© उज्वला सबनवीस
"नीट न घाबरता बोल तिथे , तिकीट हवं आहे न लवकरचं , प्राॅब्लेम बरोबर सांग तुझा , उत्तरं नीट दे ."जयु सफाइदारपणे कार चालवत बोलत होती.
त्या एम्बसी मधे पोचल्या . तिथे लांबच लांब रांग होती .हिच्या तळव्यांना घाम फुटायला लागला , "मला भारतात जायचं ," ती हळुच जयुला म्हणाली.
"सानु लहान मुली सारखं करु नको , त्यासाठीच आलो आहोत न आपण इथे , धीट बन".जयुने प्रेमाने तिचा हात हातात घेतला."धीट बन "हे शब्द सानिकाच्या भोवती फेर धरायला लागले. का बनले मी धीट , घाबरटच राह्यला हवं होतं .
"सानिका बाई , धीट बना , अमेरिकेत जायचं आहे न तुम्हाला , ईच्छाच आहे न तशी तुमची ". बाबांचे प्रेमळ शब्द कानावर आले , आणि तिने गोल गिरकी घेतली .
धुमधडाक्यात लग्न झालं . सोसायटीतले सगळे लोक मदतीला होतेच . सुहास , तिचा बालमित्र जो लहानपणा पासुन तिच्या बरोर होता .लहानपणीच्या भांडणात तिची बाजु हिरीरीने घ्यायचा .
सुयश अधीरतेने बेल वाजवत होता अन सानिका अंगणात हरवली होती .सुबकतेने कापलेले गवत , वेगळ्याच रंगाचे चिमुकले सुंदर सुंदर फुलांचे ताटवे , आल्हादायक वातावरण , ती गुंगुन गेली .लहान मुली सारखी हरखली आणि फुलांच्या ताटव्या जवळ पोचली सुद्धा.
"इथे तुला काही कमी पडणार नाही , आम्हाला तशीही एका मेडची गरज होतीच , ती आता तू ती पुर्ण करायची , खा पी , कामं कर , अमेरिकेत राहण्याचा आनंद घे. लग्ना आधी तुझ्या बोलण्यातुन अमेरिकेची क्रेझ जाणवलीच होती मला .
ती पाय ओढत सुयशच्या मागुन जायला लागली , तो एवढा मोठा बंगला आता तिला नकोसा झाला . एवढे कशा आपण वेंधळ्या आपला पासपोर्टही आपल्या जवळ ठेवला नाही .तिला रडायला यायला लागलं . कसं बाहेर पडायचं या मृगजळातुन , तिला सुचेना .
तेवढ्यात फोन वाजला जयुचाच होता ,"पोचले का राजाराणी " जयु हसत तिकडून विचारत होती .सुयशने तिचा हात करकचुन धरुन ठेवला , एका बाजुने ॲना उभी राह्यली , सानिकाच्या तोंडून शब्द फुटेना .
"हो हो आत्ताच पोचलो आम्ही जयु , आमच्या सानिकाबाई खुश आहेत घर बघुन , बोल ग सानु जयुशी ''. सुयश एका कसलेल्या नटा प्रमाणे ॲक्टिंग करत होता .
सानिकाने आवंढा गिळला अन कशी बशी बोलली , " मी करते जयु ताई तुला नंतर फोन '' ती एवढं एकच वाक्य बोलली . कारण तिच्या हातावरचा सुयशचा दाब वाढत होता .
सानिका धपकन पलंगावर बसली , ती बाहुली अन सुयश बाहेर निघुनही गेले. सानिकाला जोरात हुंदका फुटला , आणि ती हमसुन हमसुन रडायला लागली .
जयुने त्यांना जेवायला बोलावले . तिला वाटलं आता आपल्याला संधी मिळेल जयुताईला सांगण्याची . पण सुयशने तिला एक मिनटही एकटं सोडलं नाही , अन सुखी जोडप्याचं नाटक करुन ते घरी आले सुद्धा .
रविवार उजाडला , सानिकाने पुर्ण भारतीय सैपाक केला , आज ॲनाची लुडबुड नव्हती , तिला बरं वाटत होतं . आजची संधी वाया घालवायची नाही हे सानिका स्वता:लाच बजावत होती .
विमान लॅंड होतय ही अनाउंसमेंट झाली .
तिला एकदम दचकून जाग आली , काही क्षण आपण कुठे आहोत हेच कळेना , भिंती वेगळ्या , पडदे वेगळेच , ती सैरभैर झाली .हळुहळु पुर्ण उठून बसली , मग लक्षात आलं की आपण जयु ताई कडे आहोत.
सकाळ झालेली आहे , एक दिवस कमी झालाय , इथल्या वास्तव्यातला. तिने निश्वास सोडला ,अन उठून बेसिन जवळ गेली. तोंडावर पाण्याचे सपकारे घ्यायला लागली ,
" कितीही पाणी मारलं तरी सावळ्याची गोरी थोडी होणार आहेस तू ".कोणाचा तरी कुत्सित स्वर कानावर आला.

तिने गरकन मान वळवली , पण तिथे कोणीच नव्हतं. कसं असेल आपण तर जयु ताई कडे आहोत .तिला धीर आला एकदम. वाॅश घेउन ती किचन मधे गेली .स्वता:साठी एक कडक काॅफी बनवली आणि बाल्कनीत आली.
पूर्वेला लालबुंद सूर्य वर येत होता .आकाश पुर्ण केशरी दिसत होतं. त्या तेजोनिधीकडे ती भान हरपून बघत राह्यली. ती अशीच आहे मनस्वी. प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य शोधणारी , त्याचा आनंद घेणारी.

पक्ष्यांची लांब रांग चालली होती , कुठे चालले असतील हे , भारतात जात असतील का , मला घेउन चला असा आक्रोश तिच्या मनाने मांडला ,
"आकाशात काय बघतेस बावळटा सारखी तिथून काही खाली पडणार आहे का खायचं , नाही न , मग सैपाकाचं बघा आता ". करडा स्वर कानात घुमला .तिने कान घट्ट बंद केले .

पण बंद कानातून तो आवाज आत आत झिरपत गेला .मी जयू ताई कडे आहे , हे ती स्वता:च स्वता:ला बजावत राह्यली. आता सूर्याचे कोवळे रूप गायब झाले होते . तो प्रखर झाला होता .
माणसाचे पण असेच असते का प्रेमळ , हसरा , काळजीवाला असे रूपं एकदम गायब होउन ते एकदम कठोर , क्रूर होतात. तिच्या मनात निराशा झाकोळून आली .
अस्वस्थ वाटायला लागले एकदम. अमेरिकेत आता उन्हाळा सुरु झाला होता. त्यांचा उन्हाळा काय, काहीच दम नाही. आमच्या भारतातला बघावा उन्हाळा .
तिच्या मनात तीव्र कळ उठली . मला भारतात जायचं आहे .हे ती व्याकुळ होत मनातल्या मनात पुटपुटली. तिला कसं तरी व्हायला लागलं . आपण एकटे आहोत ही भावना मन कुरतडायला लागली .
ती अस्वस्थ होत काॅफी मग वरुन बोटं फिरवायला लागली .
"उठली का सानु " जयुचा आश्वासक स्वर कानावर आला ,तसं तिचं मन थोडं शांतावलं . ती उठली बाल्कनीतून ,अन किचन मधे आली.
"आटपा लवकर आपल्याला ईंडियन एम्बसी मधे जायचय , काय सानिका बाई जायचय न भारतात परत . "जयु हसत बोलली तसा तिच्या मनावरचा ताण हलका झाला .
"उठली का सानु " जयुचा आश्वासक स्वर कानावर आला ,तसं तिचं मन थोडं शांतावलं . ती उठली बाल्कनीतून ,अन किचन मधे आली.
"आटपा लवकर आपल्याला ईंडियन एम्बसी मधे जायचय , काय सानिका बाई जायचय न भारतात परत . "जयु हसत बोलली तसा तिच्या मनावरचा ताण हलका झाला .
"नीट न घाबरता बोल तिथे , तिकीट हवं आहे न लवकरचं , प्राॅब्लेम बरोबर सांग तुझा , उत्तरं नीट दे ."जयु सफाइदारपणे कार चालवत बोलत होती.
ती नुसतीच टकटक बाहेर बघत होती. आता तिला अमेरिकतले घरं , रस्ते काहीच आवडत नव्हतं . एक वेळ अशी होती की अमेरिका म्हटलं की तिचे मन , डोळे , चेहरा सगळं थुईथुई नाचायला लागायचं .
अमेरिकेत आपण आहोत , हे स्वप्न तर रोजच पडायचं.
त्या एम्बसी मधे पोचल्या . तिथे लांबच लांब रांग होती .हिच्या तळव्यांना घाम फुटायला लागला , "मला भारतात जायचं ," ती हळुच जयुला म्हणाली.
"सानु लहान मुली सारखं करु नको , त्यासाठीच आलो आहोत न आपण इथे , धीट बन".जयुने प्रेमाने तिचा हात हातात घेतला."धीट बन "हे शब्द सानिकाच्या भोवती फेर धरायला लागले. का बनले मी धीट , घाबरटच राह्यला हवं होतं .
"सानिका बाई , धीट बना , अमेरिकेत जायचं आहे न तुम्हाला , ईच्छाच आहे न तशी तुमची ". बाबांचे प्रेमळ शब्द कानावर आले , आणि तिने गोल गिरकी घेतली .
खरच जायला मिळेल का मला अमेरिकेत. तिला लहान पणा पासुनच अमेरिकेची क्रेझ होती. तिच्या दोन तिन मैत्रिणींचे लग्न होउन त्या नव-यां बरोबर अमेरिकेत गेल्या अन हिच्या पण मनाने घेतलं मला अमेरिकेत जायला मिळायला हवं.
अमेरिकेत राहणा-या मुलाशी माझे लग्न झाले तर काय मस्त होईल. ती दिवसा स्वप्न बघायला लागली. ती तशीच होती थोडीशी हळवी , पुस्तकी दुनियेत रमणारी , स्वप्नाळु , कवीमनाची .
आई बाबांना म्हणूनच तिची काळजी होती , हिला समजून घेणारा नवरा मिळाला की गंगेत घोडं न्हालंच समजायचं .
सानिकाचे लग्नाचे वय तसे झाले नव्हते , पण आईबाबांना घाई होती . रिटायर्डमेंटच्या आत सानुचे हात पिवळे करायचेच. मोठ्या भावाचे लग्न होउन तो सेटल होता .

सानिका शेंडेफळ , सगळ्यांची लाडकी , ती सुखात राहावी अशीच सगळ्यांची इच्छा म्हणण्या पेक्षा आग्रहच जास्त होता. तिच्या मना प्रमाणे सगळं झालं पाहिजे या विचाराने सगळे कामाला लागले. रितसर वर संशोधन सुरु झाले. आणि सानिकाला स्वप्नात अमेरिका पुन्हा दिसायला लागली.
सानिका दिसायला अतिशय सुरेख होती . थोडा सावळ्याकडे झुकणारा पण एकदम सतेज चेहरा , सरळ नाक , अन खांद्यापर्यंत कापलेले थोडेसे कुरळे केस , .सगळेच म्हणायचे सानिकाला काय , वाटेवरचा चोरही हसत घेउन जाईल.

सानिका बोलघेवडी मनमोकळी असल्याने मित्र मैत्रिणी भरपुर होते . एखाद दोन मित्र फार जवळचेही होते . पण तिचं मन मात्र कोणी मोहून घेतलं नाही . कारण ते सगळे भारतातच राहुन नोकरी करणारे होते .अन हिचं स्वप्न तर अमेरिका होतं . अन अशा योग्य वेळेसच सुयशचं स्थळ सांगून आलं.
सुयश एका नामांकीत कंपनीत अमेरिकेत सेटल होता . आई वडिलांचा एकुलता एक मुलगा , गोरापान उंचं सगळ्या दृष्टीने छान स्थळ होतं. सानिकाच्या मावशीच्या घराजवळच राह्यचे ते लोक . आणि मावशीची मुलगी जयुही अमेरिकेत होती .

त्यामुळे तिचेही लक्ष राहिल सानिका कडे या विचारांनी , आईबाबांनी हे स्थळ पाह्यचं ठरवलं .
अमेरिकेत मुलगा आहे म्हटल्यावर , सानिका तर हवेत तरंगायला लागली .वहिनीने फोटो पाह्यल्यावर हळुच म्हटलही , ''मुलगा जरा जास्तच गोरा आहे , ते लोक श्रीमंतही आहेत , झेपेल न सानु तुला , नीट विचार कर .अमेरिकेत आहे म्हणून हूरळु नकोस ." पण हे वाक्य हवेतच विरलं , कोणीही मनावर घेतलं नाही.
सानिकाला तर आता कुठलाच अडथळा नको होता . अमेरिका आणि फक्त अमेरिका हे एकच तिला दिसत होते . फोटो वरून सानिका त्याला आवडल्याचा फोन आला .

आईबाबा पण खुश झाले . वहिनीने मग आपले विचार बाजुला सारले अन तीही त्या अमेरिका उन्मादात सामील झाली, पण थोडी मना विरुद्धच.
रितसर पाहण्याचा कार्यक्रम झाला , सुयशला लग्न करुन लगेच परत जायचं होतं . त्यांचा होकार आला. यांच्या कडून तर होकार होताच . आणि सानिकाच्या कानात सनईचे मंजुळ सुर वाजायलाही लागले .

विचार करायला पण फारसा वेळ मिळाला नाही. भराभर खरेदी , सासुबाई सास-यांची कौतुकाची नजर यात सानिका न्हाउन निघत होती . महागडे दागिने , भारी साड्या यात ते सगळे दिपून जात होते .
या धबडग्यात सुयश फारसा बोलत नाही, हे आणि त्याची घारी नजर , वहिनीला बोचत होती . पण उत्साह , उन्माद एवढा होता की ते आपल्याला खटकतेय हे ही बोलायला तिला जमलं नाही , अन तिचं कोणी ऐकायला तयारही झालं नाही.
धुमधडाक्यात लग्न झालं . सोसायटीतले सगळे लोक मदतीला होतेच . सुहास , तिचा बालमित्र जो लहानपणा पासुन तिच्या बरोर होता .लहानपणीच्या भांडणात तिची बाजु हिरीरीने घ्यायचा .
अभ्यासात कायम मदत असायची त्याची . त्यांच्या फ्रेंड सर्कल मधे ,सुहासचं सानिका वरचं जीवापाड प्रेम लक्षात येत होतं. पण सानिका समजुन उमजुन दुर्लक्ष करत होती .
कारण तिचं पराकोटीचं अमेरिका आकर्षण . आणि जे सुहास कधीच पुर्ण करु शकणार नव्हता . त्यामुळेच सानिका सुहासला समजुन घेत नव्हती .
त्याची घायाळ नजर सानिकाचा पाठलाग करायची . पण तिचं कुठे लक्ष होतं . ती अमेरिकेत तिथल्या वातावरणात , बर्फवृष्टीत मनाने पोचलीही होती . आता हे सगळे भारतातले मित्र तिला अजागळ आणि गावंढळ वाटायला लागले .
लग्नानंतर आठ दिवसात सानिका आणि सुयश अमेरिकेत पोचले सुद्धा . सानिका हरखुन बाहेर बघत होती. अमेरिकेतले रस्ते , घरं बघण्यात ती एवढी मश्गुल झाली होती की आई बाबा , भारत सगळं विसरुन गेली होती.
''उतर आलय घर."तुसडा स्वर कानावर आला . ती भारवलेल्या अवस्थेत खाली उतरली. सुयश भराभर पुढे गेलाही .ही आपली मोठी बॅग सांभाळत हळुहळु पोचली .
लग्नानंतर आठ दिवसात सानिका आणि सुयश अमेरिकेत पोचले सुद्धा . सानिका हरखुन बाहेर बघत होती. अमेरिकेतले रस्ते , घरं बघण्यात ती एवढी मश्गुल झाली होती की आई बाबा , भारत सगळं विसरुन गेली होती.
''उतर आलय घर."तुसडा स्वर कानावर आला . ती भारवलेल्या अवस्थेत खाली उतरली. सुयश भराभर पुढे गेलाही .ही आपली मोठी बॅग सांभाळत हळुहळु पोचली .
सुयश अधीरतेने बेल वाजवत होता अन सानिका अंगणात हरवली होती .सुबकतेने कापलेले गवत , वेगळ्याच रंगाचे चिमुकले सुंदर सुंदर फुलांचे ताटवे , आल्हादायक वातावरण , ती गुंगुन गेली .लहान मुली सारखी हरखली आणि फुलांच्या ताटव्या जवळ पोचली सुद्धा.
आपल्याला घरात जायचय हे ही ती विसरली . भारतात नाही दिसत असली फुलं . मी काळजी घेउन हो तुमची आता , हे सगळं आता माझं आहे. अभिमानाने तिने पुर्ण घरावरुन बागे वरुन नजर फिरवली . तेंव्हा तिला जाणवलं गाडीच्या बाहेर तिच्या बॅगा तशाच पडल्या आहेत .
"चला घरात " सुयशचा अलिप्त आवाज कानावर आला , तिने भरकन बॅगा घेतल्या अन उत्सुकतेने घरात पाउल टाकलं .

मोठ्ठा हाॅल तिच्या डोळ्यातही मावत नव्हता . ते महागडं फर्निचर , ती सजावट तिचे डोळे दिपुन गेले .आईबाबा ,दादावहिनी यांना विडिओ काॅल करुन हे कधी दाखवते असं तिला वाटायला लागलं. तिचे काळेभोर टपोरे डोळे अपार उत्सूकतेने हाॅलभर फिरत होते .
हाॅलमधे तिन मोठे सोफे होते , त्यातल्या एका सोफ्यावर , गोरीपान , घट्ट कपडे घातलेले एक अमेरिकन मुलगी बसली होती .तिचे निळे डोळे हिला खाली पासून वर पर्यंत निरखत होते.
सानिका बावरली .ही कोण हा प्रश्न तिच्या चेह-यावर उमटला . तिने सुयश कडे बघितलं ,
सुयश शांतपणे चालत गेला अन त्या अमेरिकन मुलीच्या शेजारी बसला आपले हात त्याने तिच्या भोवती वेढले अन थंडपणे बोलला ," ही माझी बायको ॲना '' . सानिकाला वाटलं आपल्या कानात कोणी गरम तेल ओततय .समोर काय चाललय हे तिला कळतच नव्हतं .
"ही बायको तर मग मी कोण ''. तिने क्षीणपणे विचारलं. या क्षणी तिच्या तोंडुन एवढेच शब्द बाहेर पडले.
" माझ्या आई वडिलां साठी मी तुझ्याशी लग्न केलं , ॲनाला सुन म्हणून त्यांनी कधीच मान्य नसतं केलं , आईची हौसमौज हिच्या आईवडिलांनी काहीच केली नसती .

मी एकलुता एक असल्याने आईबाबांना दुखावु शकत नव्हतो. त्यांना तू आवडली ,मीही आवडुन घेतलं तुला .पण आपलं नातं नवरा बायकोचं राहणार नाही . तुला हे स्विकारावच लागेल. ". सुयश थंडपणे बोलत होता .
ती कचकड्याची बाहुली आपले निळे डोळे रोखुन सानिका कडे बघत होती.
"आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. हे भारतात कोणालाही सांगायचं नाहीस , याद राख , मला कळलं की तू बोललीस तिकडे कोणा जवळ , तर परिणाम वाईट होतील. तुझा पासपोर्ट माझ्या ताब्यात आहे . ''. करड्या आवाजात सुयश बोलत होता.
आता सुयश तिला अजिबात देखणा वाटत नव्हता , त्याचा गोरा रंग , घारे डोळे , या सगळ्याचीच तिला किळस यायला लागली .

इतका मोठा धोका , कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही .तिला घाम फुटला एकाकी वाटायला लागलं.
"का फसवलत तुम्ही आम्हाला , माझा काय दोष यात ''?. ती केविलवाणे पणाने म्हणाली.
सुयशने ॲनाला अजुनच जवळ ओढले अन कुत्सितपणे बोलला ,
"उगीच भावनिक ब्लॅकमेल करण्याचा जराही प्रयत्न करु नकोस , अमेरिकेत येउन मी प्रॅक्टिकली कसं जगायचं , हे निट शिकलोय . माझ्या आईवडिलांना आनंद देणं माझं कर्तव्य आहे ते , मी तुझ्याशी लग्न करुन निभावलं . तुम्हाला अमेरिकेतला जावई हवा होता , तो तूम्हाला मिळाला , विषय संपला ".
"पण मी इथे काय म्हणुन राह्यच़ , तुमची बायको , मैत्रिण , काय नातं काय आपलं ''. सानिका चाचरत बोलली.ती एवढीच बोलु शकली .

सुयश नुसताच हसला .हे सगळं होइल हे त्याला माहित होतच .त्याचं काय करायचं याची पुर्ण तयारी झाली होती .
तो उठला , तिच्या जवळ आला , तिचा थरथरणारा देह बघुन तो थोडा चलबिचल झाला , त्याला दया आली पण , तेवढ्यात , ॲना पाठी मागुन आली अन तो पुन्हा ताठरला .
तो उठला , तिच्या जवळ आला , तिचा थरथरणारा देह बघुन तो थोडा चलबिचल झाला , त्याला दया आली पण , तेवढ्यात , ॲना पाठी मागुन आली अन तो पुन्हा ताठरला .
"इथे तुला काही कमी पडणार नाही , आम्हाला तशीही एका मेडची गरज होतीच , ती आता तू ती पुर्ण करायची , खा पी , कामं कर , अमेरिकेत राहण्याचा आनंद घे. लग्ना आधी तुझ्या बोलण्यातुन अमेरिकेची क्रेझ जाणवलीच होती मला .
चल तुला तुझी खोली दाखवतो , लक्षात ठेव कोणालाही बोलशील तर , तू तुझ्या घरच्या लोकांना दिसणार पण नाहीस , जयुशी माझी ओळख आहे , तिला पण जराही या गोष्टीची जाणीव करुन दिलीस तर बघ मी तुझे काय हाल करीन ते .''सुयश एखाद्या हिंदी पिक्चर मधल्या खलनायका सारखा बोलत होता .
सानिका हबकुन गेली . आज पर्यंत ती फारच सुरक्षित वातावरणात अन अतिशय लाडाकोडात वाढली होती , असा प्रसंग आपल्यावर येइल असं तिला स्वप्नातही वाटलं नाही.
सानिका हबकुन गेली . आज पर्यंत ती फारच सुरक्षित वातावरणात अन अतिशय लाडाकोडात वाढली होती , असा प्रसंग आपल्यावर येइल असं तिला स्वप्नातही वाटलं नाही.
ती पाय ओढत सुयशच्या मागुन जायला लागली , तो एवढा मोठा बंगला आता तिला नकोसा झाला . एवढे कशा आपण वेंधळ्या आपला पासपोर्टही आपल्या जवळ ठेवला नाही .तिला रडायला यायला लागलं . कसं बाहेर पडायचं या मृगजळातुन , तिला सुचेना .
तेवढ्यात फोन वाजला जयुचाच होता ,"पोचले का राजाराणी " जयु हसत तिकडून विचारत होती .सुयशने तिचा हात करकचुन धरुन ठेवला , एका बाजुने ॲना उभी राह्यली , सानिकाच्या तोंडून शब्द फुटेना .
"हो हो आत्ताच पोचलो आम्ही जयु , आमच्या सानिकाबाई खुश आहेत घर बघुन , बोल ग सानु जयुशी ''. सुयश एका कसलेल्या नटा प्रमाणे ॲक्टिंग करत होता .
सानिकाने आवंढा गिळला अन कशी बशी बोलली , " मी करते जयु ताई तुला नंतर फोन '' ती एवढं एकच वाक्य बोलली . कारण तिच्या हातावरचा सुयशचा दाब वाढत होता .
सानिका धपकन पलंगावर बसली , ती बाहुली अन सुयश बाहेर निघुनही गेले. सानिकाला जोरात हुंदका फुटला , आणि ती हमसुन हमसुन रडायला लागली .
आपण फार मोठ्या संकटात सापडलोय याची तिला जाणीव झाली. पण यातुन बाहेर कसे पडावे हे तिला कळत नव्हते . आईबाबांना सांगितले , आणि याने आपल्याला मारुन टाकले तर ...तिच्या अंगावर काटा आला .
विचारशक्ति खुंटल्या सारखी झाली . टक्के टोणपे खायची तिला सवयच नव्हती . चांदीचा चमचा तोंडात घेउनच ती जन्माला आली होती. रडता रडता तिला कधी तरी झोप लागुन गेली.
सकाळी बाबांचा फोन आला . सुयश तिला खेटुन उभा राह्यला . तिने सगळा धीर गोळा केला , हसत हसत बाबांशी बोलली . सुयश पुर्ण वेळ तिथे उभा होता . सुयश तिचे मेसेज पण चेक करायचा . ए

क डिलीट मेसेज दिसला तसा तो बिथरला , बोल काय मेसेज केला , असं म्हणत अंगावर धाउन आला . ॲना मधे पडली आणि सानिका बचावली .
सगळ्याचीच चोरी झाली होती तिला . एका रात्रीत ती पोक्त झाली होती . अल्लड सानिका भारतातच राह्यली होती . हळु हळु ती विचार करायला लागली होती .पण मार्ग दिसत नव्हता .ती खचत चालली होती .तशीही ती फारशी धीट नव्हतीच .
सुयश जाता येता तिला टोमणे मारायचा , ॲनाची निळी नजर तिला असह्य व्हायची . भारतातुन कोणाचेही फोन आले की नाटक करणे . बस एवढच तिचं जीवन होतं.
सुयश जाता येता तिला टोमणे मारायचा , ॲनाची निळी नजर तिला असह्य व्हायची . भारतातुन कोणाचेही फोन आले की नाटक करणे . बस एवढच तिचं जीवन होतं.
जयुने त्यांना जेवायला बोलावले . तिला वाटलं आता आपल्याला संधी मिळेल जयुताईला सांगण्याची . पण सुयशने तिला एक मिनटही एकटं सोडलं नाही , अन सुखी जोडप्याचं नाटक करुन ते घरी आले सुद्धा .
ॲनाने आल्या बरोबर घारी सारखी सुयशवर झडप घातली . अन ती हताश पणे बघत राह्यली .
बाबांना फोन करायलचा हे ती ठरवायचीही पण आपला पासपोर्ट , त्याची धमकी , कुत्सित बोलणे हे सगळं आठवलं की ती पुन्हा मिटुन जायची .

सुयश मोठ्या पोस्टवर होता , त्याला घरुनच काम होतं , त्यामुळे तो आॅफिसमधे गेल्यावर संधी मिळेल ही शक्यता नव्हती . अन तशीही ॲनाची निळी नजर असायचीच तिच्या आजुबाजुला .
तिला त्या भागातलं माहितीही नव्हतं. एकटीने काही निर्णय तिने कधी घेतलेच नव्हते . तिचं जग फार छोटं होतं .
काय करावं , कसं करावं तिला कळत नव्हतं . नुसता विचार करुन होणार नाही , हे तिला समजत होतं , पण ती हतबल होती .
जयुचा , घर बघायला येते म्हणुन फोन आला , सुयश नेहमी प्रमाणे नाटकी बोलला , रविवारी या म्हणाला .

ॲना मैत्रिणीकडे राह्यला गेली . हे सगळं प्लॅनिंग ती निमुटपणे बघत राह्यली .
सुयशला काहीही करुन स्वता:च्या आईवडिलांना दुखवायचे नव्हते . तेवढाच भावनेचा ओलावा त्याच्या मनात कसा काय शिल्लक आहे याचं सानिकाला आश्चर्य वाटायचं.
रविवार उजाडला , सानिकाने पुर्ण भारतीय सैपाक केला , आज ॲनाची लुडबुड नव्हती , तिला बरं वाटत होतं . आजची संधी वाया घालवायची नाही हे सानिका स्वता:लाच बजावत होती .
पण जयुताई पर्यंत हे सगळं कसं पोचवावं हे तिला कळत नव्हतं. सुयश सतत आजुबाजुला राहिलच . त्याने सकाळीच धमकावलं होतं . जयुला आणि तिच्या नव-याला जराही संशय आला तर बघ , मी मारुन टाकीन तुला .जयुला पण काहीही करीन . सुयश तिच्या भित्र्या स्वभावाचा फायदा घेत होता .
आता तिचं विचारचक्र जोरात सुरु झालं .पाण्यात बुडायला लागल्यावर माणुस हातपाय मारतोच , तसच सानिकाचं झालं , तिला आता धिट बनायचं होतं .

ती इकडे तिकडे नजर फिरवत होती , कसं पोहचवु जयुताई पर्यंत की मी संकटात आहे हे .
तिला पेन दिसला , नोटपॅड पण होतं . सुयश आसपास नव्हता , तिने भराभर सगळं लिहलं , मला वाचव हे आर्तपणे लिहलं . चिठ्ठीची छोटी घडी केली अन लपवुन ठेवली .
जयु एकटीच आली . सुयशच्या अन तिच्या लहानपणीच्या गप्पा रंगल्या .पण सुयशचे सानिका कडे पुर्ण लक्ष होते .तिला संधी मिळत नव्हती..

जेवणं झाले , सानिका गप्प गप्प होती .
जयुला काही तरी खटकत होते , सानिका , तिची लाडकी मावस बहिण , अल्लड , बडबडी , पण आता अशी कोमेजलेली का दिसतेय . पण ती काही बोलली नाही.
सानिका आईस्क्रिम आणायला आत गेली , तिने ती लपवलेली चिठ्ठी आपल्या पायाच्या बोटात ठेवली अन ती बाहेर आली .

जयु तिच्या कडे रोखुन बघतच होती , सानिकाने आपली नजर पायाकडे नेली , तसं जयुनेही तिच्या पायाकडे बघितलं , तिला तिथे कागद दिसला , तिने सानिका कडे बघितलं , तिचे डोळे भरुन आल्या सारखे वाटले , चेहरा वेदनेने पिळवटल्या सारखा वाटला .
काही तरी गडबड आहे , हे चाणाक्ष जयुच्या लक्षात आलं . ती बोलली काहीच नाही .
सानिका आईस्क्रिम द्यायला तिच्या जवळ आली , तसा जयुने आपला रुमाल खाली पाडला अणि तो उचलण्याच्या उद्देशाने , ती खाली वाकली ती चिठ्ठी तिने घेतली अन पटकन रुमालात ठेवली , अन काहीच झालं नाही ,अशा थाटात आईस्क्रिम खायला सुरवात केली .
सानिकाला हायसं वाटलं . आता जयुताई काहीतरी मार्ग नक्की काढेल याची तिला खात्री पटली .
जयुने घरी जाउन चिठ्ठी वाचली आणि ती हबकुन गेली . सुयशच्या गो-या चेह-या मागे एवढा काळा चेहरा असेल हे तिला खरच वाटत नव्हतं .

पासपोर्ट आणि सानिका त्याच्या ताब्यात आहे म्हटल्यावर थोडं सावधगिरीनेच पावले उचलावी लागणार होती . थोडी जरी गडबड झाली तर सानिकाच्या जीवाला धोका होता .
सुयश सारखी टोकाला गेलेली माणसे काहीही करु शकतात . आधी सानिकाला तिथुन सही सलामत बाहेर काढायला पाहिजे , पासपोर्टचं मग बघु , असा त्यांनी निर्णय घेतला .
भारतात पण सध्या कळवु नये , हे ही जयुने ठरवले . इथले कायदे वेगळे आहेत , पोलीस मदत घेतली तर सानिकाही अडकु शकते , याची जयुला कल्पना होती .
कसं काढावं बाहेर याचा विचार करण्यात दोन दिवस गेले . जयुने सानिका , सुयशला अजिबात फोन केला नाही . संशयाला जागा नको.
सानिकाही संयम पाळून होती तिला माहित होतं . जयु ताई यातुन नक्की मार्ग काढेल .
जयूची मैत्रिण सुयशच्या घरा जवळच राह्यची . जयुने तिला विश्वासात घेतले , आणि ती तिच्या कडे राह्यलाच गेली.

तिच्या घरुन ते सगळे लक्ष ठेवुन होते , सुयश अन ॲना सोबत कधी बाहेर जातात., ते जर गेले तर लगेच सानिकाला तिथुन घेउ . दोन दिवस झाले संधी मिळत नव्हती . जयु आता अस्वस्थ झाली .
सानिकाचा गोड चेहरा तिला सारखा दिसत होता . भारतात मावशी आणि काकांना ती काय तोंड दाखवणार होती .
तिस-या दिवशी सकाळी सुयश आधी बाहेर आला लगेच ॲना पण आली , सुयश कार काढत होता , म्हणजे बाहेर निघाले की काय , जयुने टुणकन उडीच मारली . ते सगळे खुश झाले .

ते दोघेही कार मधे बसले अन कार भरधाव निघुन गेली . तशी जयु भरकन उठली आणि सुयशच्या घराकडे धावली . पण हाय रे दैवा गेटला कुलुप , आता कसही करुन त्यांना ही संधी सोडायची नव्हती .
जयुचा नवरा गेट वरुन आत गेला , जयुच्याही अंगात विरश्री संचारली ती ही चढली दोघे आत गेले , अधिरतेने बेल वाजवली , पण बाहेरच्या दारालाही कुलुप होते .

आता जयुचे हात पाय गळले , आत काही आवाजही नव्हता , सानिकाचं काही बरं वाइट तर नाही केलं याने . तिला रडायला यायला लागले .
जयु मागे गेली , सानिकाला आवाज द्यायला लागली . शेवटी एका खिडकीतुन सानिका दिसली . जयुला पाहुन ती आनंदाने रडायलाच लागली .
बागेत उघडणारे एक गेट उघडे होते , जयु आत गेली . त्या दोघींनी भराभर तिचे सामान घेतले . पासपोर्ट थोडा शोधण्याचा प्रयत्न केला , पण नाही दिसला , सुयश कोणत्याही क्षणी येउ शकतो , याची त्यांना कल्पना होती .

जयुने चिठ्ठी खरडली , "तुझे बिंग फुटले आहे सानिकाला मी नेते आहे , त्रास देउ नकोस , पोलिसात तक्रार करेन . "अन ते लगेच निघाले .
जयुकडे आल्यावर सानिकाचा बांध फुटला . मला भारतात जायचं , असं म्हणत ती हमसुन हमसुन रडायला लागली.

जयुचा आश्वासक हात तिच्या पाठीवरुन फिरत होता तशी ती शांत होत गेली .
पोलिसांच्या धमकीने म्हणा की काय सुयशने संपर्क साधला नाही . मैत्रिण म्हणाली ते लोक घर सोडुन निघुन गेले . पासपोर्ट मात्र त्याच्या कडेच राहिला .

भारतात सगळे घाबरुन गेले . सुयशच्या आईवडिलांचा तर विश्वास बसत नव्हता सुयश असं काही करेल . आता सानिका इकडे कधी येते असं सगळ्यांना झालं होतं .
इंडियन एंबीसीत जयुची थोडी ओळख होती . सानिकाने आपला प्राॅब्लेम नीट सांगितला . तिचं काम तसं लवकर झालं . आणि दोन दिवसा नंतरचं तिकीट मिळालं सुद्वा .

सानिकाला आता ती स्वप्ननगरी अमेरिका अगदी नकोशी झाली होती .
विमानात सानिकाला बसवल्यावर जयुने निश्वास सोडला अन विमान आकाशात उडाल्यावर सानिकाने समाधानाने डोळे बंद केले . ती मनाने केंव्हाच मुंबईला पोचली पण होती.
विमानात सानिकाला बसवल्यावर जयुने निश्वास सोडला अन विमान आकाशात उडाल्यावर सानिकाने समाधानाने डोळे बंद केले . ती मनाने केंव्हाच मुंबईला पोचली पण होती.
विमान लॅंड होतय ही अनाउंसमेंट झाली .
विमानतळावर आईबाबा , दादावहिनी तर होतेच पण त्यांच्या सोबत आणखी एक चेहरा लांबुन सानिकाला दिसला तो होता सुहास तिचा बालमित्र . ती हळुहळु चालत आली .
आईने तिला घट्ट मिठीत घेतलं . बाबा मुकपणे प्रेमाचा वर्षाव करत होते . वहिनीच्या तर डोळ्यांना धाराच लागल्या होत्या . दादाचा आश्वासक हात तिच्या हातात होता .अन सुहासचे डोळेच सगळं बोलत होते .
तू चुकलीस पण मी अजुनही आहे तुझ्या सोबत , हेच त्याला म्हणायचं होतं . हे तिला आता कळलं होतं .
आता पर्यंत ती मृगजळाच्या मागे धावत होती . पण हे आहे खरं प्रेम , जे कोणत्याही परिस्थितीत अढळ राहतं . ती आता तिच्या माणसात होती . तिने आत्मविश्वासाने चालायला सुरवात केली . आता तिला कसलीच भिती नव्हती .
© उज्वला सबनवीस
सदर कथा लेखिका उज्वला सबनवीस यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.