© सौ. प्राजक्ता पाटील
त्यामुळे लहानपणापासूनच रिया प्रत्येक बर्थडे अनाथ आश्रमामधील मुलांसोबत सेलिब्रेट करत होती.आणि त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू ही भेट द्यायची.
"अपेक्षा किती सुंदर दिसते ग तू ! देवाला ना तुला बनवताना खूप वेळ मिळाला वाटतं. नाही तर आम्ही बघा त्याने आम्हाला बनवलं. नाक दिलं पण त्यातही कंजूषी केली. आमच्या जवळ आल्यावरच रंग संपला बघ देवा जवळचा."
"कल्याणी(माझी मैत्रिण) माझं तोंडभरून कौतुक करत होती. पण मी मात्र शांत होते. मी म्हणाले, "आता तूच असं म्हणतेस, म्हणून तुझ्या भाषेत तुला सांगते.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
रिया आपल्या आई बाबांची एकुलती एक लाडाची लेक होती. रियाने काही मागितले आणि रियाला नकार मिळालाय असे आतापर्यंत कधीच घरात घडले नव्हते.
हा, पण श्रीमंत बापाची लेक म्हणून श्रीमंतीचा गर्व किंवा इतरांना तुच्छ समजणे असले गुण रिया मध्ये आजिबात नव्हते. त्यामुळेच तिचे हट्ट ही फाजील नव्हते.
ते म्हणतात ना- 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.' आईबाबांच्या सद्वर्तनाचे अनुकरण करत करतच रिया मोठी झाली होती.लहानपणापासून घरात अगदी खेळीमेळीचे वातावरण होते. त्यामुळे लपवाछपवीचा वगैरे असला विचार रियाच्या मनाला स्पर्श करत नव्हता.
लहान असताना रियाला प्रश्न पडला होता, "आई अनाथ म्हणजे काय गं?"
या एवढ्याशा चिमुकल्या जीवाला काय उत्तर द्यायचं आईला प्रश्न पडला होता.

पण रिया उत्तर मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही हे ही आईला माहित होतं म्हणून आई म्हणाली," रिया, नको असलेली मुलं काही लोक सोडून देतात आणि मग अशा काही सामाजिक संस्था असतात ज्या या मुलांना सांभाळतात मोठं करतात त्यांना त्यांचे नाव देतात.
आणि ज्या आई-बाबांना मुलं होत नाही ते त्यांना दत्तक घेतात. मोठं करतात. आपलं नाव देतात."
"आई, मग तुम्ही पण घ्या ना दत्तक बाळ." रिया म्हणाली.
"तूच म्हणायचीस ना, आता आम्हाला बाळ होत नाही म्हणून. जेव्हा मी तुला म्हणायचे बघ.. आई मला खेळायला घेऊन ये ना,डॉक्टरांकडून लहान भाऊ किंवा बहीण माझ्या मित्र-मैत्रिणींसारखा." रिया आईला म्हणाली.
'आज आईला आपण रियाला आपल्या नोकरीच्या ताणामुळे तसे म्हणालो होते हे आठवले.

आईपीएस ऑफीसर असल्याने कामाचा प्रचंड ताण आणि एकट्या रियाचेच इतके हाल होतात ते बघवत नाहीत आणि परत दोघांचे हाल पहाणे माझ्याच्याने शक्य नाही.
पण रिया अजून लहान आहे तिला नाही समजणार हे म्हणून मी तसे म्हणाले होते.
पण रियाने ते सहा वर्षांनंतर पुन्हा बोलून दाखवले.' हा विचार करून आई रिया कडे आश्चर्याने पाहत होती.
आता टीनएज मध्ये रीयाला नाराज करणं आईला योग्य नाही वाटलं.
"बरं,आपण बाबांना विचारू या." आई म्हणाली.
रिया आनंदाने उड्या मारू लागली.
आईला मात्र रियाच्या चेहर्यावरचा आनंद गमावायचा नव्हता. म्हणून बाबांना आईने तयार केलं.

रियाचे बाबाही तयार झाले.सर्वजण आश्रमात पोहोचले.
नोकरीमुळे लहान बाळाची काळजी घेणे रियाच्या आईला शक्य नसल्यामुळे आश्रमातील रिया एवढी मुलगी दत्तक घ्यायचं ठरलं.
रियाने आश्रमातल्या एका मुलीला आपली बहीण म्हणून स्वीकारलं पण ती मुलगी "मला नका ना पाठवू येथून." म्हणून चक्क रडत होती.
आई-बाबांना आता रियाला फार वाईट वाटेल असं वाटलं पण रियाने आपला समजूतदार दाखवत "नाही घेऊन जाणार आम्ही तुला." म्हणत आश्रमातून काढता पाय घेतला.आणि परत दत्तक मूल घ्यायचा विचारही नाही केला.

पण तेथून पुढे आईबाबांबरोबर सतत जाऊन आश्रमातील मुलांना खरा आनंद तिने दिला.
आज रिया चा 17 वा वाढदिवस होता.
आज रिया चा 17 वा वाढदिवस होता.
आई बाबांनी खूप सारी तयारी केली होती. रियाच्या आवडीची सिरीयल अभिनेत्री ही बोलावली होती.
आईपीएस अधिकारी असलेल्या आई,बाबांची लेक असल्यामुळेच फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये अगदी व्हीआयपी लोकांसोबत ही पार्टी रंगणार होती.
पण हे सगळं रिया साठी मात्र खूप मोठं सरप्राईज होतं. आतापर्यंत एकही रियाचे बर्थडे सेलिब्रेशन एवढे ग्रॅन्ड झाले नव्हते.
आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य असल्यामुळे, रिया आई बाबा घरी नसताना लहानपणापासून घरी एकटी राहायची. एकटं राहणं किती अवघड असतं हा अनुभव तिला फार हळवं करत होता.
त्यामुळे लहानपणापासूनच रिया प्रत्येक बर्थडे अनाथ आश्रमामधील मुलांसोबत सेलिब्रेट करत होती.आणि त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू ही भेट द्यायची.
केक ही त्यांच्या सोबतच कापायची. त्यामुळे आज आपण केलेला हा अनावश्यक खर्च रियाला आवडेल का नाही? हा प्रश्न आई-बाबांना नक्कीच पडला होता.
रियाला घेऊन आईबाबा हॉलवर आले. रिया खूप खुश झाली होती.

पण थोड्या वेळात बाबाला म्हणाली, "बाबा अहो एवढा खर्च करायची काही गरज नव्हती. हे पैसे आपण गरजू व्यक्तीला मदत म्हणून दिले असते तरी चालले असते."
"हो रिया, पण पुढच्या वर्षी तू तुझा जिथे नंबर लागेल तिकडे जाशील अन् तुझा हा असा वाढदिवस करायची आमची हौस कोण जाणे कधी पूर्ण होईल? म्हणून हा घाट घातला." बाबा आपल्या लाडक्या लेकीला म्हणाले.
मस्त बर्थडे सेलिब्रेशन झाले. आणि सगळेजण घरी परतले.
दुसऱ्या दिवशी रिया नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली. ती रडतच घरी आली.
"काय समजतात ही पोरं स्वतःला. मी दाखवत नाही की मी एका आयपीएस ऑफिसर ची मुलगी आहे म्हणून. नाहीतर वर मान करून पण बघण्याची हिंमत केली नसती यांनी." रिया म्हणाली.
"अगं काय झालंय रिया?" आई म्हणाली.
"आई कॉलेजमधला एक मुलगा सतत माझ्याकडे पहात असतो. खूप वाईट फिल होतं. तूमची पिढी किती लकी आहे ना ! तुमच्या वेळी असलं काही नव्हतं."
या लेकीच्या वक्तव्यावर आईला थोडस हसू आलं.
"मी आयपीएस ऑफिसर झाले, याचा अर्थ मला काहीच त्रास झाला नाही असं समजू नकोस."असं म्हणून आईने रियाला आपल्या जवळ घेतलं.
आणि आई कॉलेजच्या जीवनात घडलेली सत्य घटना, आज लेकीला जणू मैत्रीण बनून सांगू लागली..
"कॉलेज म्हटलं की मैत्रिणींचा विषयच तो काय असतो ? सौंदर्य. थोडासा अभ्यास आणि जास्तीचे सजने -धजने. असेच आम्हा मैत्रिणीच्या बाबतीतही सौंदर्याच्या गप्पा मारतानाचे अनेक प्रसंग घडायचे" रियाला तिची आई अपेक्षा म्हणाली.
"हो रिया, पण पुढच्या वर्षी तू तुझा जिथे नंबर लागेल तिकडे जाशील अन् तुझा हा असा वाढदिवस करायची आमची हौस कोण जाणे कधी पूर्ण होईल? म्हणून हा घाट घातला." बाबा आपल्या लाडक्या लेकीला म्हणाले.
मस्त बर्थडे सेलिब्रेशन झाले. आणि सगळेजण घरी परतले.
दुसऱ्या दिवशी रिया नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली. ती रडतच घरी आली.
"काय समजतात ही पोरं स्वतःला. मी दाखवत नाही की मी एका आयपीएस ऑफिसर ची मुलगी आहे म्हणून. नाहीतर वर मान करून पण बघण्याची हिंमत केली नसती यांनी." रिया म्हणाली.
"अगं काय झालंय रिया?" आई म्हणाली.
"आई कॉलेजमधला एक मुलगा सतत माझ्याकडे पहात असतो. खूप वाईट फिल होतं. तूमची पिढी किती लकी आहे ना ! तुमच्या वेळी असलं काही नव्हतं."
या लेकीच्या वक्तव्यावर आईला थोडस हसू आलं.
"मी आयपीएस ऑफिसर झाले, याचा अर्थ मला काहीच त्रास झाला नाही असं समजू नकोस."असं म्हणून आईने रियाला आपल्या जवळ घेतलं.
आणि आई कॉलेजच्या जीवनात घडलेली सत्य घटना, आज लेकीला जणू मैत्रीण बनून सांगू लागली..
"कॉलेज म्हटलं की मैत्रिणींचा विषयच तो काय असतो ? सौंदर्य. थोडासा अभ्यास आणि जास्तीचे सजने -धजने. असेच आम्हा मैत्रिणीच्या बाबतीतही सौंदर्याच्या गप्पा मारतानाचे अनेक प्रसंग घडायचे" रियाला तिची आई अपेक्षा म्हणाली.
"अपेक्षा किती सुंदर दिसते ग तू ! देवाला ना तुला बनवताना खूप वेळ मिळाला वाटतं. नाही तर आम्ही बघा त्याने आम्हाला बनवलं. नाक दिलं पण त्यातही कंजूषी केली. आमच्या जवळ आल्यावरच रंग संपला बघ देवा जवळचा."
"कल्याणी(माझी मैत्रिण) माझं तोंडभरून कौतुक करत होती. पण मी मात्र शांत होते. मी म्हणाले, "आता तूच असं म्हणतेस, म्हणून तुझ्या भाषेत तुला सांगते.
मला दिलेले हे बाह्य सौंदर्य आहे; पण तू मनानं एवढी चांगली आहेस की, आंतरिक सौंदर्य इतकं भरभरून दिल्यामुळे बाह्य सौंदर्याची तुला गरजच पडणार नाही हे देवाच्याही लक्षात आलं असेल.
दोघीही एकमेकींना टाळ्या देऊन मोठमोठ्याने हसलो. चला आता क्लासचा टाईम झाला म्हणून दोघीही क्लासमध्ये गेलो." रियाची आई रियाला म्हणाली.
"मी खुप मन लावून अभ्यास करायचे. मला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण त्यादिवशी कॉलेजमध्ये असं काही घडेल यावर माझा विश्वासच बसला नव्हता.

चक्क कॉलेजातील एका मुलाने मला 'लव लेटर' लिहिलं होते. ते पाहून मी थबकले.
घरी समजल्यावर काय होईल? म्हणून मी काहीच बोलले नाही. मात्र तुझ्या सारखं न राहून हे सर्व मी आईला सांगितलं.
माझी आई मला म्हणाली, "तुझ्या बाबांना यातलं काहीच कळायला नको. त्यांचा स्वभाव तुला चांगलाच माहित आहे. नाहीतर ते तुला पुढे शिक्षण घेऊ देणार नाहीत.मग तुला लग्न करून सासरी जाणे याशिवाय पर्यायच उरणार नाही.आणि मी काहीच करू शकणार नाही." रियाची आई रियाला पुढे सांगत होती.
यावर मी नाराजीच्या स्वरात आईच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाले,"आई, मला शिकून खूप मोठे व्हायचंय ग! पण या अशा मुलामुळे मी माझं शिक्षण का थांबवावं? यात माझी काय चूक?

"समाजातील लोक चूक कोणाची हे बघत नाहीत. पण उद्या त्या मुलाने काहीही केले तर बदनामी मुलीची होते ग. म्हणून फार भीती वाटते." माझी आई दबक्या आवाजात उत्तरली.
मी मनाशी ठरवलं, आता त्या मुलाकडे आपण लक्ष द्यायचंच नाही, फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं.
तो मुलगा माझ्या मागे- मागे फिरत होता.
तो मुलगा माझ्या मागे- मागे फिरत होता.
मी त्याला सगळ्यांच्या समोर बोलावलं. आणि विचारलं, "तू माझ्या मागे-मागे का फिरतो..? तू मला "लव लेटर" का लिहिलंस?"
त्यावर तो मुलगा मला म्हणाला, "कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्यासाठी काहीही करु शकतो."
मी नेमकं हेच वाक्य पकडलं आणि मी त्याला याच वाक्यावर थांबवलं.

मी त्या मुलाला हात जोडून म्हणाले. "मग आता माझ्यासाठी येवढच कर. माझा पाठलाग करणं सोड. कारण मला माझ्या रंगीत स्वप्नांच्या लाटा निर्माण करायच्या आहेत.आणी त्यात तू अडथळा बनून सतत माझ्यासमोर येतोस. मुलाला काय समजायचे ते तो समजला.माझी माफी मागून तो तिथून निघून गेला."
"व्हॉट? वॉव ! दॅटस् ग्रेट आई!" रिया म्हणाली.
"माझ्यामध्ये त्यादिवशी जणू झाशीची रणरागिनी अवतरली की काय? असा भास सर्वांना झाला. केवळ शिक्षण घेऊन पुढे स्वतःच्या पायावर उभं राहायचं ही आवड असल्यामुळे मी त्या मुलाशी ठामपणे बोलू शकले." रियाची आई आपल्या लेकीला प्रसंगावधानाचे धडे स्वानुभवातून देत होती.

हे बाबांनी ऐकलं.
"अरे वा..! मग आज लेकीला देखील सांगितल वाटतं भूतकाळातील "लवस्टोरी" पुराण. " असे म्हणून अपेक्षाचे मिस्टर मायलेकींचा संवादात सहभागी झाले.
"म्हणजे बाबा, आईने तुम्हालाही सांगितलं त्या मुलाच्या एकतर्फी प्रेमाबद्दल." रिया आश्चर्याने म्हणाली.
"अगं त्या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर नंतर दुतर्फी प्रेमात झालं."बाबा म्हणाले.
"म्हणजे?" रिया म्हणाली.
"तो कॉलेजमधला तुझ्या आईला "लवलेटर " देणारा मुलगा मीच होतो." बाबा हसून म्हणाले.

"तुझ्या आईच्या शिक्षणाप्रती असलेल्या रंगीत स्वप्नांच्या लाटांच्या आवडीची मी तिच्यासोबत निवड केली. मीही अधिकारी झाल्यावर तिला लग्नासाठी तिचा हात मागितला.
आणि माझ्या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर दुतर्फी प्रेमात झालं."
"हाऊ रोमँटिक..!" म्हणत रियाने आई बाबांना जवळ घेतलं.
"हाऊ रोमँटिक..!" म्हणत रियाने आई बाबांना जवळ घेतलं.
© सौ. प्राजक्ता पाटील
सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...