© पल्लवी घोडके-अष्टेकर
संजना नेहमीप्रमाणे तिच्या ५ वर्षाच्या मुलीला घेऊन संध्याकाळी बागेत फिरायला गेली. मुलगी बागेत छान खेळत, संजना दिवसभर घरातले कामे करून दमून एका बाकावर बसून राहत.
आता बागेत गेल्यावर संजनाची नजर रोजच तिला शोधू लागली.तिला पाहिल्यावर आपण किती साधे राहतोय,भर तारुण्यात आपण जरा देखील स्वतःकडे लक्ष देत नसल्याची जाणीव संजनाला होऊ लागली.
एके दिवशी तीच संजनाच्या बाकाजवळ आली.
दुसऱ्या दिवशी संजूला बघून वसु चक्क तिच्याकडे एकटक पाहातच राहिली. संजूनेही तिच्या डोळ्यापुढे टिचकी मारत, "काय मग,उड गये ना होश? हम भी किसीसे कम नही" म्हणत केसातून हात फिरवला.
एक दिवस अशीच ती बाकावर बसलेली असतांना तिचे लक्ष काही अंतर सोडून दुसऱ्या बाकावर बसलेल्या "तिच्याकडे" गेले. तिची सुंदर सोबर white साडी व त्यावर असलेले फेंट pink कलरचे flowers अतिशय सुरेख दिसत होते.
तिचे तेजस्वी अन् बोलके डोळे, कापलेले सुंदर केस, व ओठांवर जणू साडीच्याच रंगाला साजेशी लिपस्टिक लावण्याचा भास होत होता. तिची नजर संजना वर पडताच तिने संजनाला छानशी स्माईल दिली.
आता बागेत गेल्यावर संजनाची नजर रोजच तिला शोधू लागली.तिला पाहिल्यावर आपण किती साधे राहतोय,भर तारुण्यात आपण जरा देखील स्वतःकडे लक्ष देत नसल्याची जाणीव संजनाला होऊ लागली.
नकळतच संजना तिच्याकडे आकर्षित होत होती. कारण……. तसं पाहता एक कारण पुरेसं नव्हतं, त्याला अनेक कारणे होती.
एके दिवशी तीच संजनाच्या बाकाजवळ आली.
संजना कडे हसून तिने तिचा हात पुढे केला व "माझे नाव वसुधा!" अशी स्वतःची ओळख करून दिली. संजनानेही पटकन उभे राहून तिचा हात हातात घेत "मी संजना, तुम्ही बसा ना!' असे म्हणून तिच्या हाताला धरून तिला बसायचा इशारा केला.
बाकावर बसतांना "मला आहो-जाहो घालून उगाच वयस्कर असल्याचा भास करुन देऊ नकोस."असे तिने म्हणताच त्या दोघीही खळखळून हसल्या.
"मला वसुधाच म्हण, तश्या…..माझ्या जीवलग मैत्रिणी मला वसु म्हणतात." तिने मिश्कीलपणे डोळे मिचकावत सांगितले.
सुरुवातीला तिला वसुधा म्हणून एकेरी हाक मारायला सजना थोडी संकोचत होती परंतु हळूहळू तिला सवय झाली. संजनाची मुलगी तन्वीही वसुधा बरोबर छान रमली होती.
वसुधा तिचे फार लाड करायची. संजनाशी ती खूप छान गप्पा मारायची. पण कधीही घरच्या लोकांचा तिने उल्लेख केला नव्हता, घरी कोण-कोण असतं?काय करतात? मुले किती? आहेत की नाही? हे देखील ती कधी बोलत नसत.
तिने या सगळ्या गोष्टी कधी संजनालाही विचारल्या नव्हत्या. पण त्या दोघी इतक्या गप्पा मारत की तो एक तास कसा संपत त्यांचे त्यांनाच कळत नसे.
साहित्य, जुनी फिल्मी गाणी, एखादं छानसं नाटक यावर गप्पा रंगू लागल्या.
जुन्या सुंदर गाण्यांची लिस्ट बनू लागली.
येता-जाता संजना गोड गाणे गुणगुणू लागली. एकमेकींच्या आवडीनिवडी आता त्यांना छान कळाल्या होत्या, एकमेकींच्या कलागुणांची स्तुती होऊ लागली, चांगल्या गोष्टींची देवाण-घेवाण होऊ लागली.
संजनाची आता "संजू" तर वसुधाची "वसु"झाली होती.
त्यांची ही जगावेगळी मैत्री संजनाला फारच आवडत होती त्या मैत्रीमध्ये कुठलेही हेवेदावे नव्हते,कुणाबद्दलही गार्हाणे नव्हते, सासु-सुन हा विषय नव्हता, पण जे काही होतं ते अगदी छान होतं.
एक दिवस तिने संजूकडे निरखून बघितले व म्हणाली, "संजू तुझे केस किती सुंदर आहेत गं,पण ते सुंदर आहेत हे तुझ्याकडे फार निरखून पाहणाऱ्या व्यक्तीलाच दिसते, त्यांना छान वाऱ्याच्या झोकात मनमुराद उडू दे,छानशी हेअर कट कर की, मी देऊ का तुला माझ्या ब्युटीशियनचा नंबर?" वसु तिच्या कापलेल्या केसांची बट कानामागे घेता घेता बोलली.
एक दिवस तिने संजूकडे निरखून बघितले व म्हणाली, "संजू तुझे केस किती सुंदर आहेत गं,पण ते सुंदर आहेत हे तुझ्याकडे फार निरखून पाहणाऱ्या व्यक्तीलाच दिसते, त्यांना छान वाऱ्याच्या झोकात मनमुराद उडू दे,छानशी हेअर कट कर की, मी देऊ का तुला माझ्या ब्युटीशियनचा नंबर?" वसु तिच्या कापलेल्या केसांची बट कानामागे घेता घेता बोलली.
"तुझी ब्युटीशियन?"संजूने हसतच विचारले. "अगं हो…. चांगली आहे ती, मस्त हॉट आहे,आवडेल तुला." ती डोळे मिचकावत बोलली. तश्या दोघीही हसू लागल्या.
दुसऱ्या दिवशी संजूला बघून वसु चक्क तिच्याकडे एकटक पाहातच राहिली. संजूनेही तिच्या डोळ्यापुढे टिचकी मारत, "काय मग,उड गये ना होश? हम भी किसीसे कम नही" म्हणत केसातून हात फिरवला.
"अरे वा मस्त! हम तो फिदा हो गये."असे म्हणून वसुने संजूला चक्क मिठी मारली व गालावर किसही केले.
संजूला खूप आनंद झाला.त्या दिवशी तन्वीही वसुला म्हणाली, "मस्त दिसतेय ना आई?" "हो गं, खूप सुंदर.अगदी आतून बाहेरून सुंदर दिसते तुझी आई." तिच्या बोलण्याने संजु उगाचच लाजली.
तेवढ्यात तन्वीने, "आई बॉयफ्रेंड म्हणजे काय ग?" असा अनपेक्षित प्रश्न केला.
तिच्या प्रश्नाने चकित होऊन संजूचे डोळे विस्फारले गेले,ते पाहून हे प्रकरण तू माझ्यावर सोड म्हणून वसु तिला समजाऊ लागली. "अगं एखादा मुलगा एखाद्या मुलीचा फ्रेंड झाला की त्याला बॉयफ्रेंड म्हणायचं आणि मुलगी फ्रेंड झाली तर तिला गर्लफ्रेंड म्हणायचं,इतकच."
तिच्या बोलण्याचा अर्थ नीट समजून न घेताच तन्वी म्हणाली, "अच्छा म्हणजे नेहा माझी गर्लफ्रेंड आणि तू आईची गर्लफ्रेंड आहेस तर!"
"अगं…. तसं नाही." संजूने समजावण्याचा प्रयत्न केला पण तन्वी होती कुठे ऐकायला? ती तर धूम ठोकून निघूनही गेली.
संजूला थोडे संकोचल्यासारखे वाटले ती काही बोलणार तेवढ्यात वसुने संजूचा हात हातात घेतला व म्हणाली, "मला आवडेल तुझी गर्लफ्रेंड व्हायला,तुला आवडेल की नाही….. माझी गर्लफ्रेंड व्हायला ते तुझं तू बघ." तिच्या बोलण्यावर दोघीही मनमुराद हसल्या.
संजूला वसुचा सहवास आवडत होता. तिने स्वतः मध्ये खूप पॉझिटिव बदल घडवून आणले तिच्यातील बदल तिच्या नवऱ्यालाही जाणवू लागला.
संजूला वसुचा सहवास आवडत होता. तिने स्वतः मध्ये खूप पॉझिटिव बदल घडवून आणले तिच्यातील बदल तिच्या नवऱ्यालाही जाणवू लागला.
त्याची बायको आता त्याला पूर्वीपेक्षाही जास्त आवडू लागली.
एखादा दिवस जरी संजू बागेत जाऊ शकत नसेल तर लगेच बसूला फोन करून वाट पाहू नकोस म्हणून कळवू लागली. संजू वसु बद्दल घरात भरभरून बोलत,तिच्या वागण्याचं, दिसण्याचं,राहणीमानाचं कौतुक करत.
एक दिवस वसुने संजूला सहपरिवार घरी जेवायला बोलावले.
एक दिवस वसुने संजूला सहपरिवार घरी जेवायला बोलावले.
निमित्त होतं तिच्या वाढदिवसाचं.
७१ वर्षाच्या वसूने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अबोली रंगाची सुंदर साडी नेसली होती, मॅचींग नेकलेस, डोक्यात मोगऱ्याचा गजरा व नेहमीप्रमाणे एक चाफ्याचं फूल माळलं मॅचिंग नेलपेंटही लागली होती.
तिचा मुलगा-सून व नातवंडे ही बर्थडे साठी हजर होते.तिच्या घरात काम करणाऱ्या मेडने तिच्या नवऱ्याला व्हीलचेअरवरून डायनिंग टेबलजवळ जेवणासाठी आणले.त्याने त्याच्या सुंदर बायकोकडे डोळे भरून पाहिले, डोळ्यांनी जणू तू जगातली सर्वात सुंदर स्त्री असल्याची पोहोचपावतीच त्याने तिला दिली.
तिनेही ती कॉम्प्लिमेंट आनंदाने स्वीकारली. ब्लॅक अँड व्हाईट मूव्ही मधलं छानसं रोमँटिक सॉंग त्या प्रसंगाला अगदी साजेसं होतं.
त्याने नजर फिरवून संजूकडे पाहिलं व "हीच का तुझी गर्लफ्रेंड?" म्हणून विचारणा केली.
त्याच्या या प्रश्नावर सगळेचजण खळखळून हसले व "हो, हीच माझी ब्यूटीफुल गर्लफ्रेंड संजू!" असे मोठ्या ऐटीत वसुने संजूची ओळख करून दिली.
मैत्री ही वयाच्या कुठल्याही टप्प्यात अगदी निखळ असते नातवंडांची कमी तन्वीने भरून काढली होती पण संजू कडून वसुला सून,मुलगी,भाची,पुतणी अशा कुठल्याही प्रकारचे नाते नको होते.
मैत्री ही वयाच्या कुठल्याही टप्प्यात अगदी निखळ असते नातवंडांची कमी तन्वीने भरून काढली होती पण संजू कडून वसुला सून,मुलगी,भाची,पुतणी अशा कुठल्याही प्रकारचे नाते नको होते.
कारण नात्यात अनेक बंधने असतात,स्वार्थ असतो,अपेक्षा असतात. पण मैत्रीचे तसे नसते मैत्रीला ना वयाचे बंधन असते, ना परिस्थितीचे,मैत्री ही केवळ निखळ-निरागस-निस्वार्थ असते.
नातेवाइकांच्या गलबल्यात अंतर्बाह्य सुखावलेली वसु आज संजूने पहिल्यांदाच पाहिली होती.
नातेवाइकांच्या गलबल्यात अंतर्बाह्य सुखावलेली वसु आज संजूने पहिल्यांदाच पाहिली होती.
इतके सारे अवतीभवती असतांनाही संजूचे वस्तूच्या आयुष्यातील स्थान वेगळे होते.
स्वतःच्या मुलांचा विषयही न काढता त्यांच्या आठवणीत तळमळणारी वसू,नवऱ्याच्या आजारपणात त्याची मनापासून साथ देणारी परंतु तरीही स्वतःचे अस्तित्व जपणारी वसु आज नव्यानेच संजूला पाहायला मिळाली.
तिला तिच्या मैत्रिणीचा खूप अभिमान वाटत होता.तिच्या जगण्याच्या पद्धतीचे कौतुक संजूच्या डोळ्यात दिसत होतं.
स्वतःच्या परिस्थितीसाठी,एकटेपणासाठी,नवऱ्याच्या आजारपणासाठी नशिबाला दोष देणे खूप सोपे असते पण त्यातूनही मनमुराद आनंद लुटता येणे ही कला वसूने आत्मसात केली होती व तिच्या जिवलग मैत्रिणीलाही नकळतपणे शिकवली होती.
© पल्लवी घोडके-अष्टेकर.
© पल्लवी घोडके-अष्टेकर.
सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.