© प्रांजली लेले
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
भर पावसाळ्यातली ती संध्याकाळ...बाहेर अजूनही पावसाची रिपरिप चालूच होती. चिंटूला त्याचे मित्र खाली खेळायला बोलवत होते. आईने त्याला नाही म्हंटले तरी तो ऐकतोय कुठे..त्याने तर आधीच धूम ठोकली होती.
मुलांचे बाहेर पावसात मस्त क्रिकेट खेळणे चालू होते. केतकी वरून बाल्कनीतून त्यांची दंगामस्ती बघत होती. तिच्या डोळ्यासमोरून तिचे बालपण सहज तरळून गेले.
खरचं उगाच नाही म्हंटले आहे, "लहानपणं देगा देवा"..किती मजा असते ना या वयात, ना कसली काळजी ना चिंता, सगळं काही भरभरून अनुभवता येतं..ती तिच्याच विचारांच्या तंद्रीत असताना खालून मुलांचा एकच गोंधळ ऐकु आला.
पार्किंगमध्ये कार खाली गेलेला बॉल काढताना चिंटूला तेथे एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू अंगाचे मुटकुळं करून थरथरत बसलेले दिसले.

चिंटू ने त्याला हळूच बाहेर काढले आणि मग सर्व मुलांनी त्याच्या भोवती गराडा घातला. सर्व जण ते पिल्लू हातात घ्यायला गोंधळ घालत होते त्यामुळे ते अधिकच गांगरले आणि चिंटूला चिकटले तसे चिंटू ने त्याला लगेच वर आणले.
केतकी ने मात्र त्या पिल्लाला घरात न आणता कॉरिडॉर मध्ये ठेवायला सांगितले आणि चिंटूच्या आग्रहाखातर त्याच्यासाठी दूध, बिस्कीट दिले.

साधारण दोनेक महिन्याचे असावे ते पिल्लू..सोनेरी तपकिरी रंगाचे, डोक्यावर मधोमध चंद्रकोरी सारखा पांढरा पट्टा असलेले ते पिल्लू खरंच खूप गोजिरवाणे होते. चिंटू ने त्याला खायला घातले.
घरातील जुना टॉवेल घेऊन त्याचे अंग जरा कोरडे केले. दूध प्यायल्यावर जरा तरतरी आल्याने ते मग छान खेळायला लागले. सारी बच्चा कंपनी जरा वेळ त्याच्याशी खेळून मग आपापल्या घरी गेली.
चिंटू मात्र अजूनही त्या पिल्लूशी खेळत बसला होता. पाऊस गेल्यावर त्याला बाहेर सोडून यायला केतकी ने चिंटूला आधीच बजावले होते कारण केतकीला चिंटूच्या सवयी माहिती होत्या. त्याला मुळातच प्राण्यांचा फार लळा होता. कधी कुठे मांजरीचे पिल्लू दिसो की कुत्र्याचे ..तो लगेच घरी घेऊन येत असे आणि त्याला पाळायचे स्वप्न बघत असे. पण ती पिल्लं कुठे टिकणार..खाऊन पिऊन परत ती पळून जात. आता या पिल्लाला बघून त्याच्या बाल मनात परत नव्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
आज दत्त जयंती असल्याने केतकी ने देवाजवळ दिवा लावून श्रीदत्तगुरूंची आरती केली. चिंटूला आवडतो म्हणून सकाळी नैवेद्याला त्याच्या आवडीचा गोड शिरा केला होता.

संध्याकाळच्या आरतीसाठी आणि श्लोक म्हणायला केतकी ने चिंटूला घरात बोलावले. आधी बाथरुम मध्ये जाऊन त्या कुत्र्याला लावलेले हात आधी स्वच्छ धुवून ये असे आईने ओरडताच तो हो म्हणाला.
घरात येताना चिंटू ने अगदी न विसरता खालचे जिन्याचे दार बंद केले होते त्यामुळे पिल्लू कॉरिडॉर मधून पळून जाण्याचा प्रश्नच नव्हता. एव्हाना ते पिल्लू देखील खेळून थकल्याने जरा शांत पहुडले होते.
ते बघून चिंटू देखील श्लोक म्हणायला घरात आला. हातपाय धुवून त्याने रामरक्षा म्हंटली.
काही वेळाने बाबा घरी येताच त्याने खाली धावत जाऊन दार उघडले आणि मोठ्या उत्साहाने बाबांना आजचे सरप्राइज दाखवले. ते पहुडलेले गोड पिल्लू बाबांना पण आवडले. जणू काही एक छोटेसे सॉफ्ट टॉय तिथे ठेवले आहे असेच त्याला बघून भासत होते.
चिंटू ने मग नेहमी प्रमाणे बाबांच्या पाठी तगादा लावला की याला आपण पाळूया. बाबांनी पण नेहमीच्या अनुभवाने हो म्हंटले. त्यांना माहिती होते हे पिल्लू पण रात्रीतून पळून जाणार पण चिंटूच्या समाधानासाठी ते हो म्हणले.

रात्री झोपताना चिंटूने बाबांबरोबर परत एकदा त्याला दूध प्यायला दिले. त्याला खेळायला त्याचे एक जुने सॉफ्ट टॉय ठेवले. ते पिल्लू देखील त्या खेळण्याशी मस्त खेळत बसले. पावसामुळे वातावरण थंड असल्याने खाली त्याच्यासाठी एक जाडसर कापड अंथरले.एवढे सगळे सोपस्कार पार पाडून चिंटू एकदाचा झोपायला गेला.
रात्री झोपण्यापूर्वी चिंटूच्या बाबांनी जिन्यातले खालचे दार मुद्दाम उघडे ठेवले जेणेकरून या भरकटलेल्या पिल्लूला त्याच्या राहत्या ठिकाणी परत जाता यावे. इकडे सकाळ झाली तशी केतकी ने हळूच दार थोडंसं उघडून बाहेरचा कानोसा घेतला तर हे छोटे बहाद्दर तिथेच त्या अंथरलेल्या टॉवेलच्या तुकड्याशी मजेत खेळत होते. केतकी दिसताच त्याने आपली इवलिशी शेपूट हलविली तसे तिने लगेच दार लावून घेतले.
प्रसाद उठला तसे तिने लगेच त्याला पिल्ला बद्दल सांगितले. अरे त्याला चिंटू उठण्यापूर्वी बाहेर सोडून ये जरा नाहीतर चिंटूच्या डोक्यातले खुळ जायचं नाही.

पण बाहेर अजूनही पावसाची रिपरिप चालूच होती. कदाचित त्यामुळे ते इथेच राहिले असावे असा त्यांनी अंदाज बांधला. चिंटू उठल्यावर तो तडक पिल्लू ला बघायला बाहेर गेला आणि त्या पिल्लाला बघून खूप खुश झाला. मग चिंटू आणि बाबांनी त्याला प्यायला थोडे दूध दिले. ते गटागट संपवत तो चिंटूशी खेळू लागला. चिंटू ने खाली अंगणात त्याला फिरायला नेले. चिंटू जिथे जाई त्याच्या पाठी पाठी ते पिल्लू जात होते.
बघता बघता तीन दिवस सरले पण हे महाशय घर सोडून जाण्याचे काही नाव घेईना. त्यामुळे आता त्याला पाळण्याचा बापलेकाचा निर्णय पक्का झाला होता शिवाय हे स्वतंत्र घर होते, इथे खाली एक आणि वर हे असे दोनच भाडेकरू होते आणि घरमालक दुसरीकडे राहत असल्याने त्यांनी कुत्र्याला पाळण्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तसा तो होता ही मोठा गोजिरवाणा, गुबगुबीत, कुणालाही आवडावा असा..

संध्याकाळी ऑफिसमधून प्रसाद घरी येताच तो आणि चिंटू त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे चेक अपला घेऊन गेले..अगदी हेल्दी पिल्लू आहे, त्याला पाळु शकता असे डॉक्टरांनी सांगतच चिंटूला भारी आनंद झाला..मग त्याच्या साठी गळ्यातला पट्टा, बेल्ट अशी सारी खरेदी झाली. भर पावसाळ्यात घरी आलेल्या या नव्या पाहुण्याचे चिंटूने रेनी हे नामकरण केले.
पाहता पाहता रेनी यांच्या घरातील एक अविभाज्य आणि लाडका मेंबर झाला होता. रेनीच्या रूपात चिंटूला छान सवंगडी मिळाला होता.सुरवातीला कुरकुर करणारी केतकी आता मात्र चिंटू पेक्षा त्याचेच लाड जास्त पुरवत होती.

त्याच्या भुकेची वेळ झाली की रेनी स्वैपाक खोलीबाहेर येऊन बसत असे आणि केतकी मग त्याच्यासाठी गरम गरम तूप लावलेली पोळी करून त्याला भरवत असे. सकाळ संध्याकाळ प्रसाद आणि चिंटू त्याला फिरायला नेत असे तेव्हा मात्र रेनी खूप खुश असे. त्याची फिरण्याची वेळ झाली की आधीच त्याचे भुंकणे चालू होई आणि ते मग घराबाहेर पडल्यावरच बंद होई.
प्रसाद आणि केतकी सकाळी शाळा, ऑफिसला निघताना रेनीला कॉरिडॉर मध्ये मोकळं सोडत असे. तो खाली अंगणात जाऊन इकडे तिकडे फेऱ्या मारी किवा मग निवांतपणे पहुडलेला राही.

खालचे लोक पण रेनी ची काळजी घेत. त्यांचा मोठा मुलगा हे घरी नसताना त्याला दुपारी एक चक्कर मारून आणत असे. त्यामुळे रेनीला त्याचा पण लळा लागला होता.. काही महिन्यातच रेनी एकदम मोठा दिसू लागला होता. घरी आला तेव्हा छोटेसे दिसणार ते पिल्लू आता यंग एनर्जेटीक असा रुबाबदार डॉग झाला होता.
इकडे रेनी आला आणि तिकडे प्रसादला प्रमोशन मिळाले. पण त्याचे पोस्टिंग दुसऱ्या शहरात झाल्याने त्याला पंधरा दिवसात जॉईन व्हायचे होते. शाळेचे नवीन वर्ष सुरू होऊन चारपाच महिने लोटले असल्याने आणि आता मधेच एडमिशन मिळण्याचे चान्स कमी असल्याने चिंटूचे हे इथले सहावीचे वर्ष पूर्ण करून मगच केतकी आणि चिंटू तिकडे शिफ्ट होणार होते.

शिवाय केतकीला असा मधूनच जॉब सोडून जाणे शक्य नव्हते. शाळेत तीन महिन्यांची नोटीस पिरियड तिला द्यायची होती. प्रसाद शिवाय इथे एकटे राहण्याची ही दोघांची पहिलीच वेळ होती. प्रसादच्या जॉब मुळे ते कायम वेगवेगळ्या प्रांतात स्थाईक होत होते. त्यामुळे जवळ नातेवाईक वगैरे असे कुणीच नसे.
प्रसाद तिकडे शिफ्ट झाल्यावर काही दिवस रेनी नीट खात नव्हता. प्रसादला खूप मिस करत होता तो..केतकीला वाटले, खरंच मुके प्राणी किती जीव लावतात ना आपल्यावर..त्यांना त्या मोबदल्यात फक्त हवे असते ते निर्मळ प्रेम..किती निखळ नातं असतं त्यांचं.

प्रसाद तिकडे गेल्यापासून इथे या दोघांना रेनीचा फार आधार वाटत होता. कुठल्याही अनोळखी माणसाला तो घरात शिरु देत नसे. त्याच्या नुसत्या भुंकण्याने कुणीही यायच्या आधी खालूनच चौकशी करत. त्यांच्या खाली राहणाऱ्या टेनंटच्या मोठ्या मुलाशी रेनीचे चांगलेच सुत जुळले होते. कित्येकदा तो दादा आणि चिंटू रेनीला फिरायला नेत. एक दोनदा दसरा, दिवाळीला केतकी माहेरी गेली असता त्यांनीच रेनीला छान सांभाळले होते.
इथे रेनीमुळे दिवस भरभर सरत होते. बघता बघता तो एक वर्षाचा झाला. तो म्हणजे केतकीचा दुसरा बाळच झाला होता आणि चिंटूचा छोटा भाऊ. रेनीचाही खूप लळा होता चिंटूवर..चिंटू शाळेतून यायची अगदी आतुरतेने तो वाट पाही. मग दोघांची खूप दंगामस्ती चाले. त्याच्या बरोबर फिरायला जाणे हा रेनी चा सगळ्यात आवडता टाईम असे.

बघता बघता शाळेचे वर्ष सरले. रेनी ला खालच्यांकडे ठेऊन सुट्टीत तिकडे जाऊन ते नवीन शाळेत एडमिशन घेऊन आले. केतकीला पण चिंटूच्याच नवीन शाळेत जागा असल्याने जॉब ऑफर होती. त्यामुळे आता एका महिन्यातच ते तिकडे शिफ्ट होणार होते.
प्रसाद राहत होता त्या अपार्टमेंटमध्ये घरमालकाने कुत्र्याला ठेवण्याची परवानगी दिली नाही. त्याचे म्हणणे की सोसायटीतील लोकांना त्रास होतो आणि यांच्यासमोर मुख्य प्रश्न हा होता की इथे नवीन जागी हे तिघेही शाळा ऑफिस साठी बाहेर पडणार तेव्हा रेनीला सांभाळणार तरी कोण..त्याला बंद फ्लॅटची अजिबात सवय नव्हती. तिथे तो कायम वर टेरेसवर कीवा खाली अंगणात मोकळा फिरत असे आणि त्याला बघायला खालचे लोक ही होतेच.
शिवाय इथे या मोठ्या सिटीत स्वतंत्र घर मिळणे अशक्य आणि मिळाले तरी इंडिपेंडंट घराचे भाडे त्यांना मुळीच परवडणारे नव्हते. तरी त्यांनी बराच प्रयत्न केला पण किमती खरंच आवाक्याबाहेर होत्या.

आता नवीन ठिकाणी जाण्यापूर्वी रेनीला त्यांना नाईलाजाने इथेच ठेवणे भाग होते. चिंटू तर ऐकायला मुळीच तयार नव्हता. आपण तिकडे सेटल झाल्यावर त्याला इथे आणुया असे सांगून कशीबशी दोघांनी त्याची समजूत काढली.
खालच्या लोकांची रेनीला सवय होतीच..बऱ्याचदा तो त्यांच्याकडे राहिला होता त्यामुळे यांनी त्याला ठेवण्याची विनंती केली तर त्यांनी आनंदाने स्वीकारली. हे पण जरा आश्वस्त होते की रेनी इथे या लोकांच्या सोबत आनंदात राहील.

खूपच कठीण निर्णय होता तो केतकी आणि प्रसाद साठी..केतकी तर रेनीला सोडून जाण्याच्या आठवणीने व्याकुळ होऊन कितीदा तरी रडत असे. ते दुःख तिला असह्य होई पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता.चिंटू ची पण तीच अवस्था होती..पण आपण नंतर त्याला आणू या आशेवर तो होता. आता तर जास्तीत जास्त वेळ तो रेनी बरोबर घालवत होता.
केतकीच्या मनाची अवस्था पाहून प्रसाद ने केतकीला समजावले. बघ केतकी, कोण कुठले ते पिल्लू, अचानक आले आणि आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग झाले. आपला आणि त्याचा ऋणानुबंध कदाचित एवढाच होता असे समज.

बघ ना त्या दिवशी आपण त्याला घरात घेतले नसते तर काय आयुष्य त्याच्या नशिबी असते कुणास ठाऊक. त्याला इथे छान लोकं मिळत आहेत आपल्या सारखेच..यातच आपण आनंद मानायचा. खरचं आपल्या आयुष्यात येऊन किती आनंद दिला त्याने आपल्याला त्याची भरपाई नाहीच करता यायची आपल्याला कधी..
तशी केतकी म्हणाली, खरं म्हणतोस तू, बघ ना काय योगायोग होता.तो आला त्यादिवशी श्रीदत्त जयंती होती. श्रीदत्त गुरुंनीच त्याला आपल्याकडे पाठवले जणू.. तो आला आणि काही महिन्यात तुझी ट्रान्स्फर झाली..आम्ही इथे एकटे असताना रेनीचा खूप आधार वाटला रे मला.

इथे वर्षभर तुझ्याविना एकटी होते तरी कसली भीती वाटली नाही. जणुकाही आम्हाला आधार देण्यासाठीच त्यांनी त्याला आपल्या घरी धाडले होते. त्यामुळे त्याला सोडताना खूप वाईट वाटतंय.
आज सामानाची सगळी बांधाबांध झाली. रेनी ने आज विशेष काही खाल्ले नाही. तो पण जरा अस्वस्थ वाटला. जणू त्याला पण कळून चुकले होते की ही काही दिवसांची ताटातूट नाही.. त्या तिघांनाही रेनी बरोबर घालवलेले ते डेज आयुष्यात कधी विसरणे शक्यच नव्हते. रेनीच्या सहवासाने त्यांच्या जीवनात आनंदाचे इंद्रधनू फुलविले होते. एक गोड आठवण बनुन ते सतत त्यांची सोबत करणार होते.
आज घरात सामान शिफ्टींग ची गडबड असल्याने रेनी ला खालच्यांकडेच ठेवले होते. चिंटू तर पूर्ण दिवस रेनी बरोबर खालीच खेळत होता. तरी मधून मधून वर येण्यासाठी तो सारखा भुंकत होता. घरातलं सामान गेलं आणि यांची निघण्याची वेळ झाली..आज संध्याकाळी परत अचानक आभाळ भरून आलं होतं...
रेनी ला निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. रेनीला पण हे बहुदा जाणवले असावे. त्याच्या समोर केतकी आणि प्रसादला निघायचे नव्हते..त्याला तसा निरोप ते देऊच शकले नसते म्हणून खालच्या दादा ने रेनीला बाहेर फिरायला नेले . बाहेर जातांना रेनी वळुन वळुन आमच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यातील ते भाव बघुन केतकी स्वतः ला आवरू शकली नाही.

तिच्या डोळ्यातील ओघळणारे अश्रू आभाळातून आता बरसु लागलेल्या पावसाच्या थेंबात मिसळत होते. बाहेरच्या पावसाबरोबर तिच्या मनातलं आभाळ ही भरुन आलं होतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रूरुपी श्रावणधारा अविरत बरसायला लागल्या.
© प्रांजली लेले
© प्रांजली लेले
सदर कथा लेखिका प्रांजली लेले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
Tags
relationships