© धनश्री दाबके
"लेले काकू, बरं झालं इथेच भेटलात. तुमच्याकडेच निघाले होते. उद्या आशु येणारे आमची. डोहाळे पुरवून घ्यायला. तुमच्या हातची पुरणपोळी खायचीये तिला. द्याल ना उद्या १५ पोळ्या? तशा बाजरात मिळतात हो पण तुमच्या हातची सर नाही बघा त्यांना. जमवाल ना?" स्मिता ताईनी विचारले.
शोभाताईंना आशुचे डोहाळे म्हंटल्यावर नाही म्हणायला जमेना.
"हो जमवेन ना. त्यात काय एवढे? आपल्या आशुसाठी करेन हो मी" असे म्हणत शोभाताई घरी आल्या आणि विवेकचा फोन आला. " आई उद्या सकाळी ११ वाजताची appointment घेतली आहे मी डॉ. गोखल्यांची. अर्धा दिवसची रजाही टाकली आहे तेव्हा १०:३० ला निघू आपण. आता कामात busy होइन मी म्हणुन लगेच फोन केला तुला. Bye "
"काय म्हणतात आमच्या patient? कसा आहे गुडघा आता? " डॉ. गोखल्यांनी विचारले.
शोभाताईंच्या आधी विवेकनेच उत्तर दिले " अहो काय सांगणार डॉक्टर ? तुम्ही एवढे बजावूनही आईने काही ऑर्डर्स बंद केल्या नाहीयेत. व्यायाम करते पण त्यात ही नियमितपणा नाही. सतत उभी असते ओट्यापाशी. आजही पुरणपोळ्या केल्या आहेत. Pain killers वर गाडी सुरु आहे."
डॉक्टरांनी तपासले व म्हणाले "लगेच x- ray काढून घेऊ. सुज वाढली आहे. नुसत्या व्यायामाने व आरामाने बरं वाटणार नाही. बघु आपण."
X- ray साठी बरीच गर्दी होती. तिथे नंबर लावून बसल्यावर विवेक laptop उघडून कामात गर्क झाला आणि शोभाताईंचे मन भुतकाळात गेले.

साध्या तापाचे निमित्त झाले आणि अचानक काही कळायच्या आत सुधाकरराव शोभाताई आणि लहानग्या विवेकला मागे सोडून कायमचे निघून गेले. शोभाताईंवर आकाश कोसळले.
विवेककडे बघून त्यानां स्वतःला सावरणे भाग होते. नुसते सावरणे नाही तर आता त्यांना एकटीने संसाराचा गाडा हाकणे भाग होते. हुशार , चुणचुणीत मुलगा आणि चाळीतले दोन खोल्यांचे घर ह्या दोनच जमेच्या गोष्टी बाकी सगळ्या फक्तं अडचणीच होत्या. तसे सुधाकररावांचे थोडे savings आणि मिळालेले funds हाताशी होते पण ते किती दिवस पुरणार?
आधी कधीही विचारसुद्धा करायची गरज न लागल्याने घराबाहेर पडून कुठलाही अनुभव नसतांना नोकरी शोधण्यात वेळ घालवणे परवडणारे नव्हते. तेव्हा आपल्याकडे आहे त्या कौशल्याचा वापर करावा असा विचार करुन शोभाताईंनी आधी पोळीभाजीचे डबे मग पुरणपोळ्या, चकल्या, उकडीचे मोदक, अनारसे अशा पदार्थांच्या ऑर्डर घेणे सुरु केले आणि हळूहळू त्यांचा जम बसला.
काकू, आमच्या बाप्पाला तुमच्या हातचेच मोदक हवेत बरका. पुरणपोळी खावी तर तुमच्याच हातची. अशा कौतुकाने प्रोत्साहन मिळत गेले.
विवेक शिक्षणात चांगली प्रगती करत गेला आणि बघता बघता काळ सरकला. विवेकला चांगली नोकरी लागली. सुबत्ता आली आणि मग आर्थिकदृष्ट्या ऑर्डर्सची गरज लागेनाशी झाली. पण मनाला लागलेल्या कौतुकाच्या थापेच्या सवयीचे काय?
ज्या व्यवसायाने शोभाताईंना त्यांची ओळख मिळवून दिली तो फक्त गुडघेदुखीने बंद करण्याचा विचारही करवेना त्यांना.
विवेक शोभाताईंना खूप समजवायचा. पण त्याला आपल्या आईच्या कष्टांची, तिने दाखवलेल्या धैर्याची आणि ह्या व्यवसायात रमलेल्या तिच्या मनाची पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच तो टोकाची भूमिका घेवून त्यांना काम बंद करायला लावत नव्हता.
X-ray बघून डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती, औषधे, व्यायाम आणि सुज कमी झाल्यावर पुढच्या टेस्ट्स करुन ऑपरेशन असा क्रम सांगितला.
X-ray बघून डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती, औषधे, व्यायाम आणि सुज कमी झाल्यावर पुढच्या टेस्ट्स करुन ऑपरेशन असा क्रम सांगितला.
आणि मग मात्र विवेकने आपला खाक्या बदलून आईला प्रेमळ धमकीने ऑर्डर्स बंद करायला लावल्या. तरीही हे फार काळ चालणार नाही कारण आईचा गुडघा तर बरा होईल पण मन मात्र रमणार नाही आणि त्यासाठी आपल्याला काही तरी वेगळा उपाय करावा लागेल हे जाणून होता विवेक.
त्याने मामाबरोबर एक योजना आखली. सीमाला म्हणजे मामेबहिणीला थोड्या दिवसांसाठी बोलावून घेतले.
त्याने मामाबरोबर एक योजना आखली. सीमाला म्हणजे मामेबहिणीला थोड्या दिवसांसाठी बोलावून घेतले.
ऑर्डर्स, आजारपण ह्या कशावरही चर्चा न करता सीमाने फक्त आत्या मलाही तुझ्यासारखे आपले सगळे पदार्थ करायला शिकायचे आहे तर मला शिकवशील का असे विचारले आणि शोभाताईंच्या मनाचा ताबा घेतला.
मग सीमा बरोबर चाळीतल्या इतर मुलीही हळूहळू स्वयंपाक शिकायला येऊ लागल्या आणि शोभाताई तब्येत सांभाळता सांभाळता शिकवणीत रमल्या.
आपल्या तब्येतीपेक्षा व्यवसाय महत्वाचा नाही हे शोभाताईंना कळत नव्हते असे नाही. पण लोकांना आपल्या हातचे चविष्ट जेवण खायला घातल्याने मिळणाऱ्या समाधानाचे पारडे पैसा, कष्ट, त्रास ह्या सगळ्यांपेक्षा जड ठरत होते.
ज्या व्यवसायाने त्यांचे व विवेकचे आयुष्य घडवले तो त्यांना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा प्रिय होता. आणि तरी आता थांबायलाही हवे होते. विवेकने ज्या पद्धतीने आपली मनस्थिती समजून घेऊन युक्तिने आपल्या मनाचा गाडीला योग्य मार्गावर वळवले त्यासाठी शोभाताईंनी त्याला मनातल्या मनात पूर्ण गुण दिले होतें.
रविवारच्या दिवशी सकाळी घरात चकल्यांचा खमंग सुवास दरवळत होता.
रविवारच्या दिवशी सकाळी घरात चकल्यांचा खमंग सुवास दरवळत होता.
चकल्या तळता तळता सीमा, आत्या तुझी रेसिपी एकदम भारी म्हणून शोभाताईंना टाळी देत होती.
विवेक हसत हसत ते दृश्य पहात होता आणि रेडिओवर आशाताईंचे सुरेल गाणे सुरु होते.
माझिया मना , जरा थांबना
पाउली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना......
समाप्त
© धनश्री दाबके
© धनश्री दाबके
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
Tags
socialmarathi