© उज्वला सबनवीस
"मध्यवर्ती काराग्रुह " असं ठळकपणे लिहलेल्या त्या इमारती कडे, ती त्या लेडी पोलीस बरोबर मुकाटपणे चालायला लागली".
प्रो.नयना चांदे".या नावाची झुल बाहेरच्या जगात ठेवून, तिने त्या दरवाज्यातुन आत प्रवेश केला , अन ते दार धाडकन बंदं झालं. तसं तिचं आयुष्यही बंदं झालं . आणि बाहेरचं जगही संपलं .
एक सुस्कारा सोडुन ती चालायला लागली.
आतल्या लांबच लांब व्हारांड्यात, एका जुनाट टेबल खुर्चीवर एक कळकट चेह-याची बाई बसली होती. तिने हिच्याकडे बघितलं, ड्राँवर मधुन फाँर्म काढला ,अन वसकन ओरडली,
"सांग नाव".
"प्रो.नयना चांदे".ती शांतपणे म्हणाली.
चष्म्यातुन हिच्याकडे आपादमस्तक बघत ती पुन्हा चिडुन ओरडली,
"विसरायचं ते नाव आता, हा बिल्ला क्रं २१ घे ,अन आता हेच तुझं नाव ,लक्षात ठेव वागणुक चांगली ठेवायची, शिक्षणाचा माज इथे दाखवायचा नाही. घे हा बिल्ला अन जा आपल्या कोठडीत आता". उगाचच मग्रुरीने बोलत त्या बाईने तो बिल्ला तिच्या कडे फेकला ,अन बेसिन मधे जाउन पचकन पान थुकून आली .
तिला एकदम शिसारी आली. आत्ता तर कुठे सुरवात होती. तिला उरलेलं आयुष्य इथेच काढायचं होतं जे ,तिने स्वताः ओढवुन घेतलं होतं.
"चंदा, बरोबर ने तिला कोठडीत ,जन्मठेपेची शिक्षा झालीय तिला, एक खुन करुन आलीय इथे ."ती बाई तिरस्काराने तिच्या कडे बघत बोलली.
चंदाने वरिष्ठांचा हुकुम बरोब्बर ऐकला ,हिचा हात ओढत ती चालायला लागली .
खरं म्हणजे इतकं ओढुन न्यायची गरज नव्हती. तिला ओरडुन सांगावं वाटत होतं .मी जात नाही पळुन बाहेर . मी सराईत गून्हेगार नाही हो ,मी प्रोफेसर आहे .
पण तिचं कोण ऐकणार होतं. आता ती या जेलमधे एक कैदी होती .अन तिला अशीच वागणूक मिळणार होती .तिने सूस्कारा सोडला , अन समोर बघितलं..
त्या रंग उडालेल्या भिंती ,लांबच व्हरांडा , एकेक कोठी मागे पडत होती. सगळी कडे भयाण शांतता , या सगळ्या मुळे तो तुरुंग अजुनच भयानक वाटत होता .पण ती कुठलाच विचार आपल्या मेंदु पर्यंत पोचु देत नव्हती .समोर येईल ते स्विकारायचं एवढच तिच्या हातात होतं.
कोठी नंबर१३ आल्यावर , चंदाने कंबरेचा किल्ल्यांचा जुडगा काढला , अन करकर आवाज करणारं, ते कुलुप उघडुन , तिला जोरात आत ढकललं.
आता ती काही प्रतिकार करणार नव्हती , किंवा पळुनही जाणार नव्हती .पण चंदा तिच्याशी जराही नरमाइने वागण्याची जोखीम घेणार नव्हती, ती खुनी होती तिच्याशी कठोर वागायचं , हा वरिष्ठांचा हुकुमच होता .
तिने आत पाउल टाकलं ,तिच्या जिवनातल्या नव्या पर्वाला सुरवात झाली होती. आत आधीच तिघी बायका होत्या. एक जण सतरंजी वर झोपली होती ,तर दुस-या दोघी बसल्या होत्या .
त्यातली एक जण दुसरीच्या केसाचं मालीश करत होती. ती हे सगळं नजरेने टिपत असतांनाच , चंदा बाहेरुन ओरडली,"नवीन पाव्हणी सोडलीय तुमच्यात, जन्मठेपेची कैदी आहे, खुन करुन आली आहे.सांभाळुन रहा बायांनो".
"कुण्या गावाचं आलं पाखरु,"असं भसाड्या आवाजात मालीश करुन घेणारी गायला लागली.
"काई बा चमेली तुझं, चांगली वयस्कर पाखरीण हाय ती". मालीश करणारी दात विचकत हसली..
"हो ग मंदे,बरोबर हाय तुजं . पाखरीणच हाय ही .पर ए खुने, हितं आमचं चालतं ,ज्यादा शानपट्टी कराची नाइ. आमचा हुकुम बराब्बर ऐकाचा ."असं बडबडत चमेली एकदम तिच्या समोर उभी राह्यली.
ती घाबरुन मागे सरकली, तशी झोपलेली बाई फसकन हसली.
",तुले हसाले का झालं व रुक्मे ,असं हसाचं नाय बा पावण्या समोर . ती खुनी हाय बरं ,तुझा पन खुन करन ती"
अन त्या तिघी जोरजोरात हसायला लागल्या.
यांच्या सोबत राह्यचं असेल तर हे सोसावच लागेल, याची खुणगाठ तिने मनाशी बांधली. ती एका कोप-यात गुडघ्यात मान टाकुन बसली. चमेली तिला उगाचच धक्का देत, तिच्या बाजुला धपकन येउन बसली..तिला आता चमेलीची भिती वाटायला लागली.
"कामुन केला तू खुन? सांग न सांग न ".चमेली तिला हलवत हसत हसत जोरजोरात बोलत होती .
ती घाबरली चमेली कडे केविलवाण्या नजरेने बघायला लागली .तसा चमेलीला अजुनच जोर आला. ती तिला जोरजोरात हलवत विचारत राह्यली , अन मोठ्याने हसत राह्यली.बाकी दोघीही तिला साथ द्यायला लागल्या..कसं राहु आपण इथे .तिला घाम फुटला.
तेवढ्यात सायं प्रार्थनेची घंटा झाली.अन तिची त्या जीवघेण्या प्रकारातून सुटका झाली. सगळ्या कैद्यांना बाहेर काढलं गेलं.सगळ्या जणी हिच्या कडे टुकटुक बघत राह्यल्या एवढी चांगली बाई इथे कशी, हा प्रश्न त्या कैदी स्त्रियांच्या मनात घोळत होता.
चमेली तिला सारखी" ए खुने "असा उगीचच आवाज देत राह्यली. माझं नाव नयना आहे ,हे ती काकुळतीने चमेलीला सांगत होती.
पण चमेली काही ऐकत नव्हती,"खुने ,नयना वगैरे नाय म्हननार आम्ही तुले ".असं जोरात हसत चमेली म्हणाली.ही खुन करुन आलीय ही बातमी सगळी कडे लगेच पसरली. अन सगळ्या एका वेगळ्याच नजरेने तिच्या कडे बघायला लागल्या.
खुनी बाई अशी दिसते . त्या सगळ्या चोरीमारी वगैरे , अशा सारखे गुन्हे करुन आल्या होत्या. खुनी बाई म्हणजे ,कसा केला असेल हिने खुन त्यांची उत्सुकता अजुनच वाढली कोणाचा खुन केला असेल हिने.
ती बिचारी कोणाशी काहीच न बोलता हात जोडुन उभी होती. प्रार्थना झाल्यावर जेलरला न जुमानता सगळ्यांनी तिच्या भोवती गर्दी केली.
ही कोणी प्रदर्शनातली वस्तु होती असच सगळ्या वागत होत्या. एवढी सुशिक्षीत बाई आपल्यात उभी आहे ,या धक्क्यातून त्या बाहेर येत नव्हत्या.शेवटी जेलर ओरडली तशा सगळ्या पांगल्या.अन तिने पण मोठा श्वास घेतला..परमेश्वरा ,आता काय काय सोसावं लागणार आहे मला , काय माहित.
दिवस उगवत होता अन मावळतही होता .बदल काहीच नव्हता.फक्त शिक्षेतला एक दिवस कमी होत होता.
हळुहळु ती या वातावरणाला सरावत होती.
चमेली अन तिची गँग तिला त्रास द्यायची एकही संधी सोडत नव्हत्या.दिवस भरात चमेली तिला कितीदा तरी विचारायची सांग कोणाचा खून केला अन का केला. ती आपली मुकाटपणे ते सहन करत होती. तिला सहन करायची सवय होतीच. तिने याही पेक्षा भयानक त्रास भोगला होता.
महिन्यातल्या दुस-या रविवारी जेल मधे एक कार्यक्रम व्हायचा ,प्रत्येक कैदीने आपल्या मनातलं बोलायचं.त्यामुळे त्यांचं मन मोकळं व्हायचं.जरा विरंगुळा पण मिळेल संवादही साधला जाईल , हा या उपक्रमा मागचा उद्देश होता .प्रत्येकीला १५ मिनीट मिळत.
त्याही दिवशी तो कार्यक्रम होता. सगळ्या मैदानात जमल्या होत्या. एकेक जण आपलं मनोगत व्यक्त करुन जात होती. कोणाला चांगलं जमायचं , तर कोणी एखाद वाक्य बोलुन खाली बसायची.
हिचा नंबर आला ,ही खुनी आता काय बोलते या कडे सगळ्यांच़ लक्ष लागलं. सगळ्यांनाच उत्सुकता होती .हिने कोणाचा खुन केला असेल अन का केला कसेल.आता तरी ही सांगेल का असा प्रश्न कैद्यांना पडला.
"आता आपली खुनी बाई बोलणार"चमेली जोरात हसत बोलली .जेलर रागावली तेंव्हा चमेली शांतं झाली.
ती उठुन उभी राह्यली, तिला काय बोलावं हे कळत नव्हतं. तिने सगळ्यां वरुन नजर फिरवली, काही डोळ्यात तिला तिरस्कार दिसला, तर काहींच्या डोळ्यात उत्सुकता होती.
"ए खुने, अट्टल खुनी हाय न तू बोल की मंग लवकर.कोनाचा खुन केला तेच सांग आम्हाला."चमेली रागात बोलली.
"मी अट्टल गुन्हेगार नाही हो,मला ते करावं लागलं."ती काकुळतेने बोलली. मी सांगतेच आता तुम्हाला सगळं. असं म्हणत तिने एक आवंढा गिळला. अन बोलायला सुरवात केली.
मी अगदी सुरक्षित वातावरणात मोठी झाले .आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते .त्यामुळे लाडात पण शिस्तित वाढले. चार चौघीं सारखं शिक्षण झालं . अन काँलेजात प्रोफेसर म्हणुन रुजु झाले.
आता आई बाबांना माझ्या लग्नाची घाई झाली, अन राघवचं स्थळ आलं .नकार देण्या सारखं काहीच नव्हतं, फक्त राघवची एक अट होती की मी नोकरी सोडावी.
मला चमत्कारिक वाटलं ते जरा, पण आईने समजावलं ,अगं थोडे दिवस जाउ दे देइल तो परवानगी .मी ही हट्ट सोडला अन थाटामाटात आमचं लग्न झालं. नव्या नवलाईचे दिवस फुलपाखरा सारखे होते..
दोन मुलं झाले.थोडक्यात काय माझं आयुष्य मजेत चाललं होतं.
राघवचं माझ्यावर खुप प्रेम होतं. जराही नजरे समोरुन हलु देत नसे तो. मी कोणाशी बोलली तरी लगेच म्हणायचा, तू इकडे तिकडे नको जाउ माझा जीव घाबरतो नेईल तुला कोणी पळवुन.
मी सुखावायची, त्याच्या या वाक्याने. पण नंतर मला या एकसुरी आयुष्याचा कंटाळा यायला लागला. मुलही मोठी झाली होती. मी पुन्हा काँलेज मधे नोकरी करते हा लकडा मी त्याच्या मागे लावला. सुरवातीला तो तयारच नव्हता, मोठ्या मिन्नतवारीने परवानगी दिली त्याने .माझी नोकरी सुरु झाली.
काँलेजमधला रोजचा लेखाजोखा त्याला द्यावा लागायचा, कोणाशी बोलली, याच्याशीच का बोलली , असा संशय घेणं त्याने सुरु केलं . अन आमच्या संसाराचे सुर बेताल व्हायला लागले.
त्याचा संशयी स्वभाव फारच वाढत होता .संशयी स्वभाव आधीही होताच त्याचा, पण माझ्या लक्षात नाही आला. मुलांना पण माझ्या विषयी भरवायला लागला.
सुरवातीला मी दुर्लक्ष करायचे .दुपारीही तो आँफिस मधुन अचानक घरी यायचा मी काय करतेय हे बघायला. त्या दिवशी तर कहरच झाला.
मी रस्त्यात एका सरांशी बोलत होते ते त्याने पाहिलं, अन संध्याकाळी सगळं घर डोक्यावर घेतलं. त्या दिवशी पहिल्यांदा त्याने माझ्यावर हात उगारला. हात उगारला हा शब्द सौम्य झाला त्याने मला अक्षरशः लाथा बुक्क्याने तुडवलं.
मी विरोध करण्याचा दुबळा प्रयत्न केला पण तो दणकट असल्याने माझं काही चाललं नाही. आता ही मारझोड नित्याचीच झाली. जरा काही संशय आला की मारझोड.
सगळ्यांनी समजाउन पाह्यलं काही उपयोग झाला नाही. हे सांगतांना आताही तिच्या घशात आवंढा अडकल्यासारखा झाला .ती दोन मिनीट थांबली अन पुन्हा बोलायला लागली.
यातुन मार्ग कसा काढावा हे कळत नव्हतं. जीवाचं काही करुन घेतलं तर माझ्या मुलांचं कसं होईल . यामुळे मला ते ही करता येत नव्हतं. मुलांना जन्माला घातलं होतं, मला त्यांना नीट वाढवायचं होतं .
माहेरचा आधार नव्हता . आई बाबा दोघही राह्यले नव्हते . शेवटी हिंमत करुन मुलांना घेउन वेगळी राह्यला लागले. पुढे घटस्फोट घेउन सुटका करुन घेउ त्याच्या पासुन हा विचार करुनच मी वेगळी राह्यला लागले.
तर तिथे येउनही राघव तमाशे करायला लागला सोसायटीतले लोक मधे पडले की तो अजुनच आरडा ओरडा करायचा .माझी ती लग्नाची बायको आहे अजुन हक्क आहेच माझा तिच्यावर . तो घटस्फोट द्यायलाही तयार नव्हता..सोसायटीतल्या लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला . तिथे राहु द्यायला ते लोक कुरकुर करायला लागले.
दोन पिल्लांना घेउन या अफाट जगात मी कुठे राहु, कशी राहु .ना कोणाचा आधार ना मी धीट होते. शिवाय मुलांच्या भविष्याचा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होताच.
मुलांना त्याचा लळा होता.मुलांशी प्रेमाने वागायचाच तो. शेवटी माझ्या मना विरुद्ध, मुलांसाठी , मला पुन्हा राघवच्या घरीच यावं लागलं .पुन्हा तेच सुरु झालं. आता लोकच मला टाळायला लागले.
दिवस जात होते .मुलं नोकरीला म्हणुन परदेशी गेले तिकडेच सेटल झाले.
दोघांचेही लग्न झाले. लग्न मात्र राघवने थाटामाटात केले. सगळ्यां समोर गोड बोलायचा, पण आतुन तो काय आहे , हे फक्त मलाच माहित होते.
घरात आता दोघच उरलो . दोन ध्रुवावर राहणारे दोन जीव. एकमेकात ना संवाद होता ना प्रेम. होती ती फक्त कटुता अन मारझोड. माझीही सहनशक्ति आता कमी होत चालली होती. त्याच्या मनासारखं वागलं की गोड वागायचा नाही तर होताच रुद्रावतार..
त्या दिवशी दुपारी मी घरीच होते, किल्ली घ्यायला म्हणुन शेजारचे घरी आले, अन तेवढ्यात राघव घरी आला, त्यांना पाहुन संतापाने बेभान झाला ,त्यांच्या समोरच ओरडायला लागला ,काय चाललय तुझं मी नसतांना ,असले घाणेरडे आरोप करायला लागला.
अपमानाने मला रडायला यायला लागले, हा माणुस आहे की राक्षस मला कळतच नव्हतं. मी इतकी कठपुतळी सारखं का जगावं. माझाही तोल सुटला मीही ओरडायला लागले, भांडायला लागले. एवढे वर्ष सहन केलं. आता वया नुसार मला पण सहन होइना.
शेजारच्यांनी काढता पाय घेतला. अन राघव माझ्यावर धावुन आला. माझं डोकं धरुन भिंतीवर आपटलं. जोरजोरात मारायला लागला .
मला ते सगळं सोसवेना ,मी मरेन या मारातुन असं मला वाटायला लागलं. काय करु मी कशी करुन घेउ सुटका याच्या हातुन. मी दोषी नसताना या दैत्याच्या हातुन का मरु, यालाच जगण्याचा हक्क नाही .
त्याचं मला जोरजोरात मारणं सुरुच होतं. मी कशीबशी सुटले अन सैपाक खोलीत आले, तोही धावत आलाच. जोरात बडबडायला लागला.
सुटका ,सुटका हा एकच शब्द माझ्या डोळ्या समोर नाचत होता. मी समोरच असलेला वरवंटा उचलला , अन शक्तिनिशी त्याच्या डोक्यात घातला..अन राघव..तो जागीच गेला.
माझ्या समोर दुसरा पर्याय नव्हता .हे चुकीचं आहे, यापुढचं आयुष्य मला तुरुंगात काढावं लागेल हेही मला कळत होतं. पण त्या क्षणी त्या दैत्या पासुन सुटका करण्याचा तो एकच मार्ग होता. अन माझ्या हातुन त्याचा खुन झाला. मी अतिशय सालस अन पापभिरु आहे हो. पण राघवच्या अत्याचाराने मला भाग पाडलं खुन करायला.
"हो आहे मी खुनी,आहे मी खुनी". ओंजळीत तोंड लपवुन ती ओक्साबोक्शी रडायला लागली.
सगळ्या कैदी निशब्द बसल्या होत्या. एका सुशिक्षित बाईलाही नव-याचा असा त्रास असु शकतो. ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं . एक भयाण शांतता सगळी कडे भरुन राह्यली.
"नयना ताई पाणी घ्या". तिने दचकुन वर पाह्यलं .हो..ती चमेलीच होती.आज तिने तिला ए खुने, अशी हाक मारली नव्हती , तर नयना ताई म्हटलं होतं.
आवेगाने नयनाने चमेलीला मिठी मारली. अन दोघीही भावनावेगाने रडायला लागल्या.
आज जेलचे नियम सैल झाले होते. एका कैद्याला जागेवर पाणी मिळालं होतं. अन ती जवळपास एक तास बोलत होती.
जेलर जवळ आली मायेने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली , "तुम्ही हायकोर्टात अपील करा होईल तुमची शिक्षा कमी".
"नको, मला आता हेच जग सुरक्षित वाटतय .बाहेरच्या जगात मला अजुन कैदी असल्या सारखं वाटेल. मला आता इथुन सुटका नकोच आहे .
एक आचका देत व्हँन उभी राह्यली ,अन तिच्या हाताला एक हिसडा देत लेडी काँन्स्टेबलने तिला त्या मोठ्या ईमारती समोर उतरवलं.

मी बरोबर केलं की चुक हे मला माहित नाही . पण जिथुन पाहिजे होती तिथुन मी करुन घेतली माझी सुटका." अन ती चमेलीच्या आधाराने , कोठी क्रमांक १३ कडे चालायला लागली.
सगळ्या कैदी पाणावल्या नजरेने तिच्या कडे बघत राह्यल्या...आता कोणालाच ती अट्टल खुनी वाटत नव्हती , अन तिचा तिरस्कार पण वाटत नव्हता.
समाप्त
© उज्वला सबनवीस
सदर कथा लेखिका उज्वला सबनवीस यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.