© वर्षा पाचारणे.
"ताई, आमच्या शेजारची सुखदा बाळंत झाली आहे... अंघोळ घालण्यासाठी कुणीतरी अनुभवी महिला असेल तर सांगा ना"... "अहो तिला आई वडील नाहीत आणि सासूबाई मागच्या महिन्यातच वारल्या... फार एकटी पडली आहे बिचारी... त्यात तिच्या मुलीची शाळा असल्याने फार गांगरून गेली आहे, कसं होईल या विचाराने".... शिंदे मावशींच्या बोलण्यामुळे चित्राच्या आईने चित्राला, 'जाशील का गं?', असं विचारलं... विचार करून शेवटी चित्रा बाळ बाळंतिणीला आंघोळ घालण्यासाठी तयार झाली..
शिंदे मावशींना चित्राने होकार दिल्याने आनंदाने मन भरून आलं होतं... ही बातमी त्यांनी येऊन सगळ्यात आधी सौरभला सांगितली... 'एक मोठा प्रश्न सुटला', या आनंदाने सौरभलादेखील थोडं हलकं वाटलं.. मागच्याच वर्षी शिंदे मावशींशेजारी राहायला आलेली सुखदा कधी त्यांना पोटच्या लेकीप्रमाणे वाटू लागली कळलीही नाही... कामं आटोपली की दोघी निवांत गप्पा मारायच्या एकमेकींशी... सुखदा, तिचा नवरा सौरभ, मुलगी श्रावणी आणि आता या त्रिकोणी कुटुंबाला चौकोनी बनवत जन्मलेला अर्णव...
श्रावणी छोट्या शिशु वर्गात असल्याने अभ्यासाचा काही ताण पडणार नव्हता... छोट्या अर्णवच्या येण्याने श्रावणीला हक्काचा भाऊ आणि छोटासा, कायम स्वरुपी आपल्यासोबत राहणारा फ्रेंड मिळाल्याने आनंद गगनात मावत नव्हता... ते चिमुकलं गुलाबी गालांचं गाठोडं हॉस्पिटलमधून घरी आल्यावर मात्र खरी कसरत सुरू होणार होती...
डिस्चार्ज मिळणार या खुशीत सौरभने सारं घर स्वच्छ करून सजावट करून ठेवलं होतं.. बाजूच्या मावशींना अंघोळीसाठी कुणी ओळखीत असेल, तर सांगायला सांगितलं होतं... श्रावणीदेखील आता अगदी गूड गर्ल बनली होती... आईला त्रास होणार नाही, याची काळजी घेत होती... बाळ बाळंतीण घरी आले. सौरभ आणि लेकीने दोघांचंही जंगी स्वागत केलं...
दुसऱ्या दिवशी सकाळ पासून आंघोळ घालणारी बाई येणार होती.. सकाळी साधारण साडेसात आठ वाजता दारावरची बेल वाजली.. सौरभने दार उघडताच दारात साधारण वय वर्ष ३४-३५, केसांचा छान घट्ट बांधलेला अंबोडा, मध्यम उंची, गोरा वर्ण आणि नाकी डोळी अतिशय रेखिव अशी बाई दारात उभी होती.
चहाच्या घोटा बरोबर सुरू झालेल्या गप्पांना कधी अश्रुंची सोबत मिळाली सुखदालाही कळलं नाही.. चित्राच्या शांत राहण्यामागं एवढं काही घडलं असेल', असं तिला खरंच वाटलं नव्हतं.. "चित्रा, अगं किती सारं सहन केलंस आजवर तू?... आणि हे सारं सहन करताना मनातून किती वेळा होरपळली असशील तू?"...
"ताई, एकटी बाई म्हटलं की लोकांच्या विकृत नजरा जेव्हा तिच्यावर पडतात, तेव्हा त्या नजरांना जागीच ठेचण्याची धमकदेखील ती बाळगत असते. म्हणूनच जगण्याच्या लढाईत त्याच किळसवाण्या नजरांना लेकीवर पडण्यापासून तर मी रोखू शकत नाही, पण अन्याय सहन करायचा नाही ही शिकवण मी माझ्या लेकीला लहानपणापासून दिली.

"कोण हवंय?", असं सौरभने विचारताच ,"मी बाळ बाळंतिणीला अंघोळ घालायला आले", असं तिने सांगितलं... अंघोळ घालणारी महिला साधारणपणे आजीच्या वयाची असणार असं गृहीत धरलेल्या सौरभसाठी हा मोठा धक्का होता... सौरभने तिला आत यायला सांगितले.
सुखदा नुकतीच उठून बसली होती.. सौरभ सुखदाकडे जाऊन म्हणाला ,"सुखदा, या नक्की नीट आंघोळ घालतील ना बाळाला?"... "म्हणजे... तसा अनुभव असेल ना यांना?"... सुखदा त्याच्याकडे पाहून हसली आणि बेडवरून उठली..
"अरे, आलात तुम्ही... शिंदे मावशींनी मला कालच सांगितलं होतं तुमच्याबद्दल"... असं म्हणत तिने बाळ चित्राच्या हातात दिलं... चित्राने कोमट तेलाने छान मालिश करून अंघोळ घालून ओव्याचा शेक देऊन एका सुती कपड्याने घट्ट गुंडाळून पाळण्यात ठेवले...
"आता दोन तीन तास तरी हे पिल्लू काय उठायचं नाही... ताई आता मस्त गरमागरम अळीवाची खीर पिऊन घ्या" असं म्हणत ती जायला निघाली...
"अळीवाची खीर?"... "मला नाही येत"... सुखदाने असे म्हणताच मी आज तुम्हाला करून दाखवते, मग उद्यापासून शिंदे मावशीकडून आठवणीने करून घेत जा... चांगली असती या दिवसात"... चित्राने असा म्हणताच सुखदाने सौरभला पटकन दुकानातून आळीव आणायला पाठवून चित्राकडे दिले... सुखदासाठी अळीवाची खीर करून तिला गरम गरम खायला लावून चित्रा घरी निघून गेली... सौरभ आणि सुखदा मात्र विचारात पडले... 'एवढ्या कमी वयात किती अनुभवी बाईसारखी अंघोळ घातली तिने बाळ, बाळंतिणीला'...
महिनाभर बाळाला अंघोळ घातल्यामुळे आता सुखदा आणि चित्राची चांगलीच गट्टी जमली होती.. सुखदाचा स्वभाव अगदी मन मोकळा असल्यामुळे चित्रादेखील तिला लहान बहिणीप्रमाणे सगळं मनातलं बोलून दाखवायची... एक दिवस चित्राचा पडलेला चेहरा पाहून सुखदाने चित्राला विचारलं ,
"ताई काय झालं?"... "आज नेहमी सारख्या बोलत नाही आहात तुम्ही... काही प्रॉब्लेम आहे का?"... त्यावर कसंनुसं हसत चित्रा म्हणाली ,"काही नाही, जरा डोकं दुखतंय"... पण त्यानंतरही दोन दिवस सुखदा रोज पाहत होती की, चित्राचं काहीतरी बिनसलंय..
सकाळी चित्राने बाळाला अंघोळ घालून झाल्यानंतर 'आज मात्र ताईंबरोबर बसून बोलायचेच', या विचाराने सुखदाने चहा ठेवला आणि बाळ झोपल्याबरोबर ताईंसाठी ती चहा बिस्कीट घेऊन आली...
"बसा ना ताई, आज आपण दोघी निवांत बसून चहा घेऊया"... चहाच्या घोटा बरोबर सुखदा हळूहळू चित्राच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती... "सांगा ना ताई, काय झालं?.... काही प्रॉब्लेम असेल, तर मी नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेल"... तिच्या बोलण्यातली काळजी आणि सहजता पाहून शेवटी चित्रा बोलती झाली...
"ताई ,माझं लग्न खूप कमी वयात झालं... नवरा अपघातात गेल्यानं वयाच्या २२ व्या वर्षीच विधवा झाले... नवऱ्याच्या निधनानंतर महिन्याभरात त्या धक्क्याने सासू वारली... सासरी हक्काचं असं कुणीच राहिलं नव्हतं... तेव्हापासून गावातल्या लोकांच्या वाईट नजरा पडू लागल्या.

पदरात तीन वर्षांची लेक होती... जगण्याचं मोठं संकट उभं राहीलं... माझी दशा आईला बघवत नव्हती... तिनं तडक गाव सोडून मुंबई गाठली.. आम्ही इथे चाळीत भाड्याने खोली घेतली..
त्या वेळी आईने चाळीतील बाळ-बाळंतीणला अंघोळ घालायचं काम केलं आणि मग त्यानंतर ओळखी पाळखीतून आईला अशी बर्यापैकी काम मिळत होती... सकाळचं आईचं काम झालं, कि दिवसभर आई माझ्या मुलीला सांभाळायची...
मग त्या वेळेत मी लोकांकडे जाऊन पोळ्या बनवण्याचं, जेवण बनवून देण्याचं काम करायचे... खोलीचे भाडे सुटून कसंबसं दोन वेळेला जेवायला मिळेन इतकं आमचं ठीकठाक चालू होतं..
पण प्रश्न होता तो आता मुलगी मोठी व्हायला लागली होती. तिला शाळेत घालणं गरजेचं होतं.. मग खूप विचार करून मी ज्या ताईंकडे पोळ्यांचं काम करत होते, त्यांनाच धुणेभांड्याचे काम मिळेल का?, असे विचारलं.. माझी परिस्थिती पाहून त्यांनीही मला लगेच कामावर ठेवलं..
त्या ताई सकाळीच लवकर ऑफिसला जायच्या.. त्यामुळे सकाळी लवकर स्वयंपाक करून मग त्या गेल्यानंतर मी भांडी आणि कपडे धुवायचे.

एक दिवस त्या ताईंचा नवरा नेमका घरी असल्याने त्याची नजर सतत माझ्याकडेच होती.. मला खूप विचित्र वाटू लागलं.. घरातील कामं आटोपून मी पटकन त्या दिवशी निघून गेले.
तो अनुभव माझ्यासाठी फार विचित्र असल्याने, त्यानंतर त्या ताई घरात असेपर्यंतच मी सारे काम आटोपून पटकन निघून जायचे... थोड्या दिवसांनी त्या ताई दुसरीकडे रहायला गेल्यानंतर माझे ते काम सुटले"...
"पोळ्या आणि जेवणाची इतर कामं चालूच असल्याने पैशाची फारशी चणचण नव्हती... त्यातच आईने घरातल्या घरात खाणावळ चालू केल्याने हातभारच मिळत होता..

एक दिवस असंच ओळखीतल्या एका मावशींनी बाळाला अंघोळ करण्याचे काम आहे असं सुचवलं... आईला कंबरदुखीचा त्रास सुरू झाल्याने तिने 'माझी मुलगी आली तर चालेल का', असं विचारलं.
त्या मावशींनी 'हो' म्हणून सांगताच मी दुसऱ्या दिवशीपासून बाळाला आंघोळ घालायला जाऊ लागले... एक दिवस मी बाळाला मालिश करत असताना त्या बाईचा मोठा दिर माझ्याकडे सतत पाहू लागला.
बाळाला आंघोळ घालण्यासाठी म्हणून मी माझी साडी गुडघ्यापर्यंत खोचून घेतल्याने माझ्या उघड्या पायांकडे असलेली त्याची नजर मला किळसवाणी वाटून गेली. पण कदाचित माझ्या मनाचा भ्रम असेल, असे समजत मी त्याकडे दुर्लक्ष केले.
पण दुसऱ्या दिवसापासून बाळाच्या मालिशसाठी लागणारे तेल, कपडे असं सामान मी देतो, असे सांगत तो वहिनीला मदत करतोय असं दाखवत सतत माझ्या मागे पुढे घुटमळू लागला.
मी बाळाला घेऊन उठताना माझे हातपाय तेलाने माखलेले असल्याने मला बाळ दुसऱ्या कोणाच्या तरी हातात देणे गरजेचे असायचे... त्यावेळी मुद्दाम माझ्या पायांना, हाताला स्पर्श करण्याची संधी तो साधायचा.
आता दोन दिवसांनी तसेही ते काम सुटणार असल्याने मी निर्धास्त होते.. ते काम सुटले आणि माझ्यावर पडणारी त्याची ती किळसवाणी दृष्टी देखील आयुष्यातून संपली.
'आता यापुढे कुणाच्याही घरी जाऊन काम करण्यापेक्षा घरात आईला खानावळीतच मदत करेल', असा मी मात्र त्या दिवसापासून निर्धार केला... बोल बोल म्हणता खाणावळीतील गर्दी वाढू लागली.

पण लोकांच्या बोचर्या नजरा मात्र अनेकदा घरात असूनही झेलाव्या लागत होत्या... त्यावर वाद घालायची तयारी देखील अनेकदा दाखवून निर्ढावलेल्या समाजात 'हा', नाहीतर 'तो' स्त्रीकडे वाईट नजरेने बघण्यासाठी तयारच असतो.
आजवर कितीतरी अश्या किळसवाण्या नजरा झेलत असतानाच पुन्हा एकदा शिंदे मावशींनी 'बाळाला आंघोळ घालण्यासाठी याल का?', असं विचारलं आणि मागचे दिवस आठवले... हो, नाही करता करता पैशांसाठी आज पुन्हा होकार द्यावाच लागला.
परवा दिवशी पुन्हा इथे कामावर येत असताना रस्त्यावरच्या एका इसमाने माझ्याकडे बघून किळसवाणे हावभाव करत 'मी तुला रोज कामावर जाताना बघतो', असं म्हणत मला तू आवडते असं म्हणत हद्दच गाठली.
माझ्याही संयमाची सीमा संपल्याने खाडकन त्याच्या मुस्काटात मारत मी तिथून निघून आले... त्यावर तुझ्या लेकीलाही मी ओळखतो... तुझ्या इतकीच ती पण मला आवडू शकते', असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा मात्र काळजात धस्स झालं.
'नवरा गेल्याने एकटी पडलेली मी, या नराधमांच्या नजरांना सामोरे जाताना इतकी घायाळ होत असताना माझ्या निरागस लेकराकडे कोणी वाईट नजरेने पाहात आहे', या विचाराने माझ्या डोक्यात झिणझिण्या आल्या.
मी पायातली चप्पल काढून सटासट त्याला बदडत असताना बाजूला लोकांची गर्दी झाली... काय झालं, हे कळल्यानंतर लोकांनी त्याला दम देत पोलीस स्टेशनला नेलं... कदाचित दोन दिवस तिथे राहून त्याचं डोकं टाळ्यावर येईलही किंवा आणखी खुनशी प्रवृत्तीने तो माझ्यावर दबा धरून राहील'... याच विचारात गेले तीन दिवस डोक्याचा पार भुगा झालाय.
चहाच्या घोटा बरोबर सुरू झालेल्या गप्पांना कधी अश्रुंची सोबत मिळाली सुखदालाही कळलं नाही.. चित्राच्या शांत राहण्यामागं एवढं काही घडलं असेल', असं तिला खरंच वाटलं नव्हतं.. "चित्रा, अगं किती सारं सहन केलंस आजवर तू?... आणि हे सारं सहन करताना मनातून किती वेळा होरपळली असशील तू?"...
"ताई, एकटी बाई म्हटलं की लोकांच्या विकृत नजरा जेव्हा तिच्यावर पडतात, तेव्हा त्या नजरांना जागीच ठेचण्याची धमकदेखील ती बाळगत असते. म्हणूनच जगण्याच्या लढाईत त्याच किळसवाण्या नजरांना लेकीवर पडण्यापासून तर मी रोखू शकत नाही, पण अन्याय सहन करायचा नाही ही शिकवण मी माझ्या लेकीला लहानपणापासून दिली.
आपल्या आईचा जगण्याचा संघर्ष बघत लहानाची मोठी झालेल्या माझ्या लेकीने कालच कराटेमध्ये अव्वल पदक मिळवलं.. आणि आता तिचं संरक्षण ती स्वतः करू शकते, याची मला खात्री पटली'... लेकींना कमी समजणाऱ्या या जगात, जर असं हिमतीने लढायचं बळ मिळालं, तर महिला सबलीकरणासाठी थोडातरी हातभार नक्कीच लागेल.
एवढे बोलून घरी जायला उशीर होत असल्याने चित्रा पायात वहाणा अडकवून निघून गेली... पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना एका रणरागिणीची जगण्याची लढाई किती चढ-उतारांनी भरलेली असते, हे मात्र सुखदाला जाणवलं.
'परिस्थिती गरीब असो वा श्रीमंत, स्त्री म्हणजे वासनेचे ठिकाण समजणार्या नराधमांच्या समाजात वावरताना मुलींना स्वसंरक्षणाचे धडे हे मिळायलाच हवेत', या हेतूने सुखदाने देखील दुसऱ्याच दिवशी तिच्या लेकीसाठी कराटे क्लासमध्ये ऍडमिशन घेतली.
एका सामान्य महिलेची असामान्य लढाई आज सुखदाला विचार करायला भाग पाडत होती.
वाचकहो, समाजात वावरताना अनेक विकृतींना सामोरे जाताना स्त्रीच्या मनाची होणारी होरपळ दिसली नाही, तरी ती अतिशय दाहक असते... प्रत्येक स्त्रीला मानाने, सुरक्षितपणे वावरण्यासाठी समाजात आवश्यक असणारे बदल घडण्यासाठी आणखी किती काळ जावा लागणार?', हा एक अनुत्तरित प्रश्न...

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.