© कांचन सातपुते 'हिरण्या'
“दिप्ती कॉफी ठेवतेस का गं एक कप , काळे वहिनी आल्यात ." शोभनाताईंनी बाहेरूनच दिप्तीला सांगितलं.
“वहिनी कसं झालं देवदर्शन ?" त्यांनी काकूंना विचारलं.
" दिप्तीच्या हाताला चव आहे हो शोभनाताई तुमच्या. अगदी पाण्याला फोडणी दिली तरी स्वादिष्ट होईल. दिप्ती, मग आज काय बेत ? " काकूंनी कॉफीचा घोट घेत विचारलं.
“आज मंगळवार, माझा उपास ना काकू आणि सगळ्यांना आवडतेही म्हणून बासुंदी पुरी, अळु वड्या अन मसालेभात." दिप्ती स्वयंपाकघरात निघाली .
तेवढ्यात काकूंनी नेहमीसारख्या टिप्स दिल्या.
“अळू वड्यांना डाळीच्या पिठाबरोबर तांदूळ पीठही घाल हं थोडं . कुरकुरीत होतात छान."
दिप्तीही हसून, “हो काकू तुम्हांला देते ना झाल्या की पाठवून. " म्हणून गेली.
दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काळेकाकू अर्णवला क्लासला सोडून थोडावेळ बसायला येतात संध्याकाळी .
सकाळी नऊला गेलेल्या सोनालीला संध्याकाळी सात सव्वा सात होतात घरी यायला तेव्हा दमलेला अर्णव आजीच्या मांडीवर डोकं ठेवून टीव्ही बघत झोपेला आलेला असतो.
काळेकाकूंच्या तोंडातून पटकन गेलं , “आमची सोनालीही खूप थकते हो , नोटा छापते ना ." दिप्तीला आश्चर्यचं वाटलं काकूंच्या तोंडून हे असं बोलणं ऐकून .
सोनाली पूर्णवेळ व्यवसायासाठी देते म्हणून नोटा छापते मग मी घरात राहून अर्थार्जन करते याला काहीच किंमत नाही का ? " तिला राहवलंच नाही .
“ काकू राग मानू नका माझ्या बोलण्याचा पण खरं सांगू का मीही कमावतेच , पण घरातही सुखाचे छाप उठायला हवेत हे ही तितकंच खरं ."
काकू काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या मनातही तेच होतं, ते त्यांच्या डोळ्यांत दिसत होते.
काकूंचं बोलणं आणि चेहर्यावरचे हावभाव यातला फरक स्पष्ट दिसत होता ते दिप्तीनं आणि शोभनाताईंनी ओळखलंच .
रविवारी दुपारी जेवणं आटोपल्यावर दिप्ती सोनालीला भेटायला गेली. “ सोनाली , आज सुट्टी काय मग स्पेशल ?"
“काकू दिसत नाहीत गं बाहेर गेल्यात का ?"
“अगं त्या स्वयंपाकाचं बघतायत. खूप दमायला होतं बघ दोघींना . बस ना तुला सरबत आणते."
सोनाली उठली, दिप्तीनं तिचा हात धरून तिला बसवलं , “सोनाली , थोडा निवांतपणा हवाच नाही का गं
सगळ्यांना ? नाहीतर आता उमेदीच्या वयात वेळ नाही आणि जेव्हा वेळ व पैसे असतील तेव्हा तब्येतीच्या तक्रारी ! मान्य आहे, नवरा बायको दोघांनी कमावल्याशिवाय घर चालणं आता अशक्य आहे, पण त्या कमावलेल्या सुखाचा उपभोग घेता यायला हवा ना ! "
“काय झालं गं दिप्ती? आज असं काय बोलतेस. "
"तूला राग नाही ना येणार मी मैत्रिण म्हणून काही सांगितलं तर."
"अगं अशी काय तू ? हक्कानं सांग , मी नाही का मला काही अडचण आली तर तुझ्याकडेच येते ."
“ म्हणजे बघ ना सोनाली , तुझी स्वतःची फर्म आहे आणि घरही तुझंच आहे ना. पण या दोन्हीत वेळेचा समतोल साधला जात नाहीये. काकूंनाही थोडा मोकळेपणा हवा ना. तूच नेहमी म्हणतेस प्रज्वलला एकटीने वाढवताना त्यांना खूप त्रास झालाय "...
दिप्ती सोनालीकडे तिच्या उत्तराच्या अपेक्षेने पाहत होती.

“खूप छान , हे काय कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आणि नरसोबाच्या वाडीचा प्रसाद आणलाय तुम्हांला .अजूनही गाभार्यातल्या मूर्ती डोळ्यांसमोर दिसतात हो शोभनाताई .उठावसंच वाटत नव्हतं मंदिरातून ."
बऱ्याच महिन्यांनी काळे काकू कुठेतरी बाहेर फिरून आल्या होत्या.
“काकू ही घ्या कॉफी, आई तुम्हालाही घ्या." दिप्तीनं जायफळ स्पेशल काॅफी दिली काकूंना आणि सासूबाईंना .
“काकू ही घ्या कॉफी, आई तुम्हालाही घ्या." दिप्तीनं जायफळ स्पेशल काॅफी दिली काकूंना आणि सासूबाईंना .
" दिप्तीच्या हाताला चव आहे हो शोभनाताई तुमच्या. अगदी पाण्याला फोडणी दिली तरी स्वादिष्ट होईल. दिप्ती, मग आज काय बेत ? " काकूंनी कॉफीचा घोट घेत विचारलं.
“आज मंगळवार, माझा उपास ना काकू आणि सगळ्यांना आवडतेही म्हणून बासुंदी पुरी, अळु वड्या अन मसालेभात." दिप्ती स्वयंपाकघरात निघाली .
तेवढ्यात काकूंनी नेहमीसारख्या टिप्स दिल्या.
“अळू वड्यांना डाळीच्या पिठाबरोबर तांदूळ पीठही घाल हं थोडं . कुरकुरीत होतात छान."
दिप्तीही हसून, “हो काकू तुम्हांला देते ना झाल्या की पाठवून. " म्हणून गेली.
दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काळेकाकू अर्णवला क्लासला सोडून थोडावेळ बसायला येतात संध्याकाळी .
दिवसभर घर सांभाळतात पण कधी थकलेल्या नसतात आणि कोणाची गाऱ्हाणी न करता चार गोष्टी चांगल्याच सांगतात.
त्यांची सून सोनाली सी.ए. आहे. तिने घर कामाला बाईही ठेवली आहे , पण घर म्हटलं की कामांचं शेपूट वाढतं राहतं ना आणि अर्णव , त्यांचा नऊ वर्षांचा नातू शाळेतून आला की त्याचं जेवण , दुपारची झोप, संध्याकाळचे क्लास, सगळं काकू बघतात.
सकाळी नऊला गेलेल्या सोनालीला संध्याकाळी सात सव्वा सात होतात घरी यायला तेव्हा दमलेला अर्णव आजीच्या मांडीवर डोकं ठेवून टीव्ही बघत झोपेला आलेला असतो.
मग सोनाली , प्रज्वल आणि काकू सगळेच दमलेले जीव जेवणं आटोपतात आणि मंडळी झोपतात पुन्हा दुसऱ्या दिवशी आपापल्या कामांवर रुजू होण्यासाठी .
सोनाली खूप समजूतदार आहे , पण अजून पूर्णपणे संसारात अडकल्यामुळे काकूंना अजिबात निवांतपणा नाही.
संध्याकाळी थोडावेळ शोभनाताईंशी गप्पा मारायला आल्या की न बोलताही काकूंच्या मनातील गोष्टी दिप्तीला कळतात.
दिप्तीचं बी.एड. झालंय. लग्नाअगोदर नोकरी करणाऱ्या तिनं लग्नानंतर मात्र स्वतःचे इंग्रजी विषयाचे क्लास घ्यायला सुरुवात केली .

मयुरचीही संमती होती. कारण अर्थार्जन , आवड आणि घरासाठी , घरातल्या माणसांसाठी देता येणारा वेळ या विचारावर त्या दोघांचे एकमत होतं.
तिच्या गरजा पूर्ण होतील एवढं उत्पन्न मिळतं तिला आणि सुरुवातीलाच सासरी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला दिप्ती आईला ठराविक रक्कम देते कारण माहेरी आई एकटीच आहे आणि घरात खर्च करून काही बाजूला ठेवते.
या सगळ्यामुळे शोभनाताईंना कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये न गुंतवल्यामुळं त्याही छान आहेत .
अधूनमधून छोट्यामोठ्या सहली , रोज सकाळ संध्याकाळ जवळच्या गणपती मंदिरात आरतीसाठी जातात . त्यामुळं मोकळ्या होतात . शिवाय दिप्तीला मदतही करतात कामांत. मग तिच्या छोट्या अमोघसाठीही तिलाही वेळ देता येतो.
आज काकू आल्या तेव्हा नेमक्या शोभनाताईंची नणंद सुषमाआत्या आल्या.

चहापाणी झाल्यावर आत्या म्हणाल्या, “दिप्ती अगं बस की जरा इथं , दमली असशील ना .सारखा हात चालूच असतो तूझा बघावं तेव्हा ."
काळेकाकूंच्या तोंडातून पटकन गेलं , “आमची सोनालीही खूप थकते हो , नोटा छापते ना ." दिप्तीला आश्चर्यचं वाटलं काकूंच्या तोंडून हे असं बोलणं ऐकून .
सोनाली पूर्णवेळ व्यवसायासाठी देते म्हणून नोटा छापते मग मी घरात राहून अर्थार्जन करते याला काहीच किंमत नाही का ? " तिला राहवलंच नाही .
“ काकू राग मानू नका माझ्या बोलण्याचा पण खरं सांगू का मीही कमावतेच , पण घरातही सुखाचे छाप उठायला हवेत हे ही तितकंच खरं ."
काकू काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या मनातही तेच होतं, ते त्यांच्या डोळ्यांत दिसत होते.
काकूंचं बोलणं आणि चेहर्यावरचे हावभाव यातला फरक स्पष्ट दिसत होता ते दिप्तीनं आणि शोभनाताईंनी ओळखलंच .
दिप्तीनं योग्य वेळ पाहून सोनालीशी बोलायचं ठरवलं. तसं तिनं सासूबाईंना सांगितलंही.
"बघ हं दिप्ती विचार करून सांग सोनालीला काय सांगायचं ते. कोणाकोणाला आवडत नाही घरगुती गोष्टींमधे बाहेरच्यांनी लक्ष घातलेलं .उगाच सोनालीला वाटायचं तिच्या सासूबाईंनी आपल्याला तिच्याबद्दल चुगली केली ."
"आई तुम्ही नका काळजी करू हो .सोनाली समजुतदार आहे खूप आणि माझी मैत्रिणही जवळची ."

सोनालीचं काम सुरू राहून काकूंना निवांतपणा मिळण्यासाठी काहीतरी सुवर्णमध्य निघेल असं तिला मनोमन वाटलं.
रविवारी दुपारी जेवणं आटोपल्यावर दिप्ती सोनालीला भेटायला गेली. “ सोनाली , आज सुट्टी काय मग स्पेशल ?"
“अगं कसली सुट्टी अन कसलं काय ? आठवड्याभराचं सामान आणायचंय , त्याचीच यादी करतीये. अधेमधे अजिबात वेळ नसतो ना गं ."
“काकू दिसत नाहीत गं बाहेर गेल्यात का ?"
“अगं त्या स्वयंपाकाचं बघतायत. खूप दमायला होतं बघ दोघींना . बस ना तुला सरबत आणते."
सोनाली उठली, दिप्तीनं तिचा हात धरून तिला बसवलं , “सोनाली , थोडा निवांतपणा हवाच नाही का गं
सगळ्यांना ? नाहीतर आता उमेदीच्या वयात वेळ नाही आणि जेव्हा वेळ व पैसे असतील तेव्हा तब्येतीच्या तक्रारी ! मान्य आहे, नवरा बायको दोघांनी कमावल्याशिवाय घर चालणं आता अशक्य आहे, पण त्या कमावलेल्या सुखाचा उपभोग घेता यायला हवा ना ! "
“काय झालं गं दिप्ती? आज असं काय बोलतेस. "
"तूला राग नाही ना येणार मी मैत्रिण म्हणून काही सांगितलं तर."
"अगं अशी काय तू ? हक्कानं सांग , मी नाही का मला काही अडचण आली तर तुझ्याकडेच येते ."
“ म्हणजे बघ ना सोनाली , तुझी स्वतःची फर्म आहे आणि घरही तुझंच आहे ना. पण या दोन्हीत वेळेचा समतोल साधला जात नाहीये. काकूंनाही थोडा मोकळेपणा हवा ना. तूच नेहमी म्हणतेस प्रज्वलला एकटीने वाढवताना त्यांना खूप त्रास झालाय "...
दिप्ती सोनालीकडे तिच्या उत्तराच्या अपेक्षेने पाहत होती.
सोनालीने तिचा हात हातात घेतला ,
“दिप्ती ,थॅंक्यु व्हेरी मच ! घरं फोडणारी खूप माणसं असतात आजूबाजूला पण मला आज खूप छान वाटतंय. माझ्या घरात सुखाचे छाप पाडण्यासाठी तळमळणारी तुझ्यासारखी मैत्रीण माझ्याकडे आहे . मी नक्कीच या दोन्हीत ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करेन, काळजी करु नकोस अजिबात."

दिप्ती गेली पण सोनालीला राहून राहून एकच प्रश्न सतावत होता ,"माझ्या कसं लक्षात आलं नाही जे दिप्तीला समजलं . खरंच मी किती स्वार्थी झाले ,आईंचा उपयोग करुन घेतीय का मी ? "
"
सोनाली अगं जेवायचं नाही का ? दिप्ती गेली का गं ?"
"हो गेली मघाशीच ."
"गुणाची आहे पोर , नाही का गं सोनाली ."
"आणि मी ?"
"असं काय विचारतेस , तु तर किती काम करतेस .मला तर तुझं नेहमीच कौतुक वाटतं ."
"पण मी तुम्हांला पुर्णपणे गुंतवून ठेवलंय ना अजुनही संसारात , माझ्यामुळं तुम्हांला कुठं जाता येत नाही सतत घरातच राहावं लागतं ."
" अगं हे काय खुळ घेतलंयस डोक्यात सोनाली ."
" खुळ नाही आई, मी माझी चुक सुधारायची ठरवलंय ."
" माझा ऑफिस टाईम थोडा कमी करुन घरातही लक्ष देता येईल अन् त्यामुळं तुम्हालाही मोकळीक मिळेल असं करता येईल. एक असिस्टेंटही बघते ऑफिसमध्ये. आई आता तुम्ही स्वत:साठी वेळ द्यायचा", सोनालीनं त्यांचा हात हातात घेतला .
त्या स्पर्शातून सासूबाईंना आनंदाची भेटच गवसली.
समाप्त
©कांचन सातपुते 'हिरण्या'