माझी ओळख हाच माझा दागिना....१

©®अनुजा धारिया शेठ



सहजीवन सोसायटीमध्ये महिला दिनाची जोरात तयारी चालू झाली होती.....सोसायटी खूप मोठी होती त्यामध्ये १०-१५ मोठ्या complex होत्या आणि प्रत्येक complex मध्ये ५ विंग....जणू काही छोटे नगरच होते.....सगळ्या महिला अगदी उत्सव असल्या सारखी तयारी करत होत्या....


सोसायटीच्या अध्यक्ष सौ. माधुरी देशमुख अगदी उत्साही होत्या.....सगळ्याची त्यांना खूप आवड....त्यामुळे गेले ५ वर्ष त्याच अध्यक्ष होत्या....आणि ते ही बिनविरोध....

असो तर अशी गोकुळ असल्यासारखी ही सोसायटी..... प्रत्येक सण उत्साहपूर्ण साजरा करायची.....पण ह्या महिला दिनाची गोष्टी जरा वेगळी होती..... कार्यक्रम पण वेगळे होते.... आणि सकाळी ७ ते रात्री ९ सर्व बायकांची तिथे सर्व बाबतीत सोय केली होती. 

एकंदरीत खूप मोठा कार्यक्रम होता..... प्रमुख पाहुणे म्हणून येणारी व्यक्ती ही खूप मोठे व्यक्तीमत्व असलेली होती.... पण,तिचे नाव आधी सांगायचे नाही अशी तिने अट घातली होती....त्यामुळे सर्व महिलांना अगदी उत्सुकता होती.....

अखेर तो दिवस आला, सर्वात पहिला कार्यक्रम होता सायकलींग चा....सर्व आपल्या सायकली घेऊन सज्ज.....तेवढ्यात सावी आली तिथे.....तीच्या हातात असलेली सायकल बघून सर्व हसायला लागल्या.... कारण थोडे जुने मोडेल होते सायकलचे.. सगळ्यांची कुजबुज सुरू झाली... कोण ग ही??? 

तेवढ्यात कोणतरी बोलली अगं आताच राहायला आलेत, भाड्याने घेतलाय गोखलेंचा फ्लॅट.... आणि जुनी ओळख पण विसरलीस का??? अगं आपल्या सुधा काकू आहेत ना त्यांची मुलगी....आग पळून जाऊन लग्न केलं ना तीच ही....

तेवढ्यात  देशमुख मॅडम नि घोषणा केली सर्वांनी तयार रहा.... आपली हि रॅली शिस्तबद्ध वाटायला हवी....सगळ्यांना विनंती कृपया सहकार्य करा....

तशा सर्व बायका चूप झाल्या.... नवीन बायका होत्या त्यांना काही माहीती नव्हते, त्यामुळे त्या खूप छान वागल्या सावीशी.....जुन्या उगाच जखमेवर मीठ चोळत होत्या....पण तिने दुर्लक्ष केले....आणि सायकल रॅली खूप छान झाली....आणि ज्यांना सायकल चालवणे शक्य नव्हते त्यांना पण सहभागी होता यावे म्हणून 2 wheelar रॅली पण ठेवली होती....देशमुख मॅडमचा हाच स्वभाव होता की सगळ्यांना भाग घेता आला पाहिजे....म्हणून तर त्या सर्वांच्या लाडक्या होत्या.....तर असा हा पहिला कार्यक्रम खूप छान झाला....

त्यानंतर सर्वांना चहा,कॉफी ठेवली होती, देशमुख मॅडम स्वतः सर्व आवर्जून बघत होत्या.... सावी नुकतीच रहायला आली होती.... आणि तिच्या सोबत पण त्या छानच वागत होत्या.....

आणि अचानक सुधा काकू आणि सावी समोरासमोर आल्या...तिची आईच त्या....त्यांना बघून तिला भरून आले....त्याना ही वाट्त होते पोटच्या पोरीला जवळ घ्यावे....पण सर्व आठवलं मागचे आणि त्या रागाने निघून गेल्या.....बाजूच्या बायका बघत होत्या सर्व.....आणि लांबून मजा बघत होत्या....

तेवढ्यात परत देशमुख मॅडमनि पुढचा कार्यक्रम घाेषित केला...आणि सर्व बायका तयारीत मग्न झाल्या.....

तेवढ्यात कोणीतरी विचारले मॅडम आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आल्या नाहीत???

मॅडम म्हणाल्या अहो आल्यात त्या, सायकलींग पण केले त्यांनी आपल्या सोबत...पण त्यांची अट आहे ना म्हणून नाव घेतले नाही....त्यांना सर्व कार्यक्रम अगदी एन्जॉय करायचे आहेत तुमच्या सोबत म्हणून तर त्या शेवटी म्हणजे अगदी बक्षिस वितरण सोहळा होईल तेव्हाच स्टेजवर येणार आहेत....

आता मात्र सर्व बायका विचार करू लागल्या....कोण नवीन होते का सकाळी.....पण सोसायटी एवढी मोठी होती....बरेच चेहरे तसे नवीन....पण देशमुख मॅडम मात्र सर्वांना अगदी नावासकट ओळखत असत.....

पण दुसरा कार्यक्रम सुरू होणाऱ त्यामुळे जास्त कॊणी मनावर घेतले नाही....सर्व तयारी करायला गेल्या....

पहिला कार्यक्रम झाला सायकल आणि....बाईक चा....

आता दुसरा कार्यक्रम होता.... पाककला, रांगोळी आणि चिञकला.....इथे सुद्धा देशमुख मॅडमनि सर्वांना सांभाळून घेतले होते.... जेणेकरून लहान मुलींपासून तें सर्व आजीपर्यंत त्यांनी सर्वांना भाग घ्यायला लावला....  2 तास वेळ दिली होती..  मग् सर्वाना जेवण.... सर्व अगदी मन लावुन करत होत्या.... सावीला लहान असल्यापासून चित्र काढायला आवडत असे....अन स्वयंपाक पण....

पण नियम होता...एक व्यक्ती जास्तीत जास्त २ स्पर्धां मध्ये भाग घेऊ शकते.... पण वेळ वाढवून मिळणार नाही.... वेगळे बक्षिस मात्र होते.... त्यासाठी....

सावीने दोन्ही मध्ये भाग घेतला..... अगदी छान स्पर्धा झाल्या..... सुधा काकूंनी सुद्धा पाककला मध्ये भाग घेतला होता.... नेमके दोघींचे टेबल एकच आले.... माय लेकींनी कशी बशी वेळ सांभाळून नेली.... पण, त्यांची सून अंकिता तिला काही हे पटत नव्हते....

ती वाट बघत होती, कधी एकदा सावी तिला भेटते....तिने वाट बघितली.... आणि सर्व बायका जेवण करण्यासाठी गेल्यावर तिला बोलायला सुरुवात केली????  तू का आलीस परत???  एकदा आमची शोभा करून गेलीस ना मग् आता परत काय आहे??? तू मुदाम आलीस आम्हाला त्रास द्यायला.... तू निघून जा या सोसायटी मधून.....आणि हो आज सुद्धा पुढचा कार्यक्रम करायला थांबु नकोसं....

त्या कार्यक्रमा मध्ये स्वतः ची ओळख करून द्यायचे.... त्यातून तें निवडणार आहेत मिस आणि मिसेस ऑफ  सहजीवन सोसायटी....

तू येशील तेव्हा काय ओळख करून देशील ग???  आमची इज्जत घालवायची आहे का परत???  सगळ्यांना नाही माहीती तूझं नी आमचे नाते.....  आम्हाला ते माहीती करून द्यायचे पण नाही.... तुझी काय ओळख आहे ग? .... सावी काहीच बोलली नाही.... तेवढ्यात देशमुख मॅडम आल्या.... तिला जेवायला घेऊन गेल्या....

थोड्या वेळात हळदी कुंकूचा कार्यक्रम होता.....त्यानंतर मग् निवडणार होते मिस आणि मिसेस ऑफ सहजीवन सोसायटी....

सर्व बायका तयारी करायला गेल्या.... तेवढ्यात परीक्षकांनी येऊन सर्व स्पर्धा बघितल्या... त्यांनी रिज़ल्ट देशमुख मॅडमकडे दिल्या.... पुढच्या कार्यक्रमासाठी त्या सुद्धा तयारी करायला गेल्या.....

हळदी कुंकू म्हणून सर्व बायका अगदी नखशिखांत नटुन आल्या.... पाया पासून डोक्या पर्यंत दागिने घालून.... कॊणी नउवारी, कॊणी पैठणी, कॊणी गुजराथी, तर कॊणी बेंगाॅली.... थिम करून फोटो काढत होत्या..... सावी आली... अगदी सिम्पल नारायण पेठ साडी... नाकात नथ... गळ्यात मंगळसूत्र आणि बारीक ठुशी.... तिला बघितलं तर अंकिताला राग आला.... तूला बोलले होते ना येऊ नको.... का आलीस?? आलीस ती आलीस परत हि अशी.... खोटे दागिने मिळतात तें तरी घालायचं.....

पण सावी मात्र गप्प.... ती नुसती हसली.... आणि म्हणाली आग वहिनी हळदी कुंकू आहे.... त्याला कधी पाठ करू नये ग म्हणून आले.... अंकिता कुत्सितपणे हसली....अन म्हणाली खर आहे, गरीब असला तरी नवरा आहे तूझा..... सुधा काकू दागिने घेऊन आल्या आणि म्हणाला हे घाल.... आमची लाज राख.... सावी म्हणाली आई तू सुद्धा.... असे बोलतेस... नको मला....

पुढच्या कार्यक्रमाची सुरवात झाली... देशमुख मॅडम येऊन सावी ला घेऊन गेल्या.... पण सावी मात्र  भूतकाळात गेली....

क्रमशः


बघूया काय आठवत असेल तिला??? आणि कार्यक्रमाचे काय होते????

कशी वाटली कथा? आवडली असेल तर नक्की लाइक करा अन अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..

©®अनुजा धारिया शेठ

सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने