© वैदेही जोशी
22 तारखेला संपूर्ण दिवस घरात राहिल्यावर जाणवलं रोजच्या धावपळीत या आपल्या घरट्याकडे आपलं लक्षच नाहीय्ये.
दुसऱ्या दिवशी सकाळी...वेगळेच वातावरण.. रस्त्यावर गाड्या नाहीत.. आवाज नाहीत.. वर्दळ नाही.. एकदम शांत शांत.
खूप वेगळे वाटत होतं पण कुठेतरी मन याची वाट बघत असल्यासारखं सुखावलं देखिल होतं.. कारण 25 शी नंतर फक्त पळणारे धावणारे जग बघितले होते.
रोजची काम झाली.. थोड रिलॅक्स बसावं म्हणून आराम खुर्चीत टेकली.. डोळे मिटून घराच्या कोन्याकोन्यात फिरून आली.
"वेदांत.. कंटाळा येतोय असं वाटलं की.. हे चार दोस्त.. तुझ्यासाठी तय्यार असतील". सखी थोड्या ठामपणे पण हसत हसत म्हणाली..
"ओके"- असं म्हणत तो निघून गेला..
"सखी.. पुढचा जन्म मी बाईचा मिळावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करतो.. चालेल ना?-"अनुरागने विचारले.
कारण या न समजून घेण्याच्या एकमेकांच्या वृत्तीमुळेच सगळं रामायण..महाभारत घडतं संसाराच!!
मनातल्या मनात सखी बोलली.. कारण स्त्री जन्माचं खरं रहस्य.. त्या भगवंताला तरी कुठे कळलय?"
काही गोष्टी अचानक घडतात म्हणून तर जगण्याची खरी किंमत कळते. नाही तर मनुष्य सगळं गृहीत धरून चालतो.. अन् सुखाच्या लालसेने फक्त पळत रहातो.. आराम खुर्चीत डोळे मिटून सखी मनातच सारं न दिसणाऱ्या पाटीवर लिहीत होती..
खरतरं सर्वसाधारण स्त्री चे जसं आयुष्य असतं तसच सखीच ही जीवन होतं..अगदी सरळ रेषेत... पण.. ती सरळ रेषा तशीच रहाणार नव्हती.. हे नियतीला माहिती होतं..
संध्याकाळची वेळ सखीचे निवांत क्षण.. दिवेलागण झाली कि मग पुन्हा गृहिणीची कर्तव्य सुरू..
पलिकडून फक्त रडण्याचा आवाज येत होता.. सखीच्या हृदयात कालवाकालव झाली.
"नंदिता...नंदिता...मी गुलनाझ बोलतेय"..कसे बसे हुंदके आवरत आवाज आला.
"गुलू.. काय झालं...रडतेस का? बोल ना काय झालय..?" सखी काकुळतीने म्हणाली..
मग गुलनाझ... सगळं फोनवरुन बोलत राहिली. सखी सारं ऐकत होती... पण डोकं मन सगळं बधीर झालं होतं..डोळ्यासमोर काळोखी आली होती..
गुलनाझं बोलण पुरं झालं आणि सखीने फोन खाली ठेवला..शेजारच्या खुर्चीत मटकन बसत डोकं गच्च धरले. दीर्घश्वास घेतला.. डोळे पुसले..आणि...हॉलमधून बेडरुम मधे आली.
अनुरागचा आश्वासक आवाज ऐकून सखीला भरुन आलं..
तीला शांत करत अनुरागने लगेच ड्रायव्हरला फोन केला. "सकाळी लवकर गावी जायचय..तु तयारीने ये." सखी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती.
अनुरागच्या हातून पाण्याचा ग्लास घेतला..डोळ्यातले पाणी थांबत नव्हते.. संसाराची सप्तपदी अशी ही अनुभवता येते..!!!
दुसऱ्या दिवशी सखी गाडी करून गावी पोहचली. गुलनाझ तीच्या मावशीच्या शेजारी रहायची.
काल फोनवरुन गुलनाझं सारं मावशीच्या बाबतीत सांगत होती. मावशीने सखीला आईच्या ममतेने संभाळले होते. म्हणुनच इतक्या तातडीने सखी आपल्या मायेच्या मावशीसाठी धावत आली.
घरी आल्यावर अनुरागला सगळा घडलेला प्रकार पुन्हा एकदा सांगितला.. आणि सखी म्हणाली आता मावशी कायमची इथे राहील..चालेल ना?
प्रश्न विचारताना मनात भीती.. चिंता आणि दडपण होते.. कारण अनुरागच्या उत्तरावर सगळेअवलंबून होते.
सखी मानेने हो म्हणाली... रात्रीचे काही तासच तर मधे होते, दिवस उजाडायला.. पण त्या काही तासांवरच सारं अवलंबून होतं..
संसाराची घडी बसलेली होती..पण आजच्या धावपळीच्या आणि चौकट बंद संसारात एखाद्याचे अचानक येणे सगळेच रुटीन डीस्टर्ब करणारे ठरते.
एकूणच अनुराग काय ठरवेल..सांगेल ते विश्व सखीच..पण तरीही स्वतः ची ओळख आणि मत ठाम असणारी ती...पण आज मात्र पेचात पडली.
अनुरागने सखीला हाक मारली...धडधडत्या मनाने पण तरीही काही मनात पक्क ठरवल्यासारखी सखी समोर आली.
संसारात असे चढउतार येत राहणार.. परिस्थिती दरवेळी परीक्षा घेत रहाणार हे युगायुगांच सत्य त्यानेही सप्तपदी चालताना जाणून घेतले होतेच की.
22 तारखेला संपूर्ण दिवस घरात राहिल्यावर जाणवलं रोजच्या धावपळीत या आपल्या घरट्याकडे आपलं लक्षच नाहीय्ये.
आपण सुख, संपत्ती याच्यामागे धावता धावता समाधानाने तथास्तु म्हणणाऱ्या वास्तू कडे नीटसं खूप वर्षात पाहिलच नाही.. आपलं घर म्हणतो पण आपलेपणा कुठतरी कोपऱ्यात दडून बसलाय... थँक्स कोरोना... .. मनातल्या मनात सखी हे सारं साठवत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी...वेगळेच वातावरण.. रस्त्यावर गाड्या नाहीत.. आवाज नाहीत.. वर्दळ नाही.. एकदम शांत शांत.
खूप वेगळे वाटत होतं पण कुठेतरी मन याची वाट बघत असल्यासारखं सुखावलं देखिल होतं.. कारण 25 शी नंतर फक्त पळणारे धावणारे जग बघितले होते.
रोजची काम झाली.. थोड रिलॅक्स बसावं म्हणून आराम खुर्चीत टेकली.. डोळे मिटून घराच्या कोन्याकोन्यात फिरून आली.
शोकेसवरची धूळ मुलगा साफ करायचा..पण आतल्या वस्तूंसारखं.. पुन्हा जिथल्या तिथं रुटीन जगत होतो आपण.. हे जाणवलं.
मन म्हणालं किती हौशीनं वस्तू जमवल्या..सजवल्या पण त्यांच्या कडे बघायला सुध्दा झाले नाही.. इतक्या व्यस्त दिनचर्येत.
सखी स्वतः शीच हसली.. चटकन कपडा घेतला आणि आज त्या सगळ्या वस्तू आपण स्वतः पुसल्या.. अन् त्यांना कुठून कसं आणलं हे आठवत आठवत त्यांच्या जागा देखिल बदलल्या.
" अहो.. हा टेडी वेदांतसाठी आणला होता.. हो नं? लहानपणी एकटा खेळत असताना वेदांत यालाच आपला दोस्त मानायचा.. गप्पा मारायचा..अगदी झोपतानासुध्दा जवळ घेऊन झोपी जायचा."
आजची ही शांतता युगानुयुगे गुहेत दडलेली होती असच वाटत होतं.
आजची ही शांतता युगानुयुगे गुहेत दडलेली होती असच वाटत होतं.
सगळे व्यवहार शांत संयमाने होत होते.."आई.. आज मी काय करु दिवसभर.."थोडाशा चिडचिड्या आवाजात वेदांतने विचारले..
" जे रोज करत नाहीस ते करं.." बाबा हसत हसत म्हणाला.
" जे रोज करत नाहीस ते करं.." बाबा हसत हसत म्हणाला.
"म्हणजे? प्रश्नांकित मुद्रेने अनुरागकडे बघत वेदांतने विचारले..
"आज आई घरात काय काय करते ते निरीक्षण कर.. आणि तीला लागेल तिथे मदत कर.... दे टाळी !!"
सखी बापलेकाचा संवाद ऐकत होती. मनातल्या मनात विचार चालूच होते..
असं छान वातावरण घरात राहिलं प्रत्येकाच्या तर कशाला कंटाळा येईल? पण.. असं प्रत्येक घरात असतच असं नाही.. हे वास्तव आहेच ना.. असो..

तीने कपाट उघडले.. वेदांत चौथी पाचवीत असताना आणलेली कोडी सोडवा.. गणिताची जादू... मजेशीर गोष्टी.. आणि कागदांची गंमत" ही सगळी पुस्तके त्याला दिली.
"वेदांत.. कंटाळा येतोय असं वाटलं की.. हे चार दोस्त.. तुझ्यासाठी तय्यार असतील". सखी थोड्या ठामपणे पण हसत हसत म्हणाली..
"ओके"- असं म्हणत तो निघून गेला..
सखी घरात कामाला गेली.. अनुराग मात्र विचारात पडला... आपण काय काय करू शकतो? आठवू लागला.
सखीचे कामात गुंतलेले हात आणि मन.. वाचता आलं असतं तर? या विचाराने त्यालाच हसू आलं.
सखीचे कामात गुंतलेले हात आणि मन.. वाचता आलं असतं तर? या विचाराने त्यालाच हसू आलं.
"सखी.. पुढचा जन्म मी बाईचा मिळावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करतो.. चालेल ना?-"अनुरागने विचारले.
सखीला कळलं तो असं का म्हणतोय.. डोळे हळूच पुसत ती म्हणाली..." हो चालेल ना.. जन्म नाही मिळाला तरी स्त्रीचं मन ओळखण्याची.. जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक पुरुषाला दे म्हणावं..परमेश्वरा!!
कारण या न समजून घेण्याच्या एकमेकांच्या वृत्तीमुळेच सगळं रामायण..महाभारत घडतं संसाराच!!
मनातल्या मनात सखी बोलली.. कारण स्त्री जन्माचं खरं रहस्य.. त्या भगवंताला तरी कुठे कळलय?"
काही गोष्टी अचानक घडतात म्हणून तर जगण्याची खरी किंमत कळते. नाही तर मनुष्य सगळं गृहीत धरून चालतो.. अन् सुखाच्या लालसेने फक्त पळत रहातो.. आराम खुर्चीत डोळे मिटून सखी मनातच सारं न दिसणाऱ्या पाटीवर लिहीत होती..
खरतरं सर्वसाधारण स्त्री चे जसं आयुष्य असतं तसच सखीच ही जीवन होतं..अगदी सरळ रेषेत... पण.. ती सरळ रेषा तशीच रहाणार नव्हती.. हे नियतीला माहिती होतं..
संध्याकाळची वेळ सखीचे निवांत क्षण.. दिवेलागण झाली कि मग पुन्हा गृहिणीची कर्तव्य सुरू..
अचानक फोनची बेल वाजली म्हणून सखीने रिसीव्हर उचलून ' हॅलो.. म्हटलं..
पलिकडून फक्त रडण्याचा आवाज येत होता.. सखीच्या हृदयात कालवाकालव झाली.
"हॅलो... हॅलो...कोण बोलतय...? कोण बोलतय?" असं वारंवार विचारून ही पलिकडचे हुंदके थांबत नव्हते.
सखी दोन मिनिटे शांत उभी राहीली. पलीकडची व्यक्ती शांत झाली की बोलेल म्हणून.. रिसीव्हर कानाला तसाच ठेवला.
"नंदिता...नंदिता...मी गुलनाझ बोलतेय"..कसे बसे हुंदके आवरत आवाज आला.
"गुलू.. काय झालं...रडतेस का? बोल ना काय झालय..?" सखी काकुळतीने म्हणाली..
मग गुलनाझ... सगळं फोनवरुन बोलत राहिली. सखी सारं ऐकत होती... पण डोकं मन सगळं बधीर झालं होतं..डोळ्यासमोर काळोखी आली होती..
गुलनाझं बोलण पुरं झालं आणि सखीने फोन खाली ठेवला..शेजारच्या खुर्चीत मटकन बसत डोकं गच्च धरले. दीर्घश्वास घेतला.. डोळे पुसले..आणि...हॉलमधून बेडरुम मधे आली.
अनुराग आपल्या कामात मग्न होता. सखी त्याच्याजवळ आली अन् म्हणाली.". अहो.."
तीचा रडवेला स्वर अनुरागने लगेच ओळखला.. "काय झालं? बस इथं आणि सांग.." मला उद्याच जावं लागेल गावी.. गुलनाझ चा फोन आला होता.." असं म्हणत तीने अनुरागला घडलेलं सारं सांगितले.
अनुरागचा आश्वासक आवाज ऐकून सखीला भरुन आलं..
तीला शांत करत अनुरागने लगेच ड्रायव्हरला फोन केला. "सकाळी लवकर गावी जायचय..तु तयारीने ये." सखी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती.
आधाराचं हसू तीला देत अनुराग म्हणाला" पाणी आणतो.. थांब.." मानेनच हो म्हणत.. सखी तीथे बसली.
अनुरागच्या पाठमोऱ्या मुर्तीकडे पाहत.. मनात म्हणाली.. किती वेळा.. किती जन्म वडाला प्रदक्षिणा घातल्या.. देव जाणे..कि हरतालिकेच्या व्रताचे पुण्य?.
अनुरागच्या हातून पाण्याचा ग्लास घेतला..डोळ्यातले पाणी थांबत नव्हते.. संसाराची सप्तपदी अशी ही अनुभवता येते..!!!
दुसऱ्या दिवशी सखी गाडी करून गावी पोहचली. गुलनाझ तीच्या मावशीच्या शेजारी रहायची.
काल फोनवरुन गुलनाझं सारं मावशीच्या बाबतीत सांगत होती. मावशीने सखीला आईच्या ममतेने संभाळले होते. म्हणुनच इतक्या तातडीने सखी आपल्या मायेच्या मावशीसाठी धावत आली.
वृध्दापकाळात मावशी अगदी एकटी पडली होती. तीला विस्मरणाचा मोठा आजार झाला होता. अन् त्यामुळेच काल तीने स्वतः ला कोंडून घेतले होते.
सखीने मावशीला हाक मारली..तीचा आवाज ऐकून मावशी भानावर आली..
मग गुलूला मदतीला घेऊन मावशीला हळूहळू समजावत सावरत सखीने आपल्या बरोबर येण्यासाठी तयार केले.
मावशी खरतरं त्या काळात जगत नव्हतीच.. तीला तीचे तरुणपण आठवत होते. अन् म्हणूनच सासरहून माहेरी जावं अशा उत्साहाने ती तयार झाली.
सखीला रडावं कि आनंद मानावा हेच कळत नव्हतं.डोळ्याने गुलुला समजावत सखीने मावशीला गाडीत बसवले, अन् सखी घरी परतली..
घरी आल्यावर अनुरागला सगळा घडलेला प्रकार पुन्हा एकदा सांगितला.. आणि सखी म्हणाली आता मावशी कायमची इथे राहील..चालेल ना?
प्रश्न विचारताना मनात भीती.. चिंता आणि दडपण होते.. कारण अनुरागच्या उत्तरावर सगळेअवलंबून होते.
अनुराग तीला म्हणाला.. "आत्ता रात्र झाली आहे. याविषयावर आपण उद्या बोलू.. आज तू मावशीजवळ रहा.. त्यांना शांत झोप लागू दे."
सखी मानेने हो म्हणाली... रात्रीचे काही तासच तर मधे होते, दिवस उजाडायला.. पण त्या काही तासांवरच सारं अवलंबून होतं..
एकिकडे नवरा काय निर्णय देईल याचे टेंशन.. जर नकारात्मक निर्णय आला तर आपल्याला काय काय करावं लागेल..काय गमवावं लागेल याची भीती..
कारण काय वाट्टेल ते झालं तरी मावशीला आता अशा अवस्थेत सोडून तीला सुखाचा संसार करता आलाच नसता.
एका बाजूला समंजस पत्नीचे कर्तव्य होते.. एका बाजूला ममता.. मावशीची मानसिक आणि शारीरिक स्थिती तीला आपल्या मुलीच्या भुमिकेची जाणीव करुन देणारी होती.
मावशीचे रहाणे संपूर्ण रुटीन लाईफला बदलवून टाकणार आहे.. हे माहिती असून ही तीच्या या भूमिकेला तीला नाकारणं शक्यच नव्हतं.
संसाराची घडी बसलेली होती..पण आजच्या धावपळीच्या आणि चौकट बंद संसारात एखाद्याचे अचानक येणे सगळेच रुटीन डीस्टर्ब करणारे ठरते.
मावशी ठीक होती तोपर्यंत कधीच कसलाच प्रश्न आला नव्हता.
सासुसासरे देखील गावी आपल्या आपल्या व्यापात आणि रोजच्या कामात व्यस्त असायचे..त्यामुळे अशी कधी वेळ येईल याची यत्किंचितही शंका मनात आली नव्हती.
आता मात्र हे सारं वेगळच समोर आलं होतं.. मावशीची अशी स्थिती किती दिवस.. किती महिने..वर्ष...असेल हे कुणीच सांगू शकत नव्हते.
वय जास्त असतं..किंवा अंथरुणावर असती तरी प्रश्न वेगळा होता. वयाची 68 वर्षे च तर अवघी सरली होती...बरं पोटच..मागच पुढच कुणी नाही... म्हणून तर एकमेव सखी आधार...आणि सखीला सुध्दा तीचाच आधार प्रेम.
कारण अवघ्या चार वर्षाच्या सखीला आई सोडून गेली म्हणून बाबांनी मावशीकडे आणून सोडले अन् आपण..फकिरा सारखे निघून गेले.आजमितीला ते जगात आहेत कि नाही माहिती नाही.
एकूणच अनुराग काय ठरवेल..सांगेल ते विश्व सखीच..पण तरीही स्वतः ची ओळख आणि मत ठाम असणारी ती...पण आज मात्र पेचात पडली.
उद्या साठी...काय असेल...परमेश्वर जाणे...कारण विस्मृती झालेल्या माणसांच्या अनेक गोष्टी.. प्रसंग कानावर आलेले होतेच...सगळच अवघड अन् अशुद्ध.
सकाळी सखी उठली...पण मनावरचा ताण डोळ्यातून अन् हालचालीतून जाणवत होता.
सकाळी सखी उठली...पण मनावरचा ताण डोळ्यातून अन् हालचालीतून जाणवत होता.
आर्थिक बाजू भक्कम असली तरी अनुराग अन् सखीला खूप खूप गोष्टी तडजोड करुनच घ्याव्या लागणार होत्या.
एकांत..एकत्र गप्पा... सहवासाचा आनंद किती काळ सोडावा लागणार होता परमेश्वरच जाणत होता.
अन् खरतर या नवरा बायकोच्या नात्याची वीण सैल होते..कि घट्ट बनते..हे अनुराग च्या निर्णयामुळे ठरणार होतं. कारण लग्नाला अजुन फार वर्ष झाली नव्हती.
एक निश्वास सोडून.. सखी उगीच कामात मन रमवू लागली.
अनुरागने सखीला हाक मारली...धडधडत्या मनाने पण तरीही काही मनात पक्क ठरवल्यासारखी सखी समोर आली.
अनुरागच्या हातात काही तरी वस्तू होती..सखीने लक्षपूर्वक पाहिले.. लग्नाच्या रुखवतात ठेवलेली सप्तपदीची पावलं.\
त्यातल शेवटचे अन् महत्त्वाचे पाऊल तीच्या हातात आणून दिलं...अन् डोक्यावर ुन हात फिरवत म्हणाला..वाच...विसरली असलीस तर.
सखीने..पावलावर नजर फिरवली..'अंतिम वचन, जे हे पवित्र गठबंधन अधिक मजबूत बनवतं. एकमेकांवर प्रेम करण्याचं, विश्वास आणि सहयोग देण्याचं वचन यावेळी देण्यात येतं. दोघेही कायम एकमेकांचे मित्र होतील अशी शपथ घेतात.
कोणत्याही परिस्थितीत एकमेकांबरोबर न डगमगता उभं राहण्याचंही वचन यावेळी देण्यात येतं. तसंच आयुष्यात काहीही झालं तरीही एकमेकांबरोबर नेहमी खरं बोलायला हवं ही सत्य परिस्थितीदेखील यावेळी वचनातून समोर येते.
आपल्या आयुष्यातील गोडवा आणि प्रेम कायम असंच राहो अशीही यावेळी देवाकडे प्रार्थना करण्यात येते.
अनुरागच्या या कृतीने तीच्या सगळ्या शंका फोल ठरवल्या.. अनुरागकडे अभिमान आणि प्रेमाने
बघत सखी म्हणाली.." गौरीहाराजवळ बसून अन्नपुर्णेजवळ मागितलेले वरदान आज पुर्णत्वास आलं..आज एकाच वेळी आईला... आणि मुलीचे कर्तव्य पुर्ण करु पहाणाऱ्या तुमच्या पत्नीला जिंकून घेतलंत."
"संसाराचा सारीपाट सगळ्या नात्यांनी समृद्ध व्हावा. यासाठी च तर आपली सगळी धडपड असते... हो ना ?"

अनुराग मनापासून हसला.
कारण मनाने जोडलेली जपलेली नाती मनापासून संभाळायची असतात.. हे तोही जाणत होता.
संसारात असे चढउतार येत राहणार.. परिस्थिती दरवेळी परीक्षा घेत रहाणार हे युगायुगांच सत्य त्यानेही सप्तपदी चालताना जाणून घेतले होतेच की.
© वैदेही जोशी
सदर कथा लेखिका वैदेही जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.