© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
"संजू, मला आणि आईला एका महत्त्वाच्या कामासाठी नाशिकला जावं लागतंय.. दोन दिवसांसाठी! मुंबईला घरी पोहोचताच संध्यानं घोषणा केली.
"तू इथे करशील ना मॅनेज?" संजयचे डोळे चमकले.
"घरी मी सांभाळून घेईन. पण आश्रमाचं काय?" संजयनं काळजीनं विचारलं.
"आपला मनोज आहे ना.. तो आणि त्याची बायको विशाखा दोघांना सांगितलंय तिकडे बघायला.. दोन दिवसांचा तर प्रश्न आहे.. आज सकाळी जायचं अन् उद्या रात्री परत यायचं!"
मनोज म्हणजे आश्रमात काम करणारा सहाय्यक आणि त्याची बायको विशाखा!

मनोज स्वतः अनाथ असल्यामुळे त्याची राहण्याची अन् जेवण्याची व्यवस्था आश्रमातच होती. त्याचं लग्न संध्यानं स्वतः पुढाकार घेऊन विशाखाशी जुळवलं होतं.
विशाखाची संध्याला बरीच मदत व्हायची. कधी अडीनडीला हे जोडपं वृद्धाश्रमाची सगळी व्यवस्था चोख पार पाडत होतं.
संध्याच्या आईच्या वेळेपासून ही दोघं आश्रमात कार्यरत होतं. गेल्या सहा महिन्यांपासून संजय अन् मनोज दोधांचीही चांगलीच गट्टी जमली होती.
सकाळी लवकर आवरून संध्या नाशिकला निघून गेली अन् संजय त्याच्या कामाला!!
संजयची स्टोरी जवळपास पूर्ण झाली होती. फक्त मध्ये एक साखळी जोडायची राहिली होती. कदाचित संध्या म्हणाली त्याप्रमाणे त्यांना अल्झायमरमुळे आपला पत्ता सापडला नसावा..
पण तरीही हैद्राबादच्या वेश्या वस्तीतून करीम नगरला त्यांची रवानगी का आणि कशी झाली ह्याची स्टोरी बनवायला हवी होती.
"सुंदराबाईंना त्यांचा 'हमदर्द' वाटलेला पुरूष त्यांना झोपडपट्टीतून स्वतःच्या घरी घेऊन गेला.. सुंदराबाईंना हवा असलेला ऐशोआराम त्यांना त्यांच्या त्या 'हमदर्द'कडे मिळाला.

त्या जरी तिथे 'ठेवलेली' बाई म्हणून राहत असल्या तरी उंची कपडे, दागिने, अत्तरं, गाड्या ह्या कशालाच कमतरता नव्हती.
त्यात त्यांना दारू पिण्याची सवय लागली.. अन् वाढता वाढता ती इतकी वाढली की त्या व्यसनात आकंठ बुडाल्या." संजयने स्वतःचं स्क्रिप्ट लिहायला सुरूवात केली.
"आता त्यांचे त्या 'हमदर्द' सोबत पैशांच्या कारणामुळे खटके उडू लागले.

सुंदराबाईंचं तारूण्य आता ओसरू लागलं होतं.. अन् त्यांच्या 'हमदर्द'चा त्यांच्यातील इंटरेस्ट देखील कमी होत गेला.
त्यामुळे तो पैशांच्या बाबतीत हात आखडता घेऊ लागला.
एक दिवस तो 'हमदर्द'च त्यांना वेश्या वस्तीत सोडून आला." संजयनं आपलं स्क्रिप्ट पुन्हा पुन्हा वाचलं. अन् तो स्वतःच्या कल्पनाशक्तीवर खूष झाला.
जर पुढे कधी ह्या गोष्टी सुंदराबाईंच्या आयुष्यात घडल्याच नाहीत असं सिद्ध झालं तरी त्याचा संजयला किंवा त्याच्या न्यूज चॅनलला फारसा फरक पडणार नव्हता.

कारण एकतर ती बातमी दाबून टाकता आली असती.. किंवा सरळ एक माफी पत्र देऊन मोकळं होता आलं असतं.
प्रेक्षकांना जे हवं ते देणं हे त्याच्या चॅनेलचं कर्तव्य होतं. अन् जास्तीत जास्त लोकांना मसालेदार आवडतं हे ही त्याला आता ठाऊक झालं होतं.
"आपण चांगलीच प्रगती करू लागलोय!" संजय मनाशीच म्हणाला.. आणि पुढच्या तयारीला लागला.
**********
'ब-बातम्यांचा' ह्या न्यूज चॅनेलवर दुपारच्या दोनच्या बातम्यांमध्ये ब्रेकिंग स्टोरी होती.

"सुमारे साठ वर्षांपूर्वी गाजलेली अभिनेत्री सुंदराबाई आज असहाय्य अवस्थेत जिव्हाळा वृद्धाश्रमात दाखल!!"
सोबतच सुंदराबाईंचा भूतकाळ.. त्यांच्या आईचं घर.. घराण्याचा नाचगाण्यांचा इतिहास.. जुन्या घराचे फोटो.. तेथे आता तयार झालेली बकाल वस्ती.

त्यांचा चित्रपट प्रवेश.. वयाने वडीलांसारख्या असलेल्या देशमुखांशी लग्न.
मॅनेजरशी विवाहबाह्य संबंध.. त्यांचं देशमुखांशी काडीमोड न घेताच मॅनेजर सोबत पळून जाणं.
हैद्राबादचं झोपडपट्टीतलं वास्तव्य.. दुसऱ्या नवऱ्याचा अत्याचार.. त्याचा मृत्यू.. सगळं सगळं.. अगदी तपशीलवार अन् संगतवार मांडलं होतं.. आणि सुंदराबाईंचा आजचा हलाखीतला फोटो पुरेशी सहानुभूती मिळवत होता.
पुढे त्यानं स्वतः लिहिलेली काल्पनिक स्टोरी बेमालूमपणे मिसळली होती. अन् ती सुंदराबाईच्या भूतकाळाशी इतकी चपखल जुळत होती की कुणालाच त्याच्या खरेखोटेपणाबद्दल शंका आली नाही.
रात्री आठच्या बातम्यांमध्ये सुंदराबाईंची मुलाखत प्रसारीत करण्यात येणार होती अन् त्याकरिता जिव्हाळा वृद्धाश्रम सज्ज झाला होता.

सुंदराबाईंना अल्झायमर होता अन् त्यामुळे त्यांना जुनं काहीच आठवत नसणार ह्याबाबत संजय निःशंक होता.
*********
दुपारच्या बातम्यांमध्ये जिव्हाळा वृद्धाश्रम अन् त्यातील सुंदराबाईंचा उल्लेख कळताच आश्रमातील टीव्हीवर देखील 'ब-बातम्यांचा' चॅनेलच्या ब्रेकिंग न्यूजचा मारा सुरू झाला.

वृद्धाश्रमातील आज्जी मात्र अजूनही निर्विकार होत्या.. जणू आजूबाजूला आलेल्या वादळाशी त्यांना काहीच देणंघेणं नव्हतं.
संध्या अन् तिची आई महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने दोघींचेही फोन बंद होते.. त्या मात्र ह्या ब्रेकिंग न्यूजपासून अनभिज्ञ होत्या.
सायंकाळी पाच वाजता मीटिंग संपली अन् संध्याने तिचा मोबाईल सुरू करताच तिच्या फोनवर नोटिफिकेशन्सचा मारा सुरू झाला.

जिव्हाळा वृद्धाश्रमातील सुंदराबाई अन् त्यांचा भूतकाळ!!
अल्पावधीतच त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड देखील झाले होते.
ह्या सर्व बातम्यांचा उगम 'ब-बातम्यांचा' चॅनेल वरून झालाय हे समजताच संध्याच्या अंगाचा तिळपापड झाला.

तिरीमिरीत तिनं संजयला फोन लावला. तर फोन व्यस्त! संजय अभिनंदनाचे फोन स्वीकारण्यात व्यस्त झाला होता.
सुंदराबाईंची मुलाखत होऊ नये म्हणून तिनं मनोज अन् विशाखाला एका पाठोपाठ एक कॉल केले.

पण त्यांचेच काय तर आश्रमातल्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद होते.. एक हजार रुपये एव्हढ्या मोबदल्यात दुपारी दोन ते रात्री आठ एवढाच वेळ काय.. पण संपूर्ण दिवसरात्र फोन बंद ठेवायला देखील त्यांची काहीच हरकत नव्हती.
सायंकाळी सहा वाजता जेव्हा आज्जींना कॅमेरासमोर बसवण्यात आलं तेव्हा मात्र त्या ढसढसा रडू लागल्या.
"सुंदराबाई, तुम्हाला तुमचा तो 'हमदर्द' कोण ते सांगता येईल का? त्याने तुम्हाला वेश्या वस्तीत का नेऊन ठेवलं? तिथून तुम्ही करीमनगरला कशा पोहोचलात? तुम्हाला काही आठवतंय का?" संजयमधला रिपोर्टर प्रश्न विचारू लागला.
"तू माझी इतकी माहिती काढलीच आहेस तर ही माहिती मिळवणं देखील तुला कठीण नव्हतं पोरा!"

आजींचा आवाज ऐकून संजयला धक्का बसला.. ह्याचा अर्थ आजींना विस्मृती झाली नव्हतीच?
"मी सुंदराची माया झाले ते माझा वेदनादायी भूतकाळ विसरण्यासाठी!! माया म्हणून मी माझ्यासारख्या वाकडं पाऊल पडलेल्या महिलांना माया लावायचा प्रयत्न केला.

पण तू अन् तुझ्यासारखी धेंडं माझा भूतकाळ घेऊन माझ्या पाठी कुत्र्यासारखी लागलेली.. अगदी म्हातारपणात देखील!!
म्हणून मी माझी ओळखच पुसून टाकली अन् जिथे रस्ता सापडेल तिथे भटकू लागले.. मुक्याचं सोंग घेऊन!! पण तू मला आज पुन्हा शोधून जगासमोर आणलंस.. माझ्या नकोशा भूतकाळासह!!"
"होय! मी नायकीणीच्या पोटी अनौरस संतान म्हणून जन्म घेतला. लग्न केलं पण रखेल असल्यासारखी राहिले. विवाहबाह्य संबंध ठेवले.

दुसरा नवरा गेल्यानंतर तिसऱ्या माणसासोबत पळाले.. अगदी खरंय.. पण असा चारित्र्यहीनतेचा शिक्का घेऊन मला मरायचं नव्हतं!
पण आज तू मला माझ्या अप्रिय भूतकाळासह लोकांसमोर उभं केलंस.. केवळ तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी!!
त्यासाठी तुझ्या आजीच्या वयाच्या बाईचा बाजार मांडायला देखील तू कमी केलं नाहीस!!"
"मला तुला काहीही सांगायचं नाहीये.. तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी तू माझं ह्रदय 'ब्रेक' करतोय हे कळतंय का तुला??" सुंदराबाई बोलत सुटल्या होत्या..
संजय समोर मोठाच पेच पडला.

आता ही मुलाखत कशी प्रसारीत करायची? त्याच्या कॅमेरामन राहुलनं हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला.
"तसंही सुंदराबाई काहीच बोलत नाहीत.. मुक्याचं सोंग घेऊन वावरतात अन् त्यांना विस्मृती झाली आहे हे आश्रमातल्या लोकांना आणि पोलिसांना माहीत आहे.

तेच आपणही कायम ठेवू. मी त्यांचे धाय मोकलून रडतानाचे काही शॉट्स घेतलेत.. तेव्हढे फक्त टेलिकास्ट करू.." राहुल पाटीलच्या हुशारीचं संजयला कौतुक वाटलं..
सोबतच आश्रमातल्या काही वृद्धांचे सुंदराबाईंबद्दल काही बाईट्स घेऊन अन् त्यांची आश्रमातील दिनचर्या चित्रीत करून दोघांनी अर्ध्या तासाची चित्रफीत तयार केली.
ही आश्रमातील चित्रफीत प्रसारीत झाल्यावर संजयवर पुन्हा अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.. ह्या ब्रेकिंग स्टोरीने त्याला त्याच्या करियर मध्ये 'ब्रेक' दिला होता.

त्याच्या नशीबाची दारं उघडली होती.
अभिनंदनाच्या अनेक इमेल्ससह दोन तीन प्रथितयश चॅनेल्सच्या ऑफर्स त्याच्या मेलबॉक्स मध्ये येऊन पडल्या होत्या..
त्यातच एक ईमेल संध्याची पण होती.. "आय हेट यू..संजय.. आय क्विट यू.. मी तुझ्या सोबत आणखी नाही राहू शकत!! बाय अँड सी यू नेव्हर!!"
**********
संजय हतबल होऊन खाली बसला.. एका ब्रेकिंग न्यूज मुळे काय काय घडलं??
त्याच्या चॅनेलला 'ब्रेकींग' न्यूज मिळाली ..
त्याला करियर मध्ये 'ब्रेक' मिळाला..
सुंदराबाईंचं ह्रदय 'ब्रेक' झालं..
पण सगळ्यात वाईट म्हणजे..त्याचा संसार सुरू होता होताच 'ब्रेक'अप झाला!
समाप्त

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा