© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
"त्या आजींबद्दल काय ठरवलंस तू? कोल्हापूरला जाऊन काय कळलं?" अपेक्षेप्रमाणे भेट झाल्या झाल्या संध्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
"सध्या कुणाला काही बोलू नकोस!" संजयनं गुप्ततेचा इशारा देत संध्याला सत्य परिस्थिती कथन केली.
"अरे, पण त्यांचा ठावठिकाणा शोधायचास ना! इन्स्पेक्टर नाईकांनी सगळ्या पोलिस स्टेशन्सना चौकशी केलीय. आजींना मॅच होणारी कुठलीच मिसिंग कंप्लेंट नाहीये!" संध्या हताश होत म्हणाली.
"थांब! अशी पॅनिक होऊ नकोस!" संजयनं समजावलं.. "मराठी चित्रपट संघाचे सचिव आहेत चौगुले म्हणून! सध्या त्यांचा नंबर नाहीये माझ्याकडे! पण मिळवता येईल.
त्यांच्याकडून काही मदत मिळेलच.. पण प्लीज, ही माहिती लीक नको होऊ देऊस! हे पेपरवाले अन् चॅनेलवाले त्या सुंदराबाईंचं आणि तुमचंही जगणं मुश्कील करून ठेवतील!" संजयनं विनवलं अन् संध्याला देखील ते पटलं.
कारण संजयच्या मनात काय चाललंय ह्याचा थांगपत्ता देखील तिला लागला नाही.
"फील्डवर निघालोय.. कॅमेरामन सोबत आहे!" असा व्हॉट्सॲप मेसेज पीटर फर्नांडीसला टाकून संजयनं सकाळीच कोल्हापूरकडे कूच केलं.
संग्रहालयातील मासिकांतून त्याला सुंदराबाईंच्या आईच्या घराचा परिसर कळला होताच. संजयनं सर्वप्रथम तेथे जाऊन चौकशी करायचं ठरवलं.
जुन्या शहरात असल्यामुळे त्या परिसरातील रस्ते अतिशय अरूंद होते. आपली व्हॅन बाहेरच्या मोकळ्या जागेत उभी करून संजय अन् कॅमेरामन राहुल दोघेही पायीच त्या गल्लीबोळातून मार्ग काढू लागले.

पुढची वस्ती अतिशय गलिच्छ होती. उघडी गटारं, त्यावर घोंगावणारे किडे अन् तीव्र दुर्गंधी ह्यातून मार्ग काढत दोघे पुढे सरकू लागले तर पुढे अगदी शुकशुकाट असलेल्या परिसरातील दुमजली घरं दिसू लागली.
सुंदराबाईंच्या जुन्या सुरेल घराची आता वेश्यावस्ती झालीय हे समजायला दोघांनाही वेळ लागला नाही.
धीर करून संजयनं त्यातल्या एका घराच्या दारावर टकटक केलं. "सुंदराबाईंना ओळखता का?" दार उघडायला आलेल्या साधारण पन्नाशीच्या महिलेला संजयने प्रश्न केला.

आपल्या प्रश्नाच्या उत्तरात तिचाच प्रश्नार्थक चेहरा मिळाल्याने संजयने पुढचं दार ठोठावलं.
अशी चारदोन दारं ठोठावल्यावर एका सत्तर-पंच्याहत्तर वर्षांच्या वृद्धेनं दार उघडलं अन् घरातल्या एका मुलीला सांगून अंगणात दोन टप्पराच्या खुर्च्या टाकून घेतल्या.

दुसऱ्या मुलीनं लगबगीनं दोन बिसलेरीच्या बाटल्या एका मळक्या स्टुलावर आणून ठेवल्या.
"सुंदराबाईंना ओळखता का? संजयने आपल्या प्रश्नाचा पुनरुच्चार केला.
"ती इथं समोरच राहायची. माझ्याहून दहा वर्षांनी मोठी होती!" ती वृद्धा कोल्हापुरी हेल काढत बोलू लागली.. मग सिनेमात काम करायला गेली.. मग परत नाय आली!" वृद्धेने माहिती दिली.
"तुम्ही एकाच शाळेत शिकलात काय?" संजयने प्रश्न विचारताच सोबतच्या दोन्ही मुली 'खो खो' हसू लागल्या. "आज्जी शाळेत नाय गेली!" त्या हसत हसत सांगू लागल्या.

संजयला स्वतःच्या मूर्खपणाची कीव आली.
"सुंदरानं त्या सिनेमावाल्याशी लग्न केलं.. मग रग्गड पैसा मिळाला तिला.. मग ती परत आली नाय!" वृद्धेनं माहिती दिली.
"सिनेमावाला म्हणजे कोण?" संजयनं उत्सुकतेनं विचारलं.
"तोच.. तो तिला सिनेमात काम करायला घेऊन गेला तो! तिच्यापेक्षा खूप मोठा होता.. बायका पोरं पण होती. पण त्यानं हिच्याशी लग्न केलं.. हिला वेगळं घर बांधून दिलं!" वृद्धा स्मरणशक्तीला ताण देऊन सांगू लागली.
"घर कुठे होतं सुंदराबाईंचं?" संजयच्या प्रश्नावर ती वृद्धा जरा गोंधळली.

तिला नेमका पत्ता सांगता येईना. त्या वृद्धेनं सांगितलेली घटना साधारण सत्तर ते पंच्याहत्तर वर्षांपूर्वीची असल्यामुळे त्या काळी अस्तित्वात असलेल्या वस्तीतच शोध घेणं क्रमप्राप्त होतं.
त्यामुळे तिच्याकडून मिळेल तसा पत्ता अन् खाणाखुणा घेऊन संजय अन् राहुल पुढे निघाले. निघताना त्या वृद्धेच्या अन् मुलींच्या हातात शंभर शंभरच्या नोटा द्यायला विसरले नाहीत.
"तू त्या बाईंनी दाखवलेलं सुंदराबाईंचं घर अन् परिसर तुझ्या कॅमेरात कॅप्चर केलास ना?" संजयनं रस्त्यात राहुलला विचारलं.
"काय यार! मला माझं काम शिकवतोस तू! एक झलक त्या आजीबाई अन् तिच्या पोरींची पण घेतलीय!" राहुलनं सांगितलं अन् ते मार्गस्थ झाले.
वस्तीतल्या त्या वृद्धेकडून अगदीच जुजबी माहिती मिळाल्याने संजय अन् राहुल निराश झाले.. पण त्यांनी तिने सांगितलेल्या दिशेने जाऊन प्रयत्न करायचे ठरवले.
बरीच शोधाशोध केल्यावर एका सिनेमावाल्याचं घर एका फोटो स्टुडिओ वाल्याने विकत घेतल्याचं कळलं.. अन् संजयच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.
मिळालेल्या पत्त्यावर एक तिशीचा तरूण सापडला.. तो त्या स्टुडिओचा मालक होता.

खरं म्हणजे त्याच्या कडे चौकशी करून काहीच साध्य होणार नव्हतं.. कारण सुंदराबाईंबद्दल त्याला माहिती असण्याची शक्यता अगदीच नगण्य होती.
तरीही आलोच आहोत तर एक खडा टाकून पाहू या म्हणून त्यांनी त्या तरुणाकडे चौकशी सुरू केली.
"हा स्टुडिओ माझ्या आजोबांनी विकत घेतला होता!" तो तरुण सांगू लागला.

"तेव्हा देशमुख आडनावाचे एक चित्रपट दिग्दर्शक होते.. त्यांची दुसरी पत्नी सुंदरा इथे राहायची! म्हणजे त्यांनी तिच्यासाठीच हे तीन खोल्यांचं घर विकत घेतलं होतं!" संजयच्या अपेक्षेपेक्षा त्या तरुणाकडे बरीच माहिती होती.
"सुंदराबाईची लोकप्रियता वाढत असल्यामुळे तिला आता इतर निर्मात्यांकडून देखील कामाच्या ऑफर्स येऊ लागल्या.

देशमुखांच्या स्वतःच्या कामाचा पसारा भरपूर असल्याने त्यांनी आपल्या हाताखालील एका माणसाला सुंदराबाईंचा मॅनेजर म्हणून नेमलं."
"सुंदरा दुसरेपणाची होती. त्यापेक्षाही ती नायकीणीची मुलगी होती.. त्यामुळे तिला देशमुखांच्या घरी कधीच स्वीकारलं गेलं नाही!" तो तरुण पुढे सांगू लागला.

"एकतर दोघांच्या वयात पण बरंच अंतर होतं. शिवाय काही वर्षांतच देशमुखांच्या मुलीचं लग्न ठरलं. त्यामुळे घरच्यांच्या दबावामुळे त्यांचं सुंदराबाईंकडे जाणं येणं कमी झालं."
ह्या स्टुडिओच्या मालकाने बरीच माहिती गोळा केलेली दिसत होती.. अन् तो ती आत्मीयतेने दोघांना पुरवत होता.

ह्या तिघांच्या बोलण्याकडे आजूबाजूची मंडळी बघून कुजबुजत आहेत हे लक्षात येताच संजयने त्या तरुणाला चहा ऑफर केला.
शेजारच्या दुकानदाराला दुकानाकडे लक्ष द्यायला सांगून तो तरुण थोड्या अंतरावरच्या हॉटेलकडे निघाला.
हॉटेलला पोहोचताच संजयने चहाची ऑर्डर दिली अन् त्या तरुणाला बोलण्याची खूण केली.
"देशमुखांचं सुंदराबाईंकडे येणं कमी झालं अन् मॅनेजरचं वाढलं. तो बरेचदा सुंदराबाईंना त्याच्या फटफटीवर घरी सोडायला येई. जुना काळ तो! चर्चा झालीच!" गरम चहाचा एक घोट घेऊन तो तरुण सांगू लागला.
त्यावेळी सुंदराबाई पंचविशीत असतील अन् तो मॅनेजर तिशीचा! दोघांचं गूळपीठ जमलं अन् एक दिवस सुंदराबाई त्या मॅनेजरसोबत पळून गेली." तरुणानं चहा संपवून कप खाली ठेवला.
"मग, देशमुखांची प्रतिक्रिया??" संजयनं विचारलं.
"त्यांनाही सुंदराबाईची अडचणच होत असावी. कारण ही बातमी कळल्या वर त्यांनी तातडीनं घर विकायला काढलं.. जे माझ्या आजोबांनी विकत घेतलं.. अगदी पडत्या भावात!!" संजयचं बोलणं संपलं होतं.
"पण तुला हे सगळं कसं माहीत?" संजयनं माहितीचा खरेखोटेपणा ताडून बघण्यासाठी विचारलं.
"माझ्या आजीकडून! ती आणि आजोबा शेजारीच राहत आणि तिला जुन्या जुन्या गोष्टी आठवून सविस्तर सांगण्याची सवय होती. त्यामुळे ह्या गोष्टी तिनं अनेकांना अनेकदा सांगितल्या अन् त्या माझ्या कानावर आल्या." तरुणाच्या स्पष्टीकरणावर संजयचं समाधान झालं.
"पण सुंदराबाई आणि मॅनेजर गेले कुठे?" संजयनं पुढे विचारलं.
"ते काही ठाऊक नाही.. पण तो मॅनेजर मूळचा हैद्राबादचा होता.. कदाचित हैद्राबादला गेले असतील!" तरुणानं अंदाज बोलून दाखवला.

तेव्हढ्यात त्याला काहीतरी आठवलं अन् त्यानं एक जुनं पिवळं पडलेलं पोस्टकार्ड आतल्या खोलीतल्या कपाटातून काढून संजयच्या हाती दिलं.
हैद्राबादच्या कुणा अबझारी हुसैन ह्यांचं ते पोस्टकार्ड होतं. त्यांच्या ओळखीच्या एका मराठी मुलाला सिनेमात नट व्हायचं होतं. त्या साठी त्यांनी ते शिफारसपत्र पाठवलं होतं. ते जुन्या कागदपत्रात तसंच राहिलं.
संजयने लगेच त्या पोस्टकार्डचा मोबाईलमध्ये फोटो काढून घेतला.
सुंदराबाईंचा जीवनपट हळूहळू उलगडू लागला असला तरी सुंदराबाई अचानक अज्ञातवासात का आणि कशा गेल्या.. त्या इतकी वर्षं कुठे होत्या हे शोधणं हे खरं आव्हान होतं.

अन् ही खरी ब्रेकिंग न्यूज असणार होती.. जी संजयच्या करिअरसाठी लक्षवेधी ठरणार होती.
क्रमशः
क्रमशः
© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा