© अस्मिता देशपांडे
सुवर्णाचे लग्न झालेले होते आणि अपर्णासाठी स्थळे बघणं चालू होते.
यात कोणाला फारसे काही वावगे वाटले नाही..
अपर्णाचीही या गोष्टीला हरकत नव्हती.. फोटो पाहून तिला आणि घरच्या सर्वानांच आशुतोष आवडला होता.
तसेही बारावी पास मुलगी, पुढे काहीही शिकण्यात स्वारस्य नसलेली मुलगी कशी उजवावी ही चिंता लागलीच होती अपर्णाच्या आई वडिलांना... त्यामुळे हे स्थळ आपसूक चालून आल्याचा आनंदच झाला त्यांना...
त्यात त्यांची हुंडयाची, मानपानाची सुद्धा काहीच अपेक्षा नव्हती.. पत्रिका, कपडालत्ता, लग्नाचा खर्च सगळं आम्ही बघून घेतो असंही आवर्जून सरदेसायांनी सांगितलं...
फक्त लग्न आशुतोषच्या घरी अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत व्हावे एवढीच अट त्यांनी घातली...ती सुद्धा अपर्णाच्या घरच्यांनी मान्य केली...
सगळी कामे करण्यासाठी फारच कमी अवधी होता.
या दोन महिन्यात अपर्णा आणि आशुतोषचे फोन चालू असायचे... तासंतास गप्पा तर होत नव्हत्या पण आशुतोष अगदीच थोडेफार बोलायचा... अपर्णाला त्याच्याशी बोलत राहावं वाटायचं पण मोघम बोलून तो फोन ठेवून द्यायचा..
मुळातच गप्पिष्ट असलेल्या अपर्णाला कधी कधी वाटायचं, की माझ्या मैत्रिणी लग्न ठरल्यानंतर किती बोलायच्या तासंतास होणाऱ्या नवऱ्याशी... तसं काहीच होत नाही आपल्यात बोलणं.. ती हिरमुसून जायची.
सासूबाई दर महिन्याला न चुकता पाळी आली का मात्र आवर्जून विचारायच्या.
एकदा त्यांनी स्पष्टच विचारले तू आता लवकर पाळणा हलू दे .पुढच्या महिन्यात पाळी आली म्हणून सांगावे लागू नये असं कर.
अपर्णा चकितच झाली.. तिच्या हातात काय होते ? आशुतोष तर त्या विषयावर सोडाच कुठल्याच बाबतीत नीट बोलायला तयार नव्हता तिच्याशी.
आशुतोषचे यांत्रिक वागणे तसेच चालू होते. अपर्णा जणू एक पुतळी होती त्याच्यासाठी. बेडरूम मध्ये यायचे आपला कार्यभाग उरकायचा आणि झोपी जायचे एवढाच दिनक्रम गेले चार महिने चालू होता.
सासूला अत्यानंद झाला.. अपर्णाही सुखावली.. आता बाळाच्या आगमनाने आशुतोषचे वागणे बदलेल असं वाटले तिला.
ही बातमी ऐकून आशुतोष खूप खूष होईल वाटलं तिला.
अपर्णाने ओझरतं ऐकलं ते वाक्य पण नीटसा काही बोध झाला नाही तिला.
माझी तब्येत ही अशी नाजूक त्यात दोन्ही मुलींच्या वेळी सीझर झालेले त्यामुळे मी तिसरा चान्स घेऊच शकत नव्हते.
आता अपर्णाला समजलं तिची सासू सतत पाळीबद्दल का विचारायची ते... पण आशुतोष च्या तुटक, यांत्रिक वागण्याचं काही गौडबंगाल कळत नव्हतं.
शेवटी मनाचा हिय्या करत तिने विचारलेच जावेला... पण तिने हा प्रश्न विचारताच जाऊ एकदम गोरीमोरी झाली आणि चटकन बाळाला ठेवून निघून गेली...
आता तिला आस होती ती दोघांनी मिळून बाळाला पाहण्याची.. बाळाच्या बाळलीला आशुतोष सोबत बघण्याची... पण आशुतोषचं वागणं अजूनच तुटक झालं होतं आता तर ......
तिला काहीच समजत नव्हतं... एवढा कसा कोरडा असू शकतो माणूस.. हा विचार करून ती थकून जायची..
अपर्णा तिला तसे बघून अवाक झाली... तेवढ्यात ती आणि आशुतोष पुढे सरसावले आणि त्यांनी तिच्या हातातून बाळाला काढून घेतलं... अपर्णाला क्षणभर काहीच कळेना नेमकं काय चालू आहे ते....
दोघेही तिच्याकडे बघून छद्मी हसत म्हणाले.. आजपासून हे बाळ आमच्या दोघांचं आहे. तुझा या बाळावर काहीही हक्क नाही.
अपर्णा धडपडत उठली व तिने बाळाला त्यांच्या हातातून घेण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला...
ती पळतच सासू सासऱ्याकडे मदत मागण्यासाठी गेली.. पण हाय रे दैवा घरातले झाडून सगळेच या कटात सहभागी झालेले होते... सगळ्यांनी मिळून अपर्णाची घोर फसवणूक केली होती......
अमृता... ही अपर्णाच्या जावेची बहीण बिहीन कोणी नव्हती तर ती होती आशुतोषची बायको.... अभिपर्णा....
त्यात मोठ्या सुनेला घाबरवून, धमकावून सामील करून घेतले... आणि अभिपर्णाला अमृता म्हणजेच तिची लांबची बहीण म्हणून अपर्णासमोर उभं केलं...
घरातल्या सर्व नोकर माणसांना सुट्टी दिली जेणेकरून कुणालाही कळू नये आशुतोषने दुसरं लग्न करून एक बायको आणली आहे....
पत्रिका तर छापल्याच नव्हत्या...लग्न समारंभाचे फोटो, शूटिंग काहीच नव्हतं त्यामुळे असा काही सोहळा झाला होता याची कुणालाच सांगोवांगी खबर नव्हती...
आणि जेव्हा अपर्णा घरात आली तिचे नाव रीतसर बदलण्यात आले.
दुसऱ्या राज्यातून स्थळ आले तेव्हा केवळ मध्यस्थावर अंध विश्वास न ठेवता मुलाची, त्याच्या घराची , इतर व्यक्तीची नीट चौकशी केली असती तर कदाचित काही सुगावा लागला असता का??
अपर्णा पुढे शिकली असती, तर ती थोडी सजग आणि डोळसपणाने आजूबाजूला काय घडत आहे याचे योग्य निरीक्षण करू शकली असती का??
सासरची मंडळी अवाजवी समजूतदारपणे वागत आहेत याचा थोडा तरी संशय अपर्णाच्या माहेरच्यांना आला असता तर पुढे घडलेल्या गोष्टी टाळता आल्या असत्या का???
गोष्टी घडून गेल्यावर जर... तर... या गोष्टींना अर्थच नसतो पण तरीही..... अपर्णाला सतत वाटत राहतं की भूतकाळात जाऊन काही गोष्टी बदलत्या आल्या असत्या तर तिचा भविष्यकाळ खचितच एवढा काळाकुट्ट ठरला नसता.........
अपर्णा एका छोटयाश्या गावातली, खाऊन पिऊन सुखी असलेल्या कुटुंबातील एक मुलगी..
आई, वडील, दोघी बहिणी सुवर्णा, अपर्णा आणि लहान भाऊ मंदार असं त्यांचे कुटुंब..
सुवर्णाचे लग्न झालेले होते आणि अपर्णासाठी स्थळे बघणं चालू होते.
अपर्णा नुकतीच एकोणीस वर्षे पूर्ण झालेली, गोरीगोमटी, ठेंगणी आणि स्वयंपाकात सुगरण होती पण अभ्यासात फारशी गती नव्हती त्यामुळे जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण घेऊन घरी बसलेली होती.
तिच्या आयुष्याकडूनही फारशा काही अपेक्षा नव्हत्याच.. आपल्यावर नितांत प्रेम करणारा नवरा मिळावा आणि आपण सुंदर संसार करावा एवढेच भोळेभाबडे स्वप्न तिने पाहिलेले होते.
अशात एका मध्यस्थाने शेजारच्या राज्यातील अत्यंत श्रीमंत असलेल्या सरदेसाईच्या धाकट्या मुलाचे म्हणजेच आशुतोषचे स्थळ अपर्णासाठी सुचवले.

मध्यस्थाने अपर्णाची पत्रिका फोटो मागवून घेतला आणि सरदेसायांकडे पोचता केला.
त्या घरची माणसे अपर्णाला बघण्यासाठी आली. आशुतोष सोबत आला नव्हता.

त्याचा फोटो मात्र त्याच्या आईने सोबत आणला होता आणि सांगितलं आमच्या आशूतोषला अपर्णा पसंत आहे... सांगितले आहे त्याने तसे फोटो पाहून.. थोडे जरुरी काम असल्याने येऊ शकला नाही या कार्यक्रमासाठी..
यात कोणाला फारसे काही वावगे वाटले नाही..
अपर्णाचीही या गोष्टीला हरकत नव्हती.. फोटो पाहून तिला आणि घरच्या सर्वानांच आशुतोष आवडला होता.
श्रीमंत, देखणा रुबाबदार, उच्चशिक्षित आशुतोषमध्ये खोट काढण्यासारखे काही नव्हतं...
आशुतोषचे आई, वडील, मोठा भाऊ , भावजय स्वभावाने चांगले वाटले अपर्णाच्या घरच्या सर्वाना...
आशुतोषचे आई, वडील, मोठा भाऊ , भावजय स्वभावाने चांगले वाटले अपर्णाच्या घरच्या सर्वाना...
तसेही बारावी पास मुलगी, पुढे काहीही शिकण्यात स्वारस्य नसलेली मुलगी कशी उजवावी ही चिंता लागलीच होती अपर्णाच्या आई वडिलांना... त्यामुळे हे स्थळ आपसूक चालून आल्याचा आनंदच झाला त्यांना...
त्यात त्यांची हुंडयाची, मानपानाची सुद्धा काहीच अपेक्षा नव्हती.. पत्रिका, कपडालत्ता, लग्नाचा खर्च सगळं आम्ही बघून घेतो असंही आवर्जून सरदेसायांनी सांगितलं...
फक्त लग्न आशुतोषच्या घरी अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत व्हावे एवढीच अट त्यांनी घातली...ती सुद्धा अपर्णाच्या घरच्यांनी मान्य केली...
आधीच एका मुलीच्या लग्नाला घेतलेले कर्ज फिटलं नव्हतं.. तेव्हा बरंच झालं सुंठीवाचून खोकला गेला असा विचार करून अपर्णाच्या आई वडिलांनी लग्नाला होकार दिला.
होकार घेऊन जाताजाता आशुतोषच्या मोठ्या वहिनीने हळूच आशुतोषचा नंबर तिला दिला होता... अपर्णाने लाजतच तो नंबर फोनमध्ये सेव्ह करून घेतला होता .
आशुतोषच्या घरच्यांनी अपर्णाच्या घरचा होकार समजताच लगबगीने लग्नाची अगदी जवळची तारीख काढली.. अगदी दोन महिन्यानंतरचा मुहूर्त...
होकार घेऊन जाताजाता आशुतोषच्या मोठ्या वहिनीने हळूच आशुतोषचा नंबर तिला दिला होता... अपर्णाने लाजतच तो नंबर फोनमध्ये सेव्ह करून घेतला होता .
आशुतोषच्या घरच्यांनी अपर्णाच्या घरचा होकार समजताच लगबगीने लग्नाची अगदी जवळची तारीख काढली.. अगदी दोन महिन्यानंतरचा मुहूर्त...
सगळी कामे करण्यासाठी फारच कमी अवधी होता.
या दोन महिन्यात अपर्णा आणि आशुतोषचे फोन चालू असायचे... तासंतास गप्पा तर होत नव्हत्या पण आशुतोष अगदीच थोडेफार बोलायचा... अपर्णाला त्याच्याशी बोलत राहावं वाटायचं पण मोघम बोलून तो फोन ठेवून द्यायचा..
मुळातच गप्पिष्ट असलेल्या अपर्णाला कधी कधी वाटायचं, की माझ्या मैत्रिणी लग्न ठरल्यानंतर किती बोलायच्या तासंतास होणाऱ्या नवऱ्याशी... तसं काहीच होत नाही आपल्यात बोलणं.. ती हिरमुसून जायची.
पण नंतर .. की ही मोठ्या, बड्या घरची लोक.. त्यांचे रीतिरिवाज कदाचित वेगळे असतील.. लग्नापूर्वी बोललेलं चालत नसेल यांच्याकडे.. किंवा असतो एखाद्याचा स्वभाव शांत राहण्याचा... असा विचार करून गप्प बसायची..
बघता बघता लग्नाची तारीख आली.
बघता बघता लग्नाची तारीख आली.
ठरल्याप्रमाणे लग्नाच्या आदल्या दिवशी केवळ पाच सहा माणसे घेऊन अपर्णाकडची मंडळी सरदेसायांच्या वाड्यावर आली.
लग्नसोहळा अगदीच साधेपणाने पार पडला... सरदेसाई कडची फारशी कोणी माणसं दिसली नाहीत.
सासू सासरे,मोठे दीर जाऊ आणि जावेची एक लांबची बहीण एवढेच नातेवाईक दिसले लग्नाला.... पण आशुतोषला साधेपणानेच लग्न करायचे होते त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळली असं त्याच्या आई वडिलांनी सांगितलं.
साधेपणा तर ठीक आहे पण काहीच रोषणाई, फोटोग्राफर, शूटिंग चीही गडबड कुठे दिसत नव्हती... असं अपर्णाच्या मनाला वाटून गेलं क्षणभर....
लग्न सोहळा पार पडला.. अपर्णाच्या घरच्यांना सरदेसायांनी अगदी भक्कम आहेर केला..आपण त्या मानाने अपर्णाला काहीच दागिने केले नाहीत, तिच्या सासरच्याना फारसा काही चांगला आहेर नाही केला या विचाराने अपर्णाचे आईवडील थोडे ओशाळले.. पण सासरच्यांनी काही हरकत नाही हो म्हणत बाजू सांभाळून घेतली.....
माहेरची अपर्णा साठे सासरची अभिपर्णा आशुतोष सरदेसाई झाली. सरदेसाईच्या घरची धाकटी सून झाली. सासरची रीत म्हणून लग्नात तीचे नाव बदलून अभिपर्णा ठेवण्यात आले...

आपल्या नावात अपर्णा.. पूर्वीचे नाव तर आहेच ना, या विचाराने ती मनोमन सुखावली...
सरदेसाईचा आलिशान वाडा बघून अपर्णा अगदी हरखूनच गेली होती.

अगदी तिच्या स्वप्नातले घर होते. मोठयामोठ्या खोल्या, उंची फर्निचर, चमचमती झुंबरे, सगळंच मोहात पाडणारं.
ती आनंदाने मोहरली..
दोन तीन दिवसानंतर पूजा वगैरे सोपस्कार झाल्यावर सासूबाईंनी तिला तिची बेडरूम दाखवली...नविन गुलाबी संसाराची स्वप्ने डोळ्यात घेऊन तिने खोलीत प्रवेश केला.

आशुतोष रात्री उशिरा आला..अपर्णा त्याची वाट पाहत चुळबुळत बसली होती... कितीतरी गोष्टी तिला बोलायच्या होत्या त्याच्याशी.
पण अपर्णाशी एकही शब्द न बोलता त्याने अगदी यांत्रिकपणे आपला पतीधर्म निभावला.
तिची लाज, संकोच, भीती या भावनाशी आशुतोष ला जणू काहीच देणेघेणे नव्हतं.
अपर्णाला जे अपेक्षित होते.. तिने जी काही हळुवार स्वप्ने रंगवली होती किंवा मैत्रिणीकडून जे काही ऐकले होते तसं रोमँटिक काहीच घडलं नव्हतं.

जे काही त्या दोघांमध्ये घडलं होतं तो केवळ एक उपचार. . प्रेमाचा लवलेश ही नव्हता त्याच्या स्पर्शात...होतं ते केवळ एक ओरबाडलेपण. अपर्णा मनातल्या मनात खंतावली.
पण सहवासाने, काही दिवसांनी फरक पडेल या आशेवर तग धरून राहिली.
पण आशुतोषचे वागणं काही बदललं नाही.
आशुतोष चे यांत्रिक वागणे सोडलं तर बाकी सगळं सासर बरंच होतं.

घरात लक्ष्मी पाणी भरत होती.. पण कामाला कोणीच नोकर चाकर नव्हते.
सगळी कामे घरातच केली जायची. नाही म्हणायला जावेची बहीण तेवढी सतत येऊन जाऊन असायची.
ती जवळच राहायची म्हणे पण दार दोनतीन दिवसांनी मुक्कामी असायची सरदेसायांकडे.
अपर्णाला तिचा मोकळा गळा आणि भकास चेहरा बघून कधी कधी विचारावं वाटायचं की तिचं लग्न झालंय की व्हायचं आहे.

पण तिच्याबद्दल फारसे कुणी बोलायचं नाही आणि ती सुद्धा अपर्णाशी एकही शब्द बोलायची नाही.
अपर्णाला आधी थोडेसे आश्चर्य वाटायचे की एवढ्या मोठ्या, श्रीमंत असणाऱ्या लोकांकडे कामाला नोकर माणसे कशी नाहीत.
अपर्णा हळूहळू रुळली या वातावरणात पण आशुतोषचे तुटक वागणे तिला नेहमीच छळत राहायचं.
बरं सासूबाई किंवा जावेला विचारायची सोय नव्हती... सासूबाई तेवढया मनमोकळ्या नव्हत्या आणि जावेच्या दोन छोटया मुली आणि तिची नेहमीच तब्येतीची कुरबुर चालू असल्याने ती आपल्या रूम मधेच जास्त राहायची.....
सासूबाई दर महिन्याला न चुकता पाळी आली का मात्र आवर्जून विचारायच्या.
पाळी आल्यावर फक्त मोठ्या देवघरात जायचे नाही एवढाच दंडक होता त्या घरात त्यामुळे अपर्णालाही हायसे वाटले होते.
माहेरसारखी शिवाशिव पाळायची गरज नव्हती तिला सासरी.
मग तरी सासूबाई आवर्जून का विचारतात हे तिला कळायचं नाही... आणि पाळी आली सांगितले की त्यांचा चेहरा कसनुसा व्हायचा. .
एकदा त्यांनी स्पष्टच विचारले तू आता लवकर पाळणा हलू दे .पुढच्या महिन्यात पाळी आली म्हणून सांगावे लागू नये असं कर.
अपर्णा चकितच झाली.. तिच्या हातात काय होते ? आशुतोष तर त्या विषयावर सोडाच कुठल्याच बाबतीत नीट बोलायला तयार नव्हता तिच्याशी.
आशुतोषचे यांत्रिक वागणे तसेच चालू होते. अपर्णा जणू एक पुतळी होती त्याच्यासाठी. बेडरूम मध्ये यायचे आपला कार्यभाग उरकायचा आणि झोपी जायचे एवढाच दिनक्रम गेले चार महिने चालू होता.
अपर्णा हताश झाली होती ती कशाला नकार ही देऊ शकत नव्हती आणि ही गोष्ट कुणाशी उघडपणे बोलू ही शकत नव्हती. घालमेल होत होती तिची अक्षरशः.
एक दोन महिन्यातच तिची पंधरा दिवस पाळी लांबली तसे तिने सांगितले सासूला.

सासू आनंदित झाली... लगेचच फॅमिली डॉक्टर कडे घेऊन गेली नी ती प्रेग्नन्ट असल्याचे कळले.
सासूला अत्यानंद झाला.. अपर्णाही सुखावली.. आता बाळाच्या आगमनाने आशुतोषचे वागणे बदलेल असं वाटले तिला.
ही बातमी ऐकून आशुतोष खूप खूष होईल वाटलं तिला.
तिने बातमी सांगितली आणि खरंच त्याचा चेहरा उजळला आणि तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला.
बरं झालं सुटलो मी.
अपर्णाने ओझरतं ऐकलं ते वाक्य पण नीटसा काही बोध झाला नाही तिला.
सातव्या महिन्यात अपर्णाच्या घरचे तिला माहेरी बाळंतपणासाठी न्यायला आले.
तेव्हा सासूबाईनी सांगितले नको तुमच्या गावात फारशी चांगली सोय होणार नाही तेव्हा इकडंच करू हिचे बाळंतपण.
तुम्ही येण्याची सुद्धा तसदी घेऊ नका. आम्ही कळवतो प्रसूती झाली की.
अपर्णाची एवढी काळजी घेणारे सासर बघून आई बाबांना तर आनंदच झाला पण लेक माहेरी न आल्याचे थोडे वाईटही वाटले.
अपर्णाचे पूर्ण दिवस भरले आणि तिने अतिशय गोंडस, सुदृढ मुलाला जन्म दिला.

घरात सासू सासरे दीर जाऊ आणि जावेची ती बहीण, अमृता सगळेच अतिशय आनंदित झाले.
बाळाला पाहण्यासाठी आशुतोष आणि अमृता दोघे मिळून आले होते.
दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद झळकत होता. अपर्णा तेवढया त्रासातसुद्धा आशुतोष आणि अमृताच्या चेहऱ्यावरचा आनंद निरखत होती.
ती घरी आल्यापासून, त्या अमृताला पहिल्यांदाच एवढी आनंदी बघत होती.
मोठी जाऊ आली तिनेही बाळाला खूप आनंदाने हातात घेतले नी म्हणाली. मिळाला बाई सरदेसाईच्या वंशाला दिवा. मी तर काही नाही देऊ शकले. सासू सासऱ्याची पूर्ण भिस्त तुझ्यावरच होती वंशाच्या दिव्यासाठी.
मोठी जाऊ आली तिनेही बाळाला खूप आनंदाने हातात घेतले नी म्हणाली. मिळाला बाई सरदेसाईच्या वंशाला दिवा. मी तर काही नाही देऊ शकले. सासू सासऱ्याची पूर्ण भिस्त तुझ्यावरच होती वंशाच्या दिव्यासाठी.
माझी तब्येत ही अशी नाजूक त्यात दोन्ही मुलींच्या वेळी सीझर झालेले त्यामुळे मी तिसरा चान्स घेऊच शकत नव्हते.
आता अपर्णाला समजलं तिची सासू सतत पाळीबद्दल का विचारायची ते... पण आशुतोष च्या तुटक, यांत्रिक वागण्याचं काही गौडबंगाल कळत नव्हतं.
शेवटी मनाचा हिय्या करत तिने विचारलेच जावेला... पण तिने हा प्रश्न विचारताच जाऊ एकदम गोरीमोरी झाली आणि चटकन बाळाला ठेवून निघून गेली...
अपर्णा तिच्या या गूढ वागण्याने अजूनच बुचकळ्यात पडली...
पण तेवढ्यात अपर्णाचे आई, बाबा, भाऊ बहीण सगळेच बाळाला पाहण्यासाठी आले त्या आनंदात ती हे विसरली...

तिच्या आईबाबांनी तिला काही दिवसासाठी माहेरी घेऊन जाऊ का म्हणून पुन्हा विचारले पण तेव्हाही सासू सासऱ्यांनी नकार दिला.
अपर्णा घरी आली बाळाला घेऊन... जंगी स्वागत झाले बाळाच्या आणि तिच्या आगमनाचे.
अपर्णा घरी आली बाळाला घेऊन... जंगी स्वागत झाले बाळाच्या आणि तिच्या आगमनाचे.
आता तिला आस होती ती दोघांनी मिळून बाळाला पाहण्याची.. बाळाच्या बाळलीला आशुतोष सोबत बघण्याची... पण आशुतोषचं वागणं अजूनच तुटक झालं होतं आता तर ......
तिला काहीच समजत नव्हतं... एवढा कसा कोरडा असू शकतो माणूस.. हा विचार करून ती थकून जायची..
बघता बघता तीन महिने झाले... बाळाचे स्तनपान, शी, शु, झोप.... सगळं करण्यात अपर्णा मनापासून रमली होती...
पण या सगळ्यात तिला आशुतोषची सोबत कुठेच जाणवत नव्हती.. तो यायचा पण केवळ बाळाकडे हर्षभरीत नजर टाकून निघून जायचा... अपर्णा त्याच्या दोन गोड शब्दासाठी तरसत राहायची.....
अमृता, जावेची बहीण मात्र आता थोडी बदलली होती.. ती अपर्णाशी बोलायची नाही मात्र कौतुकाने बाळाला घेऊन बसायची बराच वेळ...
बघता बघता बाळाला चार महिने पूर्ण झाले..
आणि तो काळा दिवस उगवला ज्या दिवशी अपर्णावर मोठी वीज कोसळली...
त्या दिवशी आशुतोष अमृता दोघेही एकाच वेळी अपर्णाच्या रूममध्ये आले.

आज अमृता काही तरी वेगळीच दिसत होती.. नेहमीची साध्या सुती साडीतली, चेहऱ्यावर एक कठोर भाव घेऊन वावरणारी , मोकळा गळा घेऊन घरातली सर्व कामे करणारी अमृता अचानक सुंदर सिल्कची साडी, मोकळे केस आणि गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र घालून तिच्यासमोर उभी होती.
अपर्णा तिला तसे बघून अवाक झाली... तेवढ्यात ती आणि आशुतोष पुढे सरसावले आणि त्यांनी तिच्या हातातून बाळाला काढून घेतलं... अपर्णाला क्षणभर काहीच कळेना नेमकं काय चालू आहे ते....
तेवढ्यात आशुतोष म्हणाला... ही माझी बायको अभिपर्णा आशुतोष सरदेसाई........
अपर्णाच्या कानावर हे शब्द आदळले आणि तिच्या कानात जणू शिसे ओतल्यासारखे झालं.
अपर्णाच्या कानावर हे शब्द आदळले आणि तिच्या कानात जणू शिसे ओतल्यासारखे झालं.
दोघेही तिच्याकडे बघून छद्मी हसत म्हणाले.. आजपासून हे बाळ आमच्या दोघांचं आहे. तुझा या बाळावर काहीही हक्क नाही.
अपर्णा धडपडत उठली व तिने बाळाला त्यांच्या हातातून घेण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला...
ती पळतच सासू सासऱ्याकडे मदत मागण्यासाठी गेली.. पण हाय रे दैवा घरातले झाडून सगळेच या कटात सहभागी झालेले होते... सगळ्यांनी मिळून अपर्णाची घोर फसवणूक केली होती......
अमृता... ही अपर्णाच्या जावेची बहीण बिहीन कोणी नव्हती तर ती होती आशुतोषची बायको.... अभिपर्णा....
होय..अभिपर्णा आशुतोष सरदेसाई...
लग्नाला चार वर्षे झाली तरी मुल होत नव्हतं त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडून तपासणी केली तेव्हा कळाले की दोष अभिपर्णा मध्ये आहे.. तेव्हा तिने आशुतोषच्या आयुष्यातून दूर जाणे पसंत केले आणि आशुतोषला दुसरं लग्न करण्याची गळ घातली.
पण आशुतोषचं अभिपर्णावर जीवापाड प्रेम होतं.. त्या प्रेमासाठी वाटेल ते करायला तो तयार होता आणि मग बाळ मिळवण्यासाठी, आपल्या रक्ताचं, आपल्या घराण्याचा वंश वाढवणारे औरस बाळ मिळवण्यासाठी घरातल्या सगळ्यांनी मिळून हा कुटील डाव रचला...
त्यात मोठ्या सुनेला घाबरवून, धमकावून सामील करून घेतले... आणि अभिपर्णाला अमृता म्हणजेच तिची लांबची बहीण म्हणून अपर्णासमोर उभं केलं...
घरातल्या सर्व नोकर माणसांना सुट्टी दिली जेणेकरून कुणालाही कळू नये आशुतोषने दुसरं लग्न करून एक बायको आणली आहे....
पत्रिका तर छापल्याच नव्हत्या...लग्न समारंभाचे फोटो, शूटिंग काहीच नव्हतं त्यामुळे असा काही सोहळा झाला होता याची कुणालाच सांगोवांगी खबर नव्हती...
आणि जेव्हा अपर्णा घरात आली तिचे नाव रीतसर बदलण्यात आले.
प्रेग्नन्ट झाल्यावर रीतसर दवाखान्यात नोंदणी केली.... अभिपर्णा आशुतोष सरदेसाई.......
झालेल्या बाळाच्या जन्म दाखल्यावर नाव होते बेबी ऑफ अभिपर्णा आशुतोष सरदेसाई.......
आज तोच जन्मदाखला अपर्णासमोर नाचवत आशुतोष आणि अभिपर्णा दोघे क्रूर हसत होते
विकृत हसत आशुतोष तिला म्हणाला .... आता हे बाळ आमच्या दोघांचं आहे..... तुझा यावर काहीच अधिकार नाही आणि तू कोर्टात धाव घेतलीस तरी तुझ्याकडे या विरुद्ध काहीच पुरावा नाही त्यामुळे यापुढे इथे राहायचं असेल तर एक गुलाम बनून राहावं लागेल... अथवा तुला तुझ्या माहेरचा मार्ग मोकळा आहे.... पोटगी मागण्याचा तर विचारही करू नकोस कारण आपले लग्न झाले आहे हे तू सिद्धच करू शकणार नाहीस कोर्टात...
अपर्णा हे ऐकून पार कोलमडून गेली....सगळ्यांच्या वागण्याची संगती तिला आत्ता लागली होती.

पण हातातून सगळंच निसटून गेलं होतं... तिची काहीही चूक नसताना, आयुष्याचा खेळखंडोबा होऊन बसला होता.... विमनस्क अवस्थेत ती माहेरी परतली.....
आई वडील भावाने शक्य तितके प्रयत्न करून पाहिले ..लग्न ज्या मध्यस्थाने ठरवले त्याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने कानावर हात ठेवले कारण त्याचं तोंड आधीच बंद केलं होतं सरदेसाईनी...
गावातल्या चांगल्या वकिलाकडे धाव घेतली पण लग्न झालं असल्याचा कुठलाच पुरावा ते उपलब्ध करू शकले नाहीत आणि केस उभीच राहू शकणार नाही असं वकिलाने सांगितले.....
सगळं काही संपलं होतं अपर्णासाठी... तिच्या स्वप्नांचा डोळ्यासमोर चुराडा झाला... आणि कोणीच काहीच करू शकलं नाही...
आता विचार केल्यानंतर तिच्या घरच्यांना आपण भूतकाळात केलेल्या चुका आठवतात पण भूतकाळ जाऊन पुसू तर शकत नाही ना कोणी.....
आता विचार केल्यानंतर तिच्या घरच्यांना आपण भूतकाळात केलेल्या चुका आठवतात पण भूतकाळ जाऊन पुसू तर शकत नाही ना कोणी.....
दुसऱ्या राज्यातून स्थळ आले तेव्हा केवळ मध्यस्थावर अंध विश्वास न ठेवता मुलाची, त्याच्या घराची , इतर व्यक्तीची नीट चौकशी केली असती तर कदाचित काही सुगावा लागला असता का??
अपर्णा पुढे शिकली असती, तर ती थोडी सजग आणि डोळसपणाने आजूबाजूला काय घडत आहे याचे योग्य निरीक्षण करू शकली असती का??
सासरची मंडळी अवाजवी समजूतदारपणे वागत आहेत याचा थोडा तरी संशय अपर्णाच्या माहेरच्यांना आला असता तर पुढे घडलेल्या गोष्टी टाळता आल्या असत्या का???
गोष्टी घडून गेल्यावर जर... तर... या गोष्टींना अर्थच नसतो पण तरीही..... अपर्णाला सतत वाटत राहतं की भूतकाळात जाऊन काही गोष्टी बदलत्या आल्या असत्या तर तिचा भविष्यकाळ खचितच एवढा काळाकुट्ट ठरला नसता.........
© अस्मिता देशपांडे
सदर कथा लेखिका अस्मिता देशपांडे यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.