© अस्मिता देशपांडे
मे महिन्याची तळपती, रणरणती दुपार.. रजनी हातामध्ये तीन चार जड पिशव्या हातात घेऊन चटचट पावले उचलत चालली होती.
तेवढयात समोरून येणारी आलिशान कार तिच्यासमोर थांबली.. तिने दचकून मान वर करून पाहिले.. कारमधुन एक नखशिखांत सुंदर तरुणी उतरली आणि अगं तू रजनी ना??? असं विचारलं.
रजनी चाचरत हो म्हणताच तिने तिला घट्ट मिठीच मारली भर रस्त्यात... रजनी गोंधळून गेली होती...
मग तीच म्हणाली अगं ओळखलं नाहीस का मला.. मी नीरजा..
चल बस गाडीत.. सोडते तुला घरी...
चल बस गाडीत.. सोडते तुला घरी...
रजनीने ओळखले नीरजाला.. अगं किती वर्षांनी भेटते आहेस... आणि केवढी बदलली आहेस.. कशी ओळखणार तुला...
मग नीरजाने हात धरूनच तिला आपल्या गाडीत बसवले...
गाडीतल्या सुखद थंडाव्याने रजनी शहारली... नीरजाच्या उंची, सुगंधी परफ्युमने गाडीतले वातावरण अधिकच सुगंधी झालेलं होतं.. रजनीला क्षणभर आपल्या घामट कपड्यांची लाजच वाटून गेली...
ती नीरजाकडे निरखून बघत होती... केवढी बदलली होती नीरजा ...
डार्क रेड कलरचा स्लीव्हलेस लॉन्ग फ्रॉक, गळ्यात चमचमता डायमंडचा नेकलेस, कानात हिऱ्याच्या कुड्या, हातात पण डायमंड ब्रेसलेट, चमचमत होती नुसती आणि चेहरा एकदम तुकतुकीत, टवटवीत...
वरवर ती नीरजाच्या प्रश्नांना उत्तरे देत होती पण मनातल्या मनात तुलना करत होती तिची स्वतःशी... आपली जुनी, मातकट रंगाची सुती साडी उगाचच पुन्हा पुन्हा सावरत होती रजनी...
तेवढ्यात नीरजा म्हणाली... तुला वेळ असला तर येतेस का माझ्या घरी... थोडा वेळ गप्पा मारू आणि मग सोडते तुला तुझ्या घरी.. काय चालेल ना...?
रजनी म्हणाली.. हो चालेल ना ... गप्पा मारुयात.. किती वर्षे झाली भेटून...
माझे लग्न झाले. त्यानंतर दोनच महिन्यांनी. .तुझे लग्न झाले तेव्हा आपली सगळी गल्ली हरखून गेली होती.
केवढं श्रीमंत स्थळ चालून आलं तुझ्यासाठी म्हणून... मामा मामीपण किती खूष होते जबाबदारीतुन मुक्त झाले म्हणून..सासरचं किती कौतुक करत होते तुझ्या..
माझ्या आई बाबा कडून तुझ्या सासरच्या श्रीमंतीचे खूप किस्से ऐकले होते.. पण परत तुझी काही वार्ता कळलीच नाही कारण नंतर मामामामी दुसऱ्या गावी गेले.. तू कुठे राहतेस हे माहितीच नव्हतं बघ...
नीरजा थोडी बावरली.. पण क्षणात सावरत म्हणाली हो हो घरी तर चल.. सगळं सांगते. .
रजनी पुन्हा भूतकाळात गढून गेली होती..
नीरजा थोडी बावरली.. पण क्षणात सावरत म्हणाली हो हो घरी तर चल.. सगळं सांगते. .
रजनी पुन्हा भूतकाळात गढून गेली होती..
रजनी आणि नीरजा अगदी जिवलग मैत्रिणी..दोघींची घरे अगदी जवळजवळच होती.. रजनी दिसायला सामान्य होती आणि नीरजा अतिशय सुंदर होती.
गोरा लखलखीत रंग, घारे डोळे, लांब पिंगट केस .. लहानपणीच आईवडील एका अपघातात वारले.
तिच्या मामा मामींना मुलबाळ नव्हते त्यामुळे पोटच्या. मुलीसारखा सांभाळ करत होते तिचा.
नीरजा आणि रजनी शाळेपासून एकत्र असायच्या. पुढे सोबतच बी. कॉम केले दोघीनी.
नीरजा आणि रजनी शाळेपासून एकत्र असायच्या. पुढे सोबतच बी. कॉम केले दोघीनी.
वर्षभरातच रजनीचे लग्न रमाकांतशी करून दिले तिच्या आईवडिलांनी.. रमाकांत एका प्रायवेट कंपनीत काम करत होता. खाऊन पिऊन सुखी कुटुंब..
नीरजाला मात्र अतिशय श्रीमंत घरातून मागणी आली होती.
नीरजाला मात्र अतिशय श्रीमंत घरातून मागणी आली होती.
निखिल एक गर्भश्रीमंत मुलगा होता आणि नीरजाच्या सौंदर्यावर भाळून त्याच्या घरातून मागणी घालून तिच्याशी लग्न केले होते त्याने .
गल्लीतले सगळे अगदी दिपून गेले होते नीरजाच्या सासरची मंडळी आणि त्यांचा थाटमाट बघून...
नीरजा आणि निखिलची जोडी अगदी सुंदर दिसत होती. तेव्हा रजनीला तिच्याबद्दल सूक्ष्म असूया निर्माण झाली होती...
तिला नेहमी वाटायचं... रजनी आणि नीरजा... दोन नावं...दोन्ही नावात सारखीच अक्षरं... एक नाव उलट केलं तर दुसरं... आणि आपली नशिबही तशीच तर नाहीत का...
तिला नेहमी वाटायचं... रजनी आणि नीरजा... दोन नावं...दोन्ही नावात सारखीच अक्षरं... एक नाव उलट केलं तर दुसरं... आणि आपली नशिबही तशीच तर नाहीत का...
मी पडले अगदी साध्या घरात आणि हिला मिळाले गर्भश्रीमंत सासर...
पण हळूहळू सगळं विसरून रमाकांत सोबत त्याच्या तुटपुंज्या पगारात संसारात रमत गेली.
आणि आता कितीतरी वर्षांनी पुन्हा नियतीने दोघीना एकमेकींसमोर उभे केले होते. पूर्ण भूतकाळ रजनीच्या नजरेसमोर क्षणात तरळून गेला..
तेवढ्यात नीरजा रजनीला म्हणाली.. मॅडम कुठे हरवलात... घर आलेय माझे .. चल..
आणि आता कितीतरी वर्षांनी पुन्हा नियतीने दोघीना एकमेकींसमोर उभे केले होते. पूर्ण भूतकाळ रजनीच्या नजरेसमोर क्षणात तरळून गेला..
तेवढ्यात नीरजा रजनीला म्हणाली.. मॅडम कुठे हरवलात... घर आलेय माझे .. चल..
रजनी भूतकाळातून परत आली..
बघते तो काय गाडी मोठ्या बंगल्यासमोर उभी होती...
नीरजा तिला गेटमधून आत घेऊन गेली..
निगुतीने लावलेली आणि पोसलेली फुलझाडे, फळझाडे बघून क्षणाक्षणाला रजनीला त्या बंगल्यातील ऐश्वर्याची प्रचिती येत होती.
एका नोकराने दार उघडले आणि ते प्रशस्त सुंदर घर बघून रजनीचे डोळेच दिपून गेले.
एका नोकराने दार उघडले आणि ते प्रशस्त सुंदर घर बघून रजनीचे डोळेच दिपून गेले.
पाय रुतेल एवढं गुबगुबीत कारपेट...प्रशस्त सोफा..घराचा कोपरा न कोपरा उंची वस्तुंनी सजवलेला दिसत होता..
एवढं मोठं घर ती पहिल्यांदाच पाहत होती. डोळे विस्फारून रजनी हे सगळं ऐश्वर्य डोळ्यात साठवत होती आणि पूर्वीचीच असूया पुन्हा एकदा तिच्या मनात घर करत होती.
तेवढ्यात नीरजा आली.. सरबताचे ग्लास घेऊन.. आणि बोलू लागली.. कशी आहेस तू रजनी... कसं चालू आहे.. मिस्टर काय करतात.. मुले किती आणि काय करतात
रजनी खोटं हसत म्हणाली... माझे काय गं बाई.. चालू आहे रुकुटुकू संसार. .

प्रायव्हेट कंपनीत मिळणार किती तो पगार.. एक छोटं दोन रूम चं घर आहे.. दोन मुले आहेत एक पाचवीत आणि दुसरा तिसरीत .
मिळालेल्या पगारात कसंबसं घर चालवते आहे... तुझं बरं आहे.. श्रीमंत घरात पडलीस..
आयुष्याचं सोनं झालं तुझ्या ...तू मात्र अधिकच सुंदर दिसू लागली आहेस... श्रीमंतीचे तेज अगदी झळकत आहे हं तुझ्यावर....
हम्म्म्म्म... मोठा सुस्कारा सोडत नीरजा म्हणाली... रजनी तुला हे जे दिसतंय ती नाण्याची एक बाजू आहे.. चमकती, चकाकती... दुसरी बाजू ऐकायची आहे तुला??
रजनी न समजून म्हणाली.. म्हणजे मी नाही समजले.. काय म्हणायचं आहे तुला?

नीरजा म्हणाली... माझे सौंदर्यच माझ्यासाठी शाप ठरेल असं वाटलं नव्हतं गं..
निखिलच्या घरून मागणी आली तेव्हा मी पण तुम्हा सगळ्यासारखी हरखून गेले..
आता माझ्या आयुष्यात सुखाची बरसात होणार म्हणून आनंदाने फुलले होते...
लग्नातला थाटमाट बघून मी पण सुखावले होते. लग्नानंतर लगेचच मला निखिल हनिमूनसाठी म्हणून गोव्याला घेऊन गेला. मला तर स्वर्ग दोनच बोटे उरल्यासारखा वाटत होता.
लग्नातला थाटमाट बघून मी पण सुखावले होते. लग्नानंतर लगेचच मला निखिल हनिमूनसाठी म्हणून गोव्याला घेऊन गेला. मला तर स्वर्ग दोनच बोटे उरल्यासारखा वाटत होता.
निखिल ने माझ्यासाठी कितीतरी कपड्यांची खरेदी केली होती.. त्याच्या हौशी स्वभावाने किती गुदगुल्या झाल्या होत्या मनात तुला काय सांगू....
त्या कपड्यात अगदी छोटे छोटे असेही कपडे होते.. अगदी वन पीस, टू पीस बिकिनी असे... मला लाजच वाटली असे कपडे पाहून... पण निखिल म्हणाला माझी बायको प्रत्येक कपड्यात किती सुंदर दिसतेय हे पाहायचं आहे मला... आणि तो भराभर सगळ्या अँगलने माझे फोटो काढत होता.. एकाच वेळी मला त्याचे आश्चर्य आणि अचंबा वाटला होता...
आनंदाच्या लाटेवर स्वार होत असताना पुढे कुठले समुद्री वादळ माझ्या आयुष्यात येणार आहे याची मला त्यावेळी जाणीवच नव्हती गं... !!!!!
गोव्याला आपण एक महिना राहणार असे तो म्हणाला... मी म्हटलं एवढे दिवस... कशासाठी?? घरी तुमचे आई वडील, सगळे नातेवाईक वाट बघतील ना.. मला ही माझे सासरचे घर बघायचे आहे कसं असेल ते...
तोच निखिल छद्मी हसत म्हणाला... कुठलं सासर आणि कसलं काय.. मी तुझ्याशी लग्न केलं ते तुझे सौंदर्य पाहून.. आणि तुला विचारणारे आगेमागे कुणी नाही म्हणून..
तुझ्या मामा मामीचे तोंड सुद्धा बंद केलेय आम्ही भरपूर पैसे चारून... आणि त्यांनी जास्त काही करण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारायला मागे पुढे बघणार नाहीत आमच्या टोळीची माणसं.
आमची एक टोळी आहे. स्त्रियांची तस्करी करणारी...
आमची एक टोळी आहे. स्त्रियांची तस्करी करणारी...
गेले पंधरा दिवस मी जे फोटो काढलेत ना ते माझ्या सगळ्या सर्कलमध्ये पाठवले आहेत.. आणि तुझ्यासारख्या सुंदर आणि सोज्वळ, नव्याकोऱ्या मुलीला बाजारात भरपूर मागणी आहे ... .
तयार रहा.. उद्याच एक फॉरेनचा क्लायंट येणार आहे....
हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली... सगळी स्वप्ने डोळ्यासमोर बेचिराख झाली होती... माझे सौंदर्य माझ्यासाठी एक मोठा शाप ठरलं होतं...
हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली... सगळी स्वप्ने डोळ्यासमोर बेचिराख झाली होती... माझे सौंदर्य माझ्यासाठी एक मोठा शाप ठरलं होतं...
आणि मग हा सिलसिला रोजचाच झाला... रोज कुणीतरी नविन व्यक्ती येऊन माझ्या सौंदर्याचा भरभरून उपभोग घेऊन जात होती आणि मी कणाकणानं रिकामी आणि उध्वस्त होत हात होते.
आज ही अश्याच एका कामानिमित्त या शहरात आले आणि अवचित तुझी भेट झाली.. माहेरचं कुणीतरी भेटल्याचा आनंद झाला..
तुला सगळं मनातलं सांगावंसं वाटलं म्हणून या घरी घेऊन आले.. हे काही माझं घर नाही...
अशी घरे प्रत्येक शहरात या टोळीने भाड्याने घेऊन ठेवलेली आहेत....
रजनी मलाही आवडलं असतं गं तुझ्यासारखा संसार करायला...
गरीबीतसुद्धा आनंदी राहिले असते पण माझ्या नशिबात ही काटेरी श्रीमंती आहे....
मी एकदोन वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न केला पण या माणसांचे हात खुप खूप दूरपर्यंत पसरले आहेत गं...
पुन्हा विचार केला.की मला असं स्वीकारेल तरी का पुन्हा कोणी... आणि आता हेच माझं प्राक्तन म्हणून झेलत राहिले सगळं......
तू आल्याबरोबर इथल्या ऐश्वर्याने दिपून गेलीस... पण खरं सांगू...तुझं ऐश्वर्य हे पाच वेळा काळजीने तुझ्या नवऱ्याचा आलेला फोन आहे.. जो तू कट करत असताना मी पाहिलेय...
तू आल्याबरोबर इथल्या ऐश्वर्याने दिपून गेलीस... पण खरं सांगू...तुझं ऐश्वर्य हे पाच वेळा काळजीने तुझ्या नवऱ्याचा आलेला फोन आहे.. जो तू कट करत असताना मी पाहिलेय...
तुझी दोन मुले हे तुझं खरं सुख आहे जे माझ्या नशिबात कधीच येणार नाही. ...
तुटका का असेना पण तुला तुझा संसार आहे, तुझी काळजी करणारी माणसं आहेत....
तुझ्यावर प्रेम करणारा नवरा आहे...
मी या माझ्या चेहऱ्यावरील मेकपमध्ये सगळं दुःख दडवून ठेवलंय फक्त....
माझ्या चमकत्या चेहऱ्याच्या मागे किती हतबलता आणि अपेक्षाभंग मी दडवून ठेवले आहेत हे केवळ मलाच माहिती आहे...
रजनीला तिच्या टवटवीत चेहऱ्यामागची मलूलता आणि मरगळ क्षणात जाणवली...
पायाखालचे गुबगुबीत कारपेट जणू एखाद्या काटेरी झुडुपाप्रमाणे भासू लागलं...
आपण नीरजासाठी काहीच करु शकणार नाहीत ही हतबलता ही जाणवली... आणि तिने विद्ध मनाने नीराजाचा निरोप घेतला...
घरी आल्याबरोबर तिची काळजीने वाट पाहणारा, छिद्रे पडलेली आणि घामट वासाची बनियान घातलेला रमाकांत आज तिला खूप देखणा, रुबाबदार आणि मनाने श्रीमंत वाटत होता आणि दोन खोल्यांचे तीचे घर म्हणजे एक राजवाडा...........
© अस्मिता देशपांडे
सदर कथा लेखिका अस्मिता देशपांडे यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.