© अनुजा धारिया शेठ
"अरे, असू दे. आपण करू काहीतरी. पण आईला काहीच कळता कामा नये" रिशा
"मावशीला विचारायच का?." रोहित
दोघांचे एकमत झाले.. पण कसे विचारणार हा प्रश्न..?
घरात आई.. आणि मावशीच्या पोटात काही राहायचे नाही.
रोहीत आणि रिशा दोघे मिळून आईच्या ५० व्या वाढदिवसाच प्लॅन करत होते.
कोणाला बोलवायचे? काय करायचे?
"आईच्या मैत्रीणींना बोलवायच का? पण आईकडून कधी ऐकलच नाही ग जास्त कोणाची नाव?"
"अरे, असू दे. आपण करू काहीतरी. पण आईला काहीच कळता कामा नये" रिशा
"मावशीला विचारायच का?." रोहित
दोघांचे एकमत झाले.. पण कसे विचारणार हा प्रश्न..?
घरात आई.. आणि मावशीच्या पोटात काही राहायचे नाही.
"अजून एक महिना आहे, आपण 2 दिवस मावशीकडे जाऊ राहायला" रिशा म्हणाली.
"ए आई ह्या शनिवारी, रविवारी आम्ही दोघे मावशीकडे जाणार आहोत २ दिवस राहायला." रोहितने सांगितलं..
"चालेल, मी पण येते." आई
"ए नको आई, तू आलीस ना की मावशी आणि तू आम्हाला काही बोलू देणार नाही.. तू नंतर जा.. आम्ही घर सांभाळू" रिशा
दोघेही निघाले, मावशीला प्लॅन मध्ये घेतले की झाले.. मावशी लहान असल्यामुळे मैत्रीचे नाते होते.

मावशीकडे आले, मावशीने मस्त पाणी-पुरीचा बेत आखला.. मुले खुश.
" ए मावशी, आईच्या ५० व्या वाढदिवसाला तिच्या सर्व मित्र- मैत्रिणींना बोलवायच ठरवल आहे आम्ही.. पण आम्हाला माहितच नाही ग कोण आहे तिच्या जवळच्या मैत्रिंणी विषयी... तू सांग... ना ग"
नीता विचारांत हरवली, "ए मावशी सांग ना ग" मुलांनी गलका केला.
नीता सांगू लागली, "अरे तुमची आई म्हणजेच नुतन ताई माझ्या पेक्षा ८-९ वर्षांनी मोठी, पण तीच लहानपण जगलीच नाही रे ती.

आमचे अण्णा, एकदम कडक, त्यात पहिली मुलगी म्हणून तुमच्या आईचा कायम तिरस्कार करायचे, ताईला खूप बोलायचे.
त्यात जरा ती रंगाने कमी म्हणून सर्वच कमी लेखायचे तिला, एकच मैत्रीण होती तिची, पण ती डॉक्टरची मुलगी म्हणून भारीच वचक दाखवायची.
आणि तिची आई माझ्या ताईला ड्रेस वरून, दिसण्या वरून बोलायची शेवटी ताईने तिची मैत्रीच कमी केली.
ताई जास्त बोलायची नाही रे. कमीच बोलायची. सगळ्यांनी सारख बोलून बोलून ताईचा आत्मविश्वास कमी झाला होता.. कसे तरी कॉलेजची दोन वर्ष केली तिने पण मुलीची जात म्हणून तसे लवकरच लग्न लावून दिले.
तिच्या बरोबरच्या सर्व मुली शिकत होत्या आणि माझी ताई संसारात अडकून गेली, बघता बघता तुमचा जन्म झाला, लहान वयात ती मोठी झाली.
लग्नानंतर खूप बायका होत्या तिच्या ओळखीच्या पण मैत्रिण अशी कधी झालीच नाही कारण सासू, नवरा घर या कुचाळक्या तिला कधी आवडल्याच नाहीत.
लग्नानंतर खूप बायका होत्या तिच्या ओळखीच्या पण मैत्रिण अशी कधी झालीच नाही कारण सासू, नवरा घर या कुचाळक्या तिला कधी आवडल्याच नाहीत.
संसार आणि मुले वाढवताना राहून गेलेले छंद जोपासत तिने तुम्हा मुलांना वाढवले, कधी कधी रडायची मैत्रीण हवी ग एक तरी हक्काची पण कधी भेटलीच नाही बघ निस्वार्थ मैत्री जपणारी.
ती अशी हतबल झाली की तुमचे बाबा म्हणायचे मी आहे ना हक्काचा मित्र. कि ती हसायची. खुप वेगळी आहे तुमची आई, सगळ्यांना हेवा वाटावा अशी, मिळेल त्यात समाधान मानणारी.
मी तर म्हणेन ती खूप ग्रेट आहे त्यामुळे तिला हवी तशी मैत्रीण कधीच मिळाली नाही कारण तिला आपले मानण्यापेक्षा ना कमी लेखणार्या आणि जळणार्याच जास्त होत्या.
पण तुमची आई मोठी जिद्दी. तुम्ही दोघ झाल्यावर पण तिने राहिलेले शिक्षण पूर्ण केले, शाळेत नोकरी धरली.
पण तुमची आई मोठी जिद्दी. तुम्ही दोघ झाल्यावर पण तिने राहिलेले शिक्षण पूर्ण केले, शाळेत नोकरी धरली.
तिथे पण तिचा आपले काम बरे आणि आपण बरे हा विचार. कारण मज्जा करणे, फिरणे ह्या सर्व गोष्टींपासून तीच्याही नकळत ती लांब गेली होती. तिच्या कामांत होणाऱ्या प्रगतीमुळे निंदकच जास्त झाले.
रोहित आणि रिशा एकमेकांकडे बघून विचारांत पडले.
रोहित आणि रिशा एकमेकांकडे बघून विचारांत पडले.
आईच्या मनाचा एक नवीनच कोपरा त्यांना समजला. आईशी मैत्री करायची असे ठरवून तें तिथून निघाले, अन् मावशीला सांगितलं की, ज्या मैत्रिणींनी आमच्या आईला कमी लेखले किंवा तिला दूखावले त्या सर्वांना बोलाव.
आज ज्यांनी आमच्या आईला दुखावले त्यांना सर्वांना आईच कौतुक ऐकू दे.
घरी आल्यावर आईशी लाडीगोडी लावली, आई तू आमची मैत्रीण, तुझ्याशी बोलताना खूप छान वाटतं, आम्ही सर्व काही शेअर करतो म्हणजे आपण मित्र-मैत्रिण झालो की नाही?
घरी आल्यावर आईशी लाडीगोडी लावली, आई तू आमची मैत्रीण, तुझ्याशी बोलताना खूप छान वाटतं, आम्ही सर्व काही शेअर करतो म्हणजे आपण मित्र-मैत्रिण झालो की नाही?
आई हसली आणि म्हणाली, "आज अचानक काय झाले?"
"काही नाही ग... फ्रेंड्स... योsss" असे म्हणून हात पुढे केला, हातांत हात घातला... शेकहॅन्ड केले.
नूतन मुलांना असे बघून काहीतरी खलबत आहेत खरी असे मनात म्हणाली.
नूतन मुलांना असे बघून काहीतरी खलबत आहेत खरी असे मनात म्हणाली.
अखेर तो दिवस आला, मावशीला आधीच बोलावून घेतले होते, सकाळी आई उठायच्या आधीच दोघांनी उठून आईच्या स्वागताची तयारी केली.
फुले उधळून हातात एक मस्त स्मार्ट फोन देऊन आईला विश केले... तोपर्यंत बाबांना सुद्धा मुलांनी काहीच सांगितल नव्हते..
"अरे, मी ठरवलेले गिफ्ट तुम्हीच दिले आता मी काय देणार?" बाबांनी असे म्हणताच रिशाने बाबांच्या हातांत आईसाठी एक गोष्ट दिली.
"अरे, मी ठरवलेले गिफ्ट तुम्हीच दिले आता मी काय देणार?" बाबांनी असे म्हणताच रिशाने बाबांच्या हातांत आईसाठी एक गोष्ट दिली.
त्यात तिचे टाइम टेबल आणि योगा क्लासचे डिटेल्स, ट्रॅक सूट, योगा मॅट असे सर्व काही होते.. हे तुम्ही सांगा बाबा तिला.. आजपर्यंत तिने आपल्या साठी टाइम टेबल आखले आज आम्ही तिला देत आहोत..
नूतन म्हणाली, "अहो तुम्ही पण काय मुलांसोबत लागता? हे सर्व बाहेर कशाला एवढी वर्षे मला जमेल तसे घरी करत होते की"
"अगं ताई, आता तू काही बोलू नको.. आणि हो माझ्याकडून तूला वेगळच गिफ्ट आहे.
नूतन म्हणाली, "अहो तुम्ही पण काय मुलांसोबत लागता? हे सर्व बाहेर कशाला एवढी वर्षे मला जमेल तसे घरी करत होते की"
"अगं ताई, आता तू काही बोलू नको.. आणि हो माझ्याकडून तूला वेगळच गिफ्ट आहे.
तुझ्या ह्या लिखाणाच्या वह्या.. किती वर्ष त्या कपाटात आहेत सांग मला? अगं हि पण एक कला आहे.. किती तरी ऑनलाईन पोर्टल आहेत, मी तुझ्या मोबाईल मध्ये आधीच डाउनलोड करून दिलेत.
आजचा दिवस चांगला आहे, आजच माझी लेखणी म्हणुन एक ब्लॉगिंग साईट आहे तिथे मेल कर तुझ्या कथा आणि कविता.... तूला खूप छान प्लॅटफॉर्म मिळेल तिथे, वाचक वर्ग, तसेच पूर्ण टीम सुद्धा छान आहे, सपोर्टीव्ह आहे."
नूतनला काहीतरी वेगळेच वाटत होते... पण आज तिला कोण काही बोलूच देत नव्हते.
नूतनला काहीतरी वेगळेच वाटत होते... पण आज तिला कोण काही बोलूच देत नव्हते.
किचन मध्ये जायचे नाही, इकडे जायचं नाही... शिक्षा केल्यासारखी तिला आणि निलेशरावांना एका खोलीत बसून राहायला सांगितल होते.
"अहो, तुम्हाला ऑफिसला नाही जायचं का?" नूतन म्हणाली.
आजू बाजूला कॊणी नाही म्हटल्यावर निलेशने आज बऱ्याच वर्षांनी त्यांच्या मनाचा कोपरा तिच्या समोर उलगडला.
आजू बाजूला कॊणी नाही म्हटल्यावर निलेशने आज बऱ्याच वर्षांनी त्यांच्या मनाचा कोपरा तिच्या समोर उलगडला.
"नूतन, खरंच खूप केलस तू आमच्या साठी, ह्या घरासाठी, कधी स्वतः साठी जगली नाहीस आणि ह्या मुळे तुझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाले मैत्रीची जागा तशीच आहे अजून.
कारण तू तुझ्या विश्वात एवढी गुंतून गेलीस की तुझ्या मैत्रिणी खूप पुढे निघून गेल्या.. मी जायचो मित्रांसोबत, मुले जायची.. खर्च वाढत जातो असा विचार करून तू मात्र घरी राहायचीस..
माझ्या वर चिडायचीस.. मी घरी एकटीच असते हो, माझी आठवण ठेवत जा.. पण तेव्हा मात्र आम्ही तुझी खील्ली उडवायचो.. तूला कधी गॉसिपींग जमलं नाही म्हणून तू एकटी राहिलीस."
"अहो, असे काय बोलताय, उलट आपल्या नात्याचा हेवा वाटतो लोकांना, तुम्ही किती सपोर्ट केला मला म्हणून नोकरी, घर, मुले सांभाळू शकले.
"अहो, असे काय बोलताय, उलट आपल्या नात्याचा हेवा वाटतो लोकांना, तुम्ही किती सपोर्ट केला मला म्हणून नोकरी, घर, मुले सांभाळू शकले.
आपल्या मधील मैत्रीचे नाते तसेच आहे, तरी पण हि पोकळी आधी जाणवायची मला आता नाही वाट्त काही.. मुले पण छान मित्रासारखी वागतात... आणि अहो, पाठ फिरली की नाव ठेवणार्या मैत्रिणी काय उपयोगी? त्यापेक्षा दुरून डोंगर साजरे... नाही का?"
दोघ गप्पांत हरवले.
तिकडे मुलांची तयारी सुरू होती, दुपारची जेवण झाली आणि जवळचं असलेल्या एका हॉलमध्ये संध्याकाळी सर्व येणार होते, आईला दिव्यांनी ओवाळायचे.. सर्व काही ठरले होते.
तिकडे मुलांची तयारी सुरू होती, दुपारची जेवण झाली आणि जवळचं असलेल्या एका हॉलमध्ये संध्याकाळी सर्व येणार होते, आईला दिव्यांनी ओवाळायचे.. सर्व काही ठरले होते.
"नीतू, आज आई- अण्णा हवे होते नाही का?" नूतन म्हणाली..
" असू दे ग ताई आपण आहोत ना."
नीताच्या मुलांनी येऊन मावशीला मिठी मारली.. आणि ताई-दादा च्या मदतीला गेले..
सर्वांना मुलांनी बोलावलं होते.. नूतनला हॉल वर येण्यासाठी मुलांनी फोन केला, निलेश आणि नुतन अगदी तरुण दिसत होते, एवढी वर्ष झाली तरी त्यांच्या मधील प्रेम तसेच होते.
सर्वांना मुलांनी बोलावलं होते.. नूतनला हॉल वर येण्यासाठी मुलांनी फोन केला, निलेश आणि नुतन अगदी तरुण दिसत होते, एवढी वर्ष झाली तरी त्यांच्या मधील प्रेम तसेच होते.
हॉल भरलेला बघून नुतन पाहत बसली, निलेशराव मात्र हसत होते, नातेवाईक, मैत्रिणी, कलीग्स सर्व आले होते, नुतनवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता... नूतन मात्र थक्क होऊन बघत होती.
मुलांनी लपून छपून वाढदिवसाचा कार्यक्रम ठरवला, तयारी केली, थिम दिली सर्वांना.
मुलांनी लपून छपून वाढदिवसाचा कार्यक्रम ठरवला, तयारी केली, थिम दिली सर्वांना.
सगळ्यांपासून लांब राहून राहणारी आई, जिला सर्वानी कमी लेखले अशा सर्व लोकांना आज फ़क्त आणि फ़क्त आईच कौतुक ऐकायला बोलवले होते.
आईच्या संपूर्ण आयुष्याचा स्लाईड शो केला होता आणि एक पेपर आणि पेन ठेवला होता ज्यावर सर्वांना आईसाठी शुभेच्छा लिहायच्या होत्या.
सर्व बघून नूतनचे डोळे भरून आले, सगळ्यांना नुतनचे एक नवीन रूप समजलं.
सर्व बघून नूतनचे डोळे भरून आले, सगळ्यांना नुतनचे एक नवीन रूप समजलं.
सर्वांचे झाल्यावर नूतनला बोलायला सांगितल, खर तर काहीच कळत नव्हते तिला, एक जुनीच तीनेच केलेली कविता म्हणायला तिने सुरुवात केली...
एक तरी मैत्रीण असावी...
मनाच्या कोपर्यात अलगद बसावी...
मी-तू पणाची भावना आमच्यात कधीच नसावी.
हेवे-दावे, मान-पान यांना मैत्रीत जागा नसावी....
खुले असावे नाते, व्हाव्या मनमोकळ्या गप्पा...
अलगद उघडला जावा मनाचा नाजूक कप्पा...
हवी आहे मजला अशीच एक सखी....
माझे नाव तीच्या अन तिचे नाव माझ्या....असावे सतत मुखी...
न बोलता समजून घेऊ आम्ही एकमेकींच्या भावना....
नकळत समजतील आम्हाला एकमेकींच्या यातना....
आयुष्याची जरी सरली एवढी वर्ष....
तरीही अशा ह्या सखीची जागा अजूनही आहे रीक्त...
भेटेल जेव्हा ती मला, काय सांगूं केवढा होईल हर्ष...
हक्काने होऊ शकेन मी तिच्याजवळ व्यक्त....
आजपर्यंत अनेकांच्या ऐकल्यात मी सुख-दुःखाच्या कथा...
पण कोणालाच नाही वेळ, ऐकायला माझ्या मनीची व्यथा....
ह्या वेड्या मनाला आहे अजूनही आस...
कधी भेटेल मला माझी सखी ती खास...
मैत्री दिनाच्या वेळेस मात्र या विचारांनी होतो खूप त्रास...
जेव्हा तिची-माझी होईल भेट, तोच दिन असेल माझ्यासाठी मैत्री दिन खास....
ऐकून माझी ही कहाणी, नकळत बोलली एक वाणी..
असता तूला हे कन्यारत्न, आणू नकोस डोळ्यात पाणी..
तीच होईल बघ तुझी सखी, अन जाणून घेईल तुझी व्यथा...
ऐकता हे बोलणे, मनास आली परत उभारी...
अन खरोखरच आमची मैत्री झाली सर्वांपेक्षा न्यारी....
माझी प्रिय सखी झाली माझीच लेक प्यारी....
जोरात टाळ्या वाजल्या, दोन्ही मुलांचे तिने कौतुक आणि आभार मानले, बऱ्याच मैत्रिणी तोंडदेखले कौतुक करून गेल्या तर काही नव्याने जोडल्या गेला.
नीता आणि रिशाच्या साथीने मग् अनेक ऑनलाईन पोर्टल सोबत केली मैत्री नुतनने, आणि तिला हव्या तश्या तिच्या सारख्या कित्येक मैत्रिणी तिला मिळाल्या.. आणि तिच्या आयुष्यात असलेली मैत्रीची पोकळी तीच्या लेखणीने भरून काढली.

समाप्त
© अनुजा धारिया शेठ
सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.