प्रीत ( भाग 3 )

प्रीत ( भाग 3 )
सौ. प्रभा निपाणे

अंकिता मात्र या पासून कोसो दूर होती. संसाराचे स्वप्न ती सुध्दा नक्कीच पाहत होती. पण आपल्या तोला मोलाचे. स्वराज सारख्या मुलाचे स्वप्न ती फक्त स्वप्नात पाहू शकत होती.

त्याने ठरवले, आपले MBA पूर्ण झाले की या विषयावर बोलू. तोवर फक्त अंकिताच्या मनातले जाणून घेऊ.

भराभर वर्ष सरले, आता शेवटचे सहा महिने बाकी होते.

अंकिता चे बाबा एक दिवस त्याच्या मालकांना म्हणाले, साहेब पोरीसाठी स्थळ शोधायला सुरवात करतो. बघता बघता वर्ष सहा महिने निघून जातात. फक्त थोडे पैसे अंगावर द्याल. तशी थोडी तजवीज करून ठेवली.

तिच्या आईने अर्धा अर्धा ग्राम करून दोन तोळे सोने घेऊन ठेवले. जावयाला अंगठी, तिला एखादा दागिना होईल.

दिनू अरे पण मुलीला विचारले का ? आज काल मुलं आपल आपल ठरवतात. घरी आईवडिलांना सांगतात. घरचे भेटतात, लग्न ठरते.

नाही साहेब माझी मुलगी अस काही करणार नाही. पण तरी सुद्धा आज घरी गेलो की नक्की विचारतो. असेल तिच्या मनात, आणि आमच्या तोलामोलाचा तर मला काही अडचण नाही . लागलीच बार उडवून देतो.


बर! बर !

तु तिच्याशी बोल, तिचे असे काही नसेल तर स्थळ शोधायच्या आधी मला सांग. माझ्या नजरेत एक स्थळ आहे. अगदी तुझ्या तोलामोलाचे आहे..मी शब्द टाकला तर नाही म्हणणार नाही.

साहेब खरच !

हो !

कुठले स्थळ आहे !

आपल्या कंपनीत एक सद्गृहस्थ आहे, त्यांचा मुलगा आहे. अंकिता सारखाच MBA करतो. मुलगा सालस आहे. एक दोन वेळा कंपनीत आला होता. तेव्हा त्याचे वडिलच बोलले होते.

अंकिताला जेव्हा पासून मी पाहतो, तिच्या अगदी सुयोग्य स्थळ आहे.

पण हो!

जर तिचे कोणावर प्रेम असेल तर मात्र हा विषय इथेच संपवू.

आजच घरी जाऊन अंकिता ला विचारतो.

रात्री अंकिता जवळ हा विषय काढला. बाबा ! माझे कोणत्याच मुलावर प्रेम वगैरे नाही. तुम्ही माझ्यासाठी योग्य तेच करणार खात्री आहे.

अंकिताच्या आई जरा एकडे या, अवि तू पण ये रे !

माझे साहेब आज म्हणत होते , आमच्या कंपनीत एक जण आहे. त्याचा मुलगा MBA करतो. अंकिता सारखी ही शेवट ची परीक्षा. ते साहेबांना म्हणाले म्हणे, मुलाच्या लग्नाबाबत. त्याच्या साठी ते अंकिताचा विचार करू म्हणाले. अंकिताला एकदम सुयोग्य स्थळ आहे म्हणाले. आपल्याच तोलामोलाचे. एक बहिण आहे लग्न झाले, हा धाकटा.

साहेब काही आपल्या अंकिता साठी असे तसे स्थळ नाही सांगणार. खूप जवळून ओळखतात तिला. सारखे घरी बोलवत असतात. माझ्या डोक्यात सुध्दा तेच आहे. मुलगा एकदा बघूनच घ्यावा. अंकिता तुला काय वाटते बेटा !

माझी काही हरकत नाही !

पण लग्न माझे शिक्षण पूर्ण झाल्यावरच. अजून एक अट मी नोकरी करणार हे मान्य असेल तरच. उद्याच बोलतो साहेबांसोबत.

सकाळी एका वेगळ्याच उत्साहात उठले ! भराभर सगळे आवरले देवाला मनोभावे नमस्कार केला आणि निघाले.

पोहचल्या पोहचल्या, साहेब मी विचारले अंकिताला. तिचे असे कुठेच काही नाही. मग मी आपल्या कंपनीतया मुलाबद्दल तुम्ही बोलले ते सांगितले. साहेब तिची काही हरकत नाही. फक्त एकच अट आहे. आता परिस्थिती अशी आहे की दोघांनी नोकरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकरी करू देणार असेल तर नक्की विचार करा !

ठीक आहे, ऑफिस मध्ये गेल्यावर बोलतो त्याच्याशी . उद्या आला की सांगतो तुला.

दिवसभर डोक्यात तेच विचार आणि एक वेगळाच आनंद त्यांना झाला होता. खरतर त्यांनी हे मुद्दाम बायकोला सांगितले नव्हते. त्यालाही कारण होते. अंकिता तिला तशीही खूप आवडतं होती. त्यामुळे जर अंकिता कडून होकार आला तर तिला डायरेक्ट surprice देऊ असे त्यांनी ठरवले. नाही आला तर त्या नाराज होतील.

खरतर लवकर घरी जायचे होते पण नेमकी एक मीटिंग होती ती सुध्दा अर्जंट.

जातांना दिनुला म्हणाले, दिनू अरे आज खूप काम होते त्यात ही मीटिंग. त्यामुळे मी त्याला आज नाही विचारू शकलो. उद्या नक्की ह !

सॉरी !

अहो साहेब सॉरी नका बोलू !

इतके कोणताच मालक आपल्या नोकरासाठी करणार नाही.

दिनू सारखे ते नोकर नोकर म्हणू नको ! तुला माहित आहे मला आवडत नाही !

सॉरी साहेब !

मग गमतीचा मुड मध्ये येऊन म्हणाले, दिनू तू मला आणि मी तुला सॉरी बोलत बोलत घरी जाऊ !

दोघेही खळखळून हसले.

घरी पोहचले, कधी एकदा स्वराजच्या आईंना सांगतो असे त्यांना झाले होते. स्वराज बाहेर गेला होता. अंघोळ करून फ्रेश होऊन स्वरजच्या आईला म्हणाले, अग तुझ्या मनासारखे होते आहे !

म्हणजे हो!

म्हणजे सून म्हणून अंकिता या घरी नक्की येणार !

काय ?

हो अग!

आजच मी तिच्या बाबांसोबत बोललो. मग त्यांनी त्या दोघात मधील सर्व संवाद सांगितला. खरच खूप अभिमान वाटतो मला या घराण्याचा.

त्यांना सव्वीस वर्षापूर्वीचा तो दिवस आठवला. त्या दिवशी तिच्या आईबाबांच्या लग्नाचा पंचवीसवा वाढदिवस होता. माधवी बाबांच्या मागे लागली आज सुट्टी घ्या. बाबा म्हणाले अग नाही जमणार, साहेबांना कुठे कुठे जायचे असते. जेवण बनवणारी बाई आणि ड्रायव्हर या दोन लोकांनी सुट्ट्या घेतल्या की मालकाचे फार हाल होतात.

तिचे बाबा ड्रायव्हर होते, त्यामुळे ते फारच कमी सुट्या घेत होते. आज सुध्दा ती अशीच मागे लागली.

शेवटी ऑफिसला गेल्यावर साहेबांना म्हणाले साहेब मला उद्या सुट्टी हवी आहे ?

काय काम ते तरी सांग?

हो नाही करत, लाजत बोलला, साहेब उद्या आमच्या लग्नाचा पंचवीसवा वाढदिवस आहे. मुलगी हट्टाला पेटली उद्या सुट्टी घ्या !

अच्छा काय करते रे मुलगी, केवढी आहे. बारावी शिकली आहे. आता घरी मुलींचे क्लास घेते टेलरिंग चे. बावीस वर्षाची आहे.

काय रे मग आम्हाला नाही बोलवणार का ?

काय साहेब ?

गरिबाच्या घरी तुमची काय सोय करणार ?

काय रे मेनू काय आहे जेवायला ?

पुरण पोळी, कटाची आंबटी, भजी, मसाले भात , अजून एक दोन नाव सांगितली !

खरच पुरणपोळी करणार आहे का ? आताच फोन लावून विचार. हो साहेब करणार आहे. फोन नाही ना घरी !

मग घरी गेल्यावर सांग , मी माझी बायको आणि मुलगा आम्ही तिघे जेवायला येतो.

काय ?

काय काय ?

अरे पुरण पोळी आमची जीव की प्राण.

आम्ही येणार म्हणजे येणार !

खरतर बाबांचा विश्वासच बसत नव्हता. पुन्हा म्हणाले, रामू आम्ही खरच येणार.

दुसऱ्या दिवशी बोलल्या प्रमाणे संध्याकाळी तिघे हजर.

थोडीफार तयारी केली होतीच. एक साधा पंजाबी सूट माधवी ने घातला होता स्वतःच शिवलेला. आईबाबांना छान तयार केले. केक मागवला होता.

फक्त बाबांचे एक भाऊ आणि आईच्या दोन बहिणी आल्या होत्या.

पंचवीस दिव्यांनी आईबाबांना ओवाळले. केक कापला, प्रत्येक जण आपापले मनोगत व्यक्त करत होता.

कैलास फक्त माधवी कडे पाहत होता. माधवीच्या हे लक्षात आले. ती मुद्दाम तिची आणि त्याची नजरा नजर होऊ नये याची खबरदारी घेत होती. तिला वाटत होते ही श्रीमंत बापाची पोरं अशीच वाया गेलेली. मनातून म्हणाली उगाच बाबांनी ह्यांना बोलावले. मझातर सगळा विरसच झाला.

त्यात बंधन पाळावी लागतात मोठी लोक आली की. आपण गरीब लोकांचं बर असते सगळंच अघळपघळ.

आता तिची बोलायची पाळी आली. आपल्या आईबाबाचे भरभरून कौतुक करत होती. ती म्हणाली आम्ही दोघी बहिणी. ताईला येता आले नाही याची खंत आहे. आमच्या आईवडिलांनी कधीच असा विचार केला नाही की आम्हाला मुलगा हवा. त्यांनी दोन मुलींवर ऑपरेशन करून घेतले. नाहीतर लोकांना वंशाला दिवा लागतो. एवढेच नाही तर जमेल तसे शिक्षण दिले. खरतर मला टेलरिंग मध्ये खूप आवड. वेगवेगळ्या डिझाईन तयार करायच्या त्या शिवायचा प्रयत्न करायचा हेच माझे विश्व. शेवटी बाबा म्हणाले, चांगला क्लास तरी लाव. काहीतरी चांगले कर.

नाही पुढे शिकायचे, नको शिकू

पण निदान जे आवडते ते मनापासून कर.

आणि मी माझा छोटासा व्यवसाय सुरू केला. आता बऱ्याच मुली क्लासला येतात माझ्याकडे.

अभिमान आहे मला मी अशा आई वडील यांच्या पोटी जन्म घेतला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . त्यांचा मुलगा कैलास मात्र एकटक बघत होता. त्याच्या बाबांनी त्याला भानावर आणले.

काय रे विकेट पडली की काय ?

तो म्हणाला हो बहुतेक !

आपण हे काय बोलून गेलो त्याला समजून चुकले.

जबरदस्त लाजला . त्या तिघांना जेवायला वाढले, पण ते तिघे बसायला तयार नव्हते. मग सगळेच एकदम दाटीवाटीने बसलो.

बोलता बोलता त्याचे बाबा म्हणाले, रामू काय रे मुलीसाठी स्थळ बघतो की नाही !

सुरू केले साहेब !

हळूच शेजारी बसलेल्या मुलाला धक्का दिला.

विचारू का ?

होणार का क्ककर घराण्याची सून !

तो जोरात म्हणाला, बाबा खरच !

हो , तुला मान्य असेल तर !!!!

Love you baba !

कोणाला काही कळायला मार्ग नव्हता.

जेवण झाली, त्याचे बाबा त्याच्या आईला म्हणाले, पोरगा माधवी च्या प्रेमात पडला. माझी काही हरकत नाही.

माझी पण हरकत नाही. आपण रामूला कित्येक वर्षापासून ओळखतो. लग्न करायला गरिबी हे कारण असू शकतं नाही. मग आजच मागणी घालतो. दिवस पण मस्त आहे. त्यांचा २५ वा लग्नाचा वाढदिवस.

जेवण आटोपली, रामू सोप , सुपारी घेऊन आला.

रामू मी काही तुझ्याकडे मागितले तर देशील!

साहेब हे काय बोलणे झाले !

माझा प्राण जरी मागितला तरी हा रामू हसत देणार. तुमचे उपकार कधीच विसरणार नाही हा रामू.

माझ्या मोठ्या मुलीच्या बाळंतपणात किती प्रॉब्लेम झाला होता. तुमच्या आर्थिक आणि ओळखीने बाळ , बाळंतीण वाचले.

अरे रामू प्राणच हवा आहे तुझा !

रामू पायाजवळ बसला, साहेब बोला काय करू ?

अरे रामू उठ !

खरच तुझा प्राण देशील? साहेब हुकूम करा !

मग बोलावं तुझ्या लेकीला, माधवीला !

माधवी जरा बाहेर ये बेटा !

साहेब बोलावतात!

काय बाबा?

रामू ही माधवी तुझा जीव की प्राण असेल हो ना !

हो साहेब !

मग मला तुझा हाच प्राण माझ्या कैलास साठी मागतो, देतोस !

काय ?

काय म्हणाले मालक ?

जे तू एकले तेच !

माधवी, तुझा प्राण माझ्या मुलासाठी मागणी घालतो !

सगळे अवाक होऊन फक्त पाहत होते.

सगळे स्वप्नंवत होते.

रामू म्हणाला साहेब मी स्वप्नात तर नाही ना हो !

नाही रामू !

अरे माझा मुलगा पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला. आता इथेच सांगितले. विचार केला दिवस चांगला आहे.

कल करे सो आज!

काय रे कैलास बरोबर ना !

हो बाबा !

माधवीच्या लक्षात आले तरीच तो मध्ये मध्ये तिच्याकडे रोखून पाहायचा. त्याच्या कडे बघायचे ती कटाक्षाने टाळत होती. पण एवढ्याश्या घरात ते शक्य होत नव्हत.

कैलासच्या बाबांनी रामूचा हात धरला, हे बघ रामू माधवी आमच्या घरची सून होणार पण तुला नोकरी सोडता येणार नाही. तु कायम माझा ड्रायव्हर राहणार.

हो साहेब ! तुम्हाला सोडून हा रामू कुठे जाणार.

स्वराजच्या आईला आज सगळे जसेच्या तसे आठवू लागले.

त्या भानावर आल्या. कैलास म्हणाले, माधवी येत्या अठरा तारखेला स्वराजचा वाढदिवस आहे. दिनू आणि त्याच्या कुटुंबाला सांगतो तो ऑफिसचा व्यक्ती आणि त्याचे कुटुंब आपल्या घरीच भेटू म्हणून. मग बाबांच्या फोटो समोर उभे राहून दिनुच्या मुलीला मागणी घालू. जशी बाबांनी माझ्यासाठी तुझ्या बाबांना घातली होती.

हो असेच करू !

रात्री स्वराज घरी आला. त्याला सांगितले तू तुझ्या वाढदिवसाला सकाळी तुझे काय असेल ते आटपून घे, रात्री घरी आपण पार्टी करू !

बाबा तुम्हाला माहित आहे मला असे काही आवडतं नाही !

अरे फार काही नाही अगदी घरातल्या घरात करू, आपण तिघेच, चालेल. येस बॉस

दुसऱ्या दिवशी दिनूला सांगितले , दिनू तो ऑफिस मधला माणूस मुलगी बघायला तयार आहे. माझा असा विचार आहे आधी मुलगा माझ्या घरी बघू. जर आवडले तर मग त्यांच्या घरापर्यंत जाऊ.

चालेल साहेब !

मग येत्या अठरा तारखेला संध्याकाळी सात वाजता तुम्ही तिघे या. ते पण तिघे येणार आहे.

ठरल्या प्रमाणे सात वाजता तिघे पोहचले. स्वराज जेमतेम घरात आला होता. त्यामुळे तो अजून बाहेर आला नव्हता.

आवरून तो बाहेर आला. अंकिताला पाहून म्हणाला अंकिता तू इथे !

काका काकू पण !

हो अरे काकांनी बोलावले !

स्वराजला काही अर्थबोध होईना. कारण बाबा बोलले आपण तिघे वाढदिवस साजरा करू. त्याने त्याचे एफबी वर हे काढून टाकले होते.

अंकिताच्या वडिलांची चुळबूळ चालू झाली. कैलास कक्करने ओळखले, अरे येतील ते दिनेश. नको काळजी करू.

माधवी येऊ का आत ?

झाले का आवरून?

हो या!

सगळे आत आले. एका रूम मध्ये केक , छान रूम सजवली होती. बाजूलाच एक मोठी तसबीर होती. बहुतेक ते कक्कर साहेबांचे वडील असावे असा सगळ्यांनी अर्थ लावला.

स्वराजला समोर बसवले. त्याच्या आईने ओवाळले. मग अंकितची आई, अंकिता. दोघांच्या बाबांनी पण ओवाळले. केक कापला हॅप्पी बर्थडे टू यू स्वराज त्याचे आईबाबा टाळ्या वाजवून बोलू लागले. ह्यांनी पण ताल धरला.

केक भरवून झाला.

कक्कर साहेब म्हणाले, मला माझ्या मुलाला एक गिफ्ट द्यायचे होते. परंतु दिनेशच्या सहकार्याशिवाय ते शक्य नव्हते. ते तिघे फक्त पाहत राहिले. अर्थबोध होईना.

अंकिता समोर ये, कक्कर साहेबांनी दिनेशचा हात हातात घेतला.

दिनेश तुझी ही लेक माझ्या मुलासाठी मी मागणी घालतो. हे तुझे कन्नेचे दान माझ्या झोळीत घालू शकतो ????

ते तिघे ही जणू पुतळे बनले होते.

कोणतीच हालचाल नाही. कारण जे घडत होतं ते ऐकून कानावर आणि पाहात होते ते बघून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.

दिनेश भानावर आला.

त्याला काय बोलावे काही सुचत नव्हते.

बोबडीच वळली होती.

साहेब कोणत्या जन्मीचे पुण्य हो !

पाय धरायला वाकणार, कक्कर साहेबांनी त्याला मिठी मारली.

वडीलांच्या फोटो समोर गेले.

बाबा बरोबर सव्वीस वर्षापूर्वी तुम्ही मला माधवीच्या आईबाबांच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला एक गिफ्ट दिलं होत. ते म्हणजे माधवीचा हात. आज मी पुन्हा आपल्याच एका ड्रायव्हरच्या मुलीचा हात स्वराज साठी मागतो.

आपल्या दोन पिढीची प्रेम करायची ही अनोखी प्रीत तुम्हाला नक्की आवडली असेल.

तुमचे आचार, विचार आणि आदर्श मी अंगिकरण्याचा प्रयत्न करतो. बाबा स्वराज आणि अंकिताला आशीर्वाद द्या.

अंकिता, तिचे बाबा आणि आई हात जोडून त्यांचे आभार मानत होते.

स्वराजला मनासारखा जोडीदार, ते सुध्दा असे अनोख्या पद्धतीचे surprise . खूप खुश होता तो.

हळूच अंकिताला म्हणाला. मला माझे birthday gift खूप आवडले....!

तुला आवडले का ?

ती लाजली !

अंकिता!!!तुला जर मी आवडतं नसेल तर खुशाल नाही म्हण!!!

जयाचे लग्न ठरले तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करतो!

कदाचित आधी पासून असावे !

पण तिच्या लग्नानंतर जास्त जाणवत होत !!!

सारखे विचार यायचे !!!!

अंकिता !! हीच माझी जीवनसंगिनी!!!

हीच माझी प्रीत...!!!!

तुला असे काही वाटले का माझ्याबद्दल!!

अंकिता आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले!!!

स्वराज हे मी स्वप्नातही पाहू शकत नव्हते, सत्यात उतरले!!

स्वराज !!

खरच विश्वासच बसत नाही!!!शब्दच नाहीत, माझ्या सगट माझ्या आईबाबा कडे!!!

तुमच्या कुटुंबाची "प्रीत" करण्याची अनोखी रीत!!!!

हे फक्त तुमच्या सारखी मोठ्या मनाची लोकच करू शकतात.

खरच निःशब्द !!!!! तुमच्या "प्रीती" पुढे!!!

समाप्त
सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत..
📝 माझी लेखणी

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने