सौ. अश्विनी टेंबे
कमल जोरात खाली पळत आली आणि स्वयपांकघरात येवून रडू लागली.
हमसून हमसून रडत होती पोर... राधाबाईंच्याही पोटात कळवळले.
खोबर किसायचं तसेच ठेवून त्या लगबगीनं उठल्या आणि कमलजवळ आल्या. तिच्या पाठीवर हात फिरवत तिला विचारु लागल्या.
त्यांच्या खांद्यांवर डोकं ठेवून कमल आणखीनच रडू लागली. रडतच तिने मालकांनी तिच्यावर एकदमच ओरडल्याचं सांगितलं. ते ऐकून राधाबाईंच्या सगळं लक्षात आलं.
अग... माझं चुकलं, त्या खोलीत जावू नको मालकांना तिथे कुणीही आलेलं आवडत नाही... हे तुला सांगायचं मीच विसरले. उगी उगी... आत गप्प बैस. अग मालकांनी बाईसाहेबांच्या सार्या आठवणी, त्यांचे फोटो, त्यांच्या वस्तू... असं सारं काही त्या खोलीत जपून ठेवलय. ते रोज संध्याकाळी आ्रॅफीसमधून आल्यावर त्या खोलीत जावून एकटेच बसतात. त्यावेळी तिथे जावून त्यांना डिस्टर्ब केलेलं त्यांना आवडत नाही. बाकी त्यांची काहीही तक्रार नसते बघ....
राधाताई तिला समजावत होत्या. कमल तरी बिचारी काय करणार. 23 -24 वर्षाची पोर.
हिरॉईन व्हायचं म्हणून घरातून पळून आलेली. आणि फसवली गेली. जवळचे पैसे, किडूक मिडूक सार काही संपलं.
भूक लागली म्हणून एका हॉटेलमध्ये चहा प्याला... पण बील द्यायला जवळ पैसेच नव्हते, त्यामुळे हॉटेल मालकाने तिच्यावर केलेला आरडाओरडा ऐकून त्याच हॉटेलमध्ये आपल्या क्लायेंट सोबत बसलेल्या श्रीधर काळेंनी हे पाहिलं.
त्यांच्या बरोबर असणार्या होतकरु आणि नुकताच त्यांच्या कंपनीत नोकरीला लागलेल्या राकेशला त्यांनी तिचे पैसे देवून हे भांडण मिटवून टाकण्याबाबत सांगितले.
चहाचे बिल तरी भागले होते.... पण पुढे काय... श्रीधर काळेंनी तिच्याकडे नजर टाकली.
दिसायला छान, नाकेली, प्रथम दर्शनी चांगल्या घरातली वाटणारी.... ही मुलगी इथे कशी काय... हे प्रश्नचिन्ह श्रीधर काळेंच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते.
ते पुढे येवून काही विचारणार तोच त्यांचा फोन ठणाणू लागला. त्याच नादात ते ऑफीसला पोचले.
श्रीधर काळे शहरातील एक नामवंत आणि श्रीमंत व्यक्तीमत्व. गरीब घरातील अनुवर त्यांचं प्रेम बसलं, पण लग्नानंतर अवघ्या 5 वर्षातच कॅन्सरने अनु गेली.
आईच्या जागी असणार्या राधाताईंवर श्रीधर साहेबांना सांभाळण्याची, त्यांच्या घराची जबाबदारी आली.
श्रीधरला अमेरिकेतील बहिणीशिवाय इतर कोणीही नातेवाईक नाही, त्यामुळे घरी डझनभर नोकर असूनही साहेब एकटेच होते.
बंगल्याच गेट जोरात उघडल गेलं... तोच राधाबाई लगबगीनं आत आल्या. ग्रीन टी घेवून त्या बाहेर आल्या. साहेबांनी घरात प्रवेश करताच गणूने त्यांच्या हातातील ऑफिस बॅग आणि कोट काढून घेतला. साहेब सोफ्यावर बसले...
राधाताई... तुम्ही फार करता ओ माझ्यासाठी.... त्यांच्या हातातील ग्रीन टी घेत साहेब बोलले.
साहेब तुम्ही मला कधी नोकर मानलं नाहीत, कायम आईच्या स्थानी मानत आलात तेच माझ्यासाठी खूप आहे. राधाताईंचे डोळे ओले झाले...
साहेबांनी चहा घेतला आपल्या खोलीत जायला वळणार इतक्यात... राकेश कमलला घेवून बंगल्यावर आला. आतूनच साहेबांनी विचारल अरे.. हिला इथे कशाला अणलस....
साहेब.. हिला इथल काहीच माहित नाही. हॉटेलच बील भागवून हिला बाहेर आणलं तर मला नोकरी द्या... म्हणून पायाच पडू लागली. मला पण दया आली आणि तिला इथ घेवून आलो.
साहेबांनी काहीतरी विचार करुन राधाताईंना कमलला तुमच्या हाताखाली ठेवून घ्या असे सांगितले. आणि त्या दिवसापासून कमल बंगल्यातच राहू लागली आणि राधाबाईंना स्वयंपाकघरात मदत करु लागली.
भाज्या आणणे, चिरणे, चहा करणे, बागकाम करणे.... अशी छोटी मोठी कामे ती पाहू लागली. अशातच एके दिवशी हा प्रसंग घडला आणि कमलला आपण इथे रहायलाच नको असं वाटू लागलं. त्यावेळी राधाताईंनी समजूत काढली म्हणून कमल सगळं विसरली पण त्या खोलीत मात्र जायचे तिने पूणं बंद केले.
सकाळच्या सोनेरी किरणांनी श्रीधर साहेबांचें डोळे उघडले. ही सकाळही तशी प्रसन्न होती, पण अनु गेल्यापासून श्रीधर साहेबांचं सगळ्यावरच लक्षच जणू उडालं होतं. अनुनंतर त्यांनी आयुष्यात केवळ आणि केवळ कामालाच महत्व दिलं.
घर आणि ऑफिस गावातच असल्याने ते झोपायला तेवढे घरी असायचे.... नाहीतर तेदेखील आले नसते.
त्यांना गायला खूप आवडायच... पण ते सुद्धा केवळ अनुसाठी, त्यामुळे वाढदिवसाला अनुने गिफ्ट दिलेला पियानोही त्यांनी तिच्याच रुममध्ये अतिशय जपून ठेवला होता.
संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर श्रीधर साहेब तासन तास त्या खोलीत बसत असत.
राधाबाईंनी आणलेला चहा घेवून आंघोळीला जाणार तोच गाण्याचा नाजूक आवाज कानावर पडला. त्यांनी खिडकीतून खाली पाहिलं तर कमल बागेला पाणी देत गात होती.
त्या आवाजाच्या दिशेने साहेब तसेेच खाली आले. पायरीवर बसून तिचा तो मधूर आवाज ते ऐकत होते.
बागेतलं काम आटोपून कमल आत येवु लागली तोेच तिला पायरीवर बसलेले साहेब दिसले. तशी ती चमकली....
साहेब... तुम्ही इथ...? तिथे आत खुर्चीवर बसा. चहा आणू का... कमल चा उडालेलेा गोंधळ साहेब पाहात होते.
अग कमल, असू दे मी चहा घेतला. तुझा आवाज खूप छान आहे. अशीच गात रहा....
साहेबांच्या या कॉम्लप्लीमेंटने कमल अगदीच खूश झाली.
या आनंदातच तिने नाश्ता, चहा केला.
ऑफिससाठी आवरुन साहेब खाली आले.
नाश्ता केला.
राधाबाई पोहे छानच झालेत.
राधाबाईंनी हसून साहेबांकडे पाहिले. साहेब आज नाश्ता मी नाही कमल ने बनवलाय.
साहेब नुसतेच हसले आणि ऑफिसला गेले.
कमलबद्दलची साहेबांची नाराजी कमी होत होती. तिने केलेला चहा, नाश्ता, पदार्थ, बागकाम त्यांना आवडू लागलं होतं.
अशातच एक दिवस साधाबाईंना त्यांचा मुलगा खूप आजारी पडल्याने चार दिवस गावाला जावं लागलं. अतिशय विश्वासाने त्यांनी कमलला या घराची आणि साहेबांची जबाबदारी सोपवली.
राधाबाई गावी गेल्याने घर अगदीच रिकामं रिकामं वाटू लागलं. त्या दिवशी कमलने बागेत नवी फुलझाडे लावली. माळ्याला बागेची देखभाल कशी करायची याबद्दलचे धडेही दिले.
साहेबांची गाडी वाजली. रात्रीचे 9 वाजले. साहेबांची वाट पाहात कमलही न जेवताच राहिली. साहेब घरी आले.
साहेब पान वाढू.
कमलने टेबल स्वच्छ करतच विचारलं.
नको... माझं बाहेर खाणं झालय, तू जेव आणि झोप.
साहेब आपल्या रुममध्ये गेले.
तोच राकेश साहेबांची बॅग घेवून आला...
कमल... साहेबांना काहीतरी खायला दे.. आज दुपारीही ते जेवले नाहीत.
कमलने मान हलवली, आणि ताट घेवून रुममध्ये गेली. तिने दार वाजवले.
यस कम इन...
कमल आत आली.. साहेब जेवून घ्या ना.
अग नको मला भूक नाहीये..., साहेबांनी तिला सांगितले पण तिच्या हट्टापुढे साहेबांना नमत घ्यावचं लागलं.
साहेबांना तिचा हट्ट पाहून अनु ची आठवण झाली. तिचं बोलणं, तिच हसणं, तिचा लाघवी हट्ट... सारं काही अगदी अनुसारखच.
अगदी पोटभरुन साहेब जेवले.
कमलही आनंदाने रुमबाहेर येणार तोंच गडगडाटी वादळासह जोरात पाउस सुरु झाला आणि लाइट गेली.
ताट घेंवून झर्रकन वळालेली कमल ओढणीत पाय अडकून जोरात पडणार तोच साहेबांनी तिला पकडलं.
तिच्या नाजुक देहाचा स्पर्श साहेबांना हवाहवासा वाटू लागला.
इतक्यात जोरात विज चमकली आणि तिने साहेबांना घट्ट मिठी मारली. जणू साक्षात त्यांची अनुच त्यांच्यासमोर उभी होती. आणि त्या पावसात दोघेही एकरुप झाले.
सकाळच्या उन्हाचा कोवळा कवडसा साहेबांच्या डोळ्यावर पडला तसे साहेबांनी डोळे उघडले... तर समोर निळ्याशार पाचवारीत कमल चहा घेवून उभी होती.
साहेब पटकन उठले. कमलकडे न पाहता, तिने आणलेला चहा न घेता ते तडक ऑफिसला गेले. कमल ला त्यांचे हे वागणे थोडे चमत्कारिकच वाटले.
दिवस कसाबसा गेला... रात्रीचे 2 वाजले तरीही साहेब अजून घरी आले नव्हते.
कमलला काळजी वाटू लागली. राकेशला फोन करणार इतक्यात साहेबांची गाडी आली.
साहेब आले, पण काहीही न बोलता रुममध्ये गेले.
पाठोपाठ जेवण घेवून कमलही गेली.
कमल, थांब काल रात्री माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. माझ्या बायकोची, जिच्यावर मी मनापासून प्रेम करतो तिची प्रतारणा मी केली आहे. प्लीज तू कुठेही जा. मी तुझी दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करतो, पण प्लीज इथे आता थांबू नकोेस.
कमल चे डोळे भरुन आले.
डबडबलेल्या डोळ्यांनीच कमलने जेवणाचे ताट टीपॉय वर ठेवले.
साहेब, तुम्ही कोणतीही चूक केलेली नाही. तुम्हाला माझ्यात अनु ताई दिसल्या त्यात प्रतारणा करण्यासारखे काही घडलेले नाही. त्यांच्याच आठवणीने तुम्ही मला जवळ घेतले. तुमचा स्पर्श, तुमच्या बाहुपाशातील कालची रात्र माझ्यासाठी अमृत होती. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमचा आदरही आहे. मी अनु ताईंच्या आठवणी तुमच्याबरोबर जपण्यचा मनापासून प्रयत्न करेन, पण प्लीज साहेब मला तुमच्यापासून दूर करु नका.
कमलच्या त्या मोहक आर्दवी चेहर्याने साहेबांना पुन्हा भूलवले.
का कुणास ठाउक पण साहेब नकळत तिच्यात गुंतू लागले.
15 दिवस झाले. राधाबाई मुलाला बर वाटू लागल्यावर बंगल्यावर परतल्या.
कमलच्या राहणीमानात झालेला बदल पाहून त्या आवाक झाल्या.
त्यादिवशी साहेबही लवकर घरी आले. ते पाहून तर राधाबाईंना चक्कर येणेच बाकी होते.
कमलने साहेबांना चहा दिला.
दोघेही अगदी हसत खेळत होते.
साहेबांना इतक मनमोकळ हसताना राधाबाईंनी पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्यांना खूपच आनंद झाला.
कमल आत येताच त्यांनी कमलची दृष्ट काढली. तुझ्यामुळे आज माझे साहेब खूप आनंदात दिसत आहेत.
राधाबाई तिच्या आलाबला घेत होत्या तेवढ्यात कमलने त्यांना सारी घडलली हकीकत सांगितली. राधाबाईंना धक्का बसला पण सुखद.
साहेबांनीही आपला मान राखून आपल्याला सारे सांगितले याचा त्यांना अभिमान वाटला. सारच सुखाच होतं.
एके दिवशी रात्री कमल श्रीधर साहेबांबरोबर असताना तिला एक फोन येतो.
साहेबांना सांगून फानवर बोलतच ती खाली येते.
बंगल्यामागे राकेश तिची वाट पाहात असतो.
तिचा हात धरुन राकेश तिला ओढतो, ती हिसका देवून हात सोडवते.
‘ए ज्यादा अगाउपणा करु नकोस हं, तुझा तोरा आता दोन मिनिटात उतरवेन. तुझं सत्य साहेंबांसमोर सांगून. सारं काही प्लॅननुसार झालं असताना, ही लग्नाची टूम काय काढलीस मध्येंच. सगळा पैसा काय तुलाच घशात घालायचाय काय...? मला तू फसवू शकत नाहीस. तुला सोडणार नाही मी... सांगून ठेवतो.‘ राकेश अगदीच संतापून बोलत होता.
हे पाहून कमल जरा ओशाळली.
तिला त्याची भितीही वाटली. आपलं नाटक लग्नापर्यंत पोचेल असं तिलाही वाटलं नव्हतं. ‘अरे तू गप्प बसतो का. त्या म्हातार्याशी मी कशाला लग्न करेन. आज बघते काय करायचं ते... तू उगाच संतापत जावू नको. आणि असा कसा इथे आलास एवढया रात्री. कुणी बघितलं तर सगळच संपेल... जा आता. फार शहाणा आहेस. मला माहित आहे आपल्यातील कमिटमेंट. बर आता जावू का मी नाहीतर येईल तो म्हातारा...‘
असं बोलून कमल वर जायला मागे वळते, तोच श्रीधर साहेब तिच्या मागेच असतात.
त्यांनी तिचं आणि राकेशच सारं बोलणं ऐकलेलं असतं.
त्यांच्या डोळ्यात तिला अंगार दिसून येतो.
ती मनोमन प्रचंड घाबरते. साहेब तसेच संतापून आपल्या खोेलीकडे जातात, पाठोपाठ कमलही जाते. साहेब रुमचे दार लावून घेतात. आणि आराम खुर्चीत बसतात.
कमल खूप विनवण्या करत असते. पण साहेब कशालाच दाद देत नाहीत. अखेर खिडकी फोडून कमल आत येते.
साहेबांजवळ बसते. त्यांचा हात हातात घेते, तोच त्यांचा हात तिला थंड लागतो.
ती त्यांना हलवते, तर साहेबांना हृदयविकाराचा तिव्र झटका आलेला असतो.
तिचं सत्य साहेबांपर्यंत पोचून साहेंबांपर्यंतच संपलेलं असतं.
आपल्या लालचीपणामुळे, नीचपणामुळे एका भल्या माणसाचा जिव गेला याची तिला खंत वाटायला लागते.
ती राधाकाकूंना उठवते. साहेब गेल्याचं सांगते.
सारं घर शोकाकुल होतं.
अमेरिकेतून साहेबांची बहिण येते.
साहेबांनी आपलं विल यापूर्वीच केलेलं असतं. त्यानुसार आपल्या इस्टेटीची योग्य वाटणीही त्यांनी केलेली असते. त्यानुसार, बीहिणीला एक फ्लॅट, राधाकाकाकुंना फार्म हाउस आणि कमलच्या नावे इतर सर्व इस्टेट त्यांनी लिहून ठेवलेली असते.
आपण काय केलं. या पेशासाठी देवासारख्या माणसांना फसवलं.
तेही राकेशसारख्या नमक हरामासाठी. मी कुल्टा आहे.
मला जगण्याचा काहीच अधिकार नाही, मी मारलं त्या भल्या माणसाला... कमलचच मन तिला खात राहत.
राकेश तर कधीच पळून गेलेला असतो.
पण घरातल्या मंडळींचा तिच्यावरचा विश्वास, प्रेम तिला घर सोडून जावू देत नाही.
पण काही दिवसांनी आपल्या नावावरची सारी इस्टेंट साहेबांच्या बहिणीच्या नावे करुन कमल घर सोडते.
पण प्रचड विश्वास ठेेवलेल्या एका प्रेमाच्याच माणसाने आपला विश्वासघात केल्याचं दु:ख घवूनच साहेब देवाघरी गेले, त्यानंतर त्यांची पै अन पै चांगल्या कामासाठी वापरली जावी यासाठी कमलने केलेलं जिवाचं रान, त्या भल्या माणसाच्या गावीही नाही..... ही सल मात्र कायम तिच्यासोबत होती.
सौ. अश्विनी टेंबे
सदर कथा लेखिका सौ. अश्विनी टेंबे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!! 📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...