©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे
जय आणि सुमित दोघे एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. दोघे एकाच वर्गात, जिवलग मित्र.
जयचे वडील चांगल्या हुद्द्यावर होते. सुमित चे वडील बऱ्यापैकी कमवत होते. एक छोटासा बिझिनेस होता. परंतु ते सतत आजारी असायचे त्यामुळे शिल्लक अशी राहत नव्हती.
सुमित मात्र खूप हुशार नेहमी वर्गात पहिला दुसरा नंबर असायचाच.
जयला क्लास लावून पण पाचच्या पुढेच असायचा. जयच्या आईचे सुमित वर फार प्रेम, तितकेच कौतुक पण.
आता आता त्याच्या वडिलांचे आजारपण खूप वाढले होते. त्यामुळे बिझिनेस कडे दुर्लक्ष होऊ लागले. जवळची शिल्लक संपत आली.
शेवटी सुमितची आई म्हणाली. मी सुध्दा आता घराबाहेर पडते. काहीतरी छोटे मोठे काम बघते. सुमित तसाही जय कडेच असतो जास्त. जयच्या आईंना त्याबद्दल बोलते मी. लक्ष ठेवतील त्या सुमित वर. या वर्षी सुमितच्या वह्या, पुस्तक , दप्तर सगळे त्यांनीच घेऊन दिले. आता फी भरावी लागेल. शिवाय रोजचा खर्च.
खरय तुझे म्हणणे. पण अग तु जेमतेम दहावी शिकलेली. काय काम जमणार तुला ?
मी काही लगेच लोकांची धुणी, भांडी करायला नाही जाणार हो! पण कित्येक शिकलेले लोक कॅटरिंगचा बिझिनेस करतात. अगदी कॅटरिंग नाही पण, जेवण बनवायचे काम तर करू शकते. हाताला चव आहे हो माझ्या !
आपल्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये किती तरी नवरा बायको नोकरी करतात. मागे तीन चार जणी बोलत होत्या . कुणी जेवण बनवणारी असेल तर सांगा.ऐकत होते मी. सकाळी पोळी भाजी आणि रात्री वरण, भात, भाजी पोळी चार हजार पगार देणार बोलल्या होत्या. दोनतीन घर मिळाले तरी तेव्हढाच हातभार.
कल्पना चांगली आहे. मी पण जमेल तसा धंदा करतोच आहे. निदान कुणापुढे हात पसरायला नको. कर तू हे काम.
खरच मी आज स्वतःला खूप मूर्ख समजतो.
का ?
आता काय झाले असे ?
तु म्हणाली होती. अहो मी पुढे शिकू का?
निदान आपल्याच मुलांचा अभ्यास घेता येईल. पण मी स्पष्ट नकार दिला. शिकून मोठे दिवे लावणार आहेस!
बस मुकाट्यानं घरात ! शिकली असतीस तर नक्कीच कुठे आज छोटी मोठी नोकरी लागली असती.
ते सोडा हो आता, झाले गेले गंगेला मिळाले. जेवण बनवणे हे सुध्दा फार मोठे शिक्षण आहे. ते हॉटेल मैनेजमेट का काय करतात पोरं, खूप सारी फी भरून आणि मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण बनवतात. मी लोकांच्या घरी बनवणार. फरक इतकाच.
कुठून इतका समजूतदार पणा येतोस ग तुझ्याकडे. हे सगळ परिस्थिती शिकवते हो !
मी आताच जाऊन येते त्या ताई कडे. तीनचार दिवसापूर्वीच बोलल्या होत्या त्या. आडनाव आठवत नाही. हो पण घर माहित आहे . बाई मिळाली त्यांना दुसरी तर पंचाईत व्हायची.
हो जा तु! तसाही आज रविवार आहे, घरीच असतील.
Door bell वाजवली त्याच ताईने दार उघडले.

नमस्कार ताई! मी सुमितची आई, गीता ! तुम्ही बागेत आल्या होत्या मैत्रिणी सोबत. तेव्हा मी तुमचे बोलणे ऐकले होते. तुम्हाला जेवण बनवायला बाई हवी म्हणून !
हो ! हो !
आठवते मला !
तुम्हाला जेवण बनवायला बाई मिळाली का हो ताई ?
नाही हो !
कोणी आहे का तुमच्या ओळखीत ?
या ,आत या गीता ताई !
बसा.
अहो गीता ताई, बाई मिळतच नाही आहे!
फार धावपळ होते माझी !
रोजचं कोणाला कोणाला विचारत असते.
ताई माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नसते. त्यांचा बिझिनेस आहे. पण इतका चालत नाही. म्हणजे त्यांना कामावर जाताच येत नाही. मग कसा चालणार. शिवाय औषध पाण्यावर फार खर्च होतो. त्यामुळे पैश्याची गरज आहे. म्हटले आपणच का करू नये. मला सगळ जेवण बनवायला येते ताई.
फक्त मला पैश्याची खूप गरज आहे . म्हणून ठरवले काहीतरी करावे. तुमचे त्या दिवशीचे बोलणे आठवले. तशीच इकडे आले.
मला चालेल !
तुम्ही सांगा कधी पासून येताय!
अहो ताई कधी पासून काय विचारता ?
आत्ता पासूनच सुरू करते.
काय?
हो ताई !
खूप निकड आहे हो पैशाची !
सगळी सोंग करता येतात पण पैशाचे नाही !
खरय !
बर आता सहा वाजले , आता पहिले फक्कड चहा करा. मग जेवणाचे बघू. त्यांनी चहा ठेवला.
त्यांचा मुलगा पण खेळून घरी आला. सुमितच्या आईला बघून म्हणाला, गीता काकु तुम्ही ?सुमित कुठे आहे?
तो पण आला का ?
नाही रे बाळा !
तो जय कडे अभ्यास करायला जातो बोलला. तिथेच थोडावेळ खेळतो बोलला.
त्याची आई म्हणाली, अक्षय तू ओळखतो या काकूंना !
हो आई !
तो बागेत येतो खेळायला ! कधी कधी काकु येतात!
काकु काकांना बरे आहे का ?
नाही रे बाळा !
म्हणून तर....
तेवढ्यात त्याची आई म्हणाली. अक्षय तुला माहित आहे काका आजारी असतात ते.
हो आई !
सुमित सांगत असतो.
आई या वर्षी त्याच्या वह्या , पुस्तक , दप्तर सगळे जयच्या आईबाबांनी घेऊन दिले. सुमित सांगत होता.
तेव्हा जय म्हणाला, त्याचे बाबा म्हणाले आपण त्याची फी पण भरू. हुशार मुलगा आहे. उगाच वर्ष वाया जायला नको.
काय ?
हो ताई !
अक्षय बरोबर बोलतो.
या वर्षी सगळा खर्च त्यांनीच केला. फी चे मला आत्ताच कळले.
खूप मदत करतात आम्हाला. सुमित त्यांच्याच घरी जास्त असतो.
अक्षय तुला माहीत आहे, आज आपण या गीता काकूंना आपल्या कडे जेवण बनवायला ठेवले. मला इतके माहित नव्हते. खरतर जयची आई मला चांगली ओळखते. पण कधी बोलल्या नाही. असतो एकेकेकाचा स्वभाव. मदत करतात पण त्याचा उहापोह नाही करत.
आज पासून आपण पण तुझ्या सुमितला मदत करू. गीता ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि हो अजून तीनेक घरी तुम्हाला नक्की काम मिळेल.
ताई खूप उपकार होतील. हे बघा गीता ताई ही उपकाराची भाषा खरच नको.
अहो आम्हाला खरच काही माहित नव्हते. नाहीतर कधीच तुम्हाला बोलावले असते.
नाही ताई, मी आज पहिल्यांदा हा निर्णय घेतला. तडक तुमचे घर गाठले. या आधी मी घराच्या बाहेर कधी पडलेच नाही.
अच्छा !
तुम्ही एक काम करा, तुम्हाला मी भाज्या काढून देते. छान पावभाजी करा. तोवर मी माझ्या त्या तीन मैत्रिणी आहे त्यांना फोन करून विचारते. त्यांना बाई हवी का म्हणून?
खूप उपकार होतील ताई !
हे बघा गीता ताई, पुन्हा ही उपकाराची भाषा वापरू नका. नाहीतरी मी नाही करू देणार तुम्हाला काम.
सॉरी ताई!
दोघींनी बसून चहा घेतला.
त्या भाजी चिरत होत्या, तेव्हढ्यात त्यांना सगळी कडून जेवण बनवायला पाठवा म्हणून होकार आला. आज त्यांच्या हाती बारा,तेरा हजाराचे काम आले होते. सगळ्यांना उद्या पासून येते असा निरोप दिला.
पावभाजी बनवून झाली. आज पहिलाच दिवस, अक्षयची आई म्हणाली , गीता ताई दोनतीन पाव आणि थोडी भाजी सुमित साठी घेऊन जा.
त्या नको नको म्हणत असताना त्यांनी डबा पॅक केला सुध्दा.
चार घरचे काम सुरू झाले. बऱ्यापैकी चालले होते.
दुपारच्या वेळी काही छोट्या मोठ्या पार्टीच्या ऑर्डर यायला लागल्या. कधी इडली चटणी, कधी मेदू वडा, कधी काय. आता रोजचं काहीतरी ऑर्डर असायचीच. हातात पैसा बऱ्यापैकी येत होता. तीनचार वर्ष निघून गेली. जय आणि सुमित दोघेही बारावीला होते. त्याने गणित आणि सायन्स दोन्ही घेतले होते. जयने फक्त सायन्स. कारण त्याला डॉक्टर व्हायचे होते.
सुमित म्हणाला होता दोन्हीचा अभ्यास करतो. जमेल तसे बघू नाहीतर आपले BSC जिंदाबाद .
कॉलेज सुरू होऊन सहा महिने झाले. सुमितच्या बाबांची तब्बेत दिवसोंदिवस बिघडतच होती. त्याच काळजीने एकदिवस अचानक सुमिचे बाबा झोपेतच गतप्राण झाले. बहुतेक हार्ट अटॅक आला असावा.
कसा बसा सुमित यातून सावरला. पुन्हा अभ्यासाला लागला. परीक्षा जवळ आली.
जयचे बाबा म्हणाले .तुम्ही दोघे मिळून अभ्यास करा. जयला म्हणाले, जय मेडिकलला तुला पाठवायचे माझे नक्की आहे. कोट्यातून नंबर नाही लागला तर डोनेशन देणार. पण तुला डॉक्टर करायचे हे माझे स्वप्न आहे.
वरून हे ही म्हणाले, तू अभ्यास कर, government कोट्यातून जर तुझा नंबर लागला तर आपण सुमितच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करू. तो सुध्दा डॉक्टर होणार.
बाबा खरच !
होय जय अगदी खर !
जयने हे सुमितला नाही सांगितले .पण दोघे जिद्दीने अभ्यास करायला लागले.
परीक्षा झाली, बारावी उत्तम मार्कने पास झाले. अर्थात सुमित जिल्ह्यात पहिला होता.
खूप कौतुक, सत्कार झाले.
आता तो इंजिनिअरचां फॉर्म भरणार, जयचे बाबा म्हणाले, सुमित तुला खात्री आहे तु मेडिकल ची entrance exam चांगल्या मार्कने पास होणार.
हो काका !
पण फी झेपणार नाही!
म्हणून मग नाही घेणार एडमिशन !
काय ?
अरे वेडा झाला का?
जय म्हणाला त्याची government कोट्यातून नक्की एडमिशन होणार.
त्याच्यासाठी मी डोनेशन सुध्दा देण्याची तयारी ठेवली होती. तुला तर माहित आहे सत्तर अंशी लाखाच्या आसपास लागले असते.
पण मी जेव्हा त्याला बोललो, जर तुझा government कोट्यातून नंबर लागला तर आपण सुमितला पण डॉक्टर करू.
हे ऐकून तो तुझ्या बरोबरीने जिद्दीने अभ्यास करत होता. त्याचे डाऊट तुला विचारत होता. त्याने एकच ध्यास घेतला कोट्यातून नंबर लागून आम्ही दोघे डॉक्टर होणार .
काय?
हो सुमित !
बाळा आता मागे नको फिरू !
हे बघ, हे सगळे माझे कर्ज समज तुझ्यावर. तुझे सगळे स्थिरसावर झाले की हळूहळू कर परत.
त्याने उठून तडक काकांचे पाय धरले.
काका कोणत्या जन्माची पुण्याई हो ही माझी. अशी देव माणस भेटली.
सुमित खरतर मला दोन मुलं हवी होती. एक मुलगा , एक मुलगी. पण तुझ्या काकूला जयच्या वेळी खूप त्रास झाला मग डॉक्टर म्हणाले. आता पुन्हा त्या हे सगळे सहन करू शकणार नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हाच मी तिचे ऑपरेशन तिला न सांगता करून घेतले.
नाहीतर आज अजून एकाची जबाबदारी माझ्यावर असतीच ना.
कदाचित तुला मदत करणं आमच्या नशिबात असेल.
Thank you काका म्हणत त्याने मिठी मारली.
मेडिकलचा निकाल लागला. जयला जरा कमी मार्क पडले, पण government कोट्यातून नंबर लागेल इतके नक्की होते .
सुमित नेहमी प्रमाणे अव्वल. त्याला कोणत्याही कॉलेज मध्ये एडमिशन मिळाली असती. दोघांनी फॉर्म भरले. दोघांचा नंबर पुण्याला वेगवेगळ्या कॉलेज मध्ये लागला.
एमबीबीएस झाले, त्यांनी आधीच ठरवले होते. एमबीबीएस करून थांबायचे नाही. पुढे कोणती तरी पोस्ट डिग्री नक्की घ्यायची.
पुढे सुमितचा हृदयरोगाचा डॉक्टर आणि जयचा हाडाचा डॉक्टर होण्यासाठी नंबर लागला.
पुन्हा नव्या जोमाने अभ्यास. इथेच त्या दोघांना आपल्या आयुष्याच्या जोडीदार मिळाल्या. सुमित एका गायनिकच्या प्रेमात पडला. आणि जय भूलतज्ञच्या. दोघांची प्रेम कहाणी रंगात होती.
डिग्री हातात घेऊन लग्न केले, अगदी साध्या पद्धतीने रजिस्टर, एकाच दिवशी.
वेगवेगळ्या हॉस्पिटल ला visit ला जात होते. दोन वर्ष छान गेले. जयच्या बाबांनी जागा घेऊन एक मोठे घर बांधायचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांचे जुने घर सुमितला विकले. कारण त्याचे घर अगदी one room kitchen होते. थोडे कर्ज घेऊन त्याने आपले जरा मोठे घर घेतले.
दिवस जात होते. एक गोड बातमी मिळाली. जय ची बायको गरोदर होती .तीन महिने झाले होते. एक दिवस फोन आला, मिता आहे तशीच ये. एका पेशंटचे अर्जंट ऑपरेशन करायचे आहे. ही घाई घाईने आपली स्कूटी घेऊन निघणार गाडी चालू होत नव्हती. तिने दोनतीन किक मारल्या. गाडी चालू झाली. हॉस्पिटलला पोहचली. भूल दिली , ऑपरेशन झाले. पण हिच्या पोटात दुखायला लागले. तिथेच हॉस्पिटल मध्ये तिचा गर्भपात झाला.
एकाचा जीव वाचवला, पण पोटातल्या बाळाचा जीव गमवावा लागला.
सगळ्यांनाच खूप वाईट वाटले. सुमितची बायको म्हणाली काय उपयोग मी गायनिक असून मिताच्या बाळाला वाचवू शकले नाही ?
खूप दुःखी झाली ती. हळूहळू सावरले सगळे.
पुढे काही दिवसात सुमितच्या बायकोला दिवस गेले. राखीने एका छान गोंडस बाळाला जन्म दिला. तेजश्री नाव ठेवले.
तेजश्री मार्च मध्ये दोन वर्षाची झाली. जोरात दोन घरातील सदस्यांच्या उपस्थिती
वाढदिवस साजरा केला.
आणि आठ दिवसाने कोरोना ने भारतात प्रवेश केला. तसा प्रवेश आधीच झाला होता. आता तो धुडगूस घालत होता. अचानक रुग्ण संख्या वाढायला लागली. Lock down करावे लागले. आणि डॉक्टर लोकांची जबाबदारी वाढली.
PPE कीट घालून प्रत्येक डॉक्टर सज्ज झाले होते. रुग्ण वाचावा म्हणून झटत होते. हळू हळू कोरोना कमी झाला.
पुन्हा लोकांची गर्दी, लग्न, साखरपुडा, वाढदिवस , valentine day , हॉटेल, ट्रेन, बस ओसंडून वाहायला लागले.
आणि आता कोरोना तिपटीने वाढला. पहिल्या वेळी मृत्यूचे प्रमाण तसे कमी होते. पण आता मृत्युने सुध्दा तांडव मांडले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर , remdesivir injection सगळ्याची मारामार चालली. डॉक्टर लोकांना श्वास घ्यायला उसंत मिळत नव्हती.
काल अचानक जय ला ताप आला. तसेही तो घरात थोडा आईबाबा आणि बायको पासून लांबच राहत होता.
डॉक्टर असल्यामुळे ताबडतोब medicine चालु केल्या. Ct. स्कॅन केले. Ct स्कॅन चां रिपोर्ट मधे जास्त infection निघाले. ताबडतोब admit केले. श्वास घ्यायला अचानक त्रास व्हायला लागला. डॉक्टर असूनही ऑक्सिजन मिळत नव्हते. व्हेंटिलेटरची गरज होती. शेवटी वीस किलोमीटर लांब त्याला admit केले. तोवर दोन दिवस निघून गेले.
चार दिवसाने त्याच्या बायकोला सुध्दा घसा खवखवणे चालू झाले. तिने सुध्दा टेस्ट केली positive निघाली. Ct स्कॅन केले.
Infection कमी होते. पण ही खूप घाबरली होती. कारण नवरा जय खूप serious होता. तिच्या इच्छेनुसार तिला पण जयच्या हॉस्पिटल ला admit केले. सुमित सतत डॉक्टरांशी संपर्क करत होता. त्यांचे म्हणणे जय रिस्पॉन्स देतच नाही. सगळे उपाय करतो. पण जय जैसे थे !
डॉक्टर म्हणाले, यांनी मनातून धास्ती घेतली आहे, आणि याच आजारावर medicine आणि उपचार दोन्ही नाही.
वीस पंचवीस लाख बिल झाले, इकडे जयचा शॉक घेऊन मिता सुध्दा जास्तच आजारी झाली. तिला पण व्हेंटिलेटर वर ठेवले. दोघांचे बिल वाढत होते. पण रिस्पॉन्स नाही.
जय चे आई बाबा खचून गेले होते. पैश्याची जुळवाजुळव होत नव्हती. एक दिवस सुमित ला म्हणाले, मी घर विकायला काढतो. मुलगा, सून दोघे कमावते म्हणून मोठ घर बांधलं, आता हप्ते भरणे, आणि हे बिल दोन्ही मला अशक्य आहे. एखादा छोटा फ्लॅट घेतो. तुला कोणी ओळखीत असेल तसे सांग.
ठीक आहे काका पण तुम्ही घाई करू नका. मी बघतो गिर्व्हाइक . खूप उपकार होतील बेटा.
काका बेटा म्हणता, मुलासारखे केले सगळे माझे आणि उपकाराची भाषा बोलता. तुम्ही नसता तर हा सुमित आज इथे नसता.
तुम्ही निवांत बसा. हा तुमचा मुलगा सगळे बघून घेणार.
तसाच उठून बँकेत गेला. दोघा नवरा बायकोचे मिळून साठ लाख लोन काढले.
डॉक्टर असल्यामुळे चार दिवसात लोन पास झाले. दवाखान्याचे थकित बिल भरले.
काकांना सांगितले, काका घर विकायची घाई करू नका. मी बोललो डॉक्टर सोबत. ते म्हणाले पैसे सावकाश द्या. ओळखीचे आहे माझ्या. आपण घर नंतर विकू. आता लोकांना माहीत आहे आपल्याला निकड आहे तर भाव पण कमी मिळेल.
ठीक आहे तू म्हणशील तसे.
दोन महिने झाले दोघेही नवराबायको ची तब्येत सुधारत नव्हती.
अखेर एक दिवस जयने शेवटचा श्वास घेतला. त्याच दिवशी दोन तासाने मिता ने आपला शेवटचा श्वास घेतला. जणू ते एकमेकांसाठी थांबले होते.
सुमित वेड्या सारखा रडत सुटला.राखीने ओळखले आता आपणच धीराने घेतले पाहिजे.
ती घरी गेली. सुमितला फोन केला तू स्मशानात जाणार तेव्हा मला कॉल कर. मी काका, काकु आणि आईंना घेऊन येते. जय आणि मिता चे शेवटचे दर्शन तरी घेऊ दे त्यांना.
दोन डेड बॉडी ambulance मध्ये ठेवल्या, तेवढ्यात राखी त्या तिघांना घेऊन तिथे पोहचली. दोघांचे अंतिम दर्शन देऊन ती त्यांना घेऊन घरी गेली. सुमित आणि अजून दोन मित्र स्मशानात गेले.
काका, काकूंना कसे सांभाळायचे हाच प्रश्न राखीला पडला होता. त्यांचा आक्रोश ऐकून तिचाच धीर सुटत चालला होता. तिच्या सासुबाई पण खूप घाबरल्या होत्या.
राखी मनोमन म्हणत होती, देवा थांबव हे सगळ. अशी वेळ माझ्या वैऱ्यावर पण नको आणू. आपल्याच तरुण, उमद्या दोन डॉक्टर मुलांना गमवल्याच दुःख कोणतेच मायबाप झेलू शकणार नाही.
काका, काकु म्हणत होते, अरे तुला न्यायचेच होते तर आम्हा म्हातारा म्हातारीला न्यायचे असते रे ! कोणत्याच बापावर आपल्या तरुण मुलाची अर्थी उचलायची वेळ आणू नको रे !
असा कसा निष्ठुर तू !
आम्हाला जिवंत ठेवले, प्राण मात्र काढून घेतला !
खरच तू असशील तर आम्हाला पण सोबत घेऊन जा !
आज चार चिता पेटू दे!
ये !
आम्हाला घ्यायला ये !
राखी पदोपदी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती.
सुमित अग्नी संस्कार करून घरी आला. त्याचा त्याला तोल सांभाळता येत नव्हता.
कोणी कोणाला सावरायचे मोठा प्रश्न होता. कश्या बश्या आंघोळी केल्या.शेजारच्या घरून जेवण पाठवले. कुणी अन्नाच्या कणाला सुध्दा हात लावला नाही.
राखीचे लक्ष तिच्या लेकी कडे गेले. किती वेळ झाला ती एकटीच एका कोपऱ्यात बसली होती. मम्मा भूक लागली म्हणाली नाही का काही नाही. तिने दूध गरम केले. निदान ग्लास भर दूध तरी तिच्या पोटात जावे. दुधाचा ग्लास तिच्या तोंडाला लावला. तिला काय कळले कोणास ठाऊक. म्हणाली मम्मा नको मला भूक नाही !
राखीचे डोळे आसवांनी ओथंबून गेले.
तिच्या मनात आले, हिला काय कळले असेल ? आपल्यावर मुली प्रमाणे माया करणारे काका, काकु आता नाही हे तिला समजले असावे का ?
म्हणतात मुक्या प्राण्यांना सुध्दा कळते. त्यांना जीव लावणारी माणस त्यांना सोडून गेली तर. हिला नक्कीच काही तरी अघटीत घडले समजत असावे !
देवा सावर आमच्या कुटुंबाला !
ती सुमित जवळ गेली, म्हणाली सुमित तेजश्री ने काही खाल्ले नाही. दूध पण घेत नाही. तो इतकचं म्हणाला, राखी भावना असतात ग मुलांना पण. थेट त्यांच्या हृदया पर्यंत पोहचतात. किती लाडकी होती ती या दोघांची. राहू दे !
भूक लागली की मागेल ती !
सुमित मला वाटते काका , काकु आणि आईंना एक एक झोपेची गोळी देऊ या का ?
निदान थोडे तरी निवांत झोपतील !
हो बरोबर बोलते तू !
मी जाऊन आणतो !
नाही अरे!
मी मघाशी सुधीर कडून मागवून घेतल्या.
ठीक आहे दे त्यांना!
तु पण घेतो का अर्धी गोळी !
तुला सुध्दा थोड्या विश्रांतीची गरज आहे.
नाही मला नको !
तिघांना गोळ्या देऊन ते दोघे बसले. सुमित एक एक गोष्ट तिला आज पुन्हा पुन्हा सांगत होता. काका , काकूंची मदत . जय चे प्रेम, त्याचे शिक्षण. डोळे फक्त वाहात होते.
सुमित म्हणाला, राखी आता आपण इथेच राहायला येऊ. आपला तो फ्लॅट भाड्याने देऊ. त्याचे भाडे काका काकूंना देऊ. तुला काय वाटते ?
हो सुमित !
त्यांना आता एकटे ठेवणे शक्य होणार नाही. शिवाय ते घर नक्की विकायचा विषय काढणार.
हॉस्पिटल चे सगळे बिल मी भरले, दोघांचे पन्नास लाख बिल झाले होते.
बोलता बोलता डोळा लागला. दोघे एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेऊन झोपी गेले.
सकाळी राखीने चहा केला. शरीर धर्म म्हणून सगळे विधी चालले होते. प्रत्येक जण फक्त अश्रू पित होता.
पुन्हा शेजाऱ्यांनी जेवण पाठवले. आज राखीने दोन घास प्रत्येकाला भरवले.
तिसरा दिवस, दहावा , तेरावा सगळे विधी पार पडले.
काकांनी पुन्हा विषय काढला. सुमित बिलाचे काय झाले ?
काका, डॉक्टर म्हणाले द्या सावकाश. तुमच्यावर विश्वास आहे.
अरे पण द्यावे तर लागणार न !
तु एक काम कर, पेपर ला जाहिरात दे. बंगला विकणे आहे. साधारण किती पैसे येतील रे !
काका, नव्वद लाखाच्या आसपास येतील!
बिल किती झाले?
पन्नास लाख!
मग काम सोपे झाले सुमित!
बघ, पन्नास लाख बिल भर! चाळीस उरतात. एक फ्लॅट घेतो भाड्याने तिथे राहू !
हो काका!
तसेच करू!
उद्यापासून कामाला लागतो !
लवकरात लवकर घराचा प्रश्न मार्गी लावतो!
खूप उपकार होतील सुमित! आयुष्यात कुणी घरी पैसे मागायला दारात उभे राहिले नाही !
माझ्या मेलेल्या मुलाचे आणि सुनेचे बिल मागायला कुणी दारात नको!
सुमित ने अश्रूंचा मोठा आवंढा गिळला !
राखीने हलकेच आपले डोळे टिपले.
राखी सासू बाईंना म्हणाली आई तुम्ही तेजश्री ला घेऊन इथेच थांबा. मी आणि सुमित घरी जाऊन येतो
दोघे घरी गेले. कपड्याच्या बॅग भरल्या .
हातात भल्या मोठ्या बॅग बघून जय चे आईबाबा पाहतच राहिले.
गीता ताईंना मात्र त्यांच्या मुलांनी कल्पना दिली होती. त्यामुळे त्या फक्त बघत होत्या.
जय चे बाबा म्हणाले, जय काय हे ?
कोणाच्या बॅग रे !
कोणाच्या म्हणजे ?
कुठे चाललात का तुम्ही ?
नाही काका ?
आलोत!
म्हणजे ?
काका , काकु आता आपण सगळे याच घरात राहणार आहोत!
काय ?
हो काका!
हॉस्पिटल चे कर्ज फिटले आहे !
कसे?
ते मी भरले!
काय?
हो!
लोन काढले साठ लाख!
अरे पण आता चाळीस लाख मी कसे उभे करू?
ते कशाला?
तुला बाकीचे इतके पैसे कुठून देऊ!
का देणार तुम्ही मला पैसे?
काका तुम्हाला आठवते !
तुम्ही म्हणाला होता, सुमित डॉक्टर हो !
खूप अभ्यास कर !
माझी फी तुझ्यावर कर्ज समज !
जमेल तसे फेड!
काका तुमच्या ऋणातून मी आणि आई कधीच मुक्त होऊ शकणार नाही !
परंतु तुम्ही जे मायेने, प्रेमाच्या धाग्याचे जे रेशमी बंध माझ्या बालपणी माझ्या भोवती विणले होते त्याची विण थोडी उसवत होती. मी फक्त ती रेशमाची बंध आयुष्यभरासाठी बांधतो आहे बस !
त्याने बाबा म्हणून जयच्या बाबांना कडकडून मिठी मारली.
म्हणाला, बाबा हा तुमचा सुमित जय बनुन सदैव तुमच्या मागे सावली सारखा उभा असेल.
बाबा ही तुमची नात, तेजश्री .तुम्हीच तर म्हणाले होते, काय तेज आहे हिच्या चेहऱ्यावर, म्हणाले आपण हीचे नाव तेजश्री ठेऊ या.आठवत न....!
होय सुमित !
सगळ आठवत ...!
आता आठवणीच उरल्या रे ...!
त्यांनी सुमित आणि तेजू ला कडकडून मिठी मारली.
जय , माझा जय...
होय बाबा !
तुमचाच जय !
हुंदके एकायला येत होते.
आनंद आणि दुःख दोन्ही, याची देही याची डोळा सगळे अनुभवत होते.

कल्याण.
सदर कथा लेखिका सौ प्रभा निपाणे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करु नये. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.