© वर्षा पाचारणे.
गीता गोरीपान, नाकीडोळी रेखीव असलेली, मनमिळावू शिक्षिका होती. तिचा नवरा आणि ती एकाच शाळेत शिक्षकी पेशात कार्यरत होते.
संसारवेलीवर मिताली आणि ध्रुवसारखी दोन गोंडस फुलं उमलली होती..... गीताचा नवरा सतीश अतिशय स्वार्थी मनुष्य होता... शिक्षक असूनही स्वतः कधीही नीतिमुल्यांची जपणूक म्हणून त्याने केली नाही.
गीताबरोबर लग्न करतानाही त्याने तिच्या सौंदर्याचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घेता येईल, असा विचार केला होता.
गीता शाळेतील आदर्श शिक्षिका होती... तिच्या गोड, मृदुभाषी स्वभावामुळे कुणालाही ती लगेच आपलसं करायची. विद्यार्थ्यांना तर गीता म्हणजे शाळेतली दुसरी आईचं वाटायची.
गीता शाळेतील आदर्श शिक्षिका होती... तिच्या गोड, मृदुभाषी स्वभावामुळे कुणालाही ती लगेच आपलसं करायची. विद्यार्थ्यांना तर गीता म्हणजे शाळेतली दुसरी आईचं वाटायची.
कुठलाही विद्यार्थी शाळेत पडला, त्याला लागलं, खरचटलं तर सगळ्यात आधी, गीता त्याला मायेनं गोंजारत, त्याचं रडणं थांबवायची... जखमेवर मलमपट्टी व्हायच्या आधीच, मनावर फुंकर घातली जायची... अश्या या शाळेतील गीता मॅडम मुलांच्या लाडक्या नसतील तर नवलच!....
पण घरात मात्र सतीश तिला अतिशय वाईट वागणूक द्यायचा.
पण घरात मात्र सतीश तिला अतिशय वाईट वागणूक द्यायचा.
शाळेत जाताना तिने मान वर करून बघायचे नाही, तोंडाला पूर्ण स्कार्फ गुंडाळून जायचे, सुट्टीच्या दिवशी तर घरातून बाहेरदेखील पडायचे नाही, असा त्याचा विनाकारण धाक होता.
गीताचा मुलीच्या म्हणजेच मितालीच्या लक्षात यायचे की, आई बाबांना खूप घाबरते .... पण का? हे माहीत नव्हतं... कारण अनेकदा मुलं झोपल्यानंतर सतीश तिला मारझोड करी. तिच्यावर संशय घेत, तिला शिवीगाळ करीत असे... आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मुलांसमोर अगदी आदर्श बाबा बनून तयार.
नक्की चूक कोणाची? हे समजण्याचा मितालीचं वयंच नव्हतं. त्यात आईदेखील गरीब गाय.... त्यामुळे रात्री सतीशने कितीही तमाशे केले, तरी त्याची झळ आपल्या लेकरांना कधी लागू नये, म्हणून सतत तळमळायची.
एक दिवस नेमकेच शिंदे सर गावात राहायला आले.
एक दिवस नेमकेच शिंदे सर गावात राहायला आले.
सतीशने त्यांच्या पुढे पुढे करत ओळख वाढवली.... स्त्री लंपट म्हणून चर्चेत असलेल्या त्या अधिकाऱ्याचा आपण मुख्याध्यापक होण्यासाठी उपयोग करून घेता येईल, असा विचार करून त्याने एक दिवस त्या शिंदे सरांना जेवणाचं आमंत्रण दिलं.
'गीता मॅडम' म्हणजेच सतीशची बायको आहे, हे शिंदेंना आधीच कळले होते... त्यादिवशी सतीशने गीताला मटणाचा बेत करायला लावला... "तू त्यांच्याकडे स्वतःहून माझ्या पदासाठी शब्द टाक", असे तिला जवळपास दरडावलेच.
'आपल्या नशिबात किती त्रास लिहून ठेवलाय?', या विचाराने नकळत गालावर आलेले अश्रू तिने कसेबसे पुसले.... भविष्यात येणाऱ्या वादळाची ती नांदी होती याची मात्र तिला धूसरशी कल्पना देखील नव्हती.
इमाने इतबारे नोकरी करणाऱ्या गीताला शिंदे सरांना असे 'नवऱ्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करा' म्हणण्याचे मात्र काही केल्या धाडस झाले नाही.
इमाने इतबारे नोकरी करणाऱ्या गीताला शिंदे सरांना असे 'नवऱ्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करा' म्हणण्याचे मात्र काही केल्या धाडस झाले नाही.
जेवणाचा बेत उरकून शिंदेंची गाडी गेटबाहेर पडताच ,'खूप रात्र झाली आहे', असं म्हणत सतीशने मुलांना झोपायला पिटाळले.
"आता आपली काही खैर नाही", हे लक्षात आलेली गीता मात्र नवऱ्यासमोर बळीच्या बक-याप्रमाणे उभी होती. तिच्या खाटकन मुस्काटात मारत सतीशने शिव्यांची लाखोली वाहिली.
चादरीमधून चोरून लपून मिताली आपल्या बापाचे प्रताप बघत होती.... मिताली आणि गीता दोघींच्याही तोंडातून मात्र निःशब्द हुंदके फुटत होते.
सकाळ होताच नाश्त्याच्या टेबलवर सतीश मुलांना म्हणाला, "बरं का बाळांनो, आज आईला आणि मला रात्री कामानिमित्त बाहेर जायचे आहे... रात्री यायला उशीर होईल... ते आमचे शिंदे सर आहेत ना त्यांनी पार्टी ठेवली आहे"... त्याने असे म्हणताच गीता मात्र बर्फासारखी गोठली.

रात्री मारझोड करत सतीशने दिलेल्या जखमांनी अंग नको तसं ठणकत होतं... त्यात 'आज रात्री काय घडणार?' या विचाराने ती खूप अस्वस्थ झाली...
"आज रात्री मला कुठलीही कारणं नकोत"... एक पातळ अशी नाजूक डिझाईनची साडी तिच्या पुढ्यात टाकत, "आज हीच साडी घाल", म्हणत सतीशने तिच्याकडे चिडून बघितले.
शाळेतून दुपारी घरी आल्यानंतर गीताला संध्याकाळच्या विचाराने घाम फुटला होता. जसजशी संध्याकाळ जवळ यायला लागली, तशी ती अधिकच अस्वस्थ व्हायला लागली.
सतीश आता कुठल्याही वेळी घरी येईल, या विचाराने विचारी गीता, त्याने सांगितलेली साडी नेसून तयार झाली. परंतु तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता मात्र साफ झळकत होती.
सतीश घरी आला आणि त्याने सांगितलेली साडी नेसून गीता तयार असल्याचे पाहताच खुश होऊन म्हणाला ,"अगदी राणीसारखी दिसतेस बघ... आज शिंदे सरांना तुझ्या दिसण्याने घायाळ कर आणि माझा मुख्याध्यापक पदाचा मार्ग मोकळा कर, मग तुला काय वाटेल ते देईल".... त्याचं हे बोलणं ऐकून गीताला त्याची किळस येऊ लागली.
हा नराधम आपल्याला आज कुठल्या मार्गावर ढकलणार? या विचाराने ती आतून पुरती खचली होती.
हा नराधम आपल्याला आज कुठल्या मार्गावर ढकलणार? या विचाराने ती आतून पुरती खचली होती.
मुलांकडे मायेने पहात, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत गीता म्हणाली "मीतू, बाळा तू आणि ध्रुव दोघही जेवून झोपा... आम्हाला उशीर होईल, त्यामुळे दरवाजा लावून घे.. आम्ही जाताना चावी घेऊन जाऊ"..... आईची अस्वस्थता बघून, मिताली मात्र आतल्या आत तुटत होती.
एवढीशी पोर ती... पण मोठ्यांपेक्षाही जास्त समज होती तिला... ती आईचा हात हातात घेत म्हणाली ,"आई काळजी घे आणि लवकर परत ये".... तिने असे म्हणताच गीताच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
गीता आणि सतीश, शिंदे सरांच्या बंगल्यावर पोहोचले... तिथे सुनसान वातावरण पाहून, कुठल्याही प्रकारची पार्टी असेल, असं वाटत नव्हतं.
गीता आणि सतीश, शिंदे सरांच्या बंगल्यावर पोहोचले... तिथे सुनसान वातावरण पाहून, कुठल्याही प्रकारची पार्टी असेल, असं वाटत नव्हतं.
गीता सतीशला म्हणाली ,"काय हो? तुम्ही तर सरांकडे पार्टी आहे असं सांगितलं, पण इथे तर कोणीच दिसत नाही"... त्यावर सतीश म्हणाला ,'अगं मी मुख्याध्यापक झालो की लगेच ठेवूया आपण पार्टी बघ'... आणि विचित्र हसत तो गीताचा हात पकडून बंगल्यात शिरला.
शिंदे सरांबरोबर थोड्या गप्पा मारून, आपल्याला दुसरा फोन आला आहे, असं म्हणून त्याने तिथून काढता पाय घेतला.
शिंदे सरांबरोबर थोड्या गप्पा मारून, आपल्याला दुसरा फोन आला आहे, असं म्हणून त्याने तिथून काढता पाय घेतला.
शिंदे सर म्हणजे जवळपास गीताच्या वडिलांच्या वयाचे होते... आपल्यावर सूड उगवण्यासाठी अनेक लोकांनी आपण स्त्रीलंपट आहोत, अशी प्रतिमा बनवली आहे, हे त्यांनी बोलण्या बोलण्यातून गीताला सांगितले.
शिंदे सरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावे की नाही? या विचारात असतानाच शिंदे सरांनी मात्र गीताला तिच्या माहेरबद्दल, मुलांबद्दल आपुलकीने विचारले. 'सतीशबद्दल फार काही चांगले ऐकू आले नाही', असे म्हणत त्यांनी गीताला त्याच्याबद्दल खोदून खोदून विचारले.
परंतु ती मात्र काहीही सांगण्यास तयार नाही, हे पाहून सर स्वतः तिला म्हणाले ,"हे बघ मुली, तू एक शिक्षिका आहेस. बाहेर जरी मी तुला गीता मॅडम म्हणून ओळखत असलो, तरी तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संकोच न करता मला सांग. तू आज एवढी दचकून का वागत आहेस?"
'सतीश स्वतःच्या स्वार्थासाठी तिला येथे घेऊन आला आहे', हे कसे सांगायचे या विचारात असतानाच तिला आदल्या दिवशीची रात्र आठवली... जबरदस्त मारझोड करत त्याने किती मोठा तमाशा केला होता, हे आठवून तिच्या अंगावर शहारा आला.
ती दबक्या आवाजात शिंदे सरांना म्हणाली ,"सर, यांना मुख्याध्यापक व्हायचे आहे"... शिंदे सरांना जे समजायचं होतं, ते समजलं.. इतक्यात सतीश तिथे आला आणि म्हणाला ,"माफ करा सर. मला यायला जरा जास्तच वेळ लागला"... इतक्या वेळात गीताने सरांकडे आपला विषय नक्कीच काढला असेल, या खुशीत तो सरांना म्हणाला ,"आम्ही आता निघतो".
थोड्याच दिवसात सतीशची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली... दिवसभर पेढे वाटून, शुभेच्छा स्वीकारुन खुशीत असलेला सतीश घरी आला.
थोड्याच दिवसात सतीशची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली... दिवसभर पेढे वाटून, शुभेच्छा स्वीकारुन खुशीत असलेला सतीश घरी आला.
बायकोपुढे एका नवीन साडीचा खोकं सरकवत म्हणाला ,"आजच्या या आनंदाच्या दिवसासाठी खरे तर तुझे आभार मानायला पाहिजेत. आज आपण दोघांनी हा क्षण साजरा करायचा आहे... संध्याकाळी मी यायच्या आधी तयार रहा"
'आता आणखी कुठल्या मोठ्या दिवसाला सामोरे जावे लागणार?', या विचाराने पुन्हा एकदा गीताच्या पोटात गोळा आला... 'मागच्यावेळी देव माणसाप्रमाणे शिंदे सर मला समजू शकले... खरंतर एका देव माणसाची प्रतिमा या अश्या स्वार्थी लांडग्यांनी मलीन केली होती'
संध्याकाळी पुन्हा एकदा मुलांना टाटा, बाय बाय, करून दाराबाहेर पाऊल ठेवताना आज मात्र गीताचं पाऊल उंबरठ्यावर अडखळलं.
संध्याकाळी पुन्हा एकदा मुलांना टाटा, बाय बाय, करून दाराबाहेर पाऊल ठेवताना आज मात्र गीताचं पाऊल उंबरठ्यावर अडखळलं.
मागे उभ्या असलेल्या मितालीच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती... आपल्या एवढ्याशा लेकीच्या प्रेमळ, अश्रूभरल्या नजरेला नजर मिळवण्याची मात्र गीताच्या डोळ्यांमध्ये आता हिंमत उरली नव्हती.
आधीच काळाकुट्ट अंधार आणि त्यात सोबतीला सतीश सारखा धोकेबाज नवरा... यामुळे एक एक पाऊल पुढे टाकताना गीताच्या अंगावरचे शहारे वाढत चालले होते.
आधीच काळाकुट्ट अंधार आणि त्यात सोबतीला सतीश सारखा धोकेबाज नवरा... यामुळे एक एक पाऊल पुढे टाकताना गीताच्या अंगावरचे शहारे वाढत चालले होते.
एका टेकडीवर येऊन त्याने तिला एक चिठ्ठी लिहायला लावली.... "मी माझ्या नवऱ्याशी प्रतारणा करत परपुरुषाशी संबंध ठेवल्याने मला माझीच लाज वाटत आहे आणि म्हणूनच मी आत्महत्या करीत आहे... तरीही माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये". अशी चिठ्ठी ना त्याने तिला लिहायला लावली.
या असल्या घाणेरड्या जगण्यापेक्षा मृत्यू परवडला असं वाटून गीतानेही निमूटपणे चिठ्ठी लिहिली... "मी इथून निघून गेल्यावर तु या डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या कर, नाहीतर मी तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तुला माझ्या आयुष्यातूनंच नाही, तर सगळ्या जगाच्या नजरेतून उतरवेन"... अशी धमकी देऊन तो नवऱ्याच्या नात्याला कलंक असलेला नराधम तिथून निघून गेला.
रात्र सरली होती... घरात आई न दिसल्याने मिताली गांगरून गेली होती.... तिने बाबांना विचारताच ते धाय मोकलून रडू लागले.... "मिताली, तुझी आई आपल्याला सोडून गेली गं.....आईने आत्महत्या केली.... अशी कशी ती आपल्याला सोडून जाऊ शकते गं?... काय कमी होती तिला या घरात?"..... असे म्हणत मुलांपुढे रडण्याचे नाटक करत सतीशने आपलं कृत्य लपवत गीताच्या आत्महत्येची बातमी पसरवली.
तिने लिहिलेली चिठ्ठी शेजारीपाजाऱ्यांना दाखवत त्यातला मजकूर तो मुद्दाम दहा वेळा वाचून दाखवत होता.... "मी कुठलीच कमी ठेवली नव्हती संसारात".. असं म्हणून स्वतः चांगलं असल्याचा आभास निर्माण करत होता... त्याचं हे रडगाणे सुरू असताना दारात शिंदे सर उभे राहिले...

'मुख्याध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता शिंदे सरांकडे आपलं काहीही काम नसणार', या विचाराने त्यांची जमेल तितकी बदनामी करावी, या हेतूने सतीश तावातावाने उठला.
शिंदे सरांच्या शर्टाची कॉलर पकडत म्हणाला "यानेच माझ्या बायकोला फूस लावून माझ्या संसाराचं वाटोळं केलं".... त्यांच्या मागे उभे असलेले पोलीस बघताच आता मात्र सतीशला काहीच कळेनासं झालं.
'आत्महत्येची केस असल्याने पोलीस आले असतील', या विचाराने पोलिसांपुढे शिंदेसरांबद्दल उलट-सुलट बोलू लागला....
जमलेले शेजारीपाजारी मात्र हे सगळं अवाक् होऊन पाहत होते.... गीतासारखी मनमिळावू, सुस्वभावी आणि चारित्र्यसंपन्न असलेली शिक्षिका, कधीही वाममार्गावर जाणार नाही आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाही, याची सर्वांनाच खात्री होती.

पोलिसांनी सतीशला 'जे काही सांगायचं,ते पोलीस स्टेशनला येऊन सांग', असे म्हणत गाडीत बसवले.... आधीच आई घरात नाही आणि त्यात आता बाबांनाही पोलीस घेऊन गेले, हे बघून मुलं आक्रोश करत होती... आईsssss बाबाsssss म्हणून हुंदके देत होती.
सतीश पोलीस स्टेशनला पोहोचला. शिंदे सरांच्या नावाने आरडाओरड करत त्यांच्याविरुद्ध 'मला पोलिस कंप्लेंट करायची आहे', असं म्हणत पोलिसांपुढे रडारड करत होता.
सतीश पोलीस स्टेशनला पोहोचला. शिंदे सरांच्या नावाने आरडाओरड करत त्यांच्याविरुद्ध 'मला पोलिस कंप्लेंट करायची आहे', असं म्हणत पोलिसांपुढे रडारड करत होता.
इतक्यात त्याचे लक्ष कोपर्यात खुर्चीवर बसलेल्या गीताकडे गेलं... गीताला बघून सतीशला दरदरून घाम फुटला.... पोलिसांनी सतीशला पोलिसी खाक्या दाखवत चांगलाच फोडून काढला.... स्त्री वर अत्याचार केल्याबद्दल, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल, घरगुती हिंसाचार प्रकरणी मारझोड करण्याबद्दल अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले.
गीता सतीशजवळ जाऊन म्हणाली ,"सौंदर्य हा माझ्यासाठी शाप ठरेल, असं मला आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं... माझ्या सौंदर्याचा उपयोग स्वतःच्या पदोन्नतीसाठी व्हावा इतका नीच विचार तुमच्या डोक्यात आलाच कसा?
गीता सतीशजवळ जाऊन म्हणाली ,"सौंदर्य हा माझ्यासाठी शाप ठरेल, असं मला आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं... माझ्या सौंदर्याचा उपयोग स्वतःच्या पदोन्नतीसाठी व्हावा इतका नीच विचार तुमच्या डोक्यात आलाच कसा?
लेकरांच्या भविष्यासाठी मी तुमच्यासारख्या विकृत माणसाबरोबर इतकी वर्ष संसार करत राहिले... आई-वडिलांच्या विचित्र वागण्याने मुलांची झालेली फरफट मी अनेकदा बघितली होती... त्यामुळे स्वतःच्या मुलांच्या आयुष्यात अशी कुठलीही दुःख येऊ नये, म्हणून मी वारंवार तुमच्याकडून होणारी मारझोड सहन करत होते"...
"त्या दिवशी शिंदे सरांकडे घेऊन गेलात.... आमच्यात शारीरिक जवळीक झाली असेल, म्हणून तुम्हाला पदोन्नती मिळाली, या भ्रमात तुम्ही होतात... परंतु सगळेच पुरुष तुमच्यासारखे नीच नसतात... शिंदे सरांनी मला लेकीसारखं मानलं.
त्या रात्री तुम्ही मला स्वतःचा हेतू साध्य केल्यानंतर आयुष्यातून घालवून टाकणार याची मला आधीच कल्पना आली होती. मी शिंदे सरांना याबद्दल सांगताच त्यांनी मला एक कॅमेरा दिला. माझ्या केसांमध्ये क्लिपजवळ तो छोटासा कॅमेरा तुम्हाला दिसू नये अशी मी व्यवस्था केली. तुम्ही माझ्याकडून जबरदस्ती लिहून घेतलेली चिठ्ठी, मला आत्महत्या करण्यासाठी दिलेली धमकी, सगळंच त्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे"...
"शिंदे सरांसारखा देवमाणूस जर मला त्या दिवशी भेटला नसता, तर तुमच्या स्वार्थापोटी माझ्या चारित्र्याला कलंक लागला असता"... 'आपली आई कलंकित होती, हा डाग माझ्या मुलांनी आयुष्यभर मिरवला असता'... "परंतु तुमच्यासारख्या आयुष्य उध्वस्त करणाऱ्या वादळाला थांबवण्यासाठी कधीकधी शिंदे सरांसारख्या भक्कम आधार देणाऱ्या, परस्त्रीबद्दल सन्मान बाळगणाऱ्या आणि तुमच्या सारख्या लांडग्यांना धडा शिकवणाऱ्या निश्चल कठड्याची जास्त गरज असते".
या सर्व घटनेनंतर सतीशला शिक्षा तर झालीच, परंतु त्याची नोकरीही गेली.
गीताची बदली दुसऱ्या गावातल्या शाळेत झाली... बदलेल्या गावाबरोबरच आयुष्यातल्या आधीच्या आठवणी मनाच्या कप्प्यात बंद करत, तिने एका नवीन आयुष्याला सुरुवात केली.
आज गीताच्या दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत.... शांत, संयमी, सगळं सहन करणाऱ्या आईला बघत मोठी झालेली मुलं, आज तिचा आधार बनली आहेत.
गीताप्रमाणेच तिच्या मुलांमध्येही संस्कार आणि नीतिमूल्य अगदी ठासून भरली आहेत.... उद्ध्वस्त करणाऱ्या वादळाच्या तडाख्यात सावरलेल्या मायलेकरांचं आयुष्य आताकुठे खर्या अर्थाने मार्गी लागलं होतं.
©वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.