© सौ.वैशाली प्रदीप जोशी
काटकसर हा बहुतांच्या टिंगलटवाळीचा विषय आहे.काटकसर म्हणजे कंजुषी अशी एक सर्वसामान्य समजूत झालेली आहे.
मला माझ्या छंदांबद्दल विचाराल तर लेखन, वाचन, अभ्यास ह्याप्रमाणेच काटकसर हादेखिल माझा छंद आहे. इतर छंदांना वेगळा वेळ द्यावा लागतो पण माझा काटकसरीचा छंद मी माझी रोजची कामे करतानाच पूर्ण करत असते.
सकाळी उठल्यावर ट्यूबमधून टूथपेस्ट निघाली नाहीत की नवरोजी लगेच स्टोअररूम मधून दुसरी टूथपेस्ट वापरायला घेतात.
वरणभातासाठी कुकर लावताना मी कुकरची शिट्टी होऊ देत नाही. कुकरला प्रेशर चढलं म्हणजे झुकझुक असा आवाज आला की गॅस सीम करते आणि दुसऱ्यांदा प्रेशर चढलं की बंद. तेव्हढ्यातही वरण भात छान शिजतो.
उकडपेंडीसाठी किंवा शिऱ्यासाठी कणिक भाजायला,लोणी कढवायला,पन्हयासाठी कैरी उकडायला,गाजर हलवा करायला तसेच पुरण पाकावर आणायला मी हमखास मायक्रोवेव्हचा वापर करते.
उकडपेंडी, उपमा, शिरा,कोबीभात असे प्रदार्थ करताना एकीकडे पाणी गरम करायला ठेवते आणि पदार्थ कोरडे परतल्यावर त्यात गरम पाणी घालते.पदार्थ लवकर आणि छान शिजतात तसेच मोकळे होतात.
बटाटेवडे, दहीवडे, सांबारवडे,बॉलकेक असे प्रकार मी आप्पेपात्रात बनवते.
चकल्या, शेवेचा घाणा किंवा वडे असं काही तळण करायचं असेल तर एकतर मी पदार्थ तळून झाल्यावर चांगला झारुन मगच काढते म्हणजे पदार्थासोबत खूप सारे तेल निघत नाही.
सर्व स्त्रियांप्रमाणेच माझ्याकडेही ठेवणीतल्या भारीपैकी भरपूर साड्या आहेत.
पूर्वी मी जुने कपडे देऊन बोहारणीकडून भांडी विकत घेत असे.
काटकसर म्हणजे दात कोरून पोट भरणे अजिबातच नव्हे.
माझ्या मते काटकसर म्हणजे वेळ, पैसा आणि श्रम ह्यांच्या बचतीची सांगड घालून तयार झालेले उत्तम प्रॉडक्ट. थोडक्यात व्यवस्थापन कौशल्यांपैकी एक. ही एक कला तर आहेच पण त्याहून जास्त एक शास्त्र आहे.
मला माझ्या छंदांबद्दल विचाराल तर लेखन, वाचन, अभ्यास ह्याप्रमाणेच काटकसर हादेखिल माझा छंद आहे. इतर छंदांना वेगळा वेळ द्यावा लागतो पण माझा काटकसरीचा छंद मी माझी रोजची कामे करतानाच पूर्ण करत असते.
सकाळी उठल्यावर ट्यूबमधून टूथपेस्ट निघाली नाहीत की नवरोजी लगेच स्टोअररूम मधून दुसरी टूथपेस्ट वापरायला घेतात.
आमचे पिल्लूमोशाय पण बाबांच्या पावलावर पाऊल ठेवतात पण मी मात्र पहिली टूथपेस्ट दाबून त्यातली पेस्ट काढत किमान तीन-चार दिवस ती वापरतेच.
स्वैपाक करताना मला काटकसर करायला भरपूर वाव असतो.
स्वैपाक करताना मला काटकसर करायला भरपूर वाव असतो.
सकाळी उठून दह्यादुधाची ठेवरेव हे माझे आवडते काम आहे.
नोकरी निमित्त्याने साडे चार वर्षे रोज 200 किलोमीटर अपडाऊन करताना सकाळच्या बिझी श्येड्युलमध्येही माझे हे काम कधीच चुकले नाही !
आमच्याकडे रोजचा एक लिटर दुधाचा उकडा आहे तर आठवड्याला अर्धा किलो लोणी म्हणजेच महिन्याला दोन किलो लोणी किंवा पाऊणेक किलो साजूक तूप सहज निघतं.
आमच्याकडे रोजचा एक लिटर दुधाचा उकडा आहे तर आठवड्याला अर्धा किलो लोणी म्हणजेच महिन्याला दोन किलो लोणी किंवा पाऊणेक किलो साजूक तूप सहज निघतं.
साधारण तुपाचा चारशे रुपये किलोचा भाव गृहीत धरला तरी 300 रुपयांचे तूप घरीच निघते. म्हणजे दुधाचा महिन्याचा खर्च 1800/- ऐवजी 1500/- च पडतो.शिवाय त्यावर ताक फ्री !!!
झाली किनई 16% दूधबिलात बचत ? शिवाय घरच्या तुपाची सर बाजारच्या तुपाला थोडीच येते ??
मी रिकाम्या झालेल्या दुधाच्या भांड्याला कोरडी कणिक पुसून मग ती भिजवते.
मी रिकाम्या झालेल्या दुधाच्या भांड्याला कोरडी कणिक पुसून मग ती भिजवते.
तसेच लोणी कढवलेल्या भांड्यात पाणी गरम करून त्या पाण्याने कणिक भिजवते.
त्यामुळे ही भांडी स्वच्छ होतात,भांड्याना चिकटलेले दुधातुपाचे कण वाया जात नाहीत आणि पोळ्यांना आयते मोहन मिळून पोळ्या नरम होतात !
बरेचदा पोळ्या झाल्यावर गरम तवा घासण्यात जातो किंवा पाणी टाकून थंड केला जातो.
बरेचदा पोळ्या झाल्यावर गरम तवा घासण्यात जातो किंवा पाणी टाकून थंड केला जातो.
मी मात्र कुकरच्या वरणाची डाळ धुवून पाणी घालून तो डबा गरम तव्यावर ठेवून देते.तव्याची वाया जाणारी उष्णता कामी येते आणि वरण कमी वेळात शिजते.
वरणभातासाठी कुकर लावताना मी कुकरची शिट्टी होऊ देत नाही. कुकरला प्रेशर चढलं म्हणजे झुकझुक असा आवाज आला की गॅस सीम करते आणि दुसऱ्यांदा प्रेशर चढलं की बंद. तेव्हढ्यातही वरण भात छान शिजतो.
उकडपेंडीसाठी किंवा शिऱ्यासाठी कणिक भाजायला,लोणी कढवायला,पन्हयासाठी कैरी उकडायला,गाजर हलवा करायला तसेच पुरण पाकावर आणायला मी हमखास मायक्रोवेव्हचा वापर करते.
ह्यामुळे गॅसची बरीच बचत होते. (मायक्रोवेव्ह मध्ये उकडलेले बटाटे मला नाही आवडत)
उकडपेंडी, उपमा, शिरा,कोबीभात असे प्रदार्थ करताना एकीकडे पाणी गरम करायला ठेवते आणि पदार्थ कोरडे परतल्यावर त्यात गरम पाणी घालते.पदार्थ लवकर आणि छान शिजतात तसेच मोकळे होतात.
बटाटेवडे, दहीवडे, सांबारवडे,बॉलकेक असे प्रकार मी आप्पेपात्रात बनवते.
खूप कमी तेलात होतात चवीलाही छान लागतात. ह्यात तेलाची बचत हा एक उद्देश तर आहेच पण अति तेलकट खाणं प्रकृतीसाठी बरं नाही आणि वेगळं काही तर खावंसं वाटतं म्हणून हा मध्यममार्ग.
पोळ्या करताना (लॉकडाऊनमध्ये वेळ आहे) कणिक मळून त्याचे गोळे करून मगच तव्याखालचा गॅस पेटवते. त्यामुळे पोळी लाटायची राहिली म्हणून तवा रिकामा रहात नाही आणि गॅस वाया जात नाही.
पोळ्या करताना (लॉकडाऊनमध्ये वेळ आहे) कणिक मळून त्याचे गोळे करून मगच तव्याखालचा गॅस पेटवते. त्यामुळे पोळी लाटायची राहिली म्हणून तवा रिकामा रहात नाही आणि गॅस वाया जात नाही.
चकल्या, शेवेचा घाणा किंवा वडे असं काही तळण करायचं असेल तर एकतर मी पदार्थ तळून झाल्यावर चांगला झारुन मगच काढते म्हणजे पदार्थासोबत खूप सारे तेल निघत नाही.
तसेच एका परातीत पातळ पोहे किंवा मुरमुरे घेऊन तळलेला पदार्थ त्यावर काढते म्हणजे त्यामुळे पदार्थामधील अतिरिक्त तेल पोहे/मुरमुरे शोषून घेतात आणि पदार्थ तेलकट होत नाही. तसेच हे तेलयुक्त पोहे/मुरमुरे खमंग भाजून त्याचा चिवडा करता येतो.
बरेचदा मला ऑफिस दौरे किंवा घरगुती कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. अश्यावेळी मी नाश्त्याच्या पदार्थांचे घरगुती रेडीमिक्स बनवून ठेवते.
बरेचदा मला ऑफिस दौरे किंवा घरगुती कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. अश्यावेळी मी नाश्त्याच्या पदार्थांचे घरगुती रेडीमिक्स बनवून ठेवते.
शिरा, उपमा, खीर, उकडपेंडी, पुलाव ह्यांचे रेडीमिक्स तयार असले म्हणजे ह्यांना घरी नाश्ता बनवणे सोयीस्कर होते आणि बाहेरचे पदार्थ आणून खावे लागत नाहीत.
बदलीनिमित्त्य मी दुसऱ्या गावी असतानाही मी असे माझे रेडीमिक्स घेऊन जात असे म्हणजे तिथे फक्त पाणी घालून इंडक्षन वर नाश्ता तयार होत असे.
सध्या कैऱ्यांचा मोसम आहे. कैरीची डाळ, लोणचे,मेथांबा, कैरीभात,गुळंबा, पन्हं असे नानाविध कैरीचे प्रकार घरी होत असतात.

ह्यासाठी कैरीच्या फोडी किंवा कीस किंवा गर वापरला जातो आणि कोय फेकली जाते.
मी ह्या कोयी कुकरमध्ये (कोयी बुडतील इतपत पाण्यात) घालून पाच-सात मिनिटं शिजवून घेते.
कुकरचे प्रेशर गेल्यावर त्यात आणखी थंड पाणी घालून गर काढून घेते.त्यात गूळ किंवा साखर घातली की पन्हं तय्यार !!!
साबण वापरल्यावर त्याच्या बारीक चिपट्या उरतात. मी साबण अगदी चिपटी व्हायच्या आधीच त्यात पाणी टाकून विरघळवून घेते. तात्पुरता हँडवॉश तयार होतो.
साबण वापरल्यावर त्याच्या बारीक चिपट्या उरतात. मी साबण अगदी चिपटी व्हायच्या आधीच त्यात पाणी टाकून विरघळवून घेते. तात्पुरता हँडवॉश तयार होतो.
कपड्याच्या साबणाची चिपटी पाण्यात विरघळवून त्या पाण्यात एखाद दिवस कपडे भिजवते.
आमच्याकडे एक दिवसआड नळाला पाणी येतं.
आमच्याकडे एक दिवसआड नळाला पाणी येतं.
पाण्याच्या दिवशी नळाला पाणी असेपर्यंत स्वैपाक, कुलर भरणे, कपडे भिजवणे,अंघोळी करणे अशी शक्य तितकी पाण्याची कामे आटोपण्यावर माझा भर असतो जेणेकरून कूपनलिकेचा (बोअरिंग) वापर कमीतकमी होऊन विजेची बचत होईल.
माझ्या ह्या आग्रहाला घरी कडाडून विरोध होतो. मग बरेचदा मला शस्त्र खाली ठेवावी लागतात.
तरीही मला शक्य असलेली पाण्याची कामे मी त्या वेळेतच करते. जित्याची खोड ! दुसरं काय !!
घरी तरुण मुलं असली की घरात वेगवेगळी केसांची तेलं येतातच.
घरी तरुण मुलं असली की घरात वेगवेगळी केसांची तेलं येतातच.
काही पूर्ण वापरली जातात तर काही तशीच राहतात. अशी उरलेली सुगंधी/औषधी तेलं मी निरांजनात/दिव्यात घालते !
कपड्यांच्या बाबतीतही मला काटकसर करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असतात.
ड्रेस जुने झाले तरी त्याच्या ओढण्या चांगल्याच असतात अश्या सुती ओढण्या मी स्टोल म्हणून वापरते.
जुन्या फाटक्या बेडशीटचे लहान-मोठे चौकोनी तुकडे शिवून ते डस्टिंगसाठी वापरले जातात.
हे तुकडे चारही बाजूनी शिवले म्हणजे दिसायला बरे दिसतात आणि वापरायला सोयीचे होतात.
मला साडी नेसायला आवडते त्यामुळे मी ऑफिसमध्ये बरेचदा साड्या नेसते.
मला साडी नेसायला आवडते त्यामुळे मी ऑफिसमध्ये बरेचदा साड्या नेसते.
माझा साड्यांचा वापरही भरपूर आहे.
मऊ सिंथेटिक साड्यांचे गाऊन शिवून मी घालते.
साडीचे कापड दुहेरी शिवून घेतले की वेगळे अस्तर लागत नाही. असे गाऊन मला विकतच्या गाऊनपेक्षा कंफर्टेबल वाटतात.
ज्या साड्यांच्या डिझाईनमुळे गाऊन बरा दिसणार नाही असं वाटतं (खास करून स्कर्ट बॉर्डरच्या साड्या) त्या साड्यांचा मी घरात घालायला गरारा-कुर्ता शिवते.
ह्यात फक्त कुर्त्याला अस्तर लागतं !असे गरारा-कुर्ते माझी आई शिवून देते.
तिला शिवणकामाची प्रचंड आवड आहे. हा असा साडीचा ड्रेस ती स्वतः डिझाईन करते त्यामुळे तिची आवड पूर्ण होते.
वापरून जुने झालेले ड्रेस देखील मी घरात वापरते.
सर्व स्त्रियांप्रमाणेच माझ्याकडेही ठेवणीतल्या भारीपैकी भरपूर साड्या आहेत.
काहींची फॅशनसुद्धा आता राहिली नाही. अश्या साड्यांपैकी एक सर्वांत जुनी साडी मी दरवर्षी ऑक्टोबरमध्ये ऑफिसमध्ये वापरायला काढते.
अशी साडी फार नाही पण एक-दीड वर्ष सहज वापरली जाते आणि वॉर्डरोबमध्ये नवीन साडी ठेवायला जागा होते !
फॅशन आवडली नाही, रंग शोभत नाही अश्या फुटकळ कारणावरून मी कपडे कधीच वाया घालवत नाही.
फॅशन आवडली नाही, रंग शोभत नाही अश्या फुटकळ कारणावरून मी कपडे कधीच वाया घालवत नाही.
उलट असे न आवडलेले कपडे आवर्जून वारंवार घालते आणि असे कपडे पुन्हा कधीच घ्यायचे नाहीत असा कानाला खडा लावते !!
न आवडलेले कपडे न वापरताच टाकून दिले तर विस्मरणात जातील नं !
कोणते कपडे आपल्याला आवडत नसतात हे पूर्णपणे मनावर बिंबले तरच पुढे अशी खरेदी टाळता येईल !!
कोणते कपडे आपल्याला आवडत नसतात हे पूर्णपणे मनावर बिंबले तरच पुढे अशी खरेदी टाळता येईल !!
पूर्वी मी जुने कपडे देऊन बोहारणीकडून भांडी विकत घेत असे.
निरनिराळ्या प्रकारचे डबे, टिफिन, पातेले इ.भांडी मी जुन्या कपड्यांवर घेऊन ठेवली होती.
ह्यातल्या बरीच भांडी माझ्या बहिणींच्या,नणंदांच्या आंदणात उपयोगी आली तर काही भेटवस्तू म्हणून दिली गेली.
एक गंमत सांगते, आम्हाला माझ्या मुलाच्या बारश्याच्या वेळी आणि नंतर घराची वास्तूशांत आदि कारणांनी खूप आहेर मिळाले.
एक गंमत सांगते, आम्हाला माझ्या मुलाच्या बारश्याच्या वेळी आणि नंतर घराची वास्तूशांत आदि कारणांनी खूप आहेर मिळाले.
त्यात साड्या, ब्लाऊजपीस, शर्टपीस,पॅन्टपीस इत्यादि कपडे होते.
माझ्या दिराच्या लग्नाच्यावेळी देण्याघेण्यासाठी म्हणून मी हा सर्व खजिना बाहेर काढला. आणि त्या "घरच्याच कपड्यांची" वाजवीपेक्षा कितीतरी कमी किंमत लावूनही झालेल्या किमतीत बसेल एवढी 3 ग्रॅम सोन्याची अंगठी "ह्यां"च्याकडून वसुल केली !
घर म्हटलं की पै-पाहुणा आलाच ! बरेचदा रीतीप्रमाणे देणे घेणे करावे लागते.
घर म्हटलं की पै-पाहुणा आलाच ! बरेचदा रीतीप्रमाणे देणे घेणे करावे लागते.
मला घाऊक संख्येने खरेदी करायची आवड आहे. त्यामुळे मी केव्हाही कुठेही मला आवडतील अश्या वस्तू, पर्स, इमिटेशन ज्वेलरी,बॅग्स, ड्रेस मटेरियल, साड्या, नवीन प्रकारचे ब्लाऊजपीस, शो-पीसेस असं दिसलं की डझनभर तरी घेऊन येते.
घाऊक संख्येने वस्तू खरेदी केल्याने त्या स्वस्त पडतात शिवाय वेळेवर पाहूणे आल्यास ह्यातलीच वस्तू भेट म्हणून देता येते.
ऐनवेळी दुकान धुंडाळायची गरज नाही आणि वेळेवरच्या खरेदीमध्ये बजेट फिस्कटायची भीती पण नाही ! शिवाय शॉपिंगची हौस पण भागते !! है न फायदे का सौदा !!!
जवळच्या लग्नाकार्यात भेटवस्तू देताना आम्ही शक्यतो रोख रक्कम किंवा नवदांपत्याच्या गरजेची वस्तू (तेही त्यांना विचारून) देतो. त्यामुळे त्यांच्याकडेही वस्तू रिपीट होत नाही.
हे झालं देण्याबद्दल.
जवळच्या लग्नाकार्यात भेटवस्तू देताना आम्ही शक्यतो रोख रक्कम किंवा नवदांपत्याच्या गरजेची वस्तू (तेही त्यांना विचारून) देतो. त्यामुळे त्यांच्याकडेही वस्तू रिपीट होत नाही.
हे झालं देण्याबद्दल.
मला गिफ्ट्स घ्यायला खूप आवडतात आणि मला खूप गिफ्ट्स मिळत पण असतात.
आमच्या जवळचे आणि घरचे (माहेर आणि सासर) भेटवस्तू देताना विचारूनच देतात म्हणजे वस्तू उपयोगी येते आणि नुसती पडून रहात नाही.
माझ्याजवळ साधारण हव्या असलेल्या वस्तूंची यादी तयार असते त्यामुळे देणाऱ्याच्या बजेटनुसार मला हवी असलेली वस्तू मला मिळते.
एकदा बाबांनी पाडव्याच्या ओवाळणीचं म्हणून आम्हां मुलींना पैसे दिले होते.
एकदा बाबांनी पाडव्याच्या ओवाळणीचं म्हणून आम्हां मुलींना पैसे दिले होते.
मी त्या पैशातून मला हवा असलेला लहान-मोठ्या तीन डझन बरण्यांचा सेट घेतला होता जो बरीच वर्ष माझ्याकडे होता.
मागल्या वर्षी घराचे नूतनीकरण केले त्यानिमित्त्य एका बहिणीने नवीन सिलिंग फॅन तर दुसरीने संपूर्ण क्रोकरी सेट गिफ्ट केला.
त्यामुळे नवीन घरात मला आयत्या नवीनकोऱ्या वस्तू मिळाल्या. तसेच मला हवे असलेले नॉनस्टिक कुकवेअर आणि ट्रॅव्हल बॅग ह्या वस्तूसुद्धा गिफ्ट मिळाल्याने मला त्या विकत घेण्यासाठी वाट पाहावी लागली नाही !
शिवाय ह्या गरजेच्या वस्तू वापरताना आम्हाला देणाऱ्यांची आठवण हमखास येते.
माझ्या वाढदिवसाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला मी नवरोबांकडून गिफ्ट घेताना साडी किंवा ड्रेस असे गिफ्ट कधीच घेत नाही तर यानिमित्त्याने गृहोपयोगी वस्तू घेण्याचा किंवा त्या खर्चात त्या दिवशी एखादी कौटुंबिक सहल काढण्याचा पायंडा मी पाडला आहे.

ह्यामुळे "खास" दिवसाच्या स्मृती आणखी खास होतात.
मागच्यावर्षी नवरोबांकडून माझ्या वाढदिवसाप्रित्यर्थ घरी रेनवॉटर हार्वेस्टिंग करून घेतले !
त्याआधीचे तीन वर्ष आम्ही अनुक्रमे हैद्राबाद, मुंबई, सिक्कीम अश्या सहली केल्या !
आमचे एक घर भाड्याने दिले आहे त्याचे दरमहा जे भाडे मिळते ते मी एका वेगळ्या बँक खात्यामध्ये जमा करते.
आमचे एक घर भाड्याने दिले आहे त्याचे दरमहा जे भाडे मिळते ते मी एका वेगळ्या बँक खात्यामध्ये जमा करते.
म्हणजे दरमहा जमा होत जाणाऱ्या भाड्याच्या रकमेवर व्याज मिळते.
ह्या रकमेतूनच आमच्या राहत्या घराचा आणि भाड्याने दिलेल्या घराचा टॅक्स,किरकोळ डागडुजी खर्च इ.केले जातात.
वेळेवर घराचे काही काम निघाले तर खिशाला खार लागत नाही.
मी आमची जी काही थोडीफार बचत आणि गुंतवणूक आहे तिचे तक्ते बनवून ठेवले आहेत.
मी आमची जी काही थोडीफार बचत आणि गुंतवणूक आहे तिचे तक्ते बनवून ठेवले आहेत.
हे तक्ते मी वेळोवेळी अपडेट करत असते.
ह्या तक्त्यांमुळे एकाच दृष्टीक्षेपात आपल्या बचतीची आणि गुंतवणुकीची माहिती मिळते,
इन्शुरन्सचे हप्ते अगदी वेळेत भरले जातात आणि प्रीमियम उशिरा भरल्याने लागणारी लेट फी वाचते. सर्वांत महत्वाचे म्हणजे विमा संरक्षण अबाधित रहाते !
वीज बिल,इन्शुरन्स प्रीमियम, टेलिफोन/मोबाईल रिचार्ज,डिश टीव्ही असे अनेक खर्च मी ऑनलाईन भरते त्यामुळे ते माझ्या सोईनुसार भरता येतात आणि रांगेत उभं राहून होणारा वेळेचा अपव्यय आणि त्या-त्या ऑफिसपर्यंत जाण्याचा पेट्रोल खर्च वाचतो.
मी बाजारात जाताना नेहमी यादी करून नेते.त्यामुळे एका मार्गावरची कामे एका चकरेत करता येतात.तसेच वेळेची आणि पेट्रोलची बचत होते.

तसेच वाणसामान आणतानाही यादी सोबत ठेवून त्याबरहुकूम किराणा घेते.
ह्यामुळे अनावश्यक खर्चाना लगाम लागतो आणि अनावश्यक सामान घरी येत नाही !
छंद म्हणजे अशी कृती जे करून मनाला समाधान आणि शांतता मिळते. माझा काटकसरीचा छंद जोपासून मला आनंद आणि हुरूप मिळतो.
संत श्री गजानन महाराजांच्या कृपेनें आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने आम्हाला काही कमी नाही परंतु आपण वापरत असलेल्या संसाधनांची थोडी जरी बचत करता आली तर ते आपल्या आणि समाजाच्या भल्याचे आहे असं मला वाटतं.
तुम्हीसुद्धा काटकसर करता का आणि कशी करता नक्की कळवा !!!

सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.