© वर्षा पाचारणे
"आई, माझ्यासाठी स्थळ बघताना पुण्यातलंच बघ हा.... मला नाही पुणे सोडून बाहेर कुठे जायचे", अस्सल पुणेरी ठसक्यात कुंदाने आईला सांगितलं...
"अगं हो, पण येणारं स्थळ किमान पाहशील की नाही", असं म्हणत आईने कसंबसं तिला तयार केलं... दुपारी दोन वाजता बघण्याचा कार्यक्रम ठरला होता.

एरवी बेल बॉटम पॅन्ट, शर्ट घालणारी कुंदा आज फिकट गुलाबी रंगाची सिंथेटिक साडी, काळ्याभोर केसांच्या दोन लांबसडक वेण्या, डोळ्यात काजळ आणि केसात गजरा माळल्याने फार वेगळी दिसत होती.
आईने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत "किती गोड दिसतेस गं!", असं म्हणताच कुंदा मात्र पुन्हा एकदा डाफरली...
"आई, तू म्हणतेस म्हणून फक्तं मी हे स्थळ बघायला तयार झाले हा... नाहीतर त्या कुठल्याशा खेडेगावात मी नाही आयुष्य काढू शकत"...
"अगं हो, पण त्यांनी आधी तुला पसंत तर करू दे... नंतर मग तुझ्या फर्माईशी सोड... असं म्हणत लटक्या रागाने आईने तिला शांत केले... मोठी मुलीने पर जातीच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने कुंदासाठी आलेली स्थळं आल्या पावली परत जात होती.

जातीयवाद हा किती मोठा असू शकतो, हे खरंतर कुंदाची आई घरातल्या घरातच अनुभवत होती... कारण कुंदाच्या बाबांनी मोठ्या लेकीच्या लग्नाला चार वर्ष होऊनही तिच्याबरोबरचे असलेले नसलेले सगळे संबंध तोडून टाकले होते.
'मुलीने आपली इज्जत धुळीत मिळवली', असं म्हणत त्यांनी आता कुंदाच्या लग्नाची धावपळ करायला सुरुवात तर केली, परंतु आलेल्या स्थळाला कुंदाच्या बहिणीबद्दल कळताच समोरून काहीच निरोप येत नव्हता.
त्यामुळे इतकी देखणी, शिकलेली असूनही कुंदा बिन लग्नाची राहते की काय?, अशी काळजी आता आई-बाबांना वाटू लागली होती.
म्हणून येईल ते स्थळ जर कुंदाला पसंत पडले, तर लगेच लग्नाचा बार उडवून टाकायचा, असे त्यांनी आधीच ठरवले होते.
आज एवढ्या लांबून पाहुणेमंडळी यायचीत, म्हणून आईने छानपैकी खीरपुरीचा बेत आखला होता... मुलगा होतकरू आहे, असं मध्यस्थांकडून समजलं होतं... घरी आई आणि मुलगा दोघे जणच राहत होते.
दुपारी ठरल्याप्रमाणे दोन वाजता मुलगा आणि त्याची आई कुंदाला पाहायला आले.

मुलगा सावळ्या रंगाचा, अगदी साधा शर्ट पॅंट घालुन आलेला पाहताच कुंदाचे मात्र चेहर्यावरचे हावभाव बदलले... तिने तिच्या भावी नवऱ्याची मनात एक प्रतिमा आखून ठेवली होती... पुण्यात स्थायिक असलेला, शिकलेला, दिसायला देखणा असलेला असा मुलगा तिला नवरा म्हणून अपेक्षित होता.
स्वभावाने धडाडीची असलेली कुंदा श्रीकांतला पाहताच हिरमुसून बसली... "अगं आई, हे कुठलं ध्यान आणलं शोधून माझ्यासाठी?", असं म्हणत ती स्वयंपाक घरात दाणदाण पाया आपटत फेऱ्या मारू लागली.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर 'तुम्हाला काही बोलायचं असेल तर पाच एक मिनिट बोलून घ्या', असं म्हणत मध्यस्थांनी कुंदा आणि श्रीकांतला आतल्या खोलीत पाठवलं.

आता जो मुलगा मनातूनच पसंत नाही त्याच्याशी विनाकारण बोलण्यात वेळ कशाला घालवायचा, अशा विचारात असतानाच श्रीकांत कुंदाला म्हणाला," माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालं आहे.. पुढे वकिलीचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. गावात आमचं छोटसं किराणा मालाचे दुकान आहे. घरी आई आणि मी दोघंच असतो.
तुमच्याकडे पाहून मला नाही वाटत, की तुम्हाला मी पसंत पडेल, कारण तुम्ही दिसायला सुंदर तर आहातच, पण पूर्वीपासून पुण्यात राहिल्याने कदाचित तुमची अपेक्षाही पुण्यातल्याच मुलगा नवरा म्हणून मिळावा, अशी असावी असं वाटतंय.
खरेतर आज मी आईला त्यासाठी नकारच देणार होतो, पण मध्यस्थांनी तिला खुप भरीस घातल्याने तिचाही नाईलाज झाला, म्हणून आज आम्ही दोघं इकडे आलो.. तुम्हाला नकार द्यायचा असेल तर तुम्ही निशंकपणे माझ्याशी बोलू शकता"...
बघायला आलेला मुलगा आपल्याबरोबर एवढं स्पष्टपणे बोलेल, असं कुंदाला कधीच वाटलं नव्हतं.. दिसायला सावळा असला तरी तिला त्याचा स्पष्टवक्तेपणा भावला... केवळ दिसण्यापेक्षा आणि शहरात राहायला असावा, या अपेक्षेपेक्षा त्याचं हे वेगळेपण तिच्या मनाला भावलं.

पाहुणेमंडळी निघून गेल्यावर कुंदा या स्थळाला नकारच देणार, या विचाराने आईने त्या विषयात चर्चा करणे टाळले... पण संध्याकाळी मध्यस्थांच्या फोन येणार असल्याने उत्तर तयार ठेवणं गरजेचं होतं...
"काय मग कुंदाबाई, आता नकाराचं कारण काय कळवायचं, हे पण सांगून ठेवा", असं म्हणत आईने तिची खिल्ली उडवली... "कसा वाटला मग मुलगा.. बोल तरी.. म्हणजे मग आम्ही तसा नकार द्यायचं कारण सांगू"... असं म्हणत आईने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं
"ठीक होता की तसा... मला वाटलं होतं, तितका काही बावळट नव्हता"... आपल्या मुलीचं हे बदललेलं उत्तर पाहून आईला मनातून जरा हायसं वाटलं, पण तरीही कुंदाकडून आणखी काही जाणून घ्यावं, या हेतूने ती मुद्दाम प्रश्न विचारू लागली..
"ठीकच होता तसा... काय ते त्याचे कपडे, कोण कुठल्या गावात राहतो, आणि होतकरू असून तरी काय करायचं.. आज-काल मुलींच्या अपेक्षा किती वाढल्या आहेत त्याला कल्पना नाही काय?... या स्थळाला आपण नकारच देऊ", असं म्हणून आई स्वयंपाक घरात जाऊ लागली...
"आई, अगं विचार करायला काही हरकत नाही.. खरंच चांगला वाटला मला तो... आणि शहराचं काय थोड्या वर्षांनी त्याचंही गाव सुधारेल की"... असं म्हणत कुंदाने जवळपास लग्नासाठी होकार दर्शवला होता... पहिल्या नजरेतलं प्रेम असं काहीसं झालं होतं तिचं... तिचं लाजणं मुरडणं पाहून आईला तसा थोडाफार आधीच अंदाज आला होता... लग्नाच्या गाठी खरंच स्वर्गातच बांधलेल्या असतात असं आईला वाटून गेलं...
"मग काय, संध्याकाळी मध्यस्थांना होकार कळवू म्हणतेस".. म्हणत आई पुन्हा बाबांकडे पाहून हळूच हसली... लाजणारी कुंदा मुद्दाम लटक्या रागाने आईला म्हणाली ,"जाऊदे, तुम्ही दोघं अशी माझी टिंगल करणार असाल, तर मला लग्नच करायचं नाही"...
संध्याकाळी मध्यस्थांचा फोन आला आणि आईने होकार कळवला... पुढच्या बोलणीसाठी पुन्हा कधी भेटायचं, याची चर्चा झाली आणि लग्नाची तारीख काढून जय्यत तयारी सुरू झाली.
लग्न थाटामाटात पार पडलं. श्रीकांतच्या गावावरून फार काही वऱ्हाडी मंडळी नसल्याने पुण्यापासून गावापर्यंतचा प्रवास लोकलने करण्यात आला.

नवरा नवरीसाठी देखील विशिष्ट अशा गाडीची काही सोय करण्यात आली नव्हती.
रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर नवरा नवरीसाठी एक रिक्षा फुला फुलांनी सजवण्यात आली होती.. रिक्षा दारात पोहोचताच, आता मात्र कुंदाला पुण्याची फार आठवण येऊ लागली.
कारण आजूबाजूला सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. श्रीकांतचं घर आणि एक दोन घरे सोडली, तर बाकी सारी कुडाची घर होती... आजूबाजूच्या परिसरातील शेजारीपाजारी बायका देखील अगदीच गावंढळ दिसत होत्या.. लग्नाआधी या गोष्टीची कधीही कल्पना न आलेली कुंदा आता मात्र पुरती गोंधळून गेली होती...
दुसऱ्या दिवशी नवरा-नवरीच्या आंघोळीसाठी रीतीरिवाजाप्रमाणे अंगणात दोन पाट मांडले होते.. त्या पाटावर नवरा नवरी बरोबर आजूबाजूच्या चिल्यापिल्यांना उभे करत नवरा नवरीच्या अंगावर बाकीच्या महिला पाणी ओतत होत्या.

या सगळ्या नवीन वातावरणामुळे कुंदा मनातून धास्तावली होती... लग्ना नंतर चार पाच दिवसांनी पाहुणेरावळे देखील आपापल्या घरी निघून गेले... कुंदा देखील चार पाच दिवस माहेरी राहायला गेली..
लग्नाला स्वतःहूनच होकार दिल्यामुळे आता आई-बाबांकडे तक्रार करण्यात काहीच अर्थ नाही, हे ती जाणून होती... तरीपण तिच्या नजरेतलं दुःख मात्र आईपासून लपलं नव्हतं.

"काय गं कुंदा, काय झालं?", असं म्हणत आईने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवताच कुंदाच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं... "आई कशी राहणार आहे मी तिथे?"... "त्याच्या पाच मिनिटांच्या बोलण्यावर मी भाळले आणि त्याचं घर कसं आहे? आजूबाजूचा परिसर कसा आहे? मला इथून पुढे तिथे आयुष्य काढायचे आहे, याचा कसलाही विचार न करता मी लग्नाला होकार देऊन मोकळे झाले... आणि एरवी मला सतत समजावणारे तुम्ही देखील त्या वेळी माझ्या हट्टापायी काहीच बोलला नाही"
"अगं पण बाळा, माणसाची परिस्थिती आहे तशीच राहत नाही... आज तो खेड्यात राहतोय, पण उद्या तो वकील झाला, मिळकत वाढली की घरातल्या सोयीसुविधा देखील करूनच घेईल की... माझं लग्न झालं तेव्हा बाबांकडे तरी कुठे काय होतं... पण हळूहळू कवडी रेवडी करत एकमेकांच्या साथीने आमचा संसार सुखाचा झालाच ना".. असं म्हणत घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची ताकद आईने तिच्या शब्दातून दिली...
कुंदाला आईचे बोलणे पटत तर होते, पण पुन्हा त्याच खेड्यात जाऊन राहायचे, हे मात्र मनाला पटत नव्हते... हे लग्न म्हणजे आता कुठे तिला खऱ्या अर्थाने जगण्याची मोठी लढाई वाटू लागली होती.

कुंदा माहेराहून सासरी परतली.. सुनबाई शहरातील असल्यामुळे तिला कामाचा ताण जास्त द्यायला नको, या विचाराने सासुबाई मात्र सारं काही स्वतःच करत होत्या... लेका बरोबरच आता सुनेच्या रुपात मिळालेल्या या लेकीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना होत होतं... श्रीकांत देखील कुंदाचे सारे हट्ट, लाड पुरवत होता... हळूहळू कुंदा त्या घरात रुळू लागली...
गावातील कच्चे रस्ते, सोयी-सुविधांचा अभाव, आजारी पडलं तरीही दवाखान्याची नसलेली सोय आणि रस्त्याच्या कडेलाच हागणदारी केल्याने पसरलेली दुर्गंधी मात्र तिला आपण घेतलेला निर्णय किती चुकीचा आहे, हे सतत जाणवून देत होते.

कधीकधी या सगळ्या गोष्टींमुळे कुंदा विनाकारणच श्रीकांत बरोबर अबोला धरत होती... रात्री एकांतात रडत बसत होती... पण 'पुन्हा आईबाबांकडे जायचे म्हणजे आधीच ताईने केलेल्या चुकीची शिक्षा आजही जणूकाही आई-बाबा भोगत आहेत', हे तिने पाहिलं होतं.
रात्र-रात्र काळजीत असणारे बाबा लोकांच्या जीवघेण्या नजरांना सामोरे जाताना तीळ तीळ तुटताना तिने पाहिले होते... त्यामुळे आता 'माझे जे काही होईल ते याच गावात', या निर्धाराने तिने आपला निर्णय चुकीचा ठरू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केला.
गावाकडील लोकांची खेडवळ भाषा समजताना तिला नाकी नऊ येत होते... कुंदाचा मात्र पुणेरी ठसका अगदी जसाच्या तसा होता.. लहानपणापासूनचं अगदी शुद्ध प्रमाण मराठी भाषेतील बोलणं या खेडवळ परिसरात राहूनही बदललं नव्हतं...
अशातच कुंदाला दिवस गेले.. डिलीव्हरीसाठी माहेरी गेलेली कुंदा आता मात्र सासरच्या ओढीने पुण्यात असून देखील झुरत होती... 'आपण इथे सुखसोयींमध्ये असताना आपला नवरा आणि सासू मात्र आपल्यापासून दूर आहेत, या विचाराने तिला आता नकोसं होतं.

नऊ महिन्यानंतर तिने गोंडस मुलाला जन्म दिला... बाळाला घेऊन सासरी आल्यानंतर पूर्ण दिवस तिचा त्याचं सारं काही करण्यात जात होता... बाळाला बघण्यासाठी आता कधी पुण्यावरून मित्र-मैत्रिणी, नातेवाईक घरी यायचे, तेव्हा तिला मनातून फार वाईट वाटायचं.
आपल्या खेड्याला लोक काय म्हणतील, या विचाराने घेतलेल्या निर्णयावर आजही 'आपण चूक तर केली नाही ना?, असा विचार वारंवार तिच्या मनात डोकावून जायचा.. दोन अडीच वर्षांनी आणखी एक आनंदाची बातमी समजली आणि कुंदाला दुसरा मुलगा झाला.
मुलांची शाळा, आणि शिक्षणाचा विचार करता तिने मुलांना पुण्यात आईकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. आता मुलांपासून लांब राहताना तो विरह अनेकदा नकोसा वाटायचा... पण 'काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावं लागणार', या विचाराने तिने मनावर दगड ठेवत मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी मनातील भावनांना आवर घातला...
आजीकडे राहून मुलं चांगलीच प्रगती करत होती.. उन्हाळ्याची, दिवाळीची सुट्टी असली की मुलं गावी येत होती.. मध्येअधे श्रीकांत आणि कुंदा मुलांना भेटण्यासाठी पुण्याला जात होते.

बोल बोल म्हणता वर्ष सरली आणि लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या कुंदाच्या घरात आता आणखी दोन गृहलक्ष्मी नांदण्याची वेळ आली...
आता वधू संशोधन करण्याची वेळ आली होती.. अशातच मोठ्या मुलाने 'माझे एका मुलीवर प्रेम आहे', असे सांगताच आई-वडिलांनी स्वखुषीने होकार दिला...

कुंदाच्या मुलाचं लग्न होऊन मनीषा जाधवांची सून झाली.. वर्षभरात तिनेही गोड बातमी देताच आता घरात इतक्या वर्षांनी आनंद नांदणार होता.. अशातच एक दिवस गरोदर असताना मनीषाच्या पोटात खूप दुखायला लागलं.. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेपर्यंत मनीषाने बाळाला गमावलं.
हा धक्का पूर्ण घरासाठी फार मोठा होता... त्यानंतर मनीषा आणि तिच्या नवऱ्यामध्ये सतत छोट्या-मोठ्या गोष्टींवरून होणाऱ्या कुरबुरींचं आता मोठ्या भांडणात रूपांतर झालं होतं.. "मला इथे तुझ्या सोबत राहायचंच नाही", असं म्हणत मनीषा नवऱ्याला सोडून निघून गेली ती कायमचीच...
घटस्पोट झाल्याने मुलगा देखील एकटा-एकटा राहू लागला होता... सतत विचारत असल्याने त्याच्यावरचा मानसिक ताण वाढत चालला होता. मोठ्या मुलाचा डिव्होर्स झाल्याने धाकट्या मुलासाठी स्थळं सुचवायला साधारणपणे कुठलेही मध्यस्थ तयार नव्हते.

कुंदाला तर जणूकाही ताईने केलेल्या चुकीची शिक्षा जशी तिला मिळत होती, तसेच मोठ्या लेकाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींची शिक्षा आता धाकट्याला मिळते की काय?, अशी भीती वाटू लागली होती.
नाव नोंदणी कार्यालयात नोंदणी करूनही स्थळं मात्र घरापर्यंत येत नव्हती.. स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम राहात इतके वर्ष तडजोड करत जगलेली कुंडा आज लेकरांच्या सुखासाठी धडपडत होती... कितीही प्रयत्न केले तरी सुख मात्र ओंजळीत काही केल्या पडत नव्हतं..
अशातच नात्यातीलच एका मंडळींनी धाकट्या लेकासाठी स्थळ सुचवलं... लग्न होऊन आल्यावर सुरुवातीपासूनच आता धाकटी सूनबाई घरातलं वातावरण हसतं-खेळतं ठेवत होती..

'आता कुठे दुःखाचे डोंगर कमी झालेत', असं कुंदाला वाटून गेलं... मोठा मुलगा देखील घरातल्या आनंदी वातावरणामुळे घरच्यांमध्ये थोडा मिसळू लागला होता.. 'आता साऱ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन आपण नवरा बायकोने देखील आपलं निवांत आयुष्य जगावं', असं कुंदाला वाटू लागलं होतं...
आयुष्यभर राहून गेलेल्या गोष्टींची मात्र तिच्या मनात आता अजिबात सल उरली नव्हती कारण कुठल्याही सुखसोयींपेक्षा श्रीकांतची आयुष्यभर मिळालेली भक्कम साथ तिला पुरेशी होती.. आता कुठे आयुष्याच्या संध्याकाळी जगणं सुखद वाटू लागलं होतं...
अशातच धाकट्या सूनेची गोड बातमी समजली आणि आणि मग घर आनंदात न्हाऊन निघालं... सुनेचे किती लाड करू आणि किती नको, असं कुंदाला होत होतं.

मोठ्या सुनेच्या वेळेस बाळाच्या बाबतीत जे दुःख पदरी पडलं, तसं पुन्हा व्हायला नको, म्हणून ती जमेल तेवढी काळजी घेत होती... जशी डिलिव्हरीची तारीख जवळ आली, तशी तिने नात्यातील एका नातेवाईकाची कार आठ दिवसांसाठी मागून आणली होती... हॉस्पिटल मध्ये पोहोचायला उशीर होऊ नये, हा त्यामागचा हेतू होता.
सुनेला कळा सुरू झाल्या आणि कुंदा श्रीकांत आणि लेक तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले...
जान्हवीला कळांमुळे खूप त्रास होत होता... कुंदाने तिचा हात घट्ट हातात पकडला होता... डिलिव्हरीत समस्या वाढत असल्याने सिझर करणे गरजेचे होते..

डिलिव्हरी होऊन जान्हवीने मुलाला जन्म दिला.. पण डॉक्टर जान्हवीला मात्र वाचवू शकले नाहीत... नियतीने आणखी एक दुःखाचा डोंगर वाढून ठेवला होता.
आज ना उद्या घरात ओंजळीत मावणार नाही एवढं सुख असेल अशी आशा करणाऱ्या कुंदावर आज त्या तान्ह्या बिन आईच्या लेकराला पुन्हा एकदा तेवढ्याच मायेने, तेवढ्याच काळजीने वाढवण्याची जबाबदारी येऊन पडली होती... हसत खेळत नांदणारी गृहलक्ष्मी आज या घराला कायमचं पोरकं करून निघून गेली होती..
उभं आयुष्य आज ना उद्या दिवस पालटतील या आशेवर असताना दिवस मात्र फक्त दुखाच्या दिशेने पलटत होते... आता या लेकराला लहानाचं मोठं करताना पुन्हा एकदा तिला तिचा भूतकाळ आठवणार होता.. 'जबाबदारीतून मुक्तता' हा शब्दच कदाचित तिच्यासाठी बनला नव्हता.
फक्त या साऱ्यात श्रीकांतने दिलेली साथ मात्र लाख मोलाची होती... आणि ही साथच आजही तिच्या जगण्याच्या लढाईतलं मोठं बळ ठरली होती..
वाचकहो, हि एक सत्य घटना आहे. फक्त तिला काल्पनिकतेची जोड दिली आहे. कथेतील नायिका आज वार्धक्याच्या उंबरठ्यावर तितक्याच ताकदीने जगण्याची ही लढाई हसत मुखाने लढत आहे.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
वाचकहो, हि एक सत्य घटना आहे. फक्त तिला काल्पनिकतेची जोड दिली आहे. कथेतील नायिका आज वार्धक्याच्या उंबरठ्यावर तितक्याच ताकदीने जगण्याची ही लढाई हसत मुखाने लढत आहे.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...