© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
वर्ष 1960, मुक्काम पोस्ट- अमरावती
"दिवेलागणीची वेळ टळून गेली, अजून कार्टी घरी आलेली नाही.." आईचा जीव कासावीस होऊ लागलेला.. एवढ्यात रंजू धावतपळत घरी आली अन् मागल्या दरवाजातून आत प्रवेश करती झाली.
"कार्टे, कुठं होतीस एवढा वेळ?" आईनं रागानं विचारलं.
"तात्या आलेत का घरी?" रंजूनं घाबऱ्याघुबऱ्या दबक्या आवाजात विचारलं.
"नाही अजून, पण तुला माहिती आहे नं, तरण्याताठ्या मुलींनी तिन्हीसांजेला बाहेर पडलेलं आवडत नाही 'त्यां'ना ? कुठे गेली होतीस उंडरायला ?"
"अग आई, आज मैत्रिणीचा वाढदिवस होता.. तिच्या घरी..!"
तेवढ्यात सायकलची घंटी वाजली अन् रंजू जागीच स्तब्ध उभी राहिली.

तात्या धोतर सावरत आत आले. त्यांनी कोट व टोपी काढून भिंतीवरच्या खुंटीवर लटकवले आणि खाली मान घालून उभ्या असलेल्या मुलीकडे समाधानानं नजर फिरवत घोगऱ्या आवाजात विचारलं, "दादा कुठे आहे ?"
"तो मित्राकडे गेलाय.. नोट्स आणायला" .. आईनं खालमानेनंच उत्तर दिलं.
रात्री जेवणं झाल्यावर माजघरात रंजूची आईजवळ चुळबुळ सुरू झाली. "आई, तात्यांना विचार ना.. रविवारी सगळ्या मैत्रिणी मिळून कौंडण्यपूरला डब्बेपार्टी करणार ..फक्त पाच रुपये हवेत."
"बरं, विचारेन !" आईनं जुजबी उत्तर दिलं.
"काल पण तू हेच म्हटलं.. विचारलं नाहीसच ..माझ्या सगळ्या मैत्रिणी जाणारेत.. सगळ्यांचं ठरलं सुद्धा आणि तू अजून विचारलं पण नाहीस ! मी बोलू का तात्यांशी ?"
"नको, नको संतापतील ते ! मीच विचारेन वेळ साधून!"
तात्यांचा खाकरण्याचा आवाज आला अन् मायलेकी सावध झाल्या. रंजू लागलीच खोलीबाहेर पळून गेली.
"काय म्हणत होती रंजू ?" तात्यांनी विचारलं.
"त्या मैत्रिणी मिळून कौंडण्यपूरला डब्बे घेऊन जाणारेत..पाच रुपये हवेत !"
"हे बघा, रंजूला कॉलेजात घातली! डोक्यावरून पाणी गेलं! काय डब्बेपार्ट्या करायच्यात त्या घरीच करा म्हणावं ! बाहेर जायची गरज नाही. नुसतं कौंडण्यपूरला जाऊन यायचं तर पाच रुपये ? बसचं जाण्यायेण्याचं तिकीट दोन रुपयांत होईल!"
"अहो, पोरी वाटेत काही खायला घेणार असतील ..!"
"हे बघा, असले शौक नकोत आपल्याला.. मैत्रिणींच्या नादानं आज बाहेर जायचं म्हणतेय, उद्या आणखी काही म्हणेल..!"
"अहो, पण दादा जातोच ना मित्रांबरोबर..?" आईच्या स्वरात कणव होती.
"ही नक्की त्या रंजीची अक्कल ! कॉलेजात घातलं म्हणून थोरल्या भावाशी तुलना करू नकोस म्हणावं! काय डब्बेपार्ट्या करायच्या त्या आपल्या घरीच करा !" तात्या संतापानं बाहेर निघून गेले.
दाराबाहेर आईतात्यांच्या गोष्टी चोरून ऐकत असलेली रंजू चोरट्यानं पुन्हा माजघरात शिरली.
"आई, घरी नाही मजा येत ग ! कौंडण्यपूरला आम्ही दर्शनही घेऊन येऊ ना !"
"हे बघ, रंजू ..तात्यांचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ ! ह्यापलीकडे तुला काय ठरवायचं ते ठरव !"
सगळ्या मैत्रिणी कौंडण्यपूरला गेल्या. रंजू मात्र घरीच राहिली.. एकटीच..कुढत..!
*******
वर्ष 1990, मुक्काम पोस्ट अकोला.
सायंकाळचे सात वाजले अन आईच्या आतबाहेर येरझारा सुरू झाल्या. "स्मिता अजून घरी आली नाही.. कुठे रमली कोणास ठाऊक..!" आईचं पुटपुटणं सुरू झालं.
तेवढ्यात बाबा घरी आले. "का ग स्मिता कुठे आहे ?" बाबांनी आल्या-आल्या कानोसा घेतला.
"अहो, आज ट्युशनमध्ये एक्स्ट्रा क्लास होता. सहाला संपणार होता..अजून आली नाही.."
"असू दे, मी पाहून येतो.." पायात चपला सरकवून बाबा फाटकाजवळ गेले.. तेवढ्यात स्मिता सायकलवरून आली.
"उशीर झाला?" बाबांनी विचारलं.. "क्लास सहालाच संपणार होता ना ?"
"हो बाबा, क्लास संपल्यावर सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत उभ्या राहिलो.. वेळेकडे लक्षच राहिलं नाही.. सॉरी !" स्मितानं फाटकाच्या आत येत उत्तर दिलं.
"बरं बरं, हात-पाय धुऊन ये.." बाबांनी विषय तिथेच संपवला.
रात्रीच्या जेवणासाठी सगळे एकत्र डायनिंग टेबलवर जमले अन् बाबांचा मूड बघून स्मितानं विषय काढला.."बाबा, आम्ही मुलीमुली पिकनिकला जायचं म्हणतोय, चिखलदऱ्याला.. दोन दिवस तरी लागतील.. आज सकाळी जायचं आणि उद्या रात्री परत.."
"हं.." बाबांनी नुसताच हुंकार भरला.
"पाचशे रुपये लागतील..अंदाजे.." स्मिताने चाचरत सांगितलं.
आई बापलेकीचा संवाद कान देऊन ऐकत होती.
"हे बघ बेटा, पैशांचा प्रश्न नाही. पाचशे रुपये देतो पण नुसत्या मुलींनी रात्रभर घराबाहेर राहणं बरं नव्हे !"
"बाबा, पण सगळ्याजणी तयार आहेत..!" स्मिताने बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
"हे बघ बेटा, तू आता मोठी झालीस.. मैत्रिणींबरोबर पिकनिकला जायला माझी काहीच हरकत नाही. पण दिवस बरे नाहीत. पण जर जवळपास जाऊन संध्याकाळपर्यंत परत येण्यासारखे असेल तर जा..! आणि हो आईकडून पैसे घे.. हॉटेलमध्ये खा, प्या, सिनेमा पहा.. रीगलला श्रीदेवीचा 'चांदनी' लागलाय. मैत्रिणी मिळून बघून या.. बाल्कनीचं तिकीट काढा बरं का !"
बाबांचं जेवण झालं अन् ते अंगणात शतपावली करायला निघून गेले.
अहोरात्र बाहेर रहायला सगळ्यांच्याच घरून विरोध झाला आणि चिखलद-याऐवजी मैत्रिणींनी हॉटेलिंग, सिनेमा आणि शॉपिंग असा संपूर्ण दिवस मजेत घालवला.
*******
वर्ष 2020, मुक्काम पोस्ट नागपूर.
सानवीचा आज बारावीचा रिझल्ट. सकाळपासून तिची घालमेल चाललेली .. सकाळपासून ती सारखं नेट चेक करत होती..
"ए, सानू, नेहमी नेहमी नेट चेक केल्यानं रिझल्ट चांगला येणार आहे का ?" आईनं थट्टा केली.
"ए, तू माझ्या डॉलीला काही बोलू नकोस हां.. सानू, तू ममाकडे लक्ष नको देऊस.. मला माहित आहे तू मस्त मार्क्स मिळवणार.." सानवीच्या डॅडूनं तिच्या ममाला खोटंखोटं रागावलं.
"लव यू, डॅडू.." म्हणत सानवीनं डॅडूच्या गळ्यात हात टाकला.. "फक्त तूच मला ओळखतोस.. ममा तर नुसतीच ओरडत असते.." सानवीनंही लाडीक तक्रार केली..
"असू, दे..आपण तिचं घर उन्हात बांधू .." डॅडूनंही सानवीला साथ दिली...
"डॅडू, मी मोठी झालीये आता.. इंजिनिअरिंगला जाणारेय.."
"बरं बरं,माझ्या डॉलीला माझ्याकडून एक सरप्राssईज..." डॅडूनं खिशातून एक पाकीट काढत म्हटलं..!
सानवीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.. ती डॅडूच्या गळ्यातला हात आणखीनच घट्ट करत चित्कारली " काय???"
"तुझ्यासाठी आणि तुझ्या फ्रेंड्स साठी ताडोबाचं ऑनलाइन बुकिंग करून ठेवलंय.. बारावीत उत्तम मार्क मिळणार त्याबद्दल.."
"वाऊ ग्रेट ..!" सानवी खूपच एक्साईट झाली होती..
"बेबी ..एन्जॉय .. तिथलं राहण्या जेवण्याच सगळं बुकिंग झालंय...शिवाय पाच हजार रुपये तुझ्या अकाऊंटला ट्रान्सफर करतोय...डेबिट कार्ड सोबत असू दे .." डॅडूनंं सगळं कसं अगदी परफेक्ट प्लॅन केलेलं...
"अरे, सानवी किती लहान आहे अजून..! आईनं बापलेकीच्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.
"यू डोन्ट वरी.." डॅडू ममाला म्हणाला.."आय ट्रस्ट हर..तिचं पाऊल वाकडं पडणार नाही.."
"तसं नाही रे.. कुणी नकळत फसवलं तर.."
"अगं,ती आपली मुलगी आहे.. तिला आपण बरंवाईट काय ते शिकवलंय.. तिची प्रत्येक गोष्ट ती आपल्याशी शेअर करते.. जर तिच्या बाबतीत असं काही घडत असेल तर ती सांगेलच आपल्याला.. नाहीतर तिच्या वागणुकीतून लगेच कळेल ते मला.. केवळ मनातल्या एका शंकेसाठी माझ्या मुलीच्या पायात बेड्या नाही घालू शकत मी ..."
सानवीनं ममा आणि डॅडूला मिठी मारली अन् सेल्फी काढता काढता डॅडूच्या कानात कुजबुजली.. "लव यू, डॅडू...!"

समाप्त
© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.