©® कविता अमित सुरासे
जवळ असलेल्या चावीने तो हळूच दरवाजा उघडून आत मध्ये आला संध्याकाळचे चार साडे चार वाजले होते आणि घरामध्ये एकदम शांतता होती.
घाटकोपर स्टेशन पासून अवघ्या दहा मिनिटांवर असलेल्या त्यांच्या टू बीएचके फ्लॅट जिथे नेहमी मित्र-मैत्रिणी पार्टी गोंधळ असं सारं काही चालायचं तो असा सुना सुना बघून त्याला जरा वाईट वाटलं ....तो म्हणजे गिरीश.....
गिरीश दवे एका खाजगी हिंदी वृत्तवाहिनीचा पत्रकार. तीन वर्षापूर्वी त्याची भेट डॉक्टर कीर्तीशी झाली दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सहा महिन्यांनी त्यांनी लग्न केले.

कीर्तीचे आई-वडील नागपूरला, गिरीश पुण्याचा त्यामुळे मुंबईमध्ये दोघच राहत होते. सुरवातीला प्रेमात पडल्यानंतर ते दिवस फारच छान गेले पण आपली कीर्ती थोडीशी पजेसीव आणि गिरीश तो कायम मुलींच्या घोळक्यामध्ये.
टीव्हीवर दिसणारा पत्रकार असल्यामुळे थोडासा सोशल मीडियावर गाजणारा अनेक विषयांवर व्हिडीओ बनवून तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला लोकप्रिय असलेला.
त्यातच तिला डॉक्टर असल्यामुळे मिळणार कमी वेळ, घराची जबाबदारी नवीन घराचे हप्ते, त्याच्यामुळे घेतलेल्या एक्स्ट्रा ड्युटी ह्यात हल्ली एकमेकांना वेळ देणे होत नव्हते.
दोन वर्ष झाली लग्नाला पण गिरीश अजूनही ब्याचलर सारखाच वागत होता.
अशातच दोन महिन्यांपूर्वी आधीचा संपूर्ण दिवस आणि रात्रीची ड्युटी करून कीर्ती घरी आली आणि घराची अवस्था अंत्यत वाईट होती.

सगळीकडे पडलेल्या बिअरच्या बाटल्या .पार्टीत अन्न संपून पडलेलं सामान आणि किचनच्या ओट्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आणि.....आणि तिच्या बेडरूममध्ये झोपलेले त्याचे मित्र-मैत्रिणी.
त्यादिवशी त्या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं आणि कीर्तने त्याला तुझ्या मित्र-मैत्रिनींनी परत माझ्या घरात पाऊल ठेवायच नाही हे सांगितलं .
गिरीश सुद्धा समान घेऊन रागाच्या भारत मित्राच्या फ्लॅटवर चालला गेला.
किर्तीला वाटलेला एक-दोन दिवसांनंतर परत येईल पण एक आठवडा होऊन गेला तरी तो परतायचं नाव घेत नव्हता.
सगळीकडे कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. एक डॉक्टर असल्यामुळे कीर्तीला याबद्दलची माहिती मिळाली आणि पत्रकार असल्यामुळे गिरीशला देखील .

मग जाहीर झाला लॉकडाउन . कीर्ती जवळ जवळ हॉस्पिटलमध्येच राहत होती तिने स्वतःच्या मर्जीने कोविड वॉर्ड निवडला होता .
आणि गिरीश पण त्याच्या व्यवसायामुळे ह्या वातावरणात देखील बाहेर होता पण पण त्याच्यापेक्षा कीर्तीच्या प्रोफेशनमध्ये हे जास्त रिस्की होतं.
तिला संसर्गाचा धोका अधिक होता...
आज गिरीशला जाऊन तब्बल दोन महिने झाले होते . तीहि सक्तीच्या विश्रांतीसाठी घरी होती . आणि हे तिची असिस्टंट दिप्तीकडून गिरिशाला समजले होते आणि म्हणूनच तो आज धाडस करून घरी आला होता.

त्याने पाहिलं तर कीर्ती शांत झोपली होती डोळे खोल गेले होते,चेहरा निस्तेज वाटत होता थकवा दिसत होता चेहऱ्यावर.
तोही फ्रेश झाला आणि तिच्या बाजूला तिला कुशीत घेऊन झोपला . ती त्याला झोपेतच बिलगली.त्याला हसू आले.
जागी असती तर त्याला घालवून दिले असते दारातून असे त्याला वाटून गेले. थोड्यावेळाने तिला जाग आली आधी तिला समजले नाही पण जेव्हा जाणवले की गिरीश आहे शेजारी ती पटकन बाजूला झाली .
गिरीश तीला पाहून हलके हसत म्हणाला "काय... मी आलो माझे घर,माझे बेडरूम, माझी बायको तू कशाला ओरडते"
" ही चेष्टा करायची वेळ नाही आताच्या आता बाहेर हो.... लिव्ह धिस रूम नाऊ" कीर्ती जवळ जवळ किंचाळली.
"Ok ok ....आपण बाहेर बोलू ओरडू नको... बरं नाही आहे तुला" गिरीश म्हणाला आणि तो बाहेर पडतो न पडतो तेच किर्तीने रूम लॉक केली....
हे अपेक्षित होतेच गिरिशला..... तो तिथेच दाराबाहेर उभा राहिला आणि आतमध्ये कीर्ती दाराला टेकून खाली बसली तिने आलेलं खोकल्याची उबळ बळेच रोखून धरली होती .पाण्याच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने तिला जर बरे वाटले.
गिरीश: सॉरी बाबा.... इतकी काय चिडतेस ...परत नाही करणार पार्टी घरी मग तर ठीक
"तुझ्या डोक्यात पार्टी आणि मैत्रिणी ह्याशिवाय काही नसतंच ना ....का आलास माझ्या जवळ?? अक्कल नाही अजिबात तुला कालपासून ताप येतोय सर्दी खोकला झालाय सकाळी टेस्ट करून आले मी आणि ती पोसिटीव्ह येण्याची पूर्ण शक्यता आहे " डोळ्यातले पाणी पुसून ती चिडून म्हणाली.
गिरीश: मग येऊ जो काही result असेल तो मला नाही फरक पडत तू आधी दार उघड...
" का छळतोस मला ...इतके दिवस माझी आठवण पण आली नाही तुला आणि आज अचानक काय झालंय ???आणि तसही मला नाही वाटत तुझ्याबद्दल काही ..." ती चिडूनच बोलत होती.
" हो का.....तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही म्ह्णून अडून अडून चौकश्या करतेस ???" गिरीश जरा चिडत म्हणाला
"असं काही नाही ...मला वेळ नाही कोणाच्या चौकश्या करायला" कीर्ती थोडसं अडखळत म्हणाली ...
"मी अनिकेतकडे राहतोय ...कधी जेवतो, झोपतो उठतो कामावर जातो आराम करतो ...सगळ्याचे अपडेट्स असतात तुला ....मी काही लहान मुलं आहे का??मला संशय होताच की तो तुला सगळे सांगत असणार पण कबुल करत नव्हता ....दारू पाजली तर बोलला बरोबर " गिरीश अभिमानाने म्हणाला .
" त्यात काय नवल तुझे मित्र तुझ्या सारखेच दारुडे " कीर्ती म्हणाली.
" मी दारू पित नाही ...बियर दारू नसते .... तु पकडली गेलीस हे सांग....माझ्यावर आरोप करतेस" तो जरा मोठयाने म्हणाला.
"ठीक आहे ...मान्य आहे मला, पण मला काळजी वाटते म्हणून विचारते मी आणि तुला खुपत ते ,तुला बंधने नकोच फक्त स्वैराचार हवा.

मग जा आता मी कुठे अडवलंय तुला ....मी आणि अनिकेत काहीही बोलू तू का लक्ष देतोस ....वाग तुला हवे तसे फिर गावभर मैत्रिणीबरोबर...सगळे पुरुष सारखेच....अप्पलपोटे" कीर्ती सुरू झाली.
"ए बाई तुझ्या गाडीला जर ब्रेक लाव ....बरं वाटत नाही पण भांडायची खुमखुमी फार...तसही मला माहित होते तू कितीही रागावली तरी माझ्याशिवाय राहणार थोडीच...I Know You Love me..." तो फुशारकीच्या स्वरात म्हणाला....
"And I know you don't ....नाही तुझं प्रेम ...प्रेम की साधी काळजीसुद्धा नाही तुला माझी...मी कशी जगतीये तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा ह्यांना काय उत्तरे देतीये ... इतका वाईट आहेस तरीही कळत नाही का ??का, मी तुला विसरू शकत नाही...जाऊ दे पण आता तू जा. प्लीज मी विनंती करते तुला " कीर्ती पुन्हा रडायला लागली .
गिरीश काही बोलणार इतक्यात त्याला एक फोन आला आणि बातमी कळल्यावर तो खूप खुश झाला त्याने आनंदानेच दार वाजवले " कीर्ती बाहेर ये पटकन रिपोर्ट निगेटीव्ह आहेत तुला काही नाही झालाय .
किर्तीने हे ऐकून पटकन दरवजा उघडला समोर गिरीश डोळ्यात पाणी घेऊन उभा होता तिने त्याला मिठी मारली आणि मनसोक्त रडून मोकळी झाली....पाणी तर त्याच्याही डोळ्यात होते ...पण एक समधान होते ...
" एक मिनिट तुला कसा कळला रिपोर्ट ?? माझा फोन बंद आहे तू खोट बोललास का मी बाहेर यावे म्हणून" ती पुन्हा त्याच्यापासून दूर होऊ लागली....पण त्याने आणखी घट्ट पकडले आणि एक फोन करून मोबाइल तिच्या कानाला लावला .

" हॅलो सर...मॅमना सांगितली का तुम्ही गुड न्युज...."
"दीप्ती ????" कीर्तीचा आवाज आला तशी दिप्ती कीर्तीची असिस्टंट डॉक्टर जरा गोंधळली
" मॅम तुमचा फोन बंद होता म्हणून सरांना रिपोर्ट सांगितले...तुम्ही अराम करा आता आठ दिवस सुट्टी दिली आहे तुम्हाला ..बाय टेक केयर" दिप्तीनं घाईत फोन ठेऊन दिला.
" समजलं आता ...चल फ्रेश हो मी चहा करतो मस्त आपल्यासाठी " असे म्हणत गिरीश किचनमध्ये गेला देखील...
दोघेही चहा घेत हॉल मध्ये बसले होते ...कीर्ती डोळे बारीक करून गिरिषकडे बघत होती...
" हे बघ असे बघू नकोस जसा तुला अनिकेत तशी मला दीप्ती....मी तुला कॉल केला असता तर तू उचलला नसतास म्हणून मग ..." गिरीश जरा घाबरतच सांगत होता ....
मग दोघेही एकमेकांकडे बघत होते आणि मग दोघांनाही हसू फुटले ...प्रेमाच्या भांडणाचा शेवट साखरमिठीत झाला....
आणि गाणे वाजत होते.....
प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते, कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखळते, बघ धडपडते कोणी
©® कविता अमित सुरासे
सदर कथा लेखिका कविता अमित सुरासे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.