© वर्षा पाचारणे.
घाऱ्या डोळ्यांची, गोरीपान, सडसडीत बांधा, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, अगदी बाहुलीसारखे हलके तपकिरी केस, आणि बोलण्यात मधाचा गोडवा.... एखाद्या सिनेमातल्या अभिनेत्रीला ही लाजवेल असं सौंदर्य घेऊनच जन्माला आलेली नेहा कोणाला पसंत पडली नाही तर नवलच.
लहानपणी देखील तिच्या आईला आपल्या लेकीचं असं गोंडस रूप पाहून तिला अगदी कुठे ठेवू आणि कुठे नको असं व्हायचं.
वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल कपडे, निरनिराळ्या रंगाचे हेअर बँड, शूज, सँडल्स, घड्याळं, कशाकशाची म्हणून तिच्याकडे कमतरता नव्हती. नेहाने कुठलीही गोष्ट मागायच्या आधीच आई तिच्यापुढे वस्तू हजर करायची.
पण म्हणून नेहा हट्टी किंवा लाडावलेली मुळीच नव्हती... शाळेत प्रत्येक वेळेस नृत्य स्पर्धेत भाग घेऊन ती कौतुकास पात्र ठरायची. आठवीत गेल्यापासून तिला नववी दहावीतल्या अनेक मुलांनी प्रपोज करून झालं होतं.

अगदी फिल्मी स्टाईल मारत ती शाळकरी मुलं नेहा समोर गुलाबाचं फूल धरायची.. पण नेहाचा भाऊ राजवर्धन शाळा सुटल्यानंतर तिला रोज न्यायला येत असल्यामुळे नेहा निर्धास्त असायची.
राजवर्धनचा राग सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे, शाळा सुटल्यावर नेहाच्या आजूबाजूला फिरणारे हे प्रेमवीर कुठल्या कुठे गायब व्हायचे.
दोन वेण्या, शाळेचा युनिफॉर्म आणि पाठीवर दप्तराचं ओझं असणारी नेहा दहावी संपून आता अकरावीत गेली होती. छान छान भडक रंगाचे पंजाबी ड्रेस घालून आता रोज केसांची साधीशीच हेअर स्टाईल करून ती दादा सोबत कॉलेजला जाऊ लागली होती.
परंतु आता दोघांच्याही कॉलेजच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने नेहाला कॉलेज सुटल्यानंतर एकटीलाच घरी जावे लागायचे.
अकरावीचं वर्ष संपून बारावीचं वर्ष सुरु झालं आणि मयंकबद्दल तिच्या मनात खूप वेगळ्याच भावना निर्माण होऊ लागल्या. दिसायला तिच्यासारखाच गोरागोमटा, उंच, दिसायला रुबाबदार असणारा मयंक तिला मनापासून भावला होता.

तसं पाहता मयंक कॉलेजमधल्या अनेक मुलींना आवडायचा, परंतु मयंकला देखील मनात कुठेतरी नेहाचा स्वभाव, तिचं वागणं आवडू लागलं होतं. एकमेकांसमोर भावना व्यक्त न करताही त्यांची लव स्टोरी नकळत फुलू लागली होती.
एक दिवस नेहानेच धीर करून तिच्या जवळच्या मैत्रिणीला आपल्या मनातल्या भावना मयंकपर्यंत पोहोचवण्याचं काम सोपवलं... मयंक आणि नेहाची कॉमन फ्रेंड असलेल्या श्रावणीने सोपवलेले काम अगदी चोखपणे निभावलं.

आधीपासूनच नेहा आवडत असल्याने मयंकनेही श्रावणी जवळच होकार कळवूनही टाकला.
मग एकमेकांचे फोन नंबर घेऊन, फोनाफोनी सुरू झाली. आता कॉलेजला जाण्याचं मुख्य आणि एकमेव कारण होतं ते म्हणजे, एकमेकांना भेटणं....
आपल्या मुलीचं बदललेलं वागणं आईच्या काही नजरेतून सुटलं नव्हतं. बारावीचं वर्ष, वाढलेला अभ्यास आणि मुलीचं हे असं निष्काळजीपणाने वागणं आईला काही केल्या शांत बसू देत नव्हतं.

त्यामुळे आई जरा जास्त शिस्त लावू पहात होती.. आणि दुसरीकडे नेहा आपलं प्रेमप्रकरण घरच्यांपासून लपवताना मयंकच्या प्रेमात गुरफटत चालली होती.
आजकाल नेहा कॉलेजला कमी आणि मयंक बरोबर निर्जन स्थळी जास्त वेळ घालवू लागली होती... या गोष्टीचा शेवट काय असू शकतो, याची भीती असूनही ती सगळ्या सीमा ओलांडायला तयार होती...

दोघांनी बारावीचा अभ्यास सोडून लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या... वर्तमानाचा ठावठिकाणा नसताना भविष्याची भली मोठ्ठी स्वप्नं पाहिली होती...
नेहाला आई आणि मयंक दोघेही तितकेच महत्त्वाचे होते. आईला न दुखवता मयंक बरोबर लग्न कधीच शक्य नव्हतं...

एकीकडे आईची काळजी तिला समजत होती... आपल्या बदललेल्या वागण्यामुळे आई आणखी कडक शिस्तीने वागते आहे, हे ही तिला जाणवत होतं.. परंतु मयंक शिवाय आता आपल्या आयुष्यात दुसरं काहीच आनंददायी नाही, असंही तिचं मन म्हणत होतं...
मयंकची सोबत तिला साता जन्मासाठी हवी होती.. तो सोबत असताना एक वेगळाच आधार जाणवत होता.. मयंक आयुष्यात आल्यानंतर आता हा प्रेमाचा विचित्र त्रिकोण तिच्या आयुष्यात निर्माण झाला होता.
इतर वेळेला नेहाच्या अंगावर घरची जबाबदारी सोडून आई अनेकदा कामानिमित्त बाहेर जात होती, परंतु आपली मुलगी कुठल्या वेगळ्या वळणावर तर पाऊल टाकत नाही ना?, या भीतीने आईने नेहाला घरात एकटं सोडणही आता बंद केलं होतं...

नेहाचे फोन कॉल्स, नेहाचं कपाट, नेहाची वह्या-पुस्तकं आई तिच्या नकळत चेक करत होती...
आज नेमकच नेहाचे कपाट तपासत असताना मयंकने दिलेल्या एक दोन भेटवस्तू आणि शेरोशायरी वाले प्रेमपत्र सापडल्याने आईची शंका खात्रीत बदलली होती..

नेहा कॉलेजमधुन आल्यानंतर आज तिला याबाबत जाब विचारणारच असं ठरवून आईचा राग अनावर होत होता...
आईची होणारी तगमग राजवर्धनने पाहिली होती... 'नेहा अजून घरी आली नाही, म्हणून आई काळजीत असेल', या विचाराने दादा नेहाला आणायला घराबाहेर पडला...
कॉलेज सुटून बराच वेळ झाला होता... तरीही बरीच मुलं आजूबाजूला टाईमपास करत उभी होती... नेमकीच नेहाची मैत्रीण देखील मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात उभी असलेली दिसताच नेहाच्या दादाने तिला ,"नेहा कधी घरी गेली?", असं विचारलं...
"दादा, नेहा तर आज कॉलेजला आलीच नाही... म्हणजे आजच नाही, ती गेल्या आठ दिवसांपासून येतच नाहीये कॉलेजला"... "उलट मीच येणार होते एक दोन दिवसात घरी तुमच्या विचारायला की ती का येत नाही म्हणून"...
तिच्या एवढ्या बोलण्याने दादा मात्र पुरता हादरला... बापरे! आठ दिवस? म्हणजे ही मुलगी आम्हाला फसवून मग नक्की जाते तरी कुठे?...

या विचाराने गाडीला किक मारून तो नेहा जिथे जाऊ शकते, अश्या ठिकाणी शोधू लागला... तास दीड तास फिरून देखील नेहा न भेटल्याने शेवटी तो घरी जावं म्हणून निघाला...
गावातील प्रसिद्ध तळ्या जवळून जाताना का कोण जाणे, 'एकदा शेवटचं इथे बघून जाऊया', असा विचार करत त्याने तलाव परिसरात फेरफटका मारताना नेहा आणि मयंक एकमेकांच्या मिठीत भविष्याची स्वप्नं रंगवताना दिसताच दादाने फक्तं नेहाला जोरात आवाज दिला...
दादाला पाहून नेहा पटकन घाबरून उठली... नेहाला गाडीवर बसायला सांगून दादाने मयंकला धमकावले... परत हिच्या नादी लागलास तर नाही तुझी माझ्या पद्धतीने वरात काढली तर नाव बदल... आणि परत समोर जरी आलास तरी जिवंत परत जायचा नाहीस"...
आता मात्र इतका वेळ घाबरून शांत उभी असलेली नेहा मयंक जवळ जाऊन त्याचा हात घट्ट पकडुन उभी राहिली....
"दादा तू घरी जा.. मी येते मागून... उगाच इथे तमाशा नकोय... नाहीतर मी काय करेल सांगू शकत नाही"... असं म्हणत नेहा तळ्याच्या दिशेने धावू लागली...
नेहाने अनुचित काही करू नये म्हणून दादा आणि मयंक दोघेही तिला अडवण्यासाठी धावले... शेवटी बहिणीच्या प्रेमापोटी दादाने तिला समजावले... "हे बघ नेहा, लवकर घरी ये... आई खूप काळजीत आहे".
नेहाने मानेनेच होकार देत पुन्हा मयंकचा हात घट्ट पकडला... दादा घरी जाऊन आईला सगळं सांगणार याची कल्पना आल्याने आता नक्की काय करू, या विचारात नेहा मयंकला बिलगली... "मयंक आता रे काय करायचं?"
"नेहा घाबरु नको... मी कायम सोबत असेल तुझ्या"... असं म्हणत मयंकने तिला घराजवळ सोडले... "आणि हे बघ नेहा फोन करून कॉन्टॅक्ट मध्ये रहा"... अस म्हणत त्याने तिला पुन्हा धीर दिला...
नेहा घरी आली... बॅग बाजूला ठेवत तिने आईच्या मुडचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करताच, आईने खाडकन तिच्या मुस्काटात मारली...
"अगं, कुठं तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस आम्हांला... इतके दिवस शंका होती पण आज खात्रीच पटली... लहानपणापासून जिवापड प्रेम केलं, याची ही शिक्षा दिलीस होय आम्हांला?...

अगं बारावीचा अभ्यास करायचा सोडून प्रेम प्रकरण कसलं करतेस?".. असं बोलत आईने आता स्वत:ला दोष देत स्वतःच्या तोंडात मारून घेतले..
"आई, ऐक ना"... "अगं खूप चांगला आहे मयंक... काय कमी आहे त्याच्यात.... अग खूप प्रेम करतो तो माझ्यावर... अगदी तू जितकं करतेस तितकंच"... असं म्हणत नेहा समजावू पाहत होती...

'आपण घरी येईपर्यंत दादाने आईला सगळं सांगून परिस्थिती बिघडवली', असं वाटून नेहाने दादावर आरोप करायला सुरवात केली..
"याने सांगितलं ना तुला तिखट मीठ लावून?"... असं म्हणत तिने दादा कडे चिडून पाहिले... दादा मात्र आत्ता निःशब्द होता...
"त्याने कश्याला सांगायला हवं?"... "अगं, तुझी प्रेमपत्र तुमच्या प्रेमाचे रंग उधळत पडली होती कपाटात... आज हाती लागली ती पत्रं आणि खात्री पटली माझी"... "मी केलेल्या संस्कारांना आज वाळवी लागली"...
"आई , अगं पण... ऐक तरी"... म्हणत नेहा रडून आर्जव करत होती...
"नेहा तू ज्याच्यावर प्रेम केलेस त्याच्या आईने माझा संसार तर उधळला होताच पण तिचा लेक तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहतोय"... आईच्या या वाक्यावर नेहा आणि दादा दोघेही अवाक झाले...
"म्हणजे?... म्हणजे काय आई?", दादाने घाबरत विचारले...
"माझं लग्न होऊन जेमतेम महिना झाला असेल, तेव्हाच तुझ्या बाबांनी या मुलाच्या आईसाठी मला सोडण्याची तयारी दाखवली... कारण आमच्या लग्ना आधी पासून त्या दोघांचं प्रेम होतं...

घरच्यांच्या भीतीने त्यांनीं माझ्या बरोबर संसार करण्याचा दिखावा तर केला... पण त्या दिखाव्याच्या संसारात त्यांनी शरीरसुख भोगण्यासाठी माझा वापर केला.. यात त्यांना नको असताना दोनदा प्रेग्नंट राहून तुम्ही दोघं माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालात"...
"कितीही संसाराला कवटाळून बसण्यासाठी भावना उफळात असल्या, तरी मन मात्र हा बिनबुडाचा संसार मोडण्यासाठी तळमळत होतं...

अन् शेवटी नवऱ्याने मला कायमचं सोडून स्वतःची या साऱ्यातून सुटका करून घेतली... आणि त्यांच्या अनैतिक नात्याला नैतिकतेचं लेबल चिटकवून त्यांनी संसार सुरू केला"...
एवढं सांगताना इतक्या वर्षांची दडलेली गुपीतं बाहेर पडत जणू ढिगारा बनून आता घराला मुळापासून उखडून टाकू पाहत होती... नेहा मात्र या साऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हती... ज्या मयंकवर आपण प्रेम केलंय त्याचे बाबा आणि आपले बाबा यांच्या नावात साधर्म्य काहीच नाही हे तिला माहीत होतं...
"आई, खोटं बोलून मला फसवू नको.. अग त्याच्या बाबांचं नाव राघव आहे आणि आमच्या शेखर.... मग हा एकच माणूस कसा असेल?"...
कारण आमच्या प्रेमाच्या त्रिकोणात मी फसवले गेले... पण थोड्याच दिवसात जिच्यासाठी त्यांनी मला सोडले, तिने तुमच्या वडिलांना सोडून वेगळा संसार थाटला... त्या धक्क्याने त्यांनी आत्महत्या केली...

माझ्या पदरी दोन लेकरं असून, आर्थिक चणचण असून मी डगमगले नाही... शिक्षणाचा वापर करून , सासरची माणसं जपत पैश्याला पैसा जोडत लढत राहिले"... 'आपला मुलगा नालायक निघाला त्यात सुनेची काय चूक?', याची जाणीव सासू सासऱ्यांना होती.. त्यामुळे त्यांनी कायम माझी साथ दिली"...
"पण माझा यावर विश्वास नाही... आणि मी लग्न पण फक्त मयंक बरोबर करेल.... नाहीतर मग मरून जाईल"... असं म्हणत इतका वेळ रडत असलेली नेहा आईला धमकी देऊन तिच्या खोलीत गेली.. तितक्यात मयंकचा फोन आला...
"डार्लिंग, सगळ ठीक आहे ना?"... अस मयंकने विचारताच घडलेला सारा प्रकार सांगण्यासाठी नेहाने सुरवात करताच आईने फोन हिसकावून घेतला.
"माझ्या नशिबात आलेली दुःख काय कमी आहेत का?, म्हणून अजून त्रास देतेस", असं म्हणत आईने नेहाला चांगलाच दम भरला... नेहा देखील निमुटपणे अभ्यासाचे पुस्तक उघडून रडून लाल झालेले डोळे पुसत बसली होती...
नेहा आता थोडी शांत झालेली पाहताच, आईने स्वयंपाक करायला घेतला..

तितक्यात नेहाच्या किंचाळण्याचा आवाज येऊन धाडकन जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला... आई आणि दादा रूमकडे धावले..
दरवाजा फक्त ढकलला होता.. दार उघडून आत पाहताच आईला भोवळ आली.. नेहाने पंख्याला लटकून गळफास घेतला होता...
स्टूल ढकल्याने जोरात पडल्याचा तो आवाज झाला होता.. दादाने तिचा गळफास सोडवून नेहाला हलवून खूप आवाज दिला... पण सगळं संपलं होतं... स्टूल जवळ एक चिठ्ठी पडली होती...
प्रिय आई,
प्रेमात काही गमवणं म्हणजे पण कमवणंच असतं गं... तु, मी आणि मयंकच्या प्रेमाच्या त्रिकोणात एक कुणी तरी दुखावलं जाणारंच... तू आयुष्यभर इतकं दुःख उरात साठवून जगलीस...

मी तुझं न ऐकता मयंकची निवड केली तर तूला चालणार नाही... आणि तुझ ऐकून मयंकला विसरणं मला या जन्मात शक्य नाही... त्यामुळे मी स्वतःलाच संपवत आहे"...
दादाने ती चिठ्ठी वाचली... त्याला काय करावं सूचना.... घरातील रडण्याने आत्महत्येची बातमी गावभर पसरली... मुलीला नावं ठेवत अनेकांनी कुजबूज सुरू केली.

पोलिस केस झाली... सगळं प्रकरण निवल्यावर मयंक कुठेही दोषी आढळला नाही..
कारण त्या मुलीचं एकतर्फी प्रेम होतं, असं दाखवून त्याच्या घरच्यांनी त्याची सुटका करून घेतली... काही वर्षांत त्याचं दुसऱ्या मुलीशी लग्न देखील झालं...
आता आपण आयुष्यात काय कमावलं, यापेक्षा कितीतरी गमावलं याचीच जास्त खंत आईला होती.. आधी लग्नानंतर नवऱ्याच्या प्रेम प्रकरणाच्या त्रिकोणात अडकलेली आई, आता आयुष्यभर मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या या प्रेमाच्या त्रिकोणात जिवंतपणी मरण यातना भोगत होती...
आजकाल आलेल्या संकटांशी दोन हात करण्यापेक्षा जीवन संपवणं अनेकांना सोप्पं वाटतं, पण त्याने मागे राहणाऱ्यांच्या आयुष्यात मात्र अनेक संकटं उभी राहतात, हा विचार नक्कीच करावा... आंधळ्या प्रेमापेक्षा डोळस विचार केल्यास आयुष्य गमावण्याची वेळ नक्कीच कुणावरही येणार नाही.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
वर्षभरात त्याचे लग्न कसे होईल ते दोघे बारावीत होते ना मग जेमतेम सतरा अठरा वय त्यात मुलांचे लग्नं 21 वर्षी म्हणजे त्याने कायदा मोडत लग्न केले असे म्हणायचे का
उत्तर द्याहटवाबरोबर मुद्दा ... करेक्शन केलंय..खूप धन्यवाद ...
हटवा