साथ ( भाग 4)

© अपर्णा देशपांडे



प्रशांत आणि माधवीच्या लग्नाला आठ महिने झाले होते . प्रशांत चे वडील बाबासाहेब यांची कनव्हेअर्स ची फॅक्टरी होती . 

त्यांचा व्यवसाय काही नीट चालत नव्हता म्हणून त्यांनी कर्ज घेण्यासाठी घर गहाण टाकले होते . कर्ज तर वाढतच होते , पण बिझनेस तसाच होता ठप्प !! 

म्हणून त्यांनी खोटी श्रीमंती दाखवून माधवीच्या वडिलांना भुरळ पाडली आणि माधवीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला . ती तेव्हा नोकरी करत होती . 

तिच्या वडिलांच्या मदतीने आपले कर्ज चुकवू आणि शिवाय लग्नानंतर आपला दारुडा विक्षिप्त मुलगा थोडा सुधारेल असे त्यांना वाटले .माधवी ने देखील मनापासून प्रयत्न केले प्रशांतशी जुळवून घेण्याचे .

पण तो एक स्वार्थी आळशी बेगैरत माणूस होता . स्वतः काहीच करत नव्हता आणि तिला ही नोकरी सोडायला लावली .

माधवी प्रेग्नंट असल्याची बातमी कळाली तेव्हा तिला आशा वाटले होती की हा थोडा तरी बदलेल , वडिलांना नव्या व्यवसायात मदत करेल , पण त्याला त्याचा तसूभरही आनंद झाला नव्हता . 

तीची शेवटची आशा म्हणजे हा नवीन पाहुणा होता . किमान मुलामुळे तरी तो बदलेल असे तिला वाटले होते .. त्याला मात्र कशाचेच सोयरसुतक नव्हते ..

डॉक्टर कडेही ती एकटिच गेली होती.

आपला नंबर येण्याची ती वाट बघत होती . तिच्यानंतरही तीन चार महिला होत्या . एक थोड्या वयस्क काकू आणि त्यांचा मुलगा पण वाट बघत होते . 

त्या काकू म्हणाल्या ," पहिलीच वेळ दिसतेय ."

" हो ."

" सोबत कुणी नाही का ?"

" नाही , मिस्टरांचा व्यवसाय आहे , वेळ नाही ..म्हणून .." ती कसनुसं हसली .

ती डॉक्टर च्या केबिन मधून बाहेर आली , आणि बाबासाहेबांचा फोन आला . " माधवी , तुझ्या सासूला हार्ट ऍटॅक आलाय , हॉस्पिटलमध्ये नेतोय ,तुही तिथेच ये ."

तिला काही कळेचना ...सासूबाई ...ह्या घरात आपल्याशी प्रेमाने वागणारी एकमेव व्यक्ती !! त्याही जर नसतील तर मी ...तिला एकदम घेरीच आली .

थोड्या वेळाने तिने डोळे उघडले तर त्याच वयस्क काकू आणि त्यांचा मुलगा होते समोर . ती गेली होती त्याच डॉक्टर च्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी तिला ऍडमिट केलं होतं .

तिला बरं वाटल्यावर 'तो ' म्हणाला ,

" तुम्हाला अचानक भोवळ आली , म्हणून ..."

" माझा फोन ?"

" हा ..हा घ्या . मी ह्यावरून तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ला फोन केला ...पण ...ते ..."

" थोड्या वेळापूर्वी माझ्या सासूबाईंना ऍडमिट केलंय हो . मला जावं लागेल ."

" हे बघ बेटा , हा घेऊन जाईल तुला तिथे .काळजी नको करुस ." त्या काकू प्रेमाने म्हणाल्या .

तीने 'त्या ' माणसाकडे बघीतले . तसा सभ्य वाटला .

" मी सोडतो माझ्या गाडीत , काळजी नका करू ."

" तुमचे आभार कसे ..

"मानूच नका . बाय द वे , मी मंदार .

सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे , इथेच एक कंपनीत जॉबला आहे . "

" मी माधवी , मेकॅनिकल इंजिनिअर आहे ...पण ..जॉब...."

" अहो ,तुमच्या काही जबाबदाऱ्या संपल्या की करालच न , इतकं काय त्यात ". तो छानसं हसला . 

ते तिथे पोहोचले तेव्हा सासूबाई गेल्या होत्या . हा तिच्या साठी फार मोठा आघात होता . लग्नानंतर पहिल्यांदा ती आतून तुटली होती .

" सॉरी , हे असं घडलं . माझी काही मदत ..

त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत प्रशांत तिथे आला . 

तिच्यावरचओरडला ," वाह !! वाह !! इथे सासू ला मरायला सोडलस आणि स्वतः कुण्या परक्या माणसाबरोबर गुलछररे उडवतीयेस ? काळ्या पायाची !!"

" अहो काय बोलताय हे ? त्यांची प्रकृती नाजूक झाली होती ...

" ए s !!! तू गप्प बस !! तू कोण रे ? "

" बरोबर आहे .मी कोणीही नाही . पण जे तुमचे आहेत त्यांना तरी नीट वागणूक द्या !! मान्य आहे , आई वारल्यात ,वाईट झालं . पण ह्या दोन जिवाच्या बाईशी अशी वागणूक ? तुमच्या पत्नीची काय चूक ह्याच्यात ?

माफ करा मॅडम , पण तुम्ही यांना यांची जागा दाखवायला हवी !! ,येतो मी ."

माधवी सांगत होती आणि सानिया सगळं विसरून ऐकत होती .

"ती माझी आणि मंदारची पहिली भेट होती . सासू बाई गेल्या . मी चार महिन्यांची प्रेग्नन्ट होते तेव्हा . प्रशांत दिवसरात्र नशेतच असायचा . 

आमची परिस्थिती हालाखीचीच होती . मला खूपदा जॉब ऑफर्स आल्या . मलाही माझा जॉब खूप खुणावायचा पण ह्या माणसाने नोकरीचं नाव काढू दिलं नाही ."

"......हं s "

" एक दिवस मी फक्त भाजी आणायला बाहेर गेले होते . थोडासाच उशीर झाला होता तर ह्या माणसाने माझ्यासाठी दारच उघडले नाही . 

बाहेर जोरात पाऊस सुरू झाला . मी चार महिन्यांचे पोट घेऊन पावसात उभी ....आणि ...हा आत दारू .......त्याच क्षणी मी निर्णय घेतला . 

वापस फिरले , रिक्षा पकडली आणि माहेरी गेले . दुसऱ्याच दिवशी माझ्या जुन्याच कंपनीत गेले. साहेबांना सगळं खरं सांगितलं. त्यांनी पण माझे आधीचे काम पाहून जगावेगळा निर्णय घेतला आणि मी तश्या अवस्थेत जॉईन झाले ."

" कमाल आहे हा तुझी !!! मानलं तुला !!! लेकीन आगे की लव स्टोरी ??"

" हा , मी तेव्हाच लगेच डीव्होर्स साठी अर्ज केला . आश्चर्य म्हणजे प्रशांतनेही लगेच तयारी दाखवली . "

" एक दिवस मी मॉल मध्ये गेले होते . समोर च्या सेक्शन मध्ये मंदार होता . मला बघून गोड ओळखीचे हसला . मी.." 

तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत अर्णव आला .

" मम्मा , मम्मा ते अंकल ना , मला असे स्टेअर करत होते ना ...मी जाईल तिथे बघत होते . "

ती चमकली .

" कोण रे बेटा ? "

त्याची नजर पाठमोऱ्या सानिया कडे गेली . आणि तो गप्प झाला .

मग सानियाच म्हणाली , " बोल च्याम्प !! कोण होता ? "

" ते ..कधी कधी तुम्हाला ड्रॉप करतात न , ....ते अंकल !! "

" प्रणव ? एक सेकंद हा .....हा मोबाईल मधला फोटो बघ ....हा .बघ हे होते का ? " सानिया ने मोबाईल अर्णव समोर धरला .

" हो आंटी !! हेच , हेच अंकल ."

माधवी ने पटकन मोबाईल हातात घेतला ...बघितलं ....आणि ओरडली ...."प्रशांत !!!!! सानिया , हा प्रणव नाही , हाच प्रशांत आहे !! "

क्रमश:

© अपर्णा देशपांडे


सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने