© वर्षा पाचारणे.
"शांताक्का, तुझी लेक लय गुणाची बघ... तू दूधाची रतीबं टाकाया गेली, की तवापासून तुमच्या किराणामालाच्या दुकानावर बसून घर, दुकान नेटानं सांभाळती बघ"... रस्त्यात भेटलेल्या शांताक्काला आपल्या लेकीचं शेजारणी कडून होणारं कौतुक ऐकून दिवसभराच्या कामाचा शीण नाहीसा झाल्यासारखा वाटलं.
शांताक्का, तिची दोन मुलं हणम्या आणि सुभ्या, शांताक्काचा नवरा गज्या, आणि लाडाची लेक सुनंदा एवढं मोठं कुटुंब सांभाळण्यासाठी म्हणून शांताक्काने तिच्या तरुणपणात छोटसं घरातल्या घरातच किराणा मालाचं दुकान सुरू केलं.
गाव भागात राहत असल्याने लोकांना काही सामान हवं असल्यास तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं, पण शांताक्काने वाडीतल्या वाडीतच दुकान सुरू केल्याने तिच्याकडं बऱ्यापैकी शेजारपाजारची गिऱ्हाईकं वाढू लागली.
आपण घेतलेला निर्णय योग्य ठरला, या विचाराने शांताक्का त्या छोट्याशा दुकानात ढीगभर सामान विकू लागली.. वाडीतलं 'सुपर मार्केट'च म्हणा ना ते!
शांताक्काचा नवरा गज्या देखील मेहनती होता... गावच्या एका शेतातच तो मोलमजुरीनं काम करायचा... हणम्या आणि सुभ्याचं काही केल्या लग्नं ठरत नव्हतं.
शांताक्काचा नवरा गज्या देखील मेहनती होता... गावच्या एका शेतातच तो मोलमजुरीनं काम करायचा... हणम्या आणि सुभ्याचं काही केल्या लग्नं ठरत नव्हतं.
सुनंदाचे लग्न देखील तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलाशी करून कसंबसं जबाबदारीतून मोकळं होतोय, म्हणून शांताक्का आता लेकांच्या लग्नाच्या मागं लागली.
एक दिवस शेतात काम करत असताना बैलाच्या धडकेनं गज्या जबर जखमी झाला.
एक दिवस शेतात काम करत असताना बैलाच्या धडकेनं गज्या जबर जखमी झाला.
तालुक्याला जायला काहीच साधन नव्हतं... शेजारचा बजरंगा शांताक्काकडे ओरडत ही बातमी सांगत आला. खमकी असलेली शांताक्का तडक शेताकडे पोहोचली पण तोपर्यंत गजाने जीव गमावला होता... क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
म्हाताऱ्याच्या मैतीसाठी सारा गाव जमा झाला.... चाळीस पंचेचाळीस वर्षाची शांताक्का आणि गजाची सोबत आता सुटली होती... शांताक्का धाय मोकलून रडत होती.
म्हाताऱ्याच्या मैतीसाठी सारा गाव जमा झाला.... चाळीस पंचेचाळीस वर्षाची शांताक्का आणि गजाची सोबत आता सुटली होती... शांताक्का धाय मोकलून रडत होती.
रडताना आयुष्यभराचे सगळेच क्षण डोळ्यासमोरून झरझर जाताना तिची सतत बडबड सुरू होती... आजूबाजूच्या बायकांनी शांताक्काचं कुंकू पुसलं. गळ्यात असलेलं मंगळसूत्र हिसकावल्याने शांताक्काला त्या मानसिक धक्क्याने भोवळ आली.
कोणी तिच्या चेहर्यावर पाणी शिंपडून, कोणी कांदा हुंगून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला... गजाचे अंत्यसंस्कार पार पडले.
सगळं घर सुन्न झालं होतं... शांताक्काची तर जगण्याची इच्छाच मेली होती.. मृत्यूच्या आदल्या दिवशीच गज्याने शांताक्काला त्याने जमवलेले काही पैसे देऊन 'तुझ्यासाठी आपण बुगड्या खरेदी करू', असं सांगितलं होतं.
पण त्याच्या बरोबरच त्याचे ते स्वप्नंही कदाचित विलीन झालं होतं... कुठल्याही दागिन्यापेक्षा सौभाग्य हा स्त्रीसाठी सर्वात मोठा अलंकार असतो, हे शांताक्काला प्रकर्षाने जाणवून तिला हुंदके अनावर होत होते.
दशक्रिया विधी पार पडल्यानंतर पुन्हा पोटापाण्यासाठी हालचाल करणं गरजेचं होतं.
गावात नोकरीधंदा मिळणार नसल्याने लेकांनी देखील शहराकडे नोकऱ्या शोधल्या. बोल बोल म्हणता सहा महिने उलटले.
लेकीच्या लग्नानंतरचे सगळे सणवार रीतिरिवाजाप्रमाणे करूनही आणि सासरची मंडळी अगदी साधी भोळी असूनही लेकीची मात्र हाव काही केल्या सुटत नव्हती. प्रत्येक वेळी माहेरी आल्यानंतर 'आईने आपल्याला काहीतरी घेऊन द्यावं', अशी तिची अपेक्षा असायची.
हणम्या आणि सुभ्या शहरात नोकरीला लागल्याने नात्यातल्या मुलींशी त्यांची लग्न लावून देत शांताक्का आता मोकळी झाली.
हणम्या आणि सुभ्या शहरात नोकरीला लागल्याने नात्यातल्या मुलींशी त्यांची लग्न लावून देत शांताक्का आता मोकळी झाली.
'स्वतःचा सुखाचा संसार बघण्यासाठी आपल्या आईला पण कधीतरी शहरात घेऊन जावं', असं मात्र लेकांना काही केल्या वाटत नव्हतं... शांताक्का आता एवढ्या मोठ्या घरात एकटी पडली होती.
जगण्यासाठी लागणारा खर्च आजही तिचा तिलाच कमवावा लागत होता कारण लेकांनी उपकार केल्यासारखे दिलेल्या पैशावर तिला जगायचं नव्हतं.
आता 'एकटा जीव सदाशिव' असं म्हणत ती तिचे किराणा मालाचे दुकान आणि दोन गाईंचे दूध विकून येणारा पैसा यात समाधानी होती.
किराणामाल आणण्यासाठी तालुक्याला जायचं, एसटीमधून कसंबसं सामान आणायचं, गाईंची देखभाल करायची, ही सारी कामं करताना आता या वयात तिला खरंतर त्रास होत होता... पण जेव्हा मनाचा खंबीरपणा येतो, तेव्हा शारीरिक दुखणी मागे पडतात हेच खरं.
तिच्या तुटपुंज्या मिळकतीतूनही तिने दर महिन्याला एका पितळाच्या डब्यात पैसे साठवण्याचा नियम मोडला नव्हता.
तिच्या तुटपुंज्या मिळकतीतूनही तिने दर महिन्याला एका पितळाच्या डब्यात पैसे साठवण्याचा नियम मोडला नव्हता.
दिवाळी जवळ आली होती... एकटीच असल्यामुळे फराळाचे पदार्थ, पणत्या यातल्या कशाचीहि तिला आता आवड राहिली नव्हती.
वयाची साठी ओलांडलेली शांताक्का थरथरत्या पावलांनी स्वयंपाक घरात गेली. स्वतःपुरती पिठलं भाकरी करून जेवायला बसली. तितक्यात तिचं लक्ष मांडणीतला पितळ्याच्या डब्याकडे गेलं आणि तिला मागच्या दिवाळीत झालेला तमाशा आठवला.
मागच्या दिवाळीत हणम्या आणि सुभ्या दिवाळीच्या निमित्ताने आले खरे... पण जाता जाता 'घराची वाटणी कर', म्हणून तगादा लावून गेले.
"घराची वाटणीsss?".... या विचारानेही शांताक्काचे डोळे पाणावले. कवडी कवडी जमवून शांताक्काने आजवर पाटल्या बांगड्या केल्या होत्या. त्यावरही लेकांचा डोळा होता.
या सगळ्या गोष्टी आठवून शांताक्काला दिवाळी येऊच नये असं वाटू लागलं. गरमागरम असलेली पिठलं-भाकरीहि तिच्या तोंडात फिरू लागली.
ताटाला नमस्कार करून शांताक्का अर्धवट जेवणावरुन उठली आणि पैशांचा डब्बा घेऊन विचार करू लागली.
नवरा मेल्यानंतर लेकांनी पाठ फिरवल्याने आधीच शांताक्का एकटी पडली होती. 'त्यात आता घराची देखील वाटणी केली, तर हे दोघं माझ्या आयुष्यातले दिवसही वाटून घेतील.
नवरा मेल्यानंतर लेकांनी पाठ फिरवल्याने आधीच शांताक्का एकटी पडली होती. 'त्यात आता घराची देखील वाटणी केली, तर हे दोघं माझ्या आयुष्यातले दिवसही वाटून घेतील.
दोन महिने एकाकडे, दोन महिने दुसऱ्याकडे असं उपऱ्यासारखं जगणं मला कधीच जमणार नाही', असा विचार करत तिने मनाशी खूणगाठ बांधली.
शेवटपर्यंत मानानं जगायचं असेल तर न डगमगता राहता आलं पाहिजे'... नवऱ्याने बुगडी साठी दिलेले पैसे इतके वर्ष त्याच डब्यात पडून होते. त्या पैशातच अनेक वर्ष बचत करत शांताक्का देखील भर घालत होती..
शांताक्का जमवलेली रक्कम घेऊन दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी गेली. सोनाराच्या दुकानात तिने कानात बुगड्या घालून घेतल्या.
सोनाराच्या दुकानात शोकेसमध्ये लावलेली बोरमाळ पाहून तिला मोह अनावर होत होता.
"जाऊदे, मेल्यावर सगळी यांचीच धन होणार... मग मी माझी हौस आता का मारू", असं म्हणत तिने बोरमाळ खरेदी केलीच.
"जाऊदे, मेल्यावर सगळी यांचीच धन होणार... मग मी माझी हौस आता का मारू", असं म्हणत तिने बोरमाळ खरेदी केलीच.
पुन्हा तालुक्याच्या एसटीतून प्रवास करत ती वाडीत पोहोचली.
तिच्या कानातल्या बुगड्यांना असलेली झळाळी पाहून शेजारीच राहणारी कमळी म्हणाली ,"शांताक्का, नवीन केल्या काय गं बुगड्या?.. लईच भारी दिसतंय की"... असं म्हणून कमळी निघून गेली.
या वयातही कोणीतरी आपलं कौतुक केलं या विचारांनी शांताक्का मात्र घरात जाऊन हौसेने दहा मिनिटं त्या बुगड्या न्याहाळत होती.
दोन दिवसांनी दिवाळी होती.
दोन दिवसांनी दिवाळी होती.
लेकांनी पत्राने शांताक्काला 'दिवाळीसाठी येतोय', असं कळवलं होतं... सुनंदा देखील भाऊबीजेसाठी गावी येणार होती.
मुलं, नातवंड येणार म्हटल्यावर म्हातारीने अंगात असलं नसलेलं अवसान आणत फराळाच्या पदार्थांनी डबे भरून ठेवले. माळ्यावर ठेवलेली अंथरूणं शेजारच्या सख्याकडून काढून घेतली.
पहाटे लवकर उठून सगळ्या गोधड्या धुवून सुकवून नीट नेटक्या करून ठेवल्या. वयोमानाप्रमाणे झेपत नसूनही मांडणीवरची पितळेची भांडी चिंचेचा कोळ आणि लिंबाने लख्ख करून टाकली.
स्वच्छता केल्याने शरीराला आलेला थकवा मात्र लखलखीत घराकडे पाहून कुठल्या कुठे पळून गेला होता... आता फक्त लेक आणि नातवंडांची वाट पाहत बसणं एवढंच बाकी होतं.
गावात येणारी पहाटेची पहिली एसटी आली आणि लेक नातवंडांनी शांताक्काचं घर अगदी भरून गेलं... "आज्जी, आज्जी", म्हणत नातवंड मागेपुढे फिरताना शांताक्काला आज घर गोकुळासारखं भासत होतं.
गावात येणारी पहाटेची पहिली एसटी आली आणि लेक नातवंडांनी शांताक्काचं घर अगदी भरून गेलं... "आज्जी, आज्जी", म्हणत नातवंड मागेपुढे फिरताना शांताक्काला आज घर गोकुळासारखं भासत होतं.
थरथरत्या हाताने मऊ मुलायम होणारा आजीचा स्पर्श नातवंडांना देखील सुखावत होता. आजीची सुती साडी, तिचं बोलणं पडक्या दातातून तिच्या जिभेने हळूच डोकावणं, या साऱ्याची त्यांना मजा वाटत होती.
दिवाळीचे दिवस आनंदात पार पडले. भाऊबीजेला आलेली लेक देखील सार्यांची भेट झाल्याने खुशीत होती... दोन दिवसांनी सारे जण आपापल्या घरी परतीचा प्रवास करणार होते.
दिवाळीचे दिवस आनंदात पार पडले. भाऊबीजेला आलेली लेक देखील सार्यांची भेट झाल्याने खुशीत होती... दोन दिवसांनी सारे जण आपापल्या घरी परतीचा प्रवास करणार होते.
लेकरं, नातवंडं जाणार म्हणून शांताक्का गहिवरली होती. दुपारची जेवणाची तयारी झाल्याने सुनांनी जेवण वाढले... सारी मंडळी अंगतपंगत करून जेवायला बसली. तितक्यात हणम्या शांताक्काला म्हणाला,
"आई, घराची वाटणी करायची या विषयावर मागे तू काहीच बोलली नाहीस... दर वेळेस असं विषय काढायला आम्हाला पण नको वाटतं.. त्यामुळे एकदाचा काय तो निर्णय सांगून टाक"
"आई, घराची वाटणी करायची या विषयावर मागे तू काहीच बोलली नाहीस... दर वेळेस असं विषय काढायला आम्हाला पण नको वाटतं.. त्यामुळे एकदाचा काय तो निर्णय सांगून टाक"
इतके दिवस मिळालेल्या आनंदावर अचानक विरजण पडल्यासारखं शांताक्काला वाटलं.
तिचे डोळे रागाने लालबुंद झाले... "वाटणीsss?... मी जिवंत असेपर्यंत घराची वाटणी होणार नाय... हे घर मी माझ्या कष्टाने उभं केलंय... माझ्या दुःखात वाटेकरी व्हायला तुम्हाला वेळ नसतो आणि पैसाअडका दिसताच तुमच्या तोंडाला लाळ सुटती काय रेsss?", असं म्हणत शांताक्काने हणम्याकडे रागाने पाहिले.
हणम्याच्या विचारावर कधीही एकमत होत नसणारा सुभ्या मात्र या विषयात हणम्याचं म्हणणं कसं बरोबर आहे ते पटवून देऊ पाहत होता.

"आई, तो म्हणतोय ते बरोबर आहे... तुझ्या नंतर उगाच वादावादी होण्यापेक्षा आत्ता तू ठणठणीत असेपर्यंतच घराच्या वाटण्या करून टाक... जे काही सोनं असेल ते पण समान वाटून टाक... नंतर मग भाऊ भावाचा वैरी म्हणायला जग मोकळं असतं",... असं म्हणत सुभ्याने हणम्याच्या बोलण्याची री ओढली.
"अरे, लोकांनी कशाला म्हणायला पाहिजे भाऊ भावाचा वैरी झाला... इथे तर माझ्या पोटचे लेकच माझे वैरी झालेत"... असं म्हणत शांताक्का भडकली.
"आई, ते घराच्या वाटणीचे जे काही असेल ते तुमचं तुम्ही बघा... पण त्या पाटल्या, बांगड्या मात्र मलाच मिळायला पाहिजेत... आणि या वयात कशाला हवेत गं तुला दागिने?... ती गळ्यातली बोरमाळ तर अगदी लख्ख चमकतीये... एकटी म्हातारी बघून कधी कोण कसा डाव साधेल याचा पत्ताही लागायचा नाही"... "कानात बुगड्या पण नवीन दिसतायेत", असं म्हणत इतके वर्ष शांत असलेल्या लेकीने देखील आज तिचा लोभी स्वभाव दाखवला..
"पाटल्या, बांगड्या?".... " अगं, आजवर किती वेळा मी आजारी पडले म्हणून तू माझी सेवा करायला आली?... दिवाळीत मला वयोमानाप्रमाणे फराळ करणं जमणार नव्हतं म्हणून कधीतरी म्हणालीस का, की आई काही करू नको?"... तुझे सगळे सण वार, सारंकाही रीतिरिवाजाने करूनही तुझ्या सासरच्यांऐवजी तुझ्या मात्र अपेक्षा दिवसागणिक वाढत होत्या.

माझ्या नशिबाने तुझ्या सासरची लोकं साधी भोळी आणि समजूतदार मिळाली हे मी माझं भाग्य समजते... अगं सख्या आईशी असं वागतीस, पुढं जाऊन सासरी काय करशील या विचारानीच मन धास्तावतंय माझं"
"अगं, पाटल्या बांगड्या आणि बोरमाळ तुमच्यासारख्या लोभ्यांची धन होणार हाये पण मारताना गुंजभर तरी अंगावर सोनं जावं म्हणून त्या बुगड्या घालून घेतल्यात", असं शांताक्का ने म्हणताच हणम्या, सुभ्या आणि सुनंदा तिघे आवाज चढत वाटणीसाठी आरडाओरड करू लागले.
शांताक्का देखील 'वाटणी होणारच नाही', असा निर्धार करत जेवण अर्ध्यावर सोडून ती उठून गेली.
शांताक्का देखील 'वाटणी होणारच नाही', असा निर्धार करत जेवण अर्ध्यावर सोडून ती उठून गेली.
दाराबाहेरच्या पायरीवर ती नि:शब्द बसून राहिली... 'आयुष्यभर कष्ट सहन करून, उतारवयात हे भोग पदरी पडतील', असं तिला कधीही वाटलं नव्हतं.
'आपल्या लेकरांना चार घास जास्त मिळावेत', या आशेने तरूण वयापासून आजवर केलेले कष्ट तिला डोळ्यासमोर दिसत होते.
नवऱ्याला बैलाने केलेली मारहाण, त्यात जखमी होऊन त्याचा झालेला मृत्यू, मुलांची लग्न जुळावीत म्हणून केलेली वणवण, आणि आता घराच्या वाटणीसाठी हट्टाला पेटलेली मुलं.... सारं... सारंकाही तिच्या डोळ्यासमोर चक्राप्रमाणे फिरत होतं
'उद्या मी मेले, तर माझ्या हातातल्या पाटल्या, बांगड्यांसाठी एकमेकांचा जीवंही घ्यायला हे तिघं कमी करायचे नाहीत', या विचाराने तिच्या मनात भीतीने काहूर माजलं.
'उद्या मी मेले, तर माझ्या हातातल्या पाटल्या, बांगड्यांसाठी एकमेकांचा जीवंही घ्यायला हे तिघं कमी करायचे नाहीत', या विचाराने तिच्या मनात भीतीने काहूर माजलं.
घर बांधण्यासाठी केलेल्या कष्टापासून, कवडी रेवडी करत जमवलेल्या सोन्यापर्यंत सारं काही तिनं एकटीनं कमावलं होतं.
'यातलं माझ्याबरोबर काहीच येणार नाही या विचारानेच तर मी कानातल्या बुगड्या काल खरेदी केल्या... कदाचित माझ्या जगण्याच्या लढाईतली नवऱ्याने प्रेमाने दिलेली साथ आणि त्याने जमवलेल्या शेवटच्या पैशातून केलेल्या बुगड्या, हीच माझी आयुष्यभराची पुंजी असेल', या विचाराने शांताक्काने हातातल्या पाटल्या बांगड्या देवासमोर काढून ठेवल्या.
इकडे मुलांनी सामानाची बांधाबांध करत चिडून पुन्हा सकाळी शहरात निघण्याची तयारी केली... पहाटेच्या एसटीने 'पुन्हा शहरात गेल्यानंतर गावी लवकर पाऊलही ठेवणार नाही', अशी धमकी लेकांनी देताच शांताक्का देखील खवळली.
"अरे, माझ्यासाठी नाय, निदान माझ्या दागिन्यांसाठी, घराच्या वाटणीसाठी तरी तरफडताल माझ्या इथे येऊन".... "चालते व्हा घरातनं"... असा म्हणत शांताक्का गोधडी घेऊन पडून राहिली.
सकाळी लेक आणि नातवंड पुन्हा जाण्यासाठी निघाली, तरीही शांताक्काची काहीही हालचाल न झाल्याने नातवंडांनी आज्जीजवळ येऊन आवाज दिला.

भरभरून लाड करणारी आज्जी गोधडी घेऊन इतकी का शांत पडली आहे?, या विचाराने नातवंडांनी तिची गोधडी बाजूला केली... तरीदेखील आजी उठत नाही म्हणून तिला हलवून पाहता ती जरा सुद्धा हलली नाही.
तेव्हा मात्र हणम्या आणि सुभ्या घाबरले... त्यांनी जवळ जाऊन आईला हलवून पाहिले, पण शांताक्काची प्राणज्योत झोपेतच मालवली होती.
आता कितीही रडून शांताक्का परत येणार नव्हती.
शांताक्काची लेक सुनंदा दिखाव्याचे अश्रू ढाळण्याचं काम करत होती. दारात तिरडी बांधण्याचं काम सुरू असतानाच हणम्या, सुभ्या आणि सुनंदाची नजर मात्र आईच्या हातावर खिळली होती कारण आई गेलेली समजताच त्यांनी बोरमाळ तातडीने गळ्यातून काढून घेतली होती..
एकमेकांना नजरेने खुणावत त्यांनी पाटल्या, बांगड्यांचा शोध सुरू केला. म्हातारीची मैत निघाली. प्रेत सरणावर ठेवल्यावर देखील तिन्ही मुलांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होत नव्हता.
एकमेकांना नजरेने खुणावत त्यांनी पाटल्या, बांगड्यांचा शोध सुरू केला. म्हातारीची मैत निघाली. प्रेत सरणावर ठेवल्यावर देखील तिन्ही मुलांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होत नव्हता.
अजूनही मनात कुठलीही अपराधीपणाची भावना वाटत नव्हती... म्हातारीची इच्छा मात्र पूर्ण झाली होती.... तिच्या कानातल्या बुगड्यांची तिच्याबरोबरच राख झाली होती.
अंत्यसंस्कार करून मुलं घरी परतली... दहा दिवस दुखवटा पाळण्यासाठी आता गावात राहणं गरजेचंच होतं... म्हातारी मेल्यानंतर सुतक काढण्यासाठी सगळ्या घरादाराची साफसफाई करण्यात आली.
अंत्यसंस्कार करून मुलं घरी परतली... दहा दिवस दुखवटा पाळण्यासाठी आता गावात राहणं गरजेचंच होतं... म्हातारी मेल्यानंतर सुतक काढण्यासाठी सगळ्या घरादाराची साफसफाई करण्यात आली.
त्यावेळी देवघरात ठेवलेल्या पाटल्या, बांगड्या, आणि कपाटात शांताक्काने मागच्या दिवाळीतच वकिलाकडून घराच्या वाटणीचे बनवून घेतलेले कागदपत्र हाती लागले.
त्या कागदपत्रांबरोबरच त्या पिशवीत वकिलाच्या हस्ताक्षरातील एक चिट्ठी दिसली.
"माझ्या मुलांनी मेल्यानंतर एकमेकांचे वैरी बनण्यापेक्षा एकमेकांना जीव लावावा... त्यातच दागिन्यांचीही योग्य प्रकारे वाटणी करून दिली आहे... एकटं आयुष्य काढलेल्या माझ्या सारखीकडून, ढीगभर अपेक्षा करणाऱ्या लेकरांनो, मला तुमच्याकडून मात्र गुंजभर प्रेमाची अपेक्षा आहे... मी अंथरुणावर खिळल्यावर किंवा मेल्यावर 'ही चिठ्ठी' तुमच्या हाती लागंल हे मला माहीत नाही.

पण आयुष्यभराच्या जगण्याच्या लढाईत मी मात्र पोटच्या पोरांमुळे जरी हरले असले, तरी नवऱ्याने दिलेल्या शेवटच्या भेटीमुळे त्याच्या प्रेमाला सोबतच मरणाला कवटाळणार आहे"...
...तुमची आई.
आपल्या या विचित्र वागण्याचा आईला किती त्रास होत होता, याची जाणीव आज तिघांना झाली तरी त्याचा काही उपयोग नव्हता.
...तुमची आई.
आपल्या या विचित्र वागण्याचा आईला किती त्रास होत होता, याची जाणीव आज तिघांना झाली तरी त्याचा काही उपयोग नव्हता.
"म्हणजे मागच्या दिवाळीत झालेल्या भांडणानंतरच आईने वकिलाकडून ही चिठ्ठी आणि वाटणीचे कागद बनवून घेतले"... "तिच्या प्रेमाला आयुष्यभर समजू न शकलेले आपण, आयुष्याच्या परीक्षेतही नापास ठरलो आहोत".. असं म्हणत प्रत्येक जण स्वतःला दोष देत होता.
चिठ्ठी वाचून हणम्या, सुभ्या, सुनंदा तिघेही तीन कोपऱ्यांना बसून ढसाढसा रडत होते... दिवाळीत आठवण जपावी म्हणून काढलेला आईचा फोटो, आज फ्रेम बनून भिंतीवर लटकत होता... तिच्या कानातल्या बुगड्यांप्रमाणेच तिच्या चेहर्यावरचे तेज देखील तिने जगलेल्या लखलखीत आयुष्याची साक्ष देत होतं...एका सोनेरी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड विसावलं होतं.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा आणि खालील लिंकवर क्लिक करून आमच्या मजेशीर स्पर्धेत भाग घ्यायला विसरू नका.
इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻