© वर्षा पाचारणे
पण श्रद्धाला पहिली मुलगी झाली. घरचे सारे नाराज झाले. तिला सतत टोमणे ऐकावे लागायचे... असेच दोन वर्ष गेली... तिला पुन्हा एकदा बाळाची चाहूल लागली.
श्रद्धा एका खेडेगावात जन्मलेली आणि वाढलेली मुलगी... वयात आली, तशी आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली.
मुळातच दिसायला देखणी असलेली, उंचपुरी अशी श्रद्धा लगेच पसंत पडावी अशीच होती.. तिला पहिलंच एक स्थळ सांगून आलं. मुलगा अगदीच जेमतेम शिकलेला होता आणि श्रद्धा ग्रॅज्युएट झालेली होती.
पण आई वडिलांसमोर बोलण्याची तिची हिंमत नव्हती. आई-वडिलांनी त्या मुलाशी तिचं लग्न ठरवलं.
घरात जवळपास २७-२८ माणसांचं कुटुंब. अगदी पूर्वीच्या काळी असायची तसं घर... घरात सतत माणसांचा राबता असायचा. श्रद्धा सुरुवातीला पुरती गांगरून जायची, पण हळूहळू तिला त्या वातावरणाची सवय होऊ लागली.
शेतीची कामं, स्वयंपाक, घर सांभाळणं, धुणीभांडी सगळं करताना, जरी घरात खूप बायका असल्या, तरी तिची दमछाक व्हायची. काही महिन्यातच श्रद्धाला गोड बातमी समजली. ती आई होणार होती.
सासूने तर दम दिल्यासारखं तिला बजावलं, 'पहिला मुलगा व्हायला हवा', वंशाला दिवा मिळायला हवा'...
पण श्रद्धाला पहिली मुलगी झाली. घरचे सारे नाराज झाले. तिला सतत टोमणे ऐकावे लागायचे... असेच दोन वर्ष गेली... तिला पुन्हा एकदा बाळाची चाहूल लागली.
या वेळेस तरी वंशाला मुलगा देशील की नाही असं सतत घालून पाडून घरातल्या वयोवृद्ध बायका तिला बोलत होत्या.. हा सगळा त्रास सहन करत करत बिचारी श्रद्धा मनातल्या मनात होरपळत होती..
बाळाच्या येण्याचा आनंद तर सोडाच, पण साधं कोणी कोड-कौतुकही करत नाही, या विचाराने ती खूप नाराज व्हायची... झालं, गरोदरपणाचा नववा महिना जवळ आला, तशी श्रद्धाची घालमेल जास्तच वाढायला लागली आणि शेवटी यावेळेस ही तिला मुलगी झाली.
आता मात्र श्रद्धा त्या वातावरणात राहून सतत स्वतःला दोषी मानत होती. देवाकडे सारखं मागणं मागत होती.
ती म्हणायची," अरे, माझ्या पदरात थोडीजरी पुण्याई असेल, तरी तू माझ्या पोटी मुलगा दिला असता.… पण मीच फुटक्या नशिबाची.... म्हणून दोन्ही वेळेला मुली झाल्या... रात्री-अपरात्री दचकून जागी व्हायची.
नवरा झोपलेला असायचा. हिच्या मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी परत बाळाची चाहूल लागली. आता मात्र जवळपास घरच्यांनी तिला दमच दिला होता की," यावेळेस मुलगा नाही झाला तर लेकाचं दुसरं लग्न लावून देऊ."
हा धक्का श्रद्धाला सहन होत नव्हता... हा तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता, पण पर्याय नव्हता.... आई बापाच्या नावाखातर बिचारी श्रद्धा, सगळं काही सहन करत होती.
खरं पाहता त्रासाला कंटाळून ती माहेरी जाऊ शकत होती. पण एकदा का लग्न झालं की मुलगी माहेरी परकी होती, हे तिने जाणलं होतं. तिने ठरवलं जे काही होईल ते इथेच होईल.
चुकून याही वेळेस मुलगी झाली, तरी निराश न होता, घरचे म्हणतील तसं, नवऱ्याचे दुसरे लग्न जरी झालं, तरी मी मन मारून इथेच जगत राहील आणि आयुष्याच्या शेवटी याच घरातून माझी अंत्ययात्राही निघेल, पण आता मात्र हे घर आणि हीच माणसं आयुष्यभरासाठी मी माझ्याकडून जपण्याचा पुरेपुर प्रयत्न करेल.
कदाचित देवालाही या वेळेला तिची दया आली असेल. यावेळी श्रद्धाच्या पोटी मुलगा जन्माला आला. घरीदारी आनंदाला उधाण आलं होतं... गावभर मिठाई वाटली गेली.
श्रद्धालाही आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटलं पण मुलापेक्षा दोन्ही लेकींवर तिचा खूप जीव होता.. मुली आणि मुलगा यात किमान आपण तरी फरक करणार नाही, हे ती कटाक्षाने पाहत होती आणि तसं वागत होती.. तिने मुलींची पुरेपूर हौस केली.
मुलगी वयात आली मोठ्या मुलीच्या लग्नाची चर्चा होऊ लागली. मुलगी चांगली शिकली सवरलेली होती, त्यामुळे जे आपले झाले ते लेकीचे होऊ नये म्हणून श्रद्धा धडपडत होती.
मुलगी वयात आली मोठ्या मुलीच्या लग्नाची चर्चा होऊ लागली. मुलगी चांगली शिकली सवरलेली होती, त्यामुळे जे आपले झाले ते लेकीचे होऊ नये म्हणून श्रद्धा धडपडत होती.
आलेल्या कुठल्याही स्थळाची ती तावून-सुलाखून चौकशी करत होती.
घरचे तिला घालून पाडून बोलत होते," आता मुलीसाठी काय राजकुमार शोधणार का? म्हणून जणू तिच्या विरोधात ठाकले होते.
पण पूर्वी आणि आजही तिचा नवरा मात्र तिच्यासोबत होता... जेव्हा घरच्यांनी दुसऱ्या लग्नाचा विषय काढला होता, तेव्हाही त्याने पुरेपूर तिची साथ दिली होती..," तुला सोडून माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही नसेल".. या त्याच्या एका वाक्यावर तिने अख्ख्या जगाचा विरोध हसत हसत सहन करण्याचं धाडस दाखवलं होतं
आज श्रद्धा खूप खुश होती.. तिच्या मुलीला पाहुणे बघायला आले होते. मुलगा देखणा, शिकलेला आणि आणि सुसंस्कारी होता. घरची परिस्थिती अगदी तालेवार होती. त्याचंही एकत्र कुटुंब होतं.
आज श्रद्धा खूप खुश होती.. तिच्या मुलीला पाहुणे बघायला आले होते. मुलगा देखणा, शिकलेला आणि आणि सुसंस्कारी होता. घरची परिस्थिती अगदी तालेवार होती. त्याचंही एकत्र कुटुंब होतं.
बघण्यावरून लोक हौशी वाटत होते.. दुसऱ्या दिवशी लगेच मुलाच्या घरच्यांकडून होकार आला.. श्रद्धा खूप खुश होती. ती लेकीला म्हणजेच सायलीला म्हणाली," पोरी, नशीब काढलंस, तुला आजपर्यंत काहीही कमी पडू दिलं नाही, लग्नातही तुला जे काही हवं असेल, जे काही मला शक्य असेल, ते सगळं काही मी तुला देईल... तुझ्या आनंदातच माझं सुख आहे". दोघींचेही डोळे पाणावले होते..
एकमेकींच्या गळ्यात पडून मायलेकी अश्रूंच्या वर्षावात चिंब चिंब भिजल्या होत्या... जसजसं सायलीच लग्नं जवळ येऊ लागलं, तसं आईच्या मनातली कालवाकालव वाढू लागली... पोटच्या गोळ्याला जीवा पेक्षाही जास्त माणूस जपतो.. त्याच लेकीला किती सहज परक्याला देऊन टाकावी लागते.
आईने सायलीसाठी दागदागिने करून ठेवले होते.. जवळपास पंधरा-वीस तोळे सोनं आणि तिला हवं नको ते सारं घेऊन ठेवलं होतं.. लग्नं पंधरा दिवसांवर येऊन ठेवलं होतं.
आईने सायलीसाठी दागदागिने करून ठेवले होते.. जवळपास पंधरा-वीस तोळे सोनं आणि तिला हवं नको ते सारं घेऊन ठेवलं होतं.. लग्नं पंधरा दिवसांवर येऊन ठेवलं होतं.
जावयाचे लेकीला येणारे फोन पाहून, आई मनोमन सुखावत होती... देवाकडे सतत एकच मागणं मागत होती," जे कुठलं सुख माझ्या नशिबात नसेल, ते सर्व माझ्या लेकीला मिळू दे.... जे काही मी सोसलं आहे ,त्यातला किंचितही हिस्सा माझ्या लेकीच्या वाट्याला नको येऊ दे"...
आज सायली पळत पळत आईकडे आली आणि म्हणाली," आई ,आई ,माझं परवा प्री वेडिंग शूट आहे"... लहानपणापासून गावात वाढलेली ही भाबडी आई इतरांच्या लग्नकार्याशिवाय कधीही गावाबाहेर पडली नव्हती...
आज सायली पळत पळत आईकडे आली आणि म्हणाली," आई ,आई ,माझं परवा प्री वेडिंग शूट आहे"... लहानपणापासून गावात वाढलेली ही भाबडी आई इतरांच्या लग्नकार्याशिवाय कधीही गावाबाहेर पडली नव्हती...
तिने आपल्या शिकलेल्या लेकीच्या तोंडून पहिल्यांदाच, हे असलं काहीतरी ऐकलं होतं. तिने उत्सुकतेपोटी खूप प्रश्न विचारले," प्री वेडिंग शूट म्हणजे काय? ते कसं करतात? मग त्यासाठी तुला काय काय घेऊन जायचं आहे का? ती पुरती आनंदाच्या लाटेवर असल्यासारखं तिला वाटत होतं".
मुलीचं प्री वेडिंग शूट झालं... तिचे व्हिडीओ आणि फोटो पाहून आई खूप हरखून गेली.. जग किती पुढे गेलं आहे याची तिला क्षणाक्षणाला प्रचिती येत होती. जी मुलगी जन्माला आल्यावर घरच्यांना आनंद न होता, जणू दुःखाचा डोंगर कोसळल्या सारखं वाटत होतं, त्या लेकीचं लग्न होऊन ती परकी होणार या विचाराने आईच्या मनाला घरं पडत होती.
शेवटी आईचं काळीज ते..... लेकीसाठी तिळतिळ तुटत होतं
मोठ्या एकत्र कुटुंबात संसार करत करत, आता ती त्या वातावरणाशी इतकी एकरूप झाली होती की, कितीही लोकांचा स्वयंपाक, घरात लोकांचा राबता, आणि शेतीची कामंच काय, पण लेकीच्या लग्नाची सगळी जय्यत तयारी केली होती तिनं..
आज लग्नाची हळद होती.. हळद दळण्यासाठी खूप बायका दारासमोर जमल्या होत्या.. जात्यावरती हळद दळताना छान गाणी म्हणत होत्या... अख्खा गाव लोटला होता हळदीला...
मोठ्या एकत्र कुटुंबात संसार करत करत, आता ती त्या वातावरणाशी इतकी एकरूप झाली होती की, कितीही लोकांचा स्वयंपाक, घरात लोकांचा राबता, आणि शेतीची कामंच काय, पण लेकीच्या लग्नाची सगळी जय्यत तयारी केली होती तिनं..
आज लग्नाची हळद होती.. हळद दळण्यासाठी खूप बायका दारासमोर जमल्या होत्या.. जात्यावरती हळद दळताना छान गाणी म्हणत होत्या... अख्खा गाव लोटला होता हळदीला...
एकीकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता, अंगणातच सतरंजी टाकून जेवणाच्या पंगती पडल्या होत्या... लोकांना आग्रह करून करून जेवायला बसायला लावत होते...
नवरीच्या हातावर मेहंदी अगदी खुलून दिसत होती.... आईला भेटायला प्रत्येक जण आवर्जून तिला शोधून काढत होता... तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता... पण लेकीचं लग्न होतं तिच्या..... ती निवांत थोडीच असेल....
सतत धावपळ चालू होती तिची..... कोणी जेवायचं राहून जाऊ नये, कोणाला मानपानाची साडी चुकून द्यायला विसरू नये, लेकीच्या सासरचं कोणी आलं असेल, तर त्याच्या मानपानात काही कमतरता राहायला नको, त्याच बरोबर एकत्र कुटुंबातल्या प्रत्येकाचं मन सांभाळणं म्हणजे तिच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती पण साऱ्या जबाबदाऱ्या ती लीलया पार पाडत होती.
या साऱ्यात तिचे स्वतःकडे, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. लेकीचे लग्न असूनही ती अगदी अवतारात, साध्या कपड्यात घरभर वावरत होती... एवढेच काय, पण मेहंदी काढ म्हणून सगळे तिच्या खूप मागे लागलेले असूनही, तिने केवळ मेहंदीचे चार ठिपके लावायचे म्हणून हातावर टेकवले होते....
सकाळ झाली जवळपास पंधरा-वीस दिवस अतिशय दगदगीत गेले होते.. झोप म्हणजे तर केवळ दोन-तीन तासच मिळत होती.. डोळे कमी झोपेमुळे सुजल्यासारखे दिसत होते.
सकाळ झाली जवळपास पंधरा-वीस दिवस अतिशय दगदगीत गेले होते.. झोप म्हणजे तर केवळ दोन-तीन तासच मिळत होती.. डोळे कमी झोपेमुळे सुजल्यासारखे दिसत होते.
त्यातच आपली लाडाची लेक आता परकी होणार, या विचाराने डोळ्यातल्या अश्रूंना पदराची साथ मिळत होती.. लेकीला आईचं दुःख कळत होतं...
आईच्याही नकळत तीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होती..
आई मुलीचं नातंच तसं प्रेमळ, हळवं, हवहवसं वाटणारं, तरीही कायम एकमेकींच्या सोबत राहू न शकणारं.... 'लेक परक्याचे धन', हे वाचताना जरी सोपं वाटत असलंं, तरी निभावताना मात्र खूप कठीण असतं.
लहानपणापासून आपल्या अंगणात जी बागडत होती, आपल्याजवळ येऊन हीतगुज सांगत होती, तिचा आज लोकाची होणार होती, परक्या घरी जाऊन तिथे रुजण्याचा प्रयत्न करणार होती,
लोकांचे मन सांभाळता सांभाळता स्वतःचं मन मारणार होती.. दुसऱ्याला जगण्याचं बळ देता देता स्वतः जगणंच विसरणार होती... लेक ही अशीच तर असते... कितीही हवीहवीशी वाटली तरी, कधीतरी परक्याची होणारच असते.
लग्नासाठी गाड्या मंगल कार्यालयाकडे निघाल्या.. सनई चौघड्यांच्या आवाज, मंगल वातावरण, अत्तराचा सुवास अशा भारलेल्या वातावरणात लेक मंगल कार्यालयात पोहोचली..
लग्नासाठी गाड्या मंगल कार्यालयाकडे निघाल्या.. सनई चौघड्यांच्या आवाज, मंगल वातावरण, अत्तराचा सुवास अशा भारलेल्या वातावरणात लेक मंगल कार्यालयात पोहोचली..
वधू पक्ष आणि वर पक्षासाठी वेगवेगळ्या खोल्या दिलेल्या होत्या. वधूचा मेकअप, तिला तयारी करण्यासाठी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी यांनी खोली पुर्ण भरुन गेली होती.. माइकवरून पाहुणेमंडळींचं स्वागत केलं जात होतं.. मंगल कार्यालयाच्या जवळ बँड-बाजाचा आवाज येत होता..
नवरदेव मांडवाजवळ आल्यावर, नवरदेवाचं औक्षण करण्यात आलं.. वरपक्ष असल्याने त्यांचा एक वेगळाच थाट होता.
आपली मुलगी दुसऱ्याला सोपवताना होणारी आई बापाच्या जीवाची घालमेल समजण्यासाठी मोठं मन असावं लागतं. नवरा नवरीला हळद लावून फोटो व्हिडिओ शूटिंग चालू होतं, एकीकडे जेवणासाठी हॉलमध्ये गर्दी होती.. संध्याकाळ झाली होती.
आता लग्न अगदीच तासाभरावर येऊन ठेपलं होतं.. आईचा ऊर भरून येत होता.. बापाच्या डोळ्यात कितीही अश्रू दाटले, तरी ते लपवण्याचं कसब मात्र प्रत्येक बाबाकडे असतं.. आपल्या लेकीला हसत हसत निरोप देणं, हे जणू तो तिला लहानपणापासून वाढवत असताना स्वतःला शिकवत आलेला असतो.
लग्नाच्या मंगलाष्टका ऐकू येत होत्या. आईच्या चेहर्यावरुन मात्र अश्रुधारा बरसत होत्या... एका कोपर्यात जाऊन ती हमसून हमसून रडत होती....
बाकीच्या दोघी चौघीजणी तिच्या खांद्यावर हात फिरवून तिला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या," अगं, रडू नकोस, यातून प्रत्येकीला जावंच लागतं... लेक परक्याचं धन आहे, कधीतरी आई वडिलांना सोडून तिला परक्याचं व्हावंच लागतं...."
आईला हे समजत होतं, पण जणू मनापर्यंत पोहोचत नव्हतं... मनात आनंद खूप दाटला होता पण अश्रूंचा महापूर थांबत नव्हता. ज्या लेकीच्या जन्मानी कोणालाही आनंद झाला नव्हता, आज तिच्या परक्या होण्याने मात्र साऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं... लेक म्हणजे एक हसतं-खेळतं विश्व.... आपल्याच घरातून परकी होणार होती... यापुढे कधीही आली तरीही ती पाहुणी ठरणार होती.
पाठवणीच्या वेळी आई आणि लेक एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या....
पाठवणीच्या वेळी आई आणि लेक एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या....
जमलेल्या साऱ्या लोकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.. गाडीत बसूनही सतत मागे वळून पाहणारी लेक आई-वडिलांना हात दाखवून डोळे पुसायचा प्रयत्न करत होती...
तिची गाडी लांबवर जाईपर्यंत, आई-बाबा तिच्या वाटेकडे बघत बसले होते.….. एक लेकरू परकं झालं होतं.... रोपट्याचा वृक्ष होण्यासाठी ते जणू दुसऱ्या जागी रुजणार होतं.....
दुसऱ्या दिवशी लेकीच्या घरी लग्नाची पूजा ठेवली होती... सारी मंडळी लेकीच्या सासरी पोहोचली होती...
दुसऱ्या दिवशी लेकीच्या घरी लग्नाची पूजा ठेवली होती... सारी मंडळी लेकीच्या सासरी पोहोचली होती...
आपली लेक नटली थटलेली अन् आनंदात पाहुन आज आई-बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते.
जमलेले पाहुणेमंडळी आईला सांगत होते," एका जबाबदारीतून तू मोकळी झालीस"... पण आईने मनात विचार केला,' ही जबाबदारी मी आवडीने मिळवली आहे आणि फक्त एक जबाबदारी म्हणून नाही तर अजूनही आयुष्यभर जेवढं काही करता येईल ते मी माझ्या लेकीसाठी करत राहिल...
तिला हक्काचं माहेर राहिल याची काळजी घेईल... केवळ आई बापाच्या नावासाठी नाही तर खरोखरच सुखाने सासरी नांदेल असे संस्कार मी नक्कीच केलेत... माहेरची काळजी जरी असली तरी कायमंच सासरच्या सुखाचा ती विचार करेल, ही शिकवण मी तिला नक्कीच दिली आहे..."
लेकीच्या सासरहून निघताना आईचे डोळे काळजी नाही तर आनंदाश्रूंनी भरले होते.
लेकीच्या सासरहून निघताना आईचे डोळे काळजी नाही तर आनंदाश्रूंनी भरले होते.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.