© वर्षा पाचारणे.
शेखर संध्याकाळी घरी येताच त्याच्या कानावर हे वाक्य आज काल अनेकदा पडू लागलं होतं.
सासू-सुनांचं घरात पटत नसल्यामुळे त्याचा राग घरी आल्या आल्या आई आणि सकाळी ऑफिसला जाताना बायको अगदी हमखास काढायची. त्याला या सार्याचा खूप वैताग आला होता.
खरं पाहता, यात चूक मात्र शेखरच्या आईची होती.. 'लहान मुलांबरोबर लहान होऊन वागावं' अस म्हणतात. पण शेखरची आई आठ वर्षाच्या अन्वीच्या मनात मात्र भलतंसलतं भरवू पहात होती.

सुरुवातीला आजी आजोबांबरोबर खेळणारी अन्वी मग मात्र स्वतःहूनच आजी पासून लांब लांब राहू लागली..
"अन्वी, आज मम्मा आणि तू कुठे गेला होतास ग?".. असं म्हणून आजी बाहेर जाऊन आलेल्या अन्वीला खोदुन खोदुन प्रश्न विचारायची.
"अगं आजी, मम्माची इथे फ्रेंड राहते ना, तिच्याकडे गेलो होतो".. अन्वीने असे उत्तर देताच आजी लगेच आजोबांकडे तिरकस नजर टाकत म्हणायची ,"गावभर फिरायला हवं सतत... घरात सासू-सासर्यां सोबत मुलीला ठेवायला लाज वाटते यांना".. या पोरीला घेऊन जायची काही गरज होती का? खेळली असती आमच्याबरोबर घरात तर काही बिघडलं असतं का?", असं म्हणत आज्जी आवाज चढवत सुनेच्या प्रत्युत्तराची वाट पाहत बसायची.

अशी वाक्य अन्वीच्या कानावर पडताच अन्वी एक दिवस पटकन म्हणाली,"अगं आज्जी, मम्माच्या त्या फ्रेंडचा मुलगा माझा फ्रेंड आहे ना आणि त्याचा बर्थडे होता, म्हणून तर गेलो होतो आम्ही"...
अन्वीने असे म्हणताच आजी तिच्या अंगावर धावून आली आणि म्हणाली ,"आता तुझी मम्मा तुला देखील आमच्यासोबत वाद घालायला शिकवते का?".. आजी आजोबा कसे चुकीचे वागतात, मम्मा कशी बरोबर असते हे शिकवते का?", असं म्हणत आजीने अन्वीच्या पाठीत उगाच धम्मक लाडू दिला.

आजीने ओरडून फटका दिल्याने अनवी रुसून रडत रडत मम्माकडे गेली..
अन्वीची आई शलाका खरं तर फार समजूतदार होती. ती हळवी आणि शांत असल्याने आजी अनेकदा तिला सतत काहीतरी विचित्र बोलायची.

पण मग कधीतरी आपल्या आई वडिलांचा उद्धार होतोय हे पाहून, मुलीला चुकीची शिकवण मिळते हे पाहून ती देखील प्रत्युत्तर द्यायची.
मग काय! अन्वीच्या आजीला दिवसभर ते एकच कारण पुरेसं व्हायचं चघळत बसायला.. आणि मग स्वतःची चूक झाकून ठेवत लेक ऑफिस वरून घरी येताच त्याच्यापुढे दिवसभराचं रामायण मांडल जायचं..
बायकोची चूक नाही, हे माहीत असणारा शेखर आईला पण आदरापोटी काहीच बोलू शकत नव्हता.

आईचा एकछत्री कारभार त्याने लहानपणापासूनच पाहिला होता.. कारण आईसमोर बाबांचे देखील काहीच चालत नव्हते..
मग काय, आता या सार्या प्रकारात आजी नकळतच अन्विला ओढत होती.
एक दिवस अनवीच्या आत्यांची मुलं सुट्टी मध्ये राहायला आली.. मामी म्हणजेच अन्वीची आई या सार्या भाच्चे कंपनीचे चांगलेच लाड पुरवत होती.

रोज दर दिवसाला छान छान नवीन पदार्थ करून खायला घालत होती.. नणंदेच्या त्या चिमुकल्या दोन गोंडस पर्यांना कधी नेलपेण्ट लावून, तर कधी मेहंदी काढून खुश करत होती.. पण इतके सारे करूनही आजी मात्र आता नातवंडांमध्ये उगाचच भांडणं लावू पाहात होती.
"लेकीची मुलं माझी खूप लाडकी", असं म्हणत मुद्दाम त्या नातवंडांना सतत जवळ बसवत होती.
अन्वी देखील आजी सोबत हट्ट करायला लागताच, तिला रडवण्यासाठी आजी मुद्दाम म्हणायची ,"तु जा तुझ्या आईकडे खोलीत जाऊन बस... नाहीतरी रोज तिथेच असतेस ना आतमध्ये"..
मग मात्र शलाका चांगलाच पारा चढला. ती स्वयंपाक घरातून पटकन बाहेर आली आणि म्हणाली ,"आई ही वेळ तुम्ही स्वतःहून आणली आहे.

त्यादिवशी मी भाजी आणायला म्हणून घराबाहेर काय पडले, तुम्ही अन्विला 'मम्मा कशी वाईट आहे' हे शिकवू लागलात.. 'मम्मा पेक्षा डॅडा किती छान आहे' हे तिच्या मनात भरवू पहात होता.
"अहो डॅडाची ती लाडकीच आहे आणि मलाही त्यात कौतुकच आहे.. पण मग तुझे दुसरे आजी आजोबा चांगले नाहीत.. मामा मावशीकडे कधीच जायचं नाही.. फक्त आमच्या दोघांबरोबरच राहायचं, हे तिला शिकवण्याची खरंच काही गरज आहे का?"...

"आता तुम्ही म्हणाल की हे एवढं सगळं अन्वीने तुला कसं सांगितलं?"... "तर आपल्या आईला आज्जी इतकी नावं ठेवते हे पाहून तिला खूप वाईट वाटलं होतं..
"मी भाजी घेऊन घरी आल्यानंतर ती बराच वेळ बेडरूम मध्ये जाऊन कोपऱ्यात बसून रडत होती.

आता नऊ वर्षांची झाली आहे ती.. तिलाही आपल्या आईला कोणी तरी वाईट म्हणतंय हे सहन झालं नाही.. त्यातून सांगणारी व्यक्ती म्हणजे आजी आहे, हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी तुमच्याविषयी तिच्या मनात वाईट भरवण्याचा मात्र मुळीच प्रयत्न केला नाही"..
"पण मग तिने तिच्या मैत्रिणीची शुभदाची आजी शुभदाच्या मम्मा बद्दल किती छान बोलते, हे सांगत मी आता आज्जी बरोबर जास्त खेळणारंच नाही असं म्हणत पुन्हा रडायला सुरुवात केली.. हा सगळा प्रकार तिने रात्री डॅडाला सुद्धा सांगितला"..
"या वयात मुलांच्या मनात असले विचार का भरवावेत हेच मला कळत नाही?" ... नसेल पटत आपल्या दोघींचं, तरीही त्याचा राग नातवंडांवर काढण्याची ही कुठली पद्धत आहे?"..

"आणि मी तुमचं काही करण्यात कधीच कमी पडत नाही.. म्हणजे ती माझी जबाबदारीच आहे, परंतु तुम्ही मात्र मला कधी या घरातलं समजलंच नाही".. "अन्वी सतत बेडरूममध्ये राहण्याचं तिचं तिनेच ठरवलेलं असतानासुद्धा मी तिला सतत तुमच्या सोबत राहण्याचा आग्रह करते... "का तर तिच्या मनात तुमच्याबद्दल चुकीचा ग्रह व्हायला नको म्हणून"....
"परंतु तुझं अक्षरच खराब आहे... तू मठ्ठ आहेस का? पुढे जाऊन तुला पण तुझ्या आई सारख्याच डोक्यावर मीऱ्या वाटायच्या आहेत का? हे असं मुलांशी बोलण्याची कुठली पद्धत झाली आई?"
"अहो मुलं आणि फुलं अगदी सारखीच असतात.. प्रेमाने, मायेच्या ओलाव्याने उमलू दिली तर बालपणाचा गंध पसरवतील... पण या अशा घुसमटीत मात्र सुकून, कोमेजुन जातील"..

"या वयातच घरात जर असं वातावरण मिळणार असेल तर भविष्यात जाऊन बालपणाच्या सुखद आठवणी त्या काय निर्माण होणार?"...
"आमच्या वेळी असं होतं... आमची मुलं कोणाबरोबरही खेळायची... आजी-आजोबांबरोबरच राहायची", हे सतत सांगताना त्यावेळी वातावरणही किती खेळीमेळीचं असायचं, हे माहीत आहेच की तुम्हाला"...
"उलट आजी-आजोबांचं भरभरून प्रेम मिळावं, हीच माझी अपेक्षा होती... पण तिला गोष्ट सांगणं किंवा तिच्यासोबत तिच्या आवडीचा खेळ खेळणं तुम्हाला कधी जमलच नाही"... "त्याऐवजी तुम्ही आपल्यातले रुसवे-फुगवे तिच्या बालमनावर ठसवायचा प्रयत्न केला"...
इतके दिवस शांत असलेली शलाका आज लेकीच्या बालपणाच्या काळजीने भडाभडा सारं काही बोलून मोकळी झाली.

आजोबा देखील सुनेच्या बोलण्याशी सहमत असल्याने ते छोट्या अन्विला घेऊन आज आजीच्या परवानगी शिवायच घराबाहेर पडले.. इतर वेळेला आजोबांना कितीही वाटलं, तरीही 'सुनेच्या तालावर नाचू नका', असं सुनावणारी आज्जी कधीच त्यांना नातीशी मनमोकळेपणाने खेळू देत नव्हती..
आज बागेतून मनसोक्त खेळून, बागडून आल्यानंतर आजोबांनी दिलेला खाऊ मम्माला दाखवत अन्वी खुश होऊन म्हणाली," आता माझ्याकडे देखील शुभदाच्या आजोबां सारखेच आजोबा आहेत.. आता आजोबा आणि मी रोज बागेत खेळायला जाणार"..
तिच्या हसऱ्या, आनंदी चेहऱ्याकडे पाहून शलाकाला आपल्या बोलण्याचं सार्थक झालं असं वाटलं.

नकळत हरवणारं बालपण वेळीच जणू अन्वीच्या ओंजळीत आज पुन्हा पडलं होतं.. घरातच दुय्यम, किंवा घुसमटीची वागणूक मिळाली, तर त्याचा माणसाच्या स्वभावावर दुरोगामी परिणाम होत जातो..
मुलांना मुलांसारखं स्वच्छंदी जगू द्यावं.. मोठ्यांच्या भांडणात ते चिरडले जाणार नाहीत याची घरातील प्रत्येकानेच काळजी घ्यावी..
म्हणूनच मुलांसमोर बोलताना आजी-आजोबा, आई-बाबा किंवा घरातील इतर सदस्यांनी एकमेकांबरोबरची कटुता दूर ठेवत घरात प्रेमाचे वातावरण निर्माण करावे.

नाहीतर उमलणाऱ्या कळ्या फुलण्याआधीच आतल्या आत कोमेजल्या जातात.. लहान मुलांबरोबर संभाषणात वापरण्यात येणारे शब्द मुलं लगेच आत्मसात करतात. त्यामुळेच प्रत्येकाने स्वतःच्या वागण्याचं आत्मपरीक्षण करणं नक्कीच गरजेचं असतं.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.