साथ ( भाग 5 )

© अपर्णा देशपांडे



सानिया अवाक होऊन बघत होती .

" I don't believe this ! साला***** ! तुझ्या वर्णनावरून वाटलं त्याच्या पूर्ण विरुद्ध वागतोय हा माझ्याशी ! OMG !! किती नाटकी माणूस आहे ."

" सॉरी सानिया ,"

" अरे , dont be !! थांब मी त्याला फोन लावते ."..तिने तोंडावर बोट ठेवून बोलू नका अशी खुण केली .

" हॅलो , प्रणव तू आलाय का ? मला का नाही बोलावलस ? ...नाही नाही , बघितलं नाही ,आमच्या समोर एक क्युट मुलगा रहातो , त्याने सांगीतलं . येतेच मी खाली . "

" अर्णव , त्या काकांशी तू अजिबात बोलायचं नाही बरं ?..येते ग मी माधवी .." तिच्याजवळ जाऊन म्हणाली , " तू नको काळजी करुस ग . उलट तू मला वाचवलस . बघूया काय म्हणतो हा प्रणव उर्फ प्रशांत . "



मंदार आला . माधवी एकदम पुढे होऊन त्याच्या गळ्यात पडली .

" इट्स ओके , माधवी . तुला जॉब ची कमी नाही , पण ह्या बत्रा ला सोडायचे नाही ."

तीने घरी आल्या नंतरचा सगळा किस्सा सांगितला .

" काय माणूस आहे हा ! ह्याचे काय संबंध आहेत बत्राशी हे बघूया . त्याला सोडणार नाही आपण .किती कुटील आहे बघ हा . सानियाशी जवळीक वाढवली , आपल्याला त्रास द्यायला . ती कशी फसली ग ह्या फाटक्या माणसाच्या जाळ्यात ? माधवी , तो नक्की काहीतरी व्यवसाय करत असला पाहिजे . मला बत्रा ला भेटावं लागले . "

" आता सानिया गेलीये त्याला भेटायला . बघूया ती काय म्हणते ."

" आणि तू अर्णवची काळजी करूच नकोस . त्याचं वय लहान असल्याने कायद्याने तो आपल्याचकडे रहाणार .त्याला हे माहितेय म्हणून असा बेकायदेशीर मार्ग वापरतोय . "

" मंदार , किती छान चाललं होतं आपलं . का आला हा मध्ये ? का घडलं हे असं ? "

" तुला नोकरी सोडायची होती तर मला सांगायचं न बाई , एवढं सगळं घडवून आणलस , सॉलिड आहे हा तू !!"

" तुला बरी गम्मत सुचतेय रे !! "

मंदार नि तिचा हात हातात घेतला .

" ही साथ जोपर्यंत आहे न , तोपर्यंत कुठल्याही संकटाची भीती नाही ग मला . मुळात ते संकट आहे असे वाटतच नाही ."

तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले .

" मंदार , तुला अजूनही चित्रा ची आठवण येते का रे ?"

" तू ते पुस्तक वाचलंय न अमृता प्रीतम चं ...ती म्हणते ....त्याची आठवण येते , पण आता त्याची आठवण मला जाळत नाही . "

" हो मलाही आठवतं न प्रशांत चं वागणं ....शेवटी घडल्या गोष्टी आठवणारच की . पण वर्तमान सुखाचं असलं की भूतकाळाचा त्रास होत नाही हे खरं ."

" आठवतं का तू कसली घसरली होतीस मॉल मध्ये ....

" होरे ...आत्ता हेच सांगत होते सानियाला ." आपण कसे मॉल मध्ये भेटलो ........दोघे आठवत होते ......

माधवी मॉल मध्ये गेली होती .

थोडे मोठ्या साईझ चे कपडे घ्यायचे होते . बघते तर समोर मंदार . तिच्याकडे बघून अगदी गोड हसला .

" आज खरेदी का मिस्टर मंदार ? "

" नाही , मॉल मध्ये डॉक्टर कडे आलो होतो ." खूप मिश्किल होता मंदार .

तिला हसू आलं .

तुम्हाला एक सांगायचंय .

" आपण फुड कोर्ट मध्ये बसूया ."

दोघे वरती फूड कोर्ट ला गेले .

" लेट मी गेस मॅडम ...अ ...तुम्ही आता एकदम फ्री , दिसताय बाय माईंड म्हणजे ..."

" हो ..पाश मोकळे केले ..

" माझं ही तसंच बरं का .आमचं खटलं म्हणजे माझं कुंकू जरा जास्त महत्वाकांक्षी निघालं . त्यांना हवेत उडायचं होतं ,आणि आम्ही जमिनीवर सरपटणारे ...मग काय , आमचे पण पाश मोकळे ..."

"ओह .."

" चित्रा काही वाईट स्त्री नव्हती .माझं प्रेम होतं तिच्यावर .पण जर आधी बोलली असती की तिला एअर हॉस्टेसच व्हायचंय , संसार करायचा नाही , तर हे पुढचं टळलं असतं . .............हे सगळं आठवत होते दोघे . बराच वेळ झाला होता .

मंदार म्हणाला , " मॅडम , आपण भूतकाळाची सैर करून आलो पण माझा खांदा वर्तमानात आहे , दुखतोय ." हसून माधवी उठली .

रात्री जेवणं आटोपल्यावर बऱ्याच उशिरा सानिया आली . स्वतःच्या घरी न जाता माधवी कडेच आली .

मंदार होताच समोर .

" हाय सानिया . माधवी s , सानिया आलीये . "

माधवी अधीरतेने बाहेर आली .

" काय झालं सानिया ? काय म्हणाला प्रशांत ?"

सानिया सांगू लागली ......ती प्रणव उर्फ प्रशांत ला भेटायला गेली होती तेव्हाचा प्रसंग...



" प्रणव , तू मला बोलावले नाहीस ? खालीच थांबलास ?"

"..न ..नाही , कॉल करणारच होतो . इतक्यात तू आलीस ."

" आज बरा वेळ मिळाला बिझनेस मधून . " ती जरा लाडातच बोलली .

" आपके लिये तो वक्त ही वक्त है ."

" तू सांगितले नाहीस कधी की कशाचा बिझनेस करतोस . चल आपण तुझी वर्क प्लेस बघूया . "

" ओके !!! चलो ! "

प्रशांत तिला ' थोर्ब ' मध्ये घेऊन गेला . तिथे बत्रा होताच .

तिथे बत्रा शी तिची हा 'माझा पार्टनर ' म्हणून ओळख करून दिली . त्याच्या हे लक्षात आले नाही की थोर्ब चे बाहेरच्या देशातील कन्सल्टंटस हे तिच्याच हॉटेल मध्ये थांबतात . आणि थोर्ब च्या मार्केटिंग हेड ची सानियाशी चांगली मैत्री आहे .

" मी खूप खुश आहे प्रणव .तू एवढ्या मोठ्या मशीन सर्विस एजेंसी चा मालक आहेस ." तुझे वडील पण हाच व्यवसाय बघतात का ? "

" नाही , त्यांचा दुसरा बिझनेस आहे ."

सानिया ला कळत होते की हा खोटं बोलतोय .

" आज आपण भेटूया का तुझ्या आई वडिलांना ? "

" तुला काय झालं अचानक सानिया ? फार चौकश्या चालू आहेत . "

" अरे , फार एकटी पडते मी . एवढा मोठा फ्लॅट आहे , इतके दागिने , इतका पैसा ...आता सेटल व्हावं म्हणतेय . आपलं कुणी असावं असं वाटतंय . "

अंदाज घेण्यासाठी तिने एक खडा टाकून बघितला .म्हणाली , " तुझी मिसेस पण कंपनीचे काम बघते का ? "

आतुरतेने त्याच्या उत्तराची वाट बघत असतांनाच तो म्हणाला , " तिचं नि माझं पटत नाही . मी टिकून ठेवतोय करण तिचे वडील थोर्ब चे प्रेसिडेंट आहेत ."

म्हणजे ह्याने आणखी एक लग्न केलंय आणि त्याच्या जोरावर हा इतका माज करतोय तर !!

सानियाला खूप हायसं वाटलं . माधवी मुळे आज ती मोठ्या संकटातून वाचली होती . ....हे सगळं तिने माधवी -मंदार ला सांगितलं .

" थँक्स सानिया . तू खूप मोठं काम केलंय . म्हणजे ह्याने माधवी सारखच आणखी एक कुटुंबाला फसवलंय . आता आपण त्याला त्याची जागा दाखवू ." मंदार ला खूप मोठी माहिती हाती लागली होती .

" थोर्ब चे प्रेसिडेंट म्हणजे,अजित पोरवाल . मी भेटलीये त्यांना अनेकदा .

त्यांची मुलगी ....अ s ...हा ...नीता पोरवाल ! शीट !! ह्याला नीता बरी भेटली , आणि आता हा तिच्याही आयुष्याशी खेळतोय !! " माधवी चिडून म्हणाली . "मंदार , ह्या माणसाला असा धडा शिकवू न , की पुन्हा कुणाच्या वाट्याला नाही गेला पाहीजे ."



क्रमश:

© अपर्णा देशपांडे


सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने