लेखक - श्रीकांत मनोहर काटे
(ही कथा 1960 च्या सुमारास लिहिलेली आहे. त्यामुळे ह्यातील संदर्भ त्या काळातील आहेत.)
बस मधून उतरताना श्यामनं भिरभिरत्या नजरेनं चहुकडे बघितलं.
बऱ्याच वर्षांनी तो परत इथं येत होता. बस स्टॅन्ड चा बरसा कायापालट झाला होता.
हॉटेलं वाढली होती.फळांच्या आणि मेवामिठाईच्या फिरत्या हातगाड्याही जिकडेतिकडे दिसत होत्या.
तीन-चार वर्षांपूर्वी तो इथूनच पुण्याला जायला बस मध्ये बसला होता.त्यावेळी इथलं हे काहीही नव्हतं.
मोठ्या मिनतवारीने ठिकठिकाणी शिवलेला शर्ट अन् चड्डी घातलेला.ती चड्डी ही ठिगळांच्या कलाकुसरीने सजलेली.
"बदल झालाय खरा. पण तो आपोआप नाही. आम्ही केलाय तो.आम्ही म्हणजे आमच्या बँकेने !" असं म्हणत काळेनं सगळं सांगितलं बँकेनं कशा कशा सुधारणा घडवून आणल्या.वगैरे !
"बरंय चलतो मी. आज आमच्या मागे शहर स्वच्छता मोहिमेची जबाबदारी आहे"-असं म्हणत काळे निघून गेला. पण त्याचे शब्द मात्र घंटानादाप्रमाणे श्यामच्या कानात घुमत राहिले.
"कुठलाही बदल आपोआप होत नाही. तो करावा लागतो, घडवून आणावा लागतो." जेटच्या धुराच्या रेषेप्रमाणे काळेचे ते शब्द त्याच्या मागोमाग जाऊ लागले.
एव्हाना श्यामनं पोस्ट ऑफिस ची इमारत मागे टाकली होती. तो झपाझप चालत होता, पण रस्ता संपता संपत नव्हता. विचार संपत नव्हते.काळेच्या मघाच्या शब्दांनी त्याचे विचार नागासारखे डिवचल्या गेले होते.
तो हात पाय धुण्यासाठी आत वळला. आत जाता जाता तो थबकला. किंचित गोंधळला. बेबी किती मोठी दिसत होती ! त्याने शेवटी बघितलं तेव्हा ती स्कर्ट घालत होती. आता साडी नेसल्यावर खरोखर मोठी दिसत होती.
"आता मात्र नक्की हिच्या लग्नाचं मनावर घ्यावं लागणार !" त्यानं तिच्याकडे बघत म्हटलं. बेबी फक्त मंद हसली.
तोंड धुवून तो स्वयंपाकघरात येऊन बसला.आईनं चहाचा कप समोर ठेवला.गरम चहाची वाफ कपातून वर-वर जात होती. त्या वाफेबरोबरच जुन्या जीवघेण्या आठवणीही त्याच्या मनातून बाहेर येत होत्या.
ते सहा सात वर्षांपूर्वीचे दिवस. सकाळी उठल्यावर सगळ्या भावंडांना एकदमच चहा हवा असे.
"कशी देणार तो टालवाला ? मागचे पैसे भेटल्याशिवाय तो लाकडं द्यायला तयार नव्हता कशीतरी बाबापुता करून आणली.ती मेल्यांनं अशी ओली दिली. डोळे उठायची वेळ आली या धुरानं !"
आई वैतागली होती. आईचे ते शब्द त्याला खोलीत पसरलेल्या कोंदट धुरासारखे वाटले. बाहेर येत त्यानं रघुला म्हटलं, "चल, आपण दुसरी चांगली लाकडं आणू."
आईचा वैताग घरातलं मंद आणि रंगहीन वातावरण, नंदूचं न संपणारं आजारपण या सगळ्यांचा अर्थ त्याला आता जाणवू लागला.हे सगळं बदलण्यासाठीच तो इथे आला होता.
"आईला आता पुढे असा त्रास व्हायला नको. सगळ्या गोष्टी कशा नीट व्हायला हव्यात.दारिद्र्याची धग जेवढी आपण सोसली तेवढी नंदू -बेबी -मंगलला लागायला नको."
श्यामच्या मनावर एका वेगळ्याच उत्साहाचं वर्ख चढत होतं. त्याला सगळं काही बदलून टाकायचं होतं.सगळं काही सुधारायचं होतं.सध्याच्या या पिचलेल्या रोगट वातावरणातून सगळ्यांना मोकळ्या हवेत न्यायचं होतं. ही कोंडी त्याला फोडायची होती.हा गुंता त्याला उकलायचा होता.
"आईची तब्येत अधून-मधून बरी नसते का रे ?" शामनं आपली बर्फाळ तंद्री मोडत म्हटलं.
"आताशा चिडचिड फार करते. पुष्कळदा तर....... "बोलता बोलता मधेच रघूनं जीभ चावली.
एखाद्या लोचट मांजरीसारखे ही स्वप्न त्यांच्या पायात घोटाळा लागली.लाकडाचा टाल मागे पडल्याचंही त्यांच्या लक्षात आलं नाही !
ते दोघही घरी परतले तेव्हा बरीचशी संध्याकाळ झाली होती.आज संध्याकाळी आई बाबांजवळ सगळं बोलायचा त्यानं निश्चय केला होता.
"आईला खूपच त्रास होतोय !
श्याम झपाट्याने आत गेला.आई स्वयंपाकघरात पाटावरच बसून मागे भिंतीला रेलली होती. चेहरा थकून गेला होता वांती झाल्यानं आजूबाजूला घाण पसरली होती. घामाचे ओघळ जिथल्या तिथंच थिजले होते.
तोही शर्ट घालत बाहेर आला, "चल, मीही येतो."
तेवढ्यात आतून बेबीनं म्हटलं, "दादा, आई म्हणतेय काठी घेऊन जा सोबत. विंचूकाट्याचं बघून जा !"
डॉक्टरांचं घर बरंच दूर होतं. श्यामनं आतून ती स्टिक आणली.आजच त्यानं ती पुण्याहून आणली होती. खास बाबांसाठी. नक्षीदार मुठीची. चमकणाऱ्या छटांची. बाबा लवकरच रिटायर होणार होते. त्यांना फिरायला जायचा खुप नाद होता.रिटायर झाल्यावर हातात काठी घेऊन फिरायला जाणाऱ्या बाबांचं चित्र जेव्हा त्याच्या समोर आलं तेव्हा त्यांना पुण्याला ही वॉकिंग स्टिक विकत घेतली.
पायात चपला सरकवत, हातात काठी घेत तो रघु बरोबर निघाला.वाटेत त्यानं रघूला विचारलं, "काय झालं रे आईला ?"
"कुणास ठाऊक ?" पण असं नेहमी होतं. मात्र डॉक्टर औषध देतात न मग बरं वाटतं ! तीन-चार महिन्यापासून असंच होतं."
ते दोघेही डॉक्टरांकडे पोहोचले तेव्हा साडेनऊ वाजले होते.त्यानं दारावरची कॉलबेल वाजवली.
ही काठी ! वडील रिटायर झाल्यावर त्यांना आधारासाठी हवी म्हणून त्यांना किती कौतुकानं ही काठी आणली होती पण आता त्याला स्वतःलाच त्या काठीच्या आधाराची आवश्यकता भासू लागली.
पण क्षणभरच ! मग कसल्याशा उर्मीत त्यानं ती काठी रस्त्याच्या कडेला दूर भिरकावून दिली. आपल्या स्वप्नांची पुरचुंडीही त्या काठी-सोबतच भिरकावल्याचं त्याला उमगलं.
आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचा कागद मुठीत घट्ट धरून तो मेडिकल स्टोअर्सची वाट चालू लागला.

समोरच्या झाडावर सिनेमाचं पोस्टर अडकवलं होतं.झाडाच्याच बाजूला एक मोठं गेस्टहाऊस ही नवीनच बांधलेलं दिसत होतं.
तीन-चार वर्षांपूर्वी तो इथूनच पुण्याला जायला बस मध्ये बसला होता.त्यावेळी इथलं हे काहीही नव्हतं.
गेस्टहाऊस नव्हतं, इतकी हॉटेलं नव्हती,फळांच्या गाड्या नव्हत्या........
---- आणि तो स्वतः तरी आताचा कुठं होता !
---- आणि तो स्वतः तरी आताचा कुठं होता !
मोठ्या मिनतवारीने ठिकठिकाणी शिवलेला शर्ट अन् चड्डी घातलेला.ती चड्डी ही ठिगळांच्या कलाकुसरीने सजलेली.
हातात एक मळकीशी पिशवी घेतलेली.पायात कुणाची तरी जुनी आणि पायाशी फटकून वागणारी चप्पल.
कसल्याशा अनामिक हुरहुरीनं, एकलेपणाच्या जाणिवेनं, मामासोबत आपलं नशीब काढण्यासाठी पुण्याला निघालेला तो......
वडिलांनी दहा डब्बे हुडकून वरखर्चासाठी दिलेल्या एक रुपया मोठ्या काळजीनं खिशात जपून ठेवला होता.

तिकीट मामानी काढलं होतं.त्या एक रुपयाची किंमत कळताकळता आज तो इथं परत येत होता.आपली बॅग हातात सावरत त्यानं रस्त्याची वाट धरली.
आता रस्त्याच्या बाजूने बरीच दुकानं थाटली होती.पूर्वीचा ओसाड पडीत असलेल्या तळ्याकाठच्या जागेत एक सुंदर बगिचा तयार झाला होता. बगिचा पार करताच पुढल्या चौकावर एका मोठ्या बोर्डकडे त्याचं लक्ष गेलं.
"प्लॅन यूवर फॅमिली अँड सेव्हिंग्ज स्टेट बँक". बँकेच्या बोधचिन्हा खाली बारीक अक्षरात लिहिलेलं होतं-
"स्टार्ट नाऊ ओन्ली"
"काय श्यामराव, केव्हा आलात ?" बँकेतला काळे त्याला विचारीत होता. तो आणि श्याम शाळेत एकाच वर्गात शिकत होते.
"आताच उतरतोय बसमधून.बराच बदल झाला नाही ! बरचसं नवीन नवीन दिसतं ! श्यामला आपलं कुतूहल लपवता आलं नाही.
"स्टार्ट नाऊ ओन्ली"
"काय श्यामराव, केव्हा आलात ?" बँकेतला काळे त्याला विचारीत होता. तो आणि श्याम शाळेत एकाच वर्गात शिकत होते.
"आताच उतरतोय बसमधून.बराच बदल झाला नाही ! बरचसं नवीन नवीन दिसतं ! श्यामला आपलं कुतूहल लपवता आलं नाही.
"बदल झालाय खरा. पण तो आपोआप नाही. आम्ही केलाय तो.आम्ही म्हणजे आमच्या बँकेने !" असं म्हणत काळेनं सगळं सांगितलं बँकेनं कशा कशा सुधारणा घडवून आणल्या.वगैरे !
"बरंय चलतो मी. आज आमच्या मागे शहर स्वच्छता मोहिमेची जबाबदारी आहे"-असं म्हणत काळे निघून गेला. पण त्याचे शब्द मात्र घंटानादाप्रमाणे श्यामच्या कानात घुमत राहिले.
"कुठलाही बदल आपोआप होत नाही. तो करावा लागतो, घडवून आणावा लागतो." जेटच्या धुराच्या रेषेप्रमाणे काळेचे ते शब्द त्याच्या मागोमाग जाऊ लागले.
एव्हाना श्यामनं पोस्ट ऑफिस ची इमारत मागे टाकली होती. तो झपाझप चालत होता, पण रस्ता संपता संपत नव्हता. विचार संपत नव्हते.काळेच्या मघाच्या शब्दांनी त्याचे विचार नागासारखे डिवचल्या गेले होते.
याच रस्त्यावरून तो आपलं नशीब आजमावण्यासाठी मामासोबत पुण्याला गेला होता आणि आज एक पगारदार जीव म्हणून तो परतत होता. त्याच्या आई-वडिलांना, भावा-बहिणींना माणसासारखं जगवायला, माणसासारखं फुलवायला !
पुण्यात त्यानं एका स्टुडिओत बऱ्यापैकी नोकरी धरली होती. पगारही अपेक्षेप्रमाणे बरा होता आणि -----------अपेक्षेबाहेर कुणाची तरी साथ ही मिळाली होती.

ज्योतीची सावली त्याच्यासोबत होती. तीही नोकरी करत होती.त्याच्या परिस्थितीची, जबाबदाऱ्यांची, अडचणींची तिला कल्पना होती; जाणीव होती. ती त्याच्या सर्व स्वप्नांची प्रेरणा होती. ती स्वप्न- जी मनात- डोक्यात घट्ट रोवून घेऊन तो परत गावी आला होता.
ती स्वप्न- ज्यांचा एक धागा भूतकाळातल्या आठवणीमध्ये अडकून बसला होता. तो धागा त्याला विलग करायचा होता. त्या स्वप्ना-पासून अगदी वेगळा. त्याच धाग्याचे टोक धरून -त्याचा मागोवा घेत तो इथं आला होता.
जुनाट खोकल्याची उबळ यावी तश्या जुन्या घट्ट रुतून बसलेल्या आठवणी त्याच्या मनात येत होत्या.
ते हलाखीचे अर्धपोटी दिवस !

ते अपुऱ्या ठिगाळलेल्या वस्त्रांनी प्यायलेले ऋतू !! ते उधारउसनवारीने मिळणारे संस्कार !!! माणसासारखं ही जगायला महाग असलेले ते दिवस, अगदी या रस्त्यासारखेच.खडबडीत, निरुंद, कोंदट !
या रस्त्यावरून गावात जायचं म्हणजे एखाद्या नाण्यासारखं घरंगळतच जावे लागे आणि.परत येताना गिर्यारोहकासारखी दमछाक करावी लागे.
रस्त्याने बराच उतार असल्याने त्याची पावले जलद पडू लागली आताशा अशा रस्त्यावरून चालण्याची त्याची सवय तुटली होती. पुण्याचे रस्ते कसे रुंद, मऊ अन् मोकळे वाटायचे. नाहीतर हा रस्ता ?
एखाद्याच्या कुबड निघालेल्या निरुंद पाठीसारखा. या रस्त्यावरून चालताना आपली पावले पुढे पडत आहेत की आपलं सगळं शरीरच पुढे झोकावतंय हेच उमगायचं नाही. त्याच्या पावलांपेक्षाही त्याचे विचार अधिक वेगाने रस्ता उतरु लागले.
आता आईला पूर्ण विश्रांती द्यायची. बाबांना सांगायचं, तुम्ही कसलीही काळजी करू नका. मी अन् ज्योती आम्ही दोघंही आपल्या कुटुंबाचं सुख बघू.तुम्ही फक्त सांगायचं -रघूला मॅट्रिक करू, नंदनला पुण्याला चांगल्या डॉक्टरला दाखवून उपचार करू, बेबीचं लग्न थाटात करू, मंगल-वासंतीला खूप शिकवू.
एव्हाना तो घराच्या दाराशी येऊन ठेपला होता. त्यानं समोरच्या अंगणातूनच मोठ्यानं हाक दिली-- "आई !मी आलोय,"

"ए रघू !"
आतून मंगल नि वासंती धावत आल्या. श्यामला बघताच आश्चर्यमिश्रित आनंद त्यांच्या चेहऱ्यावर उमटला.
श्याम घरात शिरला तेव्हा बाबा बाजारात गेले होते. समोरच्या खोलीत नंदन एका खाटेवर निपचित पडला होता. श्यामने जवळ जाऊन बघितलं, त्याचं सगळं अगदी फिक्क पडत होतं.

सगळ्या अंगावर पिवळसर पांढरी सावली पडल्यागत दिसत होतं. श्यामने त्याच्याकडे बघितलं. नंदन रेल्वे स्टेशनवरच्या चहासारखा फिक्कट हसला. रंग उडालेल्या भिंतीची भेसूरता त्याच्या चेहऱ्यावर होती.
माजघरात जाताच श्यामनं आईला नमस्कार केला न् म्हटलं, "नंदनबद्दल काही कळवलं नाही. बराच फिक्का पडलेला दिसतोय !"
"सुरू आहे की औषध !" एवढेच तुटक उत्तर देऊन आई घरात वळली.

श्यामनं जास्त काही विचारलं नाही. एकतर तो लांबच्या प्रवासाने थकून गेला होता दुसरा म्हणजे ओघाओघाने त्याला नंतर सगळं बोलायचंच होतं.
तो हात पाय धुण्यासाठी आत वळला. आत जाता जाता तो थबकला. किंचित गोंधळला. बेबी किती मोठी दिसत होती ! त्याने शेवटी बघितलं तेव्हा ती स्कर्ट घालत होती. आता साडी नेसल्यावर खरोखर मोठी दिसत होती.
"आता मात्र नक्की हिच्या लग्नाचं मनावर घ्यावं लागणार !" त्यानं तिच्याकडे बघत म्हटलं. बेबी फक्त मंद हसली.
तोंड धुवून तो स्वयंपाकघरात येऊन बसला.आईनं चहाचा कप समोर ठेवला.गरम चहाची वाफ कपातून वर-वर जात होती. त्या वाफेबरोबरच जुन्या जीवघेण्या आठवणीही त्याच्या मनातून बाहेर येत होत्या.
ते सहा सात वर्षांपूर्वीचे दिवस. सकाळी उठल्यावर सगळ्या भावंडांना एकदमच चहा हवा असे.
घरात फक्त दोन-तीन कप असायचे. तेही बिनकानाचे- चिपा उडालेले, रंगहीन -कळाहीन ! मग प्रत्येकानं एकाच कपातून एकएक दोनदोन घोट चहा घ्यायचा आणि कप दुसऱ्यापुढे सरकवायचा पास ऑन चा खेळण्यासारखा !
त्यावेळचा तो कमी दुधाचा काळपट चहाचा घोट--!
श्यामला ठसका बसला. जणू त्या चहाच्या आठवणीने त्याचा घसा पोळला होता.
सिनेमाच्या ट्रेलरसारखे जुने प्रसंग त्याच्या नजरेसमोरुन सरकू लागले.चहाच्या कपात हिंदकळणारी जुन्या आठवणींची प्रतिबिंब त्याला खुणावू लागली.
त्याने एका घोटात चहा संपवला. आईकडे बघितलं. फुंकणीने चूल फुंकताना तिच्या गळ्याच्या शिरा चांगल्याच ताठरलेल्या दिसत होत्या. कोंदट ओलसर धूर खोलीभर पसरला होता. चुलीतली लाकडं पेटत नव्हती. लाकडातल्या ओलसरपणाची वाफ होतानाचा चर्र असा आवाज त्याला चांगलाच जाणवला.
"लाकडं बदलून नाही आणली ?" श्यामनं विचारलं.
त्यावेळचा तो कमी दुधाचा काळपट चहाचा घोट--!
श्यामला ठसका बसला. जणू त्या चहाच्या आठवणीने त्याचा घसा पोळला होता.
सिनेमाच्या ट्रेलरसारखे जुने प्रसंग त्याच्या नजरेसमोरुन सरकू लागले.चहाच्या कपात हिंदकळणारी जुन्या आठवणींची प्रतिबिंब त्याला खुणावू लागली.
त्याने एका घोटात चहा संपवला. आईकडे बघितलं. फुंकणीने चूल फुंकताना तिच्या गळ्याच्या शिरा चांगल्याच ताठरलेल्या दिसत होत्या. कोंदट ओलसर धूर खोलीभर पसरला होता. चुलीतली लाकडं पेटत नव्हती. लाकडातल्या ओलसरपणाची वाफ होतानाचा चर्र असा आवाज त्याला चांगलाच जाणवला.
"लाकडं बदलून नाही आणली ?" श्यामनं विचारलं.
"कशी देणार तो टालवाला ? मागचे पैसे भेटल्याशिवाय तो लाकडं द्यायला तयार नव्हता कशीतरी बाबापुता करून आणली.ती मेल्यांनं अशी ओली दिली. डोळे उठायची वेळ आली या धुरानं !"
आई वैतागली होती. आईचे ते शब्द त्याला खोलीत पसरलेल्या कोंदट धुरासारखे वाटले. बाहेर येत त्यानं रघुला म्हटलं, "चल, आपण दुसरी चांगली लाकडं आणू."
आईचा वैताग घरातलं मंद आणि रंगहीन वातावरण, नंदूचं न संपणारं आजारपण या सगळ्यांचा अर्थ त्याला आता जाणवू लागला.हे सगळं बदलण्यासाठीच तो इथे आला होता.
"आईला आता पुढे असा त्रास व्हायला नको. सगळ्या गोष्टी कशा नीट व्हायला हव्यात.दारिद्र्याची धग जेवढी आपण सोसली तेवढी नंदू -बेबी -मंगलला लागायला नको."
श्यामच्या मनावर एका वेगळ्याच उत्साहाचं वर्ख चढत होतं. त्याला सगळं काही बदलून टाकायचं होतं.सगळं काही सुधारायचं होतं.सध्याच्या या पिचलेल्या रोगट वातावरणातून सगळ्यांना मोकळ्या हवेत न्यायचं होतं. ही कोंडी त्याला फोडायची होती.हा गुंता त्याला उकलायचा होता.
"आईची तब्येत अधून-मधून बरी नसते का रे ?" शामनं आपली बर्फाळ तंद्री मोडत म्हटलं.
"आताशा चिडचिड फार करते. पुष्कळदा तर....... "बोलता बोलता मधेच रघूनं जीभ चावली.
श्यामनं प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं.दबलेल्या वाफेसारखे रघूच्या तोंडून शब्द बाहेर पडले - "आई-बाबांची भांडणं होतात आजकाल. आई विचित्र वागते. विशेष बोलत नाही. सारखा वैताग- चिडचिड !
हे सगळं ऐकून शाम धास्तावला.त्याला हे सगळे नको असायला हवं होतं.

भुसभुशीत मातीच्या ढिगाऱ्यावर जोमानं उडी मारावी आणि तो ढिगारा खचावा तसं त्याचं झालं. रघूच्या खांद्यावर थोपटत त्यानं समजावलं,"आता सगळं ठीक होईल. आईला आता त्रास नाही होणार ज्योतीचा स्वभाव खूपच मनमिळावू....."
रघु उत्सुकतेनं अन् आश्चर्यानं बघत असलेला बघून श्यामच्या एकदम लक्षात आलं अरे आपण नकळत हे बोलूनच गेलो आणि त्यांना रघूला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. ज्योतीचा स्वभाव, घरची परिस्थिती, तिची जिद्द.....!
हे सगळं ऐकताना रघूचा चेहरा उजळून निघत होता. ओशट भांडं चिंचेनं घासताच लकाकावं तसा त्याचा चेहरा खुलला.
आपण मॅट्रिक होऊ शकू- नंदू बरा होऊ शकेल, बेबीचं लग्न होऊ शकेल हे सारं त्याला खरं वाटू लागलं.

घरात आता चांगल्या लाकडाची चूल पेटू लागेल, पोटाच्या खळग्याची झूल आता सावरली जाऊ शकेल, याची त्याला खात्री पटू लागली.
"मॅट्रिक झाल्यावर मी पुण्याला येऊ का रे ? मला मिळेल तिथे नोकरी ?" रघूनं कुतूहलानं विचारलं.

आणि मग ते दोघेही पुढच्या स्वप्नाचे गोफ विणू लागले.
श्याम- रघु -ज्योती तिघही कमावतील आणि नंदू लवकरच बरा होईल. बेबी -वासंतीचे लग्न होईल.आई-बाबा सगळेच पुण्याला स्थायिक होतील !
एखाद्या लोचट मांजरीसारखे ही स्वप्न त्यांच्या पायात घोटाळा लागली.लाकडाचा टाल मागे पडल्याचंही त्यांच्या लक्षात आलं नाही !
ते दोघही घरी परतले तेव्हा बरीचशी संध्याकाळ झाली होती.आज संध्याकाळी आई बाबांजवळ सगळं बोलायचा त्यानं निश्चय केला होता.
नदीच्या काठाकाठानं वाळू तुडवत त्यानं सगळे धागे मनाशी जुळवून ठेवले होते. नदीकाठानं फिरण्याची त्याची आवड अगदी जुनी होती.आज बऱ्याच दिवसांनी त्याची ही आवड पूर्ण झाली होती. एका वेगळ्याच भारावलेल्या अवस्थेत तो घरी आला. पायात तुडवलेल्या वाळूसारखे आपले जुने दिवसही दूर उडून जावे असं त्याला वाटत होतं.
तो घरात शिरला तेव्हा बाबा घरातच होते. बहिणी मात्र कुठं बाहेर गेल्या होत्या. नंदू खाटेवर पडल्यापडल्या कसलंसं पुस्तक वाचत होता.
श्यामनं बाबांना नमस्कार केला. बाबांनी उत्तरादाखल बरीच विचारपूस केली त्याच्या नोकरीबद्दल, मामाच्या मुलाबाळांबद्दल, परिस्थितीबाबत.
श्यामनं ओघाओघातच सगळं सांगितलं.पण ज्योतीचा विषय कसा काढावा हाच प्रश्न त्याला पडला. त्याला एकदाचा निर्णय घ्यायचा होता. मनातलं सगळं बोलायचं होतं.

ज्योतीशी लवकर लग्न झाल्याने आपल्या घरात एका मिळवत्या व्यक्तीची भर पडून आपली दैना सुधारणार होती हे त्याला बाबांना पटवून द्यायचं होतं. पण मार्ग गवसत नव्हता.
रात्री जेवताना त्यांनं म्हटलं, "रघूला पुण्याला न्यावं असा विचार आहे. नोकरीसाठी शब्द टाकेन कुणाकडे तरी."
त्यानं बाबांकडे अपेक्षेने बघितलं.बाबांनी नुसताच हुंकार भरला. एक खांबी तंबू सारखा केवळ त्या एका हुंकारावर त्यानं आपल्या विचारांचा मनोरा रचला. बाबांना सगळं सांगितलं- त्याच उत्साहानं, त्याच उत्सुकतेनं.
त्याचं सगळं सांगून होताच बाबांकडे बघितलं. ते निर्विकार होते. पोस्टाचे बरेचसे शिक्के बसल्याने नं वाचता येणाऱ्या पत्त्यासारखे.त्यांचे भाव त्याला कळले नाही.
तोही अधिक काही बोलला नाही.हात धुवून तो बाहेर अंगणात आला.थोड्याच वेळात रघू शर्ट घालत घालत बाहेर आला व पायात चपला सरकवत त्याला म्हणाला, " मी डॉक्टरकडे जाऊन येतो.आईचं औषध आणायला."
"आत्ता ? यावेळी ? "
रात्री जेवताना त्यांनं म्हटलं, "रघूला पुण्याला न्यावं असा विचार आहे. नोकरीसाठी शब्द टाकेन कुणाकडे तरी."
त्यानं बाबांकडे अपेक्षेने बघितलं.बाबांनी नुसताच हुंकार भरला. एक खांबी तंबू सारखा केवळ त्या एका हुंकारावर त्यानं आपल्या विचारांचा मनोरा रचला. बाबांना सगळं सांगितलं- त्याच उत्साहानं, त्याच उत्सुकतेनं.
त्याचं सगळं सांगून होताच बाबांकडे बघितलं. ते निर्विकार होते. पोस्टाचे बरेचसे शिक्के बसल्याने नं वाचता येणाऱ्या पत्त्यासारखे.त्यांचे भाव त्याला कळले नाही.
तोही अधिक काही बोलला नाही.हात धुवून तो बाहेर अंगणात आला.थोड्याच वेळात रघू शर्ट घालत घालत बाहेर आला व पायात चपला सरकवत त्याला म्हणाला, " मी डॉक्टरकडे जाऊन येतो.आईचं औषध आणायला."
"आत्ता ? यावेळी ? "
"आईला खूपच त्रास होतोय !
श्याम झपाट्याने आत गेला.आई स्वयंपाकघरात पाटावरच बसून मागे भिंतीला रेलली होती. चेहरा थकून गेला होता वांती झाल्यानं आजूबाजूला घाण पसरली होती. घामाचे ओघळ जिथल्या तिथंच थिजले होते.
तोही शर्ट घालत बाहेर आला, "चल, मीही येतो."
तेवढ्यात आतून बेबीनं म्हटलं, "दादा, आई म्हणतेय काठी घेऊन जा सोबत. विंचूकाट्याचं बघून जा !"
डॉक्टरांचं घर बरंच दूर होतं. श्यामनं आतून ती स्टिक आणली.आजच त्यानं ती पुण्याहून आणली होती. खास बाबांसाठी. नक्षीदार मुठीची. चमकणाऱ्या छटांची. बाबा लवकरच रिटायर होणार होते. त्यांना फिरायला जायचा खुप नाद होता.रिटायर झाल्यावर हातात काठी घेऊन फिरायला जाणाऱ्या बाबांचं चित्र जेव्हा त्याच्या समोर आलं तेव्हा त्यांना पुण्याला ही वॉकिंग स्टिक विकत घेतली.
पायात चपला सरकवत, हातात काठी घेत तो रघु बरोबर निघाला.वाटेत त्यानं रघूला विचारलं, "काय झालं रे आईला ?"
"कुणास ठाऊक ?" पण असं नेहमी होतं. मात्र डॉक्टर औषध देतात न मग बरं वाटतं ! तीन-चार महिन्यापासून असंच होतं."
ते दोघेही डॉक्टरांकडे पोहोचले तेव्हा साडेनऊ वाजले होते.त्यानं दारावरची कॉलबेल वाजवली.
डॉक्टर बहुदा जेवत असावेत. पाच-दहा मिनिटांनी डॉक्टरांनीच दार उघडलं न् रघूला पाहून म्हटलं, " या ! पुन्हा त्रास होतोय की काय आईला ? प्रत्येक वेळला यायची गरजच नाही.तसा त्रास सुरू झाला की मागे मी लिहून दिलेल्या गोळ्याच आणायच्या."
आणि मग श्यामकडे निर्देश करत त्यांनी विचारलं, "हा कोण ?" रघूनं श्यामची ओळख करून दिली. जुजबी विचारपूस झाल्यावर श्यामनं हलकेच विचारलं, "आईला असा त्रास नेहमी का होतो हो ? रघु म्हणत होता गेल्या तीन-चार महिन्यांपासून असं आहे म्हणून!"
" बस्स ! आता थोडे दिवस राहिलेत.....चार पाच महिने." डॉक्टरांनी म्हटलं.
श्यामला काहीच अर्थबोध झाला नाही. "म्हणजे? त्यानं विचारलं."
" व्हेरी सिम्पल माय बॉय ! डिलिव्हरी होईपर्यंत हा असा त्रास अधूनमधून होणारच. मी त्यावर औषध लिहून दिलीत. हवं तर पुन्हा लिहून देतो "असं म्हणत डॉक्टरांनी लेटरपॅड समोर ओढलं.
डॉक्टरांचे शब्द ऐकून आपल्यालाच भोवळ येतेय असं त्याला वाटू लागलं. क्षणभर मुंग्या आल्याप्रमाणे तो खुर्चीवर सुन्नपणे बसून राहिला.डॉक्टरांचे ते शब्द विंचवाच्या नांगीसारखे त्याला डंख मारू लागले. त्या एकाच दंशानं सगळ्या शरीरात जहाल वेदना चढाव्यात तशा डॉक्टरांच्या त्या एका वाक्याने त्याचं मन झालं.
"डिलिव्हरी होईपर्यंत हा असा त्रास अधूनमधून होणारच !"

"आईची डिलिव्हरी ! आठ मुलांनंतर !! आपल्याला अजून एक भावंडं होणार !!! अजून एक -अजून एक !
तो मनातल्या मनात विव्हळू लागला.त्याला काहीच सुचेनासं झालं.
डॉक्टरांनी दिलेला कागद घेत रघूनं त्याला म्हटलं, "चल लवकर. जायला हवं नाहीतर औषध मिळणार नाहीत !"
श्याम असहाय्य पायांनी उठला.अजूनही तो पुरता सावरला नव्हता.घोंगावणाऱ्या डासांसारखा एकच विचार त्याच्या मनात येत होता.
त्याची सगळी स्वप्न- मनोरथं -इच्छा कातरवेळेच्या चिलटासारखी त्याच्या डोळ्यात खुपू लागली. नंदूचं आजारपण, रघूचं शिक्षण, बेबी- वासंतीचं लग्न, ज्योती...
तो एकदम शहारला.ज्योतीचा विचारही त्याला असह्य झाला. आता ज्योतीला काय सांगायचं ? लग्न कधी करायचं म्हणून कीआपल्याला आता आणखी एक भावंडं होणार म्हणून ?
व्हॉल्वट्यूब फुटलेल्या चाकातल्या हवेसारखी आपल्या शरीरातून सगळी शक्ती बाहेर जात आहे असं त्याला वाटू लागलं. तो काठीला रेटत चालू लागला.
तो मनातल्या मनात विव्हळू लागला.त्याला काहीच सुचेनासं झालं.
डॉक्टरांनी दिलेला कागद घेत रघूनं त्याला म्हटलं, "चल लवकर. जायला हवं नाहीतर औषध मिळणार नाहीत !"
श्याम असहाय्य पायांनी उठला.अजूनही तो पुरता सावरला नव्हता.घोंगावणाऱ्या डासांसारखा एकच विचार त्याच्या मनात येत होता.
त्याची सगळी स्वप्न- मनोरथं -इच्छा कातरवेळेच्या चिलटासारखी त्याच्या डोळ्यात खुपू लागली. नंदूचं आजारपण, रघूचं शिक्षण, बेबी- वासंतीचं लग्न, ज्योती...
तो एकदम शहारला.ज्योतीचा विचारही त्याला असह्य झाला. आता ज्योतीला काय सांगायचं ? लग्न कधी करायचं म्हणून कीआपल्याला आता आणखी एक भावंडं होणार म्हणून ?
व्हॉल्वट्यूब फुटलेल्या चाकातल्या हवेसारखी आपल्या शरीरातून सगळी शक्ती बाहेर जात आहे असं त्याला वाटू लागलं. तो काठीला रेटत चालू लागला.
ही काठी ! वडील रिटायर झाल्यावर त्यांना आधारासाठी हवी म्हणून त्यांना किती कौतुकानं ही काठी आणली होती पण आता त्याला स्वतःलाच त्या काठीच्या आधाराची आवश्यकता भासू लागली.
पण क्षणभरच ! मग कसल्याशा उर्मीत त्यानं ती काठी रस्त्याच्या कडेला दूर भिरकावून दिली. आपल्या स्वप्नांची पुरचुंडीही त्या काठी-सोबतच भिरकावल्याचं त्याला उमगलं.
आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचा कागद मुठीत घट्ट धरून तो मेडिकल स्टोअर्सची वाट चालू लागला.
लेखक - श्रीकांत काटे
सदर कथा दिवंगत लेखक श्रीकांत काटे यांची असून कथेचे सर्व हक्क त्यांच्या पत्नी वीणा काटे यांचेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.