साथ ( भाग 8 )

© अपर्णा देशपांडे




संध्याकाळी रॉयल कॅफे मध्ये बत्रा वाट पहात बसला होता .तिथे माधवी समीरला घेऊन आली .

" मिस्टर बत्रा , हे समीर .यांना पंधरा मशिन्स हव्या आहेत . ज्यापनीज कंपनीच्या . तुम्ही एन्ड
   टू एन्ड सर्विस द्यायची . करणार ? "

" हॅ s हॅ !! जरूर करणार . पण ....

तुमची गोष्ट वेगळी होती मॅडम . "

" पण तुम्ही तर सांगितले ना आमच्या कंपनीला , की मी सहा टक्के कमिशन घेतले .."

" मॅडम , ते साहेबांचे जावई आहेत ना , प्रशांत सर , त्यांच्या सांगण्यावरून केले . त्यांनी मला पैसे दिले होते त्यासाठी . "

माधवी चा संताप होत होता हे ऐकताना . ह्या माणसाच्या एका खोट्याने तिचा जॉब गेला होता .

" बाकी कंपनीचे लोक किती घेतात ? "

" पाच टक्के सर ." बत्रा लाळघोटे पणा करत म्हणाला .

" ठीक आहे . मी उद्या ऑफिस मधून पंधरा मशिन्स ची ऑर्डर काढतो , एक अट आहे . आमच्या कंपनीचे वार्षिक संमेलन आहे . तिथे सगळे एम्प्लॉयी असतील . 

त्यांच्या समोर येऊन सांगायचे की माधवी मॅडम नि आज पर्यंत एकही पैसा न घेता कंपनीचे काम केले आहे , आणि तू खोटे बोललास ."

" सर , ते ...मी ..कसं ..

" हे बघा , तुम्ही जपानी कंपनी कडून भरगच्च कमिशन घेणार , त्यातला हिस्सा नाही मागत आहे मी . नाहीतर पोरवाल सरांकडे जाऊ का ? ते लगेच ...

" नाही नाही , नको . मी येतो .मी सांगतो तुम्ही म्हणाल तसं ."

माधवी ला अतिशय दिलास मिळाला . तिने खूप कृतज्ञतेने समीर कडे बघितले .

माधवी घाईघाईने घरी गेली . मंदार तिची वाट बघत होता . दार उघडल्याबरोबर तिने मंदारला मिठी मारली ." मंदार , आपण चुकीचे तर नाहीना करत आहोत ? "

" तुकाराम महाराज काय सांगून गेले ,

' भलेही देऊ कासेची लंगोटी , नाठाळाचे माथी हाणू काठी ।।

मग काठी हाणायची वेळ त्यानेच आणली न , हो की नाही ? ..चल लवकर . "

" मंदार , मला वाटतंय की अर्णवला एक आणखी भावंड असावं . "

" बायका न , कुठला विषय कुठे आणि कधी काढतील नेम नाही बाबा . तशी हरकत नाही , चल तयारी करू ."

" काहीही काय मंदार !! आत्ता आपल्याला समीर कडे जायचंय !!.."

" मी तेच तर म्हणतोय माधवी !!

समीरकडे जायची तयारी करायचीये न !! ....तुला काय वाटलं ? " त्याने नाटकीपणे डोळे मिचकावत म्हटलं .

" मंदार ,तू माझा मार खाशील हा !!"

तिला तश्या परिस्थितीत ही हसू आले .

"चल मंदार , आत लप लवकर . प्रशांत येतोय ." ति त्याला आत ढकलत म्हणाली .

" जुना आला की नव्याला विसरू नको बरं बाई ! "

" आता खरंच मार खाशील हं !! आत हो !!"

मंदार आत लपला .

प्रशांत आला .

" ये प्रशांत . मंदार फारच हलकट निघाला रे . काय काय डिमांड केलीये त्याने . पण दागिने आणि पैसे मिळाल्यावर सोडेल तो अर्णवला ."

" हे बघ .तुझे आणि निताचेही दागिने .

आणि ही कॅश . " त्याने पुडके समोर धरले . म्हणाला , " मीच जाऊ का ?तुझ्याशी काही दगा फटका केला तर ?"

" नाही नाही . त्याने बजावून सांगितले आहे की कुणालाही न घेता ये . ..

त्याचा मुलगा थोडीच आहे , त्याला काय जातंय ? जीव आपला जळतोय न  
प्रशांत ?"

" अ ? हो s , हो न ...पण त्याने हे सगळं घेऊन अर्णवला वापस दिलंच नाही तर ?"

" इतकी हिम्मत नाहीये त्याच्यात .तू काळजी नको करू . मी आपल्या मुलाला घेऊनच येईन . तू तुझ्या वडिलांच्या घरी थांब .माझ्या फोनची वाट बघ ."

प्रशांत गेला . करोडो रुपयांच्या प्रॉपर्टी ची त्याला इतकी भुरळ पडली की तो सारासार विचारशक्ती घालवून बसला होता . 

पराकोटीची लालच माणसाला दुर्बल बनवते ,तसं त्याचं झालं होतं .

मंदार बाहेर आला , " चल लवकर , आता भराभर हालचाली कराव्या लागतील ."

" मी जात जाता नीताला फोन करते ."

गाडीत बसल्याबरोबर तिने निता फोन लावला . अजित पोरवाल सरांना पण निरोप द्यायला सांगितले .

प्रशांत ला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . इतक्या विनासायास सगळे होतेय , आणि मंदार आता माधवीच्या मनातून उतरेल याचा त्याला

आनंद होत होता . इतक्यात दारावर थाप पडली . त्याने अधीरपणे दार उघडले . दारात पोलीस !!

" पोलीस ? का? मी काय केलं ? "

" तुझ्या घरी घेऊन चल ."

" हेच माझं घर .हो , खरं ! "

" आधार वर तर दुसराच आहे ! तिथे चल ."

" ते माझ्या सासऱ्यांचे घर आहे हो , माझे नाही .."

पोलीस त्याला घेऊन नीताच्या घरी गेले .

प्रशांत ने किल्लीने दार उघडलं आणि हाक मारली ..." नीता !! "

,कुणीच बाहेर आलं नाही म्हणून पोलीस आत गेले . नीता जमिनीवर पडली होती आणि मागील अडगळीच्या खोलीत अर्णवला एका खुर्चीत बांधून ठेवले होते . तोंडात बोला कोंबलेला होता .

हे बघून प्रशांत ला ताबडतोब कळाले की डाव काय आहे ..तो ओरडायला लागला , साहेब मी काही नाही केलं ...हा एक ट्रॅप आहे . मला अडकवताएत हे लोकं .

इतक्यात अजित पोरवाल आले .

" नीता !! एम्ब्युलन्स मागवा !! मला भीती होतीच की एक दिवस हा माझ्या मुलीचा जीव घ्यायचा प्रयत्न करणार !! बेड्या घाला साहेब ह्याला . याने वाटोळं केलं हिच्या आयुष्याचं . "

मागून मंदार , माधवी आणि सानिया पण आले .

" सानिया तू ? तू सांग ना यांना की मी कसा माणूस आहे " प्रशांत ओरडत होता .

सानिया पुढे गेली आणि पूर्ण ताकद लावून फाडकन त्याच्या थोबाडीत मारली .

माधवी ने पळत जाऊन अरणावला जवळ घेतले आणि तिने ही खाडकन प्रशांतच्या मुस्काटात मारली .

" साहेब , मी सगळे पुरावे जमा करते .

याने आम्हा सगळ्यांचा गुन्हेगार आहे ."

त्याचं बखोटं पकडून पोलीस त्याला घेऊन गेले . माधवी निताजवळ गेली .

ती उठून बसली होती .

" हे घे तुझे दागिने नीता . थँक्स ,तुझी खूप मदत झाली ." तिने निताचे दागिने वापस केले .

" माधवी , समीर चा फोन आहे .बत्रा ने चूक कबूल केलीये . तुझे व्ही पी तुला वापस बोलावणारेत म्हणाला ."

" नाही मंदार , आता तिथे पुन्हा नाही जाणार ."

" कारण आमच्या 'थोर्ब ' ला माधवी सारख्या व्ही .पी . ची नितांत गरज आहे . " पोरवाल सर म्हणाले . आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या .

********

" माधवी , माझी फाईल कुठे आहे ग ? " मंदार विचारत होता .

माधवी घाईघाईने आत गेली .

मंदार मस्त कॉटवर लोळत होता .

" अरे , वेळ होऊन गेलीये , तुला ऑफिस नाही का आज ?"

" तू म्हणालीस ना , की अर्णव ला एका भावंडाची गरज आहे , मग त्याची तयारी नको का करायला ? " मंदारने नेहमीच्या खोडकर पद्धतीने डोळे मिचकावले .

(समाप्त )

© अपर्णा देशपांडे


सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने