© अपर्णा देशपांडे
सानिया ने फार मोठे काम केले होते .
माधवीला याचे आश्चर्य वाटले की नीता पोरवाल पर्यंत प्रशांत पोहोचलाच कसा ??? नशेतून बाहेर येऊन दुसऱ्या लग्नासाठी तयार होण्याची त्याची कुवत नव्हती .

हे डोकं त्याच्या वडिलांचं असणार . ते फार लालची आणि चाणाक्ष होते . दुसऱ्याच्या पैशावर जगणारे हे परजीवी लोक , आता सानियावर जाळं टाकताएत .
किती प्रकारचे लोक आले माझ्या आयुष्यात .
प्रशांत , सासूबाई , सासरे , मंदार हे सगळे किती वेगवेगळ्या स्वभावाचे आणि आता अर्णव ही .
त्याच्या विचाराबरोबर तिच्या मनात भीती आणि काळजी दाटून आली .त्याने अर्णव ला पळवून नेले तर ? तिची झोपच उडाली .
" माधवी , पुन्हा जागी ?" मंदार उठून विचारत होता .
" मंदार , त्याने अर्णव ला पळवून नेलं तर ? "
" आपण इन ऍडव्हान्स पोलीस इंटिमेशन देऊन ठेवूया . पण तो असं करणार नाही ."
" त्याचं दुसरं लग्न पण टिकणार नाहीये . आता त्याला आधार हवाय ,म्हणून अर्णव ची आठवण आलीये . त्याच्या बद्दल प्रेम आहे म्हणून नाही ."
" माधवी , तुझ्या जागे रहाण्याने समस्या सुटणार आहे का ? ...तू असं कर , छान छान विचार कर ......नाहीतर आपलेच सुरुवातीचे रोमान्स चे दिवस आठव ...गुड नाईट !"
माधवी ला त्याच्या कुल रहाण्याचे नेहेमीच आश्चर्य वाटे .
लग्ना आधी देखील जेव्हा ते पाहिल्यांदा जेव्हा मॉल मध्ये भेटले होते , तेव्हा फूड कोर्ट मधून एसकलेटर्सने खाली उतरताना तिचा पाय घसरला आणि ती पडणार इतक्यात मंदार ने तिला पकडले होते .

त्या पायऱ्या मध्ये तिची ओढणी अडकणार ,इतक्यात त्याने अलगद तिला उचलले . तिला काही समजायच्या आत त्याने हळुवार तिला खाली आणून उतरवले होते .
तिला ही भावना नवीन होती. प्रशांत ने तिच्याकडे कधीच लक्ष दिले नव्हते . कधी एकदा चुकून थोडासा प्रेमाचा उमाळा आला होता , आणि निसर्गाने तिच्या उदरात अंकुर पेरला होता .
तिने मंदार ला थँक्स म्हणण्यापूर्वीच तो म्हणाला , " हं ,हं धन्यवाद नका म्हणू . मी असच कसं तुम्हाला पडू देणार ? म्हणून उचलले ."
त्यानंतर ते नेहमी भेटायला लागले .

प्रशांत च्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदार चे मिश्किल , हळुवार प्रेमळ वागणे तिला अतिशय मोहवून गेले .
एक दिवस ऑफिस सुटल्यावर समोर बघते तर मंदार तिला न्यायला आला होता . अतिशय सोबर , साधा पण आकर्षक दिसणारा तो वेगळाच भासला तिला .
तिला बघून तो लगेच समोर आला .
" अरे ! मंदार !! इकडे कुठे ? "
" कुठे काय , जिमिंग करायला आलोय . " त्याचं आपलं नेहेमीचं मिश्किल उत्तर .
" विनोद चांगला करता येतो ."
" स्वयंपाक सुध्धा बरं का !! लगेच डेमो देऊ शकतो . येताय ? "
" अं s , चालेल . मी बाबांना फोन करून सांगते , म्हणजे ते काळजी करणार नाहीत ."
दोघे मंदार च्या घरी गेले . घर छोटेच पण छान होते . तिला आवडला त्याचा टापटीप पणा .
" तुम्हाला आता असं काही खास खावसं वाटतंय ? म्हणजे असा वाटत असतं असं ऐकलं मी ,म्हणून विचारतोय ."
" नाही . तुम्ही जे खिलवाल ते चालेल . माझे काही असे डोहाळे नाहीत . ह्या बिचाऱ्या जीवाला खूप काही pamparing ची सवय नाही लावायचीये मला ."
" हे बरोबर नाही हा माधवी . तुमच्या इश्यूजचा त्रास ह्या जीवाला का ? तुम्ही आई म्हणून कुठे ही कमी नाही पडणार आहात , मला खात्री आहे ."
" तुम्हाला आवड आहे लहान मुलांची ?"
" अरे , खु s प . कॉलनी मध्ये जी मुलं आहेत ती खूप जीव लावतात मला ."
" हे बघा . बोलता बोलता सँडविच तयार . आप के लिये हाजीर है , व्हेज सँडविच विथ एक्सट्रा चीज !! ....
हे घ्या आणि मला वीश करा ,कारण आज माझा वाढदिवस आहे " .
" अरे !! कमाल आहे हां . आधी का नाही सांगितलं ? हॅपी बर्थ डे !!"
" त्यात काय मोठं . आता ही तारीख लक्षात ठेवा आणि पुढच्या वर्षी मला आठवणीने शुभेच्छा द्या ."
" पुढच्या वर्षी ? बापरे , काय माहीत तेव्हा आपण कुठे असू ."
" आपण एकत्र असू शकतो , ह्याच घरात , काय म्हणता ?" पुन्हा डोळ्यात तेच खट्याळ हसू .
" ....."
" आपण एकेरीवर येऊया ....माधवी , आपण दोघेही एकाच परिस्थितीत आहोत . आपण एकमेकांचे दुःख चांगलंच समजू शकतो .

मला तू आवडलीस .विचार कर , घाई नाही , पण तुझ्या अपत्याने जन्म घेतांना त्याला /तिला आई वडील दोघेही असावेत . माझ्या आईला देखील तू आवडलीयएस . ती सध्या गावी गेलीये ,
पण ती ह्या निर्णयाने खूप खुश असेल ."
माधवी नुसतीच भरल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत होती .....
" मला ..मी ....काय .."
"इट्स ओके माधवी . मी समजू शकतो .
पुरुष बोलून मोकळा होतो ग , स्त्री ला अनेक कंगोऱ्यातून विचार करावा लागतो . तू तुझा वेळ घे ."
ती उठली , डोळे गळत होते ,आणि तिने मंदार कडे बघून दोन्ही हात पसरले .
मंदार पुढे झाला आणि आत्यंतिक अलवार पणे तिला कवेत घेतले .
ती त्याच्या कानातम्हणाली , " ह्यापुढे तुझा प्रत्येक वाढदिवस आपण एकत्र साजरा करायचा . हॅपी बर्थ डे मंदार ."
" तू मला दोन जीवांची स्वीकारलंस वगैरे भाषा मी बोलणार नाही मंदार . असं बोलून तुझ्या मोठेपणाला डाग नाही लावणार . मी आणि हे मूल आजपासून तुझंच ."
त्याने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले .
" चल तुझ्या वडिलांचा आशीर्वाद घेउया . "

...................................
ह्या सगळ्या सुखद आठवणीत ती असतांना गालातल्या गालात हसली . शेजारी अर्णव आणि मंदार झोपले होते .
मंदार ने मान वर केली अन म्हणाला ,
" ह s , आता कसं ! मी किती रोमँटिक आहे न , मी झोपलो असलो तरी तुला रोमँटिक बनवू शकतो की नाही ? "
" आला मोठा !! झोप उगी !! " ती म्हणाली आणि तीही झोपेच्या आधीन गेली .
सकाळी सानिया येऊन सांगून गेली की आज प्रशांत उर्फ प्रणव काही कामाने शहराबाहेर आहे . त्यामुळे ठरल्याप्रमाणे माधवी तयार झाली आणि निघाली .

ती प्रशांतच्या म्हणजे नीता पोरवाल च्या घरी गेली .
क्रमश:
© अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.