© सौ.मीनाक्षी वैद्य.
“राठी कॉफी हाऊसमध्ये.”अशोक उत्तरला. “बोलव उद्या त्यांना आणि बोलतांना तू पोलिसां समोर बसलाय हे त्यांना कळायला नको नाहीतर...”
त्याला कळत नव्हतं आपण जे केलं ते कितीतरी दिवस कळणार नाही याची त्याला खात्री होती कारण ज्या मुलीवर आपण बलात्कार केला ती मुकी बहिरी होती. कुठून कळलं असेल पोलीसांना. उत्तर शोधून तो निराश झाला. त्याचं सगळं अंग ठणकत होतं.
सावित्री सावंत साहेबांच्या केबीन मध्ये बसली होती.
सावित्री आपल्या मुलाला अशोकला बोलवायला म्हणून त्याच्या खोलीपाशी आली तर त्याच्या खोलीचं दर बंद होतं. अशोक हसत-खिदळत कोणाशीतरी फोनवर बोलत होता.
तासान-तास त्याचं फोनवर बोलणं खरतर सावित्रीला आवडत नसे,पण काय करणार आताची पिढी ऐकते कुठे? सावित्रीच्या मनात हे आलं आणि ती नाराजीनं निघून जाणार तेवढ्यात तिच्या कानावर काहीतरी पडलं आणि ती थबकली.
ती दाराजवळ सरकली आणि ऐकू लागली. जसं-जसं अशोकचं बोलणं ,हसणं तिच्या कानावर पडू लागलं तसं-तशी ती मुळापासून उखडत गेली.
ती दाराजवळ सरकली आणि ऐकू लागली. जसं-जसं अशोकचं बोलणं ,हसणं तिच्या कानावर पडू लागलं तसं-तशी ती मुळापासून उखडत गेली.
ती जे ऐकत होती त्यावर आणि स्वत:च्या कानावर तिचा विश्वास बसत नव्हता इतकं ते नीच पातळीवरचं बोलणं होतं.
सावित्री आतून इतकी हादरली होती कि तिला तिथे क्षणभरही उभं राहणं जमत नव्हतं. ती कशीबशी थरथरत्या अंगानं स्वयपाकघरात आली आणि भिंतीच्या आधारानी भिंतीला टेकवलेला पाट खाली पाडला नि त्या पाटावर धपकन बसली.
बसता-बसता तिचा तोल गेला पण नाशीब ती पडली नाही. तोंडात पदराचा गोळा कोंबून हमसून-हमसून रडू लागली.
डोळ्यातून वाहणा-या पाण्याला अडवण तिला जमलं नाही. रडता-रडता तिच्या मनात आलं इतकं काळं विद्रूप मन आहे आपल्या मुलाचं ! इतकं घाणेरडं कृत्य करतांना त्याच्यावर आम्ही केलेले संस्कार तो कसा विसरला? असा कसा वागला तो?.......सावित्री उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि रडत होती.
ब-याच वेळानं तिचा उमाळा शांत झाला. काहीतरी निश्चय करून ती उठली,चेहे-यावर पाण्याचे हबके मारले, चेहरा पुसला आणि चालू लागली.
ब-याच वेळानं तिचा उमाळा शांत झाला. काहीतरी निश्चय करून ती उठली,चेहे-यावर पाण्याचे हबके मारले, चेहरा पुसला आणि चालू लागली.
ती घराचा उंबरठा ओलांडणार तोच अशोकची ‘आई’ अशी हाक कानावर आणि सावित्रीला अंगावर पाल पडल्यासारखं वाटलं.
तिचा चेहरा कठोर झाला.तिनं मागे वळूनही बघितलं नाही,कारण तिला अशोकचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नव्हती.
‘आई कुठे चालली?......सावित्री गप्प होती.
‘आई मला भूक लागली आहे .....आता कुठे चाललीस तू?’
सावीत्रीनी कसाबसा घशात आवाज गोळा केला नि म्हणाली ‘मला सुंदर आत्याकडे महत्वाचं काम आहे मी चालले’ एवढं बोलून तिला धाप लागली कारण आत्यंतिक तीरास्कारानी तिची वाचाच बसल्यासारखी झाली होती. इतकं बोलून सावित्री घराबाहेर पडली.
अशोकला आश्चर्य वाटलं कारण एरवी त्यानं भूक लागली आहे म्हटलं की सावित्री अशी वागत नसे.

आज काय झालाय हिला. याचं उत्तर त्यानं शोधण्याचा प्रयत्न केला पण काही वेळाने ‘जाऊ दे ....’ म्हणत तो स्वयंपाकघरात गेला आणि खाण्यासाठी काहीतरी शोधू लागला.
खाण्यासाठी शोधता-शोधता त्याच्या मनात आलं ,’आई सुंदर आत्याकडे गेलीय म्हणजे चार तास तर सहज येणार नाही आज तिचा मूडही वेगळाच दिसला म्हणजे आणखी जास्त उशीरही लागू शकतो .सत्तू, मन्या, देवेशला फोन करतो ,आणलेली नवी कोरी फिल्म बघू ...यस्स

’स्वत:वरच खुष होत अशोक नी तिघांनाही फोन केला. तो त्यांना कशासाठी बोलावतोय हे सांगताना त्याच्या चेह-यावर जे हावभाव होते,जे हसू होतं त्यावरून तो कोणतीही धार्मिक फिल्म बघणार नव्हता हे नक्की कळत होतं.
त्याचं दुर्दैव त्याच्या एकाही मित्राला वेळ नव्हता,त्यामुळे तो थोडा खट्टू झाला पण शेवटी ती फिल्म एकटयानच बघायचं ठरवलं.तो खाण्याचं सामान घेऊन समोरच्या खोलीत आला. T.V.ला V.C R जोडला आणि त्यात ती सीडी टाकून मजेत बघत बसला.
दारावरची बेल वाजल्यानी तो भानावर आला. आई आली कि काय असं वाटून क्षणभर तो दचकला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आई इतक्या लवकर येणं शक्य नाही.
दारावरची बेल वाजल्यानी तो भानावर आला. आई आली कि काय असं वाटून क्षणभर तो दचकला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आई इतक्या लवकर येणं शक्य नाही.
तेवढ्यात पुन्हा बेल वाजली तसा तो धावत दार उघडायला गेला. अशोकनी दार उघडलं तसा त्याच्या खांद्या वर पोलीसाचा हात पडला.
पोलीस बघून तो घाबरला “साहेब मी काही केलं नाही मला कशाला पकडता?” घाबरत,रडत त्यांनी विचारलं.त्याला आणखी बोलू न देता इन्स्पेक्टर सावंतांनी त्याच्या एक थोबाडीत मारली आणि म्हणाले, ”काही केलं नाही तू. पण आम्ही काही न करणा-यांनाच पकडतो...शिंदे बसवा याला गाडीत.” शिंदेंनी त्याची कॉलर पकडून त्याला गाडीत कोंबलं.
पोलिसांनी त्याला धु...धु धुतलं. तेव्हा अशोक रडण विसरला,आणि घाबरतच त्यांनी केलेला सगळा प्रकार सावंतांना सांगीतला.
पोलिसांनी त्याला धु...धु धुतलं. तेव्हा अशोक रडण विसरला,आणि घाबरतच त्यांनी केलेला सगळा प्रकार सावंतांना सांगीतला.
ते ऐकल्यावर सावंत म्हणाले “तुझे बाकी मित्र कुठे आहेत? फोन कर त्यांना.”
“साहेब मी मघाशी त्यांना फोन केला होता ... ”तो पुढे बोलायच्या आधीच सावंत म्हणाले, “का केला होतास फोन?......बोल लवकर. दुसरं कांड करायचा विचार होता का?” “नाही...नाही साहेब....असं काही करायचं नव्हतं.” “मग का फोन केला होतास?’ एक लाठी हवालदार शिंदेंनी त्याच्या पायावर हाणली.

तसा अशोक जोरात किंचाळला. “साहेब मी एक अश्लील सीडी आणली होती ती बघायला त्यांना फोन करून बोलावलं”
“मग आले का ते?” सावंतांनी विचारलं
“नाही साहेब त्यांना वेळ नव्हता.” “हे बघ तू तुझ्या मित्रांना तुमच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी बोलाव. कुठे भेटता नेहमी?”त्यांनी ओरडूनच विचारलं.
“राठी कॉफी हाऊसमध्ये.”अशोक उत्तरला. “बोलव उद्या त्यांना आणि बोलतांना तू पोलिसां समोर बसलाय हे त्यांना कळायला नको नाहीतर...”
“नाही साहेब नाही कळणार.” अशोकनी मित्रांना फोन केला आणि नेहमीच्या ठिकाणी बोलावलं.
“कॉफी हाउस मध्ये तुझ्या आजुबाजुला साध्या वेषात पोलीस असतील. तू डोळ्यांनी जरी आपल्या मित्रांना सावध केलस आणि ते पळाले तर मग तुझं काही खरं नाही.कळल का?” अशोकनी हो म्हणून मान डोलावली.
“कॉफी हाउस मध्ये तुझ्या आजुबाजुला साध्या वेषात पोलीस असतील. तू डोळ्यांनी जरी आपल्या मित्रांना सावध केलस आणि ते पळाले तर मग तुझं काही खरं नाही.कळल का?” अशोकनी हो म्हणून मान डोलावली.
“शिंदे याचा फोन घ्या” अशोकचा फोन लगेच घेतल्या गेला.
त्याला कळत नव्हतं आपण जे केलं ते कितीतरी दिवस कळणार नाही याची त्याला खात्री होती कारण ज्या मुलीवर आपण बलात्कार केला ती मुकी बहिरी होती. कुठून कळलं असेल पोलीसांना. उत्तर शोधून तो निराश झाला. त्याचं सगळं अंग ठणकत होतं.
सावित्री सावंत साहेबांच्या केबीन मध्ये बसली होती.
सावंत आत आले तसं तीन विचारलं, “अशोकनी गुन्हा कबुल केला?” सावंत म्हणाले, “कसा कबुल करणार नाह्री? चार लाठ्या पडल्यावर पोपटासारखा बोलायला लागला.
सावित्रीबाई तुमच्यासारखी व्यक्ती मी आजपर्यंत बघितली नाही. आपल्या मुलांनी गुन्हा केल्यावर त्याला वाचवण्याची धडपड सगळे आई-वडील करतात. तुम्ही स्वत:हून या गुन्ह्याची आम्हाला माहिती दिलीत आणि आता तुमच्याच डोळ्यात पाणी?”
सावित्री धीर गोळा करून म्हणाली, “साहेब कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे त्यामुळे त्याची काळजीने एका डोळ्यात पाणी आहे तर दुस-या डोळ्यात कुकर्माला लपवून ठेवण्याचा गुन्हा आपण केला नाही याचं समाधान आहे. समाधानाचे ते अश्रू आहेत. साहेब मला त्या चौघांशी बोलायचं आहे.” सावित्री म्हणाली.
यावर सावंत साहेब म्हणाले “त्याचे बाकी मित्र पकडल्या गेले की तुम्हाला बोलावीन”
“बरं. पण नक्की बोलवा.” असं म्हणून सावित्री पोलीस स्टेशन मधून बाहेर पडली.
आज ठरलेल्या ठिकाणी मन्या, सत्तू, देवेश आले होते. “अजून अशोक का आला नाह्री?” या सत्तूच्या वाक्यावर देवेश खो-खो हसला म्हणाला,”दुपारची फिल्म बघून अजूनही मनातच उंडारत असेल” त्यावर सगळे हसायला लागले,तेवढ्यात त्यांना अशोक येतांना दिसला.
अशोक बरोबर साध्या वेषातील पोलीसही होते पण त्या तिघांच्या ते लक्षात आलं नाही.

अशोकाला ते बोलण्याचा आग्रह करत होते,तो घाबरत बोलू लागला. त्या तीघांच त्याच्याकडे लक्ष गेल्याबरोबर पोलिसांनी त्यांनां पकडलं.
आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पकडण्यासाठी हा सापळा रचला होता.
ते अशोकावर खूप चिडले तसं पोलिसांनी त्याच्या थोबाडीत मारलं आणि गाडीत बसवलं.
पोलीस ठाण्यात त्यांची चांगलीच धूळधाण केल्या गेली.
पोलीस ठाण्यात त्यांची चांगलीच धूळधाण केल्या गेली.
इतका मार खायची सवय नसलेलं ते पटापट पोपटासारखे बोलायला लागले.
त्यांचं ऐकतांना पोलिसांच्या अंगावर काटा आला. तीही माणसंच होती.दिवसातून शंभर गुन्हे बघतात म्हणून सामान्य माणसापेक्षा थोडे टणक असतात.
”बोलवा त्यांना’ सावंत म्हणाले.
शिंदे बाहेर गेले आता त्यांच्याबरोबर सावित्री होती तिला बघीतल्यावर चौघांनाही आश्चर्य वाटलं.
“आई...” “हो तुझ्या आईनीच आम्हाला तुमच्या कृत्याची माहिती दिली.”सावंत साहेबांनी सांगितलं.
चौघांनीही मान खाली घातली.
कोणाला कळायच्या आत सावित्री त्या चौघांसमोर तरातरा गेली आणि तिनी चौघांच्या थोबाडीत मारली. “अरे तुम्हाला लाज नाही वाटली असं घाणेरड काम करतांना? अरे तुम्ही त्या मुलीवर बलात्कार केलेला नाही तुम्ही आपापल्या आयांवर बलात्कार केलाय. तिने केलेल्या संस्कारांवर केलाय. तिच्या मातृत्वावर बलात्कार केलाय. चांडाळानो ती मुलगी पुढे कोणाची तरी आई होणार आहे याचही तुम्हाला भान राहिलं नाही? तुमची वासना मोठ ठरली.अरे...तुमच्यासारख्या नराधमांना भर चौकात फटके मारून फाशी द्यायला पाहिजे.” थरथरत्या अंगानी सावित्री सावंतांकडे वळली.
हात जोडून म्हणाली,”साहेब सरकारला माझ्याकडून विनंती करा ज्या अवयावामुळे यांना हे कृत्य करायची इच्छा झाली,ते लींगपिसाट झाले ते लिंगच छाटून टाका. अशी शिक्षा झाल्या शिवाय असं कृत्य करणा-यांना वाचक बसणार नाही. नाही. साहेब हा गुन्हेगार माझा मुलगा नाही. ज्या दिवशी याच्या मनात हे काम करण्याचं आलं त्याच दिवशी तो मला मेला. हा गुन्हेगार आहे याला कठोर शिक्षा द्या.” हात जोडून रडत सावित्री बाहेर पडली.
सावंत सावित्रीच्या या बोलण्यानी चकीत झाले. आजपर्यंतच्या आयुष्यात त्यांनी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी धडपडणारे आईबाबा बघितले होते.

सावित्रीचं आपल्या मुलावर आंधळ प्रेम नव्हतं तसेच ती समाजाला, प्रतीष्ठेलाही घाबरणारी नव्हती. म्हणूनच ती असा निर्णय घेऊ शकली.
कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा या चौघांना शिक्षा होईल. पण आज आपण एका मुक्या बही-या मुलीवर अत्याचार करणा-यांना पकडून आपलं काम चोखं केलं याचं त्यांना समाधान होतं. हे काम सावित्रीमुळेच पूर्ण होऊ शकलं हेही त्यांनी मान्य केलं.
कारण, जर सावीत्रीनी स्वत:हून पोलीसांना सांगितलं नसतं तर पोलीसांना त्या मुक्या बहि-या मुलीवर कोणी अत्याचार केला होता हे कधीच कळलं नसतं.
समाप्त

सदर कथा लेखिका सौ.मीनाक्षी वैद्य यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
Tags
familykatha