साथ ( भाग 2 )

© अपर्णा देशपांडे





बेल वाजली . दारात सानिया उभी होती , अर्णवला घेऊन .

"अरे! सानिया ? ये ना आत . हा तुझ्या कडे होता का ? "

" नाही . खाली खेळत होता . त्याला मी वर घेऊन आले . तू आली असशील म्हणून ."

" ओह ,थँक्स . ये न ."

" नाही , मी जरा बाहेर जातेय , दहा वाजेपर्यंत येईन . माझे एक पार्सल येईल ते ठेऊन घेशील का ? "

" हो नक्की "

सानिया गेली .

" मम्मा , एक अंकल खाली वाट बघत आहेत सानिया आंटीची ."

" असं ? तुझं बरं लक्ष असतं रे !! चल हायपाय धुवून घे . आपण थोडी मोसंबी खाऊया काय ."

पुन्हा फोन वाजला . धावत जाऊन अर्णव नि घेतला .

" हाय अंकल ."

माधवी आणि मंदार दोघानीही चमकून बघितले

" हो s , आलीये ना मम्मा ......हो s , बाबा पण .......हं ...हं ..

मंदार ने फोन हिसकावून घेतला .

" कोण बोलतोय ? तुझी इतकी हिम्मत ? की तू माझ्या मुलापर्यंत पोहोचलास ? ......अजिबात नाही !!!"

त्याने फोन आदळला .

" अर्णव !!! हा तुझ्याशी बोलतो फोन वर ? कधी पासून ?"

" मी स्कुल मधून आलो की फोन येतो ."

"मावशी , तुम्ही कधीच बोलला नाहीत ? असा कुणाचाही फोन आला तर अर्णव ला नाही द्यायचा !"

" मला वाटलं , आजी आजोबा फोन करतात नागपूरहून ..तेच ..असेल "

सगळी निजानीज झाली तरी माधवीला झोप येईना . तिला अर्णव ची काळजी आणि प्रशांत ची भीती वाटायला लागली.

******** 

माधवी खूप खुश होती , तिला प्रशांत सारखा देखणा ,हुशार नवरा मिळाला होता . नेहेरू नगर सारख्या प्रतिष्ठित भागात बंगला , वडिलांचा मोठा व्यवसाय ,गावाकडे जमीन ...सगळंच अनुकूल .

लग्न झालं , माधवी सासरी आली . सगळ्यांनी कौतुकाने तिचं स्वागत केलं . सासूबाई पण खूप प्रेमळ वाटल्या ..फक्त त्यांच्या चेहेऱ्यावर खूप ताण दिसत होता . काहीतरी चुकतंय असं वाटत होतं तिला .

दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा झाली . जेवणं झाले ...ती थोडावेळ तिच्या खोलीत जाऊन पडली . प्रशांत बऱ्याच वेळापासून दिसला नव्हता .

" माधवी ? प्रशांत आहे का आत ?"

" नाही , ते दुपार पासूनच कुठे बाहेर आहेत वाटतं ."

जवळपास सगळेच पाहुणे गेले होते .

मोजके दोनचार लोक घरात होते .

रात्र झाली . त्यांची पहिली रात्र .

ती प्रशांतची वाट बघत होती .रात्री बारा नंतर धाडकन दारावर आदळतच तो खोलीत आला . तिने पटकन पुढे येऊन त्याला आधार दिला . भपकन वास आला तसं तिला एकदम भडभडलं .

दाराआड सासूबाई काळजीत उभ्या दिसल्या तीला ......तर हे होतं त्यांच्या काळजीचं कारण !

" माधवी , तुला आम्ही फसवलंय ." दारूच्या नशेत तो बोलला आणि तिला चर्रर्रर्र झालं .

" पप्पांचा बिझनेस ...झिरो ...किती?....झिरो !

आता हे घर पण गिरवी आहे . उद्या ....उद्याच आपल्याला ..,बाहेर लाथ मारून काढेल बँक !! कर्ज ..ग ...,कर्ज !!" नशेत सगळं खरं बोलून गेला प्रशांत ! तिच्या मनावर प्रचंड ओझं टाकून स्वतः मात्र गाढ झोपला .

******** 

" माधवी ? ए s ..माधवी ..." मंदार उठून हाक मारत होता .

" काय तोच तोच विचार करतेस माधवी . उपयोग आहे का काही ? झोप आता , तब्बेतीवर परिणाम होईल बरं ."

" हो रे , झोपते . काळजी नको करुस ."

" भूतकाळ जर खूप रम्य असेल न , तरी त्यात रमू नये . आणि तो जर त्रासदायक असेल तर मग तर त्याला कापून टाकावं पूर्णपणे . "

" तो भूतकाळ जिवंत भूत झालातर ? "

" मग तर त्या भूताला त्याची जागा दाखवावी .....आपण दाखवू ग ...मी आहे न माधवी ...." ती प्रेमाने त्याला बिलगली .

माधविला काही ऑफिस मध्ये जावेसे वाटले नाही . म्हणून ती घरीच थांबली होती .

" माधवी , ये ना जरा निवांत वेळ आहे तर कॉफी घेऊया " सानिया बोलवत होती . ती नेहमीच आग्रह करायची , हिलाच जमायचं नाही म्हूणून आज पटकन हो म्हणाली .

" काय झालं माधवी ? तुझं नेहमीचं हसू कुठे गेलंय ?"

" .…...चांगुलपणा नडतो ग कधी कधी ....." तिचा चेहरा बदलला .

" I am sure ,it's not about mandar .....तुझा एक्स? "

" हो ग ,अर्णव ची धमकी देतोय ."

" ***साला !! ****त दम नाही त्याच्या!!! तू कशी राहिली ग पूर्ण एक वर्ष त्याच्या जवळ ?"

" अग ,लग्नानंतर महिन्यातच तो बंगला जप्त झाला होता . बँकेने ताबा घेतला ."

" माझ्या वडिलांनी चक्क त्यांचे घर दिले रहायला ....हेच तर हवे होते त्यांना . ..इतकं करूनही मी धीर देत होते त्याला . वाटलं येऊ बाहेर ह्यातून ...पण त्याची लायकीच नव्हती ग !! 

माझे दागिने विकले मला न सांगता ...पप्पांच्या घराचा परस्पर सौदा करायला चालला होता . नशीब ते अग्रवाल ..म्हणजे खरीददार ओळखीचे निघाले ..."

" तुझ्या सासूबाई ...

" अर्णव च्या वेळी मी प्रेग्नन्ट होते , तेव्हा हार्ट ऍटॅक ने ..

" excuse me ladies , मी आलोय ."

समीर आला होता .

सानिया उठून पुढे गेली ," ओह समीर , प्लिज कम ! "

" आवडलं असतं मला , पण ...पुन्हा कधी . ही आहे न आज मध्ये मध्ये बोलायला " तो माधविला चिडवत म्हणाला .

" चल बाबा समीर , तिला तुझ्या फ्लर्टिग ची सवय नाहीये ."

दोहे समोरच माधवी कडे पोहोचल्यावर तिच्या लक्षात आले की काहीतरी सिरीयस झालेय .

" काय झालं ? ..अर्णव ? ..कुठे? ...

" रिलॅक्स ! तो आहे . .."

" मग ? काय झालं समीर ? ...अरे बोल ना !!"

" आज तू आली नव्हतीस ऑफिसला ."

" हो आज घरीच रहावे वाटत होते ....का ?"

" ते ........व्ही .पी नि तुझी टर्मिनेशन ची ऑर्डर काढलीये . " समीर हिम्मत करून म्हणाला .

" टर्मिनेशन ? आर यु सिरीयस ?"

" हो . आतल्या गोटातून बातमी आहे .... भार्गवी ने सांगितलं , बाकी कुणाला माहीत नाही ."

" कसं शक्य आहे ? कारण कळेल का ? " तिचे डोळे डबडबले होते .


क्रमश:

© अपर्णा देशपांडे


सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने