© अनुजा धारिया शेठ
खोटे बोलणे संगिताला जमतच नव्हते, म्हणून तर लग्नाचे वय निघून गेले तरी लग्न होत नव्हते. तिला बघायला आलेल्या प्रत्येक मुलाला ती सर्व खरे खरे सांगायची.
आता ओळखीतल्या एकाने सागरचे स्थळ सुचवले होते, आई आजारी म्हणून त्याचे लग्न जमत नव्हते.
या वेळेस मात्र बाबा अगदी हट्टाला पेटले होते. संगीता, मुलगा खूप चांगला आहे या वेळेस जर तू काही सांगितलेस तर मी जीव देईन अशी धमकी दिली. अन् ती मनाविरूद्ध लग्नाला तयार झाली.
संगीता सावळी असली तरी दिसायला चांगली होती, त्यामुळे सागरने होकार दिला. बाबांनी काही विघ्न येऊ नये म्हणून महिन्यातच लग्न आवरले.

संगीता सागरची पत्नी झाली.. पण खोटे बोलून संसार सुरू करायचा हे तिला काही पटत नव्हते, मुळात लग्नाची ही बेडीच तिच्या मनाविरूद्ध तिने स्विकारली होती.
सागरला जेव्हा कळेल तेव्हा तो काय करेल या बेडीचे की फसवणुकीचा आळ घेऊन मला हातकडी ठोकेल अशी भीती तिला वाट्त होती..
सर्व सोपस्कार झाले, अन् शेवटी ती घडी आली.. त्यांची खोली छान फुलांनी सजवली होती.. सारं काही मस्त.. मोगर्याच्या फुलांचा वास दरवळत होता, हातांत बदाम टाकलेले दूधाचा ग्लास होता. सगळे काही फुल फिल्मी वाटत होते.

खरतर तिच्या आयुष्यात असा दिवस कधी येईल असे तिला वाटले देखील नव्हते.. हा सगळा विचार करत असताना सागर आला, तशी ती गडबडली.. थरथरु लागली, तिला घाम फुटत होता.
सागर तिच्या जवळ आला, दोन्ही हात हातांत घेत त्याने तिला पलंगावर बसवले. अन् म्हणाला, घाबरू नको.. मला माहित आहे खूपच गडबडीत आपले लग्न झाले त्यामुळे आपल्याला वेळ मिळाला नाही एकमेकांना समजून घ्यायला.. पण आता आपण वेळ देऊ, कसलीच घाई नाही.. आधी आपण एकमेकांचे मित्र होऊ..
सागर खरच किती चांगले आहेत आणि आपण त्यांना फसवले असे कितीतरी विचार तिच्या मनात येत होते. तेवढ्यात सागरने परत तिला आवाज दिला, अग बोल ना काहीतरी.. तू बोलल्याशिवाय मला कसे समजणार?
पहिल्याच रात्री, सांगूं का ह्यांना? काय करू? शेवटी हो नाही करत तिने मन घट्ट केले आणि त्याला सर्व काही सांगितलं सारं खर.... सागर, मला माफ करा, मला तुम्हाला फसवायचे नव्हते, पण बाबांनी जीव द्यायची धमकी दिली आणि माझे तोंड बंद केले.. तुमच्या आधी जेवढी मुले बघायला आली त्या सर्वांना मी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमातच सर्व खर सांगितलं, मला एकदाच पाळी आली हो नंतर कधी आलीच नाही.. त्यामुळे मी या लग्नाला तयार नव्हते, पण बाबांपुढे माझे काहीच चालले नाही हो.. उगाचच तुम्हाला या बेड्यांमध्ये मी अडकवले.. मला माफ करा, मी तुमची गुन्हेगार आहे.. संगीता रडत होती..
सागर मात्र निशब्द झाला, त्याला काय बोलावे हे कळतच नव्हते. त्याचे हात पाय गार पडले, पण त्याने स्वतःला सावरले.

तो तिला म्हणाला, डॉक्टर म्हणालेत आई फक्त ६ महिन्याची सोबती आहे, तोपर्यंत आपण हे नाते निभावू, तिला अजून दूःख नको. पुढचे पुढे बघू..
सागरचे कुटुंब तसे छोटे होते, बहिण लग्न होऊन आधीच सासरी गेली होती. बाबा लवकरच गेले त्यामुळे बाकी सगळ्या नातेवाईकांनी आधीच हात वर केले होते.

घरची परिस्थिती फार काही श्रीमंत असे नाही पण खावून पिऊन सुखी होते. त्यामुळे तसे त्यांच्या संसारात नाक खुपसणार कोणीच नव्हते..
संगीता मनातून म्हणायची, ६ महिने तर ६ महिने पण तेवढा संसार तरी मी सुखाचा करेन. ह्याच आठवणींवर पुढे आयुष्य काढेन मी.. ह्या सर्वाची आशाच नव्हती मला, तरीही देवाने लग्नाच्या बेडीत अडकवले.. सागर सारखा जोडीदार मिळाला म्हणून त्याने समजून घेतले. दुसरे कॊणी असते तर कधीच मला हातकडी लावून तुरुंगात टाकले असते.
सागरला हा धक्का पचवायला काही दिवस गेले, संगीता सर्व मनापासून करायची.

आईची सेवा, घरंच सर्व, आल्या- गेल्यांचे स्वागत, आदरातिथ्य.. तें पाहून सागर तिच्याशी मैत्रिण म्हणून तरी नीट वागू लागला.
हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते फुलत होते.. संगीता खरच एक गुणी मुलगी आहे हे त्याला पटले होते.. त्याच्याही नकळत ही अवजड वाटणारी बेडी त्याला हवी हवीशी वाटू लागली होती.. पण हे शक्य नाही असे त्याचे मन त्याला म्हणायचे..
एके दिवशी त्याला ऑफिस मधून यायला उशीर झाला म्हणून संगीता काळजी करत होती.. आला तेव्हा खूप उशीर झाला होता, तो खूप नशेत होता. संगीता काहीच बोलली नाही, मनातून खूप वाटत होते त्याला ओरडावे, काहीतरी बोलावे पण माझा तेवढा हक्क नाही असा विचार तिच्या मनात आला, म्हणून तिने त्याला धरून रूममध्ये आणले.

काहीच न बोलता ती तिथून निघणार तेवढ्यात त्याने तिचा हात धरला, तिला जवळ ओढले.
दोघांचेही श्वास वेगाने वाहत होते आणि शेवटी एक एक सीमा पार झाल्या.
ती त्याच्या त्या स्पर्शाने इतकी मोहून गेली की त्याच्या प्रेमाच्या पावसात मस्त भिजावे असेच तिला वाट्त होते. रात्र सरली, सकाळ झाली, जाग येताच बघतात तर काय दोघे एकमेकांच्या कुशीत, कपडे आणि अंगावरच्या खुणा बरच काही बोलत होत्या.. तें पहिल्यांदा जवळ आले होते..
दोघेही एकमेकांची नजर चुकवत होते.. काय बोलावे? कसे बोलावे काहीच कळत नव्हते. शेवटी सागरने तिची माफी मागितली.. ती फ़क्त एवढच म्हणाली, माफी नका मागू, दोष माझाही आहे. पुढचे काही दिवस नजर चोरूनच वागत होते तें.
एके दिवशी सागर विचार करत होता, खरतर मला आवडते संगीता.. पाळी एकदाच येऊन गेली नंतर आलीच नाही, हा एक मुद्दा सोडला तर बाकी सर्व छान आहे, ती मुळात शांत आहे, घरचे सुद्धा छान बघत आहे, आईची काळजी घेत आहे... त्यादिवशी आम्ही जवळ आलो, तेव्हा सुद्धा काही वेगळे वाटले नाही मला, छानच वाटले.

पण, मूल होणार नाही.. आपण मूल दत्तक घेऊ शकतो. काय करावे? तिच्या मनात पण हेच असेल का? अचानक त्याला हि बेडी हवीहवीशी वाटू लागली होती..
पण तिच्यासमोर काही बोलायची हिम्मत होत नव्हती त्याची. नाईलाज होता त्याचा, मधल्या काळात बऱ्याच घटना घडून गेल्या होत्या.

तें मनाने, शरीराने जवळ आले असले तरी एक पण.. होता. आणि हा 'पण' च त्या दोघांच्या मध्ये येत होता.. शेवटी आईने शेवटचा श्वास घेतला, त्यांच्या लग्नाला सहा महिने झाले होते.
मनाविरूद्ध स्वीकारलेली लग्न बेडी संगीताला सुद्धा हवी होती.. पण सागरच्या आयुष्याची वाट लावायचा आपल्याला काही एक हक्क नाही, असा विचार करून ती काहीच बोलायची नाही.
आई गेल्यावर काही दिवस तें दोघेच होते, पण कोणीही बोलायला पुढाकार मात्र घेत नव्हते. सागरला ती हवी होती, तिची सोबत हवी होती. त्याने तिच्या सोबत बोलायचे ठरवलं.

पण त्याच वेळेस संगीताने आपले कर्तव्य पाळायचे ठरवले, तो काही बोलायच्या आधीच तिने वेगळे व्हायचा विषय काढला.. तिची इच्छा नाही असे समजून सागरने होकार दिला.
शेवटी वेगळे व्हायचा दिवस आला, संगीताला खूप जड जात होते, तिने त्याच्या आवडीचा शिरा केला, त्याला एक छानसा शर्ट गिफ्ट केला.. आपण कायम मित्र राहू असे म्हणत डोळ्यातले अश्रू पुसले.

पण, तिला हे सर्व असह्य होत होते. चक्कर आली, सागरने तिला उचलून बेडवर ठेवले, डॉक्टरांना बोलावले.. सागर खूप घाबरला होता.
डॉक्टर आल्यावर तिला तपासले, तिचे डोळे उघडले तोच गोड बातमी समजली... डॉक्टरांनी दोघांचेही अभिनंदन केले. तें आई बाबा होणार होते, खरच तो एक चमत्कार होता ज्यानें तिला तिचा एक स्त्री म्हणून हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला होता.
या बातमीने त्या दोघांनाही सुरुवातीला जी नको वाटणारी लग्न बेडी होती तिला हवीहवीशी वाटणारी करून टाकली.. आई- बाबा या बेडीत अडकताना मात्र तें नव्याने प्रेमात पडले आणि या बेडीने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले.

सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.