© सौ. प्राजक्ता पाटील
अनाथाश्रमातील वातावरण अतिशय चांगलं होतं; पण काही लोक असतात की, त्यांना मुल नसल्यामुळे मुल दत्तक घेण्याची इच्छा असते.
अनाथाश्रमातील मुलांना जेव्हा कोणी पालक मिळणार हे समजतं.. तेव्हा एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असं काहीसं होतं.
अनाथाश्रमातील मॅडम शिस्तीचे धडे देत होत्या. मुलींवर चांगले संस्कार व्हावे म्हणून सतत बालसंस्कार शिबीर आयोजित केले जायचे.
पहाटे लवकर उठून व्यायाम , आसने आणि प्रार्थना असा नित्यक्रम ठरलेला असायचा.
डॉ. परीक्षित आणि त्यांच्या पत्नी प्रिया ह्या नेहमी आश्रमात येऊन मुलींची मोफत आरोग्य तपासणी करत होते. आश्रमात दाखल झालेल्या बालिकेला कोणता आजार तर नाही ना ,याचे परीक्षण या दोघा दाम्पत्याकडून केले जात असे. आणि आजार आढळून आल्यास त्वरीत उपचार सुरू केले जात होते.
एवढं पुण्याचं काम करणाऱ्या या दाम्पत्याला मात्र कुबेर दारात पाणी भरत असले तरी संतान सुख कधीच मिळणार नव्हते हे समजल्यावर दुनियेत आपणच सर्वात गरीब आहोत की असंच वाटू लागले.
आणि योगायोगाने त्यादिवशीच त्यांना "अनाथाश्रमात एक नुकतीच जन्मलेली बालिका आली आहे आणि तिला चेक करण्यासाठी या" ही विनंती आश्रमातील मॅडमनी फोन करत केली.
दोघेही आपले दुःख बाजूला सारून त्या चिमुकलीच्या चेकअपसाठी आश्रमात गेले.
" किती गोड बाळ आहे ना!" डॉ. परीक्षित यांची पत्नी डॉ. प्रिया बाळाला आपल्या छातीशी कवटाळत म्हणाली.
" हो ना. आज हिला पाहिल्यावर सकाळपासून रिपोर्टमुळे आलेला ताण कुठल्या कुठे पळून गेला बघ." डॉ. परीक्षित डॉ. प्रियाला म्हणाले.
"मॅडम, हिचं नाव आम्ही ठेवलं तर चालेल ?" डॉ. प्रिया म्हणाली.
"हो. चालेल ना मॅडम. या आश्रमावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. हक्काने आम्ही तुम्हांला बोलवतोय म्हणजे आम्ही तुम्हांला आपलं समजतोय. आणि असं परवानगी घेऊन तुम्ही आम्हांला परकं नका." आश्रमातील मॅडम म्हणाल्या.
"तसं नाही हो मॅडम, सहज विचारलं." डॉ. प्रिया म्हणाली.
"ठरलं तर मग. या बाळाचा नामकरण सोहळा अगदी थाटामाटात साजरा करूया. आणि तोही उद्याच." डॉ. परीक्षित उत्साहाने म्हणाले.
आश्रमातील हॉल रंगीत फुलांनी सजला होता. प्रत्येक कोपरा त्या चिमुकलीला हसवत होता. अबब! केवढा मोठा हा पाळणा आणि त्याला गुंडाळलेल्या त्या पुष्पमाळा पाहून जो तो आश्चर्यचकित होत होता.
त्या पाळण्याच्या वर अडकवलेली छोटीछोटी खेळणी जणू त्या चिमुकलीचे लक्ष आपल्याकडे वेधून तिच्याशी गप्पा मारत होत्या. रंगीत फुगे हॉलभर पसरले होते.
ते मनोहर दृश्य पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. जो तो डॉक्टरांना भरभरून आशीर्वाद देत होता. जेवणातही डॉक्टरांनी पंचपक्वान्नाचा बेत ठरवला होता.
जेवणाचा खमंग सुवास तोंडाला पाणी आणत होता. आता त्या चिमकुलीचा तो कापसाप्रमाणे पिंजलेला हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस डॉ. प्रियानी घातला होता. किती सुंदर दिसत होतं ते गोडुली !
अगदी दृष्ट लागण्याइतपत सुंदर .आश्रमातील मॅडमनी त्या गोडुलीची दृष्ट काढून तिला काळा तीट लावताच त्या बाळाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली.
हातात बिंदल्या, पायात पैंजण आणि गळ्यात लॉकेट घालून डॉ. प्रियानी त्या अनाथ बालिकेला कोणत्याच नात्याची उणीव भासू दिली नव्हती. खूप छान पाळणे म्हणून झाले.
आता बाळाचं नाव ठेवण्याची वेळ आली. सर्वजण डॉ. प्रिया आणि डॉ. परीक्षित यांच्याकडे बाळाचे काय नाव ठेवणार ? या उत्सुकतेने पाहू लागले.
तोच बाळाचे नाव "परी" असे ठेवण्यात आले. घुगऱ्या वाटल्या गेल्या. "परीच्या नावाने कुर्रsss" म्हणून डॉक्टर प्रिया परीच्या कानात म्हणाल्या तशा आश्रमातील इतर सख्यानी डॉक्टर प्रिया यांच्या पाठीवर धपाधप आवाज करत पाठ थोपटली.
सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. मिष्ठान्नाचे जेवण झाले. आश्रमातील वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते. सर्वांसाठी डॉक्टर दांपत्याने भेटवस्तू आणल्या होत्या कारण हे दोघे कधीच आई-बाबा होणार नाहीत ही गोष्ट त्यांनी अजून कोणालाच सांगितली नव्हती.
डॉक्टरांची आई काहीच दिवसांची सोबती होती त्यामुळे तिची शेवटची इच्छा पूर्ण करणं अवघड असलं तरी अशक्य नव्हतं म्हणून डॉक्टर म्हणाले होते ," ही परीच आपली मुलगी असेल हिला आपण दत्तक घ्यायचे."
त्यावर डॉक्टर प्रिया यांनाही हेच योग्य वाटत होते. पण आई जिवंत असेपर्यंत मुल दत्तक घेणं शक्य नव्हतं. आपला लेक आणि सून कधीच आई-बाबा होऊ शकत नाहीत हा धक्का डॉक्टरांच्या आईला सहन झाला नसता म्हणूनच परीला घरी आणता आलं नव्हतं ही खंत डॉक्टर दांपत्याला वाटत होती.

पण म्हणून परी ह्या दोघांपासून कधीच दूर नव्हती. बाहेर एखाद्या बागेत किंवा मॉलमध्ये फिरायला जाताना दोघेही परीला सोबत घेऊनच जायचे. त्यामुळे परीची आणि त्यांची ओळख घट्ट होती पण अजून एकदाही डॉक्टरांनी परीला आपल्या घरी नेले नव्हते.
परीचं सगळं बालपण अनुभवलं होतं , प्रत्येक खास क्षण तिच्या सोबत घालवला होता. परी आता मोठी होत होती. डॉक्टरांच्या आईचा देहांत झाला. आणि आईच्या मृत्यूनंतर कराव्या लागणाऱ्या क्रियाकर्मामुळे डॉक्टर दांपत्याला आश्रमात यायला जमले नाही.
त्याकाळात परीला दत्तक घेऊन जाण्यासाठी जोडपी सतत आश्रमात येऊन भेटत होती.
परी अतिशय गोड मुलगी होती. पाहताच क्षणी सगळ्यांना आवडायची.
परी अतिशय गोड मुलगी होती. पाहताच क्षणी सगळ्यांना आवडायची.
नावाप्रमाणेच पऱ्यांच्या राज्यातून पृथ्वीवर अवतरलेली.. पण दुर्दैव की तिला जन्मल्यानंतर दोन तासातच अनाथ आश्रम मध्ये दाखल व्हावे लागले.
आज परीला घ्यायला एक जोडपे आले.
सकाळपासून परी आपल्याच विचारात मग्न होती. थोड्याच वेळात ते जोडपे आश्रमात दाखल झाले.
सकाळपासून परी आपल्याच विचारात मग्न होती. थोड्याच वेळात ते जोडपे आश्रमात दाखल झाले.
आश्रमाच्या अधीक्षक मॅडमनी परीला बोलावून घेतलं.. पेशाने वकील असलेले दोघे दिसण्यावरून तर प्रेमळ वाटत होते.
सर्व प्रोसेस पूर्ण कर त्यांनी परीला गाडीत बसायला सांगितले.. तो क्षण परीसाठी अविस्मरणीय होता.
जन्मदात्री तर परीने पाहिलीच नव्हती. आश्रमातील मॅडमचा , डॉक्टरांचा लागलेला लळा तोही देवाने जास्त दिवस उपभोगू दिला नाही. असो, असं म्हणून परी गाडीत बसली.
काही तासानंतर परीच्या नवीन आईने परीला गाडीतुन खाली उतरण्यास सांगितले.. परी ने दरवाजा उघडला; पाहते तर काय..?
काही तासानंतर परीच्या नवीन आईने परीला गाडीतुन खाली उतरण्यास सांगितले.. परी ने दरवाजा उघडला; पाहते तर काय..?
रंगबेरंगी फुलांची सुंदर बाग अंगणात जणू स्वर्गाची प्रतिकृती तयार होती आणि परी ज्या बाजूला बसलेली तिथून अगदी दरवाजापर्यंत फुलांनी सजवलेली रांगोळी म्हणजे मखमली गालीचा अंथरलेला होता..
परीने साशंक नजरेने आई-बाबांकडे पाहिलं हे सगळं आपल्यासाठीच असेल का..?
मोठ्या विश्वासाने आई बाबांनी हे सर्व तुझ्यासाठीच आहे डोळ्यांच्या भाषेतुन सांगितलं. परी त्या सोनेरी क्षणांना आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात आयुष्यभरासाठी साठवून ठेवत होती कारण हा दिवस तिच्या आयुष्यातील इतर दिवसांपेक्षा नवीन अभूतपूर्व होता..
दरवाजात उभे असलेले आजी-आजोबा, मामा- मामी काका-काकू परीच्या औक्षणासाठी उत्सुक होते.. "आजीचा प्रेमळस्पर्श " परीच्या वर्षांनुवर्षांच्या प्रतीक्षेला सत्यात उतरवत होता.
दरवाजात उभे असलेले आजी-आजोबा, मामा- मामी काका-काकू परीच्या औक्षणासाठी उत्सुक होते.. "आजीचा प्रेमळस्पर्श " परीच्या वर्षांनुवर्षांच्या प्रतीक्षेला सत्यात उतरवत होता.
कुटुंब काय असतं..? हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आपुलकीचा भाव , एकमेकांबद्दलचा आदर आणि नात्याची घट्ट वीण.. परीला इंद्रधनुष्याप्रमाणे रंगबिरंगी आयुष्यात पदार्पण केल्याची साक्ष देत होता.
परीसाठी सजवलेली खेळण्यांनी भरलेल्या खोलीतील प्रत्येक खेळणी परीला "वेलकम" म्हणत होती..
सगळीकडे परीच्या लहानपणापासूनचे फोटो चिटकवून "वेलकम परी" हा टॅग लावलेला पाहिल्यावर आश्रमातील अधीक्षकांकडून माझे लहानपणापासूनचे फोटो यासाठी मागवले हे परीच्या लक्षात आलं.
सगळीकडे परीच्या लहानपणापासूनचे फोटो चिटकवून "वेलकम परी" हा टॅग लावलेला पाहिल्यावर आश्रमातील अधीक्षकांकडून माझे लहानपणापासूनचे फोटो यासाठी मागवले हे परीच्या लक्षात आलं.
परीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले.
"काय झालं परी..? रडतेस का तू..? आवडलं नाही का तुला..?" असं जेव्हा आई-बाबांनी विचारलं तेव्हा परीने दोघांना मिठी मारली.
"काय झालं परी..? रडतेस का तू..? आवडलं नाही का तुला..?" असं जेव्हा आई-बाबांनी विचारलं तेव्हा परीने दोघांना मिठी मारली.
"सगळं मला खूप आवडलं.. तुम्ही देवाने माझ्यासाठीच बनवलेले स्पेशल आई-बाबा आहात.." या परीच्या वाक्याने आई-बाबांनाही डोळ्यात आनंदाश्रू आणायला भाग पाडले..
तू ही देवाने आमच्यासाठी बनवलेलं "स्पेशल गिफ्ट" आहेस असं म्हणून आई-बाबांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं.
इकडे डॉक्टर दाम्पत्य परीला भेटायला आश्रमात पोहोचले. परीला दत्तक म्हणून एक जोडपे घेऊन गेले हे ऐकून डॉक्टर प्रियाला चक्कर आली.

त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर समजले त्या आई होणार आहे. हा चमत्कार दोघांनाही दुनियेतील परमोच्च आनंद देऊन गेला. तो नवीन दिवस परीसाठी आणि डॉक्टर दाम्पत्यासाठी मिरॅकल ठरला.
परी सारखा आणि डॉक्टर दाम्पत्यासारखा एक नवीन दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात अवश्य यावा.
परी सारखा आणि डॉक्टर दाम्पत्यासारखा एक नवीन दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात अवश्य यावा.
© सौ. प्राजक्ता पाटील
सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.