© सायली पराड कुलकर्णी
"बाबा अरे तू तरी समजाव ना आईला! मी आता लहान बाळ आहे का रे? मलाही माझी स्पेस मिळायला हवी ना. ते काही नाही ह्या वाढदिवसाला मला माझ्या मित्रमैत्रिणींना मोठ्ठी पार्टी द्यायची आहे." ऋचाचा आवाज चढला होता.
ह्या सगळ्यावरून घरात रामायण होणार हे हेमंत जाणून होताच. पण तो काही बोलणार एव्हढयात, पूर्वजाने बोलायला सुरुवात केली.
"अगं ऋचा मी तुला ह्या आधी तरी कधी मनाई केली होती का...? तुझा वाढदिवस आहे आपण सगळे मिळून साजरा करूच की अगं. आजी आजोबा पण येणार माहिती आहे ना तुला....?
"आई यार मला असं घरी वैगरे नाही करायची बर्थडे पार्टी! मी काय आता पाच वर्षांच्या आतलं बाळ आहे का गं? मला ही पार्टी एखाद्या मस्त रुफ टॉप हॉटेलमध्ये द्यायची आहे. आणि ही पार्टी मला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करायची आहे.
"आई एकीकडे तू म्हणतेस माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझ्याशी सगळं शेअर करायचं म्हणतेस आणि आता सांगते आहे तर तुझा नकार! मला तर असं वाटतंय की तुझा माझ्यावर विश्वासचं नाहीये आई!" आता मात्र ऋचाच्या डोळ्यांत पाणी आलं.
प्रकरण वाढत चाललंय ह्याचं भान येऊन शेवटी हेमंत मध्ये पडला.
"ऐक ऋचा एवढ्या लहान गोष्टींवरून घरात वाद नकोत. तुला आणि तुझ्या मित्रमैत्रिणींना करायची आहे ना हॉटेलमध्ये पार्टी तर ठीक आहे मी देतो परवानगी पण माझीही एक अट असेल बघ म्हणजे तुला मान्य झाली तर ठरवूया..." बाबा समजूतीच्या स्वरात बोलला.
"Ok बाबा....! मला सांग कसली अट आहे तुझी?" ऋचा आता शांतपणे बोलत होती.
"अगं अट म्हणजे तुझ्या सगळ्या मित्रमंडळींना ज्यांना तू पार्टीसाठी बोलवू इच्छित आहेस ना त्यांना संध्याकाळी आधी आपल्या घरी बोलव आणि मग मी आणि पूर्वजा तुम्हाला आपल्या गाडीतुन हॉटेलपर्येंत सोडून येऊ... आणि तुमची पार्टी झाल्यावर तू मला फोन कर मग आम्ही तुम्हाला घ्यायलाही येऊ म्हणजे मग घरी येतायेता आपण तुझ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या घरी सोडत सोडत येऊ शकू...!" हेमंतच्या ह्या बोलण्याने पूर्वजाच्या चेहऱ्यावर जरा चमक आली.
"अरे त्यात काय मला मान्य आहे तुझी अट बाबा...!" असं म्हणून ऋचानेही हेमंतला घट्ट मिठी मारली. आणि आनंदाच्या भरात फुलपाखराप्रमाणे बागडत तिथून बाहेर पडली.
"पूर्वजा, अगं आता आपली लेक टिनएज म्हणजे पौगंडावस्थेच्या सुरुवातीच्या पायरीवर उभी आहे. ह्या वयात डोक्यात येणारे तडकभडक विचार, घटकेत बदलणारे मुड्स किंवा सतत लहानशा कारणावरूनही होणारी तिची चिडचिड स्वाभाविक आहे.
बघता बघता आठवडा उलटला. आज ऋचाचा वाढदिवस...!
एव्हाना एक एक करत ऋचाचे सगळे मित्रमैत्रिणी जमले. कोणी तिच्यासाठी गुलाबाचा बुके आणला होता तर कोणी सुंदर ड्रेस.... ऋचा हे सगळं बघून जाम खुश होती.
"होय...! थांब अजून एक अर्धातास वाट पाहूया नाहीतर जाता येईल तिकडे." असं म्हणून हेमंतने कॉफी संपवली. एवढ्यात त्याचा फोन वाजला.
जाताजाता एका छानश्या आईस्क्रीम शॉप जवळ गाडी थांबवून हेमंत सगळ्यांसाठी मस्त आईस्क्रीम घेऊन आला.
घरी येताच ऋचा आईबाबाला मिठी मारून thank you म्हणू लागली.
"ऋचा बाळ अगं तुझी इच्छा आणि तुझा आनंद आमच्यासाठी सगळ्यांत महत्वाचा आहे गं. फक्त आम्हाला तुझी चिंता वाटते की नकळत्या वयात चुकून पाय वेडावाकडा पडला तर अनर्थ नको व्हायला.
"आई...ssss मी तुमचा विश्वास मोडेल असं कधीच काही करणार नाही. वचन देते." म्हणत निरागस, लाघवी ऋचा आईच्या कुशीत शिरली.

बरं तरी मी म्हणते तू तुझ्या सगळ्या मित्रमंडळींना घरी बोलावं मी मस्त काहीतरी जेवायला बनवेन किंवा अगदीचं नाहीतर आपण तुमच्या आवडीचा पिझ्झा मागवू मग तर झालं?" आई समजूतीच्या स्वरात म्हणाली.
"आई यार मला असं घरी वैगरे नाही करायची बर्थडे पार्टी! मी काय आता पाच वर्षांच्या आतलं बाळ आहे का गं? मला ही पार्टी एखाद्या मस्त रुफ टॉप हॉटेलमध्ये द्यायची आहे. आणि ही पार्टी मला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करायची आहे.
घरी पार्टी ठेवलीस म्हणजे मामा आत्या काका तुम्ही आणि अगदीच राहिलं तर आजी आजोबा सगळे असताना माझे मित्रमैत्रिणी ऑकवर्ड होतात... तुला समजतं आहे ना आई... प्लिज यार..." ऋचाचा स्वर अजूनही वैतागलेला होता.
"अगं हो पण असं कसं फक्त तुम्हाला मुलामुलांना हॉटेलमध्ये पाठवू आम्ही? आत्ताशी फक्त चौदा वर्षांची आहेस तू!" पूर्वजा वैतागून बोलली.
"अगं हो पण असं कसं फक्त तुम्हाला मुलामुलांना हॉटेलमध्ये पाठवू आम्ही? आत्ताशी फक्त चौदा वर्षांची आहेस तू!" पूर्वजा वैतागून बोलली.
"आई एकीकडे तू म्हणतेस माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझ्याशी सगळं शेअर करायचं म्हणतेस आणि आता सांगते आहे तर तुझा नकार! मला तर असं वाटतंय की तुझा माझ्यावर विश्वासचं नाहीये आई!" आता मात्र ऋचाच्या डोळ्यांत पाणी आलं.
प्रकरण वाढत चाललंय ह्याचं भान येऊन शेवटी हेमंत मध्ये पडला.
"ऐक ऋचा एवढ्या लहान गोष्टींवरून घरात वाद नकोत. तुला आणि तुझ्या मित्रमैत्रिणींना करायची आहे ना हॉटेलमध्ये पार्टी तर ठीक आहे मी देतो परवानगी पण माझीही एक अट असेल बघ म्हणजे तुला मान्य झाली तर ठरवूया..." बाबा समजूतीच्या स्वरात बोलला.
आता रागावलेली ऋचा थोडी शांत झाली.
पण हेमंतच्या ह्या बोलण्याने पूर्वजाला मात्र कोड्यात पडल्यासारखं झालं. आजपर्यंत नेहमी ऋचाच्या बाबतीतीलनिर्णय दोघांनीही मिळून घेतलेले आणि आत्ता नेमकं ह्या वादाच्या प्रसंगी आपल्या मताविरुद्ध जाऊन का बरं हेमंत ऋचाला हो म्हणाला असेल हे कोडं पूर्वजाला पडलं होतं.
"Ok बाबा....! मला सांग कसली अट आहे तुझी?" ऋचा आता शांतपणे बोलत होती.
"अगं अट म्हणजे तुझ्या सगळ्या मित्रमंडळींना ज्यांना तू पार्टीसाठी बोलवू इच्छित आहेस ना त्यांना संध्याकाळी आधी आपल्या घरी बोलव आणि मग मी आणि पूर्वजा तुम्हाला आपल्या गाडीतुन हॉटेलपर्येंत सोडून येऊ... आणि तुमची पार्टी झाल्यावर तू मला फोन कर मग आम्ही तुम्हाला घ्यायलाही येऊ म्हणजे मग घरी येतायेता आपण तुझ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या घरी सोडत सोडत येऊ शकू...!" हेमंतच्या ह्या बोलण्याने पूर्वजाच्या चेहऱ्यावर जरा चमक आली.
बाबा ह्या भूमिकेत गेल्यावर आपला नवरा किती शांतपणे आणि खोल विचार करू शकतो ह्याचं तिला मनोमन आश्चर्य वाटलं.
"अरे त्यात काय मला मान्य आहे तुझी अट बाबा...!" असं म्हणून ऋचानेही हेमंतला घट्ट मिठी मारली. आणि आनंदाच्या भरात फुलपाखराप्रमाणे बागडत तिथून बाहेर पडली.
"पूर्वजा, अगं आता आपली लेक टिनएज म्हणजे पौगंडावस्थेच्या सुरुवातीच्या पायरीवर उभी आहे. ह्या वयात डोक्यात येणारे तडकभडक विचार, घटकेत बदलणारे मुड्स किंवा सतत लहानशा कारणावरूनही होणारी तिची चिडचिड स्वाभाविक आहे.
आपल्याला आता समजुतीने घ्यायला हवं. तुझं म्हणणं मी अजिबात खोडून काढत नाही. तू तुझ्या ठिकाणी अगदी योग्यचं बोलत होतीस पण आपण थोडासा तिच्याही ठिकाणी जाऊन विचार करूया.
तिला थोडस व्यक्तिस्वातंत्र्य देऊया, काही निर्णय तिच्यावर सोडुया पण हे सगळं करताना आपण तिच्यासोबत आहोत हे मात्र सतत तिला पटवून द्यायचं. म्हणजे मग पाऊल चुकीचं पडणार असेल तरी ती वेळेत सावध राहील....."
बघता बघता आठवडा उलटला. आज ऋचाचा वाढदिवस...!
सकाळ पासून तिच्या मोबाईलची रिंग वाजत होती. मित्र मैत्रिणी, आजी आजोबा आणि इतरही नातेवाईक असे बरेच फोन ऋचाला शुभेच्छा द्यायला येत होते.
पूर्वजानेही आज सकाळी छान छोले भटुरे आणि आमरसाचा बेत केला होता. जेवण उरकली. घरातल्या सगळ्यांनी मिळून ऋचासाठी आणलेला छानसा केक ऋचाने कापला.
बघता बघता संध्याकाळ झाली.
एव्हाना हेमंतही ऑफिसमधून परतला होता. खरंतर लाडक्या लेकीच्या वाढदिवशी त्याला तिच्या आणि पूर्वजाबरोबर बाहेर जेवायला जाऊन छान फॅमिली टाईम घालवावा असं मनोमन वाटत होतं. पण त्या दिवशी त्यानेचं कबूल प्रमाणे त्याला आज ऋचाला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टीला सोडणं भाग होतं.
एव्हाना एक एक करत ऋचाचे सगळे मित्रमैत्रिणी जमले. कोणी तिच्यासाठी गुलाबाचा बुके आणला होता तर कोणी सुंदर ड्रेस.... ऋचा हे सगळं बघून जाम खुश होती.
घरात थोडावेळ घालवल्यावर हेमंत आणि पूर्वजाने मुलांना हॉटेलमध्ये ड्रॉप केलं आणि ते दोघे तिथूनचं पुढे असलेल्या एका निवांत कॉफीशॉपमधे गेले.
बघता बघता तास दीड तास उलटला होता. रात्रीचे साडेनऊ वाजत आलेले... अजूनही ऋचाचा हेमंतला घेऊन जाण्यासाठी फोन आला नव्हता... एवढा वेळ शांत असलेली पूर्वजा आता मात्र थोडी भांबावून गेली.
"बराचं वेळ झाला रे अजून कसा नाही आला ऋचाचा फोन?" तिने काळजीने हेमंतला विचारलं.
"बराचं वेळ झाला रे अजून कसा नाही आला ऋचाचा फोन?" तिने काळजीने हेमंतला विचारलं.
"होय...! थांब अजून एक अर्धातास वाट पाहूया नाहीतर जाता येईल तिकडे." असं म्हणून हेमंतने कॉफी संपवली. एवढ्यात त्याचा फोन वाजला.
पलिकडून ऋचा होती. "बाबा तू आणि आई या घ्यायला" म्हणून तिने फोन ठेवला.
अन पुढच्या दहा एक मिनिटांत दोघे हॉटेलमध्ये होते.
त्यांनी पाहिलं तो ऋचा आणि तिचे सगळे मित्रमैत्रिणी तिच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी त्यांची वाट पाहत होते. केक कापल्यावर ऋचाने प्रेमाने पहिला घास आपल्या आईवडीलांना भरवला. हेमंत त्यांचं बिल द्यायला म्हणून रिसेप्शनवर गेला आणि सगळे घरी निघाले.
जाताजाता एका छानश्या आईस्क्रीम शॉप जवळ गाडी थांबवून हेमंत सगळ्यांसाठी मस्त आईस्क्रीम घेऊन आला.
मागचच्या सुखद धक्क्याने पूर्वजा तर अगदी आनंदून गेली होती. आईस्क्रीम खात खात सगळ्यांच्या गप्पाही आता छान रंगल्या.
बोलताबोलता मुलांना पार्टी मध्ये खूप धमाल आली आहे हे हेमंत आणि पूर्वजाच्या लक्षात आलं. आता एक एक जणांना घरी सोडत ते तिघे आपल्या घरी पोहोचले.
घरी येताच ऋचा आईबाबाला मिठी मारून thank you म्हणू लागली.
"ऋचा बाळ अगं तुझी इच्छा आणि तुझा आनंद आमच्यासाठी सगळ्यांत महत्वाचा आहे गं. फक्त आम्हाला तुझी चिंता वाटते की नकळत्या वयात चुकून पाय वेडावाकडा पडला तर अनर्थ नको व्हायला.
आता तू अशा वयात आहेस की काय चूक आणि काय बरोबर ह्यातला फरक अजून तुला पटकन समजत नाही. म्हणून आम्ही अस्वस्थ होतो गं..." पूर्वजाच्या डोळ्यांत पाणी दाटलं होतं.
"आई...ssss मी तुमचा विश्वास मोडेल असं कधीच काही करणार नाही. वचन देते." म्हणत निरागस, लाघवी ऋचा आईच्या कुशीत शिरली.
माय लेकीच्या गोड गुळपीठाची सुंदर छबी बाबाने अचूक कॅमेरामधे टिपली....!
© सायली पराड कुलकर्णी
© सायली पराड कुलकर्णी
सदर कथा लेखिका सायली पराड कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.