© मीनाक्षी वैद्य
'आजोळ' हा किती छान शब्द आहे. एक लय आहे त्या शब्दात.पुर्वी आजोळ हे मुलांसाठी विसाव्याचं ठिकाण होतं.
आजोळी मस्ती करायला मिळायचीच त्याबरोबर शिस्तीत काम करण्याची सवय लागायची.आजोळी काम करताना मुलांना मुळीच कंटाळा येत नसे कारण सगळं काम आटोपलं की आजीच्या गोष्टींची मेजवानी मुलांना मिळत असे.मधून मधून आजोबा पण काही काही सांगत असत.हे सगळं मुलांना हवंहवंसं वाटे.
आईबाबांनी काम सांगीतलं की चेहे-यावर कंटाळा दाखवणारी ही नातवंड आजोळी मात्र ऊत्साहानी काम करत.या गोष्टीचं आई-बाबांना आश्चर्यच वाटतं असे.अशी आजोळ नावाची ही जादू होती.
आईचं जे माहेर असतं ते नातवंडांचं आजोळ असतं. आजोळी प्रेमचप्रेम मिळत असतं.मामा- मामी ,आजी -आजोबा सगळेच नातवंडांवर प्रेम करतात
आजोळ हे एक चालतं बोलतं विद्यापीठ असतं जे नातवांच्या मनात प्रेमाची रुजवण करायचं, एकमेकांची सुख-दु:ख वाटून घ्यायला शिकावायाचं, जेवढ प्रेम करायचं तेवढंच नातवंडांचं चुकलं तर रागावायचही.
आजीच्या गोष्टी नातवांच्या निद्रारथाच सारथ्य करायच्या. या आलीशान रथामध्ये नातवंड गुडूप झोपायची पण...त्यांच्या सुप्त मनात त्या गोष्टी ‘प्रबोधनाची’ शिंपण हळूच करायच्या.या संस्काराच्या डहाळीवर झुलणा-या या मुलांचे ‘आई-बाबा’ मात्र खूप निर्धास्त असायचे.
आज त्या विद्यापीठाची नितांत गरज आहे. त्यांना पुन्हा आपलं करणं ही आजच्या काळाची गरज आहे. जगाची गती इतकी वाढली आहे की फक्त आई-बाबा आपल्या मुलांकडे आणि संसाराकडे चांगलं लक्ष देण्यात कधी कधी कमी पडतात.
अशावेळी आजोळची मदत घेणं केव्हाही योग्यच ठरेल. येणा-या पीढीच भविष्य उज्ज्वल असावं असं वाटत असेल तर आजी आजोबांचा सहवास आपल्या मुलांना द्यायलाच हवा.
आज विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे.यात आई आणि बाबा मुलांचं संगोपन करतात. आईबाबा दोघंही नोकरी करतात.अश्या परीस्थितीत लहान मुलं एकटे पडतात.त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आई-बाबांना वेळ नसतो.
मुलांचं भावविश्व उलगडून बघायला आई-बाबांना वेळ नसतो.अश्यावेळी आजी आजोबा यांचा नातवंडांना सहवास असेल तर नातवंडांचे प्रश्नं योग्य वेळी ओळखल्या जातात.त्याच्यावर उत्तर शोधल्या जाते. जर मुलं वाईट संगतीत असेल तर त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आजी आजोबाच करू शकतात.
आजी आजोबा नसतील तर आई-बाबा शिवाय ही नातवंड एकटी पडतात. बरेच प्रश्नं त्यांना पडतात. त्याचं उत्तर शोधायला आजी आजोबा त्यांना मदत करत असतात. ज्यांच्याघरी आजी आजोबा आहेत आणि नातवंडं त्यांच्यावर विश्वासानी सोपवून जे आई बाबा नोकरीवर जातात त्यांना आपल्या मुलांची काळजी नसते.
प्रत्येक गोष्टीला जसे नियम असतात तसे या गोष्टीलाही आहे. दोन्ही पक्षी लोकांचा एकमेकांवर विश्वास असेल तरच हे शक्य आहे. विश्वास हा सगळ्या नात्यांचा पाया आहे. दोन पिढ्यांनी जर एकमेकांवर विश्वास टाकला तर लहान मुलांना वाढवताना खूप सोपं जातं.
आईबाबा आपल्या मुलांच्या वेळी एक वेगळ्या भूमिकेत असतात. संसाराची सगळी अवधानं सांभाळून त्यांना मुलांचा शैक्षणिक, सामाजिक, भावनिक विकास करायचा असतो. हे सगळं करतांना स्वतःची नोकरी सुद्धा सांभाळायची असते.
यामध्ये ब-याच गोष्टी करायच्या राहून जातात किंवा ब-याच गोष्टींकडे लक्ष दिल्या जात नाही. अश्यावेळी आजी आजोबा आपलं योगदान देऊ शकतात. त्यांच्यावर ब-याच गोष्टी विश्वासानी सोपवल्या तर आई-बाबांवरचा खूप ताण कमी होतो.
आजी आजोबा पण एका काळी आई-बाबा असतात.त्यांनाही ब-याच गोष्टी आपल्या मुलांच्या वेळी करायच्या राहून गेलेल्या असतात. आपल्या मुलांच्या वेळी घाई घाईत केलेल्या गोष्टी आता ते नातवंडासाठी निवांत पणे करू शकतात.ते काम आजी आजोबा आवडीनं करतात.
आजोळ आपल्या नातवंडांना भरभरून सगळी पोषक द्रव्य देत असतं.ते म्हणजे प्रेम, शिस्त,उत्तम विचार, मोठ्यांचा आदर करण्याची सवय, गोष्टीतून चांगल्या विचारांची रूजवण करत असतं.
आज खरंच मुलांपासून आजोळ हा शब्द आणि आजोळ हे जग तसंच आजी आजोबा दूर जात चालले आहे. हे सगळं आपण नातवंडांना पुन्हा मिळवून द्यायला हवं.

आज सगळीकडे पैसा महत्वाचा झाला आहे त्यामुळे आजी आजोबा आणि नातवंडे यात एक दरी निर्माण झाली आहे. ही दरी मिटवण्याचा आपण कसोशीनी प्रयत्नं करायला हवा. मुलांचं जग सुद्धा झपाट्याने बदलतंय. पुर्वीसारख्या छोट्याशा गोष्टीत रमणारी ही पिढी नाही.
या पिढीला उत्तम संस्कार द्यायचे असतील तर त्यांच्या जगात आपण मिसळलं पाहिजे. त्यांचा प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण समजून घेतला पाहिजे.
त्यांचा चांगल्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी त्यांच्या वयानुसार त्यांना मिळाली असते. ती चूक आहे असं म्हणून त्यांच्यावर संस्कार करायला जाल तर ते तुमचा हेतू पूर्ण होऊ देणार नाहीत. त्याऐवजी मुलांची मतं,दृष्टी चांगली आहे पण त्यात आणखी थोडा बदल केला तर काय घडू शकतं हे मुलांना दाखवावं.
आपल्या मतांना,विचारांना महत्व मिळतंय हे कळल्यावर तेही एक पाऊल पुढे टाकतात. आईबाबा,आजी आजोबा यांचं म्हणणं ऐकण्यासाठी मुलं स्वतःहून पुढे आल्यानं योग्य गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवणं सोपं जातं.
मुलांच्या वयाच्या टप्प्यानुसार त्यांची विचार करण्याची पद्धत बदलत असते. या प्रत्येक टप्प्यात आई-बाबां पेक्षा आजी आजोबा निवांतपणे मुलांच्या जगात शिरू शकतात.
आज जगात स्पर्धेचे वातावरण तयार झालं आहे.सतत दुस-यांशी स्पर्धा करायची सवय आज प्रत्येकाला लागली आहे. आई वडील आणि मुलं यांनापण लागलेली आहे. प्रत्येक लहान सहान गोष्ट आता प्रतीष्ठेची व्हायला लागल्या आहेत त्यामुळे सगळ्यांचं वागणं बदलतंय. ते पुन्हा पहिल्यासारखं व्हायला हवं.
आजोळ नातवंडांना वाईट विचार, वाईट सवय, वाईट संगत यापासून वाचवणारी संरक्षक भींतं आहे. ती आपण पुन्हा बांधायला हवी.
ज्यांच्या घरी आजी आजोबा आहेत त्यांना या गोष्टी पटतील की मुलांना वाईट सवयी लागतात आहे, मुलं अभ्यासात मागे पडतात आहे हे आजी आजोबांच्या लगेच लक्षात येते.
पुष्कळदा आई बाबांना कामात व्यग्र असल्याने एकटं राहणा-या मुलांची मानसिकता, त्याच्या मनात चाललेलं द्वंद्व यांचा आईबाबांना अदमास येत नाही. परीणामी मुलांकडून नको ते पाऊल उचलल्या जातं आणि आयुष्याची सुरुवातही झालेली नसताना त्या मुलांचं आयुष्य वाळवंटासारखं होतं तर काही जीवाला मुकतात.
आजी आजोबा हे त्यांची मुलं आणि नातवंडं यांच्यातील दुवा असतात. मुलं वाढवण्याचा त्यांना अनुभव असतो.मुलांच्या वागण्यातील बदल त्यांच्या अनुभवी नजरेला कळून येतो.
या वयात मुलांकडे लक्षं देणं हेच काम आजी आजोबा आवडीनी करत असतात. त्यांनी मुलांमधला बदल सांगीतल्यावर आई बाबांनी ते झटकून न टाकता बघावं. खरच मुलामध्ये बदल झाला असेल तर तो सुधरवावा.यात आजी आजोबांची मदत घेतली तर उत्तम.
आजी आजोबा हेही कधी आई-बाबा होते. त्यांना धावपळीत त्यांच्या मुलांचे खूप लाड करता आले नाही. प्रेमानी कुरवाळता आलं नाही ती भूक ते नातवंडांना जवळ घेऊन पूर्ण करतात.आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय असते.
आजी आजोबा आणि नातवंडं यांच्यात पुर्वीचा प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करायला हवा. तसं झालं तर पुढली पिढी सुरक्षीत राहील.
आज जगातील वातावरण दुषीत झालेलं आहे.याला कोणीही एकटा जबाबदार नाही. भौतिक सुखाची चटक वाढल्याचे लक्षात येते. संवेदनहीन वृत्ती निर्माण झाली आहे याला कारण हे बदलते वातावरण आहे. यामुळे नात्यातही पुर्वीसारखा विश्वास राहिला नाही.
हे सगळं बदलणं एकट्याच्या हातात नाही. पण आपण आपल्या घराच्या चौकटी पुरतं हे वातावरण बदलायचं ठरवलं तरी खूप बदल घडू शकतो.एका पूर्ण कुटुंबानी म्हणजे आजी आजोबा,आई बाबा,आणि नातवंडं या सगळ्यांनी मिळून प्रयत्नं करायला हवे.
पुन्हा आजोळ हे विद्यापीठ अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. '
प्रयत्नांती परमेश्वर' असं म्हणतात मग जितके जास्त कुटुंबं आजोळ स्थापीत करण्यासाठी प्रयत्नं करतील तेवढीच यश मिळण्याची टक्केवारी वाढेल.
'आजोळ हे असं एक गाव आहे,
ज्याला आनंदाचं तोरण आहे.
नातवांसाठी ते प्रेमाचं कोंदण आहे,
नातवंड म्हणजे दुधावरची साय आहे.
आजोळची वाट पुन्हा चालायला हवी,
नातवंडांसाठी ही अत्तराची कुपी हवी.'

सदर लेख लेखिका मीनाक्षी वैद्य यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.