© वर्षा पाचारणे
घरी मुलांच्या परीक्षा संपताच मिथिलाच्या दोन्ही मुलांनी आईकडे हट्ट केला.. "आई, इतर वेळी आम्ही तू सांगते ते सगळं ऐकतो ना, मग आज आम्हाला परीक्षा संपल्याच्या आनंदात तू पार्टी दे ना"...
मिथीलानेही हसत त्यांचा बालहट्ट मान्य केला.. 'मी आलेच तुमच्या आवडीचा खाऊ घेऊन'.. असे म्हणत पर्स घेऊन मिथिला बाहेर पडली.
वडा पावच्या दुकानाजवळ एका अनोळखी विवाहितेच्या दहा मिनिटांच्या ओळखीने मिथिला गहिवरली.. त्याला कारणही तसंच होतं..
घरी मुलांच्या परीक्षा संपताच मिथिलाच्या दोन्ही मुलांनी आईकडे हट्ट केला.. "आई, इतर वेळी आम्ही तू सांगते ते सगळं ऐकतो ना, मग आज आम्हाला परीक्षा संपल्याच्या आनंदात तू पार्टी दे ना"...
मिथीलानेही हसत त्यांचा बालहट्ट मान्य केला.. 'मी आलेच तुमच्या आवडीचा खाऊ घेऊन'.. असे म्हणत पर्स घेऊन मिथिला बाहेर पडली.
बाहेर रणरणतं ऊन होतं... अंगाची लाही लाही होत होती.. मुलांना वडापाव सोबत कोकम सरबत आणि दुपारी जेवणानंतर मस्त आइस्क्रीम देऊ म्हणून ती आधी वडापावच्या नुकत्याच सुरू झालेल्या पण कायम गरमागरम भजी, वडे तळून मिळणाऱ्या शॉपमध्ये गेली.
गर्दी नाही हे पाहून तिला हायसं वाटलं..
"ताई, बसा ना.. फक्त पाच मिनिट थांबा, मस्त गरमागरम वडा पाव देते", असं म्हणत तिथल्या काकूंनी पटपट हात चालवायला सुरुवात केली.
"ताई, बसा ना.. फक्त पाच मिनिट थांबा, मस्त गरमागरम वडा पाव देते", असं म्हणत तिथल्या काकूंनी पटपट हात चालवायला सुरुवात केली.
तितक्यात साधारण पंचविशीची महिला तिथे आली..
"ताई, पटकन जे काही तयार असेल ते द्या".. असे म्हणत सतत मोबाईलमध्ये वेळ तपासत होती.
"काय देऊ?.. वडा पाव, पॅटीस, भजी?" काकूंनी विचारले..
"ताई, पटकन जे काही तयार असेल ते द्या".. असे म्हणत सतत मोबाईलमध्ये वेळ तपासत होती.
"काय देऊ?.. वडा पाव, पॅटीस, भजी?" काकूंनी विचारले..
"वडा पाव द्या दोन पटकन"... गरम नसले तरी चालतील"... असे म्हणत पुन्हा वेळेकडे एक डोळा ठेऊन धास्तावलेली 'ती' मिथिला सोबत नजरानजर होताच स्मितहास्य करत हळूच पुटपुटली.. ' खूप वेळ लागला तर, आजुन डोकेदुखी'..
तिच्या या वाक्यावर मिथिलाने तिच्याकडे बघताच तीची मनातली भीती हळूहळू तोंडावर येऊ लागली.
"का गं? घाई आहे का तुला?... तू घे आधी वडा पाव आणि जा पटकन".. मिथिलाने तिचे भाव ओळखून सांगितलं..
"ताई, घरी दोन वर्षाचं बाळ आहे... सासू सासरे आहेत. पण खूप शिस्तीचं वातावरण.. नाश्ता, जेवण, चहा पाणी, घरची कामं अगदी घड्याळाच्या काट्यावर चालावीत असं वाटतं त्यांना.

सासूबाईंची तब्येत अगदी ठणठणीत.. इतर वेळी सकाळ संध्याकाळ मैत्रीणींसोबत फिरायला जातात, पार्टी करतात, कधी मैत्रिणींना घरी बोलावतात... पण घरात लहान बाळ असल्याने माझी कितीही तारांबळ झाली तरी कवडीची मदत करत नाही.
फिरायला सकाळ संध्याकाळ जातात पण येताना भाजीपाला, किंवा गिरणीत ठेवलेलं दळणही साधं आणत नाही.. येताना आजच्या दिवस भाजी आणाल का विचारलं तर अंगावर खेकसतात"..
"बापरे, तरीच तू मघापासून धास्तावलेली वाटली.. काळजी करू नको ग.. थोडी धीराने वाग.. तू गृहिणी आहेस का नोकरी करतेस?".. मिथीलाने विचारले..
"सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे ताई... आई वडिलांनी खूप अपेक्षा ठेऊन इतकं शिक्षण दिलं होतं.. आम्ही दोघी बहिणी.

त्यामुळे मुलांपेक्षा कुठे कमी नको पडायला म्हणून ऐपत नसताना पैसा खर्च करून शिकवलं.
मोठ्या बहिणीच्या सासरची मंडळी खूप चांगली आहेत.. त्यामुळे आई बाबांना तिची काळजी नाही .... पण माझ्या घरी मात्र रोज आई बाबांचा उद्धार.
कुठल्याही कामात थोडी जरी चूक झाली तरी आजकाल रोज सासूबाई आईला फोन करून बडबड करतात.
शिकलेली सून हवी होती.. पैसेही कमवावे असे वाटते त्यांना.. पण दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत ऑफीसने कामाची वेळ दिल्याने लॅपटॉपवर ते करणे भागच असते..
त्यामुळे 'रात्री जेवण उशिरा व्हायला नको म्हणून दुपारी दुसरी भाजी करून ठेवू का, म्हणजे रात्री पोळ्या पटकन करेल', असे विचारले तर जवळपास अंगावर धावून आल्या सासूबाई, आणि म्हणाल्या, 'तुला कामाचा उरकच नाही, जेवणाला असा कितीसा वेळ लागतो'.

पण ताई त्यानंतर बाळाने केलेला पसारा त्यांना चालत नाही.. त्याने मधेच काही सांडवलं, शी, शू केली तरी त्या लक्ष घालत नाही.
आणि माझा नवरा रात्री घरी आला की, 'बघ घर किती घाण ठेवते, अजून जेवणाचा पत्ता नाही', असे सांगतात त्यांना.
नोकरी सोडते म्हटलं तर मग 'शिकलेली होतीस म्हणून सून करून घेतली, नाहीतर काय होतं तुझ्याकडे ' असे बोलतात.
नवऱ्याला कळतात माझे हाल, पण सध्या दुसरीकडे वेगळं राहू शकत नाही. कारण सासऱ्यांच्या वर्क शॉप मध्येच नवरा कामाला.
तिथून सासूबाईंनी हुसकलं तर खायचे पण वांदे होतील... असं वाटतं नवरा नको आणि संसार पण नको.. मेलेलं बरं"...
आता एवढं बोलून तिचे डोळे गच्च पाणावले होते.. आणि मिथिलाचे देखील.
आता एवढं बोलून तिचे डोळे गच्च पाणावले होते.. आणि मिथिलाचे देखील.
कारण अगदी हेच सारं दुःख मिथिलाने सात आठ वर्षांपूर्वी अनुभवलं होतं. आत्ता कुठे तिचा वेगळा संसार प्रत्यक्षात साकारला होता.. पण मुलाला आईपासून वेगळं केलं अशी गावभर बोंब सासरच्यांनी उठवली होती.
"ताई, घ्या वडा पाव", असे म्हणत काकूंनी मिथिलाच्या हातात पिशवी दिली.
"ताई, घ्या वडा पाव", असे म्हणत काकूंनी मिथिलाच्या हातात पिशवी दिली.
मिथिलाने ते पार्सल त्या सासुरवाशीणीला दिले.. आणि म्हणाली," हे तू घे, मला घाई नाही".. आणि कसलेही वाईट विचार करू नको. दिवस सारखे नसतात.. लेकरू हेच तुझं सुख मानून चाल"
डोळ्यातले पाणी लपवत स्मितहास्य करत थॅन्क् यू म्हणून ती निघून गेली.
डोळ्यातले पाणी लपवत स्मितहास्य करत थॅन्क् यू म्हणून ती निघून गेली.
मिथिला तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहतच राहिली.
आई-वडिलांच्या गरिबीची जण असलेली संस्कारी लेक आज सासुरवासाने जीवाला कंटाळली होती.. आणि सुशिक्षित म्हणवणारे सासरचे मात्र हक्काची कामवाली मिळाल्याप्रमाणे तिचा वापर करून घेत होते.
मिथिलाला मनात वाटून गेलं की सासरची मंडळी नुसती सुशिक्षित असून उपयोग नाही तर सुसंस्कारित असायला हवी तरच बाहेरून आलेली ही अशी हळवी मंजिरी तिथे सुखाने रुजली जाईल..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
© वर्षा पाचारणे
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...