©अनुराधा पुष्कर
" काय सांगू तुम्हाला ? अहो माझा भाऊ आला होता आणि मीनाला लग्नासाठी तयार हो असं समजावत होता ,आमची मीना लग्नाला होच म्हणत नाही. "-आई
"का ..काही बाहेरच ..?'-मी
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
आमच्या कॉलनीत बाजूच्या घरातच एक कुटुंब राहायला आलं होत ..त्या कुटुंबात एक मुलगी आपल्या आई सोबात राहत होती. एक भाऊ होता तिला पण तो अजून शिकत होता.
ती मुलगी खूप शांत असायची. नेहमी पांढरा रंग वापरायची बरेचदा वाटलं कि जाऊन बोलावं, दिसायला साधी होती ,पण जवळचीच वाटायची का कोण जाणे ? हळू हळू तिच्या आईशी चांगलंच जमल आमच .
त्यांच्या बोलण्यावरून समजलं कि त्या मुलीचे म्हणजे मीना चे बाबा जग सोडून गेले ३ वर्षपूर्वी ....त्यामुळे ह्या मायलेकी ते गाव सोडून इकडे राह्यला आल्या होत्या ,मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न हि होता. तो इथे चांगला शिकला असता.
मीनाच्या वडिलांचे काही पैसे दरमहा येत होते. शिवाय मीना काहीतरी काम करायचीच बाहेर त्यामुळे त्यांचं बरं चालायचं. मींना एक स्वाभिमानी मुलगी होती. तिला कधी कोणाशी हुज्जत घालताना पाहिलं नाही मी ..नेहमी ती इतरांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असे.
पण ती रंग मात्र नेहमी पांढराच वापरत असे .मीनाला मंदिरात जाताना पाहून खूपच छान आणि शांत वाटायचं, तशी ती हि खूप शांत आणि समंजस मुलगी होती .
तिला बघितला कि नेहमी प्रश्न पडायचा ,हि इतकी शांत कशी असू शकते? कधी कोणाशी जास्त बोलणे नाही ,कधी तंटा नाही ,भांडण तर जमतच नव्हते तिला कोणालाही जास्त हो किंवा नाही असं काही नाही ,जे आहे ते ठीक आहे आणि छान आहे असं पवित्रा घेतलेली मीना !
बराच वेळा विचार केल्यावर लक्षात आले कि कदाचित ती पांढरा रंग जास्त वापरते म्हणून इतकी शांत झाली असेल बहुदा . कारण आपण जे रंग जास्त वापरतो ते आपल्याला आवडायला लागतात आणि त्याचा आपल्यावर तसा प्रभावही पडतो .
म्हणजे बघा ना जेव्हा आपण प्रेमात असतो ,तेव्हा गुलाबी रंग आपल्याला थोडा जास्त आवडायला लागतो ,लग्नात अचानक हिरवा आवडायला लागतो आणि रागात असल्यावर लाल, तर कंटाळा आला तर काहीच नको असेल तर काळा! असे सगळे रंग आणि त्याचे स्वभावावर होणारे परिणाम .
तर मीना ला मी बहुतेक करून पांढऱ्या रंगातच बघत असे .मंदिरात जाताना पांढरी साडी,कधी ड्रेस घातला तर तोही पांढरा किंवा हलका पिवळा ,मला आधी वाटलं खास मंदिरात जाण्यासाठी म्हणून घालत असेल ,पण नंतर पहिले कि बाहेर जाताना हि पांढरा ड्रेस ,पांढरी साडी काही ना काही पांढर असतेच पेहरावात .
तिला कॉलनीत राहायला येऊन जेमतेम सहा महिनेच झाले होते आणि आई सुद्धा सगळ्यात जास्त रमत नव्हती . जेवढ्यास तेवढे .त्यांचं घर तस शांत होत पण असच एकदा त्यांच्या घरातून जरा आवाज यायला लागला बघितले तर एक माणूस त्यांच्या घरात मोठ्याने बोलत होता ,जास्त ऐकू आले नाही पण कोणाच्या तरी लग्नाबद्दल बोलत होते बहुतेक .
दुसऱ्या दिवशी मीना च्या आईशी बोलावं असं ठरवून त्यांच्याकडे गेले जरा गप्पा टप्पा झाल्या आणि विचारलं काय हो काल काय झालं होत ? तुमच्या घरातून आवाज येत होता, तस कधी येत नाही म्हणून विचारले .काही प्रॉब्लेम आहे का?"
मीनाची आई शांत स्ववभावची होती तिला मी असं विचारल्यावर पहिल्यांदा तीन उडवाउडवी केली पण मग मन मोकळं करावं ह्या हेतूने कदाचित ती बोलू लागली ,
" काय सांगू तुम्हाला ? अहो माझा भाऊ आला होता आणि मीनाला लग्नासाठी तयार हो असं समजावत होता ,आमची मीना लग्नाला होच म्हणत नाही. "-आई
"का ..काही बाहेरच ..?'-मी
"नाही हो नाही असं काही नाही ..माझी मीना तशी मुलगी नाही .खूप धीराची आहे माझी पोर ..सगळं निमूटपणे सहन करते ..ललहान वयातच खूप वाईट रंग पहिले तिने समजाचाचे ,घरच्यांचे ,बहरच्यांचे ..पण अजूनही ती महेशला विसरू शकली नाही .."-आई
"महेश कोण?'-मी चाचपडत विचारलं
" मीना चा नवरा .. मीना च लग्न झालं होत ...माझा भाऊ तिच्या दुसर्या लग्नाबद्दल बोलत होता ...."-आई
काय दुसरं लग्न ? " मीनाचा वय बघता मला प्रश्न पडला .
"महेश कोण?'-मी चाचपडत विचारलं
" मीना चा नवरा .. मीना च लग्न झालं होत ...माझा भाऊ तिच्या दुसर्या लग्नाबद्दल बोलत होता ...."-आई
काय दुसरं लग्न ? " मीनाचा वय बघता मला प्रश्न पडला .
त्या बोलू लागल्या "३ वर्षांपूर्वी महेश आणि मीना ह्यांनी लव्ह मॅरेज केलं . संसार सुरु झाला , महेशच्या घरी लग्न मान्य नव्हतं, तरीपण महेश आणि मीना ने लग्न केलं..आम्हाला पण मान्य नव्हतं पण आजकालच्या पिढीच्या विचारप्रमाणे चालायला लागत म्हणून आम्ही स्वीकृती दिली .
महेश चांगला वाटला ..पण त्याच्या घरी प्रकरण थोडं गंभीर होत ..मीनाच्या सासूला मीना ला सून करून घ्यायचं हे आवडत नव्हतं ..त्यांनी महेश साठी दुसर स्थळ बघून ठेवलं होत ..त्या मुलीच्या घरच्या परिस्थिती चांगली होती आणि आमची बेताचीच ...
पण महेश ने ऐकलं नाही आणि ह्या दोघांनी लग्न केलं ...थोडा त्रास होता सुरवातीला सासूचा ,पण ठीक होत..मीना सगळं सहन करत होती महेश साठी ...महेशला हे दिसत होत आईच वागणं पण तो म्हणायचं कि थोडा वेळ दे ..होईल सगळं नीट .....
मीना हि समजदार होती ..मीना ची सासू तिला नाही नाही ते बोलत असे ..पाहुण्यांसमोर टोमणे मारत असे ..ह्या सगळ्या गोष्टींमुळे घरी खूप कुरबुर होत असे ..महेश ने कितीही प्रयत्न केले त्याची आई ऐकत नव्हती ..
बाकीचे म्हणायचे तुला तुझ्या आईचा स्ववभाव माहित आहे न सोडून दे विषय ..पण असं किती दिवस चालायचं ....आणि मग एके दिवशी अचानक तो अपघात झाला आणि त्या अपघातात महेश गेला आणि माझी पोर विधवा झाली. ..महेश गेल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला .
तो तिचा एकमेव आधार होता त्या घरात ..आधीच सासू तिला छळायची आणि मग तर सासूने घराबाहेर काढलं , नको तुझी सावली ह्या घरात म्हणून !
मग मी , मीना ला घेऊन राहू लागले ,पण मीना ला ह्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला .लग्नाला वर्षही झालं नव्हतं आणि हे असं झालं .. माझी मीना खूप हसणारी ,बोलकी ,आणि स्वाभिमानी होती . पण महेशच्या जाण्यानं एकदम गप्प झाली .."-तिची आई डोळ्यात पाणी आणून बोलू लागली .
"शांत व्हा ताई ...वेळेच्या पुढे आपण काय करू शकतो ... पण तिचं पूर्ण आयुष्य समोर पडलं आहे अजून ,,तिने विचार करायला हवा .."-मी आपला समजवायचं काम करत होते ..
"हो न, आम्हला हि तेच वाटत ...म्हणून तिचा मामा तिला समजावत होता पण ती ऐकतच नाही ..तिला आता कोणावरही विसंबून राह्यचं नाही म्हणते ..स्वतःसाठी आणि इतरांसाठी जगायचं आहे असं ठरवलंय तिने.... तिने ठरवलं कि आयुष्य असं रडत घालवायचं नाही ,तर तिच्यासारख्या अजूनही स्त्रिया असतील त्यांना मदत करायची , त्यांना आधार द्यायचा. काय करावं काही कळत नाही ,बघा.
"शांत व्हा ताई ...वेळेच्या पुढे आपण काय करू शकतो ... पण तिचं पूर्ण आयुष्य समोर पडलं आहे अजून ,,तिने विचार करायला हवा .."-मी आपला समजवायचं काम करत होते ..
"हो न, आम्हला हि तेच वाटत ...म्हणून तिचा मामा तिला समजावत होता पण ती ऐकतच नाही ..तिला आता कोणावरही विसंबून राह्यचं नाही म्हणते ..स्वतःसाठी आणि इतरांसाठी जगायचं आहे असं ठरवलंय तिने.... तिने ठरवलं कि आयुष्य असं रडत घालवायचं नाही ,तर तिच्यासारख्या अजूनही स्त्रिया असतील त्यांना मदत करायची , त्यांना आधार द्यायचा. काय करावं काही कळत नाही ,बघा.
तिला सांगितले कि रंगीत कपडे वापर लोकांची नजर असते तुझ्यावर ..तर म्हणते हो, पण पांढरा रंग काही सोडत नाही ,म्हणते महेश आता सोबत नाही ह्याचीच हा पांढरा रंग आठवण करून देतो म्हणून मी हा रंग सोडणार नाही .
ती म्हणते कि मी माझं आयुष्य ठरवलंय ,मी आता अनाथ मुलांना शिकवणार, विधवा स्त्रियांना मदतीचा हात देणार,माझा रंग वेगळा आहे ...मला महेशच्या आठवणीतच जगायचे आहे तो माझ्या सोबत आहे ह्या पांढऱ्या रंगात !" आणि त्या डोळे पुसू लागल्या .
ते ऐकून घरी आले आणि फार वाईट वाटलं , कधी कोणावर कशी वेळ येईल ते सांगता येत नाही . ह्या पोरीचं वय किती, उभं आयुष्य आहे डोळ्यापुढे, तरीही ह्या समाजाशी लढायला तयार आहे ..
ते ऐकून घरी आले आणि फार वाईट वाटलं , कधी कोणावर कशी वेळ येईल ते सांगता येत नाही . ह्या पोरीचं वय किती, उभं आयुष्य आहे डोळ्यापुढे, तरीही ह्या समाजाशी लढायला तयार आहे ..
तिच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये म्हणून तिची आई तिला वेगळंवेगळ्या रंगाचे कपडे घालायला सांगत असे कारण जर तिने सारखं पांढरा रंग वापरला तर बाकीच्या ना हे कळेल कि ती विधवा आहे आणि लोक तिचा गैरफायदा घेतील असं तिच्या आईच म्हणणं होत.
त्यांचं बोलणं ऐकून वाटू लागलं कि रंग किती महत्वाचे असतात आपल्यासाठी आयुष्य सुंदर बनवतात तर कधी कधी समाजाच्या वाईट नजरांपासूनही वाचवतात .मीना कडे बघताना बरेच विचार आले मनात किती तरी बायका नवऱ्याच्यामागे आलेल्या वैधव्याला कोसत बसतात ..त्या पांढऱ्या रंगला उद्देशून नशिबाच्या नावाने रडत असतात ..
पण मीनाचं तसं नव्हतं ..तिने आलेली परिस्थिती स्वीकारली आणि पुढे चालू राहिली. इतक्या लहान वयात किती ते शहाणपण आणि किती मोठं कार्य हातात घेतलं आहे तिने तिच्या त्या पांढऱ्या रंगाने तिला समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला ,एक वेगळी वाट दिली ज्यावर ती आता स्वाभिमानाने आणि खंबीरपणे चालू शकते ....तिला बघताना तिचा तो पांढरा रंग जणू सांगत होता कि हा तिच्या आत्मसन्मानाचा आणि निस्वार्थीपणाचा प्रतीक आहे
©अनुराधा पुष्कर
©अनुराधा पुष्कर
सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
Tags
relationships
