© आर्या पाटील
" कशाला मुंबईला. आपला गावच बरा आहे... उगा जगण्याची शर्यत नको.. इथे कसं मनभरून जगता येतं.. काळ्या आईची सेवा करण्यातच खरा आनंद.. तिकडे गिरणी कामगार म्हणून राबण्यापेक्षा इकडे शेतकरी राजा बनुन जमीन कसू... मला नाही बाई झेपायची मुंबई.. एवढ्या लांबचा प्रवास नाही व्हायचा माझ्याने.. रेल्वेचाही आणि जीवनाचाही.. त्यापेक्षा मला इथच राणी बनून राज्य करू द्या.."तरुणपणी आपल्या नवऱ्याकडे मागलेलं गाऱ्हाणं तिला आठवत होतं..
" व्हय महाराजा.. इथच राहू महाराजा.." म्हणत तिच्या नवर्यानेही तिची प्रेमळ मागणी पूर्ण केली होती..
किती बहरला होता गोदाक्काचा संसार.. भरल्या डोळ्यांना आज आठवणीची भरती आली होती..
'कारभारीन' म्हणून नवरा किती प्रेमाने साद घालायचा..त्याच्या बरोबरीने तिलाही शेतात राबायला आवडायचे..
बारमाही शेती करतांना शेताचा मळा हिरवागार असायचा आणि संसारात आनंदाची शेती सुखाने बहरलेली असायची.. दोन मुलं आणि हे दोघं राजाराणी.. सुखाची चौकट जणू.. गोदाक्का प्रत्येक बाबतीत चपळ होती.. आणि सगळ्यात महत्त्वाचे सुगरण होती ती...
लाल कौलांनी सजलेलं.. उतरत्या छप्पराचं कौलारू घर तिने मायेने जपलं होतं. शेणाने सारवलेल्या जमिनीचं रुपडंही नक्षीदार नजाकतीनं सजलेलं..
" अन्नपूर्णा आहेस तू.." तिचा कारभारी हाताची बोटे चाटत म्हणायचा..
नववारीचा पदर डोळ्यांवर घेत किती लाजायची ती....
गत आठवणींच्या या गर्दीत मघापासून भरून आलेले डोळे अचानक बोलके झाले.. मघापासून भावनिक झालेली ती अचानक हसली...
" ये आई, काय झालं..? का हसतेस..?" तिच्या बाजूला बसलेला तिचा मोठा मुलगा राम रागाने म्हणाला.. त्याच्या शब्दांनी तिची तंद्री तुटली.. भानावर येत ती पुन्हा बाहेर बघू लागली..
हिरवी शाल ल्यालेले रस्ते आता मागे पडू लागले होते.. सरसर वर चढवणाऱ्या आणि गिरक्या घेत खाली आणणाऱ्या डोंगररांगाही सपाट होत होत्या.. बोगद्यांना मागे टाकत रेल्वे मुंबईच्या दिशेने निघाली होती....
गोदाक्का पुन्हा कातर झाली...
आता पंचवीस वर्षांनी सारच बदललं होतं.. तिचा कारभारी तिला एकटीला सोडून मोक्षाच्या पंढरीला कायमचा निघून गेला होता.
तिनं मायेनं जपलेल्या घराचा ताबाही तिने मालकीण बनून घेतला आणि कारभारीण म्हणून मिरवणाऱ्या गोदाक्काला घरची दासी बनविली.. गोदाक्काला तिच्या आवडत्या स्वयंपाकघरात जायचीही बंदी केली होती तिने.
" फार सांभाळली आपण... आता भावोजींना घेऊ दे जबाबदारी.. सोडून या मुंबईला.." म्हणत सुनेने गोदाक्काला जबरी धक्का दिला..
मुलालाही बायकोचे म्हणणे पटले.. आईच्या मनाची पर्वा न करता भावाकडे सोडण्याचा निश्चय केला..
" अरे, पोरा.. असं नको करूस.. या उतारवयात मुंबई नाही झेपायची.. मी पडून राहिन कोपऱ्यात.. दिलं ते खाईन.. जमेल ते सगळं काम करेन.. पण नको ना मला माझ्या मातीपासून, माझ्या कारभाऱ्याच्या आठवणीपासून दूर करूस.. इथच आयुष्य गेलं आता इथच मातीत जायचं.." रडत रडत गोदाक्का म्हणाली.
पण पाषाणहृदयी त्या दोघांना गोदाक्काची दया आली नाही.. तिच्या मनाविरुद्ध तिला मुंबईला धाडण्याचा बेत आखला.
त्याने खिशातला मोबाईल काढला आणि लहान भावाला फोन केला.. समोरून लहान भावाचं संभाषण चालू होतं.. हा ही त्याला चोख प्रतिउत्तर देत होता..
बोलता बोलता तो थोडा दूर गेला.. पण हातवाऱ्यावरून आणि बदललेल्या हावभावावरून दोघांमध्ये चाललेल्या संभाषणाचा अंदाज येत होता गोदाक्काला..
" हे पैसे ठेव.. छोट्या येतोय.. माझ्या गाडीची वेळ झाली.. उशीर झाला तर चुकेल.. त्याला मी पत्ता दिलाय इथला.. इथून हलू नकोस.." तिच्या हातावर शंभर रुपयाची नोट ठेवून तो क्षणात निघून गेला.. आणि गर्दीत मिसळला..
हातातली शंभरची नोट न्याहाळत.. आपला गाठोडा खाली ठेवत.. गोदाक्का त्याच्यावर बसली... दोष द्यावा तरी कोणाला.. नशिबाला की अशी लेकरं दिली म्हणून देवाला कळत नव्हतं..
रात्रीच्या वेळी कुठे जाणार..? गावाकडचा रात्रीचा अंधारही भेदून काढणारी पन्नास वर्षांची गोदाक्का आज मात्र मुंबापुरीच्या झगमग रात्रीला घाबरली.
" आजी... मी सुधीर.. तुमचा मुलगा नाही.. सकाळी कामावर गेलो तेव्हाही इथेच होता आणि कामावरून परतलो तरी इथेच आहात.. म्हणून चौकशी करायला आलो.. कुणी आलं नाही का तुम्हांला घ्यायला..? मी सोडू का तुम्हांला.." तो माणुसकीच्या नात्याने म्हणाला.
त्याच्या बोलण्याने गोदाक्काचा धीर खचला. सगळी हकिगत त्याला सांगून ती रडू लागली.. सुधीरने तिला धीर दिला आणि तो काम करत असलेल्या वृद्धाश्रमात घेऊन गेला.. रात्री जेवणाची आणि झोपण्याची सोय करून दिली.. दोन दिवस गोदाक्काने तिथेच काढले..
सुधीरने खानावळीत स्वयंपाकीण म्हणून तिला काम पाहून दिलं आणि ओळखीच्या चाळीत घरही मिळवून दिलं.. खानावळीत तिच्या हाताची चव जादू करून गेली..
"आला आहेस तर विनामूल्य पोटभर जेवून जा.. कोणत्याच गरजूला उपाशी पाठवत नाही ही गोदाक्का.. पण आता माझ्या या स्वयंपाकघरावर मालकी नाही मिळवून द्यायची मी.. आल्या पावली परत जा.. तुमची आई हरवली मुंबईच्या गर्दीत.. आता समोर गोदाक्का आहे.. या खानावळीची अन्नपूर्णा.."गोदाक्का निर्धाराने म्हणाली आणि मागे वळली.
आज साक्षात अन्नपूर्णा पाठ फिरवून जात आहे असा भास झाला त्याला.. तिच्या पाठमोर्या आकृतीला हात जोडत त्याने सलाम केला आणि परतीचा मार्ग स्वीकारला.
©आर्या पाटील
कोकणातील त्या टुमदार गावाचा निरोप घेत कोकणराणीने स्टेशन सोडलं.. मघापासून शुन्यात नजर लावून बसलेली गोदाक्का पटकन भानावर आली.. निसर्गाच्या कुशीत वसलेलं... हिरव्या शालीनं पांघरलेलं... तिच्या असंख्य आठवणींचा ठेवा असलेलं... माहेराहून अधिक प्रिय असं तिचं ते सासर मागे पडत होतं..
गर्द निळ्या नववारीचा फुलांनी सजलेला पदर डोळ्यांना लावीत तिने अश्रू टिपले.. दोन्ही हात जोडत आयुष्यभरासाठी आपल्या गोड आठवणींना डोळ्यांत भरून घेतले..
" कशाला मुंबईला. आपला गावच बरा आहे... उगा जगण्याची शर्यत नको.. इथे कसं मनभरून जगता येतं.. काळ्या आईची सेवा करण्यातच खरा आनंद.. तिकडे गिरणी कामगार म्हणून राबण्यापेक्षा इकडे शेतकरी राजा बनुन जमीन कसू... मला नाही बाई झेपायची मुंबई.. एवढ्या लांबचा प्रवास नाही व्हायचा माझ्याने.. रेल्वेचाही आणि जीवनाचाही.. त्यापेक्षा मला इथच राणी बनून राज्य करू द्या.."तरुणपणी आपल्या नवऱ्याकडे मागलेलं गाऱ्हाणं तिला आठवत होतं..
" व्हय महाराजा.. इथच राहू महाराजा.." म्हणत तिच्या नवर्यानेही तिची प्रेमळ मागणी पूर्ण केली होती..
किती बहरला होता गोदाक्काचा संसार.. भरल्या डोळ्यांना आज आठवणीची भरती आली होती..
'कारभारीन' म्हणून नवरा किती प्रेमाने साद घालायचा..त्याच्या बरोबरीने तिलाही शेतात राबायला आवडायचे..
बारमाही शेती करतांना शेताचा मळा हिरवागार असायचा आणि संसारात आनंदाची शेती सुखाने बहरलेली असायची.. दोन मुलं आणि हे दोघं राजाराणी.. सुखाची चौकट जणू.. गोदाक्का प्रत्येक बाबतीत चपळ होती.. आणि सगळ्यात महत्त्वाचे सुगरण होती ती...
लाल कौलांनी सजलेलं.. उतरत्या छप्पराचं कौलारू घर तिने मायेने जपलं होतं. शेणाने सारवलेल्या जमिनीचं रुपडंही नक्षीदार नजाकतीनं सजलेलं..
सारवलेल्या ओल्या जमिनीवर सुंदर नक्षीकाम करायची ती.. दारी तुलसी वृंदावन नेहमीच रांगोळीनं सजलेलं असायचं.. सकाळी वासुदेवाची झोळी धान्याने भरल्याशिवाय तिची देवपूजा पूर्ण होत नसायची.. मागच्या पडवीत तिने मायेनं जपलेलं स्वयंपाकघर होतं.
एका कोपऱ्यात थोडी उंचावर सजवलेली चुल.. त्या चुलीच्या धुराला बाहेरची वाट करून देण्यासाठी बनविलेली चिमणी.. भिंतीमध्ये कोरलेली भांड्यांची मांडण... त्या मांडणीवर चकाकणारी तांब्या पितळेची भांडी..
उंचावर पिण्याचे पाणी साठविण्यासाठी असलेली ताब्यांची दुड... तिथे बाजूलाच पाण्यात उभ्या करून ठेवलेल्या मेथी, मुळा, पालक अश्या शेतातल्या भाज्या.. कोपऱ्यात नारळाचा खच... उबवणीला घातलेल्या आंब्याचा दरवळ आणि आणखे बरेच काही.. स्वच्छता हा तिच्या स्वयंपाकघराचा आरसा होता..
तिचा जीव होता स्वयंपाकघरात.. तिच्या असण्याने स्वयंपाकघर बोलकं व्हायचं.. भांड्याशी गप्पा मारत स्वयंपाक करायला तिला फार आवडे.. तिचं हक्काचं कार्यक्षेत्र होतं ते.. तिच्यासाठीच आरक्षित असलेलं..
मनातला गोडवा तिच्या हातातही उतरला होता.. सगळेच पदार्थ तिच्या हातातली चव घेऊनच ताटात उतरायचे.. भात, भाकरी, मोदक, घावणे, मऊभात, शेवया, आंबोळी, वांग्याचे भरीत, धोंडस, कुळीथ पीठी, गुळपोहे... अश्या कितीतरी पदार्थांचा सुगंध दरवळायचा तिच्या स्वयंपाकघरात..
तिचा जीव होता स्वयंपाकघरात.. तिच्या असण्याने स्वयंपाकघर बोलकं व्हायचं.. भांड्याशी गप्पा मारत स्वयंपाक करायला तिला फार आवडे.. तिचं हक्काचं कार्यक्षेत्र होतं ते.. तिच्यासाठीच आरक्षित असलेलं..
मनातला गोडवा तिच्या हातातही उतरला होता.. सगळेच पदार्थ तिच्या हातातली चव घेऊनच ताटात उतरायचे.. भात, भाकरी, मोदक, घावणे, मऊभात, शेवया, आंबोळी, वांग्याचे भरीत, धोंडस, कुळीथ पीठी, गुळपोहे... अश्या कितीतरी पदार्थांचा सुगंध दरवळायचा तिच्या स्वयंपाकघरात..
" अन्नपूर्णा आहेस तू.." तिचा कारभारी हाताची बोटे चाटत म्हणायचा..
नववारीचा पदर डोळ्यांवर घेत किती लाजायची ती....
गत आठवणींच्या या गर्दीत मघापासून भरून आलेले डोळे अचानक बोलके झाले.. मघापासून भावनिक झालेली ती अचानक हसली...
" ये आई, काय झालं..? का हसतेस..?" तिच्या बाजूला बसलेला तिचा मोठा मुलगा राम रागाने म्हणाला.. त्याच्या शब्दांनी तिची तंद्री तुटली.. भानावर येत ती पुन्हा बाहेर बघू लागली..
हिरवी शाल ल्यालेले रस्ते आता मागे पडू लागले होते.. सरसर वर चढवणाऱ्या आणि गिरक्या घेत खाली आणणाऱ्या डोंगररांगाही सपाट होत होत्या.. बोगद्यांना मागे टाकत रेल्वे मुंबईच्या दिशेने निघाली होती....
गोदाक्का पुन्हा कातर झाली...
आता पंचवीस वर्षांनी सारच बदललं होतं.. तिचा कारभारी तिला एकटीला सोडून मोक्षाच्या पंढरीला कायमचा निघून गेला होता.
मुलांची लग्नं झाली होती.. लहान मुलगा तर साहेब बनून मुंबईतच स्थायिक झाला होता.. आणि घरच्या संपत्तीवर मालकी हक्क गाजवत मोठा मुलगा आईला मी सांभाळतो म्हणून मिरवित होता.. मोठ्या मुलाची पत्नी गोदाक्काला डोळ्यात पाहत नव्हती..
" आपल्यावर म्हातारीचा भार टाकून दोघं राजाराणी मजा करतात तिकडे मुंबईला आणि मी काढते यांची उष्टी.." म्हणत मोठी सून नेहमीच गोदाक्काला दूषण द्यायची..
" आपल्यावर म्हातारीचा भार टाकून दोघं राजाराणी मजा करतात तिकडे मुंबईला आणि मी काढते यांची उष्टी.." म्हणत मोठी सून नेहमीच गोदाक्काला दूषण द्यायची..
तिनं मायेनं जपलेल्या घराचा ताबाही तिने मालकीण बनून घेतला आणि कारभारीण म्हणून मिरवणाऱ्या गोदाक्काला घरची दासी बनविली.. गोदाक्काला तिच्या आवडत्या स्वयंपाकघरात जायचीही बंदी केली होती तिने.
कष्टाचा पत्ता नव्हता.. जमिनीचा तुकडा विकून त्यावर मजा चालू होती.. लेकराच्या मायेनं जपलेली जमीन विकायला विरोध केला म्हणून दोघांनी आपला राग गोदाक्कावर काढला..
" फार सांभाळली आपण... आता भावोजींना घेऊ दे जबाबदारी.. सोडून या मुंबईला.." म्हणत सुनेने गोदाक्काला जबरी धक्का दिला..
मुलालाही बायकोचे म्हणणे पटले.. आईच्या मनाची पर्वा न करता भावाकडे सोडण्याचा निश्चय केला..
" अरे, पोरा.. असं नको करूस.. या उतारवयात मुंबई नाही झेपायची.. मी पडून राहिन कोपऱ्यात.. दिलं ते खाईन.. जमेल ते सगळं काम करेन.. पण नको ना मला माझ्या मातीपासून, माझ्या कारभाऱ्याच्या आठवणीपासून दूर करूस.. इथच आयुष्य गेलं आता इथच मातीत जायचं.." रडत रडत गोदाक्का म्हणाली.
पण पाषाणहृदयी त्या दोघांना गोदाक्काची दया आली नाही.. तिच्या मनाविरुद्ध तिला मुंबईला धाडण्याचा बेत आखला.
आठवणीसरशी गोदाक्काने बोगद्याच्या अंधारात डोळ्यांना पदर लावला..
बघता बघता मुंबापुरी जवळ येऊ लागली.... डोळ्यांना हिरवळीची सवय असलेल्या गोदाक्काला मात्र मुंबापुरीची गर्दी पाहून क्षणभर भोवळ आली.. स्टेशन आल्यानंतर मुलाच्या सूचनेनुसार आपल्या नववारीला सावरत, अडखळत ती उतरण्यासाठी उभी राहिली...
गर्दीच्या धक्क्याने तिचं कपड्याचं गाठोडं खाली पडलं.. तशी ती पटकन खाली बसली.. तोच रेल्वेही थांबली आणि तिला तुडवत लोकं खाली उतरली..मुलाने सावरत तिच्या बखोटीला धरलं आणि खाली उतरवलं..

गावी विषारी सापाला भिरकावून देणारी ती वाघीण गर्दीला मात्र चांगलीच घाबरली.. बाजूला बसलेल्या महिलेने तिची अवस्था पाहून तिला पाणी दिले.. माणुसकी अजुनही जिवंत आहे या आशेने तिला हायसं वाटलं...
थोड्याच वेळात तिचा हात घट्ट पकडत गर्दीतून वाट काढत तिचा मुलगा स्टेशनबाहेर घेऊन आला... "तू लहान असतांना मीही असाच तुझा हात धरून गर्दीपासून सांभाळायची तुला.. आज माझ्या जागी तू आहेस... मग स्पर्श का रे बदलला...?" स्वगत होत गोदाक्का त्याच्याकडे पाहत होती..
थोड्याच वेळात तिचा हात घट्ट पकडत गर्दीतून वाट काढत तिचा मुलगा स्टेशनबाहेर घेऊन आला... "तू लहान असतांना मीही असाच तुझा हात धरून गर्दीपासून सांभाळायची तुला.. आज माझ्या जागी तू आहेस... मग स्पर्श का रे बदलला...?" स्वगत होत गोदाक्का त्याच्याकडे पाहत होती..
त्याने खिशातला मोबाईल काढला आणि लहान भावाला फोन केला.. समोरून लहान भावाचं संभाषण चालू होतं.. हा ही त्याला चोख प्रतिउत्तर देत होता..
बोलता बोलता तो थोडा दूर गेला.. पण हातवाऱ्यावरून आणि बदललेल्या हावभावावरून दोघांमध्ये चाललेल्या संभाषणाचा अंदाज येत होता गोदाक्काला..
मघापासून चाललेलं भांडण काहीतरी निर्णय घेवून थांबलं असेल बहुतेक.. कारण मघापासून भांडणारा तो आता अगदी शांतपणे सगळं ऐकत होता.. थोड्याच वेळात तो तिच्या जवळ पोहचला..
" हे पैसे ठेव.. छोट्या येतोय.. माझ्या गाडीची वेळ झाली.. उशीर झाला तर चुकेल.. त्याला मी पत्ता दिलाय इथला.. इथून हलू नकोस.." तिच्या हातावर शंभर रुपयाची नोट ठेवून तो क्षणात निघून गेला.. आणि गर्दीत मिसळला..
हातातली शंभरची नोट न्याहाळत.. आपला गाठोडा खाली ठेवत.. गोदाक्का त्याच्यावर बसली... दोष द्यावा तरी कोणाला.. नशिबाला की अशी लेकरं दिली म्हणून देवाला कळत नव्हतं..
गर्दीतही ती एकटी होती.. मुंबापुरीचं राहणीमान न्याहाळत ती तिथेच बसून राहिली मुलाची वाट पाहत.. गर्दी कमी व्हायची... पुन्हा वाढायची पण गर्दीत तिला मुलाचा ओळखीचा चेहरा मात्र दिसला नाही.. बघता बघता रात्र झाली.. पण तो काही आला नाही.. गोदाक्काला कळून चुकले की तो आता कधीच येणार नाही..
रात्रीच्या वेळी कुठे जाणार..? गावाकडचा रात्रीचा अंधारही भेदून काढणारी पन्नास वर्षांची गोदाक्का आज मात्र मुंबापुरीच्या झगमग रात्रीला घाबरली.
दिवसभर काहीच खाल्लं नसल्याने पोटात कावळे ओरडू लागले.. पोटाच्या भूकेपेक्षा मनाची भूक जास्त अगदिक करत होती.. लोकांच्या नकोनको त्या नजरा पाहून जीव रडकुंडीला आला.. डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले..
तोच भरलेल्या डोळ्यांत आपल्याकडे कुणी येत असल्याची जाणीव झाली...
" लेकरा आलास का..? कधीपासून तुझी वाट पाहते.. दादा म्हणाला की तू निघाला आहेस.. मग एवढा उशीर..? सगळं ठिक आहे ना..? सूनबाई, आपली माऊ बरी आहे ना..?' डोळे पुसत गोदाक्का म्हणाली..
तोच भरलेल्या डोळ्यांत आपल्याकडे कुणी येत असल्याची जाणीव झाली...
" लेकरा आलास का..? कधीपासून तुझी वाट पाहते.. दादा म्हणाला की तू निघाला आहेस.. मग एवढा उशीर..? सगळं ठिक आहे ना..? सूनबाई, आपली माऊ बरी आहे ना..?' डोळे पुसत गोदाक्का म्हणाली..
" आजी... मी सुधीर.. तुमचा मुलगा नाही.. सकाळी कामावर गेलो तेव्हाही इथेच होता आणि कामावरून परतलो तरी इथेच आहात.. म्हणून चौकशी करायला आलो.. कुणी आलं नाही का तुम्हांला घ्यायला..? मी सोडू का तुम्हांला.." तो माणुसकीच्या नात्याने म्हणाला.
त्याच्या बोलण्याने गोदाक्काचा धीर खचला. सगळी हकिगत त्याला सांगून ती रडू लागली.. सुधीरने तिला धीर दिला आणि तो काम करत असलेल्या वृद्धाश्रमात घेऊन गेला.. रात्री जेवणाची आणि झोपण्याची सोय करून दिली.. दोन दिवस गोदाक्काने तिथेच काढले..
पण वृद्धाश्रमातील वृद्ध जोडप्यांच दु: ख तिच्याने पाहवेना.. ती स्वाभिमानी होती त्यामुळे अंगात ताकद असतांनाही आश्रितासारखं राहणं तिला आवडेना.. शेवटी सुधीरला सांगून कुठे कामाची व्यवस्था होते का..? हे पाहण्याचे ठरवले..
सुधीरने खानावळीत स्वयंपाकीण म्हणून तिला काम पाहून दिलं आणि ओळखीच्या चाळीत घरही मिळवून दिलं.. खानावळीत तिच्या हाताची चव जादू करून गेली..
घरचे डब्बे पोहचवण्यापुरतं मर्यादित असलेलं त्यांच कार्यक्षेत्र हळूहळू छोटेखानी हॉटेलपर्यंत पोहचलं.. गोदाक्काचा यात सिंहाचा वाटा होता.. तिच्या हातच्या कोकणी पदार्थांना तिथे सगळ्यात जास्त मागणी होती..
ज्या मुंबईला घाबरायची आज त्याच मुंबापुरीत ती अन्नपूर्णेचं काम करू लागली.... माणुसकी जपत तिने गोरगरिबांना मोफत अन्नछत्रही सुरु केलं.. कोकणच्या माणसाचं हळव मन होतं ते..
'गोदाक्का-मायेची सावली' म्हणून त्या हॉटेलवजा खानावळीचे नामकरण करत मालकिणीने गोदाक्काचा सन्मान केला.
मुंबईची हवा गोदाक्काला मानवली होती पण गावची ओढ कातरवेळी मनाला अस्वस्थ करायची..
दोन वर्षाचा कालावधी सरला असेल.. एके दिवशी जेवण बनवितांना एक ओळखीचा आवाज कानावर पडला.

स्वयंपाकघरातून बाहेर येत गोदाक्काने आवाजाच्या दिशेने धाव घेतली.. तोच होता तो.. तिचा मोठा मुलगा.. तिला एकटं स्टेशनवर सोडून जाणारा.. नजरानजर झाली आणि तो ओशाळला..
" आई माफ कर मला.. घरातून अन्नपूर्णेला बाहेर काढले आणि लक्ष्मी रुसली गं घरावर.. धरणीमातेला विकून मिळालेले पैसे किती पुरतील..? कसण्यापुरती जमीन शिल्लक आहे पण पैसे नाहीत.. बायकापोरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईत नोकरी मिळवायला आलो आहे.. तुझ्या खानावळीत नोकरी मिळेल तर बघ.." हात जोडत तो म्हणाला..
" आई माफ कर मला.. घरातून अन्नपूर्णेला बाहेर काढले आणि लक्ष्मी रुसली गं घरावर.. धरणीमातेला विकून मिळालेले पैसे किती पुरतील..? कसण्यापुरती जमीन शिल्लक आहे पण पैसे नाहीत.. बायकापोरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईत नोकरी मिळवायला आलो आहे.. तुझ्या खानावळीत नोकरी मिळेल तर बघ.." हात जोडत तो म्हणाला..
"आला आहेस तर विनामूल्य पोटभर जेवून जा.. कोणत्याच गरजूला उपाशी पाठवत नाही ही गोदाक्का.. पण आता माझ्या या स्वयंपाकघरावर मालकी नाही मिळवून द्यायची मी.. आल्या पावली परत जा.. तुमची आई हरवली मुंबईच्या गर्दीत.. आता समोर गोदाक्का आहे.. या खानावळीची अन्नपूर्णा.."गोदाक्का निर्धाराने म्हणाली आणि मागे वळली.
आज साक्षात अन्नपूर्णा पाठ फिरवून जात आहे असा भास झाला त्याला.. तिच्या पाठमोर्या आकृतीला हात जोडत त्याने सलाम केला आणि परतीचा मार्ग स्वीकारला.
©आर्या पाटील
सदर कथा लेखिका आर्या पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.