लेखिका:अश्विनी कुणाल ओगले
आज निवांत वेळ मिळाला होता सुमिला.. पोरं शाळेत गेली होती आणि नवराही कामाच्या निम्मिताने चार दिवस बाहेर..
दारावरची बेल वाजली. पिझ्झा बॉय होता... तिने तर मागवलाच नव्हता पिज्जा नंतर कळलं की तो बाजूच्या आजीने मागवला होता.. चुकून त्याने बेल वाजवली होती....
सुमीने आजीला गोड हास्य देत दरवाजा बंद केला... मनात विचार आला ह्या आजी किती मस्त ना कधी पिज्जा ऑर्डर करतात, कधी मैत्रिणीसोबत पिकनिकला जातात... मस्त enjoy करतात... भारीच कौतुक वाटतं त्यांचं....
सुमी विचारांच्या तंद्रीत गुंग झाली.... आपण कधी स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी कधी बाहेरून जेवण मागवलचं नाही.... मागवलं तरी मुलांच्या हट्टापायी, तर कधी कामाचा load असेल तर तेव्हा कधीतरी.. पण स्वतःसाठी खासकरून कधीच जेवण मागवत नाही...
तेवढ्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला राधाचा...
राधा: "hi, सुमी.....कशी आहेस गं??
सुमी: "मी मस्त तू कशी आहेस??
राधा: "मी एकदम मस्त".. बरं मी ह्याच्यासाठी फोन केला की मी आज तुला भेटायला येते आहे....
सुमी: "छानच गं ये ना, भरपूर गप्पा मारू..
राधा: "तासाभरात येते"..
सुमीने राधा येईपर्यंत घर छान आवरलं....
राधा आली..
सुमीच्या गळ्यात पडली.. सुमिला पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले ..दोन वर्षाने भेटल्या होत्या मैत्रिणी..कडकडून मिठी मारली..
सुमी: "राधा बस मी ना पाणी घेऊन येते"..
राधा: "सुमी, मला पाणी वैगेरे काही नको, तयार हो आपल्याला बाहेर जायचे आहे"...
सुमी: "अगं बाहेर, नको नको.. मुलांना शाळेतून आणायचे आहे.. चार तासाने शाळा सुटेल....
राधा: 'चार तास पुष्कळ वेळ आहे, चल तू मला काही ऐकायचे नाही, नाही तर बघ मी आताच्या आता निघून जाईल"..
सुमी: "काय गं हे तुझं असे वागणे, लहान पोरीगत करते ?बाहेर जायचे होते तर मला कल्पना दयायची ना??आता असे मधेच.
तिचं वाक्य तोडतच राधा म्हणाली "हो मध्येच असंच जायचे, कारण आता पर्यंत चार वेळा तू ना ना बहाणे देऊन माझ्यासोबत बाहेर येणे रद्द केले म्हणून आज मी धाड टाकली.. चल चल वेळ वाया नको घालवू लगेच तयारीला लाग...
सुमी:"वेडा बाई"...
सुमी बेडरूममध्ये गेली आणि तयार होऊन बाहेर आली.
तिला पाहून राधा म्हणाली "अगं बाहेर जायचे आहे फिरायला, साडी काय नेसली.. जा मस्त जीन्स आणि टॉप घाल....
सुमी: "अगं असू दे गं ,छान वाटतेय...
राधा:" तू अशी येणार असशील ना तर मी नेणार नाही हा माझ्यासोबत"..जा चल ..
सुमी:"काय गं राधा,किती सतवते. तू ना बदलणार नाही..
राधा: "मी नाहीच बदलणार "
सुमी: "बरं बाई येते जीन्स टॉप घालून
सुमी छान जीन्स टॉप घालून आली.....
राधा :"आता शोभते माझी मैत्रीण.. पण...
सुमी:"आता पण काय???
राधा:"अगं तू कॉलेजला असताना किती आवडीने लायनर लावायची, ते दिसत नाही तुझ्या डोळ्यावर.. आणि हे काय केस बांधले आहेस.. मोकळे केस आवडायचे ना???
सुमी: "हो गं आवडायचे आता कुठे पाहिल्यासारखे डोळे आणि केस राहिले?? कॉलेजमध्ये तरुण होते आता काय चाळिशीकडे झुकते आहे..
पांढरे केस आता वाकून बघतात मग आपलं त्यांना घट्ट बांधून ठेवलेलं बरं वाटतं... लायनर लावायला त्वचा कुठे पहिल्यासारखी राहिली आहे??.... कुठे ते आता शोभणार??
राधा: "तू ना काहीही बोलते, तुझं तूच ठरवून मोकळी झाली???
शरीरात बदल होतो ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या आवडीनिवडी बदलायच्या.. त्यांची सांगड घालायची.... तूच मला शिकवलं होतं ना मेकअप करायला आणि आता तूच अशी बोलते??....
सुमी: "वेळेनुसार स्वतःला बदलायचे".
राधा: "वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करायचे असतात अगदीच स्वतःला विसरुन जायचे नाही" तू तेच करते आहे.. स्वतःच्या आवडीनिवडी जपतेस??? तुला लक्षात तरी आहे का तुला काय आवडायचे?? का, ते पण विसरली??
सुमी: "आता संसार म्हंटल्यावर कुठेतरी आपण हरवून जातोच ना गं राधा??
राधा: "हो बरोबर बोलते आहेस? हरवून गेली आहेस. तुला आठवते का तू मला शेवटचा फोन कधी केला होता?? इतकं हरवून गेलीस की तू तुझं अस्तित्वच विसरून गेलीस..
एकाच शहरात राहून आपण दोन वर्षाने भेटतो आहे... कोणत्या तंद्रीत जगतेस गं??? स्वतःच अस्तित्व विसरून जगण्याला काहीच अर्थ नाही.. दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधावा पण स्वतःला विसरून, स्वतःच्या आवडीनिवडी विसरून हा स्वतःवर अन्याय आहे.
राधाचा प्रत्येक शब्द मनापासून ऐकत होती..
जुन्या दिवसात ती रमली... किती आवड होती तिला नटण्याची, मुरडण्याची... छान छान फोटो काढून स्वतःला पहात राहायची..
पिज्जा तर खूप आवडायचा.. मैत्रिणींसोबत सहलीला जायला खूप आवडायचे.
पावसाळयात गरमगरम मका, पाणीपुरी किती वेडी होती त्या गोष्टीसाठी. आता मात्र वेळेनुसार वेड कमी झाले होते.. का तिने स्वतःलाच बदललं होतं?? तिचं तिलाच कळत न्हवतं..
सुमीची तंद्री भंग झाली....
राधाने तिला खुर्चीवर बसवले..पर्समधून लायनर, लिपस्टिक काढली आणि छान हलकासा मेकअप केला....
सुमीने आरशात पाहिले... किती गोड दिसत होती...
राधा बोलू लागली"आठवले का जुने दिवस???
सुमी:"हो गं आठवले, कसं हळूहळू सर्वच विसरत गेले गं मी... कधी विसरले माझ्या आवडी तेच कळलं नाही... आईशी हट्ट करून मी किती मेकअपचे सामान घ्यायची.. किती हौस होती गं..
वेगवेगळ्या केशरचना करायची.. वेगवेगळ्या रंगाचे रबर, क्लिपा माझ्या बॅगमध्ये असायच्या... सप्तरंगी बांगड्या, वेगवेगळ्या डिजाईनच्या अंगठ्या.. कानातले तर इतके होते की विचारू नको... दर सणाला हातावर मेहंदी असायची..
राधा: "हो ना मग आता काय झाले ??
सुमी: "माहीत नाही गं, कामाच्या व्यापात कुठे वेळ मिळतो?? कदाचित त्यामुळे.
राधा: "वेळ मिळत नाही हे कारण नाही, मुळात तू स्वतःला गृहीत धरते, तू काय मीसुद्धा स्वतःला गृहीत धरत होती. पण एक वेळ अशी आली ज्याने मला जाणीव करून दिली आयुष्य फक्त दुसऱ्याचा विचार, सुख यासाठी जगायचे नसते, स्वतःला प्राधान्य दयायचे असते.
सुमी मला काही महिन्यापूर्वी मायनर अटॅक आला आणि तेव्हाच मला जाणीव झाली की मी काय गमावते आहे..
तुझ्यासारखीच स्वतःला विसरून जगत होती, मुलांसाठी, नवऱ्यासाठी पण त्या वाईट वेळेने मला जाणीव करून दिली की माझं अस्तित्व किती महत्वाचे आहे मी नसेल तर मग आयुष्यात काहीच नाही..
मीच जर धडधाकट नसेल, मीच स्वतःला खुश ठेवत नसेल तर मग आयुष्य जगण्याला जरापण अर्थ आहे का??? ह्या विचाराने मी घाबरली गं? खूप घाबरली. माझं काही झालं असतं तर??
तेव्हा शपथ घेतली स्वतःला नेहमी खुश ठेवणार.. आधी स्वतःला प्राधान्य देणार. स्वतःच्या आवडीनिवडी जपणार.. स्वार्थी होणार आता.
हा स्वार्थीपणा हवा गं नाही तर आयुष्य बेचव होते... खूप बेचव...
हे बेचव आयुष्य आपण चवीने जगतो.. असं वाटतं
आपली माणसं खुश तर आपण खुश पण स्वतःच्या आनंदाला काडीची किंमत देत नाही...
अगं आपण साधा स्वयंपाक जरी करतो ना तरीसुद्धा आपल्या मुलांना काय आवडतं, नवऱ्याला काय आवडतं हाच पहिला विचार करतो..
कपडे जरी विकत घेतो तेव्हा पण तसंच... स्वतःला आवडतं म्हणून कोणती गोष्ट आपाण खास करतो?? तुला आठवत आहे का की स्वतःला खुश ठेवण्यासाठी कोणती गोष्ट केली?? स्वतःला आवडतं म्हणून कोणता पदार्थ केलास???
आठवतं आहे का???
सुमी :"हो गं,खरंच किती हरवले गं मी..काहीवेळापूर्वी बाजूच्या अजीबाईंनी पिज्जा ऑर्डर केला..तेव्हाच विचार आला की मी माझ्यासाठी कधी मागवला होता पिज्जा....??
राधा:"हेच तर गमक आहे जीवनाचे .जेव्हा जीवन वाळूप्रमाणे निसटून जात असते ना तेव्हा क्षणांना घट्ट पकडून ठेवायचा मोह आवरत नाही...क्षण भरभरून जगावा वाटतो ..पण तुला सांगते.. आता मरण कधीही उभं राहतं बघ.
मी अनुभवलंय म्हणून सांगते... आजचा ,आताचा क्षण भरभरून जागून घे..उद्याचा दिवस आला तर ठीक आणि नाही आला तरी खंत राहणार नाही की, आपण स्वतःच अस्तिव विसरून जगलो....बरोबर ना???
सुमीने स्वतःचे केस मोकळे सोडले, राधाच्या हातात हात घातला आणि म्हणाली
"एकदम बरोबर राधा मॅडम, चला आता आपल्याला उशीर होतो आहे "...
हरवलेली सुमी पुन्हा सापडली होती..
तुम्हीसुद्धा हरवला असाल तर ,स्वतःचा लवकरात लवकर शोध घ्या...स्वतःच्या आवडीनिवडी जपा...... शेवटी अस्तिव विसरून चालायचं नाही..बरोबर ना??
© अश्विनी कुणाल ओगले.
सदर कथा लेखिका अश्विनी कुणाल ओगले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
