© वर्षा पाचारणे.
"ए पोरा, हे गिळुन घे पटकन.... अन् जा शाळत... कवा धरनं त्या पुस्तकात डोकं खुपसून बसलाया... अरे म्या म्हनते त्या पुस्तकांपुढं तुला खायची बी सुदिक कशी र्हात नाय... तुझा बा लय सपान बघायचा तुझ्या साहेब व्हन्याचं... पर बिचारा अर्ध्यातच सोडून गेला आपल्याला... त्यो असता तर त्यानं मला असलं घाणीचं काम कराया लावलं नसतं"... परश्याची आई एवढं सगळं बोलली, तरी परश्याचं मात्र पुस्तकाशिवाय कुठंही लक्ष नव्हतं... शेवटी आईने पाठीत एक धपाटा घातला आणि त्याच्या समोर जेवणाचं ताट ढकलत ती दाराबाहेर पडली.
परशा.... एका भंगिणीचा मुलगा... परशा लहान असतानाच बांधकामवर काम करत असताना डोक्यात विटांचं घमेलं उंचावरून जोरात पडल्याने त्याच्या वडलांचा जागीच मृत्यू झाला होता... तेव्हा परशा जेमतेम दीड दोन वर्षांचा असेल.
भाड्याच्या घरात राहताना भाडं भरणं त्यापुढे शक्य नसल्याने मंदाताई म्हणजेच परश्याच्या आईने गावच्या ढोरवाड्यात एक छोटसं झोपडं बांधलं... यापुढे तिला आता एकटीने परशाला वाढवायचं होतं... पैशाचा, मानसिक कुठल्याही प्रकारच्या आधार नसताना खूप मोठे संकट 'आ' वासून उभं राहिलं होतं.
'आपला आयुष्य कसं ढकललं जाईल', याकडेच आता तिला लक्ष देणं गरजेचं होतं... एकुलत्या एक लेकराला शिकून मोठं साहेब बनवायचं त्याच्या बापाचं स्वप्न होतं आणि ते तिला खऱ्या अर्थाने पूर्ण करायचं होतं.... 'धनी नसला म्हनून काय झालं?.... मी त्याचं स्वप्न माझ्यापरीने पूर्ण करील'... हा एकच विचार मनात ठेवून तिने जमेल ते काम करण्याचा निश्चय केला.

अंगकाठी अगदीच किरकोळ असल्याने बांधकामावरची ओझ्याची कामं तिला करणं शक्य नव्हतं... कोणीतरी भांडीधुणी करण्याचे काम आपल्याला देईल, या विचाराने ती वणवण फिरत होती... परंतु तिचा गबाळा अवतार बघून, तिला कोणीही कामावर ठेवून घेण्यासाठी तयार नव्हतं.
"ताई म्या लय गरीब हाय, म्या किती बी मळकट दिसली तरीबी भांडी चकचकीत घासतिया.... कपडे बी लख्ख चमकून देति"..... पण तिच्या अवताराकडे बघून कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नव्हतं.... तिला दारातूनच लोक हाकलून लावत होते.

असं वणवण फिरता फिरता ती एका चाळीजवळ आली... चाळीत आधीच खूप गलका जमा झाला होता... कुठल्यातरी विषयावरून भांडण सुरू आहे, एवढं मात्र मंदाताईला समजलं.
चाळीतील सार्वजनिक शौचालयाची अतिशय घाणेरडी अवस्था झाली होती... आजपर्यंत अनेक कामवाल्या बायका ठेवून पाहिल्या होत्या, परंतु महिन्याभरात त्या बायका संडास धुवायचं काम सोडून पळून जायच्या... 'एक वेळेस घरकाम केलेले परवडेल पण असली घाणीची कामं नको' असं म्हणत कोणीही शौचालय धुवायचं काम करण्यास तयार नव्हतं.
अशातच मंदाताई लोकांचे बोलणे ऐकून पुढे सरसावली.... "म्या धुवत जाईन रोज संडास.... अन् ते बी अगदी लख्ख".... चाळीतल्या लोकांना त्यांची समस्या सुटल्याने हायसं वाटलं होतं.
दर महिना पन्नास रुपये एवढी तुटपुंजी रक्कम तिला मिळणार होती... पण काहीच न कमावण्यापेक्षा हे पन्नास रुपये तिला लाख मोलाचे वाटत होते.... त्यातल्या एका बाईकडे बघून ती म्हणाली, "माय पन्नास रुपयांनी माझ्या लेकराच्या पोटाला घास मिळणार हाय.... त्यासाठी मी अशी कितीतरी घाणीची काम करायला तयार हाय बघ"
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच मंदाताई लवकर उठून चाळीमध्ये पोहोचली. आदल्या दिवशीच खराटा आणि पावडर चाळकऱ्यांनी शौचालयाबाहेर ठेवली होती... मंदा ताईने खसाखसा खराट्याने शौचालय घासून लख्ख केलं... शिवाय बादलीभर पाण्याने शौचालयाबाहेरचा परिसरही स्वच्छ केला.

महिन्याभरातच तिचं स्वच्छ काम लोकांच्या नजरेत भरलं. असं करत करत चाळीतल्या लोकांच्या ओळखीने तिला आजूबाजूच्या चाळीमधलीही शौचालय धुण्याची कामं मिळू लागली.
चाळीत राहणाऱ्या एक शिक्षिका जोशी बाई मंदाताईला थोडा आर्थिक हातभार मिळवून तिच्या मुलाचं शिक्षण पुढे चालू राहावं म्हणून एक दिवस मंदाताईचा पत्ता शोधत ढोरवाड्यात आल्या.
शिक्षणाच थोडंफार महत्त्व समजावून, त्या तिला म्हणाल्या "मी शाळेत शिक्षिकेची नोकरी करते. आमच्या शाळेतील शौचालय धुण्याचं काम मी तुला मिळवून देऊ शकते. त्यामुळे तुला पैसेही मिळतील आणि त्या वेळेत तुझा मुलगा शाळेत येऊन शिकूही शकेल. शिवाय पुस्तकांचा खर्च सरकार करत असल्याने तुला त्याच्यासाठी वस्तू घेण्याची गरज लागणार नाही".
जोशी बाईंचं बोलणं ऐकून शिक्षणाच्या विचाराने नाही, मात्र 'आपल्या लेकराला आणखी चार घास मिळतील', या विचाराने मंदाताईने लगेच होकार देऊन टाकला आणि शाळेत शौचालय धुण्याचं काम करू लागली. परशादेखील आता शाळेत जाऊ लागला होता.
जसजसा परश्या मोठा झाला, तसतशी मुलं त्याला 'भंगिणीचं पोर' म्हणून चिडवू लागली... बालमन होतं ते... आपल्या मित्रांनी असं चिडवल्यामुळे हिरमुसलेला परश्या रडत रडत घरी यायचा..... आणि आईला म्हणायचा ,"माय तू नको ना वं असं संडासं साफ करत जाऊ... तुझ्यामुळे पोरं मला भंगिणीचं पोर म्हणून चिडवतात"

त्यावर मंदाताई त्याला प्रेमाने जवळ घेऊन समजवायचा प्रयत्न करायची... पण परशाला मात्र त्या वयात आपल्या आईने दुसरं कुठलं तरी काम मिळवावं असं वाटायचं.
त्याचं असं रोज रडणं बघून एक दिवस मात्र मंदाताई चांगलीच भडकली, म्हणाली," मेल्या आज तुला उपाशीच ठेवते.... जी घाण साफ करून पैसं मिळत्यात, त्याच्यावर तर आपन जगतुया"... असं म्हणून मंदाताईने त्या दिवशी जेवणच बनवलं नाही.. परशाच्या पोटात कावळे ओरडू लागले.
शेवटी भुकेने कळवळत तो आईला बिलगला आणि म्हणाला ,"आय माझं चुकलं"... शेवटी आईचं मन होते तिचं... मंदाताईने पटकन एक भाकरी थापली आणि चटणी भाकरी खाऊन लेकरु शांतपणे झोपलं.
परश्या झोपला तरी मंदाताईच्या मात्र डोळ्याला डोळा लागला नव्हता.... 'आज आपलं लेकरू लहान हाय, पण उद्या मोठ्ठा होऊन त्याला आपली नक्की लाजंच वाटणार', या विचाराने तिच्या डोळ्यातून अश्रूधारा बरसत होत्या....
एक दिवस जोशीबाई शाळेत कविता शिकवत होत्या... 'आईची किंमत आई या जगात नसताना समजते', असा त्या कवितेतील अर्थ सांगताना जोशी बाई स्वतःदेखील खूप भावुक झाल्या होत्या... 'आपली आई आपल्यासाठी किती कष्ट करत असते' हे समजून सांगताना त्यांनी सगळ्या वर्गासमोर परशाच्या आईचं कौतुक केलं.

कुठलंही काम छोटं मोठं नसतं हे दाखवून देणारी ती माऊली आहे असं जोशी बाईंनी म्हणताच परश्याच्या डोळ्यातून मात्र घळाघळा पाणी वाहू लागलं.... 'काल रात्री आपण आईला काम सोडून दे असं म्हणताना तिच्या मनाला होणाऱ्या यातनांचा जराही विचार केला नाही', हे त्याच्या ध्यानात आलं होतं.
आपल्या आई-वडिलांना त्यांच्या कामात आपण थोडीतरी मदत करावी अशी शिकवण कवितेतून देताना जोशी बाई विचारात गुंग झाल्या होत्या.... 'आईच्या कामात मदत नक्कीच करावी, परंतु माझ्या परशाला मात्र त्याची आई करते तसलं काम आयुष्यात कधीही करायला लागू नये, हीच मनोमन प्रार्थना'... असं त्या देवाला म्हणत होत्या.
कवितेतली शिकवण प्रत्यक्षात आणावी, म्हणून आज परश्या देखील पहाटे लवकर उठून घरातून बाहेर पडला. एवढंसं पोर ते... हातात खराटा घेऊन चाळीतील शौचालय साफ करत होतं... परश्या बाहेर जातो म्हणून एवढ्या पहाटे उठून कुठे गेला? या विचारानं आई मात्र गोंधळली होती.

पण कामाची वेळ झाल्याने ती पटकन चाळीमध्ये पोहोचली. तिने बघितलं ,परश्या शौचालय धुवून आता आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत होता... आपलं लेकरू नको ते काम करतंय हे बघताना त्या माऊलीचा जीव कासावीस झाला... तिने धावत जाऊन परशाच्या हातातील खराटा घेतला आणि म्हणाली," हे करण्यासाठी तुला मी शाळंत पाठवत्ये का?.... आरं, तुझ्या बा नी तू सायब व्हण्याचं सपान बघितलं व्हतं... अशी संडासं साफ करून कुणी सायब व्हत नसतंय.... तुला पोसण्यासाठी मी समर्थ हाय... फक्त तु या घाणीत उतरु नको.
तिचं बोलणं ऐकून परश्यानं आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला ,"आज मला कळतंय माय, हे काम साधं नाय आणि हे काम करून मला वाढवताना तुला किती कष्ट होत्यात याची जाणीव मला आज झाली"
परशा दहावी झाल्यानंतर त्याच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च जोशी बाई आणि शाळेतील इतर शिक्षकांनी मिळून करण्याचे ठरवले. शाळेतील अगदी गुणवंत विद्यार्थी म्हणून नावलौकिक असलेला परशा शिक्षकांच्या आणि त्याच्या आईच्या अपेक्षांना नक्कीच पात्र ठरत होता... शिष्यवृत्ती मिळवून परशाने शिक्षण पूर्ण केलं.

वेळप्रसंगी शिक्षक त्याला आर्थिक मदत करत होतेच... पण पुढच्या आयुष्यात त्याने कधीही आईला 'काम सोड', असं सांगितलं नाही.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परशा एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर म्हणून म्हणून रुजू झाला.
कंपनीत आज मातृदिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार ठेवण्यात आला होता... सगळ्या मोठ्या ऑफिसरच्या आयांना तिथे आमंत्रित करण्यात आलं होतं.
कंपनीत आज मातृदिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार ठेवण्यात आला होता... सगळ्या मोठ्या ऑफिसरच्या आयांना तिथे आमंत्रित करण्यात आलं होतं.
परशाने आईला 'उद्या तुला ऑफिसमध्ये यायचे', असे सांगताच मंदाताई मात्र क्षणाचाही विलंब न करता 'नको', असं म्हणाली.... 'तिथं लय मोठ्या मोठ्या बायका येत्याल आणि त्यांच्या समोर मी काय सांगू?...... मला माझ्या कामाची लाज कधी बी वाटली नाय, पण आज भंगिणीचं पोर म्हणून तुझी ओळख पुसली गेली हाय, ती माझ्या तिथे एकदा येण्यानं परत तयार होईल. तुझ्या मागं माझं आशीर्वाद कायमच राहत्याल, पण मला तू येण्याचा आग्रह करू नको.
तिचं बोलणं ऐकून परश्या मात्र तिला खोटं खोटं म्हणाला ,"आय, तू जर आली नाय तर मला नोकरीवरून काढून टाकत्याल गं"... आपल्या लेकराच्या सुखाआड यायचं नाय म्हणून मंदाताईंनी लगेच होकारार्थी मान हलवली... परशाची युक्ती कामी आली होती.
मातृदिनाच्या दिवस उजाडला. परश्या आणि मंदाताई ऑफिसमध्ये पोहोचले.
मातृदिनाच्या दिवस उजाडला. परश्या आणि मंदाताई ऑफिसमध्ये पोहोचले.
परशाला बघून वॉचमनने सॅल्यूट ठोकत, शेजारी उभ्या असलेल्या मंदाताईला मात्र हटकले... 'ए बाई, इथे कुणालाही प्रवेश नाही... चल चालती हो इथून'... असं म्हणत तो मंदाताईला बाहेर हुसकू लागला.. परशाने मंदाताईचा हात पकडून तिला आपल्यासोबत नेले. आपल्या कंपनीचा मॅनेजर कोणत्या बाईला घेऊन आलाय हे मात्र वॉचमन बघतच राहिला.
सन्मान सोहळा सुरू झाला. स्टेजवर अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या आयांना आमंत्रित करण्यात आलं... एका एका ऑफिसरची आई येऊन तिचा परिचय देत होती.
सन्मान सोहळा सुरू झाला. स्टेजवर अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या आयांना आमंत्रित करण्यात आलं... एका एका ऑफिसरची आई येऊन तिचा परिचय देत होती.
कोणाची आई डॉक्टर, कोणाची इंजिनियर, कोणी शिक्षिका तर कोणी वकील, अशा अनेक उच्चशिक्षित महिला तिथे आज आदर्श माता पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या..... मंदाबाईच्या डोळ्यात मात्र खळकन अश्रू तरळले.... आज लेकाच्या शब्दाला मान देऊन त्याच्या सुखासाठी मी इथं आले तर खरं, पन तिथं जाऊन माझी वळख काय म्हणून करू... आयुष्यभर मी फक्त आणि फक्त एक भंगीण म्हणून राहिले.
मंदाताई विचारात गढलेली असतानाच स्टेजवर तिचं नाव पुकारण्यात आलं. पण डोळ्यातल्या अश्रुंनी आणि मनातल्या दाटलेल्या भावनांनी स्टेजवरचा आवाज तिच्या कानांपर्यंत पोहोचतच नव्हता. ती नि:शब्द खुर्चीत चिकटून बसल्याप्रमाणे बसली होती.

शेवटी परश्या स्टेजवरून खाली उतरला. त्याने गुडघ्यावर बसत आईचा हात पकडला.
आईला हाताला धरून परश्या स्टेजवर घेऊन गेला... मंदाताईंच्या एकंदर पेहरावाकडे बघून सारेजण चकित झाले होते.
"गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज मला माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान व्यक्तीची, जिने अविरत कष्ट करत कुठलंही काम छोटं नसतं हे दाखवून देत, स्वतःच्या भावनांपेक्षा लेकराच्या सुखासाठी झटणाऱ्या माझ्या मातेची ओळख करून देताना ऊर अभिमानाने भरून येत आहे. ती बाहेरच्या झगमगाटामध्ये कधीही वावरलेली नाही किंवा ती कुठलंही पुस्तक हातात धरून आजवर शिकलेली नाही. परंतू आयुष्याच्या परीक्षेत मात्र कायमच अव्वल ठरलेल्या माझ्या मातेला माझा मानाचा मुजरा"... असं म्हणत परशाने आईला घट्ट मिठी मारली.
"एवढ्या लोकांसमोर बोलण्याची तिला सवय नसल्याने किंवा तिचा परिचय करून दिल्याने माझ्या स्टेटसला धक्का बसेल असं तिला वाटत असल्याने, तिच्या तोंडातून एकंही शब्द फुटत नाहीये. परंतु ती नक्की असं कुठलं काम करते हे जाणून घ्यायची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल".... त्याच्या अशा बोलण्याने उपस्थितांनी आता कान टवकारले.
"माझ्या आईने आजवर भंगीणीचं काम करत, मला त्या कामाची झळंही न पोहोचू देता लहानाचं मोठं केलं, शिकवलं... आज मी जो काही आहे तो केवळ आणि केवळ तिच्यामुळेच." परश्याचे बोलणे संपल्यानंतर मंदाताई मात्र मान खाली घालून डोळ्याला पदर लावून आसवं पुसण्याचा प्रयत्न करत होती.
पण तितक्यात तिचं आणि तिच्या लेकाचं कौतुक करण्यासाठी मात्र सभागृहातील सार्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
आज एक आई खऱ्या अर्थाने मातृत्वाच्या कसोटीत स्वतःच्या हिमतीवर पात्र ठरली होती. माय लेकांनी एकमेकांची गळाभेट घेत अश्रूंचा वर्षाव केला.
त्यांच्या कष्टाची कहाणी ऐकून उपस्थित साऱ्यांचेच डोळे मात्र अभिमानाने भरून आले होते.... 'भंगिणीचा पोर' ही ओळख आज परश्या अभिमानाने सांगत होता... दुर्गंधीच्या कामातून आज प्रेमाचा सुगंध दरवळत होता.
अविरत कष्ट करणाऱ्या दुर्लक्षित आई आणि तिच्या लेकरासाठी हा लेख समर्पित....
आपले आई-वडील कसे दिसतात, कसे बोलतात, ते सुशिक्षित आहेत की अडाणी, याचा कमीपणा बाळगण्यापेक्षा, ते कायम खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून, आपल्यावर भरभरून प्रेम करतात, ही गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवावी... कारण आपण या जगात एकमेव कारण आपले आई-वडील असतात.... आई-वडिलांना गमावल्यानंतर अश्रू ढाळण्यापेक्षा, ते असताना 'आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे', हे किमान कधीतरी शब्दात व्यक्त करणंही तितकंच गरजेचं असतं.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
Tags
socialmarathi