© वर्षा पाचारणे
अनामिका.... दिसायला सुंदर असलेली उंच, गोरीपान, मेहंदी लावून थोडेसे भुरकट तांबूस असणारे केस... असं तिचं सौंदर्य.... नेपाळमध्ये राहणारी अनामिका, घरची परिस्थिती बेताची असल्याने सतत घुसमटत जगत होती.
अनामिका एक क्षण त्याच्याकडे पहातच बसली. तो अनामिकाच्या शेजारी येउन बाकड्यावर बसला आणि म्हणाला," मी बराच वेळ झाला पाहतोय, तू एकटीच बसून आहेस. तुझे आई बाबा किंवा कोणी मोठी व्यक्ती तुझ्याबरोबर दिसत नाही".... त्यावर अनामिका काहीच बोलली नाही.
"खरंच मुंबईला गेल्यावर फिल्ममध्ये लगेच काम मिळतं?... पण माझ्याकडे तर तिकडे जाण्याइतपतही पैसे नाहीत"... त्यावर तो काही बोलणार इतक्यात तिथे साधारणपणे ४० वयाचा एक गृहस्थ आला आणि म्हणाला," तुमच्यासारख्या मुलांना फिल्ममध्ये काम करण्याची चांगलीच संधी आहे. तुम्ही दोघेही दिसायला इतके सुंदर आहात, की ते सिनेमामधले हीरो हीरोइन तुमच्यापुढे फिके पडतील"... त्या माणसाचं बोलणं ऐकून अनामिकेला ती खरंच हीरोइन असल्याचा आत्मविश्वास वाढवून गेला.
संध्याकाळ संपून रात्रीची चंदेरी दुनिया आता सुरु झाली होती. मगाचच्या बाईसारख्याच दोन-तीन जणी छान मेकअप करून, तोंडात कचाकचा पान चावत माडीच्या पायऱ्यांवर उभ्या होत्या.
रात्रीचे दहा वाजले होते अनामिका सुंदर रंगीबिरंगी टिकल्यांचा ड्रेस घालून, भडक मेकअप करून, अत्तरांचे फवारे मारून, आरशात स्वतःला न्याहाळत बसली होती.. तिची एक नजर स्वतःवर अन् दुसरी साहेब कधी येतात? म्हणून दाराकडे लागली होती.
शेवटी त्या मनुष्याने रात्रभर त्याची वासना शमवत, पहाटे जाताना तिच्या हातात दोन हजार रुपये टेकवत,' पुन्हा भेटू' म्हणत निघून गेला... आज अनामिकेच्या हातात स्वतःचे हक्काचे पैसे होते..… जे तिने तिच्या मूर्खपणाच्या स्वप्नामागे धावत, आई-बाबांना अंधारात ठेवत आणि सगळ्यात वाईट म्हणजे ते पैसे कुठल्या मार्गाने आले होते हे जाणवून आता त्या दोन हजाराच्या नोटेवर अश्रूंचा अभिषेक होत होता.
अशाप्रकारे अनामिकाची पहिली कमाई, जी एका चुकीच्या मार्गाने मिळाली, त्या दिवसापासून तिचं जगणं म्हणजे जणू नरक बनलं होतं. रोज कुठलातरी नवीन साहेब येऊन त्याच्यासमोर त्याच पद्धतीने स्वतःचा छळ करून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं., सुटका होणे अशक्य असल्याने चार पाच वर्षानंतर तीही आता त्या व्यवसायाला जणू आपलं मानून, रोज एका नव्या माणसासाठी खोलीमध्ये सजून धजून तयार होत होती.
पण रात्र संपून जेव्हा दिवस उजाडायचा तेव्हा नकळत ती भूतकाळात जाऊन केलेल्या चुकीसाठी तळमळत असायची. कोणाच्या आयुष्यातली पहिली कमाई इतकी भयानक असू शकते याची कल्पनाही करवत नाही.
'कुठलीही गोष्ट आपल्याला केवळ दुकानातंच लांबून पहावी लागणार', या विचाराने तिच्या मनाची घालमेल वाढायची..
'खरंच आपल्याला या चकाकत्या चंदेरी दुनियेतल्या वस्तू हव्याहव्याशा वाटल्या, तरी कधीच मिळणार नाहीत का?... टीव्हीमधील हीरोइनसारखं छान मेकअप करून झगमग कपडे घालून आपण कधी वावरणार?'.... या अशा घुसमटलेल्या विचारांमध्ये ती कशीबशी जगत होती.

यंदा ती दहावीला होती. दहावीची परीक्षा देऊन शेवटचा पेपर संपल्यावर तिचे मन घरी जायला काही केल्या तयार होईना. विचारा विचारांमध्ये ती, जिथून प्रवासी गाड्या सुटतात, तिथे पोहोचली. घरी आपले आई-वडील वाट पाहत असतील, याची जराही काळजी किंवा भीती तिच्या मनाला शिवली नाही..
बराच वेळ अनामिकाला एका बाकड्यावर बसलेली पाहून, साधारण पंचवीस एक वर्षाचा मुलगा तिच्याजवळ आला. दिसायला रुबाबदार, उंचापुरा, गोरा पान, घारे डोळे आणि काळेभोर कुरळे केस यामुळे तो कुठल्याही हिरोपेक्षा कमी वाटत नव्हता.
अनामिका एक क्षण त्याच्याकडे पहातच बसली. तो अनामिकाच्या शेजारी येउन बाकड्यावर बसला आणि म्हणाला," मी बराच वेळ झाला पाहतोय, तू एकटीच बसून आहेस. तुझे आई बाबा किंवा कोणी मोठी व्यक्ती तुझ्याबरोबर दिसत नाही".... त्यावर अनामिका काहीच बोलली नाही.
तिने त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करत दुसरीकडे नजर वळवली. तो तिच्याकडे पाहून सिनेमातलं एक रोमँटिक गाणं गुणगुणू लागला, तशी तिच्या मनात जणू काही प्रेमाची फुलपाखरं उडायला लागली.
तिने मनात विचार केला," किती देखणा आहे हा दिसायला!".... मला तर अगदी ह्रितिक बाजूला बसलाय असंच वाटतंय".
तितक्यात जवळपास फ्लर्ट करत तो तिला म्हणाला," तुला एकटीला पाहून मला खूप वाईट वाटतंय. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणू का?
तितक्यात जवळपास फ्लर्ट करत तो तिला म्हणाला," तुला एकटीला पाहून मला खूप वाईट वाटतंय. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणू का?
त्यावर 'नको' अशी मान हलवली, तरीही त्याने जाऊन पटकन एक वेफर्स पॅकेट आणि पाण्याची बाटली आणली. तिच्यापुढे वेफर्स पॅकेट पकडून तो म्हणाला," अगं, घाबरू नकोस. मीही तुझ्यासारखंच घर सोडून मुंबईला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम शोधण्यासाठी जाणार आहे"... "असं भरकटत बसण्यापेक्षा मुंबईला जाऊन मी खूप पैसे कमवेन.... आयुष्यात जी स्वप्नं केवळ स्वप्नंच राहतील असं वाटतंय, ती एकाच झटक्यात पूर्ण करेन".... त्याचं हे बोलणं ऐकून अल्लड वयातल्या अनामिकाला ते सारं खरं वाटून गेलं.
"खरंच मुंबईला गेल्यावर फिल्ममध्ये लगेच काम मिळतं?... पण माझ्याकडे तर तिकडे जाण्याइतपतही पैसे नाहीत"... त्यावर तो काही बोलणार इतक्यात तिथे साधारणपणे ४० वयाचा एक गृहस्थ आला आणि म्हणाला," तुमच्यासारख्या मुलांना फिल्ममध्ये काम करण्याची चांगलीच संधी आहे. तुम्ही दोघेही दिसायला इतके सुंदर आहात, की ते सिनेमामधले हीरो हीरोइन तुमच्यापुढे फिके पडतील"... त्या माणसाचं बोलणं ऐकून अनामिकेला ती खरंच हीरोइन असल्याचा आत्मविश्वास वाढवून गेला.
ती म्हणाली,"काका, पण आम्ही तिकडे जाणार कसं? त्यावर तो मघाचा मुलगा तिचे बोलणे तोडत म्हणाला ,"अगं, हे माझे काकाच आहेत." "तू नको काळजी करू.. माझ्याऐवजी तू मुंबईला जा आणि तुझी स्वप्नं पूर्ण कर. मी थोडाफार काम धंदा करून पैसे कमवेन आणि मग मुंबईला जाईल.
पण तुला आता माझ्यापेक्षा जास्त गरज आहे"... अनामिकाचे चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांना समजलं की,' त्यांचा डाव यशस्वी झाला आहे'... त्याच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवत अनामिका त्या मनुष्याबरोबर प्रवास करून मुंबईला पोहोचली.

तिच्या मनात 'आपल्याला जणू काही देवानेच मदत केली', ही भावना होती... पण खरं पाहता ती उध्वस्ततेच्या वाटेवरची तिची पहिली पायरी होती.
त्या माणसाने 'मी तुला एका डायरेक्टरला भेटवतो', असे म्हणत एका दलाल बाईकडे आणून सोपवले. त्या बाईचा तो झगमगीत ड्रेस, लाल भडक लिपस्टिकने रंगलेले ओठ, केसांना गोल्डन कलर, कानात मोठे झुमके, असा पोशाख पाहून अनामिकाला खरंतर त्यात काहीच गैर वाटलं नाही. तिला वाटलं की, 'इकडचे लोक खरंच किती सुंदर राहतात'.
संध्याकाळ संपून रात्रीची चंदेरी दुनिया आता सुरु झाली होती. मगाचच्या बाईसारख्याच दोन-तीन जणी छान मेकअप करून, तोंडात कचाकचा पान चावत माडीच्या पायऱ्यांवर उभ्या होत्या.
आज पहिल्यांदाच त्या चंदेरी दुनियेत अनामिकाला जणू काही 'लगेच आपण हीरोइन बनून टीव्हीमध्ये दिसणार' असा खोटा आत्मविश्वास जागा झाला होता. त्या खोट्या स्वप्नांमधे ती इतकी हरवली होती की, ती रात्र तिच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवून आणणार आहे, हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं.
ती बाई अनामिकाच्या डोक्यावर हात फिरवत तिला म्हणाली," मी शेफाली... तू मला ताई म्हणलं तरीही चालेल. आता तुला सांगते, ते नीट ऐक. तुला हीरोइन बनायचं आहे, हे मला माहित आहे. पण त्यासाठी तुझ्याकडे पैसे नाहीत... पण तुझे सौंदर्य कुठल्याही पैशात तोलता येणार नाही.
आज रात्री एक साहेब तुला भेटायला येणार आहेत... मी त्यांना फोन करून इकडे बोलावून घेतले आहे.. त्यांना तुझी अॅक्टिंग पाहायची आहे. तेव्हा मी देते ते कपडे घालून आणि मेकअप करून तू आतमध्ये रूममध्ये बस.
आज रात्री एक साहेब तुला भेटायला येणार आहेत... मी त्यांना फोन करून इकडे बोलावून घेतले आहे.. त्यांना तुझी अॅक्टिंग पाहायची आहे. तेव्हा मी देते ते कपडे घालून आणि मेकअप करून तू आतमध्ये रूममध्ये बस.
कदाचित पहिल्याच भेटीत तुला चांगली संधी मिळेल... फक्त ते साहेब जे सांगतील, तसं तू करत जा"... अजूनही अनामिकाच्या डोक्यात फक्तं आणि फक्तं झगमगाटच होता.
रात्रीचे दहा वाजले होते अनामिका सुंदर रंगीबिरंगी टिकल्यांचा ड्रेस घालून, भडक मेकअप करून, अत्तरांचे फवारे मारून, आरशात स्वतःला न्याहाळत बसली होती.. तिची एक नजर स्वतःवर अन् दुसरी साहेब कधी येतात? म्हणून दाराकडे लागली होती.
तितक्यात कोणीतरी दाराची कडी उघडली. एक जाडजुड प्रौढ माणूस गुटखा चघळत रूममध्ये आला. त्याला पाहून खरंतर अनामिका थोडी घाबरली. पण 'ते साहेब आहेत आणि ते आपल्याला काम देणार', या विश्वासावर ती थोडी लाजून उभी राहिली. तिचं ते लाजणं पाहून तो मनुष्य विचित्र अचकट-विचकट हसत 'उफ ये अदा!'... म्हणत तिच्या अतिशय जवळ आला. तुम तो एकदम हीरोइन लगती हो l लेकिन यहा कैसे?" असं म्हणत त्याने तिच्यावर वरून खालपर्यंत एक विचित्र वासनांनी भरलेला कटाक्ष टाकला.
त्याने हिरोईन म्हटल्यावर 'हा नक्कीच एखाद्या फिल्ममध्ये आपल्याला काम देईल' या आशेने अनामिकाने स्मितहास्य केले.
त्याने हिरोईन म्हटल्यावर 'हा नक्कीच एखाद्या फिल्ममध्ये आपल्याला काम देईल' या आशेने अनामिकाने स्मितहास्य केले.
त्यात ताईने,' साहेब करतील, ते करु दे', असे सांगितल्याने ती शांतपणे खाली मान घालून उभी होती. त्या माणसाने तिच्या कमरेभोवती हातांचा वेढा घातला, तशी ती दचकून मागे सरकली.... "हे काय करताय साहेब?" म्हणून मागे जायचा प्रयत्न करू लागली. तसा तो मनुष्य अधिकच जवळ येत तिच्या तोंडावरून, ओठांवरून हात फिरवत, विचित्र पद्धतीने हावभाव करत,' हेच तर करायला आलोय' म्हणत तिला आणखी जवळ ओढू लागला.
तशी घाबरून ती त्याला अंगात असलेल्या पूर्ण ताकदीने ढकलू लागली. त्याच्या हातांना हिसके देऊ लागली.... पण सारं काही संपलं होतं... कितीही पळण्याचा प्रयत्न केला, तरी दाराला बाहेरून कडी लावलेली होती... त्या माणसाने तिला सणसणीत दोन मुस्काटात मारत बेडवर पाडलं... एखाद्या लांडग्याने मेलेल्या प्राण्याचे लचके तोडावेत, तसा तो तिच्यावर तुटून पडला होता.
डोळ्यातल्या अश्रुधारांशिवाय अनामिकाच्या हातात काहीही राहिलं नव्हतं.
शेवटी त्या मनुष्याने रात्रभर त्याची वासना शमवत, पहाटे जाताना तिच्या हातात दोन हजार रुपये टेकवत,' पुन्हा भेटू' म्हणत निघून गेला... आज अनामिकेच्या हातात स्वतःचे हक्काचे पैसे होते..… जे तिने तिच्या मूर्खपणाच्या स्वप्नामागे धावत, आई-बाबांना अंधारात ठेवत आणि सगळ्यात वाईट म्हणजे ते पैसे कुठल्या मार्गाने आले होते हे जाणवून आता त्या दोन हजाराच्या नोटेवर अश्रूंचा अभिषेक होत होता.
ती रडण्याच्या आवाजाने शेफाली आतमध्ये आली आणि अनामिकाचे केस घट्ट पकडत तिला म्हणाली," तुला काय वाटलं?.... तू खरी हिरॉईन होणार आहेस... "अगं, तुला नेपाळमधून घेऊन आला तो माझाच माणूस होता.…. तुला जो मुलगा भेटला होता, तोही आमच्याच गटातला माणूस आहे.
लांबून मुली आणून आम्ही त्यांना धंद्याला लावून आमची रोजीरोटी भागवतो, तिथे तुम्हाला कुठून हीरोइन बनवणार"... असे म्हणत दोन हजाराची नोट हिसकावून घेत अनामिकाच्या हातात पाचशे रुपये ठेवत, 'हे घे आणि साधे कपडे घालून, थोडा आराम कर... पुन्हा रात्री दुसरे साहेब येतील, तेव्हा परत तुला तयार व्हावं लागेल".... असं म्हणून धाडकन दार आपटलं.

आज आई-बाबांची कितीही आठवण आली, तरी परतीचे मार्ग बंद झाले होते... या कोंडवाड्यात आता ती आयुष्यभर बंदिस्त राहणार होती. झगमगीत कपडे, भडक मेकअप, हातात नोटा हे स्वप्न आयुष्य उद्ध्वस्त करून पूर्ण झालं होतं. त्यातही शरीराशी झालेला खेळ आणि यातना तिने भोगूनही ते पैसे तिच्या हातून हिरावून घेण्याचा हक्क मात्र जणू काही शेफालीचा होता.
अशाप्रकारे अनामिकाची पहिली कमाई, जी एका चुकीच्या मार्गाने मिळाली, त्या दिवसापासून तिचं जगणं म्हणजे जणू नरक बनलं होतं. रोज कुठलातरी नवीन साहेब येऊन त्याच्यासमोर त्याच पद्धतीने स्वतःचा छळ करून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं., सुटका होणे अशक्य असल्याने चार पाच वर्षानंतर तीही आता त्या व्यवसायाला जणू आपलं मानून, रोज एका नव्या माणसासाठी खोलीमध्ये सजून धजून तयार होत होती.
पण रात्र संपून जेव्हा दिवस उजाडायचा तेव्हा नकळत ती भूतकाळात जाऊन केलेल्या चुकीसाठी तळमळत असायची. कोणाच्या आयुष्यातली पहिली कमाई इतकी भयानक असू शकते याची कल्पनाही करवत नाही.
पण जे लोक ते आयुष्य जगतात, ते समाजापासून तर कायम उपेक्षित राहतातच पण आयुष्याच्या शेवटी काही चूक नसताना ते स्वतःच्या नजरेतही तितकेच पडलेले असतात. अशा नकळतपणे वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींचं आयुष्य विनाकारण उध्वस्त झालेले असतं.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
Tags
relationships