© वर्षा पाचारणे
मुलं लहान असली की कुठल्या प्रसंगाला सामोरे जायला लागेल, ते सांगता येत नाही. अनेकदा मुलं मोठ्यांच्या वागण्या-बोलण्यातून गोष्टींचा विचित्र संदर्भ लावतात आणि त्यामुळे नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी आई-वडील मात्र अपमानित होतात.
अशाच मुलांमुळे उद्भवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगांची ही कथा.
किस्सा १)
"अरे मनीष, आज शाळा सुटली की मार्केटमध्ये जायचंच आहे, तर तुझ्यासाठी अंडरवेअर पण घेऊन येऊ", असं म्हणत आई सकाळच्या धावपळीत पटापट काम आवरत होती.
शाळा सुटल्यावर मनीष आणि त्याची आई गाडीवर निघणार तितक्यात मनीषचा मित्र तेजस तिथे आला.
तेजसच्या आईबरोबर थोड्याफार गप्पा मारून मनीष आणि आई निघणार, तितक्यात तेजस म्हणाला, "काकू, मला माहित आहे, आज तुम्ही का घाईत आहात ते".
त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघून आईला देखील उत्सुकता वाटली म्हणून मनीषच्या आईने त्याला हसत विचारले ,
"का रे बाळा? का घाईत आहे मी?"
"का रे बाळा? का घाईत आहे मी?"
तसा तेजस पटकन म्हणाला ,"काकू, तुम्हाला अंडरवेअर आणायला जायचे आहे ना".. त्याच्या या उत्तरावर आईला काय बोलावे सुचेना.. तरीही मनीषकडे एक रागीट कटाक्ष टाकत तिने तेजसला विचारले ,"तुला कसं माहित?"
तेजस म्हणाला ,"मलाच नाही, अख्ख्या वर्गाला माहित आहे. मनीषने सकाळीच आम्हांला सगळ्यांना सांगितलं".
आता अंडरवेअर विकत आणणार, ही काही सांगायची गोष्ट आहे का?', असा कटाक्ष टाकत आईने मनीषला दरडावत गाडीवर बसायला सांगितले.
आई आणि मनीष दुकानात पोचताच मनीषची पुन्हा मस्ती सुरू झाली.
"मला या नाही, त्याच कलरची अंडरवेअर पाहिजे", म्हणून तो हट्ट धरून बसला.
'लहान मुलंच ती, हट्ट करणारंच', असं म्हणत दुकानातील सेल्समनने अव्वाच्या सव्वा किमती लावत मनीषच्या आवडीच्या रंगाची अंडरवेअर देताच मनीष खुश झाला.
आई आणि मनीष दुकानाबाहेर पडणार तितक्यात मनीष म्हणाला, "आई तुला पण घे ना अंडरवेअर". आईने त्याच्याकडे दुर्लक्ष करताच त्याने पुन्हा तीच टकळी लावून धरली.
शेवटी आई म्हणाली , "अरे हे जेन्ट्सच्या कपड्यांचे दुकान आहे. इथे लेडीज कपडे मिळत नाहीत".
त्यावर मनीषने पुन्हा आपली बालबुद्धी चालवली. "म्हणजे तू माझ्याsssसारखी अंडरवेअर घालत नाहीस". आता मात्र आई त्याला एक दणका देणारच, असे वाटत असतानाच तिला अचानक मैत्रिणीचा फोन आला.
त्यावर मनीषने पुन्हा आपली बालबुद्धी चालवली. "म्हणजे तू माझ्याsssसारखी अंडरवेअर घालत नाहीस". आता मात्र आई त्याला एक दणका देणारच, असे वाटत असतानाच तिला अचानक मैत्रिणीचा फोन आला.
आई तिच्याशी बोलण्यात गुंतली. पण बिल देईपर्यंत दुकानातील प्रत्येकजण आपल्यावर हसत आहे, हे मात्र तिच्या नजरेतून सुटले नाही.
किस्सा २)
"आज सिमरन आंटीकडे बर्थडे पार्टी आहे हं.. आपल्याला संध्याकाळी तिच्याकडे जायचे आहे. तिथे नीट वागायचं. सतत खाऊ खात बसायचं नाही. उड्या मारायच्या नाहीत. हट्ट करायचा नाही", अशा नेहमीच्या ठरलेल्या सूचना अखिलेशला देऊन तेजल ऑफिसला निघाली.
"आज सिमरन आंटीकडे बर्थडे पार्टी आहे हं.. आपल्याला संध्याकाळी तिच्याकडे जायचे आहे. तिथे नीट वागायचं. सतत खाऊ खात बसायचं नाही. उड्या मारायच्या नाहीत. हट्ट करायचा नाही", अशा नेहमीच्या ठरलेल्या सूचना अखिलेशला देऊन तेजल ऑफिसला निघाली.
"बाय बच्चा, संध्याकाळी मी लवकर येईल ऑफिसमधून. त्याआधी तू रेडी रहा", असे म्हणत तेजल ऑफिसला निघून गेली.
संध्याकाळी आई आणि अखिलेश ठरल्याप्रमाणे सिमरनकडे पार्टीसाठी पोहोचले.
बर्थडेचा झकास माहोल पाहून अखिलेश खुश झाला. खूप सारी बच्चेकंपनी असल्याने तो खेळण्यात मग्न झाला. तिकडे सिमरन, तेजल आणि इतर मैत्रिणींच्या गप्पांची मैफिल रंगली.
प्रत्येक जण 'आपली मुलं कशी हुशार आहेत', हे सांगण्यात रंगून गेल्या होत्या. स्टेटस, राहणीमान, शाळा या सगळ्यांचे विषय निघताच प्रत्येक जण स्वतःचंच भरभरून कौतुक करून घेत होत्या.
अशात मध्येच बच्चे कंपनीमध्ये खेळण्यावरून वाद झाला आणि सात वर्षांच्या अखिलेशने आईकडे येत कंप्लेंट करत दुसऱ्या मुलाला एक सणसणीत शिवी हासडली.
त्याच्या अशा बोलण्याने जमलेले सगळ्या मैत्रिणी अवाक झाल्या.
अशात मध्येच बच्चे कंपनीमध्ये खेळण्यावरून वाद झाला आणि सात वर्षांच्या अखिलेशने आईकडे येत कंप्लेंट करत दुसऱ्या मुलाला एक सणसणीत शिवी हासडली.
त्याच्या अशा बोलण्याने जमलेले सगळ्या मैत्रिणी अवाक झाल्या.
आतापर्यंत जी स्वतःच्या मुलाच्या वागण्याचे गोडवे गात होती, ती तेजलदेखील त्याच्या अशा विचित्र वागण्याने सुन्न झाली. आता तेजल रपाटा देणार हे ठरलेलंच होतं.
परंतु सिमरनने तिला थांबवत अखिलेशला समजावलं,"बाळा असं बोलायचं नाही. कुठे ऐकलास तू हा शब्द. हे बॅड वर्ड्स आहेत ना".
असे म्हणताच अखिलेश म्हणाला, "आंटी, हे बॅड वर्ड कसे असतील?. मी जेव्हा गावाला गेलो होतो, तेव्हा माझे अंकल चिडले की असंच बोलायचे".
इतकं बोलून पुन्हा ती बच्चे कंपनी खेळण्यात मग्न देखील झाली. परंतु एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये मुलाच्या अशा वागण्यामुळे झालेला अपमान तेजलच्या मात्र आयुष्यभर लक्षात राहिला.
किस्सा ३)
लग्नाला सात-आठ वर्ष होऊनही चांगल्या मऊसूत चपात्या श्रेयाला काही केल्या जमत नसल्याने नाइलाजाने माधवी ताईंना चपात्या करणं भाग होतं.
लग्नाला सात-आठ वर्ष होऊनही चांगल्या मऊसूत चपात्या श्रेयाला काही केल्या जमत नसल्याने नाइलाजाने माधवी ताईंना चपात्या करणं भाग होतं.
कारण श्रेया आणि प्रतीकची त्या चपात्यांमुळे रोज भांडणं व्हायची. डब्यात अशा कडक, करपट चपात्या नेताना प्रतीकला अगदीच लाजिरवाणे वाटायचे.
त्यामुळे 'आई, तूच चपात्या करत जा', असे त्याने माधवीताईंना सांगितले.
त्यांनी अनेकदा तिला चपात्या मऊ होण्यासाठी कशा लाटाव्यात, कशा भाजाव्यात, हे दाखवूनही मुळातच या कुठल्याही गोष्टीमध्ये श्रेयाला मात्र रस नसल्याने ती सरळ त्यांना उलट उत्तर देऊन मोकळी व्हायची.
अनेकदा ती म्हणायची देखील , "माझ्या हातच्या चपात्या आवडत नसतील, तर आपण त्यासाठी बाई लावूयात".
म्हणून शेवटी चपात्यांसाठी कामाला एक बाई येऊ लागल्या.
म्हणून शेवटी चपात्यांसाठी कामाला एक बाई येऊ लागल्या.
परंतु त्यांचा गलिच्छपणा पाहून घरातल्या कोणालाही चपाती खायची इच्छा होईना. म्हणून शेवटी पुन्हा माधवीताईंनी ते काम स्वतःच करायचं ठरवलं.
एक दिवस पाहुणेमंडळी जेवायला येणार असल्याने बाकीचा स्वयंपाक तयार करून, चपात्या गरमा गरम करू, असे म्हणत माधवीताई आणि श्रेया सगळं काम आटोपून बसल्या.
पाहुणे मंडळीशी गप्पा मारताना जेवणाची वेळ झाल्याने श्रेयाने चपात्या करायला घेतल्या.
तितक्यात श्रेयाची मुलगी अन्वी धावत आजीकडे गेली आणि म्हणाली, "आजी तू कर ना चपात्या. नाहीतर पुन्हा आपल्याला कुत्र्याला सुद्धा तुटणार नाही अशा चपात्या खाव्या लागतील"
"बापरे! म्हणजे काय?", असं म्हणत पाहुणेमंडळीतल्या आजीबाई मोठे डोळे करून विचारू लागल्या.
त्यावर अन्वी पटकन म्हणाली ,"माझ्या आईला चपात्या नीट करता येत नाहीत ना, त्यामुळे बाबा रोज ऑफिसला जाताना चिडतात आणि म्हणतात, या चपात्या तर कुत्रं सुद्धा खायचं नाही".
इतका वेळ पाहुणे मंडळींबरोबर हसून खेळून गप्पा मारणारी श्रेया मात्र आता अक्षरशः कुरुमजून गेली होती.
या मोठ्या अपमानानंतर तरी आपण चांगल्याच चपात्या करून दाखवायच्या, हा निश्चय करत आता कुठे तिने स्वयंपाकात रस घ्यायला सुरुवात केली. भविष्यात ती चांगली सुगरण देखील बनली.
परंतु अन्वीच्या वागण्यामुळे घडलेली ही गोष्ट मात्र तिच्या कायम लक्षात राहिली.
किस्सा ४)
"किती बडबड करत असतेस गं! खापराचं असतं तर तोंड फुटलं असतं", असं म्हणत डोकं दुखत असल्याने आजी प्रतीक्षावर वैतागली होती.
"किती बडबड करत असतेस गं! खापराचं असतं तर तोंड फुटलं असतं", असं म्हणत डोकं दुखत असल्याने आजी प्रतीक्षावर वैतागली होती.
आजीने सतत आपल्या सोबत खेळावे आणि गप्पा माराव्यात, असा प्रतीक्षाचा हट्ट असायचा. आई बाबा ऑफिसला जात असल्याने प्रतिक्षा दिवसभर आजीसोबत असायची.
आज आई घरी असल्याने प्रतिक्षा आणि आई खेळत होत्या.
तितक्यात बाजूलाच राहणाऱ्या साठे काकू येताना दिसताच आजी आईला म्हणाली, "अगं, आधीच माझं डोकं ठणकतंय, त्यात तो गिरणीचा पट्टा येतोय बघ. एकदा बडबड करायला सुरुवात झाली की थांबता थांबायचं नाव घेत नाही. माझी तब्येत बरी नाही म्हणून मी झोपले असं सांग त्यांना". असं म्हणत आजी आतल्या खोलीत जाऊन झोपली.
पण ही गोष्ट मात्र प्रतीक्षाने चांगलीच हेरली होती.
एक दिवस प्रतीक्षाच्या बाबांचे सर आणि त्यांची बायको घरी आले होते.
मोठ्यांच्या गप्पा सुरू असताना लहान मुलांना नेहमीच कंटाळा येतो. खूप वेळ होऊनही बाबांचे सर काही निघायचं नाव घेईनात, त्यामुळे वैतागून प्रतिक्षा जोरात बाबांना म्हणाली ,"बाबा, यांच्या गिरणीचा पट्टा काही केल्या थांबतच नाही. कधी संपणार तुमच्या गप्पा?"
एकतर ऑफिसमधले सर समोर असताना त्यांच्याबद्दल प्रतीक्षा असं काही बोलेल, असं आई-बाबांना स्वप्नांतही वाटलं नव्हतं.
एकतर ऑफिसमधले सर समोर असताना त्यांच्याबद्दल प्रतीक्षा असं काही बोलेल, असं आई-बाबांना स्वप्नांतही वाटलं नव्हतं.
प्रतिक्षाच्या अशा आगाऊ वागण्याने सगळेच दोन मिनिट शांत बसले आणि बाबांचे सर आणि बायको गप्पांना आवर घालत निमुटपणे निघून गेले.
आई-बाबांनी त्यानंतर कशाप्रकारे प्रतीक्षाला समज दिली असेल, हे तुम्ही समजू शकता 

किस्सा ५)
"आज शाळेत गरीब लोकांना काही मदत करता येईल का, याबद्दल मीटिंग ठेवली आहे. त्यामुळे मी रोहनला घेऊन दहा वाजता शाळेत जाईल"
"आज शाळेत गरीब लोकांना काही मदत करता येईल का, याबद्दल मीटिंग ठेवली आहे. त्यामुळे मी रोहनला घेऊन दहा वाजता शाळेत जाईल"
आई बाबांमधील हे बोलणे रोहनच्या कानावर पडताच खेळणी बाजूला ठेवून तो धावत आईकडे आला आणि म्हणाला ,"आई, गरीब लोकांना काय मदत करायची असते".
त्यावर आईने त्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. 'आपल्याकडे जे असेल ते दुसऱ्यालाही द्यावे, ही भावना खूप छान असते. त्यामुळे गरिबांच्या आयुष्यात आनंद येतो', वगैरे वगैरे.
रोहनच्या बालमनाला एवढेच कळले की आपण कोणाला काहीतरी देणार आहे.
"आई, आपण माझा हा नवीन शर्ट देऊयात का गं गरीब लोकांना?" शाळेत जायला तयार झालेल्या रोहनने अंगावर घातलेल्या शर्टकडे बोट दाखवत आईला विचारले.
आधीच उशीर झाल्याने वैतागलेल्या आईने त्याला दरडावले आणि सांगितले ,'गरिबांना नवीन नाही, आपल्याकडचे जुने, फाटके कपडे द्यायचे आहेत'. असं म्हणत आईने पटकन गाडीला किक मारली.
रोहन आणि आई शाळेत पोहोचले. शाळेच्या गेट जवळ पोहोचताच तिथल्या एका छोट्याशा तारेत वाऱ्यामुळे आईचा ड्रेस अडकला आणि ड्रेसला छोटसं छिद्र पडलं.
उशीर झाला या विचाराने आई लगबगीने वर्गात पोहोचली. मीटिंग आधीच सुरु झाली होती.
प्रत्येक पालकांनी आपण गरिबांना वस्तू देणार आहोत असे सांगताना सही करायची होती.
रोहनची वेळ येताच आई आणि रोहन क्लास टीचर जवळ गेले.
क्लास टीचरने त्यांच्या हाय फाय इंग्लिशमध्ये रोहनला विचारले, की तो कुठल्या वस्तू गरिबांना देणार. त्यावर रोहनने एक मिनिट विचार करत आईकडे पाहिले आणि आईला म्हणाला ,"आई तुझा ड्रेस काढून दे ना, नाहीतरी हा फाटलाच आहे". रोहनेने असं विचारल्याने आईला शरमल्यासारखे झालं.
त्यावर क्लास टीचर आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून रोहनला म्हणाली ,"हा तर मम्माने घातलेला ड्रेस आहे. तू कुठलीही छोटी वस्तू देखील देऊ शकतोस. तू जेव्हा ती वस्तू त्या चिमुरड्या मुलांना देशील, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठ्ठं स्माईल येईल".
पण शांत बसेल तो रोहन कसला. तो लगेच बोलून मोकळा झाला,"मॅम, पण आईने सांगितलं की चांगले नाही, फाटके कपडे गरिबांना द्यायचेत आणि आईचा हा ड्रेस पण फाटला आहे. हे बघा इथे होल पडलंय".. असं म्हणत त्याने आईच्या ड्रेसचे होल चक्क क्लास टीचरला दाखवले.
एवढ्या चकचकीत, पॉश, एसी शाळेत क्लास टीचर समोर उभं असताना रोहनने केलेला हा प्रकार अक्षरशः लाज काढणारा होता.
बाकीचे जमलेले पालक आणि क्लास टीचर सगळ्यांचीच नजर आपल्यावर रोखली आहे, असं आईला वाटून गेलं.
मुलांना नितीमुल्य शिकवायच्या ऐवजी आपण फाटके कपडे दान करण्याची चुकीची शिकवण दिली, हा समज जमलेल्या प्रत्येकाला झाला असेल, असं वाटून आई मनातल्या मनात शरमली.
भविष्यात रोहनपुढे कुठलीही गोष्ट बोलताना आई मात्र आधी दहा वेळा विचार करायची.
किस्सा ६)
"काय मग अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय करतोस तू?", असा प्रश्न इतरांच्या मुलांना विचारायची पालकांना भारीच हौस असते.
"काय मग अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय करतोस तू?", असा प्रश्न इतरांच्या मुलांना विचारायची पालकांना भारीच हौस असते.
त्यावर मग बऱ्यापैकी उत्तरं ठरलेली असतात. कोणी कराटे, अॅबॅकस, डान्स, सिंगिंग, स्विमिंग अशी उत्तरं देतात.
नीरजच्या आई-बाबांना आपल्याही मुलाने वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्यात, असे वाटायचे.
परंतु मस्तीखोर नीरज मात्र कुठल्याही क्लासमध्ये ऍडमिशन घेतली की जास्तीत जास्त दोन दिवस तेथे जायचा आणि तिसऱ्या दिवशी 'मी जाणार नाही', असा त्याने निर्धार पक्का केलेला असायचा.
त्यामुळे पैसे वाया घालवण्यापेक्षा आणि मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा थोडा आणखी मोठा झाल्यावर त्याला या गोष्टी शिकू देत, असा विचार करत आई-बाबाही आता त्याच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते.
एक दिवस सगळी मित्रमंडळी पिकनिकला गेलेली असताना प्रत्येक जण आपापल्या मुलाचे कौतुक करत त्यांचे कलागुण सादर करायला लावत होते.
कोणी उत्तम गाणारी मुलं होती, तर कोणी नकला करणारी, कोणी उत्तम पोहणारी होती, तर कोणी उत्कृष्ट नाचणारी.. सगळ्यांच्या कला सादर झाल्यानंतर शेवटी नीरजची पाळी आली.
"काय मग नीरज, अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय करतोस तू?"
समोर बसलेल्या काकांच्या या प्रश्नावर बाबा नुसते हसले आणि म्हणाले,"अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये मस्ती करतो तो".. त्यावर सारेजण हसू लागताच नीरज मोठ्या जोशात उभा राहिला आणि म्हणाला ,"नाही काका, मी तबला पण वाजवतो".
"काय मग नीरज, अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय करतोस तू?"
समोर बसलेल्या काकांच्या या प्रश्नावर बाबा नुसते हसले आणि म्हणाले,"अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये मस्ती करतो तो".. त्यावर सारेजण हसू लागताच नीरज मोठ्या जोशात उभा राहिला आणि म्हणाला ,"नाही काका, मी तबला पण वाजवतो".
"अरे, पण तबला कुठे आहे इथे? तू कसा वाजवून दाखवणार?" काकांनी उत्सुकतेपोटी विचारले.
त्यावर आई बाबांसोबतच सगळेजण नीरजकडे उत्सुकतेने पाहू लागले.
काहीजण त्याला चिअरअप करू लागले. तसा नीरज लगेच बाबांच्या मागे जाऊन उभा राहिला आणि बाबांच्या अकाली पडलेल्या टकलावर धपाधप तबला वाजवू लागला.
त्याच्या अशा वागण्याने सगळीकडे हशा पिकला. आई-बाबांना मात्र या लाजिरवाण्या प्रसंगाने संपूर्ण पिकनिकची मजाच निघून गेल्याप्रमाणे वाटू लागले.
हे आणि असे बरेच प्रसंग अनेकदा पालकांच्या वाट्याला येतात. आयुष्यात पुढे जाऊन जरी या गमतीजमती वाटल्या तरी त्या त्या वेळेला मात्र ते लाजिरवाणे प्रसंग मात्र अगदीच नकोसे वाटतात.
© वर्षा पाचारणे
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
