© सौ. अनुजा धारिया शेठ. आणि सौ.स्मिता गायकुडे
एका लहान गावात लहानाच्या मोठ्या झालेल्या या मुली. मुली कसल्या आता ५०शी उलटून पण तरूणवर्गाला लाजवतील असा उत्साह होता दोघींमध्ये. नुकतेच त्या दोघींना एका संस्थेकडून काही पुरस्कार जाहीर करण्यात आले होते, त्यामध्ये ह्या दोघींच नाव वाचून काही जुनी नाती नव्याने जोडायचा प्रयत्न काही माणसे करत होती.
काही दिवस असेच गेले बऱ्याच वर्षांनी सविताची गोड बातमी आली, सासू तिची खूप काळजी घेत होती. पण तरीही तिच्या मनात सुजाचा विचार येतच होता. कसतरी करून सूजा एकटी असताना सविता तेथे आली.
"एक काम करा तुम्ही माझ्यासोबत आमच्या संस्थेत चला.. तुमची माहिती घेऊन आम्ही तुम्हाला काम देऊ.."
त्या दोघी संगीता मॅडमसोबत संस्थेत जातात.. आपली सगळी खरीखुरी माहिती देतात.. सविताचं बारावीपर्यंत शिक्षण झालं असल्याने तिला एका ठिकाणी चौथीपर्यंतच्या मुलाचं ट्युशन घ्यायचं काम मिळतं आणि सुजाला त्या संस्थेत शिलाईच काम शिकवलं जातं नंतर तिला महिन्याला काही पैसे घेऊन शिलाई मशीन दिली जाते..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
सुजाता पार्टे आणि सविता पार्टे हि दोन नाव सगळीकडे झळकत होती. कोणतेही चॅनल, कोणताही पेपर सगळीकडे ह्या दोघींचीच नावे..
एका लहान गावात लहानाच्या मोठ्या झालेल्या या मुली. मुली कसल्या आता ५०शी उलटून पण तरूणवर्गाला लाजवतील असा उत्साह होता दोघींमध्ये. नुकतेच त्या दोघींना एका संस्थेकडून काही पुरस्कार जाहीर करण्यात आले होते, त्यामध्ये ह्या दोघींच नाव वाचून काही जुनी नाती नव्याने जोडायचा प्रयत्न काही माणसे करत होती.
हो हो माणसेच कारण या दोघींच्या आयुष्यात एवढ्या गोष्टी घडून गेल्या होत्या की त्यांचे एकमेकींसोबत असलेले मैत्रीचे नाते हेच खूप महत्वाच होते. बाकी सगळी नाती त्यांच्यासाठी कधीच मातीमोल झाली होती.
सर्व नात्यांनी जेव्हा पाठ फिरवली तेव्हा आपण दोघींनी एकमेकींना साथ दिली.
सर्व नात्यांनी जेव्हा पाठ फिरवली तेव्हा आपण दोघींनी एकमेकींना साथ दिली.
"तुझी नी माझी जोडी होती म्हणून आज आपण इथवर आलोय सुजा, आता अशी भावुक होऊ नको", सविता खूप कळकळीने सुजाताला सांगत होती.
तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील हो ना?? थांबा सर्व सांगतें. या दोघी आपल्या या कथेच्या नायिका आहेत. खरं तर दोघी जावा पण आयुष्याने त्यांना अशा वळणावर उभे केले की त्या दोघींच्या रक्ताची नाती असणार्या माणसांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.

ही गोष्ट आहे साधारण ३० वर्षापूर्वीची तेव्हा १८ व्या वर्षी मुलींची लग्न लावून द्यायचे.
सुजाताचं शिक्षण पाचवीपर्यंतच होतं तर सविता त्या मानाने बारावी पास होती. खरंतर एकाच दिवशी दोघी पार्टेंच्या सूनबाई म्हणून घरात आल्या. घरात श्रीमंती, नोकर- चाकर, मान-मरातब काही विचारू नका. असे सासर मिळतय म्हटल्यावर काय दोघींच्या माहेरचे खूप खुश होते.
नवीन नवलाईचे दिवस संपल्यावर दोघीना समजले की आपण या घरात फक्त कामवाली आहोत, घरात त्यांच्या शब्दाला काहीच मान नव्हता. रात्री दोघींचे नवरे दारु पिऊन यायचे, रात्री वस्तू असल्यासारख त्यांचा उपभोग घ्यायचे

सकाळी दोघी बोलल्या नाहीत तरी त्यांच्या अंगावरच्या खूणा बऱ्याच काही बोलून जायच्या. अशा परिस्थितीत ह्या समदुःखी जावा एकमेकांच्या मैत्रिणी कधी झाल्या ते त्यांनाच समजले नाही.
कडक वातावरणामुळे दोघींना कुठेही मन मोकळं करता यायचं नाही. पण जमेल तेव्हा त्या मनमोकळेपणाने एकमेकांशी बोलायला लागल्या. एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालू लागल्या. दोघांमधील जवळीक सासूच्या नजरेत येऊ नये ह्याचीही काळजी त्या घेत होत्या..
सुजाची गोड बातमी आली, आणि सासूबाई तिची काळजी घेऊ लागल्या. सविताला तें बघून आनंदच झाला. सासूच्या, नवराच्या तोंडून वंशाला दिवा येणार म्हणून कोडकौतुक चालू होतं.
सुजाची गोड बातमी आली, आणि सासूबाई तिची काळजी घेऊ लागल्या. सविताला तें बघून आनंदच झाला. सासूच्या, नवराच्या तोंडून वंशाला दिवा येणार म्हणून कोडकौतुक चालू होतं.
सासूला तर गरोदरपणाचे नऊ महिने सुजाला कुठे ठेवू कुठे नको असं झाल होते. किती कोडकौतुक केले, सर्व डोहाळे पुरवले, नऊ महिने उलटून एक दिवस झाला आणि सुजाने गोड मुलीला जन्म दिला. गोड मुलगी आपल्या हातात पडताक्षणी सुजाला खूप खूप आनंद झाला.
पण सासरचे मात्र कोणीही सुजाला आणि बाळाला बघायला फिरकले नाहीत, सगळ्यांचे चेहरे उतरले होते, कारण वंशाचा दिवा हवा होता ना त्यांना.. पण काय कराव? वंशाची पणती आली घरी, पहिली बेटी धनाची पेटी असते तरी पण त्याची कोणालाच किंमत नव्हती.
सुजा आणि सविताला सोडून कोणीच त्या बाळाला हातात घ्यायचे नाहीत. आई आणि काकीच्या मायेत ते बाळ मोठं होत होतं. बाळ दिड वर्षाचं असेल तेव्हा सुजाला परत दिवस गेले. आता मात्र सासरचे वंशाच्या दिव्यासाठी हट्टालाच पेटले.
शेवटी एक दिवस सूजाचा नवरा आणि सासू मुलीला सविताजवळ ठेवून सुजाला घेऊन डॉक्टरकडे गेले. ते रात्रीच आले आणि बाळ पोटातच गेले होते, काहीच हालचाल नाही त्यामुळे कूस रिकामी केली असे सगळ्यांना सांगायला लागले.
पण सुजाचा चेहरा मात्र वेगळंच काही सांगत होता. ती काहीच बोलायला तयार नव्हती, खाण-पिणे पण जात नव्हते तिला, नुसती रडत राहायची.. सविताने तिला खूपदा विचारायचा प्रयत्न केला, पण सुजा काहीच बोलायला तयार नव्हती. कारण नवऱ्याने तिला कोणापुढे तोंड उघडली तर मारून टाकायची धमकी दिली होती.
काही दिवस असेच गेले बऱ्याच वर्षांनी सविताची गोड बातमी आली, सासू तिची खूप काळजी घेत होती. पण तरीही तिच्या मनात सुजाचा विचार येतच होता. कसतरी करून सूजा एकटी असताना सविता तेथे आली.
सूजा सविताच्या गळ्यात पडून खूप रडली, ह्या वेळेस लिंगपरीक्षण करून मुलगी आहे हे समजल्यावर तिचा गर्भपात केला हे समजल्यावर तर सविताला धक्काच बसला.
सूजा खूप रडली अगदी गळ्यात पडून, मला हवं होतं ग माझं मूल... त्या बाळाची काय चूक होती सांग ना? असे म्हणत मुळात गोड आवाज असलेल्या सूजाने आज बऱ्याच दिवसांनी सुर लावले..
बंदिनी स्त्री ही बंदिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मींची कहाणी
रूप बहिणीचे माया देई
वात्सल्य मूर्त आई होई
माहेरा सोडून येई
सासरी सर्वस्व देई
कधी सीता कधी होई कुंती
सावित्रीची दिव्य शक्ति
शकुंतला तूच होसी
मीरा ही प्रीत दिवाणी
युगेयुगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जागे
बंधनें ही रेशमाची
सांभाळी स्त्रीच मानिनी
अगदी अशीच अवस्था आहे बघ आपली. सविताने आपल्या पोटावरून हात फिरवला आणि कसला तरी निश्चय केला. सुजा खूप हळवी होती ती सविताला म्हणाली, आता तूला सुद्धा दवाखान्यात नेतील आणि रडायला लागली.
तेवढ्यात बाहेर गेलेल्या सासूबाई आल्या, त्या दोघींना एकत्र पाहून ओरडल्याच घाबरून सुजा आत गेली, सविताला प्रेमाने जवळ घेत म्हणाल्या अहो, तुम्ही दोन जीवांच्या आहात, थोरल्या सूनबाई हल्ली कशातरीच वागतात, त्यांच मन थार्यावर नसतं हो.. म्हणुन आम्ही ओरडलो.

तुम्ही आराम करा, उद्या दवाखान्यात जायचं आहे, असे बोलून त्या निघून गेल्या. त्या गेल्यावर सविताने परत एकदा आपल्या पोटावरून हात फिरवला, अन् देवाला हात जोडले. देवा, मला सूबूद्धी दे, मी जे काही करणार आहे तें माझ्या बाळासाठी. त्याचे जे काही परिणाम होतील त्याला सामोरे जायची मला ताकद दे..
दुसऱ्या दिवशी सासूबाई सविताला घेऊन डॉक्टरकडे गेल्या.. थोडया वेळाने सासूबाई आणि डॉक्टरांचे काही बोलणे चालू असते तेव्हा सविता हिंमत करून दवाखान्यातून बाहेर पडली.
दुसऱ्या दिवशी सासूबाई सविताला घेऊन डॉक्टरकडे गेल्या.. थोडया वेळाने सासूबाई आणि डॉक्टरांचे काही बोलणे चालू असते तेव्हा सविता हिंमत करून दवाखान्यातून बाहेर पडली.
रडत रडत गल्लीबोळातून रस्ता काढत माहेरी पोहचली. माहेरच्यांना सगळी हकीकत सांगितली पण आधीच आई नसल्याने माहेरचे सरळ हात वर केले. नवरा हाच देव मानावा असे सल्ले जुन्या बायका देऊ लागल्या.
तिने मात्र राणी लक्ष्मीचे रूप धारण केले. काहीही झालं तरीही मी परत सासरच्या घरात पाय टाकणार नाही असा निश्चय करत माहेरच्या घरातून बाहेर पडली.
इकडे सासरचे सविताला न घेताच घरी आले. पळून गेली कार्टी, कुठे गेली माहित नाही असे सगळ्यांना सांगू लागले. हे ऐकून सुजाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटत असतं की सविता बहुतेक माहेरीच गेली असेल.
इकडे सासरचे सविताला न घेताच घरी आले. पळून गेली कार्टी, कुठे गेली माहित नाही असे सगळ्यांना सांगू लागले. हे ऐकून सुजाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटत असतं की सविता बहुतेक माहेरीच गेली असेल.
तेवढ्यात सविताच्या माहेरचे लोकं येतात आणि सांगतात की ती आली होती, पण आम्ही तिला समज देऊन इकडे पाठवले परत. सविता माहेरी ही नाही हे ऐकताच कुठे गेली असेल एकटी ह्या विचाराने सुजा मात्र अस्वस्थ होते.
संध्याकाळच्या वेळेस देवासमोर दिवा लावताना सुजा काहीतरी मनाशी निश्चय करते..
"देवा ह्या घरात फक्त आणि फक्त सवितामुळेच मी जीवन जगू शकत होते, ती नसेल तर मीही ह्या घरात राहू नाही शकणार. मी मुलीला घेऊन तिच्या शोधासाठी बाहेर पडतेय, सोबत माझ्याजवळचे काही पैसे आणि दागिने घेतलेत..मार्ग दाखव मला.."
कोणी नाहीय हे बघून सुजा बाहेर पडली. गावातल्या काही मंदिरात शोधून काढल्यावर तिला लक्षात येतं की, सविताचा साईबाबांवर खूप जीव होता.

ती गावापासून लांब असलेल्या साईबाबांच्या मंदिरात कशीबशी पोहचली. तिथे नमस्कार करून सुजा नाहीय हे बघून हताश झाली आणि बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसली.
तेवढ्यात मंदिराबाहेरच्या एका झाडाखाली सविता बसलेली दिसते. पळत पळत तिथे जाते आणि सविताच्या गळ्यात पडून रडायला लागते. सवि तू माझा एकदाही विचार नाही केला का ग? म्हणत तिला खूप सारे प्रश्न विचारते.
सविता सुजाला खूप समजावते की इथून पुढची वाट बिकट असणार आहे. तुझ्यासारख्या हळव्या मनाच्या व्यक्तीला हे सहन नाही होणार तू घरी जा. पण, सुजा म्हणते नाही मी तुला सोडून मी कुठेही जाणार नाही.
जिथे तू तिथे मी म्हणत ते दोघे मिळेल ती बस पकडून लांबच्या शहराचा रस्ता धरतात.. कारण त्यांना माहित असतं की सासरचे काही आपल्याला सोडणार नाहीत.. शोधत येथीलच इकडे.
सविता आणि सुजाता पुणेला जाणाऱ्या बसमध्ये जरी बसल्या असल्या तरी तिथे जाऊन कुठे राहणार? काय करणार? मुलांना कसे वाढवणार? ह्या पैकी काहीच त्यांना माहित नव्हतं. पुढची वाट खडतर होती.

आपल्याच लोकांनी दिलेल्या जखमा इतक्या खोल होत्या की तोंडातून शब्दच फुटत नव्हते. बसमधील अख्खी रात्र मनात असंख्य विचारांचा काहूर आणि डोळ्यामध्ये सतत वाहणार्या अश्रूंना घेऊन काढली.
इकडे गावात ह्या दोघींचा शोध सुरु होता. गावात कुठेच पत्ता नाही म्हणल्यावर आजूबाजूची काही गावे ही धुंडाळून झाली. पण ह्या दोघी काही सापडल्या नाहीत. गेली पिडा. जाऊ दे म्हणत सासूबाई मुलांच्या दुसऱ्या लग्नाच्या विचार करायला लागल्या.
पहाटेच्या वेळी ते पुणे शहरात पोहचल्या. लहानपणापासून घराचा उंबराठाही न ओलांडलेल्या त्या दोघी अनोळखी शहर, अनोळखी माणसे आणि अनोळखी पुढची वाट सोबत घेऊन नवीन सुरुवात करणार होत्या.
पहाटेच्या वेळी ते पुणे शहरात पोहचल्या. लहानपणापासून घराचा उंबराठाही न ओलांडलेल्या त्या दोघी अनोळखी शहर, अनोळखी माणसे आणि अनोळखी पुढची वाट सोबत घेऊन नवीन सुरुवात करणार होत्या.
पहिले दोन तीन रात्र तरी त्यांनी स्टेशनवरच काढल्या. एकमेकांना आधार देत, धीर देत त्याची गुजराण चालू होती. त्यांना स्वतःची पर्वा नव्हती.. सुजाला आपल्या तीन वर्षाच्या मुलीची आणि सविताला आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी होती..
तीन दिवस काम शोधण्यातच त्यांचे दिवस गेले.. चौथ्या दिवशी सकाळी उठून परत काम शोधण्यासाठीची वणवण चालू असताना एक अनोळखी बाई त्यांना थांबवून विचारते "मी संगीता देसाई.. मागच्या दोन दिवसापासून मी तुम्हाला इथे बघते आहे.. तुम्हाला कुठे जायचं आहे.. तुम्ही कुठून आले आहात?"
सुजा आणि सविता काहीच बोलायला तयार होत नाहीत.. पण अनोळखी ठिकाणी पहिल्यांदाच कोणीतरी आपली इतक्या काळजीने विचारपूस करताना पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात..
"मी महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका संस्थेत काम करते.. संस्थेचे नाव गरुडझेप आहे.. तुम्ही तीन दिवस इतक्या लहान मुलीला घेऊन इथे राहतंय म्हणून विचारत आहे.. काही प्रॉब्लेम आहे का.. बिंधास्त होऊन सांगा मला.. मी नक्कीच मदत करेन तुमची" संगीता धीर देते.

सविता सगळी हिंमत एकवटून बोलायला लागते.. एक एक करत सगळी हकीकत सांगते, "आम्ही काम शोधतोय पण आम्हाला काम मिळत नाहीय.. कृपया काम मिळवून द्यायला मदत करा म्हणजे पुढची वाट थोडी सुकर होईल मॅडम" म्हणत सुजा आणि सविता हात जोडतात.
"एक काम करा तुम्ही माझ्यासोबत आमच्या संस्थेत चला.. तुमची माहिती घेऊन आम्ही तुम्हाला काम देऊ.."
त्या दोघी संगीता मॅडमसोबत संस्थेत जातात.. आपली सगळी खरीखुरी माहिती देतात.. सविताचं बारावीपर्यंत शिक्षण झालं असल्याने तिला एका ठिकाणी चौथीपर्यंतच्या मुलाचं ट्युशन घ्यायचं काम मिळतं आणि सुजाला त्या संस्थेत शिलाईच काम शिकवलं जातं नंतर तिला महिन्याला काही पैसे घेऊन शिलाई मशीन दिली जाते..
संगीता मॅडम त्या संस्थेच्या जवळचं एक छोटंसं रूम भाड्याने घेऊन देतात. सुजा मुलीला घेऊन घरातच शिलाईचं काम करायला लागते तर सविता जवळच्या कोचिंग कलाससेस मध्ये ट्युशन घ्यायला जायला लागते.. घराचं आणि आर्थिक टेन्शन कमी झाल्याने त्या दोघी थोडया निश्चिंत होतात..
सुजा आणि सविताची आपल्या बाळांसाठीची धडपड बघून संगीता मॅडम आणि त्या संस्थेतील बाकीची लोकं अवाक होतात. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्या दोघींनी आजूबाजूच्या लोकांनाही आपलंस केलेलं असतं.
सुजा आणि सविताची आपल्या बाळांसाठीची धडपड बघून संगीता मॅडम आणि त्या संस्थेतील बाकीची लोकं अवाक होतात. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्या दोघींनी आजूबाजूच्या लोकांनाही आपलंस केलेलं असतं.
सविताचा सातवा महिना संपत आलेला असतो.. जवळच्या सरकारी दवाखान्यात तिचं नाव नोंदवतात.. सुजा सविताची काळजी घेत असते आणि वेळोवेळी तिला चेकअपला घेऊन जात असते.
ह्यातून त्या दोघींमधील बंध अजून घट्ट होत जातात.. एके रात्री सविताच्या पोटात खूप दुखायला लागतं. सविताची हालत बघून सुजाला खूप रडायला येतं.. काय करावं? काहीच सुचेनासा होतं.
तेव्हा आजूबाजूची मंडळी धावून येतात.. सविताला दवाखान्यात घेऊन जातात.. चेकअप नंतर कळतं की खूप शारीरिक आणि मानसिक ताण आल्याने वेळेआधी डिलेव्हरी थांबवण्यासाठी पुढचे दोन महिने तिला बेड रेस्ट ची गरज आहे..
"सवि पुढचे दोन महिने ट्युशन बंद कर.घरची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपव आणि घरीच आराम कर.."
"नाही सुजा ताई.. बाळ झाल्यावरही दोन तीन महिने मला कामावर जाता येणार नाही.. सगळा भार तुमच्यावर टाकून कसं चालेल?"
"काही एक ऐकायचं नाहीय मला तुझं.. चुपचाप उद्यापासून कोचिंग क्लास मध्ये सांगून टाक की मी सांगू? "
सविला खूप भरून येतं, ती सुजाच्या गळ्यात पडून रडायला लागते.

क्रमश:
पोटच्या लेकींना वाचवण्यासाठी घरापासून लांबवर निघून आलेल्या या जावांच्या आयुष्यात पुढे काय घडेल? मुलींना त्यांचे वडील आणि हक्काचे घर मिळेल का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी वाचा पुढचा व अंतिम भाग.
© सौ. अनुजा धारिया शेठ आणि सौ.स्मिता गायकुडे
सदर कथा दोन लेखिका मैत्रीणी म्हणजे सौ. अनुजा धारिया शेठ आणि सौ.स्मिता गायकुडे या दोघींची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकांकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.