© अपर्णा देशपांडे
माधवीला कळेना की हे असे कसे होऊ शकते .
" समीर , भार्गवीने तुला बोलावून सांगितले ? "
" हो . तिने आधी तू आहेस का हे बघितले . तू नेमकी रजेवर होतीस . मग तिने मला बोलावले . म्हणाली की ताबडतोब माधवीला कल्पना दे ..मला खात्री आहे की तिची टर्मिनेशन ची ऑर्डर तयार आहे ,H .R हेड नि सांगितलंय ."
मंदार माधवीच्या जवळ आला . " हे बघ माधवी , काहीतरी चुकतंय . तू काही कुणी चतुर्थ श्रेणी कामगार नाहीयेस की असं सांगितलं आणि लगेच काढून टाकलं .उद्या जाऊन बघ .आणि शांत पणे घे . Dont worry . आपण कुणाचं वाईट केलं नाहीये ...आपलं ही होणार नाही ."
" मी जाऊन बघते न उद्या .बघू , जे असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी आहे . तू आहेस न सोबत . मला काळजी नाही ."
सकाळी लवकरच ती ऑफिस ला गेली . सगळं नॉर्मल होतं . कुणाला काही कळाल्याचे दिसत नव्हते .पाच मिनिटातच तिला फोन आला . ती वाटच बघत होती . मनाची पूर्ण तयारी करून ती सरांच्या केबिन मध्ये गेली .
" येस सर ?"
" मॅडम , आपल्या सगळ्या CNC मशिन्स ची परचेस ऑर्डर तुम्ही कुणाला दिली होती ? "
" सर , 'थोर्ब इंडिया ' ला .आपण तिथेच देतो कारण मग इंस्टालेशन आणि सर्विसेस एकदम सोपं होतं .....का बरं सर ? काही प्रॉब्लेम ?"
" एकूण किती मशिन्स ची ऑर्डर होती ? आणि कितीचं अप्रुव्हल होतं एम .डी सरांकडून ? "
" सर , आपण जुन्या आणि नव्या प्लान्ट साठी एकूण अकरा मशिन्स मागवल्या .
साडे वावीस कोटी ची ऑर्डर होती ....काय झालं सर ? .. हे का विचारताय ?"
" गेले आठ दिवस I .S.D (Information system department ) तुमच्यावर लक्ष ठेऊन होतं . परवा एक मोठी डील झाली आणि काल बरोबर तुम्ही सुट्टी घेतली ."
" सर , तुम्हला काय म्हणायचं ते सरळ सरळ बोला प्लिज . कोडे नका टाकू ."
" थोर्ब नि तुम्हाला किती दिले ?"
" सर , मी दहा वर्षे ह्या कंपनीत काम करतेय . कितीतरी परचेस ऑर्डर्स माझ्या सहीने झाल्यात . कोट्यवधींची खरेदी केलीये . आत्ताच का ह्या चौकश्या ?"
" सॉरी टू से , पण काही महिन्यांपूर्वी तुम्ही युरोपला जाऊन आलात न ? आणि नवीन फ्लॅट पण .."
ती ताडकन उठली . " सर , कुठलेही निराधार आरोप मी सहन करणार नाही . मी एक पैश्याची अपेक्षा न ठेवता अतिशय प्रामाणिकपणे सगळे व्यवहार केले आहेत . "
" थोर्ब च्या विनोद बत्रा ला ओळखता ? त्याने स्वतः सांगितलंय की तो तुम्हाला सहा टक्के कमिशन देतो . तुमच्यासाठी टूर प्लान करतो ."
" व्हॉट ? सर , मला कळत नाहीये हा का खोटं बोलतोय .....हे पूर्ण खोटं आहे सर . ...माझा नवरा देखील भरपूर कमावतो , आम्ही एक काय दोन टूर करु शकतो एका वर्षात . बत्रा ला माझ्या समोर आणा सर , मी बोलते ..."
" हे बघा मॅडम , ते सगळं आम्ही बघूच .पण सध्या तरी ...."
त्यांनी एक पाकीट समोर केले .
" तुमच्या बाकी सगळ्या फॉर्म्यालीटिज लवकरच पूर्ण केल्याजातील . आणि काळजी कशाला करता ,त्यांचे आरोप खोटे सिद्ध झाल्यास पुन्हा तुम्ही...
" गुड बाय सर . थँक्स !!! मी स्वतःला निरपराध सिद्ध करेनच , पण पुन्हा येणार नाही इथे वापस ."
ती ताठ मानेने तिथून बाहेर पडली .
तिच्या केबिनमधील काही वस्तू घेतल्या आणि कुणाशीही न बोलता निघाली .
आज मुद्दाम तिने कार आणली नव्हती म्हणून कॅब मागवली .
दहा वर्षे दिली मी ह्या कंपनीला .
किती मोठ्या मोठया डील केल्या , कधी चुकूनही मनात मोह आला नाही . ह्याच बत्रा ने काय काय ऑफर्स दिल्या होत्या ...नम्रपणे नाकारल्या .....
आणि आज ? तीला फार वाईट वाटत होतं .
तिच्या अपेक्षेप्रमाणे बरोबर मंदार चा फोन आला .
" समीर ची बातमी खरी ठरली मंदार . तिचा स्वर कातर झाला होता ."
" ठीक आहे माधवी ,पण कारण सांगितलं का ? "
" मी बत्रा कडून कमिशन घेतलं म्हणे ."
" व्हॉट रबिश !!!"
" मी घरी जातेय ."
" मी पण आलोच ."
" अरे नाही !! म्हणजे , खूप महत्त्वाचे काम सोडून येऊ नको .मी ठीक आहे . तू आहेस ना सोबत मग मला काय काळजी .भेटू संध्याकाळी ."
ती घरी आली . अर्णव शाळेत होता .
फोन वाजला .
" कसं वाटतंय कामावरून काढल्यावर ? " तोच छद्मी आवाज .
" ओह म्हणजे हे तुझं कारस्थान आहे हे तर ! मला आधीच लक्षात यायला पाहिजे होतं , पण इतक्या थराला जाशील असं वाटलं नाही मला .

हे सगळं तू का करतोयस प्रशांत ? अर्णव साठी ? कशाला हवाय तो ?
तुला अर्णव ची कस्टडी कोर्टानेच दिली नव्हती . मुलाला पोसायला कुवत लागते ,प्रशांत ."
"माझी कुवत कळाली न तुला आज ?
तेव्हा अर्णव काही महिन्यांचा होता , म्हणून तुला कस्टडी मिळाली . आता तो मोठा झालाय ...आणि अजून तर फक्त तुझिच नोकरी गेलीये ,...मंदार बाबू .....चा ......बरा चाललाय न जॉब? " कुचके पणाने त्याने विचारले .
" प्रशांत , don't you dare to do that !!"
" ही ! ही ! ही ! , माझा पोरगा मला पाहिजे , बास !! तुम्ही बऱ्या बोलाने ताबा द्या , नाहीतर मला ..."
तिने चिडून फोन आपटला .
हा ..नेमका काय करतोय ? मला जॉब वरून काढण्यासाठी .. माझ्या विरुद्ध कागाळया करतोय .आणि कंपनीने ही कसं ते मनावर घेतलं ? .
" मम्मा !! " अर्णव आला होता . "अरे ! आज लवकर ? मग तुला कोणी आणले ? "
मागून सानिया आली .
" सानिया ? तुला कसं कळालं ? ह्याचं time टेबल ? "
" मंदार चा फोन होता . माझ्या हॉटेल पासून शाळा जवळ आहे न .तू अस्वस्थ असशील म्हणून तुला सांगितले नसेल ."
" ये न , बस ,.... मावशी बाई , थोडा नाश्ता घेऊन या ."
" माधवी , काही अडचण आहे का ?"
" चालतंच ग ! जाऊ दे . तुझं काय चालू आहे ? "
"मी सध्या ऍडमिनिस्ट्रेशन सोबतच मार्केटिंग पण बघतेय ."
" गुड ! आजकाल फार खुश दिसतेस सानिया हा , बात क्या है ? ...बॉयफ्रेंड ? "
" आहे एक तसा क्लोज फ्रेंड ...पण ...डोन्ट नो " ती हसली .म्हणाली ,
"तुला मंदार कुठे भेटला ग ? "
" मंदार ?........ती सांगू लागली ..................

क्रमश:
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.