© नीलिमा देशपांडे
"सोहन किती वेळा सांगितले तुला की हे गाणे लावत जावू नकोस. मला माझ्या आधीच्या लग्नांतल्या सगळ्या आठवणी विसरुन जायच्या आहेत.ह्या गाण्याने त्या आठवणी जाग्या होतात माझ्या आणि तुझ्याही! तूही आता तुला सोडून गेलेल्या बायकोचा विचार करणे बंद कर आणि आपल्या आयुष्याला आता वेगळ्या टप्प्यावर नेण्याचा विचार मनावर घे!"
डॉक्टर सोहनची नवी जोडीदार सरिता, त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती.
भातुकलीच्या खेळामधली, राजा आणिक राणी... अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी...
"सोहन किती वेळा सांगितले तुला की हे गाणे लावत जावू नकोस. मला माझ्या आधीच्या लग्नांतल्या सगळ्या आठवणी विसरुन जायच्या आहेत.ह्या गाण्याने त्या आठवणी जाग्या होतात माझ्या आणि तुझ्याही! तूही आता तुला सोडून गेलेल्या बायकोचा विचार करणे बंद कर आणि आपल्या आयुष्याला आता वेगळ्या टप्प्यावर नेण्याचा विचार मनावर घे!"
डॉक्टर सोहनची नवी जोडीदार सरिता, त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती.
रेडिओलॉजिस्ट सरिता आणि डॉक्टर सोहन यांनी ठरवून आणि विचार करुन एकमेकांशी दुसरे लग्नं तर केले होते पण ते दोघे अजूनही त्यांच्या आधीच्या जोडीदारासोबत त्यांनी घालवलेले क्षण विसरले नव्हते.
पूर्वी ज्या गोष्टींचा त्यांना त्रास झाला होता,तशाच काही साम्य असलेल्या घटना झाल्या की दोघेही अस्वस्थ होत.
जुन्या काही चांगल्या आठवणी देखील त्यांना विसरणे कठीण वाटत असल्याने, त्यांच्यात नवे वाद निर्माण झाले होते कारण त्या चांगल्या सवयी त्यांच्या आधीच्या जोडीदारात होत्या. स्वत:च्या नव्या जोडीदारात त्या आवडत्या सवयी असाव्यात अशी अपेक्षा करून ते नाराज रहात होते.
" सरिता, मी माझा अंतीम निर्णय तुला संगितलेला आहे. मी अजून त्या मानसिक धक्क्यातून सावरलो नाही आणि नंतरही मला कधी आपले मुल नकोच आहे."
एकिकडे नव्या नात्यात दोघे जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना, सोहनच्या आईच्या सुनेकडून असलेल्या अपेक्षा कमी होत नव्हत्या.

सोहनच्या वडिलांच्या माघारी त्यांचा मानसिक आधार बनलेल्या मुलाकडून म्हणजे सोहनकडून आणि सुनेकडून त्यांच्या काही अपेक्षा होत्या. आर्थिकदृष्ट्या ते अतिशय समृद्ध असले तरी घर म्हणून एकाच घरातले तीन लोक तीन दिशांना जीवन जगत होते.
"मला वाटते की आपण दोघे आधी काही विषयांवर तरी एकमत होण्याचा प्रयत्न करूत. तुझी जशी माझ्याकडून अपेक्षा आहे तशाच माझ्या आईच्या आणि माझ्या काही इच्छा,अपेक्षा आहेत तुझ्याकडून.

त्या तुला समजेपर्यंत, वाद वाढण्यापेक्षा मी वेगळ्या बेडरूममधे शिफ्ट होतोय..."
रागात सोहन बोलत असताना सरिताने देखील त्याला त्यादिवशी उत्तर दिले,
"ठीक आहे,मी सुद्धा माझ्या करीअरमधे पुढे जाण्यासाठी धडपड करत आहे आणि त्यासाठी मला मानसिक शांतता हवी आहे...त्यामूळे आपण शांत राहूत."
यातून दोघांना शांतपणे विचार करायला वेळ मिळेल आणि ते भांडण विसरुन एक होतील असे त्या दोघांना आणि डॉक्टर सोहनच्या आईलाही वाटले होते.

पण प्रत्यक्षात मात्र ह्या गोष्टीने जरा वेगळे वळण घ्यायला सुरुवात केली.
डॉक्टर सोहन दिवसेंदिवस त्याच्या कामापेक्षा व्यसनात जास्त अडकला आणि सरिता जास्तच एकटी पडत गेली.
तिच्या कामात तिचे लक्ष नसल्याने तिच्या चुका होऊ शकतील हे लक्षात आल्यावर तिने या बाबतीत त्यांच्या लग्नांला एक आनंदी रुप देण्यात मदत करतील अशा कोचशी भेट घेतली.
"नवरा बायको यांच्यात संवादच नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी हवे तसे बदल दिसायला वेळ लागतो. त्यामूळे सोहनच्या आई हा तुमच्या मधील चांगला दुवा बनू शकतील जर आधी तू सोहनपेक्षा त्याच्या आईचे मन जिंकू शकलीस तर!"
कोचने अचूक मद्द्यावर बोट ठेवताच सरितालाही ते पटले.
"तुम्ही सांगत आहात ते मला पटले आहे आणि मी मनापासून त्याचा आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल"
असे सांगून सरिताने पुढचे सेशन बुक केले आणि ठरल्यादिवशी खुश होत कोचच्या घरी आली देखील.
" मी अनेक छोट्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे. जमेल तेंव्हा मी साडी नेसते आणि डोक्यावर पदर घेते हे सासूला खुप आवडले. देवाची पूजा असो वा सण वार असला की मोठ्यांच्या पाया पडणे,शक्य तेंव्हा मी घरात असताना खासकरुन काही वेगळे करण्याचा किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयन्त करते.

याचा परिणाम म्हणजे सोहनही प्रयन्त पूर्वक स्वत:ला व्यसनात बाहेर काढत आहेत.
त्याची आईतर माझ्यावर खूप खुश आहे आणि त्यांनी आम्हाला एकत्रही आणले. पण अजुनही सोहन पुर्ण बदलला नाही, त्यामूळे परत लवकर भेटू"
असे कोचला सांगून सरिता घरी आली आणि सासूशी मोकळेपणाने तिने बोलायचा प्रयत्न केला.
"मी ह्या घरासाठी, सोहनसाठी आणि तुमच्यासाठी स्वत: मधे आजवर अनेक बदल केले.त्याला त्याच्या व्यसनातून दूर करताना अनेकदा मनस्ताप आणि उगारलेला हातही सहन केला.

पण तो त्याचा हट्ट सोडायला तयार नाही. त्यामूळे आता मीच काही दिवस वेगळे राहण्याचा विचार करत आहे. मला निदान तुम्ही तरी समजून घ्याल अशी आशा आहे"
हे सांगून सरिता एका हॉस्टेलमधे रहायला गेली. एकंदरीत मधल्या काळात सरिताने नाते टिकवण्यासाठी केलेले प्रयन्त सोहन आणि त्याची आई यांच्या मनात सरिताची नवी प्रतिमा उभारून गेले होते. त्यामूळे महिना भरातच सोहन सरिताला आणायला गेला.
"मला तुझा निर्णय मान्य आहे. आता माझी देखील मानसिक तयारी झाली आहे आणि आपण एकमेकांना समजून घेवू शकतो हा विश्वास तू निर्माण करुन दिला त्यामूळे आता आपल्या दोघांच्या इच्छेप्रमाणे आपण तुझी परीक्षा झाली की फिरायला जावून येवू!" अशी ग्वाही देत सोहन,तिला घरी घेवून आला.

आज एका बाळाचे आई वडील असलेले सोहन आणि सरिता सुखाने एकत्र नांदत आहेत. सोहनने, सरिताची परीक्षा असो वा बाळाला सांभाळणे, सगळ्यात साथ दिली जी एक जोडीदार म्हणून, प्रेमाने दिली जाते.
नव्या नात्याची सुरुवात करताना, जुने कटू अनुभव विसरता आले पाहिजेत.जुळवून घेण्याचा खरा प्रयत्न केला की अगदी तुटायला आलेले नातेही पुन्हा नीट जुळवता येते, हे त्या दोघांनी दाखवून दिले.
* 'लग्नाच्या' गाठी ! हया संग्रहातील कथा हया क्षेत्रातल्या तज्ञ : 'Millennial' Marriage Coach लीना परांजपे ह्यांच्या अनुभवांवर आधारीत असून त्यांना मी शब्दबद्ध केले आहे. यातील मुद्दे, कथानक हे सत्यकथांवर आधारीत असल्याने त्यातील नमुद केलेल्या अडचणी किंवा उपाय हयात बदल न करता, स्थळ काळ, नावे असे गरजेचे बदल केवळ करुन कथा लिहिल्या आहेत. त्यामूळे हया कथां कडे 'आमची मते वैयक्तिक मते किंवा विचार देणाऱ्या' अशा दृष्टीकोनातून न पाहता जागरुकता म्हणून वाचल्यास त्या आपल्याला खूप काही सांगून जातील हे निश्चीत!

सदर कथा लेखिका नीलिमा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.