© राधिका कुलकर्णी.
📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार
रात्रीची निरव शांतता. अंगाला झोंबणारा थंड गारवा.
सूधीरने अंगावर शाल पांघरली.
वॉशरूमला जाऊन आला आणि नेहमी प्रमाणे झोपण्याची सर्व तयारी करत टेबलवरच्या स्वामींच्या पोथीला नमस्कार करून तो पलंगावर पसरला.
कोल्हापूरची थंडी आज जरा जास्तच बोचरी वाटत होती.

ब्लँकेट ओढून मनात स्वामींचे नामस्मरण करतच तो निद्रेची आराधना करू लागला.
अजून गूंगी चढतच होती की दारावर टकटक झाली.
" आत्ता..ह्या वेळी? दारावर टकटकऽऽ..? कोण असावं बरंऽ ? "
मनाशी विचार करतच त्याने खिडकीतून डोकावून पाहिले.

साडीचा पदर वाऱ्यावर झूळझूळताना पाहून त्याने तिथूनच विचारले,
" कोण हवेय? "
त्यावर बाहेरून मंजूळ आवाजाची किणकिण कानी पडली.
" मी मधूरा मोकाशी. तुमच्या घरासमोरच्या खोलीत आजच रहायला आलेय.मला थोडी मदत हवी होती."
अजूनही त्याची दार उघडायची हिंम्मत झाली नाही.

सूधीर तसा भित्रा ससाच लहानपणापासून.
त्यामुळेच आईने तेव्हापासून स्वामींची भक्ती जी अंगात जिरवली ती आता पंचविशी उलटली तरी त्याच्या अंतरंगाला बिलगूनच होती. आजही स्वामींचे दर्शन घेतल्याखेरीज तो झोपत नसे.
त्याने खिडकीच्या आडोशातूनच विचारले.
" कसली मदत हवीय? "
" मला थोडे दूध हवे होते.गारठा खूप पडलाय आणि आता एवढ्या रात्री बाहेरही कूठे दूध मिळणार नाही म्हणुन तुम्हाला तसदी दिली,माफ करा. "
तिची ती आर्जवी वाणी ऐकून त्याच्या मनातील शंका दूर झाली.

दार उघडून त्याने तिला आत यायला सांगितले.
ती दारातून आत आली आणि चौकटीतच थबकली.
त्याने आतल्या फडताळातून कपभर दूध तिला दिले.

तशी एक आभाराचे स्मित फेकत ती आल्या पावली परत फिरली.
दूध देताना जेवढी नजरानजर झाली तेवढ्यातच तिच्या सौंदर्यावर फिदा झाला सूधीर.

तिचे बोलण्यातले मार्दव , हसल्यावर गालावर पडणारी जीवघेणी खळी.दूधाळ गोरा वर्ण आणि सडपातळ परंतु आखीव रेखीव बांधा.
मधूरा त्याच्या मनात घर करून गेली तेवढ्या लहानशा भेटीतच.
त्या रात्री त्याला झोपच लागली नाही.
कारण सतत डोळ्यासमोर मधूराची मूर्तीच येत होती.
" तिच्यात असे काय आहे की मी तिच्या विचारात इतका गूरफटतोय !! "
त्याला काही केल्या ह्या सगळ्याचे आकलन होत नव्हते.असाच केव्हातरी डाेळा लागला.
सकाळी नेहमीच्या वेळी जाग आली.

कॉमन बाथरूमला जाताना कोपऱ्याच्या त्या खाेलीला वळसा घालून जावे लागत असे.
तो तिकडून जाताना दबकत दबकतच गेला. परंतु खोलीला तर टाळं लागलेलं.
" एवढ्या सकाळी सकाळी ही कूलुप घालून कूठे बरं गेली असेल? "
विचारांच्या आवर्तनातच त्याने बाकीची कामे उरकली आणि तो कामासाठी बाहेर पडला.
सुधीर मोरे. नूकताच नोकरीनिमित्त कोल्हापूरला आला होता.
चेन्नईच्या फार्मा कंपनीचा एम आर म्हणून तो नविनच लागला होता. फिरतीच्या नौकरीमूळे कधी कधी आठवड्याचे तीन-तीन / चार-चार दिवस तो बाहेरच असे.
आजही असाच जवळपास चार दिवसांनी घरी परत आला.

पॅसेजला वळसा घालताना कोपऱ्याच्या खोलीचा लाईट चालू पाहुन पून्हा त्याच्या विसरलेल्या स्मृती जाग्या झाल्या.
खूप इच्छा झाली दार वाजवून ख्याली खुशाली विचारावी परंतु मनातल्या विचारांना आवर घालतच तो वळला तसे दार उघडून तीच बाहेर आली.

अवचित तिच्या दर्शनाने त्याच्या चित्तवृत्ती प्रफूल्लीत झाल्या. हसून दाद देत तिकडून जात असतानाच ती म्हणाली.
" बराच उशीर झाला, आता जेवायचे कसे करणार ? "
" बघतो…… नाहीतर पार्ले जी जिंदाबादऽऽ.! "
त्यावर ती लगेच म्हणाली, " एक काम कराऽऽ, तुमचा पार्ले जी इकडेच घेऊन या. मी मस्त चहा करते.तसाही तुमचा चहा उधार आहेच माझ्याकडे…"
इतक्या रात्री कुण्या अनोळखी तरूणीच्या घरात जाणे त्याला अजिबात प्रशस्त वाटत नव्हते तर दूसरीकडे तिच्याबरोबर वेळ घालवायची आयतीच चालून आलेली संधी दवडावीही वाटत नव्हती.

हो/नाही च्या भोवऱ्यात काहीवेळ फसल्यावर अखेरीस मनाने बुद्धीवर विजय मिळवला आणि फ्रेश होऊन तो बिस्कीट पूड्यासह तिच्या घरी पोहोचला.
बैठकीत ठेवलेल्या दोनपैकी एका खूर्चीवर बसुन तो ती बाहेर यायची वाट पाहू लागला.

भांड्यांच्या खणखणाटात मिसळलेली तिच्या बांगड्यांची किणकीण कानाला सूखद आनंद देत होती.
शेवटी थोड्या वेळाने ट्रे मधे दोन चहाचे कप घेऊन ती बाहेर आली.
ती ही समोरच्या खूर्चीत बसली.
कुठल्या मुलीच्या इतक्या जवळ बसून तेही इतक्या रात्री चहा पिण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती.

तो चोरट्या नजरेने तिलाच न्याहाळत होता.
संवाद नसला तरी ती मूक शांतता त्याला सूखावत होती. अखेरीस मौन तोडत तिनेच चौकशी हेतू बोलायला सूरवात केली.
कोण कूठला,कूठे नौकरी ह्या गप्पा चालल्या तरी सतत एक कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नव्हते.
" एवढी तरूण दिसायला सुंदर तरी एकटी कशी राहते ? "
त्याच्या कपाळावरील प्रश्नांचे जाळे ओळखून मग तिनेच आपली हकिकत सांगण्यास सूरवात केली.
" मी इकडे सोलापूर जवळची. मी आणि आई आम्ही दोघीच एवढ्या जगात एकमेकींसाठी पण मागल्या वर्षी आई गेली आणि मी पून्हा एकटी पडले. नौकरी निमित्त आता इकडे आले. मला कोणीच जवळचे नातेवाईक नाही. सांगता सांगताच तिचे डोळे पाणावले.
त्यावर त्यानेच विषय बदलून तिची कोणती नौकरी वगैरे विचारले.

तिनेही सांगितले की ती सेल्समन आहे विप्रो कंपनीत. त्यांचे प्रॉडक्ट्स घरोघर नेऊन विकते. त्या बदल्यात तिला कमिशन मिळते. एकटी पूरते पैसे मिळतात.
रात्र बरीच झाल्यामूळे गप्पा रंगल्या तरी वेळेचे भान ठेऊन आटोपते घेत सूधीर आपल्या खोलीत आला.
पून्हा सकाळी बघतोय तर दाराला कुलूप.

घरोघरी फिरतीचा जॉब म्हणल्यावर जात असेल लवकर अशी समजूत करून घेत तोही आपल्या कामाला लागला.
हळुहळू दोघात छान मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर कधी झाले दोघांनाही कळलेच नाही.
आता त्यांना एकमेकांशिवाय मूळीच करमत नव्हते.
थोड्याच कालावधीत त्यांना एकमेकांच्या बऱ्याच आवडी-निवडी सवयी माहितीच्या झाल्या होत्या.
जसे कीऽऽऽ... तिला मोगऱ्याचा गजरा खूऽऽऽप आवडायचा.

मोगऱ्याच्या धूंद गंधाने वेडी व्हायची ती तर त्याला पान खूप आवडायचे.
रोज एकदा तरी पान खाल्ल्याशिवाय त्याला चैन पडत नसे.
चाळीच्या कोपऱ्यावरच्या पान टपरीवरील भैय्याची त्याच्याशी त्यामूळेच गट्टी जमली होती अल्पावधीतच..
तो देवभोळा तर ही नास्तिक.
तो देवभोळा तर ही नास्तिक.
कधी कधी एकत्र फिरायलाही जायचे दोघे पण अंबाबाईच्या दर्शनाला ती बाहेरच थांबायची आणि तो मात्र लाईनीत उभे राहून दर्शन घ्यायचा.
असेच दिवस जात राहीले तसे त्यांना आता एकमेकांशिवाय रहाणे अशक्य वाटू लागले. मग एके दिवशी त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

त्याला फार ईच्छा होती की नात्यागोत्यात सांगून सवरून थाटामाटात दारी मांडव घालून लग्न करावे पण मधूराला कुठल्याच रिती-भाती करण्यात स्वारस्य नसल्याने कोर्ट मॅरेज करून लग्न उरकावे असे ठरले.
दोघेही रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन लग्नासाठी नावनोंदणी करून आले.
आता फक्त महिन्यावर लग्न राहीले म्हणल्यावर त्यांनीही स्वत:च्या भावनांचा बांध मोकळा करत रात्रीची सोबत करायला सूरवात केली.
तिच्यासोबतचे ते धूंद क्षण त्याला वेडावून टाकायचे.

तिची ती अवखळ मिठी,नाजूक स्पर्श आणि मधाळ वाणी त्याला कधी सकाळ होऊच नये असे वाटे.
तिचा आपल्या भोवतीचा वेढा कधी सुटूच नये असे होऊन जायचे त्याला.
पण सकाळी मात्र तो उठण्या आधीच ती कामावर गेलेली असे.
दिवस संपून कधी रात्री तिच्या कुशीत शिरतोय असे व्हायचे सूधीरला. आता तर ती ही रात्री त्याची कितीही उशीर झाला तरी नटून थटून एखाद्या नवरीगत वाट पहायची.
त्याने आणलेला मोगऱ्याच्या गजऱ्यानेच रात्र धूंद आणि देह सुगंधीत व्हायचे.
म्हणता म्हणता महिना सरला आणि तो दिवस समीप आला ज्याची तो आतुरतेने वाट पहात होता.
" निदान आज तरी कामाला सूट्टी घे की ग मधूऽऽऽ… ! " सूधीरने लाडिक गळ घातली मधूराला.

त्याच्या गालावर आपली नाजूक बोटे फिरवून तीही लाडिक सूरात म्हणाली, " सूट्टीचाच अर्ज द्यायला काल गेले होते ना स्विटू, पण आमचे बॉस नेमके टूरवर गेलेले. ते आज परत येणार आहेत. तू पूढे हो ,तिकडच्या बाकी फॉर्मॅलिटीज पूर्ण कर तोपर्यंत मी त्यांना अर्ज देऊन पोहोचतेच की. मग कायमची तुझ्या जवळच हं माझ्या राजाऽऽऽ.. "
आपले ओठ अलगद त्याच्या गालावर टेकवतच ती बाहेर पडली.
त्याला तिचा तेवढाही विरह सहन होत नव्हता आता.

त्याला खरेतर तिच्या सोबतच जोडीने रजिस्ट्रार ऑफीसला जायचे होते.
तो जरासा खट्टू झाला परंतु तिची अडचण समजून घेऊन तो पूढे गेला.
तिकडे त्यांचा पाचवा नंबर होता. दहा वाजता ऑफीस उघडले आणि सगळ्यांची गडबड सूरू झाली. एक एक नंबर पार पडे पर्यंत बारा वाजले.
आता अजून फक्त एकच नंबर आणि मग त्यांच्याच नावाचा पूकारा होणार होता.

तो प्रचंड एक्सायटेड होता. आता फक्त काही क्षण आणि मग मधू कायमची माझी.
मग तिला रात्री चोरून भेटायची गरज नाही.
हवे तेव्हा हवे तिथे मी आणि मधू कायमऽऽऽ सोबत…… विचारांचे वारू बेलगाम ऊडत होते स्वप्नांच्या पंखावर स्वार …. परंतु इतका वेळ होऊनही मधूरा आली कशी नाहीऽऽ? तो वास्तवात आला.
त्याने मधूराला फोन लावला. परंतु तोही आऊट ऑफ रिच… त्याची अस्वस्थता काळजीत रूपांतरीत होऊ लागली.
इतक्यात त्यांच्या नावाचा पूकारा झाला तसे लगबगीने आत जाऊन त्याने थोडा अजून वेळ मागून घेतला.

त्याची विनंती ऐकून पंधरा मिनिटांचा अवधी देऊन त्यांनी पुढचे नंबर घेतले.
पुन्हा पूकारा झाला तरीही तिचा पत्ता नाही.
बर फोन केले तेव्हा आता तर चक्क
' धिस नंबर डझ नॉट एक्झिस्ट ' अशी टेप ऐकू येऊ लागली.

त्याला तर काहीच उलगडा होईना. वाट पाहून पाहून संध्याकाळ झाली.
काय झाले असेल? मधूचा काही अॅक्सिडेंट तर नसेल ना झाला..? की फोन हरवला,चोरीला गेला?? तो विचारात हरवला पण उत्तर सापडत नव्हते.
आता येईल मग येईल म्हणता म्हणता शेवटी ऑफीस बंद व्हायची वेळ आली पण तिचा पत्ताच नव्हता.
सूधीर निस्तेज मनाने घरी परतला. जाताजाता वाटेतल्या नेहमीच्या पान टपरीवर आपसूकच पाय थांबले.
आपले नेहमीचे कलकत्ता पान सांगून तो उदास चेहऱ्यानेच उभा राहीला.
नेहमी हसून गप्पा मारणारा गिऱ्हाईक आज गप्प गप्प पाहून टपरीवाल्यानेच प्रश्न केला,
" का हूई गवा भैय्याजी ?
आज बहूत ही चूपचूपसा लागत हो! तबियत ठीक नाही लागत का तुमरी ? "
त्याच्या आपूलकीच्या प्रश्नाने आत्तापर्यंत बांधलेला धीर सूटून तो रडायला लागला.
टपरीवाल्यालाही कळेना अचानक ह्याला काय झालं….!!!
" अरे साहबऽऽ..क्या हूवा..रोते क्यु हो? "
त्याने जवळची खूर्ची सरकवत त्याला बसायला सांगितले. प्यायला पाणी दिले. एका पंटरला सांगून त्याच्या साठी एक चहा सांगितला.
त्याचा बहर जरासा ओसरल्यावर पून्हा विचारले तेव्हा उदास चेहऱ्याने आपल्या मोबाईलच्या कव्हरपेजवरचा फोटो उघडून दाखवत तो म्हणाला ,
" देखो भैय्याजी, ये लडकी देख रही हो ना मेरे बगल मे खडी दिख रही है.., आज इससे मेरी शादी होनेवाली थी। लेकिनऽऽ…..वोऽऽ ...आयी ही नहीऽ ।
जाने क्या हूवा लेकीन उसका फोन भी नही लग रहा । "
टपरीवाल्याने चिंतीत होऊन फोटो बघायला मोबाईल हातात घेतला आणि मोबाईल स्क्रीन पाहून तो स्तिमित नजरेने सूधीरकडे पाहू लागला ……..
.
.
.
.
.
.
.
.
.
त्या स्क्रीनप्लेवर फक्त………….
सूधीरचाच फोटो अस्तित्वात दिसत होताऽऽ……..!!
~~~~~~~~~(समाप्त)~~~~~~~~~

©®राधिका कुलकर्णी.
सदर कथा लेखिका राधिका कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.