© धनश्री दाबके
"हो जीजु , एकतर मला आत्ता लगेच लग्नच करायचं नाहीये. पण आई बाबा काही ऐकतच नाहीत. शिक्षण, नोकरी आणि लग्न. हाच ट्रॅक का हवा असतो सगळ्या आईवडलांना.
जरा जगू दे ना मला शांततेत. सारखं सारखं तुझ्या मनात कोणी असेल तर सांग म्हणून मागे लागलेत.
पण मला नाही कोणी आवडला अजून. आणि तो someone special कधीतरी आयुष्यात येईलच ना. काय घाई आहे इतकी. तुझे कुठे काही नसेल तर आम्ही आता मुलं बघायला सुरुवात करणार असा दम दिलाय बाबांनी.
मग मी पण सांगितले ठीक आहे तुम्ही ऐकत नाहीना तर बघा मुलं. पण मला स्वभावाने, वागण्या बोलण्याने अगदी अमोल जीजुंसारखाच नवरा हवाय " दिप्तीने जाहिर केलं आणि अमोल एकदम चमकला.
"का ग बाई? माझ्या सारखाच का? तुला अजून चांगला नवरा मिळेल की. आणि असा माझ्यासारखा हवा हा मापदंड घेऊन कसा मुलगा शोधायचा बाबांनी? कमालच करतेस तू पण " अमोलने विचारले.
पण दिप्ती ठाम होती " कसा आणि कुठे ते बघावं बाबांनी. त्यांनाच घाई आहे. पण मी क्लिअर आहे.
"का ग बाई? माझ्या सारखाच का? तुला अजून चांगला नवरा मिळेल की. आणि असा माझ्यासारखा हवा हा मापदंड घेऊन कसा मुलगा शोधायचा बाबांनी? कमालच करतेस तू पण " अमोलने विचारले.
पण दिप्ती ठाम होती " कसा आणि कुठे ते बघावं बाबांनी. त्यांनाच घाई आहे. पण मी क्लिअर आहे.
तुमच्या लग्नापासून बघतेय ना मी तुम्ही ताईला किती जपता ते. तिच्यावर जीवापाड प्रेम करता, तिचे सगळे लाड पुरवता. कौतुक करता. तिच्यातल्या गुणांना हर प्रकारे वाव देता. खुप सपोर्टीव्ह आहात तुम्ही.
आमच्या कुटुंबात किती सहजपणे सामावून गेलात आणि तुमचे आईवडीलही टीपीकल सासरच्या मंडळींसारखे नाहीत. खुप genuine आहेत. त्यामुळेच माझी ताई आनंदात आहे. तिचे करीयर उत्तमरित्या सांभाळतेय.
तुम्ही दोघही ज्या समाधानाने संसार करताय तसाच मलाही करायचाय.
आता तसा मुलगा ओळखायचा कसा हा प्रश्नच आहे खरा.
पण तुम्ही आहात ना. मला खात्री आहे तुम्ही मला नक्की मदत कराल मुलगा पसंत करतांना. त्यामुळे मी एकदम निर्धास्त आहे. तुम हो तो क्या गम है जीजु."
दिप्तीने केलेल्या स्तुतीने अमोल सुखावला.
अदिती तर नेहमीच म्हणते की मी खुप चांगला आहे, समजून घेतो, सपोर्ट करतो वगैरे वगैरे. पण ती ते माझ्यावरच्या प्रेमाने म्हणते. खरं तर तीच माझी नस अन नस ओळखते.
मला प्रत्येक गोष्टीत encourage करते. तिच्या मुळेच तर मी माझ्यातलं पोटेन्शिअल ओळखु शकलो. पण आज दिप्तीही तेच म्हणतेय. wow.. आज तो दिल गार्डन गार्डन हो गया.
ह्या विचाराने अमोलचा चेहेरा उजळला. आणि अदितीही त्याच्याकडे कौतुकाने बघत मंद हसली.
तुम हे तो क्या गम है जीजु ह्या वाक्याने आज अमोलला एकदम त्याच्या बाबांचे "मग त्यात काय विशेष? हे तर सगळेच करतात" हे पालुपद आठवले.
अमोल आई बाबांचा एकुलता एक मुलगा. आई बाबा दोघही स्वकर्तृत्वावर सुखी झालेले. अत्यंत खडतर परिस्थितीतुन वर आलेले. आणि कदाचित त्याच मुळे प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिकली शहानिशा करणारे. परखड.
अमोल आई बाबांचा एकुलता एक मुलगा. आई बाबा दोघही स्वकर्तृत्वावर सुखी झालेले. अत्यंत खडतर परिस्थितीतुन वर आलेले. आणि कदाचित त्याच मुळे प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिकली शहानिशा करणारे. परखड.
त्यात बाबा जरा जास्तच स्पष्ट आणि अतिशय रागीट. सतत अमोलवर डाफरायचे.
अमोलचे गुण, हुशारी, कष्टं हे सगळं ते बघत होते. मनातून त्यांना अमोलचा अभिमानही होता पण त्यांनी तो कधी शब्दांत व्यक्त केलाच नव्हता.
आपला हुशार मुलगा कधीही कोणाच्या वाईट संगतीत बिघडू नये आणि हुशारीची हवा त्याच्या डोक्यात जाऊ नये ह्याची काळजी घेतांना ते जरा जास्तच कठोर वागायचे अमोलशी.
कधीही बाबांनी अमोलच्या छोट्या मोठ्या कुठल्याही यशाचे भरभरून कौतुक केलेच नाही.
उलट त्याने काही सांगितले कि 'त्यात काय विशेष? हे तर सगळेच मिळवतात' हा शेरा ठरलेला असायचा.
बाबांच्या अशा वागण्याने अमोल मिटून जायचा. मोकळेपणाने कधी बोलायचाच नाही. त्याला कोणाशी बिंधास्तपणे मैत्रीही करायला जमली नाही कधी. शांतच रहायचा.
स्वतःला वाचनात आणि वेगवेगळी गाणी ऐकण्यात बुडवून घ्यायचा. आपण एक चांगला, बाबांना हवाय तसा मुलगा कधीच होऊ शकत नाही हा विचार त्याच्या मनात ठाण मांडून बसला होता.
अमोलचे वाचन आणि स्मरणशक्ती दोन्हीही अफाट होते. विविध विषयांवरची अनेक उत्तम पुस्तके त्याने वाचली होती. पण त्याच्यात आत्मविश्वास मात्र अजिबात नव्हता.
आपला मुलगा एकलकोंडा होतोय हे आईच्या लक्षात यायचे पण ती परिस्थितीच्या आणि नवऱ्याच्या रागीटपणाच्या चॅलेंजेस मधे इतकी गुंतलेली होती कि अमोलला आपण कौतुकाने खुलवले पाहिजे, बाबांच्या रागापासून वाचवून त्याच्यात प्रयत्नपूर्वक आत्मविश्वास रुजवला पाहिजे हे कधी आईच्या लक्षातच नाही आले.
अमोल जसा जसा मोठा होत गेला आणि बाहेरच्या जगात मिसळायला लागला तसा तसा त्याच्यात हळूहळू कॉंफिडंस आला आणि त्याने तो प्रयत्नांनी वाढवला.
अमोलमधे अवांतर वाचनामुळे आलेली प्रगल्भता व विचारांचे वेगळेपण त्याच्या शाळा कॉलेजच्या शिक्षकांच्या मात्र लक्षात आले. त्यांनी अमोलच्या वेगळेपणाचे उदाहरण इतर विद्यार्थ्यांना देत त्याचे खुप कौतुक केले आणि मग मात्र अमोलने मागे वळून पाहिले नाही. खुप चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होत त्याने masters degree मिळवली. चांगली नोकरी मिळवली.
त्याचे वागणे बोलणे सुधारले. मित्र मैत्रीणी मिळाले. पण घरी मात्र तो शांतच रहायचा आणि त्याची मैत्रीही एक ठराविक अंतर ठेवूनच व्हायची.
कोणाजवळ कधी तो मोकळेपणाने व्यक्तच व्हायचा नाही. मामा , मावशी व इतर जवळचे नातेवाईक या सगळ्यांशीच तो एका अलिप्ततेने वागायचा.
शिक्षण, चांगली नोकरी आणि मग अदिती व अमोलचे ॲरेंज मॅरेज ठरले.
साखरपुडा आणि लग्न ह्यात फार दिवस नव्हते.
पण जो काही वेळ मिळाला त्यात अदितीच्या घरातले मोकळे ढाकळे, हसते खेळते वातावरण, अदिती आणि दिप्तीचे त्यांच्या आईवडिलांशी असलेले घट्ट नाते व खेळीमेळीचे संबध हे सगळे अमोलच्या लक्षात आले आणि तो त्यांच्या घरी हळूहळू मोकळा होऊ लागला.
त्या चौघांसोबत पत्त्याचे डाव, गाण्याच्या भेंड्या ह्या सगळ्यात रमू लागला.
भेंड्या खेळतांना अमोलला असलेली गाण्याची आवड आणि जाण अदितीच्या लक्षात आली.
खूप वेगवेगळी गाणी अमोलची तोंडपाठ होती. नुसतच गाणं नाही तर त्याचा राग कुठला, गायक कोण आहे, संगीत कोणाचे आहे, त्यात कुठली वाद्य वापरली आहेत हे सगळे त्याला माहित असायचे.
लग्नानंतर अमोलच्या मनात असलेली वडलांबद्दलची अढी अदितीला जाणवली.
लग्नानंतर अमोलच्या मनात असलेली वडलांबद्दलची अढी अदितीला जाणवली.
खरे तर अमोल, त्याचे आई बाबा ही सगळीच स्वभावाने चांगली आणि genuine विचारांची माणसं होती.
गरज होती ती फक्त जरा एकमेकांशी थोडं सैल व्हायची.
मोकळेपणाने आनंदाने एकमेकांना छान म्हणून थोडं कौतुक करण्याची.
अदिती अमोलच्या प्रत्येक गोष्टीची दखल घ्यायची. त्याने कधी साधी नुसती भाजी जरी आणली तरी कौतुक करायची.
त्याच्या वाचनाच्या , गाण्यांच्या आवडीबद्दल आणि माहितीबद्दल तिच्या सगळ्या मैत्रीणी व नातेवाईकांना अभिमानाने सांगायची.
फॅमिली गॅदरिंग मधे, सणावाराला त्याला गायला व गाण्याची माहिती सांगायला प्रवृत्त करायची.
अदितीने केलेल्या कौतुकात व अमोलच्या मोकळे होण्यात हळूहळू आई बाबाही सामिल होत गेले आणि घरातल्या वातावरणतला ताण निवळायला लागला.
बाप लेक गप्पा मारतांना दिसू लागले.
अदितीच्या, दिप्तीच्या घरातल्या सहज वावराने अमोलच्या आईची मुलीची हौस पूर्ण झाली.
आईला मन मोकळे करायला जागा मिळाली.
आदित्यच्या येण्याने तर घर खुपच आनंदले.
अमोल आदित्यला रोज रात्री झोपतांना नविन नविन आणि सुंदर सुंदर प्रेरणा देणाऱ्या गोष्टी इतक्या खुबीने सांगायचा कि अदितीही त्या ऐकतांना रममाण होऊन जायची.
अमोलला असलेल्या वाचनाच्या छंदाची प्रचिती तिला रोज यायची.
सुखाने समाधानाने अमोल व अदितीचा संसार बहरत होता. आणि आपण कशातच कमी नाही तर एक चांगला मुलगा, नवरा आणि बाप आहोत हे अमोलला पटायला लागले होते.
तो स्वत:लाच परत नव्याने ओळखू लागला होता. आणि आज तर दिप्ती त्याच्यासारखाच नवरा हवा असे म्हणत होती.
तुम हो तो क्या गम है जीजु म्हणून त्याच्यावर तिच्या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या निर्णयाची जबाबदारी टाकत होती.
आज आपण दिप्तीच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या निवडीवर इतका प्रभाव टाकु शकतो ह्या विचारानेच अमोल खुश झाला.
आज आपण दिप्तीच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या निवडीवर इतका प्रभाव टाकु शकतो ह्या विचारानेच अमोल खुश झाला.
तिने त्याच्यावर इतका विश्वास टाकून अमोलच्या ह्या नविन आणि मोकळ्या व्यक्तीमत्वाला जणू चार चांद लावले.
आणि हे सगळे शक्य झाले होते ते अदितीच्या प्रेमाने व आधाराने.
खुप आनंदात होता अमोल आज. त्याच आनंदात आदित्यला कडेवर घेऊन अदितीकडे पहात अमोल गायला लागला
तुम आ गए हो, नूर आ गया है
नहीं तो चरागों से लौ जा रही थी
जीने की तुमसे, वजह मिल गयी है
बड़ी बेवजह जिन्दगी जा रही थी !
आणि अदितीही त्याच्या मिठीत शिरत ह्या आनंद सोहळ्यात सामील झाली.
आज बायकोच्या समजुतदारपणाने व प्रेमळ आधाराने एका नवऱ्याची स्वतःशीच नव्याने ओळख पटली होती.
©️ धनश्री दाबके
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
फोटो गुगल वरुन साभार ...
